Skip to main content

जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो

लेखक आवशीचो घोव् यांनी रविवार, 16/05/2010 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या सर्व सभासदांना सप्रेम नमस्कार! मित्राबरोबर बोलता बोलता अचानक विषय निघाला असता त्याने एक असे विधान केले की, "जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो." मी विचारले कसं काय? तर तो म्हणाला हिंदू सोडून सर्व धर्मियांवर जन्म झाल्याबरोबर धर्मांतराचे संस्कार होतात. मुसलमान - सुंता ख्रिश्चन - बाप्तिस्मा शिख - अमृत झोराष्ट्रियन - नवजोत जैन - उपदेसम इत्यादी पण हिंदूंवर कोणताही "धर्मांतराचा" संस्कार केला जात नाही. हे विधान कितपत सत्याच्या कसोटीवर उतरणारे आहे याबद्दल मज पामराला काही कल्पना नाही. हिंदू धर्माला सनातन धर्म मानले जाते याचे कारण हेच असावे का? मिपावर याविषयी चर्चा झाल्यास आवडेल. (वर उल्लेखित केलेले विचार हे व्यक्तिगत विचार असून ते पूर्णत: चुकीचेही असू शकतात. मात्र कोणत्याही धर्माच्या व्यक्तींना दुखावण्याचा माझा हेतू नाही.)

वाचने 17422
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

मित्राबरोबर बोलता बोलता अचानक विषय निघाला असता त्याने एक असे विधान केले की,
कंच्या इशयावर, काय आन का बोलत व्हता, ते कळू द्या, म्हंजे उत्तर द्यायाला सोपं जाइल. परवा आमचा पण मित्र बोलता बोलता म्हणाला कि, "जन्माला आल्यावर प्रत्येक मनुष्य हा आधी रडतो."

हिंदू हा धर्म नसून एक जीवनशैली आहे असे विवेकानंद म्हणाले होते. ह्यावर ह्या निमित्ताने थोडा प्रकाश टाकला गेला तर बरे होईल.

In reply to by निनाद मुक्काम …

" हिंदू" ही जीवनशैली आहे हेच खरे आहे.त्यात "प्रमाणा"चा बलात्कार करणारा धर्मग्रंथ नाही नास्तिक माणसाला तेवढाच मान आहे जेवढा आस्तिकाला. परमतत्वाला व्यक्त वा अव्यक्त स्वरूपात व आपल्या स्वता: च्या पद्धतीने पूजावयाची सोय व स्वातंत्र्य आहे. परधर्माच्या देवालाही पूजायाला परवानगी आहे.त्यांच्या धार्मिक स्थळाप्रत जाण्यास मज्जाव नाही व जाउन आला तर अपवित्र झाला असे मानण्याची मानसिकता नाही. गर्व से कहो हम हिंदू है याचा खरा गर्व या मुक्तपणापायी वाटला पाहिजे.

"धर्मांतराचे संस्कार" हा शब्दप्रयोग चुकीचा वाटतो. एखादा मनुष्य जन्माला आला की त्याच्यावर जे संस्कार केले जातात ते त्याच्या माता-पित्याच्या भक्तिचा भाग असतात, त्याला धर्मांतर म्ह्णणे कितपत योग्य आहे? धर्मांतर हे जाणून बुजून वा मारून केले जाते - एकात स्वेच्छा असते तर दुसर्‍यात सक्ती - समज दोन्हींमध्ये असतो. बादवे माझ्या मते, जन्माला येणारा प्रत्येक भारतीय हा हिंदू असतो आणि हिंदू ही एक जीवनशैली आहे - संस्कृती आहे.

ह्याला धर्म म्हणुन न पाहाता एक जीवनशैलि म्हणुन बघावे. असे माझे व्यैयक्तीक मत आहे. कुठेतरि वाचलेले आठवते कि "हिन्दु असायला माणुस हिन्दु म्हणुनच जन्मला यायला हवा" कारण बाकि कुठल्याहि धर्मातुन धर्मांतर करुन हिन्दु होता येत नाहि, तशी कुठलीहि व्यवस्था / विधि / पुजा ह्या जिवनशैलित नाहि. कारण हि जिवनशैलि अस्तित्वात आलि तेव्हा असा कुठलाहि धर्म अस्तित्वात नव्ह्ता कि ज्याचा धर्मांतराच्या आधाराने अंगीकार करता यावा. नंतर नंतर जसे बाकि धर्म प्रस्थापित झालेत तसे तसे लोक धर्मांतर करुन नविन धर्म स्वीकारु लागले.

हिंदू हा धर्म नसून एक जीवनशैली आहे असे विवेकानंद म्हणाले होते.
सहमत आहे. पुढे जेव्हा ह्या बेसिक जीवन प्रणाली शी फारकत घेऊन वेगवेगळ्या जीवन प्रणाली स्वीकारल्या गेल्या तेव्हा त्यांना वेगवेगळी नावं दिली. इस्लाम, खिश्चन वगेरे . आपल्याही जीवन प्रणालीला हिंदू नाव देण्यात आलं. त्यापूर्वी हिंदू नावाचा असा कुठला धर्म नवता. हि जीवन प्रणाली लाखो वर्षांपासून चालत आलेली असल्यामुळे हिंदू धर्माला सनातन म्हणलं जातं.

In reply to by म्हैस

हि जीवन प्रणाली लाखो वर्षांपासून चालत आलेली असल्यामुळे हिंदू धर्माला सनातन म्हणलं जातं.
आफ्रिकेतली माकडेही हिंदूच होती हा शोध या निमित्ताने प्रथमच वाचायला मिळाला आणि हिंदू धर्माच्या अभिमानाने डोळे पाण्याने अगदी डबडबून आले. गर्व से कहो हम हिंदू है!!!

In reply to by बॅटमॅन

होमो सेपिअन सेपिअन्स जवळपास २ लाख वर्षांपूर्वीच अस्तित्वात आल्यामुळे दावा अगदीच फोल नसावा. आफ्रिकेतले होमो सेपिअन सेपिअन सुद्धा हिंदूच होते असं म्हणा हवंतर. ;)

मी सध्या कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी सध्या जिल्हाधिकारी व मामलेदार कचरीचे उंबरे झिजवतोय्,त्यात मला माझ्या खानदानाची नक्की जात कोणती हेच कळत नाहीये. १८७० ते १९०० मराठा देशमुख,१९०० ते १९३० कुणबी,१९३० ते १९५५ हिंदु आणी १९५५ पासुन मराठा. या सगळ्यामुळे कुनबी प्रमाणपत्र काही मिळत नाही.मला हेच कळत नाही माझी जात अथवा पोटजात नक्की कोन आणी कश्यासाठी बदलत होत.त्यामुळे मी नक्की कोन ?