✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

राष्ट्रवादीची राजेशाही

ह
हुप्प्या यांनी
Sun, 02/17/2013 - 00:51  ·  लेख
लेख
आजचा जाणता राजा असा ज्याचा लौकिक बनवला जातो आहे अशा शरद पवारांच्या पक्षात सध्या थाटामाटात विवाहसोहळे, वाढदिवस वगैरे साजरे करायची अहमहिका सुरु असावी असे वाटते आहे. नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात यंदाही दुष्काळाचे रडगाणे चालू असल्यामुळे राजकीय दृष्ट्या असे श्रीमंती उधळपट्टीचे जाहीर प्रदर्शन आपल्या पक्षाला गोत्यात आणू शकते हे जाणत्या राजाने त्वरित जाणले त्यामुळे संबंधित इसमाची, ज्याचे नाव भास्कर जाधव (नगरविकास राज्यमंत्री) खरडपट्टी काढली. बहुधा ती खरडपट्टी मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर टाइपाची असावी असे वाटते. कारण जाणत्या राजाने नापसंती व संबंधित खरडपट्टीलेल्या माणसाने माफी मागितल्यावरही सोहळ्यांची मालिका अव्याहत चालू आहे. भास्कर जाधवाची सबब अशी होती की लग्नाचा अफाट खर्च कुण्या काँट्रॅक्टरने केला म्हणे आणि जाधवाला कल्पनाच नव्हती की इतका खर्च होतो आहे! वा! काय स्पष्टीकरण आहे! आता हा कंत्राटदार काय हरिश्चंद्र आहे का की उगाचच कोट्यावधी रुपये उधळेल? तो आता पुढच्या कंत्राटात सगळे दामदुपटीने वसूल करणार हे तुम्ही आम्हीही जाणतोच की. पवार आता मोठ्या साधेपणाच्या गमजा करत आहेत पण त्यांच्या मुलीचा लग्नसोहळाही आलिशान होता असे अंधुकसे आठवते आहे. चुभूद्याघ्या. इतका अमाप पैसा मिळवणार्‍या आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्र्यांना आपली श्रीमंती मिरवायची दुसरी संधी कुठे मिळणार? उगाच लोकसेवक वगैरे ढोंगे करण्यापेक्षा, होय आम्ही आहोतच पैसेवाले आणि म्हणूनच ते उधळतो आहे हे मान्य करावे झालं. साधेपणा, काटकसर वगैरे कालबाह्य मूल्ये आहेत असे वाटते. तुमचे काय मत?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14486 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

राज्यकर्त्यांचं जाऊ द्या,

रेवती
Sun, 02/17/2013 - 02:34 नवीन
राज्यकर्त्यांचं जाऊ द्या, हुप्प्याजी! गरीब म्हणवणार्‍या समाजात तसेही खर्चीक समारंभ करण्याची चढाओढ आहे. पैसे असण्यानसण्याचा संबंध कमी आहे. कर्ज काढून डामडौल करण्याकडे कल आहे. असे असताना जे खरे श्रीमंत (कोणत्या मार्गाने श्रीमंत झालेत हा विषय वेगळा) आहेत त्यांनी खर्च का नाही करायचा? ;) बरय की! आपल्यालाही बातम्या वाचायला मिळतात! :)
  • Log in or register to post comments

+१

अधिराज
Sun, 02/17/2013 - 11:57 नवीन
कर्ज काढून डामडौल करण्याकडे कल आहे
खाने के वांदे और नाश्ते मे रसगुल्ले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हे वाचा

श्रीरंग_जोशी
Sun, 02/17/2013 - 02:51 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18498811.cms
मी सुप्रियाचे लग्न अत्यंत साधेपणाने लावले होते. दोन लाख लोक आले होते. मात्र, मी साधा मांडव देखिल घातलेला नव्हता. फक्त अक्षता आणि एक पेढाच ठेवला होता, अशी आठवणही त्यांनी बोलून दाखवली.
  • Log in or register to post comments

पवार म्हणतात म्हणून खरे मानायचे का?

