✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?

ग
ग्रेटथिन्कर यांनी
गुरुवार, 02/07/2013 - 21:31  ·  लेख
लेख
आयुर्वेद हि भारतीयांनी जगाला दिलेली देणगी आहे असे म्हणतात. आयुर्वेदात अनेक औषधी काढे ,आसवं यांचा वापर केला जातो. आयुर्वेदात वात, कफ, पित्त अश्या तीन प्रकृत्ती मानल्या गेल्या आहेत, त्याद्वारे निदान करण्याची पद्धत आहे. प्रश्न असा आहे कि वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का? double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय? असल्यास त्याची माहिती कुठे मिळेल. एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
76094 वाचन

💬 प्रतिसाद (196)

प्रतिक्रिया

चुकीचे झाड

आजानुकर्ण
Fri, 02/08/2013 - 19:07 नवीन
आयुर्वेदाला कोणी सर्टिफिकेट दिले आहे याबाबतचा मूळ प्रतिसाद वाचा. त्याचा प्रतिवाद म्हणून अमेरिकेत याबाबतही आणखी संशोधन झाले आहे काय एवढेच मी विचारले. कदाचित अमेरिकेतील संशोधनावर मूळ प्रतिसाददात्याचा विश्वास असावा किंवा अमेरिकेव्यतिरिक्त असे संशोधन कुठे झाले नसावे. तुम्ही चुकीचे दार ठोठावले आहे. प्लीज कॅरी ऑन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

मुळात एक लक्षात घेण्याजोगी

निम
Fri, 02/08/2013 - 09:32 नवीन
मुळात एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे "जुनी शास्त्रे" जसे आयुर्वेद ( वास्तुशास्त्र किवा अगदी चीनी फेंगशुई) , हि तेथील भौगोलिक परिस्थितींनुसार उदयास आलेली आहेत. त्यामुळेच आयुर्वेदातील औषधे/रसायने (ज्यांची आजीबाईचा बटवा म्हणून हेटाळणी चालू आहे) भौगोलिक परिस्थितीत मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहेत .आणि म्हणूनच ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचेही ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

व्याख्या

विकास
Fri, 02/08/2013 - 11:45 नवीन
तुम्ही विज्ञान नक्की कशाला म्हणाता? त्याची व्याख्या समजल्यास पुढे लिहीणे सोपे जाईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

प्रतिसाद

आजानुकर्ण
Fri, 02/08/2013 - 18:57 नवीन
दादा कोंडके यांनी जे मत दिले आहे अगदी तेच मत माझे आहे. येथे पाहा. http://www.misalpav.com/comment/458659#comment-458659
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

माझ्या मते आयुर्वेद हे रोग,

निम
Fri, 02/08/2013 - 09:03 नवीन
माझ्या मते आयुर्वेद हे रोग, आजार मुळापासून बरे करण्यास मदत करते आणि ऍलोपथिच्या औषधांनी रोग फक्त दाबले जातात,म्हणजेच ते पुन्हा उचल खाऊ शकतात . संदर्भासहित स्पष्टीकरण हवे असल्यास माझ्या आई चेच उदाहरण घ्या.दम्याच्या विकाराने ती महिन्यातील १०-१५ दिवस अंथरुणास खिळून असायची , ऍलोपथिच्या औषधांनी थोडे दिवस बरे वाटायचे पण पुन्हा तेच.नंतर तिने आयुर्वेदाची मदत घेतली ज्यात औषधांसोबातच योगासनांचा सुद्धा समावेश होता आणि नंतर पुन्हा कधी दम्याने उचल खाल्ल्याचे बघितले नाही. बाकी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मानसोपचार, इंद्रियांचे पुनर्रोपण इत्यादी गोष्टींवर आनंदिता ने प्रकाश टाकलेला आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

साठीतले एक परिचित आहेत

पक्या
Fri, 02/08/2013 - 02:19 नवीन
साठीतले एक परिचित आहेत त्यांना कॅन्सर चे निदान झालेले आहे. पण त्यांची सर्जरी आणि किमो, रेडिओ थेरपीसारखे महागडे आणि भयंकर साईड इफेक्ट असलेले उपचार करून घेण्याची अजिबात ईच्च्छा नाही. सध्या ते एका निष्णात वैद्याचे उपचार घेत आहेत आणि सध्यातरी वैद्यांच्या औषधामुळे कॅन्सर नियंत्रणात आहे..म्हणजे आहे तसाच आहे अजून इतरत्र पसरलेला नाही किंवा वाढलेला नाही.आणि हे गेली २ वर्षे आम्ही पहात आहोत. पथ्य अगदी कडक आहे. आणि तेवढे ते नक्किच पाळतात. शिवाय वरचेवर प्रवास ही करतात. नैराश्येने ग्रासलेले, सतत झोपून असे ते गृहस्थ अजिबात नाहीयेत. खूप अ‍ॅक्टीव्ह आहेत. मला वाटते रोगाच्या सुरवातीच्या काळात आयुर्वेदिय उपचार सुरू केल्यास फायदा नक्कीच होत असवा ..शेवटच्या स्टेज ला पोहोचलेला रोग असेल तर आयुर्वेदिय उपचारांना मर्यादा असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

http://www.thehindu.com

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 02/07/2013 - 23:54 नवीन
Image removed. http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-andhrapradesh/engineerturnedyogi-performs-rare-feat/article4381131.ece याला कुठला वैद्यान्यानिक आधार शोधणार
  • Log in or register to post comments

हे आयुर्वेदिक आहे काय?

आजानुकर्ण
गुरुवार, 02/07/2013 - 23:55 नवीन
हे आयुर्वेदिक आहे काय? नसल्यास चर्चेशी संबंध कळला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

.

विकास
Fri, 02/08/2013 - 00:25 नवीन
फोटोशॉप?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

नाही

अभ्या..
Fri, 02/08/2013 - 01:44 नवीन
नाही. हे फोटोशॉप एडीटींग नाही पण फोटो काढतानाच दुसरी काही ट्रीक केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

प्रतिसाद....

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/08/2013 - 17:34 नवीन
गॅस ट्रबल असावा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

हा हा हा

प्रसाद गोडबोले
Sat, 02/09/2013 - 02:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

थोडाफार याच संदर्भात

विकास
Fri, 02/08/2013 - 02:13 नवीन
थोडाफार याच संदर्भात माहितीकरता: पारंपारीक ज्ञानाचे जालीय ग्रंथालय हा लेख वाचू शकता.
  • Log in or register to post comments

माझे मत

पिवळा डांबिस
Fri, 02/08/2013 - 03:37 नवीन
वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का?
पाश्चात्य कसोट्यांवर ते सत्य ठरत नाहीत. पण या विचारांना पाश्चात्य कसोट्या लावणं हेदेखील चुकीचं आहे. भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्रात (आयुर्वेद, योग वगैरे) हे विचार सत्य समजले गेलेले आहेत.
double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय?
नसावा. पण अजूनही कोणाला जर तशा ट्रायल्स करायच्या असतील तर ते अशक्य नाही. इथे एक महत्वाची गोष्ट दुर्लक्षिली गेलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही म्हणत असलेल्या चाचण्या ह्या नव्या रेणूंसाठी आवश्यक आहेत. असे रेणू जे कृत्रिम रासायनिक/ जैविक रीतीने बनवले गेलेले आहेत आणि मानवावर अजून वापरले गेलेले नाहीत. आयुर्वेदिक औषधे ही शतकानुशतकं वापरली गेलेली आहेत. त्यातली जी उपयुक्त होती ती टिकली आणि अनुपयुक्त/धोकादायक होती ती विस्मरणात गेली. तेंव्हा आयुर्वेदिक (किंवा युनानी) औषधांना वरील चाचण्या आवश्यक आहेत असं म्हणणं हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे.
एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?
होय!!!
  • Log in or register to post comments

मला वाटतं, वरील प्रतिसाद

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/08/2013 - 08:55 नवीन
मला वाटतं, वरील प्रतिसाद कोणाकडून आला आहे हे बघता... चर्चा संपली तरी चालावी (म्हणजे या धाग्यावर), नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पिडांकाकांना तद्दन अज्ञानमूलक

बॅटमॅन
Fri, 02/08/2013 - 11:05 नवीन
पिडांकाकांना तद्दन अज्ञानमूलक असा एक प्रश्न विचारतो. प्लीज़ बेअर विथ मी.
तेंव्हा आयुर्वेदिक (किंवा युनानी) औषधांना वरील चाचण्या आवश्यक आहेत असं म्हणणं हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे.
समजा आयुर्वेदिक औषधांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल्स घ्यायच्या आहेत. मग वडाची साल पिंपळाला लावणे का बरे ठरते हे? आयुर्वेदिक औषधे अनुभवसिद्ध आहेत म्हणून ट्रायल्स करू नयेत असे तर म्हणावयाचे नाही ना? सध्याची डॉमिनंट "पॅथी" म्हंजे अ‍ॅलोपॅथी, तिच्या चष्म्यातून आयुर्वेदाचा निर्णय करणे हे सर्वथैव बरोबर नसले तरी काही निकष चूक म्हणता येणार नाहीत असे वाटते. आपले काय मत याबद्दल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

नो क्वेश्चन इज डंब!

पिवळा डांबिस
Sat, 02/09/2013 - 02:24 नवीन
समजा आयुर्वेदिक औषधांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल्स घ्यायच्या आहेत. मग वडाची साल पिंपळाला लावणे का बरे ठरते हे?
क्लिनिकल ट्रायल्स या अनेक हेतूंनी केल्या जातात. एफिकसी (परिणामकारकता), डोस सिलेक्शन, सेफ्टी (सुरक्षितता), हेड-टू-हेड, ऑब्झर्व्हेशनल, पीआरओ वगैरे वगैरे.... तुम्हाला इथे परिणामकारकता (एफिकसी) संबंधी ट्रायल घ्यायची आहे. कोणताही रेणू हा अतिसूक्ष्म प्रमाणात (प्रत्येक रेणूसाठी हे प्रमाण वेगवेगळं असतं)दिला तर तो परिणामकारक ठरत नाही (नो इफेक्ट डोस)आणि अतिशय कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणात दिला तर तो घातक असू शकतो. म्हणूनच मी वर म्हटल्याप्रमाणे जर नवा रेणू टेस्ट करायचा असेल (मग पॅथी कुठलीहि असू द्या!)तर तो क्लिनिकली टेस्ट करणं योग्य ठरेल. पण जी आयुर्वेदिक औषधं गेली अनेक शतकं वापरात आहेत, ज्यांचे गुणधर्म आणि मात्रा (डोस) ज्ञात आहेत त्यांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल घेण्यामागचा हेतू कोणता?
आयुर्वेदिक औषधे अनुभवसिद्ध आहेत म्हणून ट्रायल्स करू नयेत असे तर म्हणावयाचे नाही ना?
मी कोणालाच कसल्या ट्रायल करू नका असं म्हणत नाहीये. ज्यांच्याकडे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ भरपूर असेल त्यांनी खुशाल हव्या त्या ट्रायल करत बसावं. त्यातून निष्पन्न काय होणार हा प्रश्न आहे. एखाद्या अगोदरच सार्वत्रिक वापरात असलेलं औषधाच्या (उदा. सुंठ, अडुळसा, ज्येष्ठमध इत्यादि)एफिकसी ट्रायल्स करून त्यातून काय शोधून काढणार? प्रत्येक ट्रायल हा एक प्रयोग असतो आणि प्रत्येक प्रयोगाला काहीतरी प्रयोजन असावं लागतं. नाहीतर तो केवळ रिसोर्सेसचा अपव्यय ठरतो... माझा कुणीही कोणत्याही औषधाच्या कसल्याही ट्रायल करत बसायला मुळीच विरोध नाहिये. पण अलिकडे आयुर्वेदिक औषधांच्या ट्रायल्स झालेल्या नसल्याने ती औषधे विकण्याची बंदी करण्यात यावी अशी जी ओरड (व्हेस्टेड इंटरेस्ट्सकडून) होतेय त्याला आहे. ज्यांना आयुर्वेदिक औषधे वापरायची नसतील त्यांनी ती वापरू नयेत. पण पारंपारिक औषधांची उपयुक्तता त्यांच्या शतकानुशतकांच्या वापरातून सिद्ध झालेली आहे.
सध्याची डॉमिनंट "पॅथी" म्हंजे अ‍ॅलोपॅथी, तिच्या चष्म्यातून आयुर्वेदाचा निर्णय करणे हे सर्वथैव बरोबर नसले तरी काही निकष चूक म्हणता येणार नाहीत असे वाटते. आपले काय मत याबद्दल?
कोणते निकष ते सांगा, म्हणजे मग माझं त्या त्या निकषांबद्दलचं मत देईन... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओक्के.

