Skip to main content

जात जातच नाही ... काय करू??

लेखक दीपकशेठ यांनी सोमवार, 04/02/2013 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना.... मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर.. खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही.. तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय?? बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या ..... हेच तर आम्हाला नको आहे ना... विचार केला २-३ वेळा म्हणून बघू होतील तयार, पण नाही :( आता वडिलाने असा पवित्र्रा घेतल्यावर मुलगी तरी काय करणार? कुणाला वाटणार असा काही झाले म्हणून.. आणि हि धमकी खरी ठरली तर?? तरीही हिम्मत हरली नाही आहे.. लढतो आहे पण हे मात्र खरा आहे, वडील धाऱ्याना समाज महत्वाचा असतो... पण मुलांच्या ख़ुशी साठी कुठे तरी थोडी तरी तयारी दाखवली तर काय हरकत आहे? तुम्हीच सुचवा अश्या वेळी काय केले पाहिजे?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25025
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

In reply to by दीपकशेठ

दीपकशेठ, फुलू पाहणारं तुमचं प्रेम गाडलंत ना, तसंच त्याच्या आठवणीही खोल गाडून त्यावर कायमचा मातीचा थर टाका. म्हणजे असं की, आता पुढच्या आयुष्यात नव्या जोडीदारावर प्रेमाचा पुरेपूर वर्षाव करा. जुन्या आठवणींनी काळजात कळ येऊन प्रेम पातळ करु नका. अन्यथा तुम्ही दोघेही आणखी दोन नव्या व्यक्तींवर अन्याय कराल.

In reply to by दीपकशेठ

चांगला आणि परिपक्व निर्णय. तुम्हाला याचा पश्चाताप होणार नाही. शुभेच्छा.

In reply to by आजानुकर्ण

असो मला मात्र पश्चाताप झालेला आहे. यापुढे प्रेमात काय करु, आंतरजातीयचे काय करु, वयाचे काय करु, पोळी करु की चपाती करु असे धागे उघडणार नाही, वाचणे आणि प्रतिसाद देणे तर दूरच. फक्त नंदनवनात जाता जाता दिपकशेठ एकच अगदी खरे खरे सांगून जा. त्या मुलीचे वडील काय म्हणाले? आणि तुमचे वडील काय म्हणाले घरी आल्यानंतर? त्यांच्या शब्दात सांगितले तर फार बरे होइल.

In reply to by अभ्या..

मुलीचे वडील: हे शक्य नाही, मला गाव वाळीत टाकणार, आणि मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही.. मला समजून घ्या.. माझे वडील पुढे तरी काय बोलणार?? मला हेच त्यांनी सांगितल आणि बघ तुझा विचार काय वाटते ते.. त्यांचा तर हाच निर्णय आहे... तुमच्या मुळे एक जीव जाऊ शकतो, आणि हे ओझे तुम्हाला आयुष्यभर वाहावे लागणार..

माझा एक ब्राम्हण मित्र आणि माळी मैत्रिणीचा असाचं प्रॉब्लेम झाला होता. दोघांच्या घरचे तयार नव्हते. शेवटी आम्ही मित्रांनी दोघांच्या घरच्यांना एकत्र बोलाऊन नीट समजावल तेव्हा कुठे तयार झालेत. दोघांचा साखरपुडा नुकताच पार पडला, आता लग्नाची तारीख ठरवायचं चालु आहे. नीट समजावलं घरच्यांना तर तेही समजावुन घ्यायला तयार असतात. तुम्ही दोघं एकमेकांशिवाय कशी राहु शकणार नाहीत ते सांगा. तुम्ही तिच्या आईवडीलांची आणि ती तुमच्या आई-वडीलांची सदैव काळजी घ्याल हे ही सांगा. आई-वडील ऐकतात योग्य पद्धतीनी सांगीतलं तर. आणि नाहीच ऐकल तर दोघही सज्ञान असल्यान लग्न करु शकताच. समाजाच काय आहे हो? चार दिवस बोंब मारतील नंतर विसरुन जातील. तुमचं मनापासुन प्रेम असेल एकमेकांवर तर एवढी रिस्क नक्कीच घ्यायला पाहीजे. आयुष्य तुम्हाला समाजातल्या सो कॉल्ड जात-पोलिसांबरोबर काढायचं आहे की तुमच्या प्रेमाबरोबर ते पण पहा. (प्रेम व्यक्त नं करता आल्यानं तिच्या लग्नाला जायला लागलेला) मन उधाण वार्‍याचे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

एक शंकाये मला : प्रेम केलं तर लग्न करणं कम्पल्सरीये का ?? :( नुसतं प्रेम नै का जमणार ?? :( लग्न केलच पाहिजे का ?? :-/

In reply to by जेनी...

एक शंकाये मला :
तुम्ही ३ विचारल्या आहेत. :D
प्रेम केलं तर लग्न करणं कम्पल्सरीये का ??
वेल सद्ध्या लिव्ह ईन रेलशनशिप चा प्रकार जवळपास समाजमान्य होत चाल्लाचं आहे की. पण तो स्वतंत्र वादाचा मुद्दा आहे :).
नुसतं प्रेम नै का जमणार ??
जमु शकेल, पण जर आयुष्य एकत्र काढायचचं नसेल तर प्रेम तरी कशाला करा? :).
लग्न केलच पाहिजे का ??
मी लग्न केल पाहीजे अश्या मताचा आहे. भले ते वैदिक पद्धतिनी असो किंवा रगिस्टर. करावं का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्ण आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी... दोघं एकमेकांशिवाय कशी राहु शकणार नाहीत हे सुद्धा सांगून झाला, माझ्या घरचे पुढे होउन तिच्या वडिलांशी बोलले..पण व्यर्थ .. :(

In reply to by दीपकशेठ

अहो पण तुम्ही स्वतः त्यांच्या वडीलांना समजवायचा प्रयत्न करुन पाहीलात का? कदाचीत तुमचा आत्मविश्वास पाहुन त्यांचा निर्णय बदलु पण शकतो. माघार घेऊ नका अशी. एकदा प्रयत्न तर करुन पहा. प्रयत्नांती परमेश्वर. :). तुम्ही प्रयत्न कराल अशी अपेक्शा बाळगुन तुम्हाला शुभेच्चा देतो. (लग्नाच्या आईसक्रीम पार्टीच्या प्रतिक्शेमधील) मन उधाण वार्याचे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही ... मी स्वतः तिच्या वडिलांशी नाही बोललो, पण हो तिच्या अत्त्याशी बोललो. तिचा पाठींबा होता, तिनेही प्रयत्न केले, पण तिच्या भावापुढे काहीही चालू शकले नाही. तुझा आणि माझा संबद्ध राहणार नाही आणि मला जिवंत राहू द्यायचा नाही वाटता तुला , असा म्हटल्यावर ती तरी काय करणार... माझ्या वडिलांना मी फोन वर विचारायला सांगितले पण तो प्रयत्न सुधा निष्फळ.. :( आता विचारले तर ते मुलीला त्रास देतील आणि काहीही करू शकतात, ते मला नाही बघितला जाणार.. असाही खूप त्रास होतोय आम्हाला... पण तिला बाकी त्रास नको म्हणून आता प्रयत्न थांबिवले... आणि दोघांची हिम्मत पण संपली... आता फक्त बोलणं चालू असता, पण मनाला माहित आहे कि किती केले तरी... शुबेच्चा दिल्या... धन्यवाद

एक कन्फेशन. धागा पाहताक्षणीच ह्यात इतके मुक्तपीठीय पोटेन्शिअल असेल असं ह्या पामरास खरंच वाटलं नव्हतं ;)