किनारे
[कविवर्य सुरेश भट यांच्या 'मज दोन आसवांना हुलकावता न आले' या ओळीवरची तरही गझल]
मज दोन आसवांना हुलकावता न आले
हसण्यात हुंदक्यांचे कढ दाबता न आले
कितिदा मनात आले, सुखपेरणी करावी
उपटून यातनांचे तण काढता न आले
निमिषात भंग झाली गहिरी, अतूट नाती
परक्याच आपल्यांना समजावता न आले
मरणासवे कितीदा फसवे करार झाले
जगणे नकोच होते, पण टाळता न आले
अनुकूल सूचनांना वगळून चूक केली
प्रतिकूल आर्जवांना धुडकावता न आले
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते
उपभोगता न आले अन् वाटता न आले
अभिजात वेदनेचे जडशीळ जून ओझे
कवटाळले उराशी, भिरकावता न आले
जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही,
गझले, तुझे किनारे पण गाठता न आले !
अप्रतिम आहे एकेक कडवं.
काय बोलु क्रांती !
छान
माय.. तुझ्या चरणांचे
अ प्र ति म !!
गझल अत्तिशय आवडली.
क्रांति
जबरदस्त यार !
जुळवून काफिये मी जपल्या
अनुकूल सूचनांना वगळून चूक
वाह!!
अप्रतिम रचना!
हे घ्या..
क्लास !!
धन्यवाद!
धन्यवाद!
केवळ अप्रतिम!!
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक
झकास
सुरेख!
वा!
खुपच सुन्दर !!!!
अप्रतिम.. सर्व कडवी परत परत
मला गझल फारशी क्ळत नाही. पण
खतरनाक !
सुभानल्लाह!
सहीच...!!!
अवघड आहे बुवा अशी रचना करणं...
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक
छानच ! पण तुमच्या लौकिकास