✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आज नेताजी सुभाष जयंती

स
सर्वसाक्षी यांनी
Wed, 01/23/2013 - 14:50  ·  लेख
लेख
akherJPG भारतीय स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या व परकिय सत्तेवर निर्णायक घाव घालण्यासाठी 'आजाद हिंद सेनेला' घेउन शत्रूवर निर्णायक हल्ला करायला निघालेल्या व दुर्दैवाने स्वप्न साकार होण्याआधीच अनंतात विलिन झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज त्यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त सादर वंदन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
15945 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

_/\_

सोत्रि
Wed, 01/23/2013 - 14:57 नवीन
सुभाषबाबूंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! -(सुभाषबाबूंचा भक्त) सोकाजी
  • Log in or register to post comments

_/\_

धमाल मुलगा
Wed, 01/23/2013 - 15:34 नवीन
अरे हो की. आज २३ जानेवारी! धन्यवाद साक्षीदेवा..साफ विसरुन गेलो होतो मी. एक देशप्रेमानं पार वेडं झालेलं वादळ ह्याशिवाय दुसरी उपमाच सुचत नाही सुभाषबाबूंसाठी. देश स्वतंत्र करण्यासाठीच्या त्यांच्या अपरिमित कष्टांची तुलनाच करवत नाही. स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करुन, एक दोन नव्हे, नऊ राष्ट्रांची मान्यता मिळवून, आझाद हिंदचे निराळे चलन. वापरात आणण्यासारख्या गोष्टी करण्यासाठी खरंच हिम्मत लागते. अन् तेही अश्या परिस्थितीत, जेव्हा जनमतचा कौल असलेली सर्वात मोठी देशी शक्ती पुर्या ताकदीनिशी विरोधात असताना! अत्यंत कर्तबगार, परंतु तितकाच दुर्दैवी सेनानी. काय बोलु अन काय नको अशी अवस्था होते नेताजींचा विषय निघाला की. तेवदहा इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments

देशी शक्ती?

आजानुकर्ण
गुरुवार, 01/24/2013 - 02:34 नवीन
जेव्हा जनमतचा कौल असलेली सर्वात मोठी देशी शक्ती पुर्या ताकदीनिशी विरोधात असताना!
कोणती बरे ही शक्ती? महात्मा गांधी तर नव्हे? (की ज्यांना राष्ट्रपिता या अभिधानाने सर्वप्रथम गौरवणारे सुभाषबाबूच होते. (दुवा)) असो सुभाषचंद्र बोस यांची महती सिद्ध करण्यासाठी इतर कोणत्याही नेत्याचे अवमूल्यन करण्याची गरज नाही असे वाटते. नेताजींच्या स्मृतीला अभिवादन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

महात्मा गांधीच

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 01/25/2013 - 07:59 नवीन
कोणती बरे ही शक्ती? महात्मा गांधी तर नव्हे?
अहो महात्मा गांधीच. आपला नेता किती महान होता हे सांगताना महात्मा गांधींना चार-दोन टपल्या मारल्याशिवाय यांना समाधान मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

आपला नेता किती महान होता हे

मृत्युन्जय
Fri, 01/25/2013 - 14:28 नवीन
आपला नेता किती महान होता हे सांगताना एकुणात तुम्ही वेगळे काय केलेत? " नेताजींना त्यांचा नेता ठरवुन मोकळे झालात. म्हणजे तुमचा त्यांचा काहीच संबध नाही. गांधी तुमचे, नेताजी त्यांची असेच ना? दुर्दैव आहे देशाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

नाही हो

पुण्याचे वटवाघूळ
Mon, 01/28/2013 - 13:37 नवीन
नाही हो. गांधीजी किती महान होते हे सांगताना इतर नेत्यांच्या टपलीत मारायची आमची पध्दत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जरासा टवाळपणा

नितिन थत्ते
Mon, 01/28/2013 - 13:45 नवीन
>>इतर नेत्यांच्या टपलीत मारायची आमची पध्दत नाही. ते बहुतेक इतर नेते डोक्यावर काहीतरी घालत (टोपी/हॅट/पगडी) असत त्यामुळे टपलीत मारता येत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

याला म्हणतात थत्तेचाचांचा प्रतिसाद

पुण्याचे वटवाघूळ
Mon, 01/28/2013 - 15:31 नवीन
ते बहुतेक इतर नेते डोक्यावर काहीतरी घालत (टोपी/हॅट/पगडी) असत त्यामुळे टपलीत मारता येत नसावी.
याला म्हणतात थत्तेचाचांचा प्रतिसाद. वल्लभभाई पटेल आणि गांधीजी सोडल्यास इतर सर्वच महत्वाच्या नेत्यांच्या डोक्यावर टोपी/पगडी/हॅट इत्यादी काहीतरी असायचे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सिध्द करा अन्यथा विधान मागे घ्या!

धमाल मुलगा
Mon, 01/28/2013 - 16:15 नवीन
कशावरुन महात्मा गांधी आणि कशावरुन त्यांना टपल्या मारल्या? एकतर सिध्द करा नाहीतर विधान मागे घ्या! माझ्या माहितीप्रमाणे बॅ.भुलाभाई देसाई, राजेंद्रप्रसाद, आचार्य कृपलानी, राजाजी, एके काळचे अत्यंत जवळचे मित्र असे जवाहरलाल नेहरु ही मातबर मंडळी आणि महात्मा मोहनदास करमचंद गांधी हे दोन्ही वेगवेगळे आहेत. अर्थातच काँग्रेसही माझ्यामाहितीप्रमाणे केवळ काँग्रेस=गांधी असं नसावं. आणि आपला नेता-दुसर्‍याचा नेता? आनंद आहे! त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाला आज किती वर्षं उलटली? अजुनही हे दुहीचं विष तसंच पोखरतं आहे. आनंद आहे. गांधीवादाची हत्या गांधीअनुयायांनीच केली हे पदोपदी किती सार्थ ठरतंय ते पटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

व्यक्ती????

धमाल मुलगा
Mon, 01/28/2013 - 16:08 नवीन
मी शक्ती असं लिहिलंय. व्यक्ती असं दिसतंय का ते? >>कोणती बरे ही शक्ती? देशामध्ये असलेला तत्कालीन सर्वात मोठा पक्ष कोणता बरे होता? काँग्रेस ना? मग तीच तर शक्ती म्हणतोय मी. नौजवानसभा, अनुशीलन समिती, युगंतर, अभिनव भारत, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी ह्या आणि अश्या कित्येक शक्ती आपापल्या परीनं स्वातंत्र्यासाठी झगडत होत्याच. परंतू सर्वात मोठी असलेली आणि जनमताचा अनुनय असलेली शक्ती कोणती बरे होती? :) >>महात्मा गांधी तर नव्हे? ते तर काँग्रेस नावाच्या एका संघटनेचा एक भाग होते ना? त्यांनाच जर काँग्रेस असं म्हणणं असेल तर काँग्रेसमध्ये कार्यरत राहून कित्येक कामं करणार्‍या इतर कर्तबगार नेते/कार्यकर्त्यांचं श्रेय हिरावण्याचा प्रकार नाही का बरे ठरत? निदान माझी तरी तशी भूमिका नाही. >>(की ज्यांना राष्ट्रपिता या अभिधानाने सर्वप्रथम गौरवणारे सुभाषबाबूच होते. (दुवा)) अलबत! गांधी आणी बोस ह्यांचे वैयक्तिक पातळीवरचे संबंध कसे घनिष्ट होते त्याबद्दल प्रत्यवाय असण्याचं काही कारणच दिसत नाही. :)
सुभाषचंद्र बोस यांची महती सिद्ध करण्यासाठी इतर कोणत्याही नेत्याचे अवमूल्यन करण्याची गरज नाही असे वाटते
केवळ एका महात्माने दाखवलेल्या मार्गाऐवजी इतर मार्गांनी स्वातंत्र्यासाठी रक्ताचं पाणी करणार्‍यांबाबत विषय निघताच हा गांधींचा उपमर्द आहे असे वाटण्याची अथवा येनकेनप्रकारे ओढूनताणून तो गांधीद्वेष सिध्द करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

केवळ एका महात्माने दाखवलेल्या

महेश हतोळकर
Mon, 01/28/2013 - 16:29 नवीन
केवळ एका महात्माने दाखवलेल्या मार्गाऐवजी इतर मार्गांनी स्वातंत्र्यासाठी रक्ताचं पाणी करणार्‍यांबाबत विषय निघताच हा गांधींचा उपमर्द आहे असे वाटण्याची अथवा येनकेनप्रकारे ओढूनताणून तो गांधीद्वेष सिध्द करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही असे वाटते.
you said it!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धन्यवाद

आजानुकर्ण
Mon, 01/28/2013 - 17:46 नवीन
तुमचे दोन्ही प्रतिसाद जोडले तर साधारण हे असे दिसते. पहिला प्रतिसादः
जेव्हा जनमतचा कौल असलेली सर्वात मोठी देशी शक्ती पुर्या ताकदीनिशी विरोधात असताना!
दुसरा प्रतिसादः
देशामध्ये असलेला तत्कालीन सर्वात मोठा पक्ष कोणता बरे होता? काँग्रेस ना? मग तीच तर शक्ती म्हणतोय मी. नौजवानसभा, अनुशीलन समिती, युगंतर, अभिनव भारत, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी ह्या आणि अश्या कित्येक शक्ती आपापल्या परीनं स्वातंत्र्यासाठी झगडत होत्याच. परंतू सर्वात मोठी असलेली आणि जनमताचा अनुनय असलेली शक्ती कोणती बरे होती? ते तर काँग्रेस नावाच्या एका संघटनेचा एक भाग होते ना? त्यांनाच जर काँग्रेस असं म्हणणं असेल तर काँग्रेसमध्ये कार्यरत राहून कित्येक कामं करणार्‍या इतर कर्तबगार नेते/कार्यकर्त्यांचं श्रेय हिरावण्याचा प्रकार नाही का बरे ठरत? निदान माझी तरी तशी भूमिका नाही.
आता या दोन्ही प्रतिसादांवरुन तुम्हाला असे म्हणायचे आहे की काँग्रेस ही जनमताचा कौल असलेली शक्ती as a party सुभाषबाबूंच्या विरोधात होती.ते सुद्धा पूर्ण ताकदीनिशी. म्हणजे ब्रिटिशांविरोधात लढण्याऐवजी आपली पुरी शक्ती सुभाषबाबूंच्या विरोधात लढण्यात खर्च करण्यात काँग्रेसला रस होता. याबाबत तुम्हाला कुठे वाचायला मिळाले हे कळाल्यास बरे होईल. सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष निवडणुकीतून निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेस हा पक्ष त्यांच्या विरोधात होता हे विधान बिनबुडाचे आहे. केवळ एका महात्माने दाखवलेल्या मार्गाऐवजी इतर मार्गांनी स्वातंत्र्यासाठी रक्ताचं पाणी करणार्‍यांबाबत विषय निघताच हा गांधींचा उपमर्द आहे असे वाटण्याची अथवा येनकेनप्रकारे ओढूनताणून तो गांधीद्वेष सिध्द करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

चालुद्या!

धमाल मुलगा
Mon, 01/28/2013 - 18:16 नवीन
केवळ वितंडवादापुरतं शब्दच्छल करणे किंवा एखाद्यानं न केलेलं विधान त्याच्याशी जुळवणं ह्यात आपल्याला तरी काही मझा वाटत नाही. वस्तुस्थिती नाकारुन किंवा तिला वळसा घालून घडलं त्यात फरक पडत नाही. ज्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाबद्दल बोलता आहात..ते एकदा नव्हे, सलग दोनदा सुभाषबाबूंकडेंच होतं. दुसर्‍या निवडणूकीला विजयश्री ही पुर्‍या विरोधातूनही खेचून आणली होती त्यांनी. ते ही असोच. एकुणच काँग्रेस+सुभाषचंद्र बोस हा इतिहास पुन्हा एकदा नीट पाहिला तर मी म्हणालो ते नक्की काय, ते लक्षात न येण्याजोगं बिलकुलच नाही. पण असोच. मी म्हणालो ते आरोप वाटले तर वाटोत बापुडे. बिनबुडाचे म्हणाल तर तसं तर तसं! चर्चेमध्ये शब्दच्छलामध्ये अन विवादामध्ये सहज हरण्याजोगाच आमचा एकुण आवाका. पण त्यानं वस्तुस्थिती लपेल काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

समजले नाही.

आजानुकर्ण
Mon, 01/28/2013 - 19:47 नवीन
मी काहीही शब्दच्छल केलेला नाही. तुमचे दोन्ही प्रतिसाद मी कॉपी पेस्ट केले आहेत. त्यात तुम्ही न केलेले विधान येण्याची शक्यता नाही. तुम्हाला गांधींजींऐवजी काँग्रेस अभिप्रेत होते हे तुम्ही स्पष्ट केल्याने काही शंका उपस्थित झाल्या. काँग्रेस ही जनमताचा कौल असलेली शक्ती जर सुभाषबाबूंच्या विरोधात असेल तर काँग्रेसच्या प्रतिनिधिंपुरताच मर्यादित असलेल्या मताधिकाराने सुभाषबाबू काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून येतात यात काही विरोधाभास दिसत नाही का तुम्हाला? दुसऱ्या निवडणुकीची विजयश्री कोणाच्या विरोधातून खेचून आणली होती ते मला कळले नाही. तिथे काही नॉन काँग्रेसींनी मतदान करुन काँग्रेसींचा पुरा विरोध मिटवण्याइतकी मते सुभाषबाबूंना देऊन त्यांना विजयी केले? निदान काँग्रेस ही शक्ती विरोधात आहे म्हणजे नक्की कोण विरोधात आहे तेवढे स्पष्ट केले तरी चालेल. शिवाय काँग्रेस पक्ष पुरता विरोधात असूनही सुभाषबाबूंना काँग्रेसच्याच अध्यक्षपदी का निवडून यावेसे वाटते आणि काँग्रेसी प्रतिनिधी पुरते विरोधात असूनही सुभाषबाबूंना का निवडून देतात तेही कळले तर बरेच होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

:-)

धमाल मुलगा
Mon, 01/28/2013 - 20:00 नवीन
एंजाॅय. द ट्रोलिंग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

ट्रोलिंग?

आजानुकर्ण
Mon, 01/28/2013 - 20:20 नवीन
a troll (pron.: /ˈtroʊl/, /ˈtrɒl/) is someone who posts inflammatory,[1] extraneous, or off-topic messages in an online community, such as a forum, chat room, or blog, with the primary intent of provoking readers into an emotional response[2] or of otherwise disrupting normal on-topic discussion.[3] नेताजींच्या अभिवादनपर प्रस्तावात 'कोणीतरी' त्यांना विरोध केला होता वगैरे विषयाशी बिलकुल संबंधित नसलेले वाक्य माझे नव्हते. असे वाक्य पोस्ट करुन वाचकांना त्या कोणाविरोधात भडकवणे हा माझा हेतू नव्हता. त्यामुळे निदान मी तरी ट्रोलिंग करत नाही असे दिसते. मी केवळ विषयाशी संबंधित नसलेल्या उपचर्चेवर 'असे कोणीतरी नव्हतेच' एवढेच सिद्ध करुन अशा स्वरुपाच्या ट्रोलिंगला विरोध केला इतकेच. तरीही मला ट्रोल म्हणण्यास माझी हरकत नाही कारण ते खरे नाही. इथे चर्चेतही नसलेल्या गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न झालाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धम्या, तु बरोबर आहेस

सर्वसाक्षी
Mon, 01/28/2013 - 23:23 नवीन
१९३९ च्या निवडणुकीत कॉग्रेसच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदासाठी निवडणुक झाली. नेताजींनी ती निवडणुक लढविणे गांधी महाशयांना पसंत नव्हते. त्यांनी पट्टाभींना आपला उमेदवार म्हणुन उभे केले आणि निवडणुक प्रतिष्ठेची केली. तरीही नेताजींचाच विजय झाला. दणदणीत विजय. मात्र लोकशाही प्रक्रियेने निवडुन आलेल्या नेताजींना मतदारांचा कौल मिळाला हे गांधी महाशयांना पचविता आलं नाही. त्यांनी पट्टाभींचा पराभव फारच व्यक्तिश: घेतला आणि 'हा माझाच पराभ मानतो' अशी जाहिर भूमिका घेतली. ते इतकेच करुन थांबले नाहीत तर त्यांनी आपला नापसंतीचा सूर आळवतच ठेवला. स्वत:पेक्षा पक्ष आणि ध्येय मोठे मानणार्‍या नेताजींनी अखेर राजिनामा दिला. जे आपल्याला सोयीचे नाही ते खोटे व द्वेषग्रस्त असा अनेकांचा खाक्या असतो. एखाद्या व्यक्तिला आदरस्थानी ठेवल्यावर त्या व्यक्तिच्या उणीवा दाखविलेल्या त्यांना सहन होत नाहीत. त्यामुळेच तु केलेले परिस्थितीचे वर्णन करणारे विधान यांना झोंबले. सत्य कथनाला मग 'टपल्या मारणे' वगैरे स्वरुप दिले गेले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धन्यवाद

चेतन
Tue, 01/29/2013 - 17:57 नवीन
नेताजींना आदरांजली आणी आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद साक्षिदेवा >> जे आपल्याला सोयीचे नाही ते खोटे व द्वेषग्रस्त असा अनेकांचा खाक्या असतो. सहमत पण ते दोन्ही बाजुंना सारखेच लागु आहे. येथे गांधी आणि बोस यांच्यातील वादाबद्दल थोडिफार संग्रहीत माहिती वाचायला मिळेल. http://middlab.middlebury.edu/files/2012/05/Woodworth_VictoriesReversed1.pdf राहुन राहुन एकाच गोष्टीचं वाईट वाटतं ते नेतांजींना मिळालेलं भारतरत्न वादाच्या भोवर्‍यात अडकण्याबद्दल. अवांतरः थोडेसे गुढ नेताजींच्या म्रूत्युच्या चौकशीसमितीच्या (तिसर्‍या) अहवाला बद्दल जो कोणतेही ठोस कारण न देता नाकारला. आणि अहवालात नाकारुन देखिल एका टिव्ही मुलाखतित मुखर्जी साहेबांनी गुमनामी बाबांना नेताजी मानणं RTI चा उपयोग करुन अनुज धर यांनी मिळ्वलेली माहिती देखील संभ्रमात टाकणारी आहे http://en.wikipedia.org/wiki/Mission_Netaji तसेच ब्रिटीशांनी देखिल माहिती २०२१ पर्यंत उघड करण्यास दिलेला नकार सगळच कस गुढ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

गैरसमज आणि समारोप

आजानुकर्ण
Tue, 01/29/2013 - 18:31 नवीन
तुमचाही माझ्याप्रमाणेच गैरसमज झाला आहे. प्रस्तुत सदस्याला कोठेही गांधीजी अपेक्षित नव्हते त्यामुळे त्याच्याच शब्दात सांगायचे म्हणजे-
कशावरुन महात्मा गांधी आणि कशावरुन त्यांना टपल्या मारल्या? एकतर सिध्द करा नाहीतर विधान मागे घ्या!
असो. आता राहिली गोष्ट अशा स्वरुपाच्या चर्चांची. क्रांतिकारकांच्या कार्याबद्दल येथे सर्वांनाच आदर असावा. मात्र असे विषय चर्चेला घेऊन हळूच गांधी किंवा काँग्रेसला टपली मारण्यात मला कोणतेही हशील दिसत नाही. गांधींचा सुभाषबाबूंना एवढा विरोध असूनही सुभाषबाबूंनी त्यांना राष्ट्रपिता म्हटले तेव्हा स्वतः नेताजींना गांधींबाबत असलेला आदर अधोरेखित झाला. सुभाषबाबूंबाबत असलेला आदर अधोरेखित केल्याने गांधींना टपल्या मारण्याचा हक्क मिळत नाही. सुभाषबाबूंच्या नावाखाली आपल्या मनातील गांधींविषयीचा किंतू येथे बाहेर काढणे हे गांधीइतकेच सुभाषबाबूंसाठीही अवमानकारक आहे. मुळात तुमच्या-माझ्यासकट सर्व सदस्यांचे स्वातंत्र्य किंवा राजकारण याबाबत काडीचेही योगदान नसताना दिवंगत क्रांतिकारकांचे अभिवादनाचे प्रस्ताव चघळायला घेऊन त्याआडून क्रांतिकारकांइतकेच योगदान असलेल्या गांधी आणि काँग्रेसची नालस्ती करणे हा मूळ हेतू असल्यास तो आपल्या क्रांतिकारकांसाठी अपमानकारक आहे. गांधींचे जे काही तथाकथित अपराध होते त्याचा बदला गांधींचा खून करुन गांधीविरोधकांनी घेतला. आता तरी त्यांचे कर्तृत्व समजून घ्यायला हरकत नसावी. गांधींचे कर्तृत्त्व समजून घेण्याची इच्छा नसली तरी क्रांतीकारकांच्या स्मृतीचे पावित्र्य राखण्यासाठी अशा अभिवादनांतून गांधींवर चिखलफेक करण्याची गरज नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

अजिबात समजले नाही

पुण्याचे वटवाघूळ
Tue, 01/29/2013 - 21:00 नवीन
नेताजींनी ती निवडणुक लढविणे गांधी महाशयांना पसंत नव्हते. त्यांनी पट्टाभींना आपला उमेदवार म्हणुन उभे केले
तुम्हाला नेताजी पसंत होते म्हणून गांधीजींनाही ते पसंत असावेत आणि नेताजी निवडणुकीला उभे राहणार म्हटल्यावर गांधींनी आपला उमेदवार उभा करूच नये हा अट्टाहास का?
त्यांनी पट्टाभींचा पराभव फारच व्यक्तिश: घेतला आणि 'हा माझाच पराभ मानतो' अशी जाहिर भूमिका घेतली. ते इतकेच करुन थांबले नाहीत तर त्यांनी आपला नापसंतीचा सूर आळवतच ठेवला.
लोकशाही पध्दतीतही शेवटचा उपाय म्हणून अशा 'डिस्क्रिशनरी पॉवर' कोणाकडे तरी दिलेल्या असतात.अमेरिकन अध्यक्षाच्या हातात व्हेटो असतो तर भारतीय राष्ट्रपती एखादे बिल एकदा नाकारू शकतो.त्याकाळी गांधींजींना अशी 'डिस्क्रिशनरी पॉवर' कोणी आपणहून दिलेली नसली तरी इतर कोणाही नेत्यापेक्षा गांधींच्या मागे जनाधाराचे व्यापक समर्थन होते त्यातून 'स्वयमेव मृगेन्द्रता' या न्यायाने ती पॉवर आपोआप गांधीजींकडे आली.आणि त्यांनी उठल्यासुटल्या कसलाही विचार न करता अशी पॉवर वरचेवर वापरली असती तर त्यांना मिळत असणारे समर्थन कमी झाले असते. काँग्रेसची भूमिका पहिल्यापासून नाझी-फॅसिस्ट-जपान या अक्ष देशांना विरोध करायची होती.पण आतल्या खलबतांमध्ये सुभाषबाबूंचा जपान-जर्मनीकडे असलेला कल महात्मा गांधींच्या लक्षात कशावरून आला नसेल?असा अध्यक्ष बनणे म्हणजे संघटनेच्या एका मुख्य तत्वाला हरताळ फासणे आणि कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणारे कशावरून ठरले नसते?कदाचित या कारणावरून सुभाषबाबू अध्यक्ष म्हणून गांधीजींना कशावरून नको असतील्?आणि अशा कारणावरून त्यांनी डिस्क्रिशनरी पॉवरचा वापर कशावरून केला नसेल?
स्वत:पेक्षा पक्ष आणि ध्येय मोठे मानणार्‍या नेताजींनी अखेर राजिनामा दिला.
हे म्हणजे मेकिंग व्हर्च्यु ऑफ नेसेसिटी झाले. शेवटी काँग्रेसमध्ये गांधीजींचाच शब्द प्रमाण होता आणि आपल्या मागचा जनाधार कमी होत आहे हे लक्षात येऊन अध्यक्ष म्हणून काम करायला अडचण येऊ नये म्हणून कशावरून नेताजींनी आधीच राजीनामा दिला नसेल?
जे आपल्याला सोयीचे नाही ते खोटे व द्वेषग्रस्त असा अनेकांचा खाक्या असतो. एखाद्या व्यक्तिला आदरस्थानी ठेवल्यावर त्या व्यक्तिच्या उणीवा दाखविलेल्या त्यांना सहन होत नाहीत.
+१. नेमके असेच जे क्रांतिकारक समर्थक गांधीजींना नावे ठेवतात त्यांच्याविषयी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

अरे वा!

सर्वसाक्षी
Tue, 01/29/2013 - 22:33 नवीन
"लोकशाही पध्दतीतही शेवटचा उपाय म्हणून अशा 'डिस्क्रिशनरी पॉवर' कोणाकडे तरी दिलेल्या असतात.अमेरिकन अध्यक्षाच्या हातात व्हेटो असतो तर भारतीय राष्ट्रपती एखादे बिल एकदा नाकारू शकतो" काय सांगता काय? म्हणजे अमेरीकेचा पराभूत राष्ट्राध्यक्ष जेत्या राष्ट्राध्यक्षाला पदच्युत करु शकतो? अरे वा. ही माहिती नव्यानेच मिळाली. पण काय हो, जर पडला तर तो सत्तेवरच नाही, मग त्याला व्हेटो पॉवर कशी मिळणार? एखाद्या लोकशाही राष्ट्रात बहुमताने निवडुन आलेला नेता स्वतःला पसंत नाही म्हणुन एखाद्या राष्ट्रपतीने वा राष्ट्राध्यक्षाने या कारंणास्तव पदच्युत केल्याचे एखादे उदाहरण द्याल काय? हे म्हणजे मेकिंग व्हर्च्यु ऑफ नेसेसिटी झाले. शेवटी काँग्रेसमध्ये गांधीजींचाच शब्द प्रमाण होता आणि आपल्या मागचा जनाधार कमी होत आहे हे लक्षात येऊन अध्यक्ष म्हणून काम करायला अडचण येऊ नये म्हणून कशावरून नेताजींनी आधीच राजीनामा दिला नसेल? फारच विनोदी:))))))). पुढची निवडणुक तर पुढच्या वर्षी होती हो, मग ते तडकाफडकी जनाधार संपल्याच्या कारणास्तव राजिनामा का देतील? आणि नेताजी आपली मते आपले विचार स्पष्ट मांडुन व ते लोकांना आदरणीय वाटल्यानेच त्यांना निवडुन दिले गेले होते. एकाएकी तो जनादार कसा काय नाहीसा होइल? मूळ मुद्याला तुम्ही सोयिस्कर बगल दिल्याचे लक्षात आले आहे, लपले नाही. 'माझ्या उमेदवाराचा पराभव म्हणजे माझा पराभव पराभव' या त्राग्याचे काय? निदान लोकशाहीत तरी पराभव स्विकारायची प्रांजल वृत्ती आणि हिंमत असावी. आपल्या उमेदवाराचा पराभव का झाला यावर आत्मपरिक्षण व्हायला हवे होते. याउलट 'लोकांना कोणाचे नेतृत्व मान्य असावे हे मी ठरविणार' हा अहंकार उघड झाला. म्हणजे थोडक्यात काय तर 'मला लोकशाही हवी, नेता मतदानाने निवडला जावा मात्र मतपत्रिकेवर कुणाचे नाव असावे हे मी ठरविणार !'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

काय बोलता राव

पुण्याचे वटवाघूळ
Wed, 01/30/2013 - 12:58 नवीन
काय सांगता काय? म्हणजे अमेरीकेचा पराभूत राष्ट्राध्यक्ष जेत्या राष्ट्राध्यक्षाला पदच्युत करु शकतो? अरे वा. ही माहिती नव्यानेच मिळाली.
भारतातही १९९० च्या दशकात शिवसेना आणि भाजपच्या अनेक आमदारांची निवडणुक कोर्टाने रद्द केली होती हे तुमच्या लक्षात असेलच.त्याचे कारण होते?कारण त्यांनी हिंदुत्वाच्या नावावर मते मागितली होती.कोणत्याही धर्माच्या नावावर मते मागणे हे आपल्या राज्यघटनेच्या मूळ तत्वात बसत नसल्यामुळे कायद्यात त्या प्रकारावर बंदी आहे.हे सगळे आमदार बहुमताने अगदी लोकशाही पध्दतीने निवडून आले होते का?अगदी १००%. पण जर त्यांच्या कृतीतून ते राज्यघटना आणि कायदा यांचे उल्लंघन करत असतील तर त्यांची निवड रद्द करायचा अधिकार कोर्टाला आहे. त्याचप्रमाणे फॅसिझमला विरोध हे काँग्रेसचे अगदी पहिल्यापासूनचे तत्व होते.कदाचित १९३९ मध्ये नेताजींचा कल त्याबाजूला आहे हे गांधीजींच्या लक्षात आले असेल आणि त्यामुळे अगदी बहुमताने निवडला गेलेला अध्यक्षही जर मुळातल्या काँग्रेसच्या तत्वांना हरताळ फासत असेल तर असा मनुष्य काँग्रेस अध्यक्षपदी नको असे गांधींना वाटले असेल तर त्यात मला तरी काहीही चूक वाटत नाही.
जर पडला तर तो सत्तेवरच नाही, मग त्याला व्हेटो पॉवर कशी मिळणार?
गांधीजींना ही पॉवर त्यांना असलेल्या व्यापक जनाधारातून आपोआप मिळाली होती.आणि त्या पॉवरचा त्यांनी दुरूपयोग केला असता तर त्यांच्या मागचा जनाधार कमीच झाला असता.
एखाद्या लोकशाही राष्ट्रात बहुमताने निवडुन आलेला नेता स्वतःला पसंत नाही म्हणुन एखाद्या राष्ट्रपतीने वा राष्ट्राध्यक्षाने या कारंणास्तव पदच्युत केल्याचे एखादे उदाहरण द्याल काय?
अत्यंत विनोदी आणि बादरायण संबंध लावलेला प्रश्न.गांधीजींचा सुभाषबाबूंना एक व्यक्ती म्हणून नव्हे तर त्यांच्या कार्यपध्दतीला विरोध होता. आणि दुसरे म्हणजे १९३८ च्या हरिपुरा काँग्रेसचे नेताजीच अध्यक्ष होते.त्यावेळी गांधीजींनी कोणा नेत्याला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते "I know Subhash is unstable. But nobody other than he should be the President of Congress" (तत्सम काहीतरी). मग १९३९ मधील गांधीजींच्या भूमिकेवर गळे काढणारे १९३८ च्या भुमिकेवर मौन का बाळगतात? एक उगवता आणि प्रॉमिसिंग नेता म्हणून गांधीजींनी १९३८ मध्ये सुभाषबाबूंना जरूर पाठिंबा दिला असेल पण असा पाठिंबा देऊन आपली चूक झाली हे लक्षात येताच नंतरच्या वर्षी त्यांनी ती सुधारली तर त्यात चूक काय?
पुढची निवडणुक तर पुढच्या वर्षी होती हो, मग ते तडकाफडकी जनाधार संपल्याच्या कारणास्तव राजिनामा का देतील? आणि नेताजी आपली मते आपले विचार स्पष्ट मांडुन व ते लोकांना आदरणीय वाटल्यानेच त्यांना निवडुन दिले गेले होते. एकाएकी तो जनादार कसा काय नाहीसा होइल?
याचे कारण सुरवातीला गांधीजींना सुभाषचंद्रांना असलेला विरोध सगळ्यांना माहित नसावा म्हणून त्यांना मतेही मिळाली.पण नंतरच्या काळात गांधीजींचा त्यांना असलेला विरोध कळताच जनाधार कमी व्हायची शक्यता आहेच.कारण शेवटी काँग्रेसमध्ये महात्मा गांधीच हे सर्वात जास्त जनाधार असलेले नेते होते.
याउलट 'लोकांना कोणाचे नेतृत्व मान्य असावे हे मी ठरविणार' हा अहंकार उघड झाला.
म्हणजे गांधीजी वाटेल ते लोकांवर लादणार आणि लोक ते ऐकून घेणार? लोक इतके मूर्ख होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

कोलांट्या

सर्वसाक्षी
Wed, 01/30/2013 - 23:07 नवीन
कोर्ट की राष्ट्रप्रमुखाचा नकाराधीकार? चूक झाली होती तर त्यांची स्वत:ची. मतदान सदस्यांनी केले होते, गांधींनी नाही. नेताजी विजयी झाले ते गांधी पुरस्कृत उमेदवाराला हरवुनच. म्हणजेच नेताजींना अधिक जनाधार मिळाला होता. लोक काय होते ते सोडा. गांधींनी झोंडशाही केली हे सत्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

गांधींनी झोंडशाही केली हे सत्य

आजानुकर्ण
गुरुवार, 01/31/2013 - 02:07 नवीन
गांधींनी झोंडशाही केली हे सत्य
गांधींचे समकालीन असलेल्या सुभाषबाबूंनी कुठेही 'मी गांधींचा तिरस्कार करतो' किंवा 'गांधी माझा तिरस्कार किंवा द्वेष करतात' किंवा 'माझ्यासंदर्भात गांधींनी झोंडशाही केली' वगैरे म्हटल्याचे वाचले नाही. त्यामुळे या एकंदर प्रकरणात गांधींच्या अधिकाराबाबत सुभाषबाबूंना शंका नसावी. मात्र आता साठसत्तर वर्षांनंतर हे मुद्दे घेऊन सुभाषबाबूंची कड घेऊन गांधींना झोडपणे हे सुभाषबाबू आणि गांधी दोघांसाठी अपमानास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

+१

पुण्याचे वटवाघूळ
गुरुवार, 01/31/2013 - 15:59 नवीन
मात्र आता साठसत्तर वर्षांनंतर हे मुद्दे घेऊन सुभाषबाबूंची कड घेऊन गांधींना झोडपणे हे सुभाषबाबू आणि गांधी दोघांसाठी अपमानास्पद आहे.
+१. पण हे स्वयंघोषिक क्रांतिकारकांच्या समर्थकांना कोण समजावणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

सरदार पटेल

क्लिंटन
गुरुवार, 01/31/2013 - 08:13 नवीन
सरदार पटेलही सुभाषचंद्र बोसांच्या अध्यक्षपदाच्या विरोधात होते आणि त्यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी व्हावी असे त्यांनाही वाटत होते हे इथे समजतेच. पण कसे असते श्रेय द्यायची वेळ आली की ते पटेलांचे आणि दोष असला की तो गांधी-नेहरूंचा ही सोयीची विभागणी आधीच करून ठेवलेली असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

सरदार पटेल

सर्वसाक्षी
गुरुवार, 01/31/2013 - 22:49 नवीन
सरदार पटेल हे नेताजींनी निवडणुक लढविण्याच्या विरोधात होते ते केवळ अध्यक्ष बिनविरोध निवडणुक यावा म्हणुन. नेताजींना विरोध होता म्हणुन नव्हे. आपल्या दुव्यातही तसा स्पष्ट उल्लेख आहे. शिवाय सरदार पटेलांनी उभे राहण्याला विरोध केला, निवडुन आल्यावर 'मला तुम्ही पसंत नाही तेव्हा राजिनामा द्या' असा नव्हे. पटेलांचा उल्लेख धम्याने केला नसावा तो यामुळेच. तुम्ही दिलेल्या दुव्यातच सरदार पटेलांनी एका घटनेत गांधींनाही विरोध केल्याचेच नव्हे तर त्यांचे कृत्य 'मूर्खपणाचे असल्याचा' निर्वाळाही दिल्याचाही उल्लेख आहे. ते सांगायचे आपण सोयिस्कर रित्या टाळलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

समजले नाही

क्लिंटन
Fri, 02/01/2013 - 08:29 नवीन
शिवाय सरदार पटेलांनी उभे राहण्याला विरोध केला, निवडुन आल्यावर 'मला तुम्ही पसंत नाही तेव्हा राजिनामा द्या' असा नव्हे.
या लेखातील क्रोनोलॉजी थोडक्यात चोप्य-पस्ते करतो:On January 29 he was re-elected Congress president by 203 votes, defeating Sitaramayya. म्हणजे सुभाषचंद २९ जानेवारी १९३९ रोजी अध्यक्ष म्हणून निवडून गेले. पुढे Patel wanted Bose ousted from the presidentship of the Congress and suggested to Dr Rajendra Prasad, in a letter on July 12, 1939, to issue a show cause notice to Netaji for violating the All-India Congress Committee decision on prohibition. म्हणजे हे पत्र लिहायची घटना १२ जुलै १९३९ रोजीची.यातील पहिले वाक्य--Patel wanted Bose ousted from the presidentship of the Congress हे नक्की कधीचे हे तितकेसे स्पष्ट होत नसले तरी "ousted from the presidentship of the Congress" यावरून मला पामराला तरी असे वाटते की पटेलांना अध्यक्षपदी निवडून गेलेल्या सुभाषचंद्रांची उचलबांगडी करायची होती. तसेच मुंबईच्या प्रांत सरकारने जारी केलेल्या दारूबंदीच्या आदेशाला नेताजींनी विरोध केला हे पण त्यात लिहिले आहे.दारूबंदी हा काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये एक महत्वाचा कार्यक्रम होता हे सर्वज्ञात आहे.त्यालाच अध्यक्षांनी (किंवा कोणाही कार्यकर्त्यानेही) विरोध करणे कितपत योग्य आहे? याच लेखात म्हटले आहे की मे १९३९ मध्ये सुभाषचंद्रांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली आणि पटेलांचे राजेंद्रप्रसांदांना लिहिलेले पत्र जुलै १९३९ चे आणि त्यात सुभाषचंद्रांना "शो कॉज" नोटिस बजावायची गोष्ट नमूद केली होती.यावरून तरी असे दिसते की सुरवातीच्या काळात फॉरवर्ड ब्लॉक हा काँग्रेस पक्षांतर्गत गट होता आणि त्याचे स्वतंत्र पक्ष म्हणून अस्तित्व जुलै १९३९ मध्ये नव्हते.नाहीतर पटेलांचे पत्र आणि सुभाषचंद्रांना "शो कॉज नोटिस" वगैरे गोष्टी अर्थहिन ठरतात.
तुम्ही दिलेल्या दुव्यातच सरदार पटेलांनी एका घटनेत गांधींनाही विरोध केल्याचेच नव्हे तर त्यांचे कृत्य 'मूर्खपणाचे असल्याचा' निर्वाळाही दिल्याचाही उल्लेख आहे. ते सांगायचे आपण सोयिस्कर रित्या टाळलेत.
नाही सोयीस्कर रित्या अजिबात टाळले नाही.त्याच लेखात स्पष्ट उल्लेख आहे--"....Gandhi admitting 'the step would have been suicidal'." म्हणजे गांधीजींनीही आपली चूक मान्य केली.आपल्या हातून कोणत्या चुका झाल्या हे नुसते मान्यच नाही तर पुस्तके लिहून जगाला सांगायचा प्रांजळपणा गांधींमध्ये होता आणि ते महात्मा बनले यात या प्रांजळपणाचा वाटा मोठा आहे.जी गोष्ट गांधीजींनीच स्वतःच चुकीची असे म्हटले त्यावर आणखी टिप्पणी करून काय मिळणार होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

समजले नाही?

सर्वसाक्षी
Fri, 02/01/2013 - 12:43 नवीन
आपला दुवा म्हणतो की सरदारांनी जुलै मध्ये नेताजींना पदच्युत करायचा प्रस्ताव आणला, मात्र नेताजींनी राजिनामा २९ एप्रिल ला दिला होता! मग हे कसे काय शक्य आहे? फॉत्वर्ड ब्लॉकची स्थापना ३ मे १९३९ ची आहे. २२ जुन १९३९ च्या मुंबई सत्रात पक्षाची घटना ठरविली गेली. आपण म्हणता जुलै १९३९ मध्ये तो अस्तित्वात नव्हता? सरदार पटेलांचाही नेताजींना विरोध होता असा मुद्दा आपण मांडलात तेव्हा तसाच विरोध गांधींनाही होता हे नमूद केले नाहीत. विरोधाचे कारण व त्यानंतर काय घडले ही नंतरची घटना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

प्रतिसाद

क्लिंटन
Fri, 02/01/2013 - 13:51 नवीन
आपला दुवा म्हणतो की सरदारांनी जुलै मध्ये नेताजींना पदच्युत करायचा प्रस्ताव आणला, मात्र नेताजींनी राजिनामा २९ एप्रिल ला दिला होता! मग हे कसे काय शक्य आहे?
वर लिहिलेलाच प्रतिसाद चोप्य-पस्ते करतो: हे पत्र लिहायची घटना १२ जुलै १९३९ रोजीची.यातील पहिले वाक्य--Patel wanted Bose ousted from the presidentship of the Congress हे नक्की कधीचे हे तितकेसे स्पष्ट होत नसले तरी "ousted from the presidentship of the Congress" यावरून मला पामराला तरी असे वाटते की पटेलांना अध्यक्षपदी निवडून गेलेल्या सुभाषचंद्रांची उचलबांगडी करायची होती.
फॉत्वर्ड ब्लॉकची स्थापना ३ मे १९३९ ची आहे. २२ जुन १९३९ च्या मुंबई सत्रात पक्षाची घटना ठरविली गेली. आपण म्हणता जुलै १९३९ मध्ये तो अस्तित्वात नव्हता?
परत एकदा चोप्य-पस्ते: याच लेखात म्हटले आहे की मे १९३९ मध्ये सुभाषचंद्रांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली आणि पटेलांचे राजेंद्रप्रसांदांना लिहिलेले पत्र जुलै १९३९ चे आणि त्यात सुभाषचंद्रांना "शो कॉज" नोटिस बजावायची गोष्ट नमूद केली होती.यावरून तरी असे दिसते
की सुरवातीच्या काळात फॉरवर्ड ब्लॉक हा काँग्रेस पक्षांतर्गत गट होता आणि त्याचे स्वतंत्र पक्ष म्हणून अस्तित्व जुलै १९३९ मध्ये नव्हते.
नाहीतर पटेलांचे पत्र आणि सुभाषचंद्रांना "शो कॉज नोटिस" वगैरे गोष्टी अर्थहिन ठरतात. काँग्रेसपक्षांतर्गत स्वराज्य पक्ष होताच ना?जुलै १९३९ मध्ये त्याचप्रमाणे फॉरवर्ड ब्लॉक हा पंक्षातर्गत गट होता का हा प्रश्न आहे.१२ जुलै १९३९ रोजी सरदार पटेलांनी राजेन्द्र प्रसादांना लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे (http://books.google.co.in/books?id=_1HoB8i0EQYC&printsec=frontcover&dq=Dr.+Rajendra+Prasad+:+Correspondence+and+Select+Documents,+Vol.+3&hl=en&sa=X&ei=w3oLUYC4DM3jrAe52YHABQ&ved=0CDAQ6AEwAA) My dear Rajendra Babu, I have received your circular letter of the 11th July. I agree with you that we cannot decide this question finally in the absence of Mahatmaji and Jawaharlal. Both of them will be returning back from their respective places in the first week of August and we can keep the Working Committee meeting at the time of their returning. I am however strongly of the opinion that a prompt and clear indication of our attitude is necessary to prevent the rot. In August when we meet we can take no action against him, unless we finish the preliminaries beforehand. I would therefore suggest that a notice asking Subhas Babu to explain about his conduct in organising a country-wide agitation and a revolt against the decisions of the A.I.C.C., which he as the President of the Bengal Provincial Congress Committee is bound to respect and execute.So far as the Bengal Provincial Executive is concerned, it would be better to give notice to it as well. They had also disregarded your advice and committed a flagrant breach of discipline. Let them sent their explanation and we shall consider the question of action to be taken in the next meeting. Any weakness on our part at this stage is bound to spread indiscipline and weaken our organisation.You must have seen Subhas Babu's statement on the prohibition policy of the Bombay Government. He has done worse than what our enemies could do. He is now issuing another statement in reply to Mahatmaji's statement. यापूर्वी ९ जुलैला राजेन्द्रप्रसादांनी (सुभाषचंद्रांनी राजीनामा दिल्यानंतर राजेन्द्रप्रसाद अध्यक्ष झाले होते) ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सर्व सदस्यांना पत्र पाठविले होते. त्यात सुभाषचंद्रांनी ए.आय.सी.सी च्या ठरावाविरूध्द (नक्की कोणता ठराव हे अधिक वाचन करून लिहितो) ९ जुलैला "डे ऑफ प्रोटेस्ट" ठेवला होता त्यासंबंधी नक्की काय करावे यासंबंधी सदस्यांची मते मागविली होती.त्या पत्रात गांधीजी आणि नेहरू दोघेही परगावी असताना यासंबंधीचा निर्णय घ्यावा की नाही याविषयीची मते राजेन्द्रप्रसादांनी मागितली होती. त्याला उत्तर म्हणून १२ जुलैला पटेलांनी पाठविलेले पत्र आहे.या पत्रात पटेलांनी तर म्हटले आहे---" He has done worse than what our enemies could do." तर गांधीजींना असलेल्या विरोधासंबंधात मात्र त्यांची भाषा--हा मूर्खपणा आहे असे म्हटले आहे. आता यात डिग्री ऑफ इन्टेन्सिटी नक्की कोणत्या केसमध्ये अधिक आहे याचा निर्णय मी वाचकांवरच सोडतो. दुसरे म्हणजे या पत्रव्यवहाराचे वरवरचे वाचन करूनही समजते की सुभाषबाबूंच्या कृतीला हरेकृष्ण मेहताब, आचार्य कृपलानी आणि प्रफुलचंद्र घोष या कार्यकारिणी सदस्यांनीही विरोध केला होता.तेव्हा सुभाषचंद्रांविरूध्द गांधींनी झोंडशाही केली वगैरे आरोपात काही तथ्य नाही. आणि दुसरे म्हणजे जुलै १९३९ मध्ये सुभाषचंद्र काँग्रेसचेच सदस्य होते हे पण त्यावरून स्पष्ट होते. ही चर्चा अधिक रंगल्यास आणखी लिहेनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

चुकीचे संदर्भ

सर्वसाक्षी
Fri, 02/01/2013 - 23:52 नवीन
चर्चा होती नेताजींना अध्यक्षपदावरुन हटविण्याच्या पत्राची आणि आपण दाखला देत आहात तो नेताजी कॉग्रेसचे सदस्य अस्ल्याचा. मला वाटते अध्यक्ष आणि सदस्य यात फरक असतो. सात सदस्यांनी राजीनामे दिले, पण पट्टाभींचा पराभ हा माझा पराभव असे निवडणुकीत पराभूत झाल्यावर म्हणणारे गांधी नेताजींना अध्यक्षपदावर राहु देण्याच्या विरोधात होते. नेताजींची तडफ व काँग्रेसवरचा वाढता प्रभाव (जो निवडणुकीत सप्रमाण सिद्ध झाला) हे गांधींना सहन झाले नाही हेच खरे. 'आहे त्या मार्गाने काँग्रेस जात राहिल्यास स्वातंत्र्य मिळ्णे दुरापास्त आहे' हे नेताजींचे म्हणणे होते, जर अधिकाधीक सदस्यांना हे मत पटले तर आपला प्रभाव व सर्व सत्ता हातुन जाईल याची गांधीना धास्ती वाटली असावी. जर गांधींना नेताजींची मते पटत नव्हती तर गांधीनी नेताजींना निवडणुक लढविण्यासाठीच विरोध का केला नाही? कार्यकारीणीतर्फे त्यांनी नेताजींना निवडणुक लढवु न देणे व बिनविरोध अधय्क्ष निवडुन आणणे यास भाग का पाडले नाही? 'कोंग्रेस मध्ये माझा शब्द प्रमाण व सगळे लोक मी म्हणेन त्यालाच मते देतील' हा अवाजवी आत्मविश्वास त्यांचा उमेदवार चारी मुंड्या चीत झाल्यावर धुळीस मिळाला व त्यांनी कुठल्याही परिस्थितीत नेताजींना अध्यक्षपद सोडायला लावायचेच असा चंग बांधला व कार्यकारिणीसही आपल्या दबावाखाली आणले हे सत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

शंका

आजानुकर्ण
Sat, 02/02/2013 - 01:03 नवीन
चर्चा चालू द्या पण एक शंका आहे. नेताजींनी काँग्रेस सोडून फॉरवर्ड ब्लॉक हा वेगळा पक्ष सुरु केल्यावर पूर्वाश्रमीच्या कॉँग्रेसमधील किती कार्यकर्ते व कार्यकारिणी सदस्य त्यांच्यासोबत आले याबाबत काही कल्पना आहे काय. त्यावरुन नेताजींची धोरणे पटणारे किती काँग्रेसी होते याबाबत माहिती मिळू शकते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

ठिक आहे

क्लिंटन
Sat, 02/02/2013 - 07:50 नवीन
जर गांधींना नेताजींची मते पटत नव्हती तर गांधीनी नेताजींना निवडणुक लढविण्यासाठीच विरोध का केला नाही? कार्यकारीणीतर्फे त्यांनी नेताजींना निवडणुक लढवु न देणे व बिनविरोध अधय्क्ष निवडुन आणणे यास भाग का पाडले नाही? 'कोंग्रेस मध्ये माझा शब्द प्रमाण व सगळे लोक मी म्हणेन त्यालाच मते देतील' हा अवाजवी आत्मविश्वास त्यांचा उमेदवार चारी मुंड्या चीत झाल्यावर धुळीस मिळाला व त्यांनी कुठल्याही परिस्थितीत नेताजींना अध्यक्षपद सोडायला लावायचेच असा चंग बांधला व कार्यकारिणीसही आपल्या दबावाखाली आणले हे सत्य आहे.
याविषयी वरील चर्चेत वटवाघूळ्/सिंह्/हत्ती यांनी मांडलेल्या मतांशी मी सहमत आहे त्यामुळे परत वेगळे लिहित नाही. बाकी सुभाषचंद्र हे अत्यंत महान दर्जाचे देशभक्त होते तरीही एक व्यक्ती म्हणून मला (मी कोणीही नसलो तरी) सुभाषचंद्रांच्या जपानबरोबर जाऊन आझाद हिंद सेनेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवायच्या प्रयत्नांना पाठिंबा नाही (कारण त्यातून इंग्रज जाऊन अधिक खुनशी जपानी मानगुटीवर यायची शक्यता होती--निदान भारताच्या काही भागात तरी). तसेच सुभाषचंद्र फॅसिस्ट शक्तींची बाजू घेणे, दारूबंदीला विरोध करणे अशा प्रकारे जर काँग्रेसच्या मुख्य कार्यक्रमातील महत्वाच्या गोष्टींनाच हरताळ फासू बघत असतील तर गांधीजींनी स्वतःची जनमानसातील प्रतिमा पणाला लाऊन सुभाषचंद्रांना विरोध केला असेल तर त्यात मला तरी काही चुकीचे वाटत नाही.आणि दुसरे म्हणजे आजानुकर्ण यांनी विचारल्याप्रमाणे किती नेते काँग्रेस सोडून सुभाषचंद्रांबरोबर गेले?गांधीजींनी विरोध केल्यावरही कोणी त्या विरोधाला विरोध केला नसेल तर एकट्या गांधीजींनी झोंडशाही केली वगैरे या गोष्टींना अर्थ राहत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

पूर्णविराम

क्लिंटन
Sat, 02/02/2013 - 22:17 नवीन
गांधींनी झोंडशाही केली हे सत्य.
हा विषय विनाकारण ताणायचा नाही.तरीही उगीचच गांधीजींना 'टपल्या' मारायच्या प्रवृत्तीला शक्य होईल तितके प्रत्युत्तर द्यायला हवे या उद्देशाने जरा जुने पेपर आणि पुस्तके इंटरनेटवर वाचली. त्यातील सर्वात योग्य असे दोन संदर्भ मिळाले ते इथे देतोच.पण गांधीद्वेष्ट्यांच्या प्रचारामुळे माझेही मत बनले होते की गांधीजींनी सुभाषचंद्रांना राजीनामा द्यायला भाग पाडले.पण ते त्यांचे जपान्यांविषयीचे मत माहित असल्यामुळे असेल अशा प्रकारची स्वतःचीच समजूत काढून घेत होतो. पण ११ मे १९४० रोजीच्या इंडिअन एक्सप्रेसमध्ये सरचिटणीस आचार्य कृपलानींचा काँग्रेसमधील तत्कालीन परिस्थितीवर अहवाल दिला अशी बातमी आहे.तो अहवाल म्हणतो--- Even after the Tripuri session was over, says the Report, the trouble which began with the election of Mr. Subhas Bose as President continued. It centred round the resolution moved by Pandit Pant at Tripuri, the operative clause of which related to the formation of the Working Committee in accordance with Mahatma Gandhi's wishes. Various interpretations were given to by Mr. Bose and Mahatma Gandhi, the former taking it to be unconstitutional and a vote of 'no confidence' in him. Mr. Bose, continues the Report, proposed a composite Working Committee to which he would nominate seven members and the General Secretary and would allow Sardar Patel to nominate the remaining seven members. Mahatam Gandhi, on the other hand suggested a homogeneous Cabinet of the President's own choice to enable him to go forward with his programme if it received the AICC. Mahatma Gandhi declined to suggest the names to the Working Committee in terms of Pandit Pant's resolution holding that it would be an imposition on the President. Mr. Bose felt that the only course open to him was to reign and he tendered his resignation at the AICC meeting at Calcutta, which elected Dr. Rajendra Prasad as the President in his place. तसेच गांधीजींच्या शंकर घोष यांनी लिहिलेल्या चरित्रात म्हटले आहे: At Tripuri Govind Ballabh Pant moved a resolution expressing confidence in the old Working Committee, reiterating faith in Gandhi, who had led the Congress for the last twenty years, and calling upon Bose to 'nominate the Working Committee...in accordance with the wishes of Gandhiji'. This resolution was passed in the Subjects Committee by 218 to 133 votes and by an overwhemling majority by a show of hands in the open session....... To resolve the crisis over the formation of the Working Committee, on 17 April 1939 Nehru wrote to Gandhi that Bose should permit Gandhi to suggest the names of the members of the Working Committee and if Bose agreed to this and was allowed to fill two vacancies, which were likely to happen, then 'the responsbility rests with you and...you should accept Subhas as president. To try to push him out seems to me an exceedingly wrong step.' But Gandhi, who was not in Tripuri when the Pant resolution was passed wrote to Bose,'The more I read it (the resolution), the more I dislike it'.At the AICC at Calcutta on 29 April Gandhi told Bose,'You are free to choose your own Committee'. Knowing your own views and knowing how most of the members differ in the fundamentals, it seems to me,'said Gandhi,'that if I give you the names it would be an imposition on you.' While Bose wanted to form a coalition, Gandhi now insisted that Bose should form a homogeneous cabinet of his own, and so he refused to give any name for the Working Committee. आता यात गांधीजींनी सुभाषचंद्रांना राजीनामा द्यायला कसे भाग पाडले?मी पण अगदी शाळेत असल्यापासून 'पट्टाभी सितारामय्यांचा पराभव हा माझा पराभव' असे गांधीजींनी म्हणून सुभाषचंद्रांना राजीनामा द्यायला कसे भाग पाडले याच्या रसभरीत कहाण्या मी ऐकत आलो आहे. या निमित्ताने त्या प्रकरणाची सत्यासत्यता पडताळून बघायची संधी मिळाली. हे प्रकरणही गांधीजींच्या ५५ कोटी प्रकरणीच्या उपोषणासारखाच गांधीविरोधकांचा प्रपोगांडाचा भाग दिसतो आहे. आणि सुभाषचंद्र कसे मोठे होते हे सांगतानाच गांधीजींनी त्यांना राजीनामा द्यायला कसे भाग पाडले या कहाण्या त्याच वेळी सांगून गांधीजींना 'टपल्या' मारायचे कामही साधले गेले याचेही वाईट वाटते. असो. आता सुभाषचंद्रांना गांधीजींनी राजीनामा द्यायला भाग पाडले का याचा निर्णय वाचकांनीच घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

जय हिंद !

मालोजीराव
Tue, 02/05/2013 - 15:28 नवीन
आझाद हिंदचे निराळे चलन. वापरात आणण्यासारख्या गोष्टी करण्यासाठी खरंच हिम्मत लागते
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हे चित्र बघून

ऋषिकेश
Tue, 02/05/2013 - 15:35 नवीन
दोन शंका.. १. या चलनाचे नाव काय होते? या नोटेवर 'रुपया किंवा टका' यापैकी काही दिसलं नाही. २. 'बँक ऑफ एन्डिपेन्डन्स'चं पुढ काय झालं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

_/\_

मूकवाचक
Wed, 01/23/2013 - 15:35 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

अभिवादन

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 15:38 नवीन
विनम्र अभिवादन सुभाषबाबूंना. आणि धमुला धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुभाषबाबूंना अभिवादन...

मनराव
Wed, 01/23/2013 - 16:00 नवीन
सुभाषबाबूंना अभिवादन...
  • Log in or register to post comments

विनम्र अभिवादन

विसुनाना
Wed, 01/23/2013 - 16:27 नवीन
नेताजी सुभाषचंद्र बोस या महान नेत्याला विनम्र अभिवादन. आधुनिक शिवाजी.
  • Log in or register to post comments

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना

ऋषिकेश
Wed, 01/23/2013 - 16:30 नवीन
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सविनय आदरांजली
  • Log in or register to post comments

__/\__

स्पंदना
Wed, 01/23/2013 - 16:59 नवीन
अगर आजादी इनके तरीकेसे मिलती तो कुछ और ही रंग लाती!
  • Log in or register to post comments

आदरांजलि!

पैसा
Wed, 01/23/2013 - 17:38 नवीन
नेताजींना विनम्र आदरांजलि! आज दुसर्‍या एका लढाऊ नेत्याची, बाळासाहेब ठाकर्‍यांचीही जयंती आहे. त्यांनाही विनम्र अभिवादन.
  • Log in or register to post comments

महानायकाला विनम्र श्रद्धांजली

निनाद मुक्काम …
गुरुवार, 01/24/2013 - 00:58 नवीन
महानायकाला विनम्र श्रद्धांजली हि ४ भागाची डॉक्युमेंट्री जरूर पहावी.
  • Log in or register to post comments

लिन्क दिसत नाहिये...

अत्रन्गि पाउस
Tue, 02/05/2013 - 09:44 नवीन
ति लिन्क जर पुन्हा देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

j4hPHkeb-U">https://www

निनाद मुक्काम …
गुरुवार, 01/24/2013 - 01:04 नवीन
https://www.youtube.com/watch?v=bj4hPHkeb-U
  • Log in or register to post comments

नेताजींच्या 116 व्या

निनाद मुक्काम …
गुरुवार, 01/24/2013 - 21:31 नवीन
नेताजींच्या 116 व्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ह्या लेखाच्या खाली दिलेली क्लिप तमाम देश भक्तांनी जरूर पहावी. ह्यात सुभाष चंद्र बोसं ह्यांचे जर्मनी मधील वास्तव्य , आझाद हिंद सेनेची स्थापना व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नाझी राजवटी सोबत संबंध ह्यावर प्रकाश झोत टाकते. ह्यात त्यांची जर्मन नागरिकत्व असणारी कन्या अनिता बोसं व नेताजींच्या सोबत काम केलेल्या अनेक जर्मन नागरिकांच्या मुलाखती आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिटलर व एस एस चा प्रमुख हिमलर सोबत च्या मुलाखतीचे व पाणबुडीची ज्यातून नेताजींनी जर्मनी ते जपान असा प्रवास अशी अनेक दुर्मीळ दृश्ये ह्यात पाहायला मिळतात. अनेक जाणकारांची मते ह्या क्लिप मधून ऐकायला मिळतात. जर्मन लोकांची नेताजींच्या बद्दल , त्या काळी तेथील वास्तव्यात असलेल्या भारतीय सैनिकांच्या बद्दल असलेली मते ऐकायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनिता बोसं ह्यांची गांधीजी ह्यांच्या विषयी मते सुद्धा कळतात. जर्मन लोकांनी नेताजींच्या बद्दल जे मत व्यक्त केले तेच महानायक ह्या कादंबरीत मला वाचायला मिळाले होते. नेताजींचे भारत स्वतंत्र झाल्यावर एक स्वतंत्र भारत म्हणून अनेक योजना , त्यांनी आखल्या होत्या ,थोडक्यात भारताच्या विकासाची सुसूत्र ब्लू प्रिंट त्यांनी तयार केली होती. दुर्दैवाने देशाची कमान त्यांच्या हातात आली नाही ,
  • Log in or register to post comments

थोडा गोंधळ

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 01/25/2013 - 07:57 नवीन
नेताजींविषयी आदर आहेच.पण आमच्याच एका फेसबुक मित्राच्या फेसबुक भिंतीवर नेताजींनी जपानची मदत घेतली हे चुकीचे केले कारण तो लढा यशस्वी झाला असता तर जपान्यांनी चीनमध्ये केले तसे अत्याचार भारतात घडायची शक्यता होती आणि म्हणून मुद्दामून जपान्यांबरोबर जाणे हे चुकीचे होते म्हणून नेताजींची भक्ती म्हणजे "वरशिपिंग फॉल्स गॉड्स" असे वाचले.तो मुद्दाही मला चुकीचा वाटला नाही.तेव्हा याविषयी थोडा गोंधळ उडत आहे.
  • Log in or register to post comments

खुनशी जपानी भारताच्या

निनाद मुक्काम …
Sun, 02/03/2013 - 23:24 नवीन
खुनशी जपानी भारताच्या मानगुटीवर बसले असते हा सगळ्यात मोठा विनोद आहे. भारतावर अनेक परकीय आक्रमण झाली पण फक्त इंग्रज राज्यकर्ते झाले कारण त्यांनी राज्यकर्ते होण्याआधी व्यापारी बनून भारताच्या समाजव्यवस्थेचा अभ्यास केला , भारतातील जाती , धर्म व्यवस्था त्यांनी जाणल्या तेव्हा कुठे संस्थानिक व भारतातील इतर वर्गाला फोडा आणि राज्य करा ही नीती वापरून भारत आपल्या कब्जात आणला. जेथे फोडाफोडी जमली नाही तेथे म्हणजे अफगाण , नेपाळ भागात अधिकार न गाजवता संबंध ठेवले , जपानी नेतृत्वाला भारत किती मोठा आहे , व भारतीय लोकांची मानसिकता ह्याबाबत एवढी माहिती नव्हती. जर ते भारतात एक आक्रमक राज्यकर्ते म्हणून आले असते , तर सिकंदर , किंवा इतर परकीय आक्रमकांच्या सारखे परत केले असते , इंग्रजांना भारतातून घालवल्यानंतर भारतीय जनतेचा आत्मविश्वास वाढला असता. हिंदू व मुस्लिम राज्यकर्ते व संस्थानिक व जनता ह्यांना जपान विषयी ममत्व नव्हते. गोवा हि वसाहत भारतीय जनता व लष्करी बळावर भारताने सोडवली तेव्हा पोर्तुगीज भारताचे काहीही वाकडे करू शकले नाही , सुभाषचंद्र बोस ह्यांना परिस्थितीची कल्पना होती. हिंदू , मुस्लिम , शीख त्यांच्या आझाद हिंद सेनेत एकत्र आले होते , त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता सुद्धा एकत्र आली असती. जेथे औरंगजेब मराठा साम्राज्य लष्करी ताकदीवर संपवू शकला नाही , जेथे सध्या अमेरिका अफगाणिस्तान लष्करी बळावर जिंकू शकला नाही , तेथे भारत लष्करी बळावर दूरवरून येउन जिंकणे केवळ अशक्य आणि जपान ने अशी आगळीक केलीच असती तर नेताजींनी वेळप्रसंगी अमेरिकेची सुद्धा मदत घेतली असती. एक आंतरराष्ट्रीय राजकारण जाणणारा नेता म्हणून नेताजी ह्यांची त्यावेळी जगात ओळख होती. एक माणूस एकटा भारताच्या बाहेर जातो व इंग्रजी साम्राज्याला आव्हान देतो , जे टिळक व गांधी ह्यांच्या काळात घडले नाही ते तो घडवतो. म्हणजेच भारतीय लष्कर जे इंग्रजांशी १८५७ नंतर कायम एकनिष्ठ होते ते त्यांच्या विरोधात उभे ठाकले, हा करिश्मा नेताजींच्या होता , महिलांना ह्यां देशात सैन्यात वाव देणारे नेताजी ह्या देशात पंतप्रधान झाले असते तर ह्या देशात महिलांचे वेगळे चित्र दिसले असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या बांगलादेशात व पाकिस्तान हिंदू , शीख , सिंधी मारण्याच्या आधी जीना ह्यांच्या पक्षाने गाठ नेताजींची आहे. हे लक्षात घेऊन अशी कारवाई केली नसती. कारण ह्यांचे काय परिणाम होऊ शकतात ह्यांची त्यांना चांगलीच कल्पना आली असती. मुळात भारतीय लष्कर हे इंग्रज भारतातून गेल्यावर नेताजींची एकनिष्ठ राहिले असते. आणि भव्य दिव्य भारत उभा ठाकला असता. फाळणीची अजिबात शक्यता उरली नसती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

समजत नाही

क्लिंटन
Mon, 02/04/2013 - 10:00 नवीन
खुनशी जपानी भारताच्या मानगुटीवर बसले असते हा सगळ्यात मोठा विनोद आहे.
हो बरोबर आहे.जपानी केवळ फिलीपाईन्स, इंडोचायना, मलाया यांच्याच मानगुटीवर बसले.पण भारताला मात्र त्यांनी गपगुमान स्वातंत्र्य मिळवून दिले असते. ते कशाला भारताच्या मानगुटीवर बसायला जातील?
भारतावर अनेक परकीय आक्रमण झाली पण फक्त इंग्रज राज्यकर्ते झाले
बरोबर आहे. ग्रीक (मिनँडर उर्फ मिलिंद हा ग्रीक राजा होता. आणि बौध्द भिक्षू नागसेन याच्याबरोबर त्याच्या बौध्द धर्मावरील प्रश्नोत्तरांचा ग्रंथ आहे मिलिंदपन्ह), कुशाण (राजा कनिष्क), हूण, मोंगल (बाबर), फ्रेंच (पाँडेचेरी), पोर्तुगीज (गोवा) इत्यादी कोणीच भारताच्या कुठल्याच भागात कधीच राज्यकर्ते झाले नव्हते.परकीय आक्रमकांपैकी पहिल्यांदा राज्यकर्ते झाले ते इंग्रजच.
जेथे सध्या अमेरिका अफगाणिस्तान लष्करी बळावर जिंकू शकला नाही , तेथे भारत लष्करी बळावर दूरवरून येउन जिंकणे केवळ अशक्य
या आणि इतर अनेक मुद्द्यांवर मी २ वर्षांपूर्वी नितिन थत्ते यांच्या थिअरी या धाग्यावर लिहिले आहे.तेव्हा त्याची पुनरावृत्ती टाळतो.
जपान ने अशी आगळीक केलीच असती तर नेताजींनी वेळप्रसंगी अमेरिकेची सुद्धा मदत घेतली असती.
हो बरोबर आहे.भारताला कोण मदत करतो यासाठी इतर सगळ्या देशांचे नेते रांगा लावूनच उभे होते. भारतीय शांतीसेना श्रीलंकेत होती.त्या देशातल्या अनेकांना शांतीसेना म्हणजे परकीय सेनाच आपल्या देशात आली आहे असे वाटत होते.समजा शांतीसेनेला घालवायला श्रीलंकेने पाकिस्तानची मदत घेतली असती आणि शांतीसेनेला घालविल्यावर पाकिस्ताननेच तिथे तळ ठोकला असता.अशा परिस्थितीत जर श्रीलंकेने पाकिस्तानला तिथून घालवायला परत भारताची मदत मागितली असती तर कोणाही रिअल पोलिटिशअन ने दोन पैकी एक गोष्ट केली असती-- एक तर श्रीलंकेला आपल्या कर्माची फळे भोगू दे म्हणून वार्‍यावर सोडले किंवा मदत केली असती तरी पूर्वीपेक्षा अधिक जोमाने आपले पाय श्रीलंकेत घट्ट रोवले असते. आता या उदाहरणात भारतीय शांतीसेनेऐवजी जपान,श्रीलंकेऐवजी भारत आणि भारताऐवजी अमेरिका/इंग्लंड असे रिप्लेस केले तरी हा माझा मुद्दा अजिबात बदलत नाही. अहो प्रत्येक देशाला आपला स्वार्थ साधायचा होता. इंग्लंडचा स्वार्थ भारतात स्वतःचे वर्चस्व असावे यात होताच तसा जपानचाही स्वार्थ इंग्रजांना आपल्या वर्चस्वाच्या क्षेत्रापासून (पॅसिफिक आणि दक्षिण-पूर्व एशिया) जास्तीतजास्त दूर ठेवण्यात होताच.तसेच जपानने फिलीपाईन्स वगैरे देशांना स्वातंत्र्य दिले नव्हते, अगदी अंदमानातही कत्तली केल्या होत्या.तेव्हा जपान्यांनी भारताच्या मुख्य लँडमध्ये वेगळे काही केले असते हे म्हणायला तुम्हाला वाटतो तितका आधार आहे असे वाटत नाही. असो.हा मुद्दा मी अगदी शंभर वेळा मांडला आहे.तेव्हा अधिक काही लिहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा