Skip to main content

आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?

लेखक ग्रेटथिन्कर यांनी गुरुवार, 07/02/2013 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
आयुर्वेद हि भारतीयांनी जगाला दिलेली देणगी आहे असे म्हणतात. आयुर्वेदात अनेक औषधी काढे ,आसवं यांचा वापर केला जातो. आयुर्वेदात वात, कफ, पित्त अश्या तीन प्रकृत्ती मानल्या गेल्या आहेत, त्याद्वारे निदान करण्याची पद्धत आहे. प्रश्न असा आहे कि वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का? double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय? असल्यास त्याची माहिती कुठे मिळेल. एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?

वाचने 76254
प्रतिक्रिया 196

प्रतिक्रिया

In reply to by पिवळा डांबिस

पाश्चात्य कसोट्यांवर ते सत्य ठरत नाहीत. पण या विचारांना पाश्चात्य कसोट्या लावणं हेदेखील चुकीचं आहे. भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्रात (आयुर्वेद, योग वगैरे) हे विचार सत्य समजले गेलेले आहेत.
मा. पिवळा डँबीस, माफ करा, मधे बोलतो आहे. पण रहावत नाही. आपण आधुनिक वैद्यकाचे शिक्षण घेतले आहेत असे गृहित धरून पुढे बोलतो. १. आपण जे बोलत आहात त्याला आपल्या डॉक्टर असण्याचे ब्याकग्राऊंड आहे, हे लक्षात घेता, वरील वाक्य भोंगळपणाचे व चुकीचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. व या मतापाठी माझ्या आधुनिक वैद्यकातील २०+ वर्षांच्या यशस्वी प्र्याक्टिसचा आधारही आहे. कसोट्या पाश्चात्य पौर्वात्य नसतात. त्या "शास्त्रीय" असतात हे आपण विसरता आहात काय? (प्राचीनतेचाच हवाला द्यायचा तर उदा. भूतबाधा झाल्याने अमुक आजार होतो अशा प्रकारचे विचार पाश्चात्य देशांतही कोणे एके काळी 'सत्य समजले गेले' होते? त्यासाठी अनुभवसिद्ध उपचारपद्धतीही आहेत. सबसे तेज च्यानेलांवर त्याचे मार्केटिंगही असते. याला आपण वैज्ञानिक जाहीर करावे काय?) २. हाय स्टेक्स आहेत म्हणून आयुर्वेदिक औषधाची क्लिनिकल ट्रायल घ्यायची गरज नाही, वा तसे करणे शक्य नाही, हे लॉजिक वापरताना तुम्ही तुमच्या वैद्यकीय ज्ञानाशी एकनिष्ठ आहात काय? याच लॉजिकने मॉडर्न मेडिसिनमधील औषधे वापरात आणावीत काय? ३. "आयुर्वेदिक" औषधे जेव्हा कधी काम करतात, तेव्हा ती नक्की कशी व का करतात? पेशंटच्या शरीरात गेलेल्या लक्षावधी प्लांट अल्कलॉईड्स व इतर 'नैसर्गिक' केमिकल्स पैकी नक्की काय काम करते, इ बाबींचे स्टँडर्डायझेशन व्हायला हवे असे आपण म्हणाल काय? या 'आयुर्वेदिक' औषधांना कोणतेही 'अन्टोवर्ड इफेक्ट्स' नसतात असे आपले मत आहे काय? (अनुभवसिद्ध औषधांत उदा. विलो बार्क पासून अ‍ॅस्पिरिन हे बाळबोध असल्याने आपणास परिचित आहेच. अधिक विवेचन इथे करायलाच हवे काय?) ४. औषधांचे 'डोस' ठरविण्याच्या पद्धतीबद्दल आपले मत ऐकायला आवडेल. थेरप्युटिक डोस, टॉक्सिक डोस, लिथल डोस इ. कसे ठरवितात? या व असल्या अभ्यासासाठी 'व्हेस्टेड इंटरेस्ट' म्हणून फार्मॅकॉलॉनी नामक ज्ञानशाखा विकसित झाली आहे असे आपले म्हणणे आहे काय?
पण जी आयुर्वेदिक औषधं गेली अनेक शतकं वापरात आहेत, ज्यांचे गुणधर्म आणि मात्रा (डोस) ज्ञात आहेत त्यांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल घेण्यामागचा हेतू कोणता?
म्हणजे नक्की काय? अमुक 'शीत' असते तमुक कफनाशक असते, हे 'गुणधर्म' आहेत, असे म्हणत आहात का आपण?? डोस म्हणजे नक्की कसा ठरतो? 'पाव चमचा सीतोपलादी चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्या,' ह्याला डोस म्हणावे काय? उत्तरे मिळण्याच्या अपेक्षेत, आनंदी गोपाळ. (टीप: आपण आधुनिक वैद्यकशास्त्राचे पदविधर नसलात तर वरील प्रतिसाद म्हणजे हवेत बोलणे आहे, असे समजून सोडून द्यावा, अन्यथा पुढे चर्चा करायला आवडेल)

In reply to by आनंदी गोपाळ

वरील प्रतिसाद म्हणजे हवेत बोलणे आहे, असे समजून सोडून द्यावा,
हे वाचून सोडून द्यायचा अनावर मोह होत आहे! पण मग लगेच उद्या बिका म्हणणार की, "एक डांबिस असतो, म्हणूनच तो आनंदी असतो!!!" :) अहो, मी इतर मिपाकरांप्रमाणेच माझं एक मत मांडलं हो! एक मिपाकर म्हणून मला तितकी तरी मुभा द्याल की नाही तुम्ही? त्यावर त्या ब्याटम्यानाने दोन फॉलो अप प्रश्न विचारले त्यांना माझ्या अल्पमतीप्राणे उत्तरं दिली मी! (ब्याटम्याना, हानू का आता येक! तुज्यामुळं आता डागतरसायबांना तरास व्हायाला लागलाय!!!) डॉक्टरसाहेब, आम्ही भोंगळ आहोत हे पूर्णपणे मान्य! नायतर पिवळा डांबिसच्या ऐवजी काहीतरी 'धन्वंतरी' वगैरे नांव नसतं काय आमचं? ते सोडा, पण आम्ही चुकीचे कसे काय ते समजावून सांगाल काय? कसोट्या शास्त्रीय असतात हे आम्हालाही कळतं, पण आज भारतीय अ‍ॅलोपाथी मेडिकल्/फार्मा जगत पाश्चात्य जगाने डेव्हलप केलेल्या कसोट्याच वापरत नाहीये काय? भारतीय अ‍ॅलोपाथी वैद्यकशास्त्राने आजवर जगन्मान्य अशा क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करण्याविषयीच्या वैद्यानिक कसोट्या शोधून काढल्या असतील तर त्याबद्दल माहिती द्या, वाचायला आवडेल... दुसरं एक, मी कधीही आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स घेऊ नका असं म्हंटलेलं नाही, माझे रिप्लाय काळजीपूर्वक वाचा. उलट मी कुणालाही कुठल्याही आयुर्वेदिक औषधाच्या कसल्याही क्लिनिकल ट्रायल्स करायच्या असतील तर माझी काहीही हरकत नाही असंच म्हंटलेलं आहे. उगाच माझ्या तोंडी नसलेले शब्द गुंफायचा तुम्ही प्रयत्न करू नका! मी तसं म्हंटलेलं नाही त्यामुळे माझ्या ज्ञानाशी मी एकनिष्ठ असण्याचा/प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. तसंच मी कुठेही आयुर्वेदिक औषधांना अनटोवर्डस इफेक्ट नसतात असं म्हंटलेलं नाहीये. उलट मी असंच म्हंटलेलं आहे की कुठल्याही रेणूला अति अल्प प्रमाणात दिला गेलेला नो-इफेक्ट डोस असतो आणि अति कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणातला घातक डोस असतो. वाचा, वाचा हो!!!
डोस म्हणजे नक्की कसा ठरतो? 'पाव चमचा सीतोपलादी चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्या,' ह्याला डोस म्हणावे काय?
दोन चमचे त्रिफळ्याचं चूर्ण गरम पाण्यातून घेतलं की बद्धकोष्ठ नाहीसं होऊन दुसर्‍या दिवशी साफ परसाकडे होते. चार चमचे घेतलं तर जास्त वेळं संडासात मुक्काम ठोकावा लागतो. याला डोस-विचार नाही म्हणायचं?
आपण आधुनिक वैद्यकशास्त्राचे पदविधर नसलात...
नाही, आम्ही आधुनिक वैद्यकशात्राचे पदवीधर (वी दीर्घ आहे पदवीधर या शब्दात!!) नाही. त्यामुळे हमारा सिर आपकी चप्पलके ऊपर!!!! पण गेली १५ वर्षे ड्रग डॅव्हलपमेंटमध्ये वाया घालवली आहेत. अगदी फार्माकॉलॉजी/ टॉक्सिकॉलॉजी अ‍ॅनिमल ट्रायल्सपासून ते फेज ३ क्लिनिकल ट्रायल्स करायचा अनुभव पाठीशी आहे. आजच्या घडीला दोन फेज ३ आणि १ फेज २ ट्रायल्स सुरू आहेत आमच्या निर्देशनाखाली जगातील २७ (अक्षरी सत्तावीस) देशांमध्ये! तेंव्हा क्लिनिकल ट्रायल्सची चर्चा चालू असतांना त्यात आपलं मत नोंदवावं असं उगीचच आम्हाला वाटलं. त्याबद्दल सॉरी!! त्याचं काय आहे की इंडियन एफडीए आमचा सल्ला विचारतं आणि दिलेला सल्ला मानतंही. पण ते वेडे असावेत. बाय द वे, तुम्ही किती ग्लोबल क्लिनिकल ट्रायल्स केल्यात तुमच्या अधिपत्याखाली डॉक्टर? कळून घ्यायला आवडेल.... डॉक्टर, मला तुमच्याविषयी राग नाही. तुम्ही एक अ‍ॅलोपाथी प्रॅक्टिस करणारे फिजिशियन आहांत हे लक्षात घेता तुमचं मत तुम्ही व्यक्त केल्याप्रमाणेच असणार ह्याची मला जाणीव आहे. मी माझं ओरिजिनल मत हे तुमच्यासारख्या लोकांसाठी व्यक्त केलेलं नाहीच आहे. तुम्हाला कुठल्याही क्लिनिकल ट्रायल्स करायला मी कोण विरोध करणारा? उलट मी तर असंच म्हणेन की तुम्हीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही गेली वीस वर्षे यशस्वी अ‍ॅलोपाथी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहांत तर पुट युवर हार्ड अर्न्ड मनी व्हेअर युवर माऊथ इज आणि करा की आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स! एकदा एफडीए कडे ट्रायल रजिस्टर केलीत की इथे लिंक द्या, आम्हीही फॉलो अप करू तिची प्रोग्रेस आणि तिचे रिझल्टस!!! त्यात काय!!! आम्ही आमचं मत अशा लोकांसाठी दिलं की ज्यांना सायन्सचं आणि आरोग्यविषयक ज्ञान नाही, त्यांचं ते दुर्दैवाने ते शिक्षण झालेलंच नाही. त्यांचा एकीकडे पारंपारिक आयुर्वेदिक औषधांवर विश्वास तर आहे पण ते वर्तमानपत्रातून वाचतात की आयुर्वेदिक औषधं अनुपयुक्त/ डेंजरस आहेत म्हणून! हा प्रचार कुठल्या हितसंबंधियांकडून चालतो हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, पण त्यामुळे ती लोकं कन्फ्यूज होतात. फक्त त्यांच्यासाठीच होता माझा प्रतिसाद. मी तुमच्यासारखा मेडिकल प्रॅक्टिस करणारा फिजिशियन नाही पण माझं सगळं आयुष्य मी घातक रोगांपासून मानवजातीची माझ्या अल्प शक्तीनुसार सुटका करण्यासाठी घालवलेलं आहे. आजही कॅन्सर, लूपस आणि स्किझोफ्रेनियासारख्या असाध्य रोगांवरच्या ट्रायल्स यशस्वी करण्यासाठी झगडतोय मी! डॉक्टर, आय हॅव, ऑनेस्ट टू गॉड, रियल लाईफ बॅटल्स अहेड ऑफ मी अ‍ॅन्ड द टाईम इज रनिंग आऊट! आय हॅव नायदर द टाईम नॉर द इन्क्लिनेशन फॉर कॉस्मॅटिक वन्स!!!! आपला, पिवळा डांबिस

In reply to by आनंदी गोपाळ

आम्ही आमचं काम चालूच ठेवतो आहोत, त्याला तुमच्या परवानगीची गरज कधीही नव्हती आणि नाही.... इन द मीनटाईम, तुम्ही केंव्हा आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स कधी सुरू करता ते सांगा.... अ‍ॅज आय सेड, पुट युवर मनी व्हेअर युवर माऊथ इज!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

शास्त्रीय ज्ञानावर आधारीत देता आले तर बरे होईल दुसरे, मी मॉडर्न मेडिसिनवाला आहे. मला तुमचा आयुर्वेद सिद्ध करण्याशी घेणे देणे नाही. हौस असेल तर तुम्हीच प्रमाणित करा, मग आयुर्वेद शास्त्र आहे हे सांगा. कोणताही शास्त्रीय बेस नसताना केवळ तुम्ही म्हटलात 'आहे' म्हणून आयुर्वेद शास्त्र आहे, अशा बाबा वाक्यं आधारित पद्धतीचेच मला हसू येते. तेव्हा, माय मनी इज ऑलवेज ऑन मॉडर्न मेडिसिन. आय होप युर 'फिलॉसॉफी' डझन्ट इन्फ्लुअन्स द क्लिनिकल ट्रायल्स कण्डक्टेड बाय युर कंपनी, (१२७ देशांत नं?) अ‍ॅण्ड ओन्ली सायन्स प्रिव्हेल्स...

In reply to by आनंदी गोपाळ

आ.गो,कशाला डांबिसच्या नादाला लागताय, ते पोथीनिष्ठ आहेत. आमच्या पुर्वजांनी लिहले आहे ना मग त्येच योग्य आहे ,असा सूर आहे त्यांचा. हे फेज३ ट्रायल घेतात हा अतिशयोक्ती अलंकार असावा काय हो? नाय म्हण्टलं...

In reply to by पिवळा डांबिस

चर्चा वाचून मी आनंदी गोपाळ यांच्या बाजूने आहे, इतकेच सांगतो. प्लीज भांडन चालू द्या. :) डॉ.सातीला बोलवा हो चर्चेत. -दिलीप बिरुटे (आयुर्वेदिक की अ‍ॅलोपॅथी,कन्फ्युज)

In reply to by पिवळा डांबिस

आजच्या घडीला दोन फेज ३ आणि १ फेज २ ट्रायल्स सुरू आहेत आमच्या निर्देशनाखाली जगातील २७ (अक्षरी सत्तावीस) देशांमध्ये!
+
दोन चमचे त्रिफळ्याचं चूर्ण गरम पाण्यातून घेतलं की बद्धकोष्ठ नाहीसं होऊन दुसर्‍या दिवशी साफ परसाकडे होते. चार चमचे घेतलं तर जास्त वेळं संडासात मुक्काम ठोकावा लागतो. याला डोस-विचार नाही म्हणायचं?
-फार्म्याकॉलॉजीत इतके काम केल्यावर हेच म्हटलात तर नक्कीच वर म्हटलो तसे चालू द्या :)
(वी दीर्घ आहे पदवीधर या शब्दात!!)
ही मिसळपावची खासियत आहे. एकीकडे प्रमाण मराठी फाट्यावर मारतो म्हणायचं अन लग्गेच एकादा मिसटाईप पकडून दाखवायचा.
तुम्ही गेली वीस वर्षे यशस्वी अ‍ॅलोपाथी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहांत तर पुट युवर हार्ड अर्न्ड मनी व्हेअर युवर माऊथ इज आणि करा की आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स!
कॅन यू प्लीज रीड व्हॉट यू हॅव्ह टाईप्ड? आयुर्वेदिक औषध किंवा कोणतेही इतर, क्लिनिकल ट्रायल्स मधून जाऊन मॉडर्न मेडिसिन बनते. ते 'आयुर्वेदिक' रहात नाही, व मग आयुर्वेदाच्या नावाखाली मार्केटिंग करता येत नाही हे मी सांगायचे का तुम्हाला? जगभरात फार्मा कंपन्या अन इन्शुरन्सवाल्यांनी मिळून काय चालवले आहे याची कल्पना तुम्हाला आहेच. असो. तुम्ही डॉक्टर आहात इतकेच ठाऊक होते म्हणून तो प्रतिसाद लिहिलेला होता. बाकी चालू द्या.

In reply to by आनंदी गोपाळ

आयुर्वेदिक औषध किंवा कोणतेही इतर, क्लिनिकल ट्रायल्स मधून जाऊन मॉडर्न मेडिसिन बनते. ते 'आयुर्वेदिक' रहात नाही
पण कोणतेही मेडिसिन, हे मॉडर्न मेडिसिनच का बनायला हवे? हा आग्रह का? तुम्ही मॉडर्न मेडिसिनचे गुलाम आहांत आणि त्यापासून उपजीविका करतां आहांत म्हणून? तसे असेल तर मीच म्हणतो की,'चालू द्या!' :)

In reply to by आनंदी गोपाळ

आमचे वरचे सर्व अभिप्राय वाचून कुणाही मिपाकराला सहज कळेल की आम्ही आयुर्वेदाचे मालक नसून चक्क अ‍ॅलोपाथी औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स घडवून आणणारे आहोत. पण तुमच्यासारख्या कावीळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसणार!! बाय द वे: काविळीवर अ‍ॅलोपाथीमध्ये काय उपचार आहे हो? :) एनिवे, अ‍ॅज आय प्रिव्हियसली सेड. आय हॅव सिरियस बॅटल्स टू फाईट. इन अ व्हेरी लेस टाईम. सो हा माझा शेवटचा रिप्लाय!!! एन्जॉय!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

काका.. प्रतिसाद आवडला.. याच धाग्यात पुढे जावुन काही सांगु इच्छीतो, मुळात बरेच प्रतिसाद आयुर्वेद व वनौषधी(किंवा हर्बल मेडीसीन) यांत गल्लत करतायेत. आयुर्वेदाचे क्षीतिज केवळ रोगावरील औषध ठरवण्यापुरतेच मर्यादीत नाही. निरामय आरोग्य जगण्यासाठी कशी जीवनचर्या ठेवावी आणी तरिही रोग झालाच तर, पथ्य व औषधींच्या मदतीने तो कसा दुर करावा याच ज्ञान म्हणजे आयुर्वेद. त्यात वर्णन केलेल्या सगळ्याच गोष्टी खर्‍या (किंवा परिणामकारक) असतीलच असे नाही परंतु कित्येक उपचार अनुभवसीध्द आहेत. आता क्लीनिकल ट्रायल विषयी.. मुळात क्लिनीकल ट्रायल कसल्या करणार? म्हणजे आयुर्वेदानुसार तुळस ही वेदनाशामक असेल तर तुम्ही क्लिनीकल ट्रायल कसली घेणार, तुळाशीची की उजेनॉलची? तुळाशीत सापडणारे β-elemene हे चांगले अन्टी कॅन्सर ड्रग असु शकते, पण उद्या तसे सिद्ध जरी झाले तरी मी त्याला आयुर्वेदीक औषध न मानता वनौषध समजेल. कदाचीत β-elemene फार्मसीमधेही तयार करता येत असेल. आयुर्वेदाची शास्त्र म्हणुन जी चौकट आहे ती माझ्या माहीती प्रमाणे कफ/वात्/पित्त या त्रीदोषांवर आधारीत आहे. असे काही वर्गीकरण करता येते का, किंवा जणुकीय द्रुष्ट्या असे वेगळेपण आहे का, हा खरा प्रश्न आहे. काही वर्षापुर्वी पुण्यातील रीजनल रीसर्च सेंटरने या तिनही प्रकारच्या लोकांचे मायक्रोअ‍ॅरे प्रोफाईल तयार केले होते. तसेच विशिष्ट परिस्थीतीला/औषधांना या लोकांतील एकाच सायकलच्या किंवा सिस्टीमच्या जीन सेटस कशा रिअ‍ॅक्ट करतात ते शोधायचा प्रयत्न केला होता. एखादे औषध/रसायन जर या तीन वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांना समान परिस्थीतीत दिले तर त्यांच्या जनुकीय प्रोफाईलमधे कोणते बदल होतात, एखादी विवक्षीत जीन कितपत अप्रेग्युलेश्न किंवा डावुन रेग्युलेशन दाखवते हे रिअल टाईम पिसीआर वापरुन ठरवायचा प्रयत्न झाला होता. त्या अभ्यासाचे पुढे काय झाले ते मला माहित नाही. आयुर्वेद शास्त्र आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी त्याच्या चौकटीची वैधता ठरवावी लागेल.. औषधांची परिणामकारकता सिध्द करणे म्हणजे फक्त त्यातील रसायनांची परिणामकारकता सिध्द करणे.

In reply to by आनंदी गोपाळ

अ‍ॅलोपॅथी मध्ये रुग्णाला औषध देण्याचे प्रमाण कसे ठरवतात हे जाणून घ्यायला आवडेल. उदा: एखाद्या सिरपच प्रमाण अ‍ॅलोपॅथीचा डाक्टर चमच्यांमध्येच सांगतो. आणि गोळयांचे प्रमाण (२५०मिलीग्राम/५०० मिलिग्राम यातल कुठलं?) हे तरी कसे ठरवतात.?

In reply to by पिवळा डांबिस

तेंव्हा आयुर्वेदिक (किंवा युनानी) औषधांना वरील चाचण्या आवश्यक आहेत असं म्हणणं हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे.
सहमत आहे. तरी माझ्या आधीच्या प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे ड्रग डीसकव्हरी साठी आयुर्वेदातील ज्ञानाचा उपयोग करून संशोधन करणे चालू आहे - केवळ भारतातच नाही. त्यालाच reverse pharmacology म्हणतात. तसे केल्यास काही गैर वाटत नाही. जे असे संशोधन करतात ते बर्‍याचदा अ‍ॅलोपथीचे डॉक्टर - संशोधक असतात आणि ते आयुर्वेदास विज्ञान म्हणूनच बघतात.

In reply to by पिवळा डांबिस

इथे एक महत्वाची गोष्ट दुर्लक्षिली गेलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही म्हणत असलेल्या चाचण्या ह्या नव्या रेणूंसाठी आवश्यक आहेत.
हा अत्यंत चुकीचा समज आहे. कुठलेही रसायन ज्याला ऑषध म्हणुन मान्यता हवी असेल तर ह्या चाचण्या आवश्यक आहेत. एकदा विकी वर बघातरी double blind test म्हणजे काय ते.

In reply to by अनुराधा१९८०

पिडाकाकांना समज देण्यात येत आहे की त्यांनी तत्काळ विकीपिडीयावर जाऊन सदर प्रक्रियेची व्यवस्थित माहिती घेउन आपले ज्ञान अद्ययावत माफ करा विकीयावत करावे. हुकुमावरुन

In reply to by नाना चेंगट

पिडाकाकांना समज देण्यात येत आहे की त्यांनी तत्काळ विकीपिडीयावर जाऊन सदर प्रक्रियेची व्यवस्थित माहिती घेउन आपले ज्ञान अद्ययावत माफ करा विकीयावत करावे.
जे प्रतिसाद देण्याआधी विकीपिडीयावरती जात नाहीत त्यांच्याकडे ज्ञान असते का? तस्मात, सध्याच्या आधुनीक काळात पिडांकाका हे ज्ञान दॄष्ट्या अत्यंत मागासलेले आहेत असे खेदाने नमूद करतो.

In reply to by अनुराधा१९८०

सहमत आहे! पिडां, एकदा बघा तरी विकिवर... आधी विषय नीट समजून घ्यावा माणसाने विकिपिडियामधून आणि मगच बोलावे! कधी कळायचं तुम्हाला?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

@नाना, परा आणि बिका: वाईऽऽऽट्ट मेले!!!! बिका, तुमची बायको गोडं वरण बनवतांना विकीपिडियावरची रेसेपी वाचून बनवते का हो? :)

In reply to by अनुराधा१९८०

येथील जुन्या जाणत्या मेंब्रांना विकी शब्द दिसताच हिव भरते असे दिसते. हवी तर फार्म्याकॉलॉजीच्या टेक्स्ट बुकांची यादी खरडवहीत देतो. अथवा अ‍ॅमेझॉनवर इथे पहा. डबल ब्लाईंड क्लिनिकल ट्रायल काय असते ते आपण सर्वांनी पहावे हे विनंती. विकी वर आहे म्हणजे चुकीचेच आहे असे नसते. सहज सोपा व सर्वांनाच उपलब्ध असलेला ढोबळ संदर्भ म्हणून विकी योग्यच आहे.

मी अलोपथिक, आयुर्वेदिक व होमिओ चा अनुभव घेतला आहे. तिन्ही ला आपापल्या मर्यादा आहेत. पण या आहेत औषध पद्धति ! त्या चिकित्सा पद्धति नव्हेत. चिकित्सा पद्धतीतील भागाचा विचार करायचा झाला तर आधुनिक वैद्यक ( अलोपथी नव्हे) हे सर्वश्रेष्ठ आहे. परिपूर्ण मात्र नाही.

आयुवेद ही एक अनुभवजन्य उपचारपद्धती आहे यावर सहमत. मात्र सध्या 'आयुर्वेदिक' म्हणून जे जे खपते ते 'वैदीक' म्हणून काहिहि खपवावे असे आहे असे खात्रीशीररित्या म्हणू शकतो. बाकी चालु दे!

एक आठवण शेयर करावीशी वाटली.. माझ्या ३ वर्षाच्या भाच्याला कधीतरी एकदा गोष्ट सांगत असताना ड्रॅगन चा संदर्भ आला तेव्हा त्याला ड्रॅगन म्हणजे ज्याच्या नाकातोंडातून आग आणि धुर येतो असा प्राणी असं सांगितलं मी होतं.. या सगळ्याला ४-५ महीने लोटून गेले होते.. एका संध्याकाळी त्याला घेऊन दुकानात गेले असताना त्याने बाहेर उभं राहुन सिगारेट ओढणार्या एका त्याने माणसाला पाहीलं आणि "मावशी हा बघ ड्रॅगन " अशी आरोळी ठोकली.. अन डोळ्यात अनंत आश्चर्याचे भाव घेऊन टाळ्या ही पिटल्या.. पण तो ' ड्रॅगन' मात्र माझ्याकडे खाऊ की गिळू असा पाहु लागला..

इट्स sicence .. आपण कुठली हि गोष्ट अ सभीत करून दाखवली कि ती तिच्या पाठीमागचे शास्त्र शोधतो. आणि पुरावा देवून तीच गोष्ट परत प्कारतो. Science is both a body of knowledge and a process which is exciting, ongoing and useful. Traditional medicine (a term used here to denote the indigenous health traditions of the world) and complementary and alternative medicine. Most research has focused on clinical and experimental medicine (safety, efficacy, and mechanism of action) and regulatory issues, to the general neglect of public health dimensions. Public health research must consider social, cultural, political, and economic contexts to maximize the its contribution to health care systems globally.

each branch of science has theories and methodologies and its own limitations which lead to invent new theory. प्रत्येक science मध्ये test successful होतात आणि fail हि. तेच आयुर्वेद ला हि लागू आहे.

आनन्दिता -पण तुज भाचा किती खर बोलला .........हि नवीन पिढी जोपर्यंत असे विचार मनात बिम्बवणार नाही, तोपर्यंत कितेक ड्रॅगन बघायला मिळणार देव जाने.

प्रास कॉलिंग प्रास प्रास कम ईन प्रास कम ईन

double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का?
झालेली नाही कुठल्याही प्रकारची trial. double blind तर फारच लांब राहिली. अश्या trials आधी कराव्यात आणि मग ऑषधे विकवीत.

जगात कुठलेच शास्त्र पारिपुर्ण नसते,प्रत्येक शास्त्राला त्याच्या काही मर्यादा निश्चितच असतात,उदा.आधुनिक शास्त्रामध्ये,संधीगत वात्,मुत्राश्मरी,सगळ्या आजारांचे मुळ असणार्‍या पचनाच्या तक्रारी,सिरोटीक लिव्हर्,असायटीस यासारख्या आजारांवर उपचार नाहीयेत्,तेथे आयुर्वेद अत्यंत उत्कृष्ठ काम करतो,सोरियॅसिस सारखा आजार अ‍ॅलोपॅथी बरीच करु शकत नाही,तेथे आयुर्वेदीय औषधपद्धती ४ ते ६ महिन्यात हा आजार पुर्ण बरा करते,पण तुम्ही सर्जिकल प्रोसिजर मध्ये आयुर्वेदाचा आग्रह नाही धरु शकत.ही त्याची निश्चित मर्यादा आहे. त्यामुळे आयुर्वेद हे शास्त्रच नाही हा दावा खरच चुकीचा आहे.

अहो काही लोकांच्या मते रामायण-महाभारतमध्ये विमान आणि अणुबॉम्ब यांचा पण उल्लेख आहे. वेदम वाक्यं प्रमाणं हे माहीत नाही का? यातून उज्वल हिंदू संस्कृतीचा इतिहास कळतो.

In reply to by पिंपातला उंदीर

विषय काय चाललाय, तुम्ही काय लिहीताय? ज्यांचे म्हणणे आयुर्वेद हे सायन्स आहे असे आहे, त्यातील कोणीही असले काही बरळले नाही. पण विषय नसताना जात आणि धर्म काढला नाही तर स्वतःचा निधर्मीपणा दिसत नाही असे कुठेतरी वाटत असावे आणि त्याव्यतिरीक्त चर्चेत लिहीण्यासारल्जे माहितीपूर्ण काही माहीत नसावे असेच असले प्रतिसाद वाचले की वाटते. असो,

In reply to by विकास

सर्वप्रथम मी कुठल्याही जाती-धर्मावर टीका केलेली नाही. नंबर २ मागच्या काही धाग्यांवर मी मांडलेली मत पटत नाहीत म्हणून इथे गुस्सा होऊ नका. नंबर ३ हे नेटवरच virtual life एवढ सीरीयस घेऊ नका हो. लोभ असावा.

In reply to by पिंपातला उंदीर

#१ & २: मी टिका केली असे कुठे म्हणले? नको तेथे जाती-धर्म काढता, हे दाखवून दिले, इतकेच. आणि ते विधान हे वास्तव आहे. #३: virtual life सिरीयसली घेयचे का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही मात्र जातीय आणि धार्मिक आणि ते देखील काही माहीती नसताना लिहू नका असे मी नक्की विनंती म्हणून म्हणेन.

In reply to by पिंपातला उंदीर

विकासराव, काही कुत्री ट्रेनिंग दिलेली असतात. त्यांना आपण बस म्हणायला सांगितले की बसतात, बऱ्याच ट्रिक करून दाखवतात. त्यांच्याकडे प्रेमाने बोलून फायदा असतो. कधीमधी खाऊ दिला तर खुशही होतात. पण हेच पिसाळलेल्या कुत्र्यांकडे करून चालत नाही. ती चावायला अंगावर येतात. त्यांना एकतर स्वतः ठोकून काढावे किंवा म्युनिसिपालिटीला फोन करावा. काय म्हणता ;-) टीप :- हे नेटवरच virtual life आहे. एवढ सीरीयस घ्यायचे नसते. त्यामुळे मी काहीही उपमा देऊ शकतो.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

उतार वय, आयुष्यात काही भरीव न केल्यामुळे आलेले frustration , आयुष्यात नैराश्य असणे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत. त्यामुळे याचा अर्थ हा नाही के ते फ्रस्ट्रेशन इथे काढावे. तुमच्यासारख्या सीनियर सिटिज़न ला असली भाषा वापरणे शोभत नाही. हा माझा शेवटचा प्रतिसाद. आणि शेवटच my sympathies.

In reply to by पिंपातला उंदीर

तुमच्यासारख्या सीनियर सिटिज़न ला असली भाषा वापरणे शोभत नाही.
आणि विकास यांच्याशी तुम्ही उद्धटपणे वागलात ते शोभले वाटते तुम्हाला. वरून एक वाक्य आधी माझ्यासारख्या सीनियर सिटिज़नचा पाणउतारा करणे पण शोभले वाटते. आता असेल आमचे उतार वय, नसेल काही भरीव केले आम्ही, असू आयुष्यात निराश आम्ही, पण हे असे चारचौघात बोलणे शोभले काय ?? वडीलधाऱ्या माणसांशी असे बोलतात होय ???

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे काका होते ते आजोबा कधी झाले? मला वाटलं होतं हा धागा शिरेस आहे म्हणून! इथे भलताच विनोदी प्रकार चालू आहे! =))

In reply to by पैसा

अमोल उद्गीरकर काकांनी लहानपणी आजोबा-आजींचा हातचा मार खाल्लीला दिसतोय. आजोबा लोकांवर इतके कावलेले दिसतायत ते! ;) अजून एक अवांतर प्रश्नः आयुष्यात भरीव काही केलेल्यांनी काहीही बोललेले चालते का? - विमेआजोबांच्या नातीची वर्गमैत्रिण

In reply to by पिंपातला उंदीर

उतार वय, आयुष्यात काही भरीव न केल्यामुळे आलेले frustration , आयुष्यात नैराश्य असणे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत.
=)) =)) अहो तो 'विश्वनाथ' लोकाच्या आयुष्यात नैराश्य आणेल. त्याला कसले येतेय नैराश्य.
हा माझा शेवटचा प्रतिसाद. आणि शेवटच my sympathies.
बघा, आले की नाही तुम्हाला नैराश्य. बाकी, तुम्ही अजून थोडी चर्चा करून ह्या धाग्यावर काही भरीव कामगिरी करावी असे वाटते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो तो 'विश्वनाथ' लोकाच्या आयुष्यात नैराश्य आणेल. त्याला कसले येतेय नैराश्य.
हीहीही !!!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

लोकांना कमालीचे नैराश्य आणुन वर असे निर्लज्जपणे हसायचे म्हणजे तर कळस झाला अक्षरशः. कुठे फेडाल ही पापे विमेकाका (की आजोबा? नक्की तुमचे ष्टेटास काय आहे आहे सध्या ते सांगा बरे). असो. मी याचा जाहीर णिषेध नोंदवतो. एक आंतरजालीय पेटिशन काढावी असाही विचार आहे. तुमच्या वेद पुराणांमुळे खुप माजले आहात तुम्ही. तुम्हाला कंपल्सरी अ‍ॅलोपॅथिक औषधे खायला घालीन म्हणतो. अजुन बरेच काही लिहायचे आहे. पण तुर्तास एवढेच. मनुवादी कुठचे.

In reply to by पिंपातला उंदीर

जाऊ द्या हो अमोल शेठ.. मेहेंदळेकाकांची जालीय वाटचाल बघून त्यांचा समीक्षकी खाक्या लगेच लक्षात येतो. बद्धकोष्ठी प्रतिसाद देवून आपल्यासारख्यांना नाऊमेद करतात हे सगळे म्हातारे लोक. माझा तुम्हाला पाठिंबा आहे. (मात्र तो चुकून घेतलाच तुम्ही, तर नक्की काय कराल हाही एक प्रश्नच आहे.!)

In reply to by पिंपातला उंदीर

नंबर ३ हे नेटवरच virtual life एवढ सीरीयस घेऊ नका हो.
हे तुम्ही पण लक्षात ठेवा म्हणजे झाले. भविष्यात कधी गरज पडेल सांगता येत नाही.

फक्त अनुभव आणि विश्वास यांच्या कसोटीवर उतरलेल्यांनी आयुर्वेदीक उपचार करावे उगाच त्याला शास्त्र वगैरेचा दर्जा कशासाठी द्यायचा?

सर्वजण प्रासची आठवण काढताहेत आणि मत मागताहेत. प्रासभाऊने लिहीलेला हा लेख ज्यांनी वाचला नसेल त्यांच्यासाठी: http://www.misalpav.com/diwali2012/ayurved_way_of_life

मला आपल्या आयुर्वेदिक पद्धतीन्वर विश्वास आहे बुआ.. १० वषान्पुर्वी मला काविळ हा रोग झाला होता. म.ब.ब.स. वैद्यान्कडे जाउनही काही फरक पडत नव्हता. मग औरन्गाबाद च्या जवळ भेन्डाळा गावाजवळच्या एका वैद्यबुवान्बद्दल ऐकले. ते म्हणे नाकात काही औषधाचे थेम्ब टाकतात ज्याने काविळ बरा होतो. हा उपाय पण करावयाचे ठरवले. तिथे जाउन त्या वैद्यबुआन्कडुन औषध नाकात टाकुन घेतले. वैद्यबुआ म्हणाले कि म्हणाले कि इथुन पुढे ३-४ दिवस नाकाद्वारे सतत पिवळा स्त्राव (त्यान्च्या शब्दात काविळ) बाहेर येइल तो एका कोरड्या फडक्याने साफ करत जा. पुढे म्हणाले की आता काळजी सोडा आणी फक्त आठवडाभर आराम करा.(तिथे जमलेली लोक तर मजेत म्हणाली कि बाहेर टपरीवर भजी खाउन गेलात तरी चालेल. आम्ही मात्र इथे आमच्या म.ब.ब.स. वैद्याचा सल्हा ऐकला कि यक्रुताला तेल्-तुप सध्या पुर्णपणे बन्द). उपचाराचे शुल्क फक्त २० रुपये (१९९७ चि गोष्ट आहे ही). पुढील १० दिवसानन्तर मी पुर्ण बरा आणी कालीजात जायला लागलो.

In reply to by केदार-मिसळपाव

काविळ ही स्वता शरीरच बरी करते. आपण फक्त पथ्य पाळुन बरे होण्याला मदत करायची असते. काही केले नाही तरी काविळ बरी होते, त्यामुळे तुम्ही एकुन ७-१० दिवस घालवल्यानंतर ती बरी झाली, नाकात ऑषध घातल्यामुळे नाही

मानावी. ज्या ज्या गोष्टीने माणसच्या उत्कर्षात भर पडते आणी ज्या गोष्टीची तार्किक पद्धतीने उकल करता येते त्याला वैज्ञानिक ज्ञान म्हणता येइल. असे बुआ मला फक्त वाटते. मी आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानतो.

double blind trial विषयी विकीपेडीयावरची माहिती.सर्वात शेवटची ओळ वाचा. A blind or blinded experiment is a scientific experiment where some of thepeople involved are prevented from knowing certain information that might lead to conscious or subconscious bias on their part, thus invalidating the results. For example, when asking consumers to compare the tastes of different brands of aproduct, the identities of the product should be concealed –otherwise consumers will generally tend to prefer the brand they are familiar with. Similarly, when evaluating the effectiveness of a medical drug , both the patients and the doctors who administer the drug may be kept in the dark about the dosage being applied in each case – to forestall any chance of a placebo effect , observer bias ,or conscious deception. Blinding can be imposed on researchers, technicians, subjects, funders, or any combination of them. The opposite of a blind trial is an open trial . Blind experiments are an important tool of the scientific method , in many fields of research— medicine , psychology and the social sciences , natural sciences such as physics and biology , applied sciences such as market research , and many others. In some disciplines, such as drug testing, blind experiments are considered essential हा विकी दुवा. http://www.wikipedia.org/wiki/Blind_experiment

जगात कोणतीच थिअरी परिपूर्ण नाही. अ‍ॅलोपथी (याचा उल्लेख मॉडर्न मेडिसिन असा करावा हेच योग्य) त्यातल्यात्यात प्रमाणित, डॉक्युमेंटेड आणि शिस्तबद्ध आहे. (उदा. अमुक औषधातील अमुक द्रव्याने हा वाईट परिणाम होऊ शकतो, इव्हन काही जणांना टॉलरेट न झाल्यास मृत्यूही येऊ शकतो हे सोबतच्या पत्रकातही स्वच्छ आणि प्रामाणिकपणे लिहीलेलं असतं.) इथे लपवाछपवी नाही. अचाट दावे नाहीत. कोणत्याही रोगावर हमखास इलाजाची ग्यारंटी नाही. अमुक एका डॉक्टरांच्या "हाताला" जास्त "गुण" येतो अशातला प्रकार नाही. अमुक औषध, मग ते त्या क्वांटिटीत कोणीही दिलं तरी परिणाम सारखाच. मात्र मुळात योग्य डायग्नोसिस करण्यातलं ज्ञान मात्र अ‍ॅलोपथीतही डॉक्टरसापेक्ष राहणारच. आयुर्वेदातलं प्रत्येक औषध अक्सीर नसेलही, पण काहीना काही द्रव्य शरीरात जातंय तोपर्यंत परिणामांची अपेक्षा आणि चर्चा करण्यासाठी वाव राहतोच. आयुर्वेद हे निश्चितच मॉडर्न सायन्स नव्हे, पण ती क्वॅकरीदेखील नव्हे. त्याला एक "पोटेन्शियल शास्त्र" म्हणून बघायलाच हवं. होमिओपथीमधे औषधाचा अंशच शरीरात जात नसल्याने चर्चाच खुंटते, आणि "अ‍ॅट बेस्ट प्लासेबो अँड अ‍ॅट वर्स्ट क्वॅकरी" असं होमिओपथीचं वर्णन करावं लागतं. होमिओपथीत नुसत्याच पर्सनल स्टोरीज असतात. दिलेल्या औषधात मुळात औषधाचा एक तरी रेणू डिटेक्ट करुन दाखवा म्हटलं की तिथेच अडतं सगळं.. परत टंकावे लागू नये म्हणून तपशील इथे पहा आयुर्वेदाची थिअरी मुळातूनच वेगळी आहे. ती खरी मानली तर अन्य पथी चुकीच्या मानाव्या लागतील.. आयुर्वेदात काटेकोर परीक्षण आणि तत्सम कसोट्यांवर किती सिद्धता झाल्या आहेत हे माहीत नसलं तरी त्यामधे "औषधी द्रव्य थेट नैसर्गिक स्वरुपात/अर्काच्या रुपात रुग्णाच्या शरीरात जाणं" ही घटना घडते आहे. त्याचा परिणामही अनेक केसेसमधे दिसतो. त्यातल्या काही औषधींचं विश्लेषण करुन त्यातला मूळ घटक आणि त्याचा रोगावर होणारा परिणाम यातला कार्यकारणभाव सिद्ध झालेला आहे. आयुर्वेद आणि अन्य सर्व बाजूला ठेवून केवळ एक थॉट एक्स्पिरिमेंट करता येईल: समजा अश्मयुगीन काळात कोणाचा पाय मुरगळला, तर त्यावर गारपिटीत हाती लागलेला बर्फ टेकवला की तात्पुरती का होईना वेदनामुक्ती मिळते असा अनुभव घेऊन बर्फ हे वेदनेवर "औषध" म्हणून वापरलं गेलं असेल. याचं स्पष्टीकरण म्हणून बर्फाची प्रवृती शांत असते आणि वेदनेची प्रवृत्ती तीव्र असते, त्या एकमेकींना रोखतात असं काही लिहीलं गेलं असेल. (हे फक्त उदाहरण आहे) नंतर प्रगती झाली तेव्हा त्या बर्फाने तापमान कमी होऊन त्या वेदनाग्रस्त भागातल्या रक्तपुरवठ्यावर किंवा अदरवाईज घटकांवर काय परिणाम होतो आणि त्यामुळे वेदनेची जाणीव कशी कमी होते याचा उलगडा झाला. त्याउपर जाऊन त्या पेशींवर तसाच परिणाम बर्फाशिवाय करता येईल असं रसायन शोधलं गेलं. प्रयोग करुन वजनानुसार नेमका डोस ठरवला गेला.. या सर्व पार्श्वभूमीवर, हजारो वर्षांनी आजही बर्फ लावला की वेदना कमी होतेच..त्यामुळे आजरोजी केवळ अश्मयुगीन "कारणमीमांसा" बाद करा, "तीव्र" "शांत" हे कसले शास्त्र असं म्हणून बर्फाचा उपयोग अतएव औषधत्वच बाद करा असं नव्हे.. जिथे त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात तिथे पुन्हा एकदा नव्या कसोटीवर चाचण्या हव्यात (उदा. संपूर्ण शरीर बर्फात बुडवणे अशी पोटेन्शियली प्राणघातक चिकित्सा असेल तर नवीन पद्धतीने चाचण्या घेऊन रिस्क बेनिफिट पाहिला पाहिजे) ओव्याचा अर्क खाऊन पोटदुखी थांबते आणि दुष्परिणाम होत नाहीत हा अनुभव सामान्यजनांना अनेकदा येऊन गेलेला असताना त्याची चाचणी केली नाही तरी ठीक असं वाटू शकेल, पण अशा वेळी ओव्यापासून अधिक प्रमाणित औषध बनवायचं असेल किंवा मूळ रेणू शोधायचा असेल तर संशोधन करता येईल.. शिवाय आयुर्वेदाला चाचण्यांची भीती किंव वावडं आहे असाही भाग नाही. उत्तम संशोधन आणि काटेकोर चाचण्यांना तोंड द्यायला नवीन आयुर्वेद तज्ञ तयार आहेत आणि तसं संशोधन होतंही आहे. मूळ तत्वांमधली काही आता कालबाह्य किंवा चुकीची ठरली तर ते मान्य करुन स्वतःला मूळ आणि होलिस्टिक अशा वैद्यकीय प्रवाहासोबत ठेवण्याचा प्रांजळपणा आयुर्वेदिक तज्ञ दाखवतील अशी मनापासून अपेक्षा आणि इच्छा आहे.

समजा अश्मयुगीन काळात कोणाचा पाय मुरगळला, तर त्यावर गारपिटीत हाती लागलेला बर्फ टेकवला की तात्पुरती का होईना वेदनामुक्ती मिळते असा अनुभव घेऊन बर्फ हे वेदनेवर "औषध" म्हणून वापरलं गेलं असेल. याचं स्पष्टीकरण म्हणून बर्फाची प्रवृती शांत असते आणि वेदनेची प्रवृत्ती तीव्र असते, त्या एकमेकींना रोखतात असं काही लिहीलं गेलं असेल. (हे फक्त उदाहरण आहे)
अगदी खरंय.
त्याला एक "पोटेन्शियल शास्त्र" म्हणून बघायलाच हवं.
हे पटलं नाही. आयुर्वेद बकवास आहे असं नाही पण ते शास्त्रसुद्धा नाही. जो पर्यंत मायक्रोलेवलला जाउन कारणमिमांसा होत नाही तोपर्यंत ते भरवश्याचं म्हणता येत नाही. हजार वर्षांआधी अनुभवावरून काही ठोकताळे काढले इतकच ते आता तेव्हडेच अ‍ॅप्लिकेबल होत असतीलच कशावरून? शास्त्र कशाला म्हणावं याचं पुस्तकी उत्तर मला माहीत नाही. पण त्याच्या उपयुक्ततेसाठी त्यातल्या मूळ नियमांचं 'सिंथसीस' करता यायला पाहिजे. म्हणूनच तर इतर शास्त्र प्रगत होत आहेत. शतकानुशतके आयुर्वेद तिथेच आहे. कारण ते शास्त्र नाहिये. आयुर्वेदातल्या औषधांचा फायदा म्वाडर्न मेडीसीन मधूनही समजाउन घेता येतोच. त्याचा फक्त फायदा असा की त्यातल्या औषधासाठी लागणारी घटकं घरगुती आहेत.

In reply to by दादा कोंडके

"पोटेन्शियल शास्त्र" म्हणजे सध्या ऑलरेडी "शास्त्र"च असं नव्हे दादा.. पोटेन्शियल शास्त्र म्हणजे (पुढे कधीतरी) शास्त्र बनण्याची (कदाचित) क्षमता असलेली पद्धती... व्यक्तिगत निरीक्षणावरुन तरी प्रांजळपणा /शिस्त / पुरोगामित्व कमी पडतं बहुधा अशा प्रगतीसाठी. एक बीएएमएसच्या अभ्यासक्रमातलं पुस्तक मागे वाचण्यात आलं. बाकी तपशील आठवत नाही पण एका विभागात रुग्णाला रक्त देण्यासाठी रक्त प्यावे (पाजावे) असा उल्लेख आहे. शिवाय अमुक देताना पूर्वेकडे तोंड करावे (कारण पूर्वेकडे देव असतात असे अमुकने म्हटले आहे) -- कंसही पुस्तकातलाच.. त्यामधे पुढे जणू फूटनोट, किंवा जाताजाता टिपणी असावी तसा उल्लेख होता की "हल्ली सुईवाटेही रक्त देतात".. हा प्रॉब्लेम आयुर्वेदाच्या प्रगतीत धोंडा होऊ शकतो.. अरे सुईनेच रक्त द्यायला पाहिजे हे निर्विवाद मान्य झालंय.. रक्त प्यायलात तर ते पचेल आणि अन्य काही घटक मिळतील पण रक्त देण्याचा तातडीचा उद्देश सफल व्हायचा तर सुईनेच दिलं पाहिजे.. "प्यावे" हे परंपरागत असलं तरी आता ते खोडा.. किंवा सुईने द्यावे हे वर मुख्य जागी लिहून पूर्वी पीत असत असं जाताजाता लिहा... पूर्वेकडे तोंड करुन अमुक औषध द्यावे हे काढून टाका जर त्यात दम नाही हे सिद्ध झालं तर.. पोथीनिष्ठता हा आयुर्वेदालाच नव्हे इतरही बर्‍याच गोष्टींना महाशाप आहे...तसे तर पृथ्वी सपाट आहे असं समजणाराही पंथ आजरोजी शिल्लक आहे, आणि ते पृथ्वीच्या टोकावरुन खाली न कोसळता जगू शकतातच... :)

In reply to by गवि

गवि.. तोडलंत.. !! माझ्या मनातला प्रतिसाद इतक्या चांगल्या स्वरूपांत मांडलेला इथे वाचून आनंद झाला.. त्यामुळे अगदी शब्दा-शब्दाशी सहमत.. गेल्या दोन प्रतिसादांमध्ये थोडक्यात या प्रश्नाचं बरंचस उत्तर आहे असं म्हणता येईल.
"पोटेन्शियल शास्त्र म्हणजे (पुढे कधीतरी) शास्त्र बनण्याची (कदाचित) क्षमता असलेली पद्धती..."
हे अगदी अचूक!

In reply to by गवि

"पोटेन्शियल शास्त्र" म्हणजे सध्या ऑलरेडी "शास्त्र"च असं नव्हे दादा.. पोटेन्शियल शास्त्र म्हणजे (पुढे कधीतरी) शास्त्र बनण्याची (कदाचित) क्षमता असलेली पद्धती...
हे कळलं हो, पण पोटेंशिअल तरी का? काही थंब रुल्स सांगितले आहेत बस्स. आणि म्वाडर्न सायन्स आणि आयुर्वेद काही समांतर वैदक शास्त्र नाहियेत. जी हमखास औषधं (हळद वगैरे) म्हणून आयुर्वेदात सांगितलेले आहेत ती (काही) म्वाडर्न सायन्सच्या कसोटीवर खरी उतरतातच. कारण त्यात अ‍ॅलोपॅथीच्या औढधांचे गुणधर्म सापडतात. पण आयुर्वेद त्याची कारण देत नाही. (आणि उद्या जाउन आणखी इतर औषध जरी खरी उतरली तरी त्याला शास्त्र का म्हणावं?) कारण ती फक्त "अ‍ॅड हॉक" पधतीचे उपचार सुचवतात. (त्यामुळे तुलना करायचीच असेल तर त्या काळात असणारे इतर मागास समाजातल्या वैद्यकलेशी करावी ज्यांनी असे वेगवेगळे प्रयोग करून बघितले नाहीत, आणि त्याची नोंद केली नाही.) त्याची ओढून ताणून अ‍ॅलोपॅथीची तुलना का करायची? आणि त्याकाळी ते पुढारलेलं शास्त्र होतं आणि कलौघात ते नष्ट झालं असं ही नव्हे. कारण अगदी काही शतकं आधी (आत्ता वाटणार्‍या) साध्या साध्या रोगांनी राजेलोक दगावल्याचा इतिहास आहे. आणि फक्त वैदक शास्त्रच पुढारलेलं असू शकत नाही त्यामगे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रसायनशास्त्रापासून इलेक्ट्रोनिक्सपर्यंत प्रगत हवं. असो.

In reply to by दादा कोंडके

गवि ह्यांची एखादा विषय सुलभरीत्या कोणाच्याही गळी उतरविण्याची हातोटी मला भयंकर आवडते. त्याच्या प्रतिसादावर शक्यतो प्रतिवाद झालेला पहिला मिळाला नाही आहे. ह्यामुळे पॉपकॉर्न घेऊन बसलेल्याची निराशा होते.

In reply to by गवि

एक बीएएमएसच्या अभ्यासक्रमातलं पुस्तक मागे वाचण्यात आलं. बाकी तपशील आठवत नाही पण एका विभागात रुग्णाला रक्त देण्यासाठी रक्त प्यावे (पाजावे) असा उल्लेख आहे. शिवाय अमुक देताना पूर्वेकडे तोंड करावे (कारण पूर्वेकडे देव असतात असे अमुकने म्हटले आहे) -- कंसही पुस्तकातलाच.. त्यामधे पुढे जणू फूटनोट, किंवा जाताजाता टिपणी असावी तसा उल्लेख होता की "हल्ली सुईवाटेही रक्त देतात"..
कोणतं हो पुस्तक ? काही नाव गाव? तसे आमचे अनेक आयुर्वेदिक डागतर ओळखीचे आहेत.. नीट अभ्यास केला नसावा त्यांनी... सूईनेच रक्त देतात.

आयुर्वेद हे शास्त्रच असावे असे वाटते. पण त्याच्या काही मर्यादा आहेत. आयुर्वेदिक औषधांचा गुण येण्यासाठी बराचा कालावधी जावा लागतो. तसेच त्याची पथ्ये आणि इतर नियमही व्यवस्थित सांभाळले तरच गुण येतो. माझ्या माहितीतले एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते बर्‍याच वेळा त्यांच्या पेशंटस ना अ‍ॅलोपॅथिक औषधे घेण्यास सूचवतात. त्यामुळे असे वाटते कि आयुर्वेद हे शास्त्र असले तरी ते परिपूर्ण नाही. तसेच आयुर्वेदिक औषधांचे गुणकारित्व आनुभवांवरून मान्य करण्यात आलेले असले तरी त्याच्या अधिकारिक चाचण्या घेतल्या जातात का ?

In reply to by मनीषा

माझ्या माहितीतले एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते बर्‍याच वेळा त्यांच्या पेशंटस ना अ‍ॅलोपॅथिक औषधे घेण्यास सूचवतात.
अहो... तुमचे डॉक्टर वेगळ्या उद्देशाने तसं करत असतील पण हे फार फार सामान्यपणे होत असतं.. एम्बीबीएसला अ‍ॅडमिशन मिळाली नाही म्हणून बीएएमएस हे इतकं कॉमन आहे की सांगता सोय नाही. प्रासभाऊसारखे आवर्जून आयुर्वेदात प्रावीण्य मिळवून आयुर्वेदिक ट्रीटमेंटच देऊन त्यात संशोधनही करणारे आयुर्वेदनिष्ठ वैद्य खूप कमी आहेत. हेच तर वाईट आहे..

In reply to by गवि

प्रासभाऊसारखे आवर्जून आयुर्वेदात प्रावीण्य मिळवून आयुर्वेदिक ट्रीटमेंटच देऊन त्यात संशोधनही करणारे आयुर्वेदनिष्ठ वैद्य खूप कमी आहेत. हेच तर वाईट आहे..
आमचा एक वायझेड मित्र तर फक्त "प्युअर होमिओपथी" चा बोर्ड लावून बसला आहे. त्याच्या सुदैवाने सध्या होमिओपथीला चांगले दिवस आल्याने त्याचं बरं चाललंय. :)

बटाटेवडे तळताना मायलार्ड रिऍक्शन होऊन वड्यांचा रंग सोनेरी होतो. यामध्ये विज्ञान आहे. तितपत विज्ञान आयुर्वेदातही आहे. आयुर्वेदातील तत्त्वे आणि औषधे यांच्या मर्यादित वातावरणात झालेल्या चाचण्या पुरेशा समाधानकारक नाहीत. आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट्स नाहीत, किंवा आयुर्वेदिक उपचार 'उलटत' नाहीत हे खोटे आहे. आयुर्वेदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. आपल्या पारंपरिक ज्ञानाचा तो ठेवा आहे. प्राथमिक उपचारापुरते त्याचे स्थान निर्विवाद आहे. मला सर्दी खोकला वगैरे झाला तर मी डॉक्टरकडे जाण्यापूर्वी गवती चहा किंवा सुंठ वगैरे वापरण्याला प्राधान्य देतो. कारण मला ते सोयीचे वाटते. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्राशी त्याची तुलना आणि बरोबरी करणे चुकीचे आहे. ज्याला कोणाला आयुर्वेदावर संशोधन करायचे असेल त्याने करुन ते अगदी रॉकेट सायन्स आहे असे सिद्थ केले तरी जोपर्यंत ते आधुनिक विज्ञान असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत आयुर्वेदाची स्थिती ही पारंपरिक ज्ञान इतकीच राहते.