Skip to main content

आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?

लेखक ग्रेटथिन्कर यांनी गुरुवार, 07/02/2013 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
आयुर्वेद हि भारतीयांनी जगाला दिलेली देणगी आहे असे म्हणतात. आयुर्वेदात अनेक औषधी काढे ,आसवं यांचा वापर केला जातो. आयुर्वेदात वात, कफ, पित्त अश्या तीन प्रकृत्ती मानल्या गेल्या आहेत, त्याद्वारे निदान करण्याची पद्धत आहे. प्रश्न असा आहे कि वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का? double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय? असल्यास त्याची माहिती कुठे मिळेल. एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?

वाचने 76254
प्रतिक्रिया 196

प्रतिक्रिया

मला वैयक्तिक अनुभव आहे. अ‍ॅलर्जी साठी. अ‍ॅलोपॅथी च्या डॉक्टरांनीच सांगितले की alternative try करा. केला. अ‍ॅलर्जी गायब.

आयुर्वेद ही विज्ञानाची शाखा नक्कीचं आहे.
double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय? असल्यास त्याची माहिती कुठे मिळेल.
वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का?
पद्धत वेगळी असु शकेल पण प्रक्रुतीचा विचार करुनचं सर्व पॅथींचे डॉक्टर औषध देतात हे खरं. -- अतिशय शुद्ध स्वरुपातील आयुर्वेदीक रसायने कशी तयार करायची ह्याची माहीती तुम्हाला आयुर्वेद चरकसंहीता ह्या ग्रन्थात मिळेत. सोप्या भाषेत ही माहीती वाचायची असल्यास डॉ. बालाजी तांबे ह्यांची पुस्तकं वाचा. (पुस्तकाची नावं समजली तर इथे पोस्ट करीनचं).

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पद्धत वेगळी असु शकेल पण प्रक्रुतीचा विचार करुनचं सर्व पॅथींचे डॉक्टर औषध देतात हे खरं
double blind clinical trials काय आहेत ते तुम्हाला माहिती नाहिये. आधी माहीति काढा मग लिहा.

In reply to by अनुराधा१९८०

मला double blind clinical trials काय आहे हे अजिबातच माहीत नाही. गरीब बिच्चारा निरुपद्रवी ईंजीनिअर आहे हो मी...डागदर, वैद्द्य ह्यांच्याशी फारसा संबध नाही येत...पण ते प्रक्रुतिचा विचार करुन मगच औषध देतात हे मात्र खरं. :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

'Topics in the History of pharamacology' या पोपट एन. पाटील यांनी संपादित केलेल्या बी.एन शहा प्रकाशनाच्या पुस्तकात आयुर्वेदातील औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्सबाबत सविस्तर चर्चा आहे. डॉ. पोपट एन. पाटील हे ओहयो स्टेट युनिव्हर्सिटीत फारमाकोलोजीचे 'प्रोफेसर' आहेत. या पुस्तकातील 'हिस्टरी ऑफ फार्माकोलॉजी ऑफ मेडिसिनल प्लांट्स इन इंडिया' या जी.व्ही.सत्यवती यांनी लिहिलेल्या लेखात आयुर्वेदिक औषधी वनस्पतींवर आधारित औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स का यशस्वी झालेल्या नाहीत आणि त्या यशस्वी होण्यासठी काय केले पाहिजे याबबत सखोल चर्चा केलेली आहे. त्यामुळे डबल-ब्लाईंड ट्रायल्स, प्लासिबो कंपॅरिझन, टॉक्सिकॉलॉजी या ट्रायल्स आयुर्वेदिक औषधांवर होतच नाहीत हा समज चुकीचा आहे. सत्यवती या आय.सी.एम. आर.च्या (Indian Council of Medical Research) माजी डायरेक्टर जनरल आहेत. त्यांनी दिलेल्या लेखातील माहितीनुसार अशा ट्रायल्स भारतात अनेक ठिकाणी सुरू होत्या आणि आहेत. ICMR चित्राच्या खराब प्रतीबद्दल क्षमस्व! या पुस्तकाच्या वाचनाने भारतीय उपचारपद्धतींबद्दल असलेले समज-गैरसमज तपासून पाहता येतील. तसेच या दुव्यावरही याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.

बोलू की नको बोलू की नको :( जाऊ देत बोलतेच. शतावरी - लॅक्टेशनकरता अफलातून म्हणजे अतिशय रामबाण उपाय आहे. स्वानुभव!

In reply to by शुचि

लैंगिक शिक्षणाचे व्यावहारीक महत्त्व सारख्या विषयावर लोकांना लिहिते करणार्‍या व्यक्तीचीसुद्धा "बोलू की नको" अशी द्विधा अवस्था व्हावी आणि "लिहिलं एकदाचं" अशा भावनेने लिहिताना अवघडलेपण टाळण्यासाठी इंग्रजी शब्दाचा आधार घ्यावा ना... लोका सांगे... ;)

In reply to by धन्या

लैंगिक शिक्षणाचे व्यावहारीक महत्त्व सारख्या विषयावर लोकांना लिहिते करणार्‍या व्यक्तीचीसुद्धा
तुम्ही स्वतःला शिनिअर मेंबर म्हणवून घेता आणि..... असो. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गांधीवादी खरेच वाचा-कृती-विचार-आचारामध्ये अहींसा वापरतात का? ... मग गांधीजी बरोबर का ते ठरवू म्हणण्यासारखे झाले! ;) अहो, भोंदू लोकं सगळीकडे असतात. त्यामुळे त्यांच्या फसवण्यावरून आयुर्वेद शास्त्र आहे का नाही हे ठरवणे योग्य ठरणार नाही असे वाटते. असो.

जाउ द्या हो ! ज्ञानशाखा असली काय अन नसली काय ! रोग बरा होतो ना? बास ! अ‍ॅलोपॅथी असो की आयुर्वेद की होमिओपॅथी की युनानी.. रोग्याला आराम मिळणे महत्वाचे... असो. आयुर्वेद भारतीय पद्धती असल्याने अनेक जण निदान आंतरजालावर तिच्याकडे तुच्छतेने पहातात हे मात्र आढळले आहे...प्रत्यक्षात त्यातील काही औषधांचा वापर करतात की नाही ते माहित नाही. ;)

In reply to by नाना चेंगट

लोक कुठे काय प्रश्न विचारतील याचा नेम नाही. :) आता आयुर्वेद ही वैज्ञानिक ज्ञानशाखा आहे की नाही हे वेगवेगळ्या क्षेत्रातील नेटकर कसे काय सांगतील? काही जाणकार विज्ञान कशाला म्हणावे यावर प्रकाशझोत नक्की टाकतील. परंतू ते विज्ञानाचे निकष आयुर्वेदाला (शरीरविज्ञान विचारात घेऊन) लावताना कुठल्या बाबींचा विचार करावा लागेल हे सांगणं त्यांना शक्य असेलच असे नाही. माझ्या माहितीनुसार प्रास ही एकच मिपाकर व्यक्ती या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकते. बिपिनदा म्हणतोय तसं, विषय "आयुर्वेदाने रोग बरे होतात का?" असा असायला हवा होता.

पुण्यात ६५ च्या सालात लागवणकर व सरदेशमुख हे प्रख्यात व निष्णात वैद्य होते. नाडी परीक्षा करून ते औषधे देत असत.. सरदेशमुख तर नुसती नाडी परीक्षा करून काय जेवलात ते सांगत असत. कुठल्या वैद्न्यानिक कसोट्या लावता आपण ते समजले तर त्या वर लिहिता येईल.

In reply to by अविनाशकुलकर्णी

सरदेशमुख तर नुसती नाडी परीक्षा करून काय जेवलात ते सांगत असत.
जेवणाचं काय घेऊन बसला आहात, नाडी परीक्षा करुन अगदी भूत, भविष्य आणि वर्तमानही सांगता येतं.

In reply to by अविनाशकुलकर्णी

सरदेशमुख तर नुसती नाडी परीक्षा करून काय जेवलात ते सांगत असत.
काय सांगता? अगदी पोळी की चपाती हे देखील?

माझा तर आयुर्वेदावर विश्वास आहे बुवा! आता बीएएमएस अभ्यासक्रम केलेल्यांना डॉक्टर म्हणायचं की नाही या वादात मी पडणार नाही.

आयुर्वेद हे अधुनिक विज्ञान नाही, पण ते वैज्ञानिक ज्ञानशाखा आहे. त्याच्यावर भारतातील सरकारी संस्थांपासून खाजगी संस्था तर संशोधन करत आहेतच पण तसेच जगात इतरत्र देखील अधुनिक विज्ञानासाठी प्रसिद्ध असलेली विद्यापिठे तसेच अमेरीकेतील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ पण काम करत आहेत. डॉ. अशोक वैद्य, मला वाटते ते अमेरीकेतील येल विद्यापिठात डॉक्टर (अधुनिक विज्ञानानुसार) होते, नंतर आडनावाला साजेसे शिक्षण देखील केले आणि आयुर्वेदाच्या आधारे जे आयुर्वेदीक वैद्य अथवा आजीबाईच्या बटव्यातून उपचार केले जातात त्यावरून त्यांनी Reverse pharmacology चा प्रकार विकसीत केला आणि अधुनिक विज्ञानाशी ताळमेळ घालणारी औषधे तयार केली. विकीवर सापडलेल्या एका माहितीप्रमाणे: It is asserted that Ayurveda knowledge allows drug researchers to start from time-tested and safe botanical material. The best example of bioprospecting using traditional knowledge is reserpine, the anti-hypertensive alkaloid from R. serpentina, which became available as a result of work carried out by CIBA in India in close collaboration with Ayurveda experts. The normal drug discovery course of ‘laboratory to clinics’ in this case actually becomes from ‘clinics to laboratories’.[8][12][13] असे अजून बरेच काम चाललेले त्या क्षेत्रातील भारतीय आणि अमेरीकन तज्ञांकडून प्रत्यक्ष ऐकलेले आहे. त्यामुळे आयुर्वेद सायन्स नाही म्हणत दुर्लक्ष केल्यास मॅक्समुल्लरने वेदांसंदर्भात काय म्हणले हे शिकत आपल्या वेदांचा अर्थ लावण्यासारखे होईल... असो.

एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?
नक्कीच... एकटी सर्जरी ही शाखा घेतली तर सुश्रुताने इसवीसना च्या ८०० वर्षापुर्वी न्युरो, रेटीना, हार्ट अशा आजही जटील समजल्या जाणार्या शस्त्रक्रिया नुसत्या यशस्वीपने पार पाडल्या नाहीत तर अतिशय शात्रोक्तरित्या त्याच्या संहिता ही लिहुन ठेवल्या आहेत.. कॉसमॅटीक आणि प्लॅस्टीक सर्जरीसारख्या करामती ही त्याने आधीच करुन ठेवल्यात.. अनेक अमेरिकन, युरोपिअन, अरेबिक फिजिसिअन्स या सगळ्या संहिता भारतात येऊन अभ्यासुन गेले आ णि स्वतःच्या भाषेत त्या अनुवादीत ही करुन घेउन गेले.. जगाने सुश्रुताला सर्जरीचा पितामह मानलंय..

In reply to by आनन्दिता

अरेच्चा. ही नवीच माहिती आहे. सुश्रुताने अतिशय शास्त्रोक्तरीत्या लिहूनही त्या शस्त्रक्रिया आजही जटील का समजल्या जातात?

In reply to by आनन्दिता

कॉसमॅटीक आणि प्लॅस्टीक सर्जरीसारख्या करामती ही त्याने आधीच करुन ठेवल्यात..
(त्या वेळच्या) प्लास्टीक सर्जरीचा आयुर्वेदाशी संबंध नसावा असे वाटते. सर्जरी आणि आयुर्वेद या दोन गोष्टींचा परस्परसंबंध नजरेसमोर आणणे जमत नाहीये. तुम्ही समजावून सांगता का?

In reply to by धन्या

सर्जरी आणि आयुर्वेद या दोन गोष्टींचा परस्परसंबंध नजरेसमोर आणणे जमत नाहीये
आयुर्वेद म्हणजे फक्त चिकित्सा आणि औषधोपचार इतकंच नाही.. आयुर्वेदाचं क्षेत्र खुप मोठं आहे.. या शास्त्राचे आठ भाग पडतात ज्याला 'अष्टांग'चिकित्सा संबोधलं जातं, शल्य चिकित्सा म्हणजेच शस्त्रक्रियेचं शास्त्र हे याच अष्टांगा पैकी एक आहे. उरलेले प्रभाग खालील प्रमाणे.. १) काय चिकित्सा ( म्हणजे आजची dermatology) २)कौमारभृत्य ( म्हणजे आजचं paediatrics) ३)भूत विद्या (treatment of mental diseases supposed to be produced by demoniacal influence) म्हणजे (demonology / exorcism/psychiatry) ४) शालाक्य :- यात डोळे आणि कान यांच्या रोगावरील उपचार येतात. म्हणजे (ophthalmology) ५)अगदतंत्र :- हे आहे विष शास्त्र.म्हणजे (toxicology) ६) रसायन :- म्हणजे (elixirs) ७) बाजीकरण :-म्हणजे (aphrodisiacs) इतकंच नाही माझ्या वाचनात तर हे ही आलय.. The medical works of both Sushruta and Charaka were also translated into the Arabic language during the 8th century. The 9th-century Persian physician Rhazes was familiar with the text. The Arabic works derived from the Gupta era Indian texts eventually also reached a European audience by the end of the medieval period.[28] In Renaissance Italy, the Branca family of Sicily and Gaspare Tagliacozzi (Bologna) are known to have been influenced by the Arabic reception of the surgical techniques of Sushruta. British physicians traveled to India to see rhinoplasty being performed by native methods.Reports on Indian rhinoplasty were published in the Gentleman's Magazine in 1794.Joseph Constantine Carpue spent 20 years in India studying local plastic surgery methods.Carpue was able to perform the first major surgery in the western world in 1815.Instruments described in the Sushruta Samhita were further modified in the Western World.Joseph Constantine Carpue based on this article was able to perform the "Indian" method of nose reconstruction and publish it in 1815. यातली rhinoplasty म्हणजे एक प्रकारची प्लॅस्टिक सर्जरी आहे.

In reply to by आनन्दिता

सुश्रुताने मोतीबिंदूच्या ऑपरेशनची पहिली नोंद मानवी इतिहास केली आहे. त्याने त्याची रीत आणि काळजी घेण्याची पद्धतीही नोंदवली आहे. त्यानेच प्लास्टीक सर्जरीचे वर्णन लिखित स्वरूपात ठेवले आहे. हे पाहा -१. http://en.wikipedia.org/wiki/Plastic_surgery २. http://en.wikipedia.org/wiki/Sushruta#Sushruta

In reply to by निनाद

सुश्रुताने सांगितलेल्या पद्धतीस काऊचिंग असे म्हणतात. आजही भारतात काही ठिकाणी वैदू ही पद्धत वापरतात. या पासून आज केल्या जाणार्‍या फेको विथ टॉरिक मल्टीफोकल लेन्स सर्जरीज मधे मोहेंजोदारोची बैलगाडी अन कोलंबिया स्पेसक्राफ्ट इतका फरक आहे. पण, मोतिबिंदू म्हणजे डोळ्यातील एक भाग (ते नेत्रभिंग आहे हा विचार नव्हता) अपारदर्शी होणे, व तो दूर केल्यास पुन्हा दिसू लागते, हा सैद्धांतिक विचार करून, तो अपारदर्शी भाग हटविण्यासाठी त्या काळात उपलब्ध असलेले विज्ञान वापरून यशस्वी सर्जिकल प्रोसिजर आखणे, तिच्यासाठी हत्यारे तयार करणे, व सर्जरी यशस्वी करणे, यासाठी सुश्रुत हा अत्यंत ग्रेट व आदरणीय ठरतो. अन त्याच वेळी, Even though Sushruta discovered the reason of blindness in cataract, envisioined and implimented the surgery, it does NOT make 'Ayurveda' a 'live science' today. Not even science. त्या काळी वर्णन केलेली एकही सर्जिकल प्रोसिजर आज वापरीत नाहीत. र्‍हायनोप्लास्टीचे ही तेच आहे. नाक कापण्याची शिक्षा झालेल्या लोकांना कपाळावरील चामडितून नाकासारखी नळी तयार करणे असे ते ऑपरेशन होते. पेडिकल ग्राफ्ट नामक प्लॅस्टिक सर्जरीच्या प्रिन्सिपलचा आद्य अवतार. असो.

In reply to by आनन्दिता

गोची आहे :) खुश्शाल भूतविद्या अ‍ॅड करीत आहात आयुर्वेदात!! बापरे! शल्य-शालक्य. सुश्रुताचे कौतिक लिवताना शल्य विसरलात तुम्ही.

In reply to by आनंदी गोपाळ

शल्य-शालक्य. सुश्रुताचे कौतिक लिवताना शल्य विसरलात तुम्ही.
शल्य हे कोणा व्यक्तीचे नाव आहे असा तुम्ही समज करुन घेतला आहात ही आमच्या अभ्यासाची गोची कशी काय बुवा.. सुश्रुताने शस्त्रक्रियेचे जे शास्त्र विकसित केले त्याला "शल्यचिकीत्सा" असं संबोधलं जातं.
खुश्शाल भूतविद्या अ‍ॅड करीत आहात आयुर्वेदात!! बापरे!
बापरे काय त्यात?. आहेच भूतविद्या आयुर्वेदाचा भाग.. पण ही ती भुतविद्या नाहीये जी तुम्ही समजताय( भुताखेतांची)...आयुर्वेदाच्या "अष्टांग चिकित्सा' मधल्या मानसशास्त्राशी संबंधीत शास्त्राला भुतविद्या म्हणतात. http://www.lifepositive.com/body/ayurveda/ayurvedic-studies.asp http://en.wikipedia.org/wiki/Ayurveda आता मानसशास्त्राला आपल्या पुर्वजांनी भुतविद्या नाव का दिले हे तुम्ही त्यांना विचारा... :) आनंदी गोपाळ नाव लावणारे तुम्ही आणि आम्हा पामरांच्या अभ्यासावर बोट... छट्ट बुवा!!!

In reply to by आनन्दिता

३)भूत विद्या (treatment of mental diseases supposed to be produced by demoniacal influence) म्हणजे (demonology / exorcism/psychiatry)
येथे इंग्रजी डिक्शनरी पहावयास मिळेल : www.dictionary.com

In reply to by आनंदी गोपाळ

ठँकू... आमच्या विंग्रजी ची काळजी केल्याबद्दल.... पण वर दिलेली भुतविद्येची व्याख्या मी माझ्या घरात बसुन लिहिली नाहीये.. आयुर्वेदाच्या सर्व संदर्भग्रंथांमधे भुतविद्येची हिच व्याख्या आढळते.. त्यासाठी तुम्ही न वाचताच कै च्या कै प्रतिसाद देणार हे माहीत असुनही मी वर लिंका दिल्या होत्या. पण असो...

In reply to by आनन्दिता

शल्य कर्म = सर्जरी.धन्यवाद!
तुम्हाला या शल्याचा नक्की प्रोब्लेम काय आहे हे कळतच नाहीये. आय मीन तुम्हाला काय सांगायचय हे कळतच नाहीये. तुमचे प्रतिसाद कळण्यासाठी एखादी डिक्शनरीची लिंक मिळु शकेल काय???. =))

In reply to by आनन्दिता

तुम्ही सेन्सिबल आहात असा चुकीचा गैरसमज झाला होता. घरी बसून व्याख्या तयार करता येऊ शकतात अशी तुमची समजूत असेल तर तुम्हाला डिक्शनरी उपयोगी नाही. आमची शिकवणी लावून तर अजिब्बात उपयोग नाही. कुणी नर्सरी/प्लेग्रूप टीचर जवळपास असतील तर तिकडे चौकशी करून पहा. यापेक्षा जास्त खडुसपणे लिहिता येते. पण त्यामुळे तुम्हाला मिरगी झाल्यास त्यावर आयुर्वेदात ट्रीटमेंट नाही, उगा ते भूतविद्या वै. करावे लागेल...

In reply to by आनंदी गोपाळ

जे लोक तुम्हाला सेन्सिबल वाटतात त्यांना तुम्ही असेच प्रतिसाद देता काय... कुठलीही व्याख्या घरी करता येत नाही याची पुरेपुर जाणिव मला आहे त्यामुळे मी वरती जे काही लिहिलंय त्याला योग्य ते पुरावे,लिंक्स च्या माध्यमातून दिले आहेत. भूतविद्या हा आयुर्वेदातील अष्टांग चिकित्सांपैकी एक आहे, हे आत्तापर्यंत माझ्या वाचनात आलं असल्यामुळे मी ते माझ्या प्रतिसादात मांडलं आहे आणि त्यासाठी योग्य ते पुरावे पण दिले आहेत. आता तुम्हाला हे भूतविद्या प्रकरण आयुर्वेदात आहे हे मान्य नसेल तर तुम्ही तुमची मतं इथे मांडायला हवी होतीत. मी वर सांगितलेली अष्टांगे तुम्हाला पटली नसतील तर ती नक्की कोणती आहेत हे तुम्ही लिहायला हवं होतंत. माझ्या समजण्यात जर काही दोष असते तर मे बी तुमचे मुद्दे वाचून मला काही नविन माहीती मिळाली असती. पण तुम्ही असं मुद्द्याचं काहीही न बोलता फक्त ,बापरे भूतविद्या अन आयुर्वेदात?.,केलंत.. तुम्हाला हवं तितकं खडुस तुम्ही लिहु शकता माझी त्याला ना नाहीये.. फक्त एकदा आयुर्वेदातल्या अष्टांगा बद्दल तुमचं पर्सेप्शन काय आहे हे एकदा मला कळू द्या.. जमलंच तर ही शल्य शालाक्य काय गोची आहे हे ही लिहा.. म्हणजे मला नक्की आपण भांडतोय कशासाठी आणि तुम्ही माझ्या अभ्यासाची मापं का काढताय हे मला कळेल. माझे प्रश्न तुम्हाला कळ्ले असतील अशी आशा आहे. तरीही एकदा परत विचारते.. १) आयुर्वेदाच्या अष्टांग चिकित्सांचे आठ भाग तुमच्या मतानुसार कोणते? २) शल्य शालाक्य हा घोळ मला खरंच समजला नाहीय. तुम्ही प्रत्येकवेळी दोन शब्दांतच उरकल्यामुळे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय हे समजलंच नाहीये. तळटीपः नवीन काही शिकायला मिळणार असेल तर नर्सरी, प्लेग्रुप च,काय पण फुफाट्यात जायला ही आम्ही तयार आहोत.

नाही. कफ, वात, पित्त आदि विचार वैज्ञानिक कसोट्यांवर टिकणारे नाहीत. ज्यांना आयुर्वेदिक औषधे म्हणतो ती नैसर्गिक रसायनेच असतात (उदा. हळद, वगैरे). त्यांच्या वापराने रोग बरे होतात हे ऍलोपथिच्या औषधांनी रोग बरे होण्यासारखेच आहे. तेवढ्या कसोटीवर आयुर्वेद वैज्ञानिक आहे हे मानता येईल. पोटदुखी, प्राथमिक स्वरुपाचा सर्दी-खोकला इत्यादी गोष्टींवर उपचार करता यावेत. मात्र आयुर्वेदातील विज्ञान हे अतिशय प्राथमिक स्वरुपाचेच असावे असे वाटते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मानसोपचार, इंद्रियांचे पुनर्रोपण वगैरे गोष्टी आयुर्वेदात शक्य नसाव्यात.

In reply to by आजानुकर्ण

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मानसोपचार, इंद्रियांचे पुनर्रोपण वगैरे गोष्टी आयुर्वेदात शक्य नसाव्यात. याचा अर्थ अधुनिक वैद्यकशास्त्रातील जनरल मेडीसिन (फॅमिली डॉक्टर) पध्दती पण वैज्ञानिक शाखा नाही असे म्हणावे लागेल.

In reply to by विकास

मात्र आयुर्वेदातील विज्ञान हे अतिशय प्राथमिक स्वरुपाचेच असावे असे वाटते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मानसोपचार, इंद्रियांचे पुनर्रोपण वगैरे गोष्टी आयुर्वेदात शक्य नसाव्यात.
आयुर्वेदातून उपचार करुन बरे होणारे रोग आणि जनरल मेडिसिनचा वापर करुन बरे होणारे रोग हे सारख्याच क्लिष्टतेचे असतील आणि उपायांची खात्रीही एकसारखी असेल तर माझ्या मते जनरल मेडिसिन व आयुर्वेद हे सारख्याच वैज्ञानिक पातळीवर आहेत. उदा. फ्लूसारख्या अत्यंत कॉमन आजारावर आयुर्वेदात काय उपचार आहे उदाहरण म्हणून घेता येईल. (स्वाईन फ्लूच्या काळात तांब्यांनी अनेक बाटल्या निलगिरीचे तेल विकल्याचे वाचले मात्र किती जणांना फायदा झाला हे कळले नाही.) दुर्दैवाने हळद, लवंग, ज्येष्ठमध, चंदन वगैरे अगदी प्राथमिक उपचार (फर्स्ट एड किंवा प्रथमोपचार स्वरुपाचे) वगळता आयुर्वेदाने काही विशेष उपचार होऊ शकतात असा मला अनुभव आलेला नाही. इतरांना असे अनुभव असतील तर वाचायला आवडेल.

In reply to by आजानुकर्ण

(स्वाईन फ्लूच्या काळात तांब्यांनी अनेक बाटल्या निलगिरीचे तेल विकल्याचे वाचले मात्र किती जणांना फायदा झाला हे कळले नाही.) ह्या संदर्भात माझा हा प्रतिसाद परत लिहीत बसत नाही. असे कुडमुडे अधुनिक विज्ञानात पारंगत झालेले डॉक्टर देखील असतात. मेडीकल मालप्रॅक्टीसचा विदा पाहीला तर सगळे वैद्यकीय सेवा ही विज्ञानाच्या ऐवजी अज्ञान ठरवावी लागेल. त्यामुळे तांब्यांनी स्वाईन फ्लू साठी काय दिले हे आयुर्वेद विज्ञान आहे का ठरवण्यासाठी योग्य नाही. मात्र आयुर्वेदातील विज्ञान हे अतिशय प्राथमिक स्वरुपाचेच असावे असे वाटते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मानसोपचार, इंद्रियांचे पुनर्रोपण वगैरे गोष्टी आयुर्वेदात शक्य नसाव्यात. अमेरीकन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्याप्रमाणे: Ayurvedic medicine, as practiced in India, is one of the oldest systems of medicine in the world. Many Ayurvedic practices predate written records and were handed down by word of mouth. Two ancient books, written in Sanskrit more than 2,000 years ago, are considered the main texts on Ayurvedic medicine—Caraka Samhita and Sushruta Samhita. The texts describe eight branches of Ayurvedic medicine: Internal medicine Surgery Treatment of head and neck disease Gynecology, obstetrics, and pediatrics Toxicology Psychiatry Care of the elderly and rejuvenation Sexual vitality. अमेरीकेत आयुर्वेदीक स्टँडर्ड नाही आहे, पण काही विद्यापिठे सर्‍टीफिकेट्स देतात. अनेक मान्यवर विद्यापिठात आल्टर्नेटीव्ह मेडीसिन म्हणून शिकवला जातो. एन आय एच, सीडीसी, एन एस एफ या संस्था देखील या संदर्भात संशोधन करत आहेत. तुम्ही वरती जे फ्ल्यू संदर्भात एक उदाहरण दिले आहे, तशी अनेक असतात. पण आयुर्वेदासंदर्भात त्याला विज्ञान समजून अभ्यास करणार्‍यांचा एकच आक्षेप प्रामुख्याने पाहीला आहे, तो म्हणजे आत्ताच्या काळात त्यातील काही औषधात वापरले जाणारे heavy metals (basically pollutants) - जे पहील्यापासून आहे का कधी त्यात आले ते माहीत नाही. पण अमेरीकेत साधारणतः ७० आयुर्वेदीक औषधांचे जेंव्हा विश्लेषण केले गेले तेंव्हा त्यातील १४ औषधांमध्ये असे मिळाले, जे toxic धरले जाते. (यातील माहीतीप्रमाणे लेड होते, मी इतरत्र ऐकलेला प्रॉब्लेम हा पार्‍याचा देखील आहे).

In reply to by विकास

मी माझ्या मूळ प्रतिसादात लिहिले होते की आयुर्वेदिक औषधे म्हणून ज्या गोष्टी दिल्या जातात ती नैसर्गिक रसायनेच असतात. ऍलोपथिक औषधांमध्ये असणाऱ्या गोष्टी आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये असणाऱ्या गोष्टी यामध्ये तत्त्वतः फरक नाही. त्यामुळे त्या निकषापुरता आयुर्वेदाला वैज्ञानिक मानायला हरकत नाही. थोडक्यात ज्याला आजीबाईचा बटवा असे म्हणतात तितपत आयुर्वेद मान्य आहेच. डाँक्टरकडे जाण्यापूर्वी अशा घरगुती उपायांनी आजार आटोक्यात येत असेल तर ते आर्थिकदृष्ट्याही फायद्याचेच आहे. ज्यांना अल्टरनेटिव मेडिसिन म्हणतात त्यात ऍक्युप्रेशर, ऍक्युपंचर, होमियोपथी वगैरे प्रकारही येतात असे दिसते. त्यामुळे त्याला 'मेडिसिन' असा शब्द जोडल्याने ते वैज्ञानिक होतेच असे नाही. http://en.wikipedia.org/wiki/Alternative_medicine आयुर्वेदाचा पाया मानल्या जाणाऱ्या कफ-पित्त-वात वगैरे गोष्टींना शास्त्रीय आधार असल्याबाबत अमेरिकेत कुठे संशोधन झाले आहे काय? मी फ्लूचे उदाहरण दिले कारण जनरल मेडिसिनमध्ये फ्लूवर उपचार आहेत. भारतासह जगातील सर्व भागात वारंवार आढळणारा हा रोग प्रतिजैविके किंवा लसींनी आटोक्यात येतो. एक उदाहरण म्हणून आयुर्वेदात यावर उपचार आहेत काय? भारतात बीएएमएस सारखी मेडिसिनची अधिकृत डिग्री मिळते तिथेही घटसर्प, धनुर्वात, कांजण्या, गोवर, डांग्या खोकला वगैरे रोगांवरही आयुर्वेदिक उपचार केले जात नाहीत. बालाजी तांब्यांचे उदाहरण दिले कारण आजघडीला महाराष्ट्रातील कदाचित सर्वाधिक यशस्वी आयुर्वेदिक वैद्य ते असावेत. ते मालप्रॅक्टिस करत आहेत असा दावा मी केलेला नाही. आयुर्वेदिक उपचारांना प्रचंड मर्यादा आहेत. आपल्या पुराणांमध्ये त्याचा उल्लेख केला होता म्हणून आपला इगो सुखावतो याउप्पर क्लिष्ट आजारात या उपचारांचा फायदा नाही. आयुर्वेदाला वैज्ञानिक किंवा अवैज्ञानिक असे कोणतेही लेबल लावले तरी ती स्थिती बदलत नाही.

In reply to by आजानुकर्ण

आयुर्वेदाचा पाया मानल्या जाणाऱ्या कफ-पित्त-वात वगैरे गोष्टींना शास्त्रीय आधार असल्याबाबत अमेरिकेत कुठे संशोधन झाले आहे काय?
मुळात आयुर्वेदाला अमेरिकेने सर्टिफिकेट द्यायची गरज च काय आहे.. आणि अमेरिकेने सर्टिफिकेट दिलं तरच आयुर्वेद विश्वासार्ह ठरतो काय? जगातलं हे सर्वात जुनं वैद्यकियशास्त्र असुन या उपचारपद्धती आपल्या कित्येक पिढ्यांनी शतकानुशतके वापरल्या आहेत.. अजुनही तेवढ्याच विश्वासाने वापरल्या जातील.. बस्स की मग!!

In reply to by आनन्दिता

आयुर्वेदाला कोणी सर्टिफिकेट दिले आहे याबाबतचा मूळ प्रतिसाद वाचा. त्याचा प्रतिवाद म्हणून अमेरिकेत याबाबतही आणखी संशोधन झाले आहे काय एवढेच मी विचारले. कदाचित अमेरिकेतील संशोधनावर मूळ प्रतिसाददात्याचा विश्वास असावा किंवा अमेरिकेव्यतिरिक्त असे संशोधन कुठे झाले नसावे. तुम्ही चुकीचे दार ठोठावले आहे. प्लीज कॅरी ऑन.

In reply to by आजानुकर्ण

मुळात एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे "जुनी शास्त्रे" जसे आयुर्वेद ( वास्तुशास्त्र किवा अगदी चीनी फेंगशुई) , हि तेथील भौगोलिक परिस्थितींनुसार उदयास आलेली आहेत. त्यामुळेच आयुर्वेदातील औषधे/रसायने (ज्यांची आजीबाईचा बटवा म्हणून हेटाळणी चालू आहे) भौगोलिक परिस्थितीत मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहेत .आणि म्हणूनच ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचेही ठरते.

In reply to by आजानुकर्ण

तुम्ही विज्ञान नक्की कशाला म्हणाता? त्याची व्याख्या समजल्यास पुढे लिहीणे सोपे जाईल..

In reply to by आजानुकर्ण

माझ्या मते आयुर्वेद हे रोग, आजार मुळापासून बरे करण्यास मदत करते आणि ऍलोपथिच्या औषधांनी रोग फक्त दाबले जातात,म्हणजेच ते पुन्हा उचल खाऊ शकतात . संदर्भासहित स्पष्टीकरण हवे असल्यास माझ्या आई चेच उदाहरण घ्या.दम्याच्या विकाराने ती महिन्यातील १०-१५ दिवस अंथरुणास खिळून असायची , ऍलोपथिच्या औषधांनी थोडे दिवस बरे वाटायचे पण पुन्हा तेच.नंतर तिने आयुर्वेदाची मदत घेतली ज्यात औषधांसोबातच योगासनांचा सुद्धा समावेश होता आणि नंतर पुन्हा कधी दम्याने उचल खाल्ल्याचे बघितले नाही. बाकी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मानसोपचार, इंद्रियांचे पुनर्रोपण इत्यादी गोष्टींवर आनंदिता ने प्रकाश टाकलेला आहेच.

In reply to by आजानुकर्ण

साठीतले एक परिचित आहेत त्यांना कॅन्सर चे निदान झालेले आहे. पण त्यांची सर्जरी आणि किमो, रेडिओ थेरपीसारखे महागडे आणि भयंकर साईड इफेक्ट असलेले उपचार करून घेण्याची अजिबात ईच्च्छा नाही. सध्या ते एका निष्णात वैद्याचे उपचार घेत आहेत आणि सध्यातरी वैद्यांच्या औषधामुळे कॅन्सर नियंत्रणात आहे..म्हणजे आहे तसाच आहे अजून इतरत्र पसरलेला नाही किंवा वाढलेला नाही.आणि हे गेली २ वर्षे आम्ही पहात आहोत. पथ्य अगदी कडक आहे. आणि तेवढे ते नक्किच पाळतात. शिवाय वरचेवर प्रवास ही करतात. नैराश्येने ग्रासलेले, सतत झोपून असे ते गृहस्थ अजिबात नाहीयेत. खूप अ‍ॅक्टीव्ह आहेत. मला वाटते रोगाच्या सुरवातीच्या काळात आयुर्वेदिय उपचार सुरू केल्यास फायदा नक्कीच होत असवा ..शेवटच्या स्टेज ला पोहोचलेला रोग असेल तर आयुर्वेदिय उपचारांना मर्यादा असावी.

In reply to by अविनाशकुलकर्णी

फोटोशॉप?

In reply to by विकास

नाही. हे फोटोशॉप एडीटींग नाही पण फोटो काढतानाच दुसरी काही ट्रीक केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. :)

वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का?
पाश्चात्य कसोट्यांवर ते सत्य ठरत नाहीत. पण या विचारांना पाश्चात्य कसोट्या लावणं हेदेखील चुकीचं आहे. भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्रात (आयुर्वेद, योग वगैरे) हे विचार सत्य समजले गेलेले आहेत.
double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय?
नसावा. पण अजूनही कोणाला जर तशा ट्रायल्स करायच्या असतील तर ते अशक्य नाही. इथे एक महत्वाची गोष्ट दुर्लक्षिली गेलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही म्हणत असलेल्या चाचण्या ह्या नव्या रेणूंसाठी आवश्यक आहेत. असे रेणू जे कृत्रिम रासायनिक/ जैविक रीतीने बनवले गेलेले आहेत आणि मानवावर अजून वापरले गेलेले नाहीत. आयुर्वेदिक औषधे ही शतकानुशतकं वापरली गेलेली आहेत. त्यातली जी उपयुक्त होती ती टिकली आणि अनुपयुक्त/धोकादायक होती ती विस्मरणात गेली. तेंव्हा आयुर्वेदिक (किंवा युनानी) औषधांना वरील चाचण्या आवश्यक आहेत असं म्हणणं हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे.
एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?
होय!!!

In reply to by पिवळा डांबिस

मला वाटतं, वरील प्रतिसाद कोणाकडून आला आहे हे बघता... चर्चा संपली तरी चालावी (म्हणजे या धाग्यावर), नाही का?

In reply to by पिवळा डांबिस

पिडांकाकांना तद्दन अज्ञानमूलक असा एक प्रश्न विचारतो. प्लीज़ बेअर विथ मी.
तेंव्हा आयुर्वेदिक (किंवा युनानी) औषधांना वरील चाचण्या आवश्यक आहेत असं म्हणणं हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे.
समजा आयुर्वेदिक औषधांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल्स घ्यायच्या आहेत. मग वडाची साल पिंपळाला लावणे का बरे ठरते हे? आयुर्वेदिक औषधे अनुभवसिद्ध आहेत म्हणून ट्रायल्स करू नयेत असे तर म्हणावयाचे नाही ना? सध्याची डॉमिनंट "पॅथी" म्हंजे अ‍ॅलोपॅथी, तिच्या चष्म्यातून आयुर्वेदाचा निर्णय करणे हे सर्वथैव बरोबर नसले तरी काही निकष चूक म्हणता येणार नाहीत असे वाटते. आपले काय मत याबद्दल?

In reply to by बॅटमॅन

समजा आयुर्वेदिक औषधांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल्स घ्यायच्या आहेत. मग वडाची साल पिंपळाला लावणे का बरे ठरते हे?
क्लिनिकल ट्रायल्स या अनेक हेतूंनी केल्या जातात. एफिकसी (परिणामकारकता), डोस सिलेक्शन, सेफ्टी (सुरक्षितता), हेड-टू-हेड, ऑब्झर्व्हेशनल, पीआरओ वगैरे वगैरे.... तुम्हाला इथे परिणामकारकता (एफिकसी) संबंधी ट्रायल घ्यायची आहे. कोणताही रेणू हा अतिसूक्ष्म प्रमाणात (प्रत्येक रेणूसाठी हे प्रमाण वेगवेगळं असतं)दिला तर तो परिणामकारक ठरत नाही (नो इफेक्ट डोस)आणि अतिशय कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणात दिला तर तो घातक असू शकतो. म्हणूनच मी वर म्हटल्याप्रमाणे जर नवा रेणू टेस्ट करायचा असेल (मग पॅथी कुठलीहि असू द्या!)तर तो क्लिनिकली टेस्ट करणं योग्य ठरेल. पण जी आयुर्वेदिक औषधं गेली अनेक शतकं वापरात आहेत, ज्यांचे गुणधर्म आणि मात्रा (डोस) ज्ञात आहेत त्यांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल घेण्यामागचा हेतू कोणता?
आयुर्वेदिक औषधे अनुभवसिद्ध आहेत म्हणून ट्रायल्स करू नयेत असे तर म्हणावयाचे नाही ना?
मी कोणालाच कसल्या ट्रायल करू नका असं म्हणत नाहीये. ज्यांच्याकडे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ भरपूर असेल त्यांनी खुशाल हव्या त्या ट्रायल करत बसावं. त्यातून निष्पन्न काय होणार हा प्रश्न आहे. एखाद्या अगोदरच सार्वत्रिक वापरात असलेलं औषधाच्या (उदा. सुंठ, अडुळसा, ज्येष्ठमध इत्यादि)एफिकसी ट्रायल्स करून त्यातून काय शोधून काढणार? प्रत्येक ट्रायल हा एक प्रयोग असतो आणि प्रत्येक प्रयोगाला काहीतरी प्रयोजन असावं लागतं. नाहीतर तो केवळ रिसोर्सेसचा अपव्यय ठरतो... माझा कुणीही कोणत्याही औषधाच्या कसल्याही ट्रायल करत बसायला मुळीच विरोध नाहिये. पण अलिकडे आयुर्वेदिक औषधांच्या ट्रायल्स झालेल्या नसल्याने ती औषधे विकण्याची बंदी करण्यात यावी अशी जी ओरड (व्हेस्टेड इंटरेस्ट्सकडून) होतेय त्याला आहे. ज्यांना आयुर्वेदिक औषधे वापरायची नसतील त्यांनी ती वापरू नयेत. पण पारंपारिक औषधांची उपयुक्तता त्यांच्या शतकानुशतकांच्या वापरातून सिद्ध झालेली आहे.
सध्याची डॉमिनंट "पॅथी" म्हंजे अ‍ॅलोपॅथी, तिच्या चष्म्यातून आयुर्वेदाचा निर्णय करणे हे सर्वथैव बरोबर नसले तरी काही निकष चूक म्हणता येणार नाहीत असे वाटते. आपले काय मत याबद्दल?
कोणते निकष ते सांगा, म्हणजे मग माझं त्या त्या निकषांबद्दलचं मत देईन... :)

In reply to by पिवळा डांबिस

ओक्के.
मी कोणालाच कसल्या ट्रायल करू नका असं म्हणत नाहीये. ज्यांच्याकडे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ भरपूर असेल त्यांनी खुशाल हव्या त्या ट्रायल करत बसावं. त्यातून निष्पन्न काय होणार हा प्रश्न आहे. एखाद्या अगोदरच सार्वत्रिक वापरात असलेलं औषधाच्या (उदा. सुंठ, अडुळसा, ज्येष्ठमध इत्यादि)एफिकसी ट्रायल्स करून त्यातून काय शोधून काढणार? प्रत्येक ट्रायल हा एक प्रयोग असतो आणि प्रत्येक प्रयोगाला काहीतरी प्रयोजन असावं लागतं. नाहीतर तो केवळ रिसोर्सेसचा अपव्यय ठरतो...
हे वाचून बाकी समाधान झालं. धन्यवाद पीतचेष्टालुभवान :)

In reply to by पिवळा डांबिस

उत्तम माहितीपूर्ण प्रतिसाद. उत्तर मिळाले, फक्त एकच लाष्ट मुद्दा. निकष म्हंजे जे क्लेम्स आहेत ते घासूनपुसून लख्ख करणे, त्यांचा कीस पाडणे. तुम्ही म्हणता तशी चिकार औषधे आल्रेडी टेस्टेड आहेतच. पण जिथे अ‍ॅलोपॅथीला अजून काही गोष्टी जमत नाहीत किंवा नीट जमत नाहीत अशा ठिकाणी जर आयुर्वेदाचे काही क्लेम्स असतील तर ट्रायल्स केले तर फायदाच आहे असे मला वाटते. बाकी अपव्यय वगैरे सहमत आहे-थोडासा अनईझी यासाठी आहे की मी सैद्धांतिकपणे बोलतोय तर तुम्ही प्रॅक्टिकली बोलताय. साहजिकच आहे ते बाकी :) असो.

In reply to by बॅटमॅन

पण जिथे अ‍ॅलोपॅथीला अजून काही गोष्टी जमत नाहीत किंवा नीट जमत नाहीत अशा ठिकाणी जर आयुर्वेदाचे काही क्लेम्स असतील तर ट्रायल्स केले तर फायदाच आहे असे मला वाटते.
जरूर, पण अशा ट्रायल्स कोण करणार हा प्रश्न आहे. आयुर्वेदिक औषधविक्रेत्यांना याची काही गरज पडलेली नाही कारण ते सध्याही ते औषध विकताहेतच. भारतीय युनिव्हर्सिटीजकडे अशा ट्रायल्स करण्याइतका पैसा आहे असं मला वाटत नाही. सरकारी संस्था करू शकतात पण सरकारी कारभार बघता त्यांच्या निष्कर्षांना फारशी विश्वसनीयता नाही. हां, काही अ‍ॅलोपाथी औषध बनवणार्‍या कंपन्या करू शकतात पण त्यातून त्यांना लाभ काही नाही. लक्षात असू दे की एखादं औषध धोकादायक ठरलं म्हणून बाजारातून बॅन करता येतं पण ते पुरेसं इफेक्टिव्ह नाही म्हणून त्याचा वापर थांबवता येणं हे जवळजवळ अशक्य असतं...
मी सैद्धांतिकपणे बोलतोय तर तुम्ही प्रॅक्टिकली बोलताय.
कारण माझा तो पेशा आहे. एका फेज ३ क्लिनिकल ट्रायलला (रोगानुसार) जवळजवळ २० ते १५० लाख डॉलर्स खर्च येऊ शकतो. इतके हाय स्टेक्स असतांना प्रॅक्टिकल न राहून मी सांगतोय कुणाला? :)