इथे भाग १ वाचावा
आपण पहिल्या लेखांकात पाहिले आहे की राग एक मसाला असेल तर पदार्थ म्हणजे काय बुवा ? ते आता जरा पाहू. राग हा गोडवा निर्माण करण्याचा राजमार्ग आहे. असाच पदार्थ चविष्ट करण्याचा " राजमार्ग" मसाला उत्पादकानी शोधून काढला आहे. असो. तर मी काय म्हणत होतो तर पदार्थ म्हणजे काय? तर पदार्थ म्हणजे " ख्याल" आणि उपशास्त्रीय प्रकार.
त्याअगोदर जरा स्वर या संकल्पनेची माहिती घेउ. मानव वंश विकसित होत असताना मानवाने २० ते २०००० हर्टझ या आवाक्यातील निरनिराळ्या ध्वनिलहरी ऐकून घेतल्या. त्यासाठी, पक्ष्यांचे आवाज, समुदाची गाज, निर्झराची खळखळ यांचा उपयोग झाला. नंतर मात्र कातडी, तंतू .वेळू ई च्या साह्याने विविध वाद्यांचा विकास जसा होत गेला तसा ध्वनिच्या आकलनाचा माणसाचा आवाका ही वाढत गेला. परिणामी पहिल्या फेज मधे सा रे ग म या चारच स्वरांचा साक्षात्कार माणसाला झाला. आजही आदिवासी लोकसंगीत आपण ऐकलेत तर त्यात सा रे ग यातच तिथल्या तिथे फिरत असलेले