बॅटमॅन
Sat, 02/09/2013 - 02:32 नवीन
ओक्के.
मी कोणालाच कसल्या ट्रायल करू नका असं म्हणत नाहीये. ज्यांच्याकडे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ भरपूर असेल त्यांनी खुशाल हव्या त्या ट्रायल करत बसावं. त्यातून निष्पन्न काय होणार हा प्रश्न आहे. एखाद्या अगोदरच सार्वत्रिक वापरात असलेलं औषधाच्या (उदा. सुंठ, अडुळसा, ज्येष्ठमध इत्यादि)एफिकसी ट्रायल्स करून त्यातून काय शोधून काढणार? प्रत्येक ट्रायल हा एक प्रयोग असतो आणि प्रत्येक प्रयोगाला काहीतरी प्रयोजन असावं लागतं. नाहीतर तो केवळ रिसोर्सेसचा अपव्यय ठरतो...
हे वाचून बाकी समाधान झालं. धन्यवाद पीतचेष्टालुभवान :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

उत्तम माहितीपूर्ण प्रतिसाद.

बॅटमॅन
Sat, 02/09/2013 - 02:43 नवीन
उत्तम माहितीपूर्ण प्रतिसाद. उत्तर मिळाले, फक्त एकच लाष्ट मुद्दा. निकष म्हंजे जे क्लेम्स आहेत ते घासूनपुसून लख्ख करणे, त्यांचा कीस पाडणे. तुम्ही म्हणता तशी चिकार औषधे आल्रेडी टेस्टेड आहेतच. पण जिथे अ‍ॅलोपॅथीला अजून काही गोष्टी जमत नाहीत किंवा नीट जमत नाहीत अशा ठिकाणी जर आयुर्वेदाचे काही क्लेम्स असतील तर ट्रायल्स केले तर फायदाच आहे असे मला वाटते. बाकी अपव्यय वगैरे सहमत आहे-थोडासा अनईझी यासाठी आहे की मी सैद्धांतिकपणे बोलतोय तर तुम्ही प्रॅक्टिकली बोलताय. साहजिकच आहे ते बाकी :) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पण जिथे अ‍ॅलोपॅथीला अजून काही

पिवळा डांबिस
Sat, 02/09/2013 - 02:59 नवीन
पण जिथे अ‍ॅलोपॅथीला अजून काही गोष्टी जमत नाहीत किंवा नीट जमत नाहीत अशा ठिकाणी जर आयुर्वेदाचे काही क्लेम्स असतील तर ट्रायल्स केले तर फायदाच आहे असे मला वाटते.
जरूर, पण अशा ट्रायल्स कोण करणार हा प्रश्न आहे. आयुर्वेदिक औषधविक्रेत्यांना याची काही गरज पडलेली नाही कारण ते सध्याही ते औषध विकताहेतच. भारतीय युनिव्हर्सिटीजकडे अशा ट्रायल्स करण्याइतका पैसा आहे असं मला वाटत नाही. सरकारी संस्था करू शकतात पण सरकारी कारभार बघता त्यांच्या निष्कर्षांना फारशी विश्वसनीयता नाही. हां, काही अ‍ॅलोपाथी औषध बनवणार्‍या कंपन्या करू शकतात पण त्यातून त्यांना लाभ काही नाही. लक्षात असू दे की एखादं औषध धोकादायक ठरलं म्हणून बाजारातून बॅन करता येतं पण ते पुरेसं इफेक्टिव्ह नाही म्हणून त्याचा वापर थांबवता येणं हे जवळजवळ अशक्य असतं...
मी सैद्धांतिकपणे बोलतोय तर तुम्ही प्रॅक्टिकली बोलताय.
कारण माझा तो पेशा आहे. एका फेज ३ क्लिनिकल ट्रायलला (रोगानुसार) जवळजवळ २० ते १५० लाख डॉलर्स खर्च येऊ शकतो. इतके हाय स्टेक्स असतांना प्रॅक्टिकल न राहून मी सांगतोय कुणाला? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

असहमत.

आनंदी गोपाळ
Sat, 02/09/2013 - 14:00 नवीन
पाश्चात्य कसोट्यांवर ते सत्य ठरत नाहीत. पण या विचारांना पाश्चात्य कसोट्या लावणं हेदेखील चुकीचं आहे. भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्रात (आयुर्वेद, योग वगैरे) हे विचार सत्य समजले गेलेले आहेत.
मा. पिवळा डँबीस, माफ करा, मधे बोलतो आहे. पण रहावत नाही. आपण आधुनिक वैद्यकाचे शिक्षण घेतले आहेत असे गृहित धरून पुढे बोलतो. १. आपण जे बोलत आहात त्याला आपल्या डॉक्टर असण्याचे ब्याकग्राऊंड आहे, हे लक्षात घेता, वरील वाक्य भोंगळपणाचे व चुकीचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. व या मतापाठी माझ्या आधुनिक वैद्यकातील २०+ वर्षांच्या यशस्वी प्र्याक्टिसचा आधारही आहे. कसोट्या पाश्चात्य पौर्वात्य नसतात. त्या "शास्त्रीय" असतात हे आपण विसरता आहात काय? (प्राचीनतेचाच हवाला द्यायचा तर उदा. भूतबाधा झाल्याने अमुक आजार होतो अशा प्रकारचे विचार पाश्चात्य देशांतही कोणे एके काळी 'सत्य समजले गेले' होते? त्यासाठी अनुभवसिद्ध उपचारपद्धतीही आहेत. सबसे तेज च्यानेलांवर त्याचे मार्केटिंगही असते. याला आपण वैज्ञानिक जाहीर करावे काय?) २. हाय स्टेक्स आहेत म्हणून आयुर्वेदिक औषधाची क्लिनिकल ट्रायल घ्यायची गरज नाही, वा तसे करणे शक्य नाही, हे लॉजिक वापरताना तुम्ही तुमच्या वैद्यकीय ज्ञानाशी एकनिष्ठ आहात काय? याच लॉजिकने मॉडर्न मेडिसिनमधील औषधे वापरात आणावीत काय? ३. "आयुर्वेदिक" औषधे जेव्हा कधी काम करतात, तेव्हा ती नक्की कशी व का करतात? पेशंटच्या शरीरात गेलेल्या लक्षावधी प्लांट अल्कलॉईड्स व इतर 'नैसर्गिक' केमिकल्स पैकी नक्की काय काम करते, इ बाबींचे स्टँडर्डायझेशन व्हायला हवे असे आपण म्हणाल काय? या 'आयुर्वेदिक' औषधांना कोणतेही 'अन्टोवर्ड इफेक्ट्स' नसतात असे आपले मत आहे काय? (अनुभवसिद्ध औषधांत उदा. विलो बार्क पासून अ‍ॅस्पिरिन हे बाळबोध असल्याने आपणास परिचित आहेच. अधिक विवेचन इथे करायलाच हवे काय?) ४. औषधांचे 'डोस' ठरविण्याच्या पद्धतीबद्दल आपले मत ऐकायला आवडेल. थेरप्युटिक डोस, टॉक्सिक डोस, लिथल डोस इ. कसे ठरवितात? या व असल्या अभ्यासासाठी 'व्हेस्टेड इंटरेस्ट' म्हणून फार्मॅकॉलॉनी नामक ज्ञानशाखा विकसित झाली आहे असे आपले म्हणणे आहे काय?
पण जी आयुर्वेदिक औषधं गेली अनेक शतकं वापरात आहेत, ज्यांचे गुणधर्म आणि मात्रा (डोस) ज्ञात आहेत त्यांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल घेण्यामागचा हेतू कोणता?
म्हणजे नक्की काय? अमुक 'शीत' असते तमुक कफनाशक असते, हे 'गुणधर्म' आहेत, असे म्हणत आहात का आपण?? डोस म्हणजे नक्की कसा ठरतो? 'पाव चमचा सीतोपलादी चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्या,' ह्याला डोस म्हणावे काय? उत्तरे मिळण्याच्या अपेक्षेत, आनंदी गोपाळ. (टीप: आपण आधुनिक वैद्यकशास्त्राचे पदविधर नसलात तर वरील प्रतिसाद म्हणजे हवेत बोलणे आहे, असे समजून सोडून द्यावा, अन्यथा पुढे चर्चा करायला आवडेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अग्गो बाई!!!

पिवळा डांबिस
Sun, 02/10/2013 - 08:52 नवीन
वरील प्रतिसाद म्हणजे हवेत बोलणे आहे, असे समजून सोडून द्यावा,
हे वाचून सोडून द्यायचा अनावर मोह होत आहे! पण मग लगेच उद्या बिका म्हणणार की, "एक डांबिस असतो, म्हणूनच तो आनंदी असतो!!!" :) अहो, मी इतर मिपाकरांप्रमाणेच माझं एक मत मांडलं हो! एक मिपाकर म्हणून मला तितकी तरी मुभा द्याल की नाही तुम्ही? त्यावर त्या ब्याटम्यानाने दोन फॉलो अप प्रश्न विचारले त्यांना माझ्या अल्पमतीप्राणे उत्तरं दिली मी! (ब्याटम्याना, हानू का आता येक! तुज्यामुळं आता डागतरसायबांना तरास व्हायाला लागलाय!!!) डॉक्टरसाहेब, आम्ही भोंगळ आहोत हे पूर्णपणे मान्य! नायतर पिवळा डांबिसच्या ऐवजी काहीतरी 'धन्वंतरी' वगैरे नांव नसतं काय आमचं? ते सोडा, पण आम्ही चुकीचे कसे काय ते समजावून सांगाल काय? कसोट्या शास्त्रीय असतात हे आम्हालाही कळतं, पण आज भारतीय अ‍ॅलोपाथी मेडिकल्/फार्मा जगत पाश्चात्य जगाने डेव्हलप केलेल्या कसोट्याच वापरत नाहीये काय? भारतीय अ‍ॅलोपाथी वैद्यकशास्त्राने आजवर जगन्मान्य अशा क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करण्याविषयीच्या वैद्यानिक कसोट्या शोधून काढल्या असतील तर त्याबद्दल माहिती द्या, वाचायला आवडेल... दुसरं एक, मी कधीही आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स घेऊ नका असं म्हंटलेलं नाही, माझे रिप्लाय काळजीपूर्वक वाचा. उलट मी कुणालाही कुठल्याही आयुर्वेदिक औषधाच्या कसल्याही क्लिनिकल ट्रायल्स करायच्या असतील तर माझी काहीही हरकत नाही असंच म्हंटलेलं आहे. उगाच माझ्या तोंडी नसलेले शब्द गुंफायचा तुम्ही प्रयत्न करू नका! मी तसं म्हंटलेलं नाही त्यामुळे माझ्या ज्ञानाशी मी एकनिष्ठ असण्याचा/प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. तसंच मी कुठेही आयुर्वेदिक औषधांना अनटोवर्डस इफेक्ट नसतात असं म्हंटलेलं नाहीये. उलट मी असंच म्हंटलेलं आहे की कुठल्याही रेणूला अति अल्प प्रमाणात दिला गेलेला नो-इफेक्ट डोस असतो आणि अति कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणातला घातक डोस असतो. वाचा, वाचा हो!!!
डोस म्हणजे नक्की कसा ठरतो? 'पाव चमचा सीतोपलादी चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्या,' ह्याला डोस म्हणावे काय?
दोन चमचे त्रिफळ्याचं चूर्ण गरम पाण्यातून घेतलं की बद्धकोष्ठ नाहीसं होऊन दुसर्‍या दिवशी साफ परसाकडे होते. चार चमचे घेतलं तर जास्त वेळं संडासात मुक्काम ठोकावा लागतो. याला डोस-विचार नाही म्हणायचं?
आपण आधुनिक वैद्यकशास्त्राचे पदविधर नसलात...
नाही, आम्ही आधुनिक वैद्यकशात्राचे पदवीधर (वी दीर्घ आहे पदवीधर या शब्दात!!) नाही. त्यामुळे हमारा सिर आपकी चप्पलके ऊपर!!!! पण गेली १५ वर्षे ड्रग डॅव्हलपमेंटमध्ये वाया घालवली आहेत. अगदी फार्माकॉलॉजी/ टॉक्सिकॉलॉजी अ‍ॅनिमल ट्रायल्सपासून ते फेज ३ क्लिनिकल ट्रायल्स करायचा अनुभव पाठीशी आहे. आजच्या घडीला दोन फेज ३ आणि १ फेज २ ट्रायल्स सुरू आहेत आमच्या निर्देशनाखाली जगातील २७ (अक्षरी सत्तावीस) देशांमध्ये! तेंव्हा क्लिनिकल ट्रायल्सची चर्चा चालू असतांना त्यात आपलं मत नोंदवावं असं उगीचच आम्हाला वाटलं. त्याबद्दल सॉरी!! त्याचं काय आहे की इंडियन एफडीए आमचा सल्ला विचारतं आणि दिलेला सल्ला मानतंही. पण ते वेडे असावेत. बाय द वे, तुम्ही किती ग्लोबल क्लिनिकल ट्रायल्स केल्यात तुमच्या अधिपत्याखाली डॉक्टर? कळून घ्यायला आवडेल.... डॉक्टर, मला तुमच्याविषयी राग नाही. तुम्ही एक अ‍ॅलोपाथी प्रॅक्टिस करणारे फिजिशियन आहांत हे लक्षात घेता तुमचं मत तुम्ही व्यक्त केल्याप्रमाणेच असणार ह्याची मला जाणीव आहे. मी माझं ओरिजिनल मत हे तुमच्यासारख्या लोकांसाठी व्यक्त केलेलं नाहीच आहे. तुम्हाला कुठल्याही क्लिनिकल ट्रायल्स करायला मी कोण विरोध करणारा? उलट मी तर असंच म्हणेन की तुम्हीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही गेली वीस वर्षे यशस्वी अ‍ॅलोपाथी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहांत तर पुट युवर हार्ड अर्न्ड मनी व्हेअर युवर माऊथ इज आणि करा की आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स! एकदा एफडीए कडे ट्रायल रजिस्टर केलीत की इथे लिंक द्या, आम्हीही फॉलो अप करू तिची प्रोग्रेस आणि तिचे रिझल्टस!!! त्यात काय!!! आम्ही आमचं मत अशा लोकांसाठी दिलं की ज्यांना सायन्सचं आणि आरोग्यविषयक ज्ञान नाही, त्यांचं ते दुर्दैवाने ते शिक्षण झालेलंच नाही. त्यांचा एकीकडे पारंपारिक आयुर्वेदिक औषधांवर विश्वास तर आहे पण ते वर्तमानपत्रातून वाचतात की आयुर्वेदिक औषधं अनुपयुक्त/ डेंजरस आहेत म्हणून! हा प्रचार कुठल्या हितसंबंधियांकडून चालतो हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, पण त्यामुळे ती लोकं कन्फ्यूज होतात. फक्त त्यांच्यासाठीच होता माझा प्रतिसाद. मी तुमच्यासारखा मेडिकल प्रॅक्टिस करणारा फिजिशियन नाही पण माझं सगळं आयुष्य मी घातक रोगांपासून मानवजातीची माझ्या अल्प शक्तीनुसार सुटका करण्यासाठी घालवलेलं आहे. आजही कॅन्सर, लूपस आणि स्किझोफ्रेनियासारख्या असाध्य रोगांवरच्या ट्रायल्स यशस्वी करण्यासाठी झगडतोय मी! डॉक्टर, आय हॅव, ऑनेस्ट टू गॉड, रियल लाईफ बॅटल्स अहेड ऑफ मी अ‍ॅन्ड द टाईम इज रनिंग आऊट! आय हॅव नायदर द टाईम नॉर द इन्क्लिनेशन फॉर कॉस्मॅटिक वन्स!!!! आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

चालू द्या!

आनंदी गोपाळ
Sun, 02/10/2013 - 09:33 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

थॅन्क्स, बट नो थॅन्क्स!!

पिवळा डांबिस
Sun, 02/10/2013 - 09:51 नवीन
आम्ही आमचं काम चालूच ठेवतो आहोत, त्याला तुमच्या परवानगीची गरज कधीही नव्हती आणि नाही.... इन द मीनटाईम, तुम्ही केंव्हा आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स कधी सुरू करता ते सांगा.... अ‍ॅज आय सेड, पुट युवर मनी व्हेअर युवर माऊथ इज!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

मी विचारलेल्या एका तरी प्रश्नाचे उत्तर

आनंदी गोपाळ
Sun, 02/10/2013 - 10:12 नवीन
शास्त्रीय ज्ञानावर आधारीत देता आले तर बरे होईल दुसरे, मी मॉडर्न मेडिसिनवाला आहे. मला तुमचा आयुर्वेद सिद्ध करण्याशी घेणे देणे नाही. हौस असेल तर तुम्हीच प्रमाणित करा, मग आयुर्वेद शास्त्र आहे हे सांगा. कोणताही शास्त्रीय बेस नसताना केवळ तुम्ही म्हटलात 'आहे' म्हणून आयुर्वेद शास्त्र आहे, अशा बाबा वाक्यं आधारित पद्धतीचेच मला हसू येते. तेव्हा, माय मनी इज ऑलवेज ऑन मॉडर्न मेडिसिन. आय होप युर 'फिलॉसॉफी' डझन्ट इन्फ्लुअन्स द क्लिनिकल ट्रायल्स कण्डक्टेड बाय युर कंपनी, (१२७ देशांत नं?) अ‍ॅण्ड ओन्ली सायन्स प्रिव्हेल्स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आ.गो,कशाला डांबिसच्या नादाला

Er.rohit
Mon, 02/11/2013 - 08:35 नवीन
आ.गो,कशाला डांबिसच्या नादाला लागताय, ते पोथीनिष्ठ आहेत. आमच्या पुर्वजांनी लिहले आहे ना मग त्येच योग्य आहे ,असा सूर आहे त्यांचा. हे फेज३ ट्रायल घेतात हा अतिशयोक्ती अलंकार असावा काय हो? नाय म्हण्टलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

डाक्टरांचे भांडन मस्तच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/10/2013 - 09:40 नवीन
चर्चा वाचून मी आनंदी गोपाळ यांच्या बाजूने आहे, इतकेच सांगतो. प्लीज भांडन चालू द्या. :) डॉ.सातीला बोलवा हो चर्चेत. -दिलीप बिरुटे (आयुर्वेदिक की अ‍ॅलोपॅथी,कन्फ्युज)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पुरवणी प्रतिसाद.

आनंदी गोपाळ
Sun, 02/10/2013 - 09:47 नवीन
आजच्या घडीला दोन फेज ३ आणि १ फेज २ ट्रायल्स सुरू आहेत आमच्या निर्देशनाखाली जगातील २७ (अक्षरी सत्तावीस) देशांमध्ये!
+
दोन चमचे त्रिफळ्याचं चूर्ण गरम पाण्यातून घेतलं की बद्धकोष्ठ नाहीसं होऊन दुसर्‍या दिवशी साफ परसाकडे होते. चार चमचे घेतलं तर जास्त वेळं संडासात मुक्काम ठोकावा लागतो. याला डोस-विचार नाही म्हणायचं?
-फार्म्याकॉलॉजीत इतके काम केल्यावर हेच म्हटलात तर नक्कीच वर म्हटलो तसे चालू द्या :)
(वी दीर्घ आहे पदवीधर या शब्दात!!)
ही मिसळपावची खासियत आहे. एकीकडे प्रमाण मराठी फाट्यावर मारतो म्हणायचं अन लग्गेच एकादा मिसटाईप पकडून दाखवायचा.
तुम्ही गेली वीस वर्षे यशस्वी अ‍ॅलोपाथी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहांत तर पुट युवर हार्ड अर्न्ड मनी व्हेअर युवर माऊथ इज आणि करा की आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स!
कॅन यू प्लीज रीड व्हॉट यू हॅव्ह टाईप्ड? आयुर्वेदिक औषध किंवा कोणतेही इतर, क्लिनिकल ट्रायल्स मधून जाऊन मॉडर्न मेडिसिन बनते. ते 'आयुर्वेदिक' रहात नाही, व मग आयुर्वेदाच्या नावाखाली मार्केटिंग करता येत नाही हे मी सांगायचे का तुम्हाला? जगभरात फार्मा कंपन्या अन इन्शुरन्सवाल्यांनी मिळून काय चालवले आहे याची कल्पना तुम्हाला आहेच. असो. तुम्ही डॉक्टर आहात इतकेच ठाऊक होते म्हणून तो प्रतिसाद लिहिलेला होता. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आयुर्वेदिक औषध किंवा कोणतेही

पिवळा डांबिस
Sun, 02/10/2013 - 09:57 नवीन
आयुर्वेदिक औषध किंवा कोणतेही इतर, क्लिनिकल ट्रायल्स मधून जाऊन मॉडर्न मेडिसिन बनते. ते 'आयुर्वेदिक' रहात नाही
पण कोणतेही मेडिसिन, हे मॉडर्न मेडिसिनच का बनायला हवे? हा आग्रह का? तुम्ही मॉडर्न मेडिसिनचे गुलाम आहांत आणि त्यापासून उपजीविका करतां आहांत म्हणून? तसे असेल तर मीच म्हणतो की,'चालू द्या!' :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

तुम्ही आयुर्वेदाचे मालक आहात

आनंदी गोपाळ
Sun, 02/10/2013 - 09:59 नवीन
हे पाहून मज्जा आली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अस्सं?

पिवळा डांबिस
Sun, 02/10/2013 - 10:12 नवीन
आमचे वरचे सर्व अभिप्राय वाचून कुणाही मिपाकराला सहज कळेल की आम्ही आयुर्वेदाचे मालक नसून चक्क अ‍ॅलोपाथी औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स घडवून आणणारे आहोत. पण तुमच्यासारख्या कावीळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसणार!! बाय द वे: काविळीवर अ‍ॅलोपाथीमध्ये काय उपचार आहे हो? :) एनिवे, अ‍ॅज आय प्रिव्हियसली सेड. आय हॅव सिरियस बॅटल्स टू फाईट. इन अ व्हेरी लेस टाईम. सो हा माझा शेवटचा रिप्लाय!!! एन्जॉय!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

ऑबस्ट्रक्टिव्ह जाँडिस

आनंदी गोपाळ
Sun, 02/10/2013 - 10:16 नवीन
हिपॅटायटिस इ. यांबद्दल आयुर्वेदात काय उपचार आहेत हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

काका..

शैलेन्द्र
Sun, 02/10/2013 - 16:29 नवीन
काका.. प्रतिसाद आवडला.. याच धाग्यात पुढे जावुन काही सांगु इच्छीतो, मुळात बरेच प्रतिसाद आयुर्वेद व वनौषधी(किंवा हर्बल मेडीसीन) यांत गल्लत करतायेत. आयुर्वेदाचे क्षीतिज केवळ रोगावरील औषध ठरवण्यापुरतेच मर्यादीत नाही. निरामय आरोग्य जगण्यासाठी कशी जीवनचर्या ठेवावी आणी तरिही रोग झालाच तर, पथ्य व औषधींच्या मदतीने तो कसा दुर करावा याच ज्ञान म्हणजे आयुर्वेद. त्यात वर्णन केलेल्या सगळ्याच गोष्टी खर्‍या (किंवा परिणामकारक) असतीलच असे नाही परंतु कित्येक उपचार अनुभवसीध्द आहेत. आता क्लीनिकल ट्रायल विषयी.. मुळात क्लिनीकल ट्रायल कसल्या करणार? म्हणजे आयुर्वेदानुसार तुळस ही वेदनाशामक असेल तर तुम्ही क्लिनीकल ट्रायल कसली घेणार, तुळाशीची की उजेनॉलची? तुळाशीत सापडणारे β-elemene हे चांगले अन्टी कॅन्सर ड्रग असु शकते, पण उद्या तसे सिद्ध जरी झाले तरी मी त्याला आयुर्वेदीक औषध न मानता वनौषध समजेल. कदाचीत β-elemene फार्मसीमधेही तयार करता येत असेल. आयुर्वेदाची शास्त्र म्हणुन जी चौकट आहे ती माझ्या माहीती प्रमाणे कफ/वात्/पित्त या त्रीदोषांवर आधारीत आहे. असे काही वर्गीकरण करता येते का, किंवा जणुकीय द्रुष्ट्या असे वेगळेपण आहे का, हा खरा प्रश्न आहे. काही वर्षापुर्वी पुण्यातील रीजनल रीसर्च सेंटरने या तिनही प्रकारच्या लोकांचे मायक्रोअ‍ॅरे प्रोफाईल तयार केले होते. तसेच विशिष्ट परिस्थीतीला/औषधांना या लोकांतील एकाच सायकलच्या किंवा सिस्टीमच्या जीन सेटस कशा रिअ‍ॅक्ट करतात ते शोधायचा प्रयत्न केला होता. एखादे औषध/रसायन जर या तीन वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांना समान परिस्थीतीत दिले तर त्यांच्या जनुकीय प्रोफाईलमधे कोणते बदल होतात, एखादी विवक्षीत जीन कितपत अप्रेग्युलेश्न किंवा डावुन रेग्युलेशन दाखवते हे रिअल टाईम पिसीआर वापरुन ठरवायचा प्रयत्न झाला होता. त्या अभ्यासाचे पुढे काय झाले ते मला माहित नाही. आयुर्वेद शास्त्र आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी त्याच्या चौकटीची वैधता ठरवावी लागेल.. औषधांची परिणामकारकता सिध्द करणे म्हणजे फक्त त्यातील रसायनांची परिणामकारकता सिध्द करणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आनंदी गोपाळ साहेब...

अनुप ढेरे
Mon, 02/11/2013 - 18:24 नवीन
अ‍ॅलोपॅथी मध्ये रुग्णाला औषध देण्याचे प्रमाण कसे ठरवतात हे जाणून घ्यायला आवडेल. उदा: एखाद्या सिरपच प्रमाण अ‍ॅलोपॅथीचा डाक्टर चमच्यांमध्येच सांगतो. आणि गोळयांचे प्रमाण (२५०मिलीग्राम/५०० मिलिग्राम यातल कुठलं?) हे तरी कसे ठरवतात.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

हम्म हे बाकी खरं. आता

बॅटमॅन
Sat, 02/09/2013 - 14:14 नवीन
हम्म हे बाकी खरं. आता पूर्णपणे सहमत :) धन्यवाद पिडांकाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ट्रायल्स

विकास
Fri, 02/08/2013 - 11:44 नवीन
तेंव्हा आयुर्वेदिक (किंवा युनानी) औषधांना वरील चाचण्या आवश्यक आहेत असं म्हणणं हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे.
सहमत आहे. तरी माझ्या आधीच्या प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे ड्रग डीसकव्हरी साठी आयुर्वेदातील ज्ञानाचा उपयोग करून संशोधन करणे चालू आहे - केवळ भारतातच नाही. त्यालाच reverse pharmacology म्हणतात. तसे केल्यास काही गैर वाटत नाही. जे असे संशोधन करतात ते बर्‍याचदा अ‍ॅलोपथीचे डॉक्टर - संशोधक असतात आणि ते आयुर्वेदास विज्ञान म्हणूनच बघतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

चुकीचा समज

अनुराधा१९८०
Fri, 02/08/2013 - 13:57 नवीन
इथे एक महत्वाची गोष्ट दुर्लक्षिली गेलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही म्हणत असलेल्या चाचण्या ह्या नव्या रेणूंसाठी आवश्यक आहेत.
हा अत्यंत चुकीचा समज आहे. कुठलेही रसायन ज्याला ऑषध म्हणुन मान्यता हवी असेल तर ह्या चाचण्या आवश्यक आहेत. एकदा विकी वर बघातरी double blind test म्हणजे काय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हांग आश्शी

नाना चेंगट
Fri, 02/08/2013 - 13:59 नवीन
पिडाकाकांना समज देण्यात येत आहे की त्यांनी तत्काळ विकीपिडीयावर जाऊन सदर प्रक्रियेची व्यवस्थित माहिती घेउन आपले ज्ञान अद्ययावत माफ करा विकीयावत करावे. हुकुमावरुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुराधा१९८०

नान्या... माझा प्रतिसाद

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/08/2013 - 14:01 नवीन
नान्या... माझा प्रतिसाद चोरलास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

ऑ ?

परिकथेतील राजकुमार
Fri, 02/08/2013 - 19:20 नवीन
पिडाकाकांना समज देण्यात येत आहे की त्यांनी तत्काळ विकीपिडीयावर जाऊन सदर प्रक्रियेची व्यवस्थित माहिती घेउन आपले ज्ञान अद्ययावत माफ करा विकीयावत करावे.
जे प्रतिसाद देण्याआधी विकीपिडीयावरती जात नाहीत त्यांच्याकडे ज्ञान असते का? तस्मात, सध्याच्या आधुनीक काळात पिडांकाका हे ज्ञान दॄष्ट्या अत्यंत मागासलेले आहेत असे खेदाने नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

सहमत आहे!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/08/2013 - 14:00 नवीन
सहमत आहे! पिडां, एकदा बघा तरी विकिवर... आधी विषय नीट समजून घ्यावा माणसाने विकिपिडियामधून आणि मगच बोलावे! कधी कळायचं तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुराधा१९८०

@नाना, परा आणि बिका:

पिवळा डांबिस
Sat, 02/09/2013 - 02:44 नवीन
@नाना, परा आणि बिका: वाईऽऽऽट्ट मेले!!!! बिका, तुमची बायको गोडं वरण बनवतांना विकीपिडियावरची रेसेपी वाचून बनवते का हो? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिका स्वतः गोड आंबट किंवा जे

नाना चेंगट
Sat, 02/09/2013 - 13:23 नवीन
बिका स्वतः गोड आंबट किंवा जे काही असेल ते वरण बनवतो त्यामुळे तुमचा मुद्दा बाद. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अनुराधा, सहमत.

आनंदी गोपाळ
Sat, 02/09/2013 - 14:08 नवीन
येथील जुन्या जाणत्या मेंब्रांना विकी शब्द दिसताच हिव भरते असे दिसते. हवी तर फार्म्याकॉलॉजीच्या टेक्स्ट बुकांची यादी खरडवहीत देतो. अथवा अ‍ॅमेझॉनवर इथे पहा. डबल ब्लाईंड क्लिनिकल ट्रायल काय असते ते आपण सर्वांनी पहावे हे विनंती. विकी वर आहे म्हणजे चुकीचेच आहे असे नसते. सहज सोपा व सर्वांनाच उपलब्ध असलेला ढोबळ संदर्भ म्हणून विकी योग्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुराधा१९८०

पॅथी अन शास्त्र

चौकटराजा
Fri, 02/08/2013 - 09:46 नवीन
मी अलोपथिक, आयुर्वेदिक व होमिओ चा अनुभव घेतला आहे. तिन्ही ला आपापल्या मर्यादा आहेत. पण या आहेत औषध पद्धति ! त्या चिकित्सा पद्धति नव्हेत. चिकित्सा पद्धतीतील भागाचा विचार करायचा झाला तर आधुनिक वैद्यक ( अलोपथी नव्हे) हे सर्वश्रेष्ठ आहे. परिपूर्ण मात्र नाही.
  • Log in or register to post comments

आयुवेद ही एक अनुभवजन्य

ऋषिकेश
Fri, 02/08/2013 - 09:54 नवीन
आयुवेद ही एक अनुभवजन्य उपचारपद्धती आहे यावर सहमत. मात्र सध्या 'आयुर्वेदिक' म्हणून जे जे खपते ते 'वैदीक' म्हणून काहिहि खपवावे असे आहे असे खात्रीशीररित्या म्हणू शकतो. बाकी चालु दे!
  • Log in or register to post comments

एक आठवण शेयर करावीशी वाटली..

आनन्दिता
Fri, 02/08/2013 - 10:14 नवीन
एक आठवण शेयर करावीशी वाटली.. माझ्या ३ वर्षाच्या भाच्याला कधीतरी एकदा गोष्ट सांगत असताना ड्रॅगन चा संदर्भ आला तेव्हा त्याला ड्रॅगन म्हणजे ज्याच्या नाकातोंडातून आग आणि धुर येतो असा प्राणी असं सांगितलं मी होतं.. या सगळ्याला ४-५ महीने लोटून गेले होते.. एका संध्याकाळी त्याला घेऊन दुकानात गेले असताना त्याने बाहेर उभं राहुन सिगारेट ओढणार्या एका त्याने माणसाला पाहीलं आणि "मावशी हा बघ ड्रॅगन " अशी आरोळी ठोकली.. अन डोळ्यात अनंत आश्चर्याचे भाव घेऊन टाळ्या ही पिटल्या.. पण तो ' ड्रॅगन' मात्र माझ्याकडे खाऊ की गिळू असा पाहु लागला..
  • Log in or register to post comments

अय्यो चुकीच्या धाग्यावर

आनन्दिता
Fri, 02/08/2013 - 10:16 नवीन
अय्यो चुकीच्या धाग्यावर प्रतिसाद दिला गेला... चुकुन चुक झाली... क्षमा असावी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

Science is both a body of knowledge and a process....

नक्शत्त्रा
Fri, 02/08/2013 - 10:36 नवीन
इट्स sicence .. आपण कुठली हि गोष्ट अ सभीत करून दाखवली कि ती तिच्या पाठीमागचे शास्त्र शोधतो. आणि पुरावा देवून तीच गोष्ट परत प्कारतो. Science is both a body of knowledge and a process which is exciting, ongoing and useful. Traditional medicine (a term used here to denote the indigenous health traditions of the world) and complementary and alternative medicine. Most research has focused on clinical and experimental medicine (safety, efficacy, and mechanism of action) and regulatory issues, to the general neglect of public health dimensions. Public health research must consider social, cultural, political, and economic contexts to maximize the its contribution to health care systems globally.
  • Log in or register to post comments

Becoming a Scientist....

नक्शत्त्रा
Fri, 02/08/2013 - 10:42 नवीन
each branch of science has theories and methodologies and its own limitations which lead to invent new theory. प्रत्येक science मध्ये test successful होतात आणि fail हि. तेच आयुर्वेद ला हि लागू आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा