Skip to main content

स्वतंत्र

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 17/02/2013 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांनी सजवित जावे वृत्तांचा ना हव्यास मज वाटे कविता झाली असतो रचनेचा भास मी नाही कुठला पंथी मज नकाच कोठे जुंपू कुणी शोधित जाती खांब मी माझा नाथ स्वयंभू ही माझी स्वतंत्र रचना हे माझे निराळे कूळ तुंम्ही अर्थ शोधुनी जाता तरी गवसत नाही मूळ एकाकी या वळणावर मी पुढे चालतो आहे. शब्दांचा नाजुक गजरा मी मनी माळितो आहे. मज ठाऊक नाही पुढती असणार कोठचे गाव? नसतात तेथल्या गावी कुणी राजा आणिक राव शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जाई जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7235
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

खूप सुंदर
मज ठाऊक नाही पुढती असणार कोठचे गाव? नसतात तेथल्या गावी कुणी राजा आणिक राव शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जाई जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही...
सुरेखच झालीय रचना.

एकाकी या वळणावर मी पुढे चालतो आहे. शब्दांचा नाजुक गजरा मी मनी माळितो आहे.
मस्त!

ह्या ओळी वाचुन मी (अजुन) सावरलो नाही >>>> कुणी शोधित जाती खांब मी माझा नाथ स्वयंभू

In reply to by धन्या

>> गुरुजी (की गुरुची?) विदया गुरुलाच >> परतीक्रिया - अ‍ॅज एक्स्पेक्टेड.. ;) गुर्जी रागावू नका बर्का..

छानच लिहिलंत बुवा!

एकाकी या वळणावर मी पुढे चालतो आहे. शब्दांचा नाजुक गजरा मी मनी माळितो आहे.
सुरेख रचना

In reply to by सांजसंध्या

हेच बोल्तो की बुवा लगे रहो ! बाकी बुवा, माळितो की माळतो ? ( बुवा , स्वस्थ बसवत नाही हो ! - आग्या वेताळाचा दोस्त .)

छान गुर्जी. विदाऊट स्मायल्या आलात. जरा चुकल्याचुकल्यासारखे वाटले. पण छान जमलेय. असेच लिहा (विदाऊट चित्राला विचित्र म्हणले तर चालते का हो, म्हण्जे सचित्रच्या उलट)

काव्यात एक गेयता आहे. आम्हाला मराठिच्या पाठ्यपुस्तकात "घननीळ सागराचा घननाद येत कानी" अशी सुरुवात असनारी एक कविता होती. ही अगदि त्याच मीटारमध्ये आहे. आवडली.

In reply to by मन१

घननीळ सागराचा घननाद येत कानी घुमती दिशादिशात लहरींमधील गाणी चौफेर सुर्यज्वाळा वारा अबोल शांत कोठे समुद्रपक्षी गगनी फिरे निवांत आकाश तेजभारे माडांवरी स्थिरावे भटकी चुकार होडी लाडात संथ धावे वाळुत स्तब्द्ध झाला रेखाकृती किनारा जवळी असुन पाणी अतृप्त तो बिचारा जलधी बरोबरीचे आभासमान नाते त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे सानिध्य सागराचे आकाश पांघराया परी साथ ना कुणाची अस्तित्व सावराया
छान आहे कविता.

बुवा कविता नक्की तुम्हीच लिहिली आहे ना? की कुणी भाडयाने (म्हणजे पैसे घेऊन) तुमच्यासाठी लिहिली आहे? तुमच्या आजवर प्रसवलेल्या कवितांपेक्षा ही पुर्णपणे वेगळी आहे. आणि हसर्‍या बाहूल्या नसल्यामुळे छान वाटतंय :)

मस्त हो आत्मुस! कवितेतल्या वर्णनावरुन मला "मिका" ची आठवण आली. फार छान लिहिलंत आत्मुस! सुरेख कविता. ते खांबाच कडव जरा गंडलय तेव्हढ सुधारा.

शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जावे जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही
बास, कविने फक्त इतकेच करावे, बाकी कविता करवून घेतेच. :) मस्त झालीये.

बुवा, मस्तच....... एकदम शॉक ट्रीटमेंट... कविता वाचल्यावर लेखकाच नाव परत एकदा तपाढुन....चिमटा काढुन.....स्वतःला ... पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

असे होते वय झाले की. कविता वाचल्यावर लेखकाच नाव परत एकदा तपासुन पाहिले....चिमटा काढुन.....स्वतःला ... असे वाचावे... तसदी बद्दल क्षमस्व. पैजारबुवा.

बुवा कविता मस्त,,,, धन्यवाद. शनिवारच्या रामदेव कट्ट्याच्या swsews आठवणीत एक कडवं, पहा जमलंय का? काजुंनी सजवित जावे पिस्त्यांचा ना हव्यास ही पहा रबडी आली असतो आईस्क्रिमचा भास

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद...
चौकटराजा>>> @बाकी बुवा, माळितो की माळतो ? >>> माळतो हेच बरोबर,पण काही ठिकाणी शब्दाला गोलावा आल्याखेरीज समाधान लाभत नाही,म्हणून तसं...इतकच! :-) @( बुवा , स्वस्थ बसवत नाही हो ! - आग्या वेताळाचा दोस्त .) >>> चालायचच... :-) हा(ही) वयाचाच परिणाम! ;-) ================================================================================ धन्या>>> @बुवा कविता नक्की तुम्हीच लिहिली आहे ना?की कुणी भाडयाने (म्हणजे पैसे घेऊन)तुमच्यासाठी लिहिली आहे?>>>धनाजीराव, इतकंही महाग नका करू हो आंम्हाला...!!! :-) @तुमच्या आजवर प्रसवलेल्या कवितांपेक्षा ही पुर्णपणे वेगळी आहे.>>> ही माझी स्वतंत्र रचना हे माझे निराळे कूळ तुंम्ही अर्थ शोधुनी जाता तरी गवसत नाही मूळ........................................................!!! :-) =============================================================================== aparna akshay>>> @ ते खांबाच कडव जरा गंडलय तेव्हढ सुधारा.>>> मी नाही कुठला पंथी मज नकाच कोठे जुंपू कुणी शोधित जाती खांब मी माझा नाथ स्वयंभू>>> मुक्त अर्थ- मी या प्रांतात कुठल्याही नव्या अगर जुन्या पंथबाजीला स्वतःला,बांधून/जुंपुन घेण्यास तयार नाही...तेंव्हा काव्य-रसिकानी मला,कुठल्याही नव्या/जुन्या- काव्यप्रकाराच्या/विचारधारेच्या-प्रवाहाचा पुढचा दुवा-मानु नये-(या अर्थी-खांब-हा शब्द आहे.).,कारण--''मी माझा नाथ स्वयंभू'' आहे...म्हणजे मी उघडपणे या प्रांतात आता बंडखोरी करत आहे. किंवा यापुढे माझा स्वतःचा प्रांत/पंथ/प्रवाह निराळाच असेल. :-) =============================================================================== ज्ञानोबाचे पैजार>>> @कविता वाचल्यावर लेखकाच नाव परत एकदा तपासुन पाहिले....चिमटा काढुन.....स्वतःला ...>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/facebook-cute-giggle-smiley-emoticon.gif मी ही तुमचा प्रतिसाद वाचल्यापासून...असच करून पहात आहे. ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

कुणी शोधित जाती खांब च्या ऐवजी कुणी शोधित जाती झेंडे कारण कंपू गट पक्ष याचे ओळख चिन्ह झेंडा हे असते. बघा शब्दाला किती महत्व आहे काव्यात. खांब या शब्दाने एकदम श्वानपंथाची आठवण होते की नाही ?

In reply to by चौकटराजा

अता याच्यावर मी फार स्पष्टीकरण देत बसत नाही... फक्त शेवतचं एक उदा- देतो...
''तुंम्ही म्हणताय तो खांब काढा,आणी देवळात अंतर्गत जे अनेक खांब असतात,त्यांना देवळाचे खांब म्हणून जसं पहाता,तसं परंपरांचे खांब या रुपक-अर्थानी पहा..''
म्हणजे माझ्या त्याच शब्दावर अडून रहाण्याच्या आग्रहा विषयी कळेल.

आयला!!!!! बुवांची कविता अन तीपण विदौट स्मायली अन टिपिकल कच्चा माल? गोंधळलोच होतो =)) पण नंतर कविता वाचायला सुरुवात केली अन मग एकच शब्द निघाला तोंडातून- "वाहवा!!"
एकाकी या वळणावर मी पुढे चालतो आहे. शब्दांचा नाजुक गजरा मी मनी माळितो आहे. मज ठाऊक नाही पुढती असणार कोठचे गाव? नसतात तेथल्या गावी कुणी राजा आणिक राव शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जाई जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही...
हा उत्तरार्ध विशेष आवडला. जियो!!

ही २ कडवी विशेष भावली मज ठाऊक नाही पुढती असणार कोठचे गाव? नसतात तेथल्या गावी कुणी राजा आणिक राव शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जाई जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही... क्या बात है !!

आवडली कविता