Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दीपकशेठ on Mon, 02/04/2013 - 11:12
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
सल्ला
मदत
खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना.... मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर.. खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही.. तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय?? बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या ..... हेच तर आम्हाला नको आहे ना... विचार केला २-३ वेळा म्हणून बघू होतील तयार, पण नाही :( आता वडिलाने असा पवित्र्रा घेतल्यावर मुलगी तरी काय करणार? कुणाला वाटणार असा काही झाले म्हणून.. आणि हि धमकी खरी ठरली तर?? तरीही हिम्मत हरली नाही आहे.. लढतो आहे पण हे मात्र खरा आहे, वडील धाऱ्याना समाज महत्वाचा असतो... पण मुलांच्या ख़ुशी साठी कुठे तरी थोडी तरी तयारी दाखवली तर काय हरकत आहे? तुम्हीच सुचवा अश्या वेळी काय केले पाहिजे?
  • Log in or register to post comments
  • 24975 views

प्रतिक्रिया

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 02/07/2013 - 00:55

In reply to एक शंकाये मला : by जेनी...

Permalink

टाळ्या

टाळ्या ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 02/07/2013 - 21:15

In reply to एक शंकाये मला : by जेनी...

Permalink

एक शंकाये मला :

एक शंकाये मला :
तुम्ही ३ विचारल्या आहेत. :D
प्रेम केलं तर लग्न करणं कम्पल्सरीये का ??
वेल सद्ध्या लिव्ह ईन रेलशनशिप चा प्रकार जवळपास समाजमान्य होत चाल्लाचं आहे की. पण तो स्वतंत्र वादाचा मुद्दा आहे :).
नुसतं प्रेम नै का जमणार ??
जमु शकेल, पण जर आयुष्य एकत्र काढायचचं नसेल तर प्रेम तरी कशाला करा? :).
लग्न केलच पाहिजे का ??
मी लग्न केल पाहीजे अश्या मताचा आहे. भले ते वैदिक पद्धतिनी असो किंवा रगिस्टर. करावं का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्ण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दीपकशेठ on गुरुवार, 02/07/2013 - 14:04

In reply to प्रतिसाद.... by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

मान्य आहे... पण पर्याय उरला नाही...

आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी... दोघं एकमेकांशिवाय कशी राहु शकणार नाहीत हे सुद्धा सांगून झाला, माझ्या घरचे पुढे होउन तिच्या वडिलांशी बोलले..पण व्यर्थ .. :(
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 02/07/2013 - 21:10

In reply to मान्य आहे... पण पर्याय उरला नाही... by दीपकशेठ

Permalink

प्रतिसाद....

अहो पण तुम्ही स्वतः त्यांच्या वडीलांना समजवायचा प्रयत्न करुन पाहीलात का? कदाचीत तुमचा आत्मविश्वास पाहुन त्यांचा निर्णय बदलु पण शकतो. माघार घेऊ नका अशी. एकदा प्रयत्न तर करुन पहा. प्रयत्नांती परमेश्वर. :). तुम्ही प्रयत्न कराल अशी अपेक्शा बाळगुन तुम्हाला शुभेच्चा देतो. (लग्नाच्या आईसक्रीम पार्टीच्या प्रतिक्शेमधील) मन उधाण वार्याचे :)
  • Log in or register to post comments

Submitted by दीपकशेठ on Fri, 02/08/2013 - 07:33

In reply to प्रतिसाद.... by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

नाही ...

नाही ... मी स्वतः तिच्या वडिलांशी नाही बोललो, पण हो तिच्या अत्त्याशी बोललो. तिचा पाठींबा होता, तिनेही प्रयत्न केले, पण तिच्या भावापुढे काहीही चालू शकले नाही. तुझा आणि माझा संबद्ध राहणार नाही आणि मला जिवंत राहू द्यायचा नाही वाटता तुला , असा म्हटल्यावर ती तरी काय करणार... माझ्या वडिलांना मी फोन वर विचारायला सांगितले पण तो प्रयत्न सुधा निष्फळ.. :( आता विचारले तर ते मुलीला त्रास देतील आणि काहीही करू शकतात, ते मला नाही बघितला जाणार.. असाही खूप त्रास होतोय आम्हाला... पण तिला बाकी त्रास नको म्हणून आता प्रयत्न थांबिवले... आणि दोघांची हिम्मत पण संपली... आता फक्त बोलणं चालू असता, पण मनाला माहित आहे कि किती केले तरी... शुबेच्चा दिल्या... धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by चावटमेला on Wed, 02/06/2013 - 21:21

Permalink

एक कन्फेशन

एक कन्फेशन. धागा पाहताक्षणीच ह्यात इतके मुक्तपीठीय पोटेन्शिअल असेल असं ह्या पामरास खरंच वाटलं नव्हतं ;)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 02/07/2013 - 01:25

Permalink

आमचा घोड्यान्चा धन्दा आहे.

आमचा घोड्यान्चा धन्दा आहे. पान्ढरे, काळे, खरबे उपलब्ध. जमले कि सान्गा. खास सवलत पण देवू.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on गुरुवार, 02/07/2013 - 02:52

In reply to आमचा घोड्यान्चा धन्दा आहे. by खटपट्या

Permalink

देवा..... कोणाच काय तर कोणाच

देवा..... कोणाच काय तर कोणाच काय?.!!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 02/07/2013 - 21:16

In reply to देवा..... कोणाच काय तर कोणाच by आनन्दिता

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 02/08/2013 - 04:38

In reply to +१ by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

शेवटी काय ठरले ते कळ्वा हो.

शेवटी काय ठरले ते कळ्वा हो. घोडे बिनकामाचे उभे आहेत.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com