"रानमोगरा - माझी वाङ्मयशेती" दूरदर्शनवर
दिनांक - रविवार, ३ फेब्रुवारी २०१३

* * *

१५ विजेत्यांपैकी १२ विजेते स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधता आला. "ब्लॉग माझा-३" या २०१० मधील स्पर्धेत विजेते ठरल्यापैकी श्री नरेंद्र गोळे, श्री एकनाथ मराठे आणि मी स्वत: या वेळी सलग दुसर्यांदा विजेते ठरलो असल्यामुळे त्यांच्याशी माझा जुना परीचय आणि मैत्री असल्यामुळे त्यांच्याशी संवाद तर झालाच पण यावेळेस नव्यानेच आलेल्यांशीही संवाद साधता आला. आंतरजालावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सोकाजीराव त्रिलोकेकर म्हणजे ब्रिजेश मराठे होय, हे सुद्धा कळून आले. सुलक्षणा लक्ष्मण प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. श्रेया महाजन यांचेकडून आणखी बरेचकाही शिकण्यासारखे आहे, याची जाणिव झाली. रोहन जगताप, तन्मय कानिटकर, प्रशांत रोटवदकर आणि इतर विजेत्यांशी संवाद साधण्याची इच्छा वेळेअभावी अपूर्णच राहिली.
एबीपी माझाचे असो-सिनिअर प्रोड्युसर- अँकर, नावाप्रमाणेच सदोदित प्रसन्न भासणारे प्रसन्न
![]() |
| विनोद कांबळी |
दरम्यानचे काळात प्रसिद्ध माजीक्रिकेटपटू विनोद कांबळी स्टुडियोत पोचले. त्यांचेशी प्रत्यक्ष भेट होणे याचा आनंद काही वेगळाच होता. विनोद कांबळी म्हणजे माझा सर्वाधिक आवडता खेळाडू. अगदी सचीन तेंडूलकर पेक्षाही माझा जीव कांबळीमध्येच जास्त गुंतायचा. सचीनची महानता मला निर्विवाद मान्य असूनही मी कांबळीवरच जास्त प्रेम का केले, याचे उत्तर मला तेव्हाही माहीत नव्हते आणि आजही मला बिनतोड स्पष्टीकरण देता येत नाही. मात्र एकेकाळी कांबळी माझा "जीव की प्राण" होता, हे नाकारण्यातही अर्थ नाही. त्याला टीममधून वगळल्यावर मला किती वेदना व्हायच्या, हे शब्दात सांगणे कठीण आहे. सचीन नावाच्या विक्रमांच्या बादशाहने एक-एक शिखर पादाक्रांत करत एकदिवसीय क्रिकेटमधील स्वप्नवत दोनशे धावांचा पल्ला गाठला तेव्हा सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत हे तुंबडीगीत मी उत्स्फ़ूर्तपणे लिहिले; तसे एखादे गीत कांबळीवर अजूनपर्यंत तरी माझ्या हातून लिहिले गेले नाही. मात्र यानिमित्ताने कांबळीसोबत जवळून भेटण्याचा जो योग आला तो क्षण माझ्या कायमच स्मरणात राहील.
कर्मधर्मसंयोगाने नेमके त्याच दिवशी प्रमोद देव साहेंबाच्या मुलीचे लग्न होते. शूटींगचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्या मुलीच्या लग्नातही जाता आले. अक्षता टाकण्याचा मुहूर्त उलटून गेला असला तरी भोजनाचा कार्यक्रम ऐन बहारात होता. मलाही त्यानिमित्ताने अक्षता न टाकताच भोजनाचा अर्थात "पंचावन्नपक्वानाचा" यथेच्छ समाचार घेता आला.
योगायोग बघा, १४ जानेवारी २०१३ला मी "शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)" ही हजल लिहिली त्यातील एक शेर असा आहे.
![]() |
| प्रसन्न जोशी सोबत लेखक |
![]() |
| चंद्रभागेच्या तिरी - पांडुरंग हरी |
* * * *
![]() |
| देशी-विदेशी पर्यटकांचा आवडता कोलंगुट बीच, गोवा |
* * * *
![]() |
| मंगेश मंदीर, गोवा |
![]() |
| कोलंगुट समुद्रकिनारा, गोवा |
![]() |
| जुने गिरिजाघर, गोवा |
![]() |
| दोना पौला, गोवा |
![]() |
| किनारपट्टीवरील सुर्यास्त, गोवा |
![]() |
| कोकणचा काजू (रत्नागिरी)* * * * |
मिसळपाव













प्रतिक्रिया
अभिनंदन!
एका लेखात बरंच काही लिहिलंत! उद्या कार्यक्रम नक्की बघेन.
कर्मधर्मसंयोगाने नेमके त्याच
कर्मधर्मसंयोगाने नेमके त्याच दिवशी प्रमोद देव साहेंबाच्या मुलीचे लग्न होते. शूटींगचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्या मुलीच्या लग्नातही जाता आले. अक्षता टाकण्याचा मुहूर्त उलटून गेला असला तरी भोजनाचा कार्यक्रम ऐन बहारात होता. मलाही त्यानिमित्ताने अक्षता न टाकताच भोजनाचा अर्थात "पंचावन्नपक्वानाचा" यथेच्छ समाचार घेता आला.
च्यायला, मी निघालो आणि तुम्ही पोहचला वाटतं. आपली भेट हुकली म्हणायची. बाकी, प्रमोद देवांच्या मुलीच्या लग्नात पंचावन्नपक्कावनाचा आस्वाद लैच भारी होता. मी अजूनही भेटेल त्याला किती मेनू होते राव जेवणाला हे आवर्जून सांगतो.
असो, उद्या कार्यक्रम पाहीन. आपलं ननःपूर्वक अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
(पहिल्या ब्लॉग विजेता स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलेला)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मी मांडत असलेल्या विषयाला प्रसिद्धीमुळे आणखी व्यापकता लाभेल याचा आनंद आहे. :)
३.१९ मिनिटांची VDO क्लिप
ज्योति कामत, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :)
---------------------------------------------------
"रानमोगरा" विषयी प्रसारीत झालेली ३.१९ मिनिटांची VDO क्लिप
https://www.baliraja.com/node/442
येथे पाहता येईल.
मुटे काका खुप खुप अभिनंदन ...
मुटे काका खुप खुप अभिनंदन ... आत्ताच बळीराजा वरची क्लिप पाहिली ...
खुप खुप शुभेच्छा :)
मुटेकाका अभिनंदन. तूनळीवर
मुटेकाका अभिनंदन. तूनळीवर कार्यक्रमाचा दुवा असेलच. शोधून ठेवतो..
- पिंगू
सलग दुसर्यांदा बक्षिस.......
सलग दुसर्यांदा बक्षिस........हार्दिक अभिनंदन :)
धन्यवाद.
पूजा पवार, पिंगू आणि जयवीतै
धन्यवाद. :)
अभिनंदन काका...
अभिनंदन काका... :)
बाकी प्रसन्न जोशीला पाहुन त्याला ब्लॉगर्स मेळाव्याला भेटलो होतो याची आठवण झाली.