खरे आहे
हे अरबी लोक जगभरात आतंक माजवीत असतात
पण
त्यात सर्वात जास्त तेच स्वतः मरतात
आज पाकीस्तानातही तेच चालू आहे
या लोकांना आपला शेजारी आपला वाटत नाही पण
जगात दुसरीकडचा कुणी आपल्या पंथाचा म्हणून जवळ वाटतो
--
('हे अरबी लोक' म्हटल्याने कुणा भारतीयांच्या भावना दुखावल्या असतील तर आमचा नाइलाज आहे)
द ग्रेट विनायक दामोदर सावरकर यांची सगळी पुस्तकं जर विकत घेउन मन लावुन वाचली तर थोडासा "हिन्दू" म्हणजे कोण ह्या प्रश्ना च्या उत्तरा वर प्रकाश पडेल असा मला वाटते. सुदैवाने ती व्यक्ती मराठी होती महणुन त्यांचे लिखाण हे मराठीतच आहे. म्हणजे कमीत कमी मराठी माणसाला समजन्यात अडचण येणार नाही असे वाटते. त्या पाप बिचार्या एव्ह्ढ्या विद्वान महान मानसाने आपले पुर्न आयुष्य च वेचले हो फक्त ह्या कामासाठी. " सागरा प्राण तळमळला" फार छान कवीता आहे त्यांची. " माझी जन्मठेप" वाचले तर आत्महत्या कुणी करनारच नाही असे कुठे तरी वाचले आहे मी. मी वाचलेय त्यांचे माझी जन्मठेप व भारतीय ईतिहासातील सहा सोनेरी पाने. माझ्या डोक्यात लख्ख उजेड पडला.
मला पडलेले प्रश्न-
१) मुसलमानात सर्कमसीझन काच करतात? साधी गोष्ट आहे. जीथे गरज आहे तीथे निसर्गाने केस दिलेत, छिद्रं दिलीत. सगळं काही गरजेनुसार दिले आहे. जर जी त्वचा कापुन टाकन्यात येते आणी त्याची गरजच नसती तर ती निसर्गाने दिलिच नसती.मुसलमानातील फीमेल सर्कमसीझन तर फारच भयंकर. ज्यु मधे मुलगा जन्मल्याच्या सातव्या दिवसी त्याचे सर्कमसीझन करतात. फार वाईट. हो. जर मुलगा जन्माला आला. त्याला लघवी होत नसेल असे कळले. फोरस्कीन टाईट असल्यामुळे. तर नाईलाजाने त्याचा जीव वाचावा म्हनुन ती थोडीशी कापुन लघवीचा अमार्ग मोकळा करुन देने ही गोष्ट मला कळते.तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, जर मुलाला असा त्रास आहे कळला की आजचे डॉक्टर्स ताबडतोब हे ऑपरेशन करतात.
" माझी जन्मठेप" वाचले तर आत्महत्या कुणी करनारच नाही असे कुठे तरी वाचले आहे मी.
हे जे काही कुठे वाचले आहे ते चूक असावे. स्वतः सावरकरांनीच प्रायोपवेशन करुण प्राणत्याग केला होता. त्यामुळे वरील दावा खरा मानला तर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' वाचले नसावे असे होईल.
स्वतः सावरकरांनीच प्रायोपवेशन करुण प्राणत्याग केला होता. त्यामुळे वरील दावा खरा मानला तर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' वाचले नसावे असे होईल.
प्रायोपवेशन म्हणजे आत्महत्या नाही हे आपणास माहीत नाही असे वाटत नाही. तरी देखील जसे सध्याच्या काळात इच्छामरण अथवा स्वेच्छामरण हा एक शब्द कायद्याने प्रस्थापित करायचा प्रयत्न होत आहे त्याच पठडीतले प्रायोपवेशन आहे. त्यात देखील सावरकरांनी "ही (त्यावेळेस नुसतेच planned असलेले प्रायोपवेशन म्हणजे) आत्महत्या का नाही" याबद्दल देखील आधी लेख लिहून प्रकाशीत केला होता. विनोबांनी जेंव्हा असेच प्रायोपवेशन केले तेंव्हा काहीजण कोर्टात ते आत्महत्या करत आहेत म्हणून तक्रार घेऊन गेले (आत्महत्या करणे बेकायदेशीर आहे), अर्थात कोर्टाने देखील ती आत्महत्या मानली नव्हती. इंदीराजी केवळ एकदा त्यांना विनंती करू शकल्या होत्या (की पुनर्विचार करा म्हणून).
असो.
प्रायोपवेशन म्हणजे जीवनात कृतार्थता आली आणि आता काही उरले नाही (अवघा रंग एक झाला) अशी भावना आली की जीवन संपवायची पद्धत आहे. त्याउलट आत्महत्या ही आयुष्यात आलेल्या निराशेतून केलेली तात्काळ घडणारी कृती आहे.
आत्महत्येत माणूस पाण्यात बुडेल, विष घेईल, गळफास लावेल, कड्यावरून उडी मारेल - थोडक्यात आत्महिंसा करेल. त्यात स्वतःस आणि इतरांना धक्का असतो. पण प्रायोपवेशन ही जीवन पायरी पायरीने संपवायची पद्धत आहे. त्यात त्यामुळे मनुष्यास (काही कारणाने) जमले नाही तर पुर्नविचारास वाव असतो. तसेच नातेवाईक-सहकारी-फॉलोअर्स ना मनाची आणि इतर कसली असेल तर ती तयारी करायला वाव असतो. सावरकरांनी १ फेब्रुवारीस प्रायोपवेशन करत आहे म्हणून जाहीर केले आणि २६ फेब्रुवारीस त्यांचे देहावसन झाले. विनोबांना पण मला वाटते साधारण आठवडाभर वेळ लागला. आत्महत्या इतक्या वेळ चालत नाही.
मला वाटते पार्श्वनाथ जैन या तिर्थंकराने देखील प्रायोपवेशन केले होते. ज्याचा प्रभाव धर्मानंद कोसंबींवर होता. एका (शेवटच्या) क्षणी त्यांना देखील प्रायोपवेशन करावेसे वाटले आणि त्यांनी तसे ते चालू केले. पण गांधीजींनी त्यांना तसे न करायची विनंती केली, जी धर्मानंदांनी ऐकली. पण नंतर काही दिवसांमधे/महीन्यांत त्यांना नैसर्गिक मृत्यू आला.
प्रायोपवेशनात हळू हळू अन्नपाणी वर्ज्य केले जाते आणि देहाच्या हालचाली कमी करत आणल्या जातात. मला वाटते, ते येरागबाळ्याचे काम नाही. कारण त्यातून जे साध्य करायचे आहे ते म्हणजे मृत्यू कधी येईल याची कुणालाच कल्पना असू शकत नाही. विनोबांच्या वेळेस वाचल्याचे अंधुकसे आठवते की जेंव्हा व्यक्ती प्रायोपवेशन करू लागते तेंव्हा त्या व्यक्तीस कमीत कमी त्रास होण्यासाठी बाहेरून काय उपचार केले जातात वगैरे. पण नीटसे आठवत नाही.
जन्मापासून कॅलिफोर्नियातील सद्गुरू सिवया सुब्रम्हण्यम स्वामी यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या जेंव्हा लक्षात आले की त्यावर काही उपाय नाही, तेंव्हा त्यांनी फक्त पेनमेडीकेशन चालू ठेवले आणि बाकी प्रायोपवेशन करून देहत्याग केला.
फार पूर्वी एक उदाहरण ऐकले होते. कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे समाजसेवक (त्यांचे आडनाव बहुधा चांदुरकर) यांनीही असाच प्राणत्याग केला. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी केवळ एका द्राक्षाच्या रसाचे ते सेवन करायचे अन अखेरच्या काही दिवसात केवळ पाणी.
कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे समाजसेवक (त्यांचे आडनाव बहुधा चांदुरकर) यांनीही असाच प्राणत्याग केला.
कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे हे मला देखील आठवत आहे, पण नाव आठवत नाही. त्या वेळेस वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे बहुतेक त्यांचे नाव देखील विनायक असावे. कारण तीन विनायकांनी (सावरकर, विनोबा आणि हे समाजसेवक) प्रायोपवेशन केले असे म्हणले गेल्याचे पुसटसे आठवत आहे...
जैन धर्मामध्ये असणारे "संथारा" व्रत हे प्रायोपवेशनच आहे. दरवर्षी अनेक जैन स्त्रीपुरूष हे व्रत करून जीवन संपवितात. या व्रताचा अंगिकार करणारे अन्नपाण्याचा त्याग करून प्राणत्याग करतात. "संथारा" व्रत घेणे हे जैनांमध्ये अत्यंत उच्च त्याग समजला जातो. हे व्रत सुरू केल्यावर या व्यक्तिला सर्व नातेवाईक, सगेसंबंधी भेटून जातात व प्राणत्यागानंतर मांडी घातलेल्या अवस्थेत अंत्ययात्रा काढली जाते.
प्रायोपवेशन म्हणजे आत्महत्या नव्हे.
"हिंदू" हा शब्द संस्कृत आहे का? काही जणांच्या मते हा शब्द अरबांकडून आला आहे,पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द त्यांच्याकडून आलेला नाही.
सावरकरांच्या मते तो अरबांकडून आलेला नाही त्या आधी देखील वापरला गेलेला आहे, पण संस्कृतमधून आलेला आहे असे त्यांचे म्हणणे नसावे. त्यांच्या मते देशाला सप्तसिंधू असे म्हणले जायचे. बहुतांशी इतर विद्वान देखील सिंधू नदीच्या तिरावरील लोकांना संबोधताना सिंधू नदीच्या संदर्भानेच बोलायचे. पण पर्शिअन्स लोकांच्या भाषेत "स" चा उच्चार "ह" केला जात असल्याने आणि त्यांच्याशी जुना संबंध असल्याने, त्यांनी म्हणलेले "हिंदू" हे जगातील इतर म्हणू लागले. तेच नंतरच्या काळात सिंधूचे इंडस आणि त्यावरून इंडीया असे झाले...
धर्माला अफूची गोळी मानले, तर मनुष्य जन्माला येतो तेंव्हा निर्व्यसनी असतो..
काही जण, मुल जन्मलं की लगेच त्याला 'हिंदु' असं लेबल लावतात..
काही जण थोड्या वर्षांनी काही दुसरे लेबल लावतात.. पण शेवटी ते फक्त 'लेबल'च असतं..
काहीजणांसाठी धर्म ही अफूची गोळी आहे. तर काही जणांसाठी अफू हाच धर्म आहे. धर्माला अफूची गोळी म्हणणार्या कम्युनिस्टांसाठी कम्युनिझम पण अफूच ठरला - धर्मापेक्षाही वाईट, ज्यामुळे ७० वर्षात होत्याचे नव्हते झाले. कम्युनिस्ट सोव्हीएट केजीबीमधील ऑफिसर (नंतरच्या काळात प्रमुख) आणि रशियन अध्यक्ष व्लादीमिर पुतीन सकट सगळे परत धर्माच्या लेबल मागे लागले...
मित्राबरोबर बोलता बोलता अचानक विषय निघाला असता त्याने एक असे विधान केले की,
कंच्या इशयावर, काय आन का बोलत व्हता, ते कळू द्या, म्हंजे उत्तर द्यायाला सोपं जाइल.
परवा आमचा पण मित्र बोलता बोलता म्हणाला कि,
"जन्माला आल्यावर प्रत्येक मनुष्य हा आधी रडतो."
" हिंदू" ही जीवनशैली आहे हेच खरे आहे.त्यात "प्रमाणा"चा बलात्कार करणारा धर्मग्रंथ नाही नास्तिक माणसाला तेवढाच मान आहे जेवढा आस्तिकाला. परमतत्वाला व्यक्त वा अव्यक्त स्वरूपात व आपल्या स्वता: च्या पद्धतीने पूजावयाची सोय व स्वातंत्र्य आहे. परधर्माच्या देवालाही पूजायाला परवानगी आहे.त्यांच्या धार्मिक स्थळाप्रत जाण्यास मज्जाव नाही व जाउन आला
तर अपवित्र झाला असे मानण्याची मानसिकता नाही. गर्व से कहो हम हिंदू है याचा खरा गर्व या मुक्तपणापायी वाटला पाहिजे.
"धर्मांतराचे संस्कार" हा शब्दप्रयोग चुकीचा वाटतो.
एखादा मनुष्य जन्माला आला की त्याच्यावर जे संस्कार केले जातात ते त्याच्या माता-पित्याच्या भक्तिचा भाग असतात, त्याला धर्मांतर म्ह्णणे कितपत योग्य आहे? धर्मांतर हे जाणून बुजून वा मारून केले जाते - एकात स्वेच्छा असते तर दुसर्यात सक्ती - समज दोन्हींमध्ये असतो.
बादवे माझ्या मते, जन्माला येणारा प्रत्येक भारतीय हा हिंदू असतो आणि हिंदू ही एक जीवनशैली आहे - संस्कृती आहे.
ह्याला धर्म म्हणुन न पाहाता एक जीवनशैलि म्हणुन बघावे. असे माझे व्यैयक्तीक मत आहे.
कुठेतरि वाचलेले आठवते कि "हिन्दु असायला माणुस हिन्दु म्हणुनच जन्मला यायला हवा"
कारण बाकि कुठल्याहि धर्मातुन धर्मांतर करुन हिन्दु होता येत नाहि, तशी कुठलीहि व्यवस्था / विधि / पुजा ह्या जिवनशैलित नाहि. कारण हि जिवनशैलि अस्तित्वात आलि तेव्हा असा कुठलाहि धर्म अस्तित्वात नव्ह्ता कि ज्याचा धर्मांतराच्या आधाराने अंगीकार करता यावा. नंतर नंतर जसे बाकि धर्म प्रस्थापित झालेत तसे तसे लोक धर्मांतर करुन नविन धर्म स्वीकारु लागले.
हिंदू हा धर्म नसून एक जीवनशैली आहे असे विवेकानंद म्हणाले होते.
सहमत आहे. पुढे जेव्हा ह्या बेसिक जीवन प्रणाली शी फारकत घेऊन वेगवेगळ्या जीवन प्रणाली स्वीकारल्या गेल्या तेव्हा त्यांना वेगवेगळी नावं दिली. इस्लाम, खिश्चन वगेरे .
आपल्याही जीवन प्रणालीला हिंदू नाव देण्यात आलं. त्यापूर्वी हिंदू नावाचा असा कुठला धर्म नवता. हि जीवन प्रणाली लाखो वर्षांपासून चालत आलेली असल्यामुळे हिंदू धर्माला सनातन म्हणलं जातं.
हि जीवन प्रणाली लाखो वर्षांपासून चालत आलेली असल्यामुळे हिंदू धर्माला सनातन म्हणलं जातं.
आफ्रिकेतली माकडेही हिंदूच होती हा शोध या निमित्ताने प्रथमच वाचायला मिळाला आणि हिंदू धर्माच्या अभिमानाने डोळे पाण्याने अगदी डबडबून आले. गर्व से कहो हम हिंदू है!!!
होमो सेपिअन सेपिअन्स जवळपास २ लाख वर्षांपूर्वीच अस्तित्वात आल्यामुळे दावा अगदीच फोल नसावा. आफ्रिकेतले होमो सेपिअन सेपिअन सुद्धा हिंदूच होते असं म्हणा हवंतर. ;)
मी सध्या कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी सध्या जिल्हाधिकारी व मामलेदार कचरीचे उंबरे झिजवतोय्,त्यात मला माझ्या खानदानाची नक्की जात कोणती हेच कळत नाहीये. १८७० ते १९०० मराठा देशमुख,१९०० ते १९३० कुणबी,१९३० ते १९५५ हिंदु आणी १९५५ पासुन मराठा. या सगळ्यामुळे कुनबी प्रमाणपत्र काही मिळत नाही.मला हेच कळत नाही माझी जात अथवा पोटजात नक्की कोन आणी कश्यासाठी बदलत होत.त्यामुळे मी नक्की कोन ?
प्रतिक्रिया
खरे आहे
असले बलीवर्दनेत्रभञ्जक
असेल बॉ
हिन्दू
शंका
शंका निरसन
विकास, आपण किंवा आजानुकर्ण
अधिक माहिती
या माहितीबद्दल धन्यवाद
आठवत नाही
जैन धर्मामध्ये असणारे "संथारा
माणसा माणसा कधी होशील माणुस
धागा
+१
शक्यता नाकारता येत नाही.
"हिंदू" हा शब्द संस्कृत आहे
किंचित फरक
माहितीबद्दल धन्यवाद.
धर्माला अफूची गोळी मानले, तर
अफू
मित्राबरोबर बोलता बोलता अचानक
हिंदू हा धर्म नसून एक
होय बुवा !
मला वाटते की डॉ.रवी बापट
"धर्मांतराचे संस्कार" हा
हिन्दु धर्म
हिंदू हा धर्म नसून एक
हि जीवन प्रणाली लाखो
होमो सेपिअन सेपिअन्स जवळपास २
अवश्य!
सगळे धर्मआणी जाती घाला चुलीत....