Skip to main content

आज नेताजी सुभाष जयंती

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 23/01/2013 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
akherJPG भारतीय स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या व परकिय सत्तेवर निर्णायक घाव घालण्यासाठी 'आजाद हिंद सेनेला' घेउन शत्रूवर निर्णायक हल्ला करायला निघालेल्या व दुर्दैवाने स्वप्न साकार होण्याआधीच अनंतात विलिन झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज त्यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त सादर वंदन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16122
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by मन१

चुकून वेंकटरामन लिहीले होते. ते आर के नारायणन होते. धन्यवाद!

In reply to by विकास

आर के नारायण हे दिग्गज व्यंगचित्रकार्.टाइम्स मधील "कॉमन मॅन" हे त्यांचेच अपत्य. . के आर नारायणन हे भारताचे माजी राष्ट्रपती.

In reply to by विकास

लक्ष्मी सहगल यांनी पुरस्कार नाकारला होता हे खरे. मात्र त्याचा आझाद हिंद सेना आणि भारत सरकार यांच्यातील तथाकथित वादाशी काहीही संबंध नसून, कॅ. सहगल यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीशी संबंध असावा असा दावा त्यांच्या कम्युनिष्ट पक्षाने केला होता. येथे वाचा. http://www.hindustantimes.com/News-Feed/India/Politicking-over-the-Bhar…
Pandhe pointed out that CPI(M) members in West Bengal and Kerala were known to reject even the freedom fighters’ pension as they viewed it as a government dole. “Our Presidential candidate Laxmi Sehgal is one such freedom fighter who refused the pension and the (Padma) award,” said Pandhe. CPI general secretary A.B. Bardhan had his own take on the debate. “We are anti-establishment and are fighting the state to attain a socialist society. So, we are against any state awards,” he said.
कदाचित आझाद हिंद सेनेला सरसकट भारतीय सेनेत स्थान न देण्यामागे सुभाषबाबू व आझाद हिंद सेनेचे इतर पदाधिकारी यांच्या साम्यवादी विचारसरणीच्या प्रेमाची नेहरुंना लागलेल्या कुणकुणीचे काही स्थान असावे काय?

In reply to by निनाद मुक्काम …

कृपया महानायक ला इतक महत्व देऊ नका. ती 'कादांबरी' आहे. ऐतिहासिक दस्ताएवज नाही.आणि क्लर्क हा तुमचा टेकु असेल तर मग बोलनेच संपले

दुसर्‍या एका धाग्यावर गांधींच्या मृत्युदिनाचे 'पावित्र्य' राखावे असे मत कुणीतरी व्यक्त केले होते. तेच या धाग्यालाही लागू व्हायला हरकत नाही.