हुप्प्या
Sun, 02/17/2013 - 05:57 नवीन
पवार ह्यांची खरे बोलण्याबद्दल फार ख्याती नाही. माझ्या आठवणीप्रमाणे हे लग्नही मोठ्या थाटात झाले होते. कदाचित जाधवांच्या मानाने साधे असे म्हणायचे असेल त्यांना! कदाचित मला चुकीचे आठवत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मी सुप्रियाचे लग्न अत्यंत

सुहास..
Sun, 02/17/2013 - 14:14 नवीन
मी सुप्रियाचे लग्न अत्यंत साधेपणाने लावले होते. दोन लाख लोक आले होते. मात्र, मी साधा मांडव देखिल घातलेला नव्हता. फक्त अक्षता आणि एक पेढाच ठेवला होता, अशी आठवणही त्यांनी बोलून दाखवली. >>>> हि हि हि !! बाकी सुप्रिया चे लग्न साधेपणा ने ( कि लपुन छपुन ? ) का ? का लय वेगळा किस्सा आहे . ( बहुधा जोशी साहेबांना माहीत नसावे की कोणी एकेकाळी महाराष्ट्राच्या विधानसभेत ८०% पाटील आडनाव असलेलं ही एक सरकार होवुन गेले. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अहो पण लपून छपून का? सुळे

llपुण्याचे पेशवेll
Tue, 02/19/2013 - 11:28 नवीन
अहो पण लपून छपून का? सुळे म्हणजे कायस्थच ना! म्हणजे क्षत्रियच झाले की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सुप्रियाचे लग्न

बाळकराम
Sun, 02/17/2013 - 15:17 नवीन
माझी एक आते-बहीण आणि सुप्रिया सुळे एकत्र काम करत होत्या एका कंपनीत (बहुधा इन्फोसिस) साधारणपणे १९८९-९० च्या आसपास. माझी बहीण सुप्रियाच्या लग्नाला गेली होती आणि तीने लग्नावरुन आल्यानंतर जे त्याचे वर्णन केले होते त्यावरुन ते लग्न साधेपणाने नक्कीच झालेले नव्हते. शरद पवारांबद्दल कुणाचे काय मत असेल ते असो, पण सुप्रियाबद्दल माझ्या बहिणीचे आणि इतर सहकार्‍यांचे मत मात्र एकदम चांगले आहे- एकदम साधी, सिन्सियर मुलगी होती ती. तिच्या वडिलांबद्दल किंवा राजकारणाबद्दल कधी फारशी बोलायची नाही किंवा वडिलांच्या मोठेपणाचा बडेजाव सुद्धा कधी तिच्या वागण्या-बोलण्यात दिसायचा नाही. त्यामुळे ती पुढे कधी राजकारणात जाईल असे त्यांना वाटले नव्हते. हे अर्थात तिच्या लग्नाच्या आधीच्या वागणूक आणि अनुभवावरुन. पवार फॅमिलीशी आमचा जो काही वैयक्तिक स्तरावर संबंध आला आहे त्यावरुन ती माणसे (अजित पवार सोडून, अर्थात) निदान वागायला आणि बोलायला तरी सरळ आहेत. (विशेषत: तुम्ही निरुपद्रवी या सदरात मोडत असला तर). त्यावागण्या वरुन तरी हे लोक महाराष्ट्रातील सर्वात मोठी माफिया गँग चालवतात हे सकृद्दर्शनी खरे वाटत नाही. (अर्थात, ही वस्तुस्थिती आहे हा भाग अलहिदा). पण आधी म्हटलं तसं हे लोक वैयक्तिक आणि राजकीय संबंध पूर्णपणे वेगवेगळे ठेवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अर्थातच

श्रीरंग_जोशी
Sun, 02/17/2013 - 07:16 नवीन
शरद पवारांचा विवाह ठरवून केलेल्या पद्धतीने झाला होता. पहिल्या भेटीच्यावेळी प्रतिभा यांना त्यांनी त्यांची एकमेव अट सांगितली. 'मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने समाजापुढे आदर्श निर्माण करणे माझे कर्तव्य मानतो. त्यामुळेच मला एकाहून अधिक अपत्य नको. मग पहिले अपत्य मुलगा असो वा मुलगी'. प्रतिभाताईंनी हि अट मान्य केली व त्यांचा विवाह झाला. सुप्रियाच्या जन्मानंतर पवारांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. ४५ वर्षांपूर्वीच्या काळात असे काही करणे नक्कीच कौतुकास्पद आहे.
  • Log in or register to post comments

खरं आहे

रामपुरी
Sun, 02/17/2013 - 08:33 नवीन
आणि त्या एका अपत्यासाठी येनंकेनं प्रकारेण एवढी माया गोळा करणं हेही तितकंच कौतुकास्पद आहे. जाता जाता: कोल्हापूरच्या सध्याच्या महाराजांना (कोण मालोजी, शाहू जे असतील ते) राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यासाठी पुण्याच्या आसपासची कित्येक शे एकर जमीन "जाणत्या राजा" ने देणगीदाखल लाटल्याची बोलवा आहे. मगरपट्टा सिटी, लवासा उभारण्यासाठी पैसा येतो तो असा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मगरपट्टा

श्रीरंग_जोशी
Sun, 02/17/2013 - 08:45 नवीन
मगरपट्टा प्रकल्प हा तेथील स्थानिक शेतकऱ्यांचा अत्यंत यशस्वी उपक्रम आहे. इतर राज्येसुद्धा त्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवतात. http://www.esakal.com/esakal/20121110/5281812421416421727.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

जोशीबुबा.

चिंतामणी
Sun, 02/17/2013 - 09:21 नवीन
तुम्ही फारच भोळे आहात बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हा हा हा हा

रामपुरी
Sun, 02/17/2013 - 09:33 नवीन
पवारांच्या समर्थनासाठी 'सकाळ' ची साक्ष... याला काय म्हणावं? HEIGHT OF INNOCENCE की HEIGHT OF UNAWARENESS की आणखी काही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मगरपट्टा प्रकल्पाबद्दल लिहिले होते

श्रीरंग_जोशी
Sun, 02/17/2013 - 09:57 नवीन
खालिल दुव्यावर बरीच माहिती आहे... http://www.rediff.com/money/2007/jan/11bspec.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

खिक

काळा पहाड
Mon, 02/18/2013 - 01:20 नवीन
खिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सर्वाधिक घोटाळे (आणि त्यात

नानबा
Sun, 02/17/2013 - 09:31 नवीन
सर्वाधिक घोटाळे (आणि त्यात गुंतलेले मंत्री) येन केन प्रकारेण पवार किंवा त्यांच्या पक्षाशी संबंधितच कसे काय असतात बुवा?
  • Log in or register to post comments

अहो त्यांचा ग्रुहपाठ झालाय्

श्री गावसेना प्रमुख
Sun, 02/17/2013 - 09:33 नवीन
अहो त्यांचा ग्रुहपाठ झालाय्,ते परीक्षा देताय म्हणे(एक सातबारा सम्राट गेले आता ह्यांना रान मोकळे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

कोल्हापूरच्या राजेंना तिकीट

विलास अध्यापक
Sun, 02/17/2013 - 11:40 नवीन
कोल्हापूरच्या राजेंना तिकीट मिळाले ते सातारच्या राजांच्या हट्टामुळे . त्या वेळची वर्तमानपत्रे पहा.
  • Log in or register to post comments

नाही हो

लॉरी टांगटूंगकर
Sun, 02/17/2013 - 12:16 नवीन
मागच्या वेळेस उदयनराजेच इकडे तिकडे फिरत होते कि तिकीट द्या.. तिकीट द्या करत, कोल्हापूरचे मंडळी त्यांच्या तुलनेत बरेच चांगले आहेत .. शिवेंद्रसिंह यांच्याकडे बोलत नसावात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलास अध्यापक

जाउ द्या हो तेवढीच इकॉनॉमीला

नाना चेंगट
Sun, 02/17/2013 - 11:59 नवीन
जाउ द्या हो तेवढीच इकॉनॉमीला मदत...
  • Log in or register to post comments

पैसा कोणत्या मार्गाने कमवला

अमोल खरे
Sun, 02/17/2013 - 12:04 नवीन
पैसा कोणत्या मार्गाने कमवला ते माहित नाही, पण आता इतका पैसा आहे आणि मुला मुलीचे लग्न आहे म्हणाल्यावर खर्च करणारच ना. माझ्याकडे इतका पैसा असता तर मीही खर्च केला असता. प्रॉब्लेम असा झाला की त्या मंत्र्याचा स्वत:चा बिझनेस वगैरे असता तर त्याला ते जस्टिफाय करता आलं असतं, तो नाही म्हणुन त्याला तो पैसा एका कंत्राटदारा करवी रुट करावा लागला. बाकी लोकं उपाशी आहेत म्हणुन मंत्री त्यांची घरची लग्ने साधेपणाने करतील हा कैच्याकै आशावाद आहे. ह्या लोकांना कसलेही एथिक्स नसतात. माझ्या माहितीत लालबहादुर शास्त्री त्यावेळी बाकी लोकांप्रमाणेच एकदा भात खायचे (भाताची टंचाई होती म्हणे तेव्हा) आणि आता नरेंद्र मोदी दरवर्षी काही खेड्यांमध्ये जाऊन मुलींना शिकवा असं म्हणत घरोघरी जातात. ही दोन उदाहरणे आणि काही कम्युनिस्ट नेते सोडले तर भाजपा / काँग्रेस / शिवसेना / मनसे / राष्ट्रवादी ह्या सर्व पक्षांकडुन इतकी उच्च अपेक्षा ठेवु नये, अपेक्षाभंग होऊ शकतो.
  • Log in or register to post comments

मी मारल्यासारखे करतो. तु रडल्यासारखे कर.

चिंतामणी
Sun, 02/17/2013 - 12:05 नवीन
असाच हा प्रकार असावा. हे वाचा.
  • Log in or register to post comments

उफ

चिंतामणी
Sun, 02/17/2013 - 12:06 नवीन
हे वाचा.
  • Log in or register to post comments

आमदारांच्या वाढदिवसाची बातमी

चिंतामणी
Sun, 02/17/2013 - 13:48 नवीन
सविस्तर वाचा. पिंपरीत जगतापांची शाही पंगत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

फार वर्षापूर्वी शिवसेनेची

आशु जोग
Sun, 02/17/2013 - 12:09 नवीन
फार वर्षापूर्वी शिवसेनेची सत्ता असताना बाळ ठाकरे यांनीदेखील रस्त्यावरील गरीब लोकांसाठी सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा केली होती. रीमोट कंट्रोल स्वतःच्या हातात असताना.
  • Log in or register to post comments

छ्या !

परिकथेतील राजकुमार
Sun, 02/17/2013 - 12:10 नवीन
इनो घ्या ! ज्याची ताकद असेल त्याने कमवावे पैसे आणि उधळावे. ज्याची ताकद असेल त्याने असे कमवणार्‍यांना रोकावे आणि उधळपट्टी थांबवावी. उगा वांझोट्या चर्चा....
  • Log in or register to post comments

+१

मन१
Sun, 02/17/2013 - 14:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

मन१
Sun, 02/17/2013 - 14:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पराशेठ,

चिंतामणी
Sun, 02/17/2013 - 14:55 नवीन
प्रश्ण पैशे उधळण्याचा नाही. सगळ्या जनतेला मुर्ख समजुन मी कसा आहे हे दाखवण्याबद्दल आहे. आणि हे उघळपट्टी करीत आहेत, त्यांनी पैसे सरळ मार्गाने मिळवले आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पिंक

हुप्प्या
Sun, 02/17/2013 - 23:23 नवीन
आपण अशी पिंक टाकाल हे अपेक्षितच होते. पण इतरांकरता, हे इतके वांझोटे वाटत नाही. सामान्य लोकांना विचार मांडायला शरद पवारांसारखे व्यासपीठ मिळत नाही. पण मिसळपाव हे एक उत्तम व्यासपीठ आहे. अनेक क्षेत्रातले लोक इथे उपस्थित असतात. समजा कुणी राजकीय नेता वा त्याचा सेक्रेटरी वा नातेवाईक अशी संस्थळे वाचत असला तर त्यातून बरेच काही घडू शकते. इंटरनेट हळूहळू एक प्रभावी माध्यम बनते आहे. अमेरिकेत त्याची झलक दिसली भारतातही दिसणे शक्य आहे. निवडणुका जवळ येत असताना असे मुद्दे प्रचारात महत्त्वाची कामगिरी करु शकतात. त्या जाधवाच्या विरोधकाने निवडणुकीच्या प्रचारात ह्या कंत्राटदार पुरस्कृत थाटमाटावर रान उठवले तर निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. किंबहुना ह्यामुळेच पवारांना ह्याबद्दल बोलावेसे वाटले. त्यामागे गरीबांचा कळवळा वगैरे आहे असे मला सुतराम वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अमेरिका ज्याप्रमाणे एका हातात

खटासि खट
Sun, 02/17/2013 - 14:18 नवीन
अमेरिका ज्याप्रमाणे एका हातात दंडुका दडवून शांततेच्या गप्पा मारते अगदी तसंच अलिबाबाच्या गुहेवर बसून दारिद्र्य निर्मूलन, दुष्काळ निवारण यावर बोलावे. दुष्काळाचे कारण आपणच आहोत असं जनतेला वाटू नये याची काळजी घ्या, हे आणि इतक्या साध्या साध्या गोष्टी सांगण्यासाठी इतक्या मोठ्या माणसाला आपला वेळ दवडावा लागत असेल तर ते राज्यास लांच्छनास्पद आहे.
  • Log in or register to post comments

खटासि खट अगदी बरोबर

आशु जोग
Sun, 02/17/2013 - 15:45 नवीन
खटासि खट अगदी बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

एक तर

आदूबाळ
Sun, 02/17/2013 - 14:30 नवीन
एक तर
भास्कर जाधवाची सबब अशी होती की लग्नाचा अफाट खर्च कुण्या काँट्रॅक्टरने केला म्हणे आणि जाधवाला कल्पनाच नव्हती की इतका खर्च होतो आहे! वा! काय स्पष्टीकरण आहे!
हे स्पष्टीकरण देणंच निर्लज्जपणाचा कळस आहे.
  • Log in or register to post comments

त्या निमित्ताने तो पैसा

यसवायजी
Sun, 02/17/2013 - 15:38 नवीन
त्या निमित्ताने तो पैसा मार्केटमधे तर येतो. नाहीतर असाच पडून कुजुन जायचा.. करा म्हणावं काय लग्नं करताय ती.. अवांतरः माझं अजुन लग्न नाही झालं.. अशी स्थळं असतील तर सुचवा.. ;)
  • Log in or register to post comments

हे वाचा

श्रीरंग_जोशी
Sun, 02/17/2013 - 23:53 नवीन
http://pmindia.nic.in/assets2011/Shri%20Sharad%20Pawar%20Minister%20of%20Agriculture%20&%20Food%20Processing%20Industries.PDF वरील दुव्यावर (भारताच्या पंतप्रधानांचे अधिकृत संकेतस्थळ) शरद पवार व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचे संपूर्ण तपशील आहेत. जवळजवळ पन्नास वर्षे पगार / व्यवसायातले उत्पन्न व गुंतवणुकींद्वारे मिळणारे उत्पन्न बघता एवढी संपत्ती असणे स्वाभाविक आहे. निवडणूक लढवणार्‍या सर्व व्यक्ती निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील देत असतात. आंतरजालावर वावरणार्‍या अशा सर्व मंडळींना जे राजकारणात असणार्‍यांच्या संपत्तीबाबत पाहिजे तसे दावे करत असतात; नम्र सूचना आहे की आपल्याकडे असलेल्या माहितीचे पुरावे गोळा करून आयकर खाते, अंमलबजावणी संचालनालयाकडे वगैरे तक्रार करावी. तेथे कारवाई न झाल्यास खुशाल बॅ. नाथ पै चौकासारख्या सार्वजनिक स्थळी प्रशासनाची संमती घेऊन उपोषणास बसावे. असले काही न करता कुणाच्याही संपत्तीबाबत अवाजवी दावे करणार्‍यांनी हे ध्यानात घ्यावे की भारतीय कायद्यांनुसार ते कायदेशीर कारवाईस पात्र असतात. भाजपचे पदाधिकारी अतुल भातखळकर यांनी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्यावर माध्यमांत आरोप केल्यावर विलासरावांनी त्यांच्यावर अब्रुनूकसानीचा दावा केला होता. न्यायालयात भातखळकरांना एकही आरोप सिद्ध न करता आल्याने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होण्याची वेळ आली होती. त्यावेळी त्यांनी विलासरावांची माफी मागितली व विलासरावांनी मोठ्या मनाने माफ केले व दावा मागे घेतला.
  • Log in or register to post comments

motor vehivles- NO NO NO NO

यसवायजी
Mon, 02/18/2013 - 00:02 नवीन
म्हंजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

म्हणजे

श्रीरंग_जोशी
Mon, 02/18/2013 - 00:13 नवीन
स्वतःच्या मालकीची गाडी नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

मला पण असंच वाटलं.. पण म्हटलं

यसवायजी
Mon, 02/18/2013 - 00:24 नवीन
मला पण असंच वाटलं.. पण म्हटलं, कन्फर्म करावं.. खरं खोटं साहेब जाणे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वीस वर्षांपूर्वी साहेब

काळा पहाड
Mon, 02/18/2013 - 01:17 नवीन
वीस वर्षांपूर्वी साहेब 'स्वतःच्या नसलेल्या' पजेरोत फिरत होता. सध्या 'स्वतःच्या नसलेल्या' हेलिकॉप्टर मधून फिरतो. स्वतःचे पंचशील मधे नसलेले शेअर विकतो. स्वतःच्या नसलेल्या लवासाची वकिली करतो. स्वतःच्या नसलेल्या वाईन फॅक्टरीज ची वकिली करतो. पण बरोबर आहे. खरं खोटं साहेबच जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

+११११

मैत्र
Mon, 02/18/2013 - 11:14 नवीन
प्रतिसाद आवडल्या गेल्या आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

वरील दुव्यावर (भारताच्या

काळा पहाड
Mon, 02/18/2013 - 01:12 नवीन
वरील दुव्यावर (भारताच्या पंतप्रधानांचे अधिकृत संकेतस्थळ) शरद पवार व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचे संपूर्ण तपशील आहेत. जवळजवळ पन्नास वर्षे पगार / व्यवसायातले उत्पन्न व गुंतवणुकींद्वारे मिळणारे उत्पन्न बघता एवढी संपत्ती असणे स्वाभाविक आहे.
बाकी आम्ही काल जन्माला आलेलो नाही आणि तसे समजण्याची चूक कुणी करू ही नये. आम्ही जे काम करतो त्याला लागणारा आयक्यु हा राष्ट्रवादीच्या सरासरी आयक्यू पेक्षा नक्कीच जास्त आहे.
नम्र सूचना आहे की आपल्याकडे असलेल्या माहितीचे पुरावे गोळा करून आयकर खाते, अंमलबजावणी संचालनालयाकडे वगैरे तक्रार करावी. तेथे कारवाई न झाल्यास खुशाल बॅ. नाथ पै चौकासारख्या सार्वजनिक स्थळी प्रशासनाची संमती घेऊन उपोषणास बसावे.
नम्र सूचना राष्ट्र्वादी ष्टाइल ने लिहिलेली दिसतेय.
असले काही न करता कुणाच्याही संपत्तीबाबत अवाजवी दावे करणार्‍यांनी हे ध्यानात घ्यावे की भारतीय कायद्यांनुसार ते कायदेशीर कारवाईस पात्र असतात.
इथे दावे करणारे बहुतांशी बाहेरच्या देशात आहेत. तेव्हा ते लोक तुमची ही सुचना फाट्यावर मारतील हे ध्यानात घेतल्यास तुमचेच कल्याण होईल. कुणाला एखाद्या पैसे खाणार्‍या भ्रष्टाचार्‍या ची वकीली करण्याची एवढी हौस असेल तर त्यांनी हे ही लक्षात घ्यावे की गाववाल्यांना फसवणे सोपे असते, मिसळपाव वर येणार्‍या उच्च शिक्षाविभूषित लोकांना फसवणे जरा अवघडच असते. तुमच्या वरचे आणि खालचे प्रतिसाद वाचा आणि जनतेचे मत काय आहे हे लक्षात घ्या. गाववाल्यांना गुंडांच्या धमक्या आणि ब्लॉगर्स ना (आपले शील आणि इमान विकणार्‍या) पगारी वकिलांच्या धमक्या हे राष्ट्रवादी ने सोडले तर त्यांना पुढच्या निवडणूकीत मते मागायला लाज वाटणार नाही. काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

बाहेरच्या देशात तर अधिकच काळजी घ्यायला हवी

श्रीरंग_जोशी
Mon, 02/18/2013 - 01:40 नवीन
एकवेळ भारतात तरी कायद्याची अंमलबजावणी कडकपणे होणार नाही. पण बाहेरच्या अनेक देशांत या गोष्टी महागात पडू शकते. अमेरिकेत टॉरेंटवरून चित्रपट डाउनलोड करणार्‍या अनेकांना फटका बसलेला आहे. अन वरील इशारा सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या प्रत्येकाबद्दलच आहे. आरोप करायला कुणाचे काय जाते. अपार्टमेंटमध्ये तन मन धनाने सार्वजनिक काम करणार्‍यांबद्दलही लोक पैसे खाल्ले असे बोलतात. बोललेले एकवेळ न्यायालयात सिद्ध होणार नाही पण आंतरजालावर लिहिलेले सहज सिद्ध होऊ शकते. लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याबरोबर अनेक कर्तव्यांचे पालन करणेही अपेक्षित आहे. शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्रामध्ये हेच शिकवले जाते. बाकी १३+ वर्षे सत्तेत राहून राज्यात कुठलेही मोठे काम न करता राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी पुन्हा पुन्हा कशी निवडून येते हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

बाहेरच्या देशात तर अधिकच काळजी घ्यायला हवी

श्रीरंग_जोशी
Mon, 02/18/2013 - 01:45 नवीन
एकवेळ भारतात तरी कायद्याची अंमलबजावणी कडकपणे होणार नाही. पण बाहेरच्या अनेक देशांत या गोष्टी महागात पडू शकते. अमेरिकेत टॉरेंटवरून चित्रपट डाउनलोड करणार्‍या अनेकांना फटका बसलेला आहे. अन वरील इशारा सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या प्रत्येकाबद्दलच आहे. आरोप करायला कुणाचे काय जाते. अपार्टमेंटमध्ये तन मन धनाने सार्वजनिक काम करणार्‍यांबद्दलही लोक पैसे खाल्ले असे बोलतात. बोललेले एकवेळ न्यायालयात सिद्ध होणार नाही पण आंतरजालावर लिहिलेले सहज सिद्ध होऊ शकते. लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याबरोबर अनेक कर्तव्यांचे पालन करणेही अपेक्षित आहे. शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्रामध्ये हेच शिकवले जाते. बाकी १३+ वर्षे सत्तेत राहून राज्यात कुठलेही मोठे काम न करता राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी पुन्हा पुन्हा कशी निवडून येते हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

राष्ट्रवादी

बाळकराम
Tue, 02/19/2013 - 03:40 नवीन
बाकी १३+ वर्षे सत्तेत राहून राज्यात कुठलेही मोठे काम न करता राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी पुन्हा पुन्हा कशी निवडून येते हा प्रश्न मला नेहमीच पडतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

कळले नाही...

श्रीरंग_जोशी
Tue, 02/19/2013 - 05:12 नवीन
कृपया विस्ताराने सांगाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

एकच फक्त विचारतो. सध्या एका

काळा पहाड
Wed, 02/20/2013 - 00:53 नवीन
एकच फक्त विचारतो. सध्या एका मताची (पिंपरी चिंचवड मध्ये) किंमत काय याची काही कल्पना? पाच हजार हा आकडा कसा वाटतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सहमत

चिंतामणी
Mon, 02/18/2013 - 02:12 नवीन
सहमत सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

सहमती काळा पहाड यानी मांडलेल्या विचारांशी आहे.

चिंतामणी
Mon, 02/18/2013 - 02:14 नवीन
मधल्या पोस्ट्मुळे गैरसमज होउ शकतात म्ह्णून हा खुलासा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

त्या ठोकताळ्यात आकडे लाखात /

खबो जाप
Wed, 02/20/2013 - 16:25 नवीन
त्या ठोकताळ्यात आकडे लाखात / कोटीत लिहायचे राहिले आहे काय हो ......... च्यायल साहेबांच्या कडे 24,69,022 चे दागिने आणि त्यांच्या बायको कडे फक्त 11,00,096 चे .........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

स्पष्टीकरण

श्रीरंग_जोशी
Mon, 02/18/2013 - 06:45 नवीन
मी वर लिहिलेल्या माहितीमध्ये जे लिहिले आहे ते एक जबाबदार नागरिक या नात्याने लिहिलेले आहे. माझा कुठल्याही राजकीय पक्षाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाही. आंतरजालावर कुणी काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे व ते वाचून ज्या व्यक्तिसंबंधी ते लिहिले गेले आहे त्या व्यक्तिस कायदेशीर मार्गाने लिहिणार्‍यावर कारवाईची मागणी करण्याचा पूर्ण हक्क आहे. कुठल्याही प्रकरणात ती बाब ज्या न्यायालयाच्या कार्यकक्षेत येते त्याचा निर्णय दोन्ही बाजूस बाध्य असतो व ठराविक मुदतीत वरील न्यायालयात अपील न केल्यास अंतिम असतो. बाकी सत्ताधारी पक्षांच्या कामगिरीवर असमाधानी असल्यास मी तरी त्यांच्या धोरणांवर व कामगिरीवर योजना वेळेत पूर्ण न करण्याच्या उदाहरणांवरून टिका करतो अन तसे करण्याचा एक नागरिक म्हणून मला पूर्ण हक्क आहे.
  • Log in or register to post comments

बडेजाव मिरवण्यासठी विवाहात

श्रिया
Mon, 02/18/2013 - 13:39 नवीन
बडेजाव मिरवण्यासठी विवाहात खर्च करण्याची प्रवृत्ती राजकारण्यांपूरती मर्यादीत नाही रहिली आहे. लग्न म्हणजे डामडौल, जेवणावळी,रोषणाई यावर केलेला वारेमाप खर्च असा खेडोपाडी सर्वसामान्य माणसाचाही समज होत आहे. कोणाच्या लग्नात जास्त खर्च झाला आणि सर्वाधिक पत्रिका वाटल्या याची चढाओढच असते. हा बडेजाव मिरवण्यासाठी आता फक्त विवाह हेच निमित्त रहिले नसून, १ वर्षाच्या मुलांचा वाढदिवसही अगदी फ्लेक्स वगैरे लावून वारेमाप खर्च करून साजरा केला जातो. हे कमीच म्हणून काही गावांमध्ये तर आजकाल पितृपंधरवडा ही फ्लेक्स लावून आणि मोठमोठ्या जेवणावळी घालून साजरा करायची पद्धत सुरू झाली आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा