✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो

आ
आवशीचो घोव् यांनी
Sun, 05/16/2010 - 10:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17265 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

हिंदु

अविनाशकुलकर्णी
Sun, 05/16/2010 - 11:46 नवीन
हिंदु हिंदु म्हणुन नुसता जन्माला न येता तो, मराठा,ब्राह्मण, कोळी, शिंपी म्हणुनही जन्माला येत असतो
  • Log in or register to post comments

माझ्या

आवशीचो घोव्
Sun, 05/16/2010 - 12:02 नवीन
माझ्या मित्राचे विधान खरोखर विचार करण्यासारखे आहे की टाकाऊ? यावर मला प्रतिक्रीया अभिप्रेत आहे. जातीबद्दल मी कुठेही उल्लेख केला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

कुठेतरी वाचलंय.

खटासि खट
गुरुवार, 02/14/2013 - 05:46 नवीन
कुठेतरी वाचलंय. मुसलमान म्हटले कि आपण म्हणतो ठीक ख्रिश्चन म्हटले कि आपण म्हणतो ठीक शीख म्हटले कि आपण म्हणतो ठीक पण हिंदू म्हटले कि आपण ठीक म्हणू शकत नाही. हिंदू ही ओळख पूर्ण नाही. कुठली जात हा पुढचा प्रश्न तयार असतो. म्हणूनच जन्माला येणारा हिंदू म्हणून नाही तर जात घेऊन जन्माला येत असतो. धर्मांतर होऊ शकतं पण जात्यांतर नाही. ती अभेद्य आहे. धर्म बदलला तरी जात जात नाही. तुमच्या मित्राचं विधान आता तुम्हीच तपासून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवशीचो घोव्

सहमत

आजानुकर्ण
Sat, 02/16/2013 - 00:18 नवीन
जात हीच पूर्वीची ओळख होती असे दिसते. कारण सगळेच हिंदू! धर्म बदलला तरी जात तशीच राहते. धर्मांतर करुनही भारतातल्या काही ख्रिश्चनांमध्ये ब्राम्हण आणि दलित अशी वर्गवारी आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

भवतु सब्ब मंगलम = सर्वांचे मंगल हो वो

jaypal
Sun, 05/16/2010 - 12:46 नवीन
मला पडलेला प्रश्न= हाजारो / करोडो वर्षांपुर्वी जेंव्हा धर्म ही संकल्प्ना अस्तित्वात आली नव्हती तेंव्हा काय होते ? (माझ्या पुरत मी शोधलेल उत्तर म्हणजे "नर आणि मादी") आपल्याला अजुन माहीती हवी असल्यास कृपया वेदांचा अभ्यास करावा ही विनंती. (अपौरुशेय)वेद मला तरी कुठीही बायस्ड वाटले नाहीत. Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

नाही पटत.

तिमा
Sun, 05/16/2010 - 12:50 नवीन
जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ति ही मनुष्यप्राणी म्हणूनच जन्माला येते. त्यानंतर सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे त्याला धर्म, जात वगैरे चिकटते. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

ह्या

Manoj Katwe
Mon, 05/17/2010 - 08:44 नवीन
ह्या विश्वात फक्त दोनच धर्म आहेत १) चांगला २) वाईट जो मनुष्य आयुष्यभर चांगले कर्म करून जनाला व स्वताला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो तो चांगला, जो फक्त स्वताचेच पोट भरतो तो वाईट. कसला हिंदू आणि कसला मुस्लीम, हे सगळा खेळ माणसानेच तयार केला आहे. सगळ्याचा रक्त एकच आहे, सगळ्यांच्या भावना एकच, पोट एक, पण हे काही leader लोक जी असतात त्यांना राज्य करण्यासाठी काहीतरी हवे म्हणून हे धर्म. सगळे एक झाले तर हे leader लोक राज्य कसे करणार ?
  • Log in or register to post comments

छोटासा आक्षेप

आशु जोग
Wed, 02/13/2013 - 20:11 नवीन
छोटासा आक्षेप जैन शीख हे हिंदू संस्कृतीचेच भाग आहेत
  • Log in or register to post comments

आक्षेपाला आक्षेप.

आनंदी गोपाळ
Fri, 02/15/2013 - 20:22 नवीन
तुमचे विधान चुकीचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

इतिहासदृष्ट्या ते विधान बरोबर

बॅटमॅन
Fri, 02/15/2013 - 22:30 नवीन
इतिहासदृष्ट्या ते विधान बरोबर आहे. पुढे हे धर्म वेगळे झाले ही वस्तुस्थिती असली तरी यांची सांस्कृतिक ओळख ही हिंदुधर्मापेक्षा फार काही वेगळी नाही. किंबहुना आपल्या वेगळ्या सांस्कृतिक ओळखीसाठी मारामारी करणे हा या तीनही धर्मांचा विशेष नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

सहमत

पैसा
Fri, 02/15/2013 - 22:44 नवीन
बौद्ध आणि जैन मत तसेच शीख पंथ असेच पूर्वीपासून ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

थोडे अधिक

विकास
Fri, 02/15/2013 - 22:53 नवीन
खालील माझ्याच एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, हिंदू हा प्रथम भौगोलीक अर्थाने एका भागात रहाणार्‍या समाजासाठी वापरला गेलेला शब्द आहे. नंतर त्याला रिलीजन अर्थाने धर्म चिकटला गेलेला आहे. पण हिंदू संस्कृती ही विविध दर्शन, तत्वज्ञान वगैरेंनी भरलेली आहे. पण त्या सर्वाचे सांगणे "एकम् सत् विप्रा बहुदा वदंती" प्रमाणे एकच आहे.... खालील एकात्मता मंत्र त्याचे चांगले वर्णन करतो. (हिंदी विकीपिडीयामधून)(http://hi.wikipedia.org/wiki/एकात्मता_मंत्र) यं वैदिका मंत्रदृशः पुराणाः इन्द्रं यमं मातरिश्वा नमाहुः | वेदान्तिनो निर्वचनीयमेकम् यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति || शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरीति स्तुवन्ति | बुद्धस्तथार्हन इति बौद्ध जैनाः सत् श्री अकालेति च सिख्ख सन्तः || शास्तेति केचित् कतिचित् कुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या | यं प्रार्थयन्ते जगदीशितारम स एक एव प्रभुरद्वितीयः || एकात्मता मंत्र का अर्थ प्राचीन काल के मंत्र दृष्टा ऋषियों ने जिसे इन्द्र (देवताओं के राजा, वर्षा के देवता), यम (काल के देवता), मातरिश्वा (हर जगह विद्यमान) कहकर पुकारा और जिस एक अनिर्वचनीय (जिसका वर्णन नहीं किया जा सके) को वेदांती (वेद, शास्त्र के ज्ञाता) ब्रह्म शब्द से निर्देश करते हैं. शैव जिसकी शिव और वैष्णव जिसकी विष्णु कहकर स्तुति करते हैं. बौद्ध और जैन जिसे बुद्ध और अरहंत (जिसका कोई अंत न हो ) कहते हैं. जिसे सिख संत सत श्री अकाल (कालातीत या समय से परे का सत्य) कहकर पुकारते हैं. जिस विश्व के स्वामी को कोई शास्ता (शास्त्र निर्माता) तो कोई कुमार (अखंड ब्रह्मचारी), कोई जिसको स्वामी, माता - पिता कहकर भक्तिपूर्वक प्रार्थना करते हैं, वह प्रभु एक ही है और अद्वितीय है यानि उसका कोई दूसरा जोड़ या विकल्प नहीं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हा श्लोक मोस्ट लाईकलि संस्कृत

बॅटमॅन
Fri, 02/15/2013 - 22:58 नवीन
हा श्लोक मोस्ट लाईकलि संस्कृत भारती वाल्यांनी बनविलेला आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

बरोबर आहे तुमचे.

नाना चेंगट
Fri, 02/15/2013 - 23:02 नवीन
बरोबर आहे तुमचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नाही...

विकास
Fri, 02/15/2013 - 23:53 नवीन
उत्सुकतेपोटी गुगगले तर एक या संदर्भातला दुवा मिळाला. या दुव्यातील माहितीनुसार: तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी संस्कृत विद्वान श्री. श्रीपाद भास्कर वर्णेकर यांना भारतीय भूमीत तयार झालेल्या सर्व श्रद्धा-तत्वज्ञानांचे प्रतिनिधित्व करणारा श्लोक/मंत्र लिहायला सांगितला होता. मला वाटते संस्कृत भारती बर्‍यापैकी नंतरची असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

रोचक आहे. धन्यवाद एनीवेज

बॅटमॅन
Sat, 02/16/2013 - 00:00 नवीन
रोचक आहे. धन्यवाद :) एनीवेज उत्तरकालीन आहे हे माहिती होते आणि पहिल्यांदा संस्कृतभारतीमध्ये ऐकल्याने मला वाटले की त्यांनीच रचला असेल. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आठवले का?

अभ्या..
Sat, 02/16/2013 - 00:04 नवीन
काही आठवले बॅट्या? वेर्णेकर....? संस्कृत मंडीत? मला हिच लिंक लागली नव्हती. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वेर्णेकर द नागपुरी!!!!

बॅटमॅन
Sat, 02/16/2013 - 00:08 नवीन
वेर्णेकर द नागपुरी!!!! येस्स, आत्ता आठवले बघ अभ्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

श्लोकबध्द संस्कृत

अभ्या..
Sat, 02/16/2013 - 00:14 नवीन
श्रीधर शास्त्री वेर्णेकरांनी कुमारवयातच स्वा. सावरकरांची भेट घेऊन त्यांच्याच 'याल तर तुमच्या सह......" या प्रसिध्द उद्गाराचे श्लोकबध्द संस्कृत रुपांतर करुन दिल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अरेच्च्या ! मग संस्कृत

नाना चेंगट
Sat, 02/16/2013 - 11:46 नवीन
अरेच्च्या ! मग संस्कृत भारतीचे लोक हा त्यांचा श्लोक असे का सांगतात? जातोच या रविवारी आमच्या इथल्या संस्कृत भारतीच्या बाईंकडे सकाळी सकाळी आणि विचारतो असे का करता म्हणून. वर चहापोहे पण हादडून येतो आणि त्यांच्या पोरांना लवकर ऊठत जा म्हणून डोस पाजून येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अहो नको हो!

पैसा
Sat, 02/16/2013 - 13:53 नवीन
त्यांची मुलं मोठी झाल्यावर मिपावर येऊन तुम्हाला शिव्या घालतील झोपमोड केली म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

ब्येस्ट

अभ्या..
Sat, 02/16/2013 - 14:02 नवीन
=)) =)) =)) राष्ट्रकाकू नं २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हॅ हॅ हॅ

नाना चेंगट
Sat, 02/16/2013 - 14:13 नवीन
हॅ हॅ हॅ आमची निम्मी लाकडं आताच मसणात गेली आहेत,ती पोट्टी मोठी होईसतोवर उरलेली जातील. तेव्हा टेन्शन नाय... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नुसतीच मुलं नाही तर

विकास
Sat, 02/16/2013 - 18:10 नवीन
घरातील स्वैपांकघरात काम करणारी व्यक्ती (स्त्री अथवा पुरूष) देखील म्हणणार, हे मिपाची लोकं घरी येऊन चहापोहे मागून खातात म्हणून. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सगळे जण संस्कृत भारती का

प्यारे१
Sat, 02/16/2013 - 14:09 नवीन
सगळे जण संस्कृत भारती का म्हणत आहेत? 'संस्कारभारती' म्हणा बरं १०० वेळा सगळे जण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

ओ प्यारेलाल मनसुखभाई किरोडीमल

नाना चेंगट
Sat, 02/16/2013 - 14:14 नवीन
ओ प्यारेलाल मनसुखभाई किरोडीमल.. तुम्ही म्हंता ते वायलं आमी म्हंतो ते वायलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वायले

अभ्या..
Sat, 02/16/2013 - 14:17 नवीन
संस्कारभारती म्हणजे होलसेल रांगोळीवाले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

जल्ला हा नाव कंदी आईकला नाय

प्यारे१
Sat, 02/16/2013 - 14:24 नवीन
जल्ला हा नाव कंदी आईकला नाय तां? संस्कार भारती कसा मुटी मुटीनं रांगोल्या काडून फेमस झालं तसा ह्यांनी काय केला नाय काय? बाकी आमीबी मराटीच हाव नाना! आमाले आपलं म्हना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जल्ला त्ये लोकं समदी सन् सन्

नाना चेंगट
Sat, 02/16/2013 - 14:31 नवीन
जल्ला त्ये लोकं समदी सन् सन् सनस स्नस..संस.. संस्क्र..च्यामारी.. संस्क्रीत..संस्क्रूत.. संस्कृत जमलं संस्कृतमधे बोलतात म्हनून नसल आईकला कंदी... ह्यांच्यावालं काम मुटी मुटीच नसतं बाबा... तुमी आपलेच हाय वो... तवा निवांत रावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ते मात्र तसे मानत नाहीत

सचीन
Mon, 12/30/2013 - 16:05 नवीन
ते मात्र तसे मानत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

अहो हिंदु कोणाला म्हणायचं याची व्याख्या काय ते तर सांगा आधि ?

अग्निकोल्हा
Wed, 02/13/2013 - 22:04 नवीन
मग बघुया जन्माला येणारा प्रत्येक जण त्या व्याखेत असतो की नसतो ते.
  • Log in or register to post comments

धागा फालतू वाटला आणि धाग्यातील विचारही.

एस
Wed, 02/13/2013 - 22:41 नवीन
तरीही शतकी धाग्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मलापण!

आदूबाळ
गुरुवार, 02/14/2013 - 00:31 नवीन
धाग्यातल्या विचाराप्रमाणे मनातल्या मनात एक व्हेन (Venn diagram) डायग्रॅम काढून पाहिला आणि जास्तच हसू आलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

च्या आवशीचो घोव!!!!!!!! अगदी

बॅटमॅन
Wed, 02/13/2013 - 23:07 नवीन
च्या आवशीचो घोव!!!!!!!! अगदी नाव आठवतं या काकूचं शीर्षक पाहून. चालूद्या, बिट टू ओल्ड फॉर धिस शिट!
  • Log in or register to post comments

शिवधर्म कुठाय?

काळा पहाड
Wed, 02/13/2013 - 23:12 नवीन
याच्यात शिवधर्माचं नाव नसल्याबद्दल निषेध.
  • Log in or register to post comments

माझा एक मित्र सनातन प्रभात

खटपट्या
गुरुवार, 02/14/2013 - 02:53 नवीन
माझा एक मित्र सनातन प्रभात बरोबर काम करतो. त्याच्या म्हणन्या प्रमाणे हिन्दू धर्म हा सनातन धर्म आहे. जो प्रुथ्वीवरील प्रत्येक प्राणीमात्राला लागू होतो. हे खरे आहे काय? जाणकारान्कडून अधिक माहीतीची अपेक्षा...
  • Log in or register to post comments

काही जण जन्माला आल्यावर काहीच

चावटमेला
गुरुवार, 02/14/2013 - 13:53 नवीन
काही जण जन्माला आल्यावर काहीच नसतात, पण मरताना मात्र वाय झेड म्हणून मरतात (जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्री) चावटमेला
  • Log in or register to post comments

जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र

बॅटमॅन
गुरुवार, 02/14/2013 - 14:06 नवीन
जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्री
असले बलीवर्दनेत्रभञ्जक शब्दसंपुट पाहून सकलशब्दकुंतलत्वग्विच्छेदकचमूत ही अभिनवप्रतिभांकित भर दिसल्याचे निजचक्षूंस समाधानातिशय जाहला. (रघुनाथपंडित आरणीकरांच्या चूर्णिकेचा जबरा फॅन) गॉथमदुष्टनिर्दालक वेनकुलावतंस मार्जारिभर्ता वाल्गुदेय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

अगागागागागा ..

अद्द्या
गुरुवार, 02/14/2013 - 14:55 नवीन
अगागागागागा .. जिभेला गाठ पडली वाचता वाचता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लोल्स

स्पा
गुरुवार, 02/14/2013 - 15:18 नवीन
वाघुळा ठा -हा - र केलंस रे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सकल शब्द कुंत लत्व ग्विच्छेद

स्पा
गुरुवार, 02/14/2013 - 15:19 नवीन
सकल शब्द कुंत लत्व ग्विच्छेद कच मूत
=)) म्हणजे काय रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

च्यायला स्पांडू, कुठे पाहिजे

बॅटमॅन
गुरुवार, 02/14/2013 - 15:44 नवीन
च्यायला स्पांडू, कुठे पाहिजे तिथे शब्द तोडला की अनर्थ होतो रे =)) सकल शब्दकुंतलत्वग्विच्छेदक चमूत = सर्व शब्दांची "बाल की खाल" काढणार्‍या चमूत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(No subject)

स्पा
गुरुवार, 02/14/2013 - 16:08 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खल्लास!

अग्निकोल्हा
Fri, 02/15/2013 - 00:24 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सदर प्रतिसाद वाचून

चावटमेला
गुरुवार, 02/14/2013 - 21:11 नवीन
सदर प्रतिसाद वाचून अस्मादिकांच्या पिंडाला पुढच्या दहा मरणांचे कावळे शिवलेले आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सकलशब्दकुंतलत्वग्विच्छेदक

सूड
गुरुवार, 02/14/2013 - 22:29 नवीन
हे तुलाच जमू शकतं !! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी अगदी !!!

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 02/16/2013 - 15:59 नवीन
अगदी अगदी !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नलदमयंति स्वयंवर आख्यान

चित्रगुप्त
Sun, 12/29/2013 - 22:00 नवीन
रघुनाथपंडित आरणीकरांच्या चूर्णिकेचा जबरा फॅन
रघुनाथ पंडितांचे 'नलदमयंति स्वयंवर आख्यान इथे बघा: http://www.scribd.com/doc/37254081 शार्दुलविक्रीडित, मालिनी, वसंततिलका, वगैरे वगैरे वृत्तांबद्दल (आणि ती चालीत कशी म्हणायची, याबद्दल) साहित्य कुठे मिळेल?) जालावर आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सुदैवाने

बॅटमॅन
Mon, 12/30/2013 - 00:25 नवीन
अरविंद कोल्हटकर यांनी नेहमी येणारी काही वृत्ते कशी गायची याचे विवेचन करणारा एक अतिशय उत्तम व्हिडिओ यूट्यूबवर दिलेला आहे. जनरल वृत्तांबद्दल विवेचनही अतिशय उत्तम आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे: http://www.youtube.com/watch?v=CNnUhll0zzA सुमारे ३१ वृत्ते दिलेली आहेत. ऐका आणि एंजॉय करा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आपली भूमिका

चौकटराजा
गुरुवार, 02/14/2013 - 14:19 नवीन
एकमेकात मारामार्‍या लावून जीवांचे निर्दालन करून उत्पती, स्थिती व लय यातील " लय" साधण्याचा निसर्गाचा एक प्रयत्न म्हणजे धर्माची निर्मिती ! बाकी अनेक मार्ग त्याने शोधलेले आहेतच !
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा