✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राष्ट्रवादीची राजेशाही

ह
हुप्प्या यांनी
Sun, 02/17/2013 - 00:51  ·  लेख
लेख
आजचा जाणता राजा असा ज्याचा लौकिक बनवला जातो आहे अशा शरद पवारांच्या पक्षात सध्या थाटामाटात विवाहसोहळे, वाढदिवस वगैरे साजरे करायची अहमहिका सुरु असावी असे वाटते आहे. नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात यंदाही दुष्काळाचे रडगाणे चालू असल्यामुळे राजकीय दृष्ट्या असे श्रीमंती उधळपट्टीचे जाहीर प्रदर्शन आपल्या पक्षाला गोत्यात आणू शकते हे जाणत्या राजाने त्वरित जाणले त्यामुळे संबंधित इसमाची, ज्याचे नाव भास्कर जाधव (नगरविकास राज्यमंत्री) खरडपट्टी काढली. बहुधा ती खरडपट्टी मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर टाइपाची असावी असे वाटते. कारण जाणत्या राजाने नापसंती व संबंधित खरडपट्टीलेल्या माणसाने माफी मागितल्यावरही सोहळ्यांची मालिका अव्याहत चालू आहे. भास्कर जाधवाची सबब अशी होती की लग्नाचा अफाट खर्च कुण्या काँट्रॅक्टरने केला म्हणे आणि जाधवाला कल्पनाच नव्हती की इतका खर्च होतो आहे! वा! काय स्पष्टीकरण आहे! आता हा कंत्राटदार काय हरिश्चंद्र आहे का की उगाचच कोट्यावधी रुपये उधळेल? तो आता पुढच्या कंत्राटात सगळे दामदुपटीने वसूल करणार हे तुम्ही आम्हीही जाणतोच की. पवार आता मोठ्या साधेपणाच्या गमजा करत आहेत पण त्यांच्या मुलीचा लग्नसोहळाही आलिशान होता असे अंधुकसे आठवते आहे. चुभूद्याघ्या. इतका अमाप पैसा मिळवणार्‍या आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्र्यांना आपली श्रीमंती मिरवायची दुसरी संधी कुठे मिळणार? उगाच लोकसेवक वगैरे ढोंगे करण्यापेक्षा, होय आम्ही आहोतच पैसेवाले आणि म्हणूनच ते उधळतो आहे हे मान्य करावे झालं. साधेपणा, काटकसर वगैरे कालबाह्य मूल्ये आहेत असे वाटते. तुमचे काय मत?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14486 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

पितृपंधरवडा ही फ्लेक्स लावून

रेवती
Tue, 02/19/2013 - 05:22 नवीन
पितृपंधरवडा ही फ्लेक्स लावून माझ्या माहितीत भर पडली आणि फिस्सकन् हसू आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

कुणी बडेजाव करो अथवा आपल्या

श्री गावसेना प्रमुख
Mon, 02/18/2013 - 14:39 नवीन
कुणी बडेजाव करो अथवा आपल्या श्रीमंतीच प्रदर्शन करो,त्यामुळे गरीबाला एका वेळेच खायला भेटतय ना.
  • Log in or register to post comments

पण मी काय म्हणतो

इरसाल
Mon, 02/18/2013 - 16:56 नवीन
उडवेनात का ते त्यांचा पैसा. आपण काय करारपत्रकरुन नाय दिला तेन्ला. इचिभैना तो उरवो त्याची पोर उरवो नायतर त्यो बिल्डर उरवो आपन फकस्त म्हावरां खावाचा नी गुमान पराचा.
  • Log in or register to post comments

खरोखर हिंमत असती तर..

हुप्प्या
Tue, 02/19/2013 - 00:31 नवीन
आमचा पैसा आहे आम्हाला हवा तसा वापरू, साठवू, उधळूही हे खरे असते तर पवारांना अशी कान उघडणी का कराविशी वाटली? ती केल्यावर त्या जगतापाने ठणकावून आमचा पैसा, आमची उधळपट्टी ष्टाईलचे टगेगिरीचे उत्तर का दिले नाही? त्याला कंत्राटदाराने सगळे केले, मला माहितच नव्हते अशी मखलाशी का करावी लागली? उत्तर सोपे आहे, अशी उधळपट्टी जनतेच्या डोळ्यात भरते आणि दुष्काळाने पिडत असलेल्या लोकांच्या डोळ्यात सलतेही. राजेशाही असली तरी दर चार पाच वर्षाने मतांचा जोगवा मागायला त्याच दरिद्री लोकांच्या दाराशी जावे लागणार आहे ह्या भीतीने ह्या उधळपट्टीवर पांघरूण घालण्याचे निर्लज्ज प्रयत्न चालू आहेत. एखाद्या उद्योगपतीने आपल्या घरच्या लग्नसोहळ्यात असे केले असते तर त्याला असे स्पष्टीकरण द्यावे लागले नसते.
  • Log in or register to post comments

बरोबर

इरसाल
Tue, 02/19/2013 - 09:53 नवीन
हुप्प्याजी त्या लोकांकडुन ही अपेक्षा करणं रास्त नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

संपत्तीचे प्रदर्शन हा गुन्हा

खटासि खट
Tue, 02/19/2013 - 09:44 नवीन
संपत्तीचे प्रदर्शन हा गुन्हा आहे असा एक अडगळीत पडलेला कायदा झाडून झटकून साफसूफ करून त्याआधारे एखाद्या जबाबदार नागरिकाला आपले कर्तव्य बजावण्यास काही अडचण येईल का ? ( या कायद्यान्वये मुंबईत झालेल्या एका हिरे व्यापा-याच्या शाही विवाहावर कारवाई झाली होती. झाली असतील आता वीस पंचवीस वर्षे )
  • Log in or register to post comments

अजुन एक बातमी

वेताळ
Tue, 02/19/2013 - 09:56 नवीन
सांगली शहराचे राष्ट्रवादी चे महापौर मा. इलियास नायकवडी ह्याचे मुलाचे लग्न अगदी साधेपणाने करणेत आले. २७-३० हजार लोकांचे जेवण केले गेले होते. २७०० किलो मटणाचा वापर केला गेला.
  • Log in or register to post comments

म्हणजे दरडोई फक्त १०० ग्रॅम

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 02/20/2013 - 02:01 नवीन
म्हणजे दरडोई फक्त १०० ग्रॅम मटण ??? एवढे तर आमच्या कडची पोट्टी एकावेळेला वेष्ट करतात... खरेच साधेपणाने केले आहे हो लग्न ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

तेच ना. लै साधेभोळे अन गरीब

बॅटमॅन
Wed, 02/20/2013 - 14:23 नवीन
तेच ना. लै साधेभोळे अन गरीब हो सांगलीचे लोक, पुण्यामुंबैगत कुठली ऐश करायला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

डायरेक भागाकार?

दादा कोंडके
Wed, 02/20/2013 - 17:56 नवीन
बाकीची लोकं शिकरण आणि मटार-उसळ खाणारी असतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ते "दामले वेड्स बापट" अशा

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 02/24/2013 - 01:33 नवीन
ते "दामले वेड्स बापट" अशा प्रकारचे लग्न वाटले नाही म्हणून थेट भागाकार केला हो. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

खरं राव आमचे साहेब....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/19/2013 - 10:22 नवीन
''जे लोक दुष्काळ असतानाही खोट्या प्रतिष्ठेसाठी लग्नसमारंभावर उधळपट्टी करतात त्यांना पक्षातच नव्हे तर सार्वजनिक जीवनातही कोणतेच स्थान नाही अशा कडक शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांची खरडपट्टी काढली'' वरील बातमी वाचतांना बॉ आपल्याला खूप आनंद झाला. पवार साहेबांचा रोखठोकपणा आपल्याला बॉ नेहमीच भावतो. खरा जाणरा राजा आहे. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हम्म.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/19/2013 - 10:27 नवीन
च्यायला, आमच्या साहेबांचा राष्ट्रवादी नेत्यांवर वचक राहीला नै का काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरे झाले.

चिंतामणी
Tue, 02/19/2013 - 10:44 नवीन
तुमच्या लक्षात आली ही गोष्ट. (अवांतर- हिच लिंक मी इथे डकवली होती)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्रर्र सॉरी हं....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/19/2013 - 10:51 नवीन
सॉरी हं शेठ, लिंक पाहिली नव्हती. पण, साहेबांनी अशा प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. आता पुढच्या वर्षी निवडणूका आहेत, अशा लोकांना जनतेसमोर नेणे अवघड होईल. आणि त्याचा परिणाम मतदानावर होईल. महाराष्ट्रात सत्ता आणायची असेल हे असे कार्यकर्ते आणि नेत्यांना आवरलं पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

महाराष्ट्रात सत्ता आणायची

श्री गावसेना प्रमुख
Tue, 02/19/2013 - 10:59 नवीन
महाराष्ट्रात सत्ता आणायची असेल हे असे कार्यकर्ते आणि नेत्यांना आवरलं पाहिजे.
कोणत्या पार्टीच्या आर आर्,जयंत्,जाधव्,क्षीरसागर्,की टगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जर ते असे पैसे खर्च करत

अनिकेतदळवी
Tue, 02/19/2013 - 10:55 नवीन
जर ते असे पैसे खर्च करत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे निदान त्यामुळे तरी त्यांचे पैसे बाहेर पडतील आणि परदेशी खर्च होण्यापेक्षा भारतातच खर्च होतील. त्यामूळे पैसा भारतातच rolling होइल.नाहीतरी दानधर्म करायला सांगितल्यावर ते इतका पैसा नक्कीच देणार नाहीत जितका ते उधळतील :D
  • Log in or register to post comments

"हा सोहळा पाहून माझी झोप

काळा पहाड
Wed, 02/20/2013 - 00:50 नवीन
"हा सोहळा पाहून माझी झोप उडाली" याचा खरा अर्थः "मूर्खांनो, निवडणुका येतायत. पार्टी फंडा साठी पैसे जमा करायचे सोडून लग्नावर कसले खर्च करतायत? पुन्हा या कॉन्ट्रॅक्टर लोकांकडे डबल वसूली करायला तुमचा बाप् जाणार का?"
  • Log in or register to post comments

चकमक

समीरसूर
Wed, 02/20/2013 - 14:13 नवीन
अजितदादांनी 'जाणत्या राजाचे' विधान अगदी खोडरबर वापरून खोडले आहे. त्यांनी जाधवांना पाठिंबा दिला आहे आणि जाधवांना दहा हत्तींचे बळ आले आहे. त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा असो की जाधवांच्या घरचे लग्न असो, अजितदादांनी 'जाणत्या राजाला' पार धुळीला मिळवायचे ठरवलेले दिसते आहे. :-) एका दृष्टीने बरेच आहे. आपसातल्या साठमारीत राष्ट्रवादी रसातळाला गेली तर चांगलेच आहे. तसेही पिंपरी-चिंचवडची महानगरपालिका आणि पुण्याची अर्धी सत्ता या पलिकडे राष्ट्रवादीने १३ वर्षात काय दिवे लावले आहेत? राज्यात सत्ता असून देखील मुख्यमंत्री मात्र काँग्रेसचा असतो हे दुर्लक्षून चालणार नाही. आणि राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे किती सख्य आहे सगळ्या दुनियेला माहिती आहे. स्वबळावर निवडणूक कुणालाच जिंकता येणार नाही हे दोघांनाही माहिती आहे. म्हणून ही आघाडी! अन्यथा तिला काही अर्थ नाही. आणि हो एका मताला पाच-पाच हजार दिले की निवडणूक जिंकणे सोपे जाते हे मी देखील ऐकले आहे. आपली जनता मूर्ख!! बाकी दोष कुणाला आणि का द्यावा? पुढच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे काही तितकेसे खरे दिसत नाही असे वाटते. बाकी मताचा दर डबल केला तरच काही स्कोप आहे. म्हणूनच तर भुजबळ, तटकरे, पवार, आव्हाड ही मंडळी इतकी गबर होत जातात ना!! सिंपल!
  • Log in or register to post comments

भास्कर जाधव यानी जो ;लग्न

अविनाशकुलकर्णी
Wed, 02/20/2013 - 16:53 नवीन
भास्कर जाधव यानी जो ;लग्न समारंभ केला व त्याच्या जेवणावळी उठल्या त्याचे खरकटे २० ट्रक इतके होते असे ऐकण्यात आले ..
  • Log in or register to post comments

त्यांच्यात धमक आहे

प्रसाद१९७१
Wed, 02/20/2013 - 17:08 नवीन
त्यांच्यात धमक आहे मिळवायची आणि उधळायची. तुम्हाला जमत नाही म्हणुन मनगट चावत बसले आहात.
  • Log in or register to post comments

तुमचा प्रॉब्लेम काय आहे नेमका

श्री गावसेना प्रमुख
Wed, 02/20/2013 - 17:10 नवीन
तुमचा प्रॉब्लेम काय आहे नेमका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

हा प्रश्न लेखकाला का मला? मला

प्रसाद१९७१
Wed, 02/20/2013 - 17:14 नवीन
हा प्रश्न लेखकाला का मला? मला काहीच प्रोब्लेम नाही कोणी २५००० च्या जेवणावळी घातल्या तर. माझ्याकडे पैसे असतील तर मी पण घालीन जेवणावळी. तुम्हाला सुद्धा बोलाविन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

त्या जेवणावळीचा पैसा जनतेकडुन

श्री गावसेना प्रमुख
Wed, 02/20/2013 - 17:18 नवीन
त्या जेवणावळीचा पैसा जनतेकडुन लुटलेला आहे,कळत नकळत.म्हणुन ओरड चाललेली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

तेच म्हणत होतो

प्रसाद१९७१
Wed, 02/20/2013 - 17:23 नवीन
तुमच्यात हिंम्मत नाही पैसा कमवायची ( लुटायची किंवा कसाही ) म्हणुन ही जळजळ. जनते कडुन पैसा लुटणे हे काही सोपे काम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

धमक

समीरसूर
Wed, 02/20/2013 - 17:28 नवीन
धमक चांगले काम पूर्ण करण्यात लागते. लोकांना फसवून, लुबाडून, जनतेचा पैसा लाटून पैसा कमवण्यात धमक नाही; हरामखोरपणा लागतो. तो या राजकारण्यांमध्ये पुरेपूर असतो. दमदाटी करून जमिनी लाटायच्या; बंगले हस्तगत करायचे; लोकांचा घामाचा पैसा स्वतःच्या रक्तात, हाडामासांत जिरवायचा; येणार्‍या उद्योगांकडून लाच खायची आणि वरून नेहमीच लोकांच्या तोंडाला पाने पुसायची याला काय म्हणतात ते दुष्काळात होरपळणार्‍या आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून (म्हणजे तब्बल ६६ वर्षे) रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, वाहतूक सेवा, शिक्षण या प्राथमिक गरजांसाठी झिजणार्‍या गावोगावच्या सामान्य माणसाला विचारा. इतक्या वर्षांत राजकारण्याची पोटे मात्र तट्ट फुगतच गेली. कालचे दीडदमडीचे गावपुढारी आजचे कोट्यधीश झाले. शेकडो कोटींची माया काय यांच्या बापजाद्यांनी कष्टाने आणि प्रामाणिकपणे घाम गाळून कमावली आहे? नाही, ती त्यांनी देशाला आणि लोकांना विकून कमवली आहे. सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत. शरद पवार धडाडीचे, मराठी मातीतले, मर्द मराठा म्हणून त्यांची तळी जनतेने उचलली पण ते ही कुचकामी निघाले. त्यांच्या पक्षाने गुंडगिरीचे आणि जातीपातीचे राजकारण महाराष्ट्रात रुजवले. भ्रष्टाचाराची इतकी प्रकरणे कशी काय जाऊन बरोब्बर शरद पवारांना जाऊन चिकटतात? बाकी छगन भुजबळ, तटकरे वगैरेंबाबत तर बोलायलाच नको. स्वतःची स्वतंत्र संस्थानेच तयार केली आहेत या लोकांनी जनतेच्या घामाच्या पैशातून. आणि यांनीच नाही तर प्रत्येक पक्षाच्या नेत्याने अशी संस्थाने उभी केली आहेत. काँग्रेस असो, शिवसेना असो, भाजप असो...सगळे सारखेच लबाड आणि स्वार्थी! एखादाच मोदी गुजरातसारख्या राज्यात खरा विकास घडवून आणू शकतो. बाकी सगळी चोर माकडे! त्यांची संपत्ती त्यांना उधळू देत. आपल्याला मनगट चावत बसायची काही गरज नाही. त्यांच्या संपत्ती उधळण्याचे परिणाम काय होतात हे ही आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. सुरेश जैन तुरुंगात आहे, कलमाडी दिवसभर घरी बसून माशा मारतात असे ऐकले आहे. अजून काय काय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

भाबडेपणा आहे समीरसुर - धमक

प्रसाद१९७१
Wed, 02/20/2013 - 17:39 नवीन
भाबडेपणा आहे समीरसुर - धमक कुठलीही कृती करायला लागते.
दीडदमडीचे गावपुढारी आजचे कोट्यधीश झाले
जर हे दिड दमडीचे लोक जर कोट्याधीश झाले असतील तर तुम्ही तर बन्द्या रुपयाचे, तुम्ही तर अब्जाधीश होयला पाहिजे होते.
लोकांनी जनतेच्या घामाच्या पैशातून. आणि यांनीच नाही तर प्रत्येक पक्षाच्या नेत्याने अशी संस्थाने उभी केली आहेत
मग हेच लोक निवडुन कसे येतात? म्हणजे जनता मुर्ख आहे हे तुम्ही कबूल करताय. मुर्ख लोकांना काय अधिकार दुसर्‍या लोकांच्या कर्तबगारीला हिणवण्याचा
  • Log in or register to post comments

मग हेच लोक निवडुन कसे येतात?

चैदजा
Sat, 02/23/2013 - 21:54 नवीन
मग हेच लोक निवडुन कसे येतात?
१. कारण दुसरा पर्याय नाही. २. राजकारणी लोक अश्या कमावलेल्या पैशात, त्यांच्या निवड्णुक क्षेत्रात बर्‍याचश्या दुय्यम दर्ज्याच्या बाबी पुरसक्रूत करतात. उ.दा. रुग्णवाहिनी, अंत्यविधी. निवड्णुकीच्या वेळी पैसे/दारु वाटणे. मुळात प्रश्न तो नाही. पैसे सगळेच खातात, पण विधायक/रचनात्मक कामे आधी करा. पैसा कमावणे हे दुय्यम महत्वाचे असावे. आजच्या महाराष्ट्रात ९९% राजकरणी पैसे खाण्याला प्रथम महत्व देतात. उगाच नाही यांच्या मलेशियात खाणी आणि न्युझिलंडात शेकडो एकर जागा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

राष्ट्रवादी/काँगेस इतर सगळेच

भिकापाटील
Sat, 02/23/2013 - 22:41 नवीन
राष्ट्रवादी/काँगेस इतर सगळेच एका माळेचे मणी आहेत मग कशाला ठणाना चालू आहे? कोण योग्य आहे ते तरी सांगा आम्हाले. शरद पवार हे नाव बिलं फाडायला सोपे आहे. कुणाही शेंबड्याने उठावे आणि काहीही बकावे......
  • Log in or register to post comments

खाजवून खरुज काढली कुणी?

हुप्प्या
Tue, 02/26/2013 - 00:21 नवीन
जाणत्या राजाने जाणून बुजून ह्या विषयाला हात घातला आहे. थाटामाटात लग्ने होणे हे कायम चालूच असते. पण दुष्काळ असताना अशी लग्ने होऊ नयेत अशी अपेक्षा कुणी बरे केली? जाणत्या राजाने. हा एक भंपकपणा होता निवडणुका जवळ आल्यात म्हणून केलेला. आणि त्याविषयी टीकाटिप्पणी करणे योग्यच होते.. अगदी राजू शेट्टीनेही ह्या बाबतीत जाणत्या राजावर ताशेरे ओढले आहेतच. जाणत्या राजाने जनताही हळुहळू जाणती होते आहे हे लक्षात घ्यावे. -- एक शेंबड्या पोर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिकापाटील

लक्षात येतय का ?शेवटी जाधव

अनामिका
Tue, 02/26/2013 - 01:51 नवीन
लक्षात येतय का ?शेवटी जाधव पुर्वाश्रमीचे शिवसैनिक . त्यांनी अशी अनावश्यक उधळपट्टी करणे थोरल्या पवारांना कसे रुचेल.. येऊनजाऊन जाधव राष्ट्रवादीच्या वळचणीला गेलेले एक क्षुल्लक आश्रित त्यांनी नव्या धन्याची बरोबरी करण्याचे धाडस करावे हे कसे जमायचे?बाकी दुष्काळाच्या नावे बोंबा मारणे हे फक्त दाखवायला. इतके वाईट वाटतेय दुष्काळी परिस्थितिचे तर स्वतःचे भरल्ेल्े खजिन्े स्वयंघोषित जाणत्या राजाने दुष्काळाने पोळलेल्यांसाठी खुले करावे कुणी अडवलय?
  • Log in or register to post comments

शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे

पिंपातला उंदीर
Tue, 02/26/2013 - 17:01 नवीन
शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यानी आपल्या सुपुत्राच्या लग्नात काय दिवे लावले आणि पैशाचा कसा चुराडा कसा केला ते बघा. मायला असले नेते आमच्या मराठवाड्यतच का पैदा होतात https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&ved=0CDAQtwIwAA&url=http%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DK07TM8CqPI0&ei=K5wsUcWyC4eqrAfhkYDYAg&usg=AFQjCNHdijca64PjIZmBhyB9_L5TNIy8Cw
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा