✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नरेंद्र मोदी: आपत्ती की इष्टापत्ती?

ऋ
ऋषिकेश यांनी
Fri, 02/08/2013 - 12:04  ·  लेख
लेख
गडकरींना 'टाटा, बाय-बाय' केल्यानंतर आलेल्या राजनाथसिंगांच्या आगमनानंतर भाजपामध्ये काही मोठे बदल होताना दिसत आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्षपद वसुंधराराजेंना देणे हे पहिले मोठे पाऊल राजनाथसिंगांनी उचलले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. वसुंधराराजेंचे जनमानसातले स्थान बघावे की काम या संभ्रमात भाजपा असताना, त्यांचे नाव घोषित करून आपण 'ब्लॅकमेलिंग'ला किती सहज बळी पडू शकतो हे राजनाथसिंगांनी दाखवून दिले. गडकरी पक्षाध्यक्ष असेपर्यंत नरेंद्र मोदींचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेणे टाळले जात होते. तेच राजनाथसिंग यांनी वसुंधराराजेंच्या धमक्यांनंतर घेतलेल्या निर्णयानंतर मोदी समर्थक आक्रमक झालेले दिसतात. या पार्श्वभूमीवर लोकसत्तामध्ये आपत्ती की इष्टापत्ती? हा सुनील चावके यांचा लेख वाचनात आला. एकूणच मोदी प्रवासाचा, त्यांना पंतप्रधानाचा उमेदवार घोषित केल्यास निर्माण होऊ शकणार्‍या परिस्थितीचा अंदाज या लेखात चांगला घेतला आहे. हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते?
  • भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का?
  • काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय?
  • मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का?
  • मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय?
  • मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55892 वाचन

💬 प्रतिसाद (172)

प्रतिक्रिया

मीरा कुमार

सिद्धार्थ ४
Sat, 02/09/2013 - 07:55 नवीन
मीरा कुमार ह्याच २०१४ च्या निवडणुकी नंतर पंतप्रधान बनतील. असे दोन शब्द बोलून मी आपली ह्या धाग्यावरून रजा घेतो. (पुढील प्रतिसाद २०१४ च्या निवडणुकी नंतर :D )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्यांच्या

तिमा
Sun, 02/10/2013 - 11:50 नवीन
मीरा कुमारांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करेल. एका दलित असलेल्या व वादग्रस्त नसलेल्या त्यांच्या स्विट्झर्लंडच्या ट्रीपा वादग्रस्त नाहीत वाटतं ? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

माझी ढोबळ मते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/08/2013 - 22:24 नवीन
*भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का ? नाही. *मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का ? नाही. *मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय ? काय सांगावे....! *मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती? सापेक्ष विचार आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मोदी ही इष्टापत्तीच आहे

हुप्प्या
Fri, 02/08/2013 - 22:27 नवीन
राहुलजींसारखे ज्ञानी, त्यागी, पराक्रमी, कर्तबगार उमेदवार पंतप्रधानपदाच्या मैदानात जवळपास उतरल्यातच जमा आहेत. अशा तेजस्वी सूर्यासमोर मोदी बिदींसारखे काजवे चमकू पहात आहेत. त्याचा हा फायदा नक्कीच होईल की ह्या केविलवाण्या लोकांसमोर राहुलजींचे कर्तृत्व अधिकच खुलून दिसेल. थोडक्यात भारताचे युवराज ते भारताचे सम्राट हा राहुलजींचा प्रवास अधिकच सोपा होईल असे वाटते. धर्मांध लोक कधी कधी धर्मनिरपेक्ष लोकांना मदत करतात ती अशी!
  • Log in or register to post comments

राजकारण पैशावर चालते विशेषतः

निनाद मुक्काम …
Fri, 02/08/2013 - 22:44 नवीन
राजकारण पैशावर चालते विशेषतः उद्योग जगताच्या पैशावर मोदींचे नाव पुढे करण्यात उद्योग जगताचा हात असून उद्योजकांनी राजकारणापासून लांब राहावे असा सल्ला शरद यादव ह्यांनी दिला आहे. तेव्हा भाजपला निवडणुकीसाठी पैसा , हवा असेल त्याच सोबत राम मंदिर , पर्यायाने हिंदुत्व असे बासनात बांधलेले विषय परत काढायचे आहेत , जे कुंभमेळ्यात संतांकडून व मग विहिप कडून मोदींचे नाव पंतप्रधान पदासाठी घोषित करणे किंवा भागवतांचे राम मंदिर बाबत उद्गार ह्या साखळी मुळे ह्यावरून स्पष्ट कळून येते. थोडक्यात रथयात्रा निघणार असेल तर अश्या मोहिमेला कट्टर हिंदूत्ववादी म्हणून मोदींच्या पेक्षा दुसरे नाव भाजपकडे नाही , अमेरिका पहिले त्यांचा विसा नाकारते व आता कुठे त्यावर पुनर्विचार होऊ शकतो असे सांगते , त्याच सोबत ब्रिटन गुजरात शी संबंध जोडतात. ह्यावरून ज्या पक्षांची केंद्रात सत्ता नाही त्या पक्षाच्या एका राज्यातील मुख्यमंत्री आंतरराष्ट्रीय पटलावर येणे कौतुकास्पद आहे , अरब राष्ट्रे असो किंवा पाकिस्तान स्वराज माहिती नसतील पण मोदी हे नाव परिचित आहे. अमेरिकेतील धनाढ्य ज्यू ,व गुजराती व पंजाबी अनिवासी लॉबी भारतातील व्यापारी वर्ग ह्यांना मोदी ह्यांनी भारताचा कारभार हातात घेऊन उद्योगाला चालना देणे अपेक्षित आहे , विशेषतः मंदीच्या पार्श्वभूमीवर भारताकडे जगाचे लक्ष आहे , भारतातील नवे तर परदेशातील उद्योजक मोदींच्या कारभाराचे चाहते आहेत , गुजरात चे चीन सोबत औद्योगिक संबंध आहेत. थोडक्यात हिंदुत्व व विकास असे दुधारी मुद्दे मोदी ह्यांच्या कडे आहेत , त्यांच्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही , ह्या देशाने गुजराल , वि पी सिंग , चंद्र शेखर , देवेगौडा सारखे पंतप्रधान पहिले , इंदिरा इज इंडिया हा आणीबाणी चा प्रकार पहिला , वाघांचे पालनपोषण करून त्याच्या भक्ष्यस्थानी पडलेला पंतप्रधान पहिला. तेव्हा आता मोदी ह्यांना विरोध का बरे करावा आता तुम्ही त्यांचे चाहते नसाल पण काही लोक अश्या थाटात त्यांचा विरोध करतात की त्यांच्यापेक्षा डझन भर सुयोग्य उमेदवार विविध पक्षात आहेत.
  • Log in or register to post comments

माझा वरती प्रतिसाद व आतच ही

निनाद मुक्काम …
Sat, 02/09/2013 - 06:03 नवीन
माझा वरती प्रतिसाद व आतच ही बातमी वाचली , ह्याआधी शैलेंद्र ह्यांच्या मोदी ह्यांच्या वरील लेखात प्रतिसाद देतांना मी अमेरिका व ब्रिटनचा ह्यांनी मोदी विषयी बदलेले ग्रह ह्याच्याबद्दल हवाला दिला होता , आता युरोपीय युनियन ने गुजरात व मोदींसाठी रेड कार्पेट पसरले आहे. राजकारणात टायमिंग महत्त्वाचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात तर जास्तच जर्मन वेळा पाळण्यात एकदम पटाईत, मोदी ह्यांच्या पंतप्रधानपदी दाव्याचा धुराळा खाली बसतो इतक्यात ही घोषणा झाली. दिलगिरी व्यक्त केल्याने जर गुजरात राज्याचा व पर्यायाने भारताचा विकास होणार असेल तर शाब्दिक खेळ खेळावयास मोदींचे काय जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

माझ्या पहिल्या प्रतिसादावर

निनाद मुक्काम …
Wed, 02/13/2013 - 23:01 नवीन
माझ्या पहिल्या प्रतिसादावर शिक्कामोर्तब करणारी ही बातमी , ह्या आधी येथे आपले राष्ट्रपती कलाम ह्यांचे तेथे भाषण अत्यंत प्रभावी ठरले होते ,] २७ देशाच्या उपस्थितीत भारताच्या राज्याचा एका मुख्यमंत्र्याला आमंत्रित करणे कौतुकास्पद आहे , राजकीय ओवी ,अभंग आता रात्रंदिन मोदींचे स्मरण चिंतन-मनन नरेंद्राचे... भाजपचा तारक, काँग्रेसचा मारक प्रतीक असे तो हिंदुत्वाचे... गुजरातकडे दावुनिया बोट करू राजकारण विकासाचे... सत्तेसाठी असे हा सारा प्रयास रामा संगे गाऊ मोदीगान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

घटनेत बसते का?

विकास
Sat, 02/09/2013 - 05:39 नवीन
भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का? .... मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय?
जे काही भारतीय घटनेबद्दल माहीत आहे त्याप्रमाणे. निवडणूकांमंतर बहुमतवाला पक्षाचे (आघाडी)चे नवनिर्वाचीत खासदार एकत्रितपणे त्यांचा नेता ठरवतात जो पंतप्रधानपदासाठी राष्ट्रपतींकडे जातो. त्यामुळे अगदी एकट्या भाजपाला बहुमत मिळेल असे गृहीत धरले तरी असे भाजपाच्या पक्षिय नेतृत्वाने आधीच जाहीर करणे घटनेत बसेल असे वाटत नाही. कदाचीत म्हणूनच एकंदरीत कुठलाच पक्ष (बाकी इतर राजकीय कारणांव्यतिरीक्त) या कारणामुळेही आपला पंतप्रधान उमेदवार घोषित करत नसावा. मनमोहनसिंगांना दुसर्‍या वेळेस आधीच जाहीर केले होते? वाजपेयींना मला वाटते निवडणूकीसाठी नेतृत्व दिले होते पण अधिकृत पंतप्रधान उमेदवाद म्हणून घोषीत केले गेले नव्हते. पण लक्षात नाही...
मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती?
मोदींच्या नावाने बोटे मोडणार्‍यांसाठी आपत्ती आहे. (कारण पोटशूळ इतकेच). इतरांसाठी (मोदी समर्थक, अलीप्त वगैरेंसाठी) ही आपत्ती देखील नाही आणि इष्टापत्ती देखील नाही. चांगला कारभार केला तर इष्ट ठरेल, केला नाही तर मागच्या पानावरून पुढे... इतकेच काय ते!
  • Log in or register to post comments

घटनाबाह्यदेखिल नाही

सुनील
Sat, 02/09/2013 - 07:23 नवीन
पंतप्रधानाचे नाव आधी जाहीर करणे हे जसे घटनात्मक बंधन नाही तसेच, आधी जाहीर करणे घटनाबाह्यदेखिल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व.

ऋषिकेश
Wed, 02/13/2013 - 14:21 नवीन
उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व. बाकी, तुमच्याकडून अधिक व्यापक मुद्द्यांची अपेक्षा होती. तुम्ही तांत्रिक मुद्दा पुढे करून चाणाक्षपणे मुळ मुद्द्याला बगल दिली असे म्हणायला वाव आहे ;) बाकी एन्डीएने पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करतात. हे बघा. इतकेच नाही तर २००४ मध्ये काँग्रेस असा उमेदवार उभा करायला घाबरते आहे असा सूर भाजपा आळवत होताच (त्यावरचा 'बिग-फाईट' चा एपिसोडही आठवतो आहे).. आणि गंअम्त म्हणजे तेव्हा काँग्रेसचा बचाव तुम्ही वर म्हणताय तसा होता ;) बाकी विचारलेल्या प्रश्नांवरच असे नाही तर एकूणच या परिस्थितीवर विस्ताराने लिहिता आले तर वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आम्ही कसले...

विकास
Wed, 02/13/2013 - 21:58 नवीन
तुम्ही तांत्रिक मुद्दा पुढे करून चाणाक्षपणे मुळ मुद्द्याला बगल दिली असे म्हणायला वाव आहे
आम्ही कसले चाणाक्ष, आम्ही आपले एकाक्ष - नुसते काव काव करणारे! ;) असो. मला तो प्रश्न खरेच पडला. केवळ तांत्रिक वगैरे काही नाही. आणि तसे देखील मी म्हणले की, "हो हो नमो नमः च" तर काय नितिश कुमार रागवणार आहेत का उद्धव मला मुंबई बंद करणार आहेत? त्यांनाच याचे जास्त पडले असावे, काँग्रेस आणि राष्ट्रवादींना काय बी पडले असेल असे वाटत नाही. निवडणूकीचे पक्ष-आघाडी नेतृत्व म्हणून जाहीर करणे वेगळे पंतप्रधान उमेदवार म्हणून जाहीर करणे वेगळे असेच मला वाटते.
बाकी एन्डीएने पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करतात. हे बघा.
वाजपेयींच्या बाबतीत मी देखील म्हणले होते. पण तरी देखील तुम्ही दिलेल्या बातमीत अडवाणी म्हणले असे आहे. हे काही तांत्रिक मुद्दा म्हणून सांगत नसून, बाय दॅट टाईम, मेडीयाने, "राम का नाम.." च्या ऐवजी "अडवाणी का नाम.." बदनाम केले होते, म्हणून मी उमेदवार नाही हे त्यांना सांगायच होते.
बाकी विचारलेल्या प्रश्नांवरच असे नाही तर एकूणच या परिस्थितीवर विस्ताराने लिहिता आले तर वाचायला आवडेल
या वाक्यातून असे जाणवते की मी मोदी समर्थक आहे त्यामुळे मला काय म्हणायचे आहे ते जाणून घेयचे आहे. आधी देखील अनेकदा म्हणल्याप्रमाणे, मी कुठल्याच पक्षाचा समर्थक नाही आणि व्यक्तीचा तर त्याहूनही नाही. जर चांगले काम करत असेल तर त्याबद्दल आणि तितकाच समर्थक असेन हे देखील नक्की. हं आता कोणी उद्या मला तिकीटच दिले तर वेगळे आहे. ते मग तुम्ही दिले तर तुमच्या नावाने पण जयजयकार करेन. ;) पण तसे होत नाही आणि मी माझे (व्यक्ती)स्वातंत्र्य देखील सोडत नाही अथवा क्रिटीकल थिंकींग सोडत नाही. आणि केवळ या क्रिटीकल थिंकीग पोटी मला जे काही नरेन्द्र मोदी अथवा इतर वेळेस संघाचे demonization करणे चालते ते अमान्य आहे, आक्षेपार्ह आहे. सध्याच्या या (माध्यमातील, केवळ मिपावरीलच नाही) चर्चेस ही पूर्वपिठीका आहे आणि त्याबद्दल आधी बोलणे महत्वाचे आहे. आजपर्यंत नरेन्द्र मोदींना कुठलीही शिक्षा झालेली नाही. गुजरात दंगल भिषण होतीच होती. राज्याचा नेता म्हणून मोदी कुठे कमी पडले - मुद्दामून, चुकून का सगळेच अनपेक्षितपणे नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे याची शहानिशा करणे योग्यच आहे. तशी ती आजपर्यंत झालेली आहे आणि मला तरी त्यांनी मुद्दामून कुठे काही केल्याचे दिसलेले नाही. उद्या तसे दिसले तर माझे मत बदलायला मी तयार आहे. पण उठसूठ त्या दंगलीला वांशिक हत्याकांड /जीनोसाईड -पोग्राम वगैरे म्हण़णे ही माझ्या दृष्टीने विकृती आहे. त्या व्यतिरीक्त ते नियम इतरांसाठी पाळलेले मी कधी पाहीलेले नाहीत. उ.दा. ९३ ची मुंबई दंगल - शिवसेनेच्या नावाने बोंब पण मग तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी काही केले नाही त्याबद्दल काय? नुसती उचलबांगडी? त्यांची चौकशी का नाही? तेच इतर अनेक दंगलींच्या संदर्भात म्हणता येईल. खाली अंशतः ठळक दंगलींचा इतिहास देत आहे: (संदर्भः हिंदूस्थान टाईम्स) फाळणीच्या वेळची दंगल सोडल्यास स्वतंत्र भारतात
  1. १९६१ मध्यप्रदेशात जबलपूर मधे पहीली दंगल झाली. (गंमत म्हणजे गांधीहत्येनंतरची महाराष्ट्रातील हत्याकांड त्यांनी यात धरलेली नाही!)
  2. १९६९ मधे अहमदाबाद दंगलीत १००० च्या घरात माणसे मारली गेली. बातमीत म्हणल्याप्रमाणे इंदिराजींच्या आशिर्वादाने हे झाले होते, जेणे करून मोरारजींचे महत्व कमी होईल.
  3. नंतरच्या काळात उत्तर प्रदेशात अनेक लहानसहान दंगली-दंगे झाले
  4. १९७९ - जमशेदपूर-अलीगढ
  5. १९८० - मोरादाबाद
  6. १९८४ - शिख हत्याकांड
  7. १९८७ - मेरट दंगल. ही कदाचीत धार्मिक-जातीय दंगल नसावी. पण राजीव गांधींच्या दबावामुळे सगळ्यांवरचे खटले काढले गेले असे या माहितीत म्हणलेले आहे.
  8. १९८९ - भागलपूर - परत जातीय-धार्मिक नसावी. पण दंगलच
  9. १९९२ - ६ डिसेंबर नंतर
  10. १९९३ - मुंबई दंगल
  11. २००२ - गुजरात दंगल
यातील एक गुजरात दंगल सोडल्यास इतर कुठल्याही दंगलीत राज्याच्या मुख्यमंत्र्याला असे demonize केले गेले नाही अथवा खटले भरले गेले नाहीत. त्या व्यतिरीक्त वरील दुव्यात मंडल कमिशन मुळे झालेल्या दंगलींचा पण उल्लेख नाही. (मंडल अहवाला योग्य-अयोग्य हा येथे मुद्दा नाही.). पण सगळे कसे गप्प... हे तुम्हाला योग्य वाटते का? हे कळल्यास बरे होईल. बरं, तरी देखील सततचे प्रयत्न करून देखील मोदींवरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत तरी देखील त्यांना तुम्ही किती दिवस राक्षस (अथवा "मौत का सौदागर") समजणार आहात? हा देखील प्रश्न आहेच. आणि हो हे सगळे मी मोदींच्या समर्थनार्थ अथवा ते कस्से निष्पाप आहेत वगैरे म्हणत लिहीत नाही. काँग्रेस मुस्लीमकार्ड वापरते, भाजपा हिंदू कार्ड तर डावे आणि त्यांचे विचारवंत हे वाट्टेल ते करून भय निर्माण करण्यासाठी मोदीकार्ड वापरतात असे वाटते. जितका सामाजीक तोटा हा सद्यस्थितीत मुस्लीम/हिंदू कार्डांमुळे होत नसेल तितका ह्या मोदीकार्डाने होतो असे मला वाटते. म्हणून या समाजभेदाच्या विरोधात मी आहे. तरी देखील तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतो. :-) भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का? इंदिरा गांधी गेल्यावर राजीव गांधींना काय येत होते म्हणून ते पर्याय ठरले? त्यामुळे अमूक एक व्यक्ती म्हणजेच पर्याय अशी अवस्था येण्या इतकी आपली लोकशाही दुर्बल नाही. काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय? अजून दिल्ली दूर आहे. आता अफझल गुरूस फाशी देऊन झाल्यावर जर गृहमंत्रालयाकडून साधी चार्जशीटही साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहीत यांच्या विरोधात कोर्टात सादर केली गेली नाही तर काँग्रेसला शिंद्यांचे वक्तव्य कुपथ्य ठरेल... त्यामुळे नजीकच्या काळात नक्की काय घडणार आहे त्यावर हे अवलंबून असेल. मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का? भाजपा हा संघटनात्मक (केडर बेस्ड) पक्ष आहे. जर भाजपाकडे बहुमत असेल तर ते वेगळ्या पद्धतीने पण चर्चा करून निर्णय घेतील. (राष्ट्रीय पातळीवर ते शक्य आहे. राज्यपातळीवर वेगळी परीस्थिती असू शकते). जर आघाडी असली तर आघाडीच्या मतानुसारच ठरेल असे मला वाटते. मग भाजपाला जर मोदी हवे असतील तर ते पटवण्याचा प्रयत्न करतील त्यात काही गैर नाही. एनीवे, "भाजपामध्ये अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा" आहे जी इतरत्र नाही हे आपल्याला देखील मान्य आहे हे पाहून डोळे पाणावले. ;) मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय? कॉलींग क्लिंटन! माझी अल्पमती: मोदींच्या करीश्म्यामुळे भाजपाला २०० जागा मिळतील असे वाटत नाही. आणि डाव्या विचारवंतांनी आणि माध्यमांनी कितीही बोटे मोडली तरी त्यामुळे पब्लीक स्वतःची मते बनवेल असे वाटत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा... "ऑल पॉलीटीक्स इज लोकल" (बॉस्टनचा अमेरीकन काँग्रेसमधील एक ऐतिहासीक काँग्रेसमन जो सभापती देखील होता, त्याचे हे प्रसिद्ध वाक्य आहे!). मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती? त्याचे उत्तर आधी दिले तेच आहे.... "मोदींच्या नावाने बोटे मोडणार्‍यांसाठी आपत्ती आहे. (कारण पोटशूळ इतकेच). इतरांसाठी (मोदी समर्थक, अलीप्त वगैरेंसाठी) ही आपत्ती देखील नाही आणि इष्टापत्ती देखील नाही. चांगला कारभार केला तर इष्ट ठरेल, केला नाही तर मागच्या पानावरून पुढे... इतकेच काय ते! "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

दंगल?

श्रीरंग_जोशी
Wed, 02/13/2013 - 22:41 नवीन
फेब्रू / मार्च २००२ पासून पुढे काही महिने अत्यंत भीषण व नंतर २००४ च्या मध्यापर्यंत अनेक लहानसहान घटनांमध्ये शेकडो निरपराध लोक मारले गेले. यापूर्वीच्या बहुतांश (मोठ्या) दंगलीमध्ये दोन बाजूंचा सहभाग होता (उदा १९९२ - ९३). गुजरातमध्ये जे घडले त्याची तुलना स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या शिखांच्या शिरकाणाशी होऊ शकते. १९९२-९३ पर्यंतची परिस्थिती व २००२ ते २००४ ची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. १९९२-९३ मध्ये दूरदर्शनखेरीज दुसरी कुठली वृत्तवाहिनीही नव्हती. राज्य सरकार व पोलिसांना अफवा व त्यामुळे होणारी प्राणहानी टाळण्यास फारच मर्यादित अशी (वेगवान) माध्यमे होती. २००२ मध्ये २४ तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या, भ्रमणध्वनी व इंटरनेटदेखील पसरले होते. २००१ पासून गुजरातमध्ये एककलमी कारभार सुरू आहे. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाला एस आय टी स्थापन करण्याचा आदेश द्यावा लागला. एककलमी कारभाराच्या आशीर्वादाने बरेच पुरावे नष्ट केले गेले. गुजरातमध्ये जे घडले ते सर्वांनाच स्पष्टपणे दिसले. आधुनिकतेची कास धरलेल्या भारतासारख्या देशातही असे काही होऊ शकते हाच मुळात मोठा धक्का होता. तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांची देखील मोदींना पदच्युत करण्याची इच्छा होती. दुर्दैवाने भाजपमधील शुक्राचार्यांनी ती हाणून पाडली. अन भाजपने १९९८ सालापासून कष्टाने कमावलेली विश्वासहर्ता जी गमावली ती आजवर भरून काढता आलेली नाही. बाकी मोदी यांची इतर कामगिरीचे वर्णन करायला मी एका चित्रपटाचे उदाहरणा देईन - बहुधा दुल्हेराजा. कादरखानच्या पंचतारांकीत हॉटेलच्या बाहेर गोविंदाचा धाबा असतो. लोक राहत कादरखानच्या हॉटेलात व खात गोविंदाच्या धाब्यात. ६-७ वर्षांपूर्वी लोकसत्तेमध्ये त्यासंबंधी वृत्त आले होते. मोदींची माणसे महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये गुंतवणुकींसाठी येणाऱ्या उद्योगपतींवर नजर ठेवून असतात व नंतर त्यांना महाराष्ट्रात मिळेल त्यापेक्षा अधिक फायद्याचा प्रस्ताव गुजरात सरकारकडून दिला जातो. तोही बरेचदा नियमबाह्य पद्धतीने. मोदींच्या सुदैवाने महाराष्ट्रात १३+ वर्षांपासून असे सरकार आहे की ज्यांचे धोरण 'आग लगे बस्ती में हम अपनी मस्ती में'. महाराष्ट्रात कार्यक्षम सरकार असते तर चित्र खूप वेगळे असते. बाकी मोदींचा एकतंत्री कारभार गुजरातमध्ये यशस्वी झाला असेलही पण भारताच्या पंतप्रधानाला असे वागून चालत नाही. लोक सिद्ध न झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर दिवसरात्र चर्चा करत असतात पण शेकडो निरपराध देशबांधवांच्या शिरकाणाबाबत इतके असंवेदनशील कसे असू शकतात हा मला पडणारा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

...

विकास
Wed, 02/13/2013 - 23:32 नवीन
गुजरातमध्ये जे घडले त्याची तुलना स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या शिखांच्या शिरकाणाशी होऊ शकते.
पण ती तुलना तुमच्या दृष्टीने केवळ हत्याकांडापुरती मर्यादीत ठेवावी का नंतरच्या कायदेशीर कारवाईच्या बाबतीत पण त्याचा विचार करायला हवा? शिख हत्याकांडाचे एका अर्थी समर्थन/बचाव करताना राजीव गांधी काय म्हणाले होते ते आठवते आहे ना? मी आधीच म्हणले आहे की मोदींची चौकशी झाली यात काहीच गैर नाही. अगदी क्रिटिकली करायला हवी आणि तशी ती केली गेली देखील. पण तेच नियम इतरांना लावले गेले का? नसल्यास का नाही? आणि ते तुम्हाला बरोबर वाटते का?
१९९२-९३ पर्यंतची परिस्थिती व २००२ ते २००४ ची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. १९९२-९३ मध्ये दूरदर्शनखेरीज दुसरी कुठली वृत्तवाहिनीही नव्हती. राज्य सरकार व पोलिसांना अफवा व त्यामुळे होणारी प्राणहानी टाळण्यास फारच मर्यादित अशी (वेगवान) माध्यमे होती.
त्याचा काय संबंध? पोलीस काय वृत्तवाहीन्यांच्या आधारे निर्णय घेतात का स्थानिक पोलीसांच्या आणि गुप्तहेर यंत्रणांच्या माहीती आधारे? शिवाय एखादी दंगल चालू झाल्यावर किती वेळात सरकारने अ‍ॅक्शन घेतली हे पण पहायला हवे... मुंबईत तशी अ‍ॅक्शन घेऊन कर्फ्यू कधी जाहीर केला आणि लष्करास कधी बोलावले ते पाहीलेत तर समजेल.
एककलमी कारभाराच्या आशीर्वादाने बरेच पुरावे नष्ट केले गेले.
हे कुठे वाचलेत अथवा कोणी म्हणले आहे?
काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाला एस आय टी स्थापन करण्याचा आदेश द्यावा लागला.
चांगले झाले. त्यांना काय मिळाले नाही असे त्यांचे म्हणणे आहे?
आधुनिकतेची कास धरलेल्या भारतासारख्या देशातही असे काही होऊ शकते हाच मुळात मोठा धक्का होता.
भारताला अधुनिकतेची कास ४८ साली देखील होती, ८४ साली देखील होती, ९२-९३ साली देखील होती आणि अर्थातच २००२-०३ साली देखील होतीच. त्यामुळे धक्का एकदाच का बरं बसतो, ४८ साल लांब आहे, पण ८४, ९२-९३ चे काय करायचे? का तेथे वेगळे नियम? तेथे का नाही अशा सत्ताधार्‍यांच्या चौकशा?
महाराष्ट्रात कार्यक्षम सरकार असते तर चित्र खूप वेगळे असते.
आपलंच नाणं खोट असे तुम्हाला म्हणायचे असेल तर मग त्यासाठी मोदींच्या नावाने का बोटं मोडायची?
बाकी मोदींचा एकतंत्री कारभार गुजरातमध्ये यशस्वी झाला असेलही पण भारताच्या पंतप्रधानाला असे वागून चालत नाही.
म्हणजे कसे वागून चालत नाही? यशस्वी कारभारी? का अजूनही जे त्यांच्या विरोधात सिद्ध झालेले नाही त्या दंगलीच्या निमित्ताने? शिवाय ते पंतप्रधान म्हणून उद्या बहुमताने निवडून आले तर काय म्हणणार?
लोक सिद्ध न झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर दिवसरात्र चर्चा करत असतात पण शेकडो निरपराध देशबांधवांच्या शिरकाणाबाबत इतके असंवेदनशील कसे असू शकतात हा मला पडणारा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
हे तुम्ही मला उद्देशून लिहीले आहे असे समजतो आणि माझ्यावर देखील अत्यंत चुकीची कॉमेंट करत आहात असे नमुद करतो. मी आधी देखील म्हणलेले आहे, इतरत्र देखील म्हणलेले आहे आणि परत म्हणतो: मोदींवरचे आरोप सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा देखील होऊंदेत. पण येथे अजून दोनदा मोदीविरोधक सरकारे येऊन देखील त्यांच्या विरोधात खटला दाखल करू शकली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. किंबहूना अमेरीकेने त्यांना जेंव्हा व्हिसा नाकारला, तेंव्हा पंतप्रधान मनमोहन सिंगांपासून संसदेत त्यांच्या (मोदींच्या) विरोधकांनी देखील अमेरीकेचा निषेध केला होता... माझा हिंसेला विरोध आहे. पण सिलेक्टीव्ह हिंसेला विरोध करणार्‍यांबद्दल मला अधिक विरोध आहे. कारण जे काही देशात समाजफुटीचे गंभीर सामाजीक प्रश्न तयार झाले आहेत, ते अशा सिलेक्टीव्ह विरोधकांमुळे झालेले आहेत. कायद्यासमोर सर्वांना समान ठेवा- एकाला एक आणि एकाला एक असे कायदेपालन आणि न्याय आणि demonization च्या मी विरोधात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

स्पष्टीकरण

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/14/2013 - 01:08 नवीन
२००२ पासून वाचलेल्या व पाहिलेल्या बातम्यांच्या आधारे वरील मुद्दे मांडले आहेत. दुवे शोधता येतीलच पण त्यातून हाशिल काय होणार? मला माझा मुद्दा मांडावासा वाटला तो मी मांडला आहे.
हे तुम्ही मला उद्देशून लिहीले आहे असे समजतो
कॄपया असा समज करून घेऊ नका. जालावर सक्रीय असणार्‍या बहुतांश लोकांकडून होणारे वर्तन जे मी पाहिले त्यावर माझा विचार मी मांडलाय. बाकी २००२ पासून आजवर स्थानिक यंत्रणा मोदींच्या हाताखाली असताना निष्पक्ष चौकशी कशी होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

चौकशी

विकास
गुरुवार, 02/14/2013 - 01:34 नवीन
२००२ पासून वाचलेल्या व पाहिलेल्या बातम्यांच्या आधारे वरील मुद्दे मांडले आहेत.
तुमचे वाचन कमी करत नाही, पण कुठल्ले माध्यम मोदींच्या विरोधात नव्हते?
दुवे शोधता येतीलच पण त्यातून हाशिल काय होणार?
एखाद्या व्यक्तीस "मौत का सौदागर" ठरवताना काय हशील होते? जर काही हशीलच होणार नसेल तर हा "मोदी" विषय तरी कशाला काढायचा? पण तरी देखील काढला जातो. बरं आधी म्हणल्याप्रमाणे सिलेक्टीव्ह हिंसाचाराचा विरोध करत, जे आक्षेपार्ह आहे.
जालावर सक्रीय असणार्‍या बहुतांश लोकांकडून होणारे वर्तन जे मी पाहिले त्यावर माझा विचार मी मांडलाय.
मी आधी देखील म्हणले आहेच की मोदी अथवा कुठल्याही व्यक्तीचे समर्थन करत नाही. अपवाद कदाचीत गुजरातच्या निवडणूका असतील, पण बहुतांशी वेळेस जालावर विषय निघाले आहेत ते मोदी विरोधकांकडून. आता ही चर्चाच घ्या, तुम्हाला काय म्हणायचे आहे, ऋषिकेश मोदी समर्थक आहे?
बाकी २००२ पासून आजवर स्थानिक यंत्रणा मोदींच्या हाताखाली असताना निष्पक्ष चौकशी कशी होणार?
चौकशी ही सुप्रिम कोर्टाकडून (एस आय टी तर्फे) होत आहे/झाली आहे, जे गुजरातमधे नाही आणि स्वतंत्र आहे. त्या व्यतिरीक्त गुजरात सरकारने मला वाटते फक्त एकच, नानावटी आयोग नेमला होता. पण त्यालाच समांतर गुजरात सरकारच्या अख्त्यारीत नसलेले मानवी हक्क आयोग, जस्टीस पी बी सामंत यांचा जनतेतर्फेचा आयोग वगैरेंनी पण कामे केली, मोदींवर टिका केली आहे, पण त्यातील कुठल्याच आयोगाच्या फाईंडींगवरून सुप्रिम कोर्टास मोदींविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे वाटले नाही. म्हणून त्यांनी एस आय टी स्थापले. एस आय टी ला पण यात काही गुन्हेगारी दिसलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

चौकशी

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/14/2013 - 01:54 नवीन
चौकशी परिणामकारक व्हायची असेल तर घटनेनंतर त्वरीत (प्रत्येक घटनेच्या तीव्रतेनुसार काही तास ते काही महिने हा कालावधी) व्हायला हवी. अनेक वर्षे निघून गेल्यावर सिद्ध करण्याइतपत पुरावे शिल्लक तर असायला हवे नं? उदा. ज्या व्यक्तिंनी त्यावेळी न्यायालयात येवून महत्वपूर्ण साक्षी दिल्या असत्या ते आज हयात नसतील किंवा त्यांना आज पुन्हा दुष्टचक्रात अडकायचे नसेल म्हणून पुढे यायचे नसेल तर न्यायालयीन खटले कमजोर होणारच. चीनचाही विकास जोरदार झालेला दिसतो म्हणून भारत सरकारने चीनच्या सरकारसारखी धोरणे राबवावी असे थोडीच आहे. केवळ गुजरातचा जोरदार विकास झाला म्हणून एवढ्या गंभीर घटनांकडे दुर्लक्ष करावे हे मला तरी पटत नाही. १९९२-९३ नंतर गुजरातचे उदाहरण वगळता या तीव्रतेच्या घटना संपूर्ण देशात कुठेच घडल्या नाही हि बाब महत्वाची आहे. देशासाठी भाजप हा सर्वोत्तम पर्याय आहे. अन तो पर्याय अधिक मजबूत व्हावा यासाठी वाजपेयींची ध्येयधोरणे पुढे चालवाली असे मला मनापासून वाटते. नाहीच चालविली तर आणखी काय डुबणार्‍याचे पाय डोहाकडे... :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मोदी नको

आजानुकर्ण
गुरुवार, 02/14/2013 - 02:32 नवीन
तहलकामध्ये गुजरात दंगलीबाबत चांगले लेख आले होते. http://archive.tehelka.com/story_main35.asp?filename=Ne171107DOES_ANYTHING.asp गरोदर स्त्रीचे पोट कापून तिचा गर्भ तलवारीच्या टोकावर नाचवणारे, मुसलमान खासदाराचे हात पाय तोडून नंतर त्याला जिवंत जाळणारे किंवा खड्ड्यात ढकलून काही जणांच्या समूहाला अंगावर इंधन टाकून मारणाऱ्या दंगलखोरांवर किंवा अशा दंगलखोरांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर प्रोऍक्टिवली मोदींनी काय कारवाई केली होती हे वाचायला आवडेल. त्यांच्या मंत्रीमंडळातच दंगलीचे आरोप असणाऱ्या कोणी एक बेन अगदी मागील वर्षापर्यंत होत्या. असो. मोदींचा गुजराती अस्मितावादही प्रखर आहे. समजा उद्या मोदी पंतप्रधान झाले आणि न जाणो मराठी विरुद्ध गुजराती अशी भाषिक दंगल कुठे पेटली तर अशा गुजराती दंगलखोरांकडे दुर्लक्ष करणारे मोदी मला तरी परवडणारे नाहीत. त्यांच्या विकासाची फळे चाखण्यासाठी जिवंत राहायला मला आवडेल. दिल्लीतील शिखविरोधी दंगल, मुंबईतील दंगल (श्रीकृष्ण आयोग रिपोर्ट), बॉंबस्फोट खटला, वगैरे सर्व दंगलीतील आरोपींना शिक्षा व्हावी या मताचा मी आहे अन्यथा सिलेक्टिविटीचाही आरोप व्हायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

असत्य

विकास
Fri, 02/15/2013 - 01:49 नवीन
गरोदर स्त्रीचे ... अशा दंगलखोरांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर प्रोऍक्टिवली मोदींनी काय कारवाई केली होती हे वाचायला आवडेल. असल्या भडक भाषेत जर एखादा उलट प्रचार केला गेला असता (म्हणजे मुस्लीम धर्मियांच्या नावे) तर तात्काळ आक्षेप घेण्यास अगदी मिपावर पण अनेक विचारवंतांची उडी पडली असती. मी जरा वाट बघत होतो की इतरत्र तात्काळ बोलणारे असल्या खोट्या ठरलेल्या बातमीच्या बाबतीत, भले ती अगदी खरी असती तरी भडक भाषा मान्य करतात का? वास्तवीक तशी ती कोणी करायला नको. पण तेथेच तर इंडीया मार खाते. - तथाकथीत विचारवंताने द्वेषमुलक समाजभेद करणे. आणि तो निषेधार्ह आहे. असो. तरी देखील तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. एस आय टी च्या अहवालात काय म्हणले आहे ते नंतर सर्वत्र आलेले आहे. टाईम्स मधील संबंधीत भाग जसाच्या तसा चिकटवत आहे.. NGOs, Teesta spiced up Gujarat riot incidents: SIT ... Many incidents of killings and violence were cooked up, false charges were levelled against then police chief P C Pandey and false witnesses were tutored to give evidence about imaginary incidents, the SIT said in a report submitted before a Bench comprising Justices Arijit Pasayat, P Sathasivam and Aftab Alam. ... Rohtagi also said that 22 witnesses, who had submitted identical affidavits before various courts relating to riot incidents, were questioned by the SIT which found that they had been tutored and handed over the affidavits by Setalvad and that they had not actually witnessed the riot incidents.

The SIT also found no truth in the following incidents widely publicised by the NGOs:

* A pregnant Muslim woman Kausar Banu was gangraped by a mob, who then gouged out the foetus with sharp weapons * Dumping of dead bodies into a well by rioteers at Naroda Patiya * Police botching up investigation into the killing of British nationals, who were on a visit to Gujarat and unfortunately got caught in the riots Rohtagi said: "On a reading of the report, it is clear that horrendous allegations made by the NGOs were false. Stereotyped affidavits were supplied by a social activist and the allegations made in them were found untrue."...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

धन्यवाद

आजानुकर्ण
Fri, 02/15/2013 - 02:08 नवीन
गर्भवती मुस्लिम स्त्रीबाबतची माहिती खोटी असल्याचे वाचून बरे वाटले. काँग्रेस खासदार जाफरी किंवा बेस्ट बेकरी प्रकरण खरे आहे असे दिसते आहे. मात्र यात मोदी यांच्या सरकारने काय कारवाई केली त्याची माहिती तुम्हाला असल्यास द्यावी. किंबहुना केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाव्यतिरिक्त गुजरात सरकारने याबाबत दंगलखोरांवर काय कारवाई केली ही माहिती दिली तर एकंदर प्रकरण समजून घेण्यास मदत होईल. प्रतिसादाच्या सुरुवातीचा भाग काहीच कळला नाही. एखाद्या वाईट घटनेचा निषेध करताना द्वेषमूलक समाजभेद कसा होतो हे कळले नाही. येथे हिंदूंविरुद्धच्या अत्याचाराचे, बाँबस्फोटाचे किंवा दंगलींचे कोणी समर्थन केले आहे काय? गुजरातेत दंगल झाली होती की नाही या गृहितकापासून सुरुवात करायची असल्यास तसेही करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

माहिती

विकास
Fri, 02/15/2013 - 02:58 नवीन
म्हणजे आत्ता पर्यंत माहिती नसतानाच "मोदी नको" म्हणून म्हणत होता तर! आता याला काय म्हणायचे ते तुम्हीच ठरवा. बोंबला, हे म्हणजे एखाद्या बुवाबाबाने काहीतरी म्हणल्यावर त्याच्या मागे टाळ कुटत जाणार्‍यांसारखेच झाले. फरक इतकाच की तेथे कोणीतरी बुवा बाबा असतो येथे टिस्टा सेटलवाड सारखे खोटारडे असतात. बुवा बाबांच्या मागे लागणारे (योग्य नाही पण) केवळ स्वतःचे नुकसान करतात तर टिस्टा आणि तिच्या पाठीमागे जाणारे समाजात खोट्या बातम्या पसरवून समाजात भेद निर्माण करतात. बाकी मी काही गुजरात सरकारचा अथवा मोदींचा समर्थक अथवा प्रवक्ता नाही की काही करून तेच कसे खरे आणि संत आहेत हे सांगायला. जर गुन्हे शाबीत झाले तर त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा करा. पण जे सिद्धपण झाले नाही आणि आता तसे अधिकॄत रिपोर्ट आहेत, त्यातले खोटेपण कवटाळून भडकपणे पब्लीक समोर मांडणे आक्षेपार्ह आहे. ज्या पद्धतीने टिस्टा सेटलवाड आणि पार्टीने आक्रस्ताळेपणा करत हे प्रकरण खोटारडेपणे चिघळत ठेवले त्याची एक भारतीय आणि त्याहूनही अधिक एक माणूस म्हणून किळस येते. केवळ असल्या व्यक्तिंमुळे समाजात तेढ निर्माण होते.
काँग्रेस खासदार जाफरी किंवा बेस्ट बेकरी प्रकरण खरे आहे असे दिसते आहे.
"दिसते आहे" हा १००% नाही पण बर्‍यापैकी योग्य शब्द प्रयोग आहे. गुजरात दंगल झाली, त्यात अनेक मुसलमान आणि हिंदूंची हत्या झाली हे दुर्दैवाने वास्तव आहे. त्यामुळे हिंस्त्रक जमावाकडून हिंसक घटना घडल्या हे देखील अत्यंत घृणास्पद पण सत्यच आहे. पण मुद्दा हा मोदींच्या बाबतीत ज्या हिरीरीने विचहंट केली जात आहे तो आहे. अशा दंगली, हिंसाचार होऊ नयेत असे वाटत असेल तर राजकारण बाजूस ठेवून खर्‍या अर्थाने सर्वांना समान वागणूक दिली पाहीजे. त्यासाठी धर्म-जात वगैरे सर्व व्यक्तीगत ठेवून कायद्यासमोर सर्व समान दिसले पाहीजेत. पण तसे होत नाही. कोणी केले, कोणाच्या राज्यात केले, कशासाठी केले वगैरे सर्व महत्वाचे ठरते. गोध्रा रेल्वे जाळपोळीच्या संदर्भात देखील संसदेत तत्कालीन विरोधकांची (मला वाटते विशेष करून कम्युनिस्टांची) प्रतिक्रीया ही "कारसेवक असे गेलेच का होते, त्यामुळे तुम्ही मुस्लीम समाजाला चिथावलेत", अशा प्रकारची होती. असो. बेस्ट बेकरी प्रकरण आणि काँग्रेस खासदार जाफरी ह्यांची हत्या हे त्याचाच भाग आहे. त्यातील बेस्ट बेकरी प्रकरण हे प्रामुख्याने झहीरा शेख च्या वक्तव्यावर अवलंबून होते. सर्व प्रथम फास्ट ट्रॅक कोर्टात सर्व आरोपींना सोडण्यात आले. (अवांतर: फास्ट ट्रॅक कोर्टाचे तोटे? ) पण फास्ट ट्रॅक असल्याने त्यात सर्व पुरावे नव्हते म्हणून आवाज उठवला गेला. मग गुजरात सरकारने ती केस परत कोर्टात दाखल केली. त्यात आरोपींनाच नाही तर झहीरा शेखला देखील शिक्षा झाली. कारण तीने कोर्टाची फसवणूक केली होती. सगळ्यात विचित्र प्रकार म्हणजे ज्या टिस्टाने तीला पाठींबा दिला, त्या टिस्टाच्या विरोधातच जबानी दिली! परीणामी टिस्टाला देखील तिच्या सबरंगमध्ये "झहीरा खोटे बोलली" म्हणून लिहावे लागले! खासदार जाफरीं हत्येची केस अजून संपलेली नाही. वास्तवीक एस आय टी रिपोर्ट मधे त्या केस मधे तथ्य नसल्याचे एस आय टी ने सांगितले. पण खासदार जाफरींच्या पत्नी झकीरा जाफरींना सुप्रिम कोर्टाने ही केस परत ओपन करण्यासाठी गेल्या आठवड्यातच परवानगी दिली आहे. त्यांची एक तक्रार होती की त्यांना एस आय टी चा रिपोर्ट मिळाला नाही. त्यावरचे खालचे टाईम्स मधील बातमीतले भाष्य रोचक आहे: Gujarat additional advocate general Tushar Mehta said the accused, who stood convicted in six sensitive cases investigated by the SIT, were not given copies of the probe report either. Moreover, he said in another case, probe into which was monitored by the apex court (Sohrabuddin fake encounter case), the sealed cover reports submitted to the court by the investigating agency was not shown to anyone. But amicus curiae Raju Ramachandran said Jafri's complaint case was different from all other cases and urged the court to make a one-time exception with a caveat that this concession should not be taken as a precedent. म्हणजे मानवाधिकार हे प्रत्येकास वेगळे असे काहीतरी दिसते... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

(No subject)

पुष्कर जोशी
Mon, 04/15/2013 - 16:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

दुवा hotos_stream">https:/

पुष्कर जोशी
Mon, 04/15/2013 - 16:05 नवीन
Image removed. दुवा https://www.facebook.com/pages/Arvind-Kejriwal-A-Christian-Missionary/365662286881905?id=365662286881905&sk=photos_stream
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी

इतक्या चांगल्या

ऋषिकेश
गुरुवार, 02/14/2013 - 10:11 नवीन
इतक्या चांगल्या प्रतिसादाबद्दल आभार! डिवचणे व्यर्थ गेले नाही :) (ट्यार्पीही वाढलेला दिसतोय ;) )
या वाक्यातून असे जाणवते की मी मोदी समर्थक आहे त्यामुळे मला काय म्हणायचे आहे ते जाणून घेयचे आहे.
क्षमस्व! पण मला असे म्हणायचे नव्हते. तुमचे मत यासाठी हवे होते की टोकाच्या किंवा केवळ भावनेच्या आहारी जाऊन मते देणार्‍यांपैकी तुम्ही नाहित हे पुर्वानुभवावरून माहित आहे. त्यातही अशा राजकीय परिस्थितीवर तुमच्याकडे वेगळा दृष्टिकोन असतो (ज्यातून मला तरी अनेकदा नव्या माहितीचा लाभ झाला आहे.)एखादवेळी तुमची मते त्यावेळी पटली नसली तरी त्याची नोंद मनात राहिली आहे आणि प्रसंगी कालांतराने माझे मत बदललेही आहे (किंवा अनेकदा नाहिहि.) तर तो मुद्दा नै. सांगण्याची गोष्ट अशी की केवाळ म्हणून तुमचे मत हवे होते. असो.
(इतर मुख्यमंत्र्याबाबत लिहून) त्याबद्दल काय? नुसती उचलबांगडी? त्यांची चौकशी का नाही? यातील एक गुजरात दंगल सोडल्यास इतर कुठल्याही दंगलीत राज्याच्या मुख्यमंत्र्याला असे demonize केले गेले नाही अथवा खटले भरले गेले नाहीत. हे तुम्हाला योग्य वाटते का? हे कळल्यास बरे होईल.
मुळात हा प्रश्न केवळ मला विचारला असल्यास त्याचे प्रयोजन समजले नाहि. पण एकूणच चर्चेतील प्रश्न असे समजतो आणि सांगतो की, इतर मुख्यमंत्र्याची चौकशी झाली नाही हे काही बाबतीत मला अयोग्य वाटते. विशेषतः १८९२-९३च्या दंगलीबाबत स्वतंत्र चौकशी आयोगाची आवश्यकता होती असे वाटते. मात्र अजूनही दोन मुद्दे मांडायचे आहेत १. जेव्हा मोदींच्या काळात दंगली झाल्या तेव्हा विरोधी पक्ष या नात्याने (खरे/खोटे कसेही का होईना, पण शांततापूर्ण पद्धतीने कायद्याच्या मर्यादेत राहुन - मिडीयाचा चतूर उपयोग करून)काँग्रेसने रान माजवले. राजकारण हा 'पर्सेप्शन'चा खेळ असतो हे सवश्रुत आणि सर्वमान्य आहेच. मोदींचा या दंगलीत हात होता हे 'पर्सेप्शन' लोकांच्या मनात जागवणे यात जितका हात काँग्रेसचा होता, तेवढा नसला तरी भाजपचा क्षीण प्रतिकार त्याला (जाणीवपूर्वक?) खतपाणी घालत होता हे कसे नाकारावे? काँग्रेसने यामुळे घडवून आणलेल्या पोलरायझेशनचा फायदा त्यांना अजूनही होतो आहे (आणि राज्य-पातळीवर त्यावेळच्या लगेच्या एका निवडणूकीत प्रामुख्याने आणि त्यानंतरच्या निवडणूकीत काहि अंशी भाजपलाही झाला). मात्र राष्ट्रीय पातळीवर भाजपापेक्षा काँग्रेसची दूरदृष्टी वरचढ ठरली असे म्हणता यावे. (भाजपाने दूरदृष्टी दाखवून मोदींचा तात्पुरता बळी दिला असता, तर कदाचित चौकशी टळली असतीच [किंवा झाल्यास ती स्थानिक पातळीवरच ठेवता आली असती] शिवाय केवळ स्थानिक पोलरायझेशन झाले असते आणि राष्ट्रीय स्तरावर तितका तोटा झाला नसता. पुढिल निवडणूकांनंतर मोडींना कधीही पुन्हा आणता आले असते किंवा तेव्हाच राष्ट्रीय स्तरावर नेता आले असते.. अर्थात हे सारेच जर तर झाले) याला उपप्रश्न असा, की इतर दंगलींमध्येही खरोखर इच्छा होती तर तेथील विरोधी पक्षांनी अश्या चौकशीच्या मागणीचे रान का माजवले नाही? गांधी हत्याकांडानंतर भाजपनेही मिडीयाचा चतुर उपयोग केला आणि त्याचे परिणाम काँग्रेसला पंजाबात आताआतापर्यंत भोगावे लागत होते. परंतु हिंदु -मुसलमान या सगळ्या भारतात असणार्‍या डेमोग्राफिसारखे शीखांचे (किंवा काश्मिरी पंडितांचेही) नसल्याने काँग्रेसला त्या मुद्यांचा काही जागा सोडल्यास तोटा झाला नाही. २. गुजरातमध्ये जो पक्ष राज्यावर होता त्यापक्षाचे कार्यकर्टे, मंत्री या दंगलीत सहभागी असल्याचे समोर आले. मुंबईसारख्या दंगलींमध्ये विरोधीपक्षच सहभागी असल्याने चौकशीची मागणी करणार कोण? तात्त्विक दृष्ट्या कितीही योग्य (आणि तुमच्या-माझ्यासारख्याला आवश्यक वाटत) असले तरी कोणता पक्ष कोणीही तितक्या जोशात, जनमताच्या रेट्यासह मागणी केली नसताना आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यावर चौकशी आयोग नेमेल? जर आघाडी असली तर आघाडीच्या मतानुसारच ठरेल असे मला वाटते. मग भाजपाला जर मोदी हवे असतील तर ते पटवण्याचा प्रयत्न करतील त्यात काही गैर नाही यातील अधोरेखीत आजमावले जाते आहे का? असा तो प्रश्न आहे.
भाजपामध्ये अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा" आहे जी इतरत्र नाही हे आपल्याला देखील मान्य आहे हे पाहून डोळे पाणावले.
आपल्यात नेहमीच मतभिन्नता हवी असे वाटत नाही ;) आणि हे माझे मत नवे नाही या आधीही व्यक्त केले आहे असे वाटते. किंबहुना येड्युरप्पा प्रकरणात रितसर मतदान घेतले जाणे हे अतिशय स्वागतार्ह होते. गडकरींच्या बाबतीततही असे मतदान होऊन नेता निवडला गेला असता तर अधिक आवडले असते पण तसे पक्षप्रमुखाच्या बाबतीत हल्ली कोणत्याच पक्षात होताना दिसत नाही :(
मोदींच्या नावाने बोटे मोडणार्‍यांसाठी आपत्ती आहे. (कारण पोटशूळ इतकेच).
पोटशुळा व्यतिरिक्त कोणत्याही कारणाने मोदी आपत्ती होऊ शकत नाहीत असे तुमचे मत समजावे काय? इतरांचे सोडा अगदी भाजपमध्ये जी स्वागतार्ह परंपरा वर आपण बघितली ती मोदीं खरंच पंतप्रधान झाले तर सरकारात तशी हेल्दी परंपरा टिकेल असे वाटत नाही. (मोदी पंतप्रधान होणे हे भाजपला १८५ ते २०० जागा मिळाअल्यावरच शक्य असावे तेव्हा, बहुतांश मंत्री त्यांच्या मर्जीचे - व त्यांच्यापुढे झुकणारे- असतील हे गृहितक आहे हे आधीच मान्य करतो). गंमत अशी की सध्याचे नेतृत्त्व दुसरे टोक आहे - ज्या त्या खात्याचे निर्णय त्या त्या मंत्र्यांवर सोडून देतो , स्वतः अनेकदा निर्णय घेत नाही- याचाही लोकांना कंटाळा आला आहे. पण याचा उतारा सगळे निर्णय केवळ स्वतःच्या मर्जीप्रमाणे घेणारा नेता असा असणे आपत्ती वाटत नाही का? बरं असे निर्णय घेऊन फार्फार काही उत्तम करत असेल तर गोष्ट वेगळी. प्रत्यक्षात बघता गुजरात हे इतर अनेक प्रगत राज्यांपेक्षा अनेक बाबतीत अजून मागेच दिसते. (अश्या वाक्यांना तुम्ही पोटशूळ म्हणणार असाल तर मग नाईलाज आहे :) )
चांगला कारभार केला तर इष्ट ठरेल, केला नाही तर मागच्या पानावरून पुढे... इतकेच काय ते! "
हा हा! म्हणजे सध्यापेक्षा वाईट कारभार असुच शकत नाही असे तुमचे गृहितक आहे तर! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

थोडेसे अवांतर

आजानुकर्ण
गुरुवार, 02/14/2013 - 21:02 नवीन
शीखविरोधी दंगलीचे वारंवार उदाहरण येत असल्याचे पाहून एक गंमत वाटली. काँग्रेसने जसे एका शीख व्यक्तीला पंतप्रधानपद देण्यास खळखळ केली नाही, तसेच भाजपानेही एखाद्या मुसलमान व्यक्तीला पंतप्रधान किंवा गेलाबाजार गुजरात राज्याचा पक्षाध्यक्ष म्हणून तरी नेमणूक केली तरी मुसलमानांबद्दल भाजपा किंवा मोदीच्या मनात काही किंतू नाही अशा स्वरुपाचे gesture दिसेल. असो अवांतर आहे त्यामुळे बाकीची चर्चा चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

...

विकास
गुरुवार, 02/14/2013 - 21:17 नवीन
शीखविरोधी दंगलीचे वारंवार उदाहरण येत असल्याचे पाहून एक गंमत वाटली.
शिखांच्या दंगलीबद्दल गंमत वाटल्याचे पाहून आश्चर्य वाटले नाही. त्याकडे दुर्लक्ष करायला लावणे सोयीचे असते. एका दंगलीस जीनोसाईड म्हणायचे आणि दुसर्‍यास नुसतेच अँटी-सिख...त्यातलाच हा भाग आहे. (धर्माच्या/जमातीच्या चष्म्यातून अशा दंग्यांकडे बघू नये, पण विचारवंत सतत बोलतात म्हणून त्या संदर्भाने इतकेच बघायला सांगेन जमातीआधारीत प्रत्येकात किती व्यक्ती बळी ठरल्या ते पाहीले तर पोग्राम वगैरे शब्द कसे सिलेक्टिव्हली वापरले गेले आहेत हे समजेल).
तसेच भाजपानेही एखाद्या मुसलमान व्यक्तीला पंतप्रधान किंवा गेलाबाजार गुजरात राज्याचा पक्षाध्यक्ष म्हणून तरी नेमणूक केली तरी मुसलमानांबद्दल भाजपा किंवा मोदीच्या मनात काही किंतू नाही अशा स्वरुपाचे gesture दिसेल.
अभ्यास कमी पडतोय असे दिसतयं... परत एकदा मला धर्माधारीत/जातीआधारीत नेमणूका/निवडणूका मान्यच नाहीत. पण तुमच्या प्रश्नाला उत्तर देयचे म्हणून... पंतप्रधानच काय, अब्दुल कलाम राष्ट्रपती कोणाच्या काळात झाले? माझाच खालचा एक प्रतिसाद आणि त्यातील दुवा वाचला तर समजेल की, "गुजरात मधील सलया नगरपालीकेच्या क्षेत्रात ९०% मुस्लीम बाहूल्य आहे. त्यात झालेल्या निवडणूकांमध्ये सर्वच्या सर्व जागा भाजपास मिळाल्या आहेत... " आणि हो त्यात भाजपाच्या २७ उमेदवारांपैकी २४ मुस्लीम धर्मीय होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

दुर्लक्ष

आजानुकर्ण
गुरुवार, 02/14/2013 - 21:29 नवीन
शिखांच्या दंगलीकडे दुर्लक्ष करा असे म्हटलेले नाही. त्या दंगलीचे समर्थनही नाही. शिखांच्या दंगलीमागची मानसिकता व गुजरात दंगलीमागची मानसिकता यामागे फरक आहे. धर्माआधारित किंवा जातीआधारित निवडणुका व नेमणुका मान्य नसणे हे अशी सत्ता उपभोगणाऱअया समुदायांकरता अनेकदा सोयीचे असते. कारण मुळातच त्या नेमणुकांमागील निकष हे अध्याहृत असतात. अशा Status Quo ला आव्हान देण्याने आधीच ही सत्ता उपभोगत असलेल्या विशिष्ट समुदायांचे privilages निघून जाण्याची गैरसोय होऊ शकते. अशा नेमणुका न केल्यास स्वतःहून सत्तेची फळे मागास समुदायांसोबत शेअर करण्यास कोणी तयार होत नाही. हा इतिहास आहे. असो जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उत्तर

विकास
गुरुवार, 02/14/2013 - 21:54 नवीन
धर्माआधारित किंवा जातीआधारित निवडणुका व नेमणुका मान्य नसणे हे अशी सत्ता उपभोगणाऱअया समुदायांकरता अनेकदा सोयीचे असते.
मुद्दा असा आहे, की सेक्यूलर व्यवस्थेत हे अयोग्य आहे. जातीआधारीत व्यवस्थेत उच्चवर्णियांकडून शूद्र-अस्पृश्यांवर कधीकाळी अन्याय झाले होते, आजही काही अंशी कुठे ना कुठे तरी चालू असते. पण तेच बोलत बसणारे केवळ भेद तयार करतात काम काही करत नाहीत. उदाहरणादाखलः आंबेडकरांनी निषेध केला, पण भेद तयार न करता काम केले. या उलट मायावतीने नुसतीच अन्यायाची बोंब करत नक्की काय दलीतांसाठी केले हे माहीतच आहे. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील... मुस्लीमांच्य बाबतीत देखील कधीकाळी औरंगजेबाने आणि त्याच्यासारख्या इतरांनी झिझिया कर लावला, हिंदूंवर अत्याचार केले म्हणत रडत बसत आत्ताच्या मुस्लीमांपेक्षा विशेष अधिकार मागणे जसे चुकीचे ठरेल तसेच आत्ता असेच मुस्लीमांना केवळ मुस्लीम म्हणून विशेष अधिकार देणे पण चुकीचे ठरेल. त्यातही अजून एक मुद्दा म्हणजे असे इतर अल्पसंख्य धर्मियांच्याबाबतीत बोलले जात नाही. त्याव्यतिरीक्त तुमच्या मुळ प्रश्नास उत्तर दिले होतेच ज्यात अब्दुल कलाम कधी राष्ट्रपती झाले आणि आत्ताच्या गुजरातच्या सलया नगरपालीकेच्या निवडणुकांबाबत लिहीले आहेच. त्या व्यतिरीक्त भाजपाच्या राष्ट्रीय उपध्यक्षांमधे नजमा हेप्तुल्ला आणि मुख्तार अब्बास नक्वी आहेतच, तर काँग्रेसमधे फक्त राहूल गांधी! बाकीच्यांचे वंश वेगळे... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

अजून एक उदाहरण

निनाद मुक्काम …
गुरुवार, 02/14/2013 - 23:32 नवीन
Syed Shahnawaz Hussain is a top politician of the Bharatiya Janata Party and a former Cabinet Minister. Born in Supaul Bihar in 1968, he has a Diploma in Engineering from Patna and Delhi. He was elected to 13th Lok Sabha in 1999 and was appointed Minister of State and held various portfolios like food processing industries, youth affairs and sports and human resource development at different times. He was given independent charge of Ministry of Coal in 2001 and was elevated to the rank of a Cabinet Minister with Civil Aviation portfolio in September 2001, thereby becoming the youngest Cabinet Minister ever in the Government of India. Later he held the Textiles portfolio as Cabinet Minister from 2003 to 2004.He is often referred to as 'The Original Youth leader' Though he lost in 2004 general elections, he re-entered the Lok Sabha in November 2006 in a by-election when he won the vacant seat of Bhagalpur in Bihar. He entered 15th Lok Sabha from Bhagalpur in 2009.[2] He is one of the few prominent Muslim leaders in the Bharatiya Janata Party. While in Delhi, he organized rickshaw-pullers and fought for the rights of the poor hailing from his home state of Bihar. He candidly voiced against the poor and poverty-stricken image of those hailing from Bihar and blames fellow native Laloo Prasad Yadav for projecting the poor image.He is also related to famous blogger Sharique Manazir who hails from Bihar too.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

एक काय अनेक उदाहरणे आहेत

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/14/2013 - 23:54 नवीन
स्व. सिकंदर बख्त हे भाजपचे संस्थापक सदस्य होते त्यांनी अनेक महत्वाची पदे भुषविली. मृत्यूसमयी ते केरळचे राज्यपाल होते. मुख्तार अब्बास नकवी यांनी देखील भाजपमध्ये पदे भुषविली आहेत. शिवाय २००४ मध्ये लक्षद्वीपमधले भाजप खासदार मुस्लिम होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

नजमा हेपतुल्ला

चिंतामणी
गुरुवार, 02/21/2013 - 15:36 नवीन
यांचे नाव वरील यादीत असायला हरकत नाही. भाजप मायनारिटी मोर्चा या भागात अनेक मुस्लीम नेते आहेत. पण ती यादी खूप मोठी होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मुळ प्रतिक्रीयेला दिलेल्या

ऋषिकेश
Fri, 02/15/2013 - 09:36 नवीन
मुळ प्रतिक्रीयेला दिलेल्या प्रतिसादावरही आपले मत समजावे ही प्रार्थना. बाकी वरील प्रतिक्रीयेवर लिहायचे आहे पण त्या विषयांवर वेगळी चर्चा झाल्यास खंडन/मंडन करूनच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

तुमच्या वरील प्रतिसादाबद्द्ल

विकास
Sat, 02/16/2013 - 05:06 नवीन
तुमच्या वरील प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. उत्तर देयचे राहील्याबद्दल स्वारी! तुमचे मत यासाठी हवे होते की टोकाच्या किंवा केवळ भावनेच्या आहारी जाऊन मते देणार्‍यांपैकी तुम्ही नाहित हे पुर्वानुभवावरून माहित आहे. गैरसमज करून घेतला नसल्याबद्दल धन्यवाद. :-)
मुळात हा प्रश्न केवळ मला विचारला असल्यास त्याचे प्रयोजन समजले नाहि.
तुम्हाला प्रतिसाद दिला असल्याने ऋषिकेशला उद्देशून होते असे वाटणे साहजीक आहे. पण माझा रोख हा मोदींवरून सतत दंगलींचे तेच तेच बोलणार्‍यांच्या बाबतीत होता. त्यामुळे तुमच्याबद्दल व्यक्तीगत नक्की नव्हते (कारण तसे तुम्ही केल्याचे दिसत नाही).
जेव्हा मोदींच्या काळात दंगली झाल्या तेव्हा विरोधी पक्ष या नात्याने (खरे/खोटे कसेही का होईना, पण शांततापूर्ण पद्धतीने कायद्याच्या मर्यादेत राहुन - मिडीयाचा चतूर उपयोग करून)काँग्रेसने रान माजवले.
तुम्ही माझे या संदर्भातले जर प्रतिसाद पाहीलेत तर लक्षात येईल की मी काँग्रेसच्या विरोधात बोलत नसून याच अत्यंत वाईट उपयोग करून एकंदरीत वातावरण दुषित करणार्‍या टिस्टा सेटलवाड आणि पार्टीबद्दल बोलत आहे. आता त्याचा फायदा काँग्रेसने घेयचा प्रयत्न केला असे म्हणता येईल. प्रयत्नच का, कारण मोदींना मौत का सौदागर म्हणून पाहीले, मॅडम पासून मॅडमपुत्रापर्यंत सर्वांनी जंग जंग पछाडले पण अजूनही काही त्यांना गुजरातेत सत्तांतर करता आले नाही. तरी देखील राजकारणापुरते आणि तसेच जेंव्हा दंगल चालू होती आणि काही काळ नंतर यावरून एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून बोलणे, आवाज उठवणे हे करणे चुकीचे नव्हते तर कर्तव्यच होते. हेच उलटे असते (काँग्रेसकडून झाले असते, भाजपा विरोधीपक्ष वगैरे) तरी मी असेच भाजपाने करावे असे म्हणले असते.
इतर दंगलींमध्येही खरोखर इच्छा होती तर तेथील विरोधी पक्षांनी अश्या चौकशीच्या मागणीचे रान का माजवले नाही?
त्याचे काही अंशी उत्तर वरच्या उत्तरात आले आहे. राजकीय पक्ष तेव्हढ्यापुरते रान उठवतात पण गुजरातच्या बाबतीत जे झाले तेथे मानवीहक्क संघटना आणि टिस्टा सेटलवाड सारख्यांनी नुसता अतिरेकच केला नाही, तर खोटे बोलले... त्याचा फायदा दंगलग्रस्तांना झाला असे वाटते का? मला नाही वाटत...
गांधी हत्याकांडानंतर भाजपनेही मिडीयाचा चतुर उपयोग केला आणि त्याचे परिणाम काँग्रेसला पंजाबात आताआतापर्यंत भोगावे लागत होते.
मी बरोबर आहे का माहीत नाही, पण तुमच्या या मुद्द्याशी असहमत आहे. शिखांचा काँग्रेसवरचा (किमान काही अंशी रास्त) राग हा पंजाब प्रश्न तयार करण्यास कारणीभूत ठरला, त्याला ज्या पद्धतीने काँगेस सरकारने हाताळले त्यावरून शिक समाज दुखावला गेला आहे. ऑपरेशन ब्लू स्टार, ब्लॅक थंडर, नंतर केपीएस गील - यातील कृतींचे मी देखील समर्थनच करेन. पण ते हाताळणे कसे झाले हे बघणे महत्वाचे आहे. मला वाटते, फक्त योग्य संवाद (मार्क टलीच्या पुस्तकात वाचल्याप्रमाणे) राजीव गांधींच्या काळात ऑपरेशन ब्लॅक थंडरच्या वेळेस झाला होता.
मुंबईसारख्या दंगलींमध्ये विरोधीपक्षच सहभागी ... आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यावर चौकशी आयोग नेमेल?
ह्या वाक्याशी सहमत आहे, पण वर जे सातत्याने आले आहे तेच... हा मुद्दा कॉंग्रेस/भाजपा/शिवसेना या राजकीय पक्षांनी उचलून का धरला नाही हा प्रश्नच नाही. हा मुद्दा मानवाधिकार आणि तत्सम लोकांनी का उचलून धरला नाही हा आहे.
मग भाजपाला जर मोदी हवे असतील तर ते पटवण्याचा प्रयत्न करतील त्यात काही गैर नाही. यातील अधोरेखीत आजमावले जाते आहे का? असा तो प्रश्न आहे.
हे मला काय माहीत, ते आजमावत आहेत का काय ते? माझ्या काय कानात येऊन सांगतात का? ;) एनी वे, फन अपार्ट, एकूण भारतीय राजकारण कसे चालते याचा विचार केला तर मोदींचे नाव पुढे आणणे हे धोपी पछाडाचा डाव देखील असू शकतो.
अगदी भाजपमध्ये जी स्वागतार्ह परंपरा वर आपण बघितली ती मोदीं खरंच पंतप्रधान झाले तर सरकारात तशी हेल्दी परंपरा टिकेल असे वाटत नाही
. असे काही म्हणणे आहे का की ते एकाधिकारशाही दाखवतात म्हणून? तसे म्हणणे असले तर त्या अर्थापुरतीच मला मर्यादीत आपत्ती वाटेल. पण मागच्या दंगलीच्या संदर्भाने मला काही आपत्ती वाटत नाही. त्यात त्यांनी गुन्हा केल्याचे अजून शाबीत झालेले नाही. त्यांच्याकडून चूक नक्की झाली असेल. त्यांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही, पण ते ऑक्टोबर २००१ मधे पहिल्यांदाच सक्रीय राजकारणात मुख्यमंत्री झाले (आधी नुसतेच पक्षात संघटक होते जे प्रशासक असण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असते) आणि चार महीन्यात दंगल झाली. आता त्यांना राजकारण, प्रशासन सगळ्याचा अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे गोष्ट वेगळी ठरू शकते असे वाटते.
पण याचा उतारा सगळे निर्णय केवळ स्वतःच्या मर्जीप्रमाणे घेणारा नेता असा असणे आपत्ती वाटत नाही का?
नेता कितीही चांगला असला असे सर्वानुमते वाटले तरी एकछत्री कारभार लोकशाहीत असणे ही आपत्तीच आहे आणि तशी असण्याशी सहमती नाही. मोदी तसे आहेत का हे मला माहीत नाही. संघाच्या पद्धतीत सरसंघचालक जरी असले तरी कारभार हा एक माणूस चालवत नाही गुरू पण फक्त भगवा ध्वज असतो, व्यक्तीपूजा देखील नाही. त्या संस्कारातून / पठडीतून जीवन घालवलेले मोदी हे हाजी हाजी करणार्‍यांचे गोतावळे गोळा करत असतील असे वाटत नाही, किमानपक्षी आशा आहे. अर्थात तुम्हाला अधिक माहिती असेल तर अवश्य सांगावीत.
प्रत्यक्षात बघता गुजरात हे इतर अनेक प्रगत राज्यांपेक्षा अनेक बाबतीत अजून मागेच दिसते.
या संदर्भात पण माध्यमांमधे दोन प्रकारची मते दिसतात. एक हिंदू वर्तमानपत्र आणि तत्सम डावे तर दुसरे मोदी समर्थक नाही, पण business focus असलेले. डावे टिका करताना दोन गोष्टी दाखवताना दिसतात - १. इतर राज्ये अजून पुढारलेली आहेत आणि २. सामाजीक विकासात गुजरात मागे आहे. डाव्या नसलेल्या आणि business focus लेखांमधे काय दिसते तर रेट ऑफ ग्रोथ ज्यातून पुढचे प्रोजेक्शन दिसते. तसेच आधीपेक्षा किती फरक पडला ते बघितले जाते. आणि सामाजीक विकासासंदर्भात त्यांच्या मते डावे सिलेक्टीव्ह इंडिकेटर्स बघतात. जर जास्त बघितले तर चित्र वेगळे दिसते. यातील काय खरे आणि काय खोटे बघण्यासाठी मला खरा विदा बघावा लागेल, जो बघायला मला वेळ नाही, आणि असली मगजमारी करायला मोदी अथवा डावे काय मला कन्सल्टन्सी फीज् देत नाहीत... ;) पण माझा लांबून बघण्याचा आणि ठोकताळे बांधण्यासाठीचा दृष्टीकोन साधा आहे...सर्वप्रथम सामाजीक विकास हा आर्थिक विकास झाल्याशिवाय होऊ शकत नाही. आत्ता सामाजीक विकास नक्की किती आहे माहीत नाही, पण आर्थिक विकास मात्र चांगला चाललेला दिसतोय, नाहीतर मोदी सरकार तिसर्‍यांदा निवडून आले नसते. नाहीतर नुसतेच इंडीया शायनिंग म्हणत रालोआ पण आधी येऊ शकले असते ना! पण पब्ली़क इतके खुळे नसते. गुजरात दंगलीनंतर दंगलीमुळे आणि प्रामुख्याने भांडवलशाही देशात सुखाने रहाणार्‍या भारतीय डाव्या विचारवंतांनी प्रचंड लॉबींग केले परीणामी गुजरातवर अमेरीका-युरोप-जपान आदींनी अघोषित बहीष्कार टाकला होता. गंमत म्हणजे असल्या डाव्यांचे चीन ने काही ऐकले नाही! आता ब्रिटनने स्वतःच्या हाय कमिशनरला मोदींना भेटायला पाठवले, पाठोपाठ इयूचे राजदूतांनी मोदींना भेटायचे ठरवले. आज म.टा. मधे आलेल्या बातमीनुसार कुठल्याशा युएस काँग्रेसमनने देखील अमेरीकन काँग्रेसमध्ये मोदींचे कौतुक केले आहे. थोडक्यात ते पण हळू हळू संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहेत. "असतील शीते तर.." ही म्हण लक्षात असेलच. :-)
अश्या वाक्यांना तुम्ही पोटशूळ म्हणणार असाल तर मग नाईलाज आहे
परखड टिका समजू शकतो, राजकीय / वैचारीक विरोध समजू शकतो त्यांना मी बोटे मोडणारे म्हणत नाही. पण "उठसूठ उचलली जीभ लावली टाळ्याला" प्रमाणे वागणारे आणि समाजात खोट्या बातम्या पसरवणार्‍यांना मी बोटे मोडणारे म्हणतो, ज्यांना मोदी सत्तेवर आले तर पोटशूळ होईल असे माझे म्हणणे आहे.
हा हा! म्हणजे सध्यापेक्षा वाईट कारभार असुच शकत नाही असे तुमचे गृहितक आहे तर!
आय होप, "असूच शकत नाही"! पण एखाद्याने जिद्दीने, "हम किसीसे कम नही" असे दाखवायचेच ठरवले, तर काय बोलणेच खुंटले! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

आभार

ऋषिकेश
Wed, 02/20/2013 - 16:02 नवीन
आता धागा वर आलाच आहे तर प्रतिसाद देऊन घेतो :)
असे काही म्हणणे आहे का की ते एकाधिकारशाही दाखवतात म्हणून? तसे म्हणणे असले तर त्या अर्थापुरतीच मला मर्यादीत आपत्ती वाटेल.
होय असे म्हणजे माझेही आहे. पक्षातील विदा बाजुला ठेऊ. सरकारी कामकाजातील त्यासंबंधीचा विदा देण्यासाठी त्यांनी गुजरात असेम्बली मध्ये काय केले आहे ते पाहु. आधीच्या असेम्बली सोडा.. सध्या त्यांच्या व्यतिरिक्त ११४ आमदारांपैकी केवळ ७ जण मंत्री आहेत (केवळ ६% स्वपक्षीय नेत्यांना निर्णय घेण्याचा थेट अधिकार). स्वतः मोदींकडे १० प्रमुख खात्यांचे मंत्रीपद आहेच, शिवाय इतरही अनेक बिनमंत्र्यांची खाती मुख्यमंत्रीम्हणून त्यांनाच 'बघावी लागतात'. (अशाच प्रकारचे एका नेत्याच्या करिष्म्यावर बनलेले प. बंगाल सरकारकडे बघु. तिथे ममतातैंकडे ७ खाती आहेत, मात्र इतर खाती उर्वरित १८४ तृमुकाँच्या आमदारांपैकी ३३ जणांत विभागली आहेत. अर्थात १८% नेत्यांना मंत्रीपद!) कोणत्याही विधानसभेत जनतेचे प्रश्न चर्चिले जातात त्यांना प्रस्तावित वेळ पुरत नाही. गुजरातचे तसे नाही. नुकत्याच अस्तास गेलेल्या १२ व्या विधानसभेची १० वेळा अधिवेशने झाली. त्यापैकी अर्धी १० पेक्षाही कमी दिवस चालली. ३० दिवसांपेक्षा अधिक चाललेले एकही सत्र नाही! बरं जी विधेयके सादर होतात त्यातील कित्येक चर्चेशिवाय मंजूर केली जातात. (विधेयकाचा विदा हाताशी नाही. हवा असल्यास शोधुन देता येईल)
आर्थिक विकास मात्र चांगला चाललेला दिसतोय, नाहीतर मोदी सरकार तिसर्‍यांदा निवडून आले नसते
केवळ मोदी सरकार तिसर्‍यांदा निवडून आले म्हणून आर्थिक विकास चांगला आहे हे मान्य करता येणार नाही.म्(मोदी सरकार तिसर्‍यांदा निवडून येण्यामागे राजकी य कारणे अधिक आणि आर्थिक कारणे जवळजवळ शिल्लक उरलेली नाहित असे माझे मत आहे) प्रत्यक्षात आर्थिक सुधारणा बघायच्या तरीही भारतातीलच इतर राज्यांमध्ये होणार्‍या सुधारणेत गुजरात सर्वात पुढे आहे का? तसे नाही. मोदी सरकारने पहिल्या पाच वर्षांच्या टर्ममध्ये पायाभूत सोयी केल्या हे कबुल आहेच. मात्र, त्याच्या जोरावर २०१२ मध्येही मते मागितली गेली (लोकांनी ती म्हणून दिली असे समजणे हा भाबडेपणा झाला). पण म्हणून 'मोदींनी विकास केला' हे वाक्य पोकळपेक्षा जुने आणि इतिहासजमा ठरते. दुसरे असे, चांगला आर्थिक विकास आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास यात अंतर आहेच. त्यापैकी दुसर्‍या आघाडीवर मोदी सरकार पराभूत आहे यावर अनेक लेख जालावर मिळतील. मात्र गेल्या ५-७ वर्षांत पहिल्या आघाडीवरही मोदी सरकारने असे- इतर राज्यांत केलेले नाही असे -काय केले आहे? बिहार सारखी राज्ये जेव्हा 'राईट टु सर्विस' आणून अ‍ॅडमिनिस्ट्रॅशनमध्ये पारदर्शकता आणत आहेत तिथे लोकायुक्ताचीही नेमणूक गुजरात सरकार करायला तयार नाही. मोदींची वाढती एकाधिकारशाही केवळ आर्थिकच नाही तर सार्‍या क्षेत्रात दिसून येते असे म्हणावयास जागा आहे. आता पक्षाच्या बाजुकडे बघु. फक्त मोदींना आवडत नाही म्हणून काहि नेत्यांना कार्यकारिणीतून काढणे हे त्यांच्या कार्यपद्धतीची झलक दाखवणारे वाटत नाही का? मोदींनी गुजरात सोडल्यास त्यांच्यामागे एकही नेता तयार होऊ शकला नाही हे कशाचे द्योतक आहे? गुजरातेत जनता मोदींच्या नव्हे तर भाजपाच्या मागे आहे हा ही काहिंचा एक गैरसमज आहे. लोकसभेचे निकाल बघितले तर खासदारांच्या संख्येत भाजप आणि काँग्रेसमध्ये तितके अंतर नाही. तेव्हा हा 'व्यक्ती'करिष्मा आहे हे ही उघड आहे. बाकी दंगल वगैरे मुद्दे न्यायप्रविष्ट असल्याने त्याविषयी अधिक बोलणे आततायी व्हावे इतकेच माझे मत आहे.
असूच शकत नाही"! पण एखाद्याने जिद्दीने, "हम किसीसे कम नही" असे दाखवायचेच ठरवले, तर काय बोलणेच खुंटले!
सध्याचा कारबहर स्वतंत्र भारतातील सर्वात वाईट कारभार आहे यावर असहमत आहे इतकेच म्हणतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हम बोलेगा तो

विकास
गुरुवार, 02/21/2013 - 23:36 नवीन
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है! या गाण्याची आठवण झाली. इतक्यासाठीच की आता परत यात वाद घातला तर (तुम्ही असे नाही पण...) म्हणणार की हा मोदी समर्थक आहे वगैरे... आपल्या प्रतिसादाशी काही अंशी अर्थातच सहमत आहे पण काही अंशीच... म्हणूनच (ह्या धाग्यात आता वाचणे कठीण होऊ लागल्याने) जे वाटते ते थोडक्यात लिहीतो. मंत्रीमंडळ किती मोठे ह्यावरून जर नेतृत्व ठरवायचे असेल तर मला वाटते नरसिंहरावांच्या मंत्रीमंडळात ६० मंत्री होते त्यावरून ते सर्वात जास्त लोकशाहीवादी ठरतात. (वास्तवीक ते म्हणजे राव तसे होते असे मला वाटते, पण मंत्रिमंडळाच्या साईझवरून नाही!), मंत्रिमंडळ लहान असावे असा अनेक वर्षाचा प्रयत्न आहे, पण ते कधीच मान्य झालेले नाही. ९०च्या दशकानंतर अर्थातच त्याचे प्रमुख कारण हे युतीची सरकारे आल्याने आहे.
१२ व्या विधानसभेची १० वेळा अधिवेशने झाली. त्यापैकी अर्धी १० पेक्षाही कमी दिवस चालली. ३० दिवसांपेक्षा अधिक चाललेले एकही सत्र नाही!
हे अयोग्यच आहे. पण मग प्रमुख विरोधी पक्ष काय करत होता? गेल्या वर्षातील डिएनए मधील एक बातमी मिळाली... त्यात म्हणल्याप्रमाणे, "A record number of 31 government bills were passed by the Assembly during the month-long budget session, which culminated on Wednesday. Talking to media persons, Assembly speaker Ganpat Vasava, said, "The assembly passed a record 31 government bills during the budget session. Usually, a maximum of 25 government bills are taken up during the budget session, but the number was 31 this time.".... Vasava said that the assembly session went off well and attributed it to the co-operation of the ruling and opposition party leaders, the parties' whips and the MLAs. He also thanked the media for informing the public about the proceedings of the assembly. थोडक्यात जर सगळ्यांचेच सहाय्य असले तर त्यात नक्की एकाधिकारशाही काय आहे? का नावडतीचे मिठ?
केवळ मोदी सरकार तिसर्‍यांदा निवडून आले म्हणून आर्थिक विकास चांगला आहे हे मान्य करता येणार नाही.म्(मोदी सरकार तिसर्‍यांदा निवडून येण्यामागे राजकी य कारणे अधिक आणि आर्थिक कारणे जवळजवळ शिल्लक उरलेली नाहित असे माझे मत आहे)
विधानसभेचे माहीत नाही, पण सलया नगरपालीकेत जो १००% विजय मिळाला आहे त्यात जे काही तिथल्या स्थानिकांनी म्हणले आहे ते विकास झाला म्हणूनच म्हणले आहे. किंबहूना त्यातील काही मुस्लीम नगरसेवक हे काँग्रेस सप सोडून (नुसत्या नाही तर) मोदींच्या भाजपामध्ये आले आहेत...
दुसरे असे, चांगला आर्थिक विकास आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास यात अंतर आहेच. त्यापैकी दुसर्‍या आघाडीवर मोदी सरकार पराभूत आहे यावर अनेक लेख जालावर मिळतील.
ते लेख हे मोदी विरोधक आणि लेफ्टीस्ट लोकांचे आहेत. त्यामुळे बायास्ड आहेत असे म्हणावे लागेल. नाहीतर उद्या मी एखादा पांचजज्ञ अथवा ऑरग्नायझर मधील लेख पण दाखवू शकेन. विकासाच्या संदर्भात मी आधी देखील जे म्हणले तेच परत सांगेन... तुम्ही ज्याला सर्वसमावेशक अर्थात सामाजीक विकास पण असला पाहीजे असे म्हणता, ते आर्थिक विकास झाल्याशिवाय शक्य नाही. त्या व्यतिरीक्त माझे व्यक्तीगत मत (या म्हणजे मोदींच्या संदर्भात नाही, किंचित अवांतर आहे), असे आहे की यात सरकारपेक्षा जनतेचा, सामाजीक संस्थांचा आणि उद्योगांचा हातभार लागतो. पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे.
बिहार सारखी राज्ये जेव्हा 'राईट टु सर्विस' आणून अ‍ॅडमिनिस्ट्रॅशनमध्ये पारदर्शकता आणत आहेत तिथे लोकायुक्ताचीही नेमणूक गुजरात सरकार करायला तयार नाही.
"राईट टू सर्विस" बद्दल जास्त माहिती नाही, पण जालावर जे काही पाहीले त्याप्रमाणे २०१० साली मध्यप्रदेशने आणि नंतर २०११ साली बिहार ने ती कायद्याने आमलात आणली. आणखी काही राज्ये ती कायद्याने आमलात आणत आहेत. पण त्यात महाराष्ट्र देखील दिसले नाही. जर रोजगार हमी योजना आहे म्हणायचे असेल तर तसे कदाचीत गुजरातमधे देखील असेल. शिवाय गुजरातचा "राईट टू सर्विस" ला विरोध आहे असे म्हणायचे आहे का? मला तरी तसे कुठे दिसलेले नाही. लोकायुक्ताच्या नेमणुकीबद्दल राजकारण चालू आहे. राज्यपाल ज्यांना नेमू इच्छितात ते अर्थातच काँग्रेस हायकमांड (एकाधिकारशाही?) च्या इच्छेनुसार वागत आहेत. ज्या पद्धतीने तो कायदा लिहीला गेला आहे त्यात हायकोर्टाच्या न्यायाधिशाशी सल्लामसलत करण्यासाठी लिहीले आहे, पण राज्याच्या मुख्यमंत्र्याशी सल्लामसलत नाही. तेथे घोडे अडले आणि मोदींनी कोर्टात विरोध केला. सुप्रिम कोर्टाने आत्ता निर्णय दिला आहे. थोडक्यात नेमणूक ही मोदींच्या हातात नव्हतीच. शिवाय हे दुधारी शस्त्र आहे. उद्या काँग्रेसचे राज्य आले आणि भाजपाने नियुक्त केलेला राज्यपाल असला तर काय होईल, त्यामुळे हे योग्य आहे असे वाटत नाही.
आता पक्षाच्या बाजुकडे बघु. फक्त मोदींना आवडत नाही म्हणून काहि नेत्यांना कार्यकारिणीतून काढणे हे त्यांच्या कार्यपद्धतीची झलक दाखवणारे वाटत नाही का?
अहो पण हे कुठे होत नाही? कॉग्रेसमधे हायकमांडचे महत्व किती असते? यशवंतरावांचे काय झाले हा जुना इतिहास झाला, पण आज देखील मुख्यमंत्र्यांना मंत्रीमंडळात बदल करता येतील का? अजून बरेच काही लिहीता येईल ज्याच्यातून एकाधिकारशाही दिसते असे म्हणता येईल.
तेव्हा हा 'व्यक्ती'करिष्मा आहे हे ही उघड आहे.
सहमत
बाकी दंगल वगैरे मुद्दे न्यायप्रविष्ट असल्याने त्याविषयी अधिक बोलणे आततायी व्हावे इतकेच माझे मत आहे.
बरोबरच आहे, पण दुर्दैवाने त्याच मुद्यावरून तथाकथीत विचारवंतांनी सातत्याने विचहंटीग चालू ठेवले आहे. त्यांना जर असे या संदर्भात आणि कायम सुचले तर समजातील तेढ कमी होण्यास खूप मदत होईल.
सध्याचा कारबहर स्वतंत्र भारतातील सर्वात वाईट कारभार आहे यावर असहमत आहे इतकेच म्हणतो
गेल्या काही वर्षांमधे जितकी आणि ज्या पद्धतीच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली आहेत त्याचे अनेक गंभीर आणि दूरगामी परीणाम होत/होणार आहेत असे वाटते. पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

असहमत

ऋषिकेश
Fri, 02/22/2013 - 09:33 नवीन
बहुतांश महत्त्वाच्या मुद्द्यांवर किंचीत/काही प्रमाणात/पूर्ण असहमती नोंदवून इथे थांबतो आहे कारण खरंच ही चर्चा तिरक्या प्रतिसादांमुळे वाचणे कठीण होते आहे या बाबतीत मात्र सहमत आहे :)] या विषयावर दुसरा धागा निघाला की/तर चर्चा 'कंटुनी' करुयात.. मोदी तसा (दुसरा धागा उघडेल असा) चान्स नक्की देतील याची खात्री आहेच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सहमत

विकास
Fri, 02/22/2013 - 17:48 नवीन
मोदी तसा (दुसरा धागा उघडेल असा) चान्स नक्की देतील याची खात्री आहेच
सहमत. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

आजानुकर्ण

चिंतामणी
गुरुवार, 02/21/2013 - 15:50 नवीन
भौ-
शिखांच्या दंगलीकडे दुर्लक्ष करा असे म्हटलेले नाही. त्या दंगलीचे समर्थनही नाही. शिखांच्या दंगलीमागची मानसिकता व गुजरात दंगलीमागची मानसिकता यामागे फरक आहे.
हे जरा विस्कटुन सांगा हो. डोक्यावरून गेले हे वाक्य. असो. गुजराथ दंगल पुन्हा पुन्हा आठवायची आणि गळे काढायचे. शीख विरोधी दंगल विसरून जायची. आसाम दंगल विसरायची. नुकतीच बंगालमध्ये झालेली दंगल तर माहीतच नसेल. त्यामुळे प्रश्णच मिटला. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

"नुकतीच बंगालमध्ये झालेली

प्रचंड तापट
Fri, 02/22/2013 - 11:49 नवीन
"नुकतीच बंगालमध्ये झालेली दंगल तर माहीतच नसेल. त्यामुळे प्रश्णच मिटला..." आणि कालचे बोंबस्फोट सुद्धा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

मराठी बाणा ऑन

खटपट्या
Sat, 02/09/2013 - 06:27 नवीन
मराठी बाणा ऑन "अंधूक शक्यता शरद पवार" >>>> एकदा तरी मराठी होउद्याना राव. मराठी बाणा ऑफ
  • Log in or register to post comments

आकड्यांचे आणि आघा ड्यांचे गणित....

लाल टोपी
Sat, 02/09/2013 - 10:05 नवीन
त्यांचे आकड्यांचे आणि आघाड्यांचे गणित नाही जमत हो.... त्यांना १९९० मध्ये चांगली संधी होती ती त्यांनी घालवली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

गेल्या ६-७ तासात परिस्थिती

श्रीगुरुजी
Sat, 02/09/2013 - 14:42 नवीन
गेल्या ६-७ तासात परिस्थिती एकदम बदललेली आहे. आधी नोव्हेंबर २०१२ मध्ये कसाबला फाशी आणि आज अफझल गुरूला फाशी हा काँग्रेसचा योजनाबद्ध डाव वाटतो. आता फक्त २१ व २८ फेब्रुवारीची वाट बघायची. मला असे वाटायला लागले आहे की, यावेळच्या रेल्वे व केंद्रीय अंदाजपत्रकात भरपूर सवलतींचा वर्षाव असेल. त्यामुळे गरीब व मध्यमवर्ग खूष होईल व त्यानंतर ६-७ दिवसात काँग्रेस लोकसभा बरखास्त करून एप्रिल्-मे २०१३ मध्ये मध्यावधी निवडणुका घेईल. कसाब व अफझल गुरूच्या फाशीमुळे भाजपच्या मुख्य मुद्द्यातील हवा गेलेली आहे व त्यामुळे काँग्रेसविरूद्धची नाराजी काही प्रमाणात कमी झालेली असणार. त्यामुळे भाजप बचावात्मक पवित्र्यात येऊन भाजपची काही मते काँग्रेसकडे वळतील. काँग्रेसला या मतांचा व अंदाजपत्रकात सवलतींचा वर्षाव केल्यामुळे मध्यमवर्गाचा पुन्हा एकदा पाठिंबा मिळेल. पण त्याचवेळी या फाशींमुळे उ.प्र., केरळ, प. बंगाल इ. ठिकाणची मुस्लिम मते काँग्रेसच्या विरूद्ध जातील व त्याचा फायदा डावे पक्ष व समाजवादी पक्षाला होईल. म्हणजे थोडक्यात अफझल गुरूच्या फाशीमुळे भाजपचा तोटा, काँग्रेसचा थोडा तोटा व थोडा फायदा आणि डावे पक्ष व समाजवादी पक्षाचा फायदा होईल.
  • Log in or register to post comments

लोकसत्ता

विकास
Sat, 02/09/2013 - 20:20 नवीन
लोकसत्तेचे आजचे विशेष छोटेसे संपादकीय या संदर्भात वाचण्यासारखे आहे. फाशीच्या दोराला लटकलेले राजकारण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

राजकारण

आजानुकर्ण
Sat, 02/09/2013 - 20:55 नवीन
लोकसत्तेच्या नव्या संपादकांना यात राजकारण नव्हे 'चतुर राजकारण' दिसले हे पाहून गंमत वाटली. शिवाय हे राजकारण लगेच सगळ्या जगाला सांगण्याइतके दहा ओळीचे छोटेसे विशेष संपादकीय पटकन लिहावेसे वाटले. कसाबला फाशी दिल्यानंतर कुबेर साहेबांनी तेव्हाच्या अग्रलेखात लिहिले होते
यामागील कारणे जास्त महत्त्वाची आहेत. यातील अफझल गुरू हा भारतीय आहे आणि त्याच्या फाशीचे राजकारण सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेसला काही विशिष्ट घटकांना दुखवायचे नसल्यामुळे त्याच्या फाशीचा प्रश्न अद्याप लटकत ठेवण्यात आलेला आहे
मग तेव्हा आणि आता मध्ये नक्की काय बदलले की काँग्रेसला आता विशिष्ट घटकांना दुखवण्याची रिस्क घेण्याइतके चतुर राजकारण खेळावेसे वाटले. याबाबत लोकसत्ताकारांनी स्पष्टीकरण दिले असते तर बरे झाले असते. कसाबच्या फाशीबाबत पुढे ते म्हणतातः
एक अत्यंत गंभीर संदेश या फाशीतून जातो तो हा की, दहशतवादी जर भारतीय असतील तर त्यांना आपले सरकार पोसण्यास तयार आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. याचे कारण यापुढे आपले शत्रुराष्ट्र आपल्याच देशांतील फुटीरतावाद्यांना घेऊन दहशतवादी कृत्ये करू शकेल आणि त्यांचा गुन्हा सिद्ध होऊनही अफझल गुरूप्रमाणे त्यांना आपण पोसतच राहू.
मात्र आजच्या अग्रलेखानुसार लोकसत्ताकारांना अफजल गुरूच्या फाशीत 'चतुर राजकारण' दिसते आहे. याऐवजी वरील अर्ग्युमेंटशी कन्सिसंट अर्ग्युमेंट असे झाले असते की दहशतवादी स्वदेशी किंवा परदेशी, कोणत्याही धर्माचा असला तरी सरकार (विलंबाने का होईना) शिक्षा करते. जर काँग्रेसला 'विशिष्ट घटकांना' दुखवायचेच नव्हते तर फाशी न देणे सयुक्तिक ठरले नसते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

.

विकास
Sun, 02/10/2013 - 10:39 नवीन
तुम्हाला त्यात राजकारण वाटले नाही ना, मग झाले तर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

उमेदवार की मुद्दे?

सुनील
Sat, 02/09/2013 - 21:31 नवीन
भाजपाने आत पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण यापेक्षा निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढवायची, यावर विचार करावा! भात्यातील बाण कमी-कमी होत चाललेत ;)
  • Log in or register to post comments

विश्वास

विकास
Sun, 02/10/2013 - 10:24 नवीन
भात्यातील बाण कमी-कमी होत चाललेत
कदाचीत भाजपाच काँग्रेसवर विश्वास असेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

नवीन बाण...

विकास
Tue, 02/12/2013 - 19:33 नवीन
Rs 3600-cr chopper deal scam: Italian firm chief held on charges of bribing in India तो जसाच्या तसा प्रश्न आहेच. पण अजून एक मुद्दा होऊ शकतो तो म्हणजे २०१० साली यात कदाचीत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने त्याला मंजूरी दिली असे आता सुरक्षा मंत्रालय म्हणत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सहज आट्।अवले म्हणून..

राघव
Tue, 02/12/2013 - 21:54 नवीन
आणखी हाही एक मुद्दा होऊ शकतो - http://dailypioneer.com/home/online-channel/360-todays-newspaper/99212-thorium-could-have-powered-india.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

महागाई आर्थिकमंदी आणि

नाना चेंगट
Sun, 02/10/2013 - 11:25 नवीन
महागाई आर्थिकमंदी आणि भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत. परंतु पहिल्या दोन मुद्यावर भाजपाकडे ठोस उत्तर नाही आणि तिसरा मुद्दा चर्चेला आणण्यात भाजपाला स्वारस्य तेवढे नसेल त्यामुळे भावनिक आवाहन, हिंदू आता भिणार नाहीत, मंदीर वही बनायेंगे हे मुद्दे घेऊन रिंगणात येतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

भात्यातले बाण कमी कशाला?बक्कळ

अनामिका
Tue, 02/12/2013 - 23:02 नवीन
भात्यातले बाण कमी कशाला?बक्कळ बाण आहेत खर पाहता भाता कमी पडायचा ....पण योग्य वेळी शरसंधान करणे गरजेचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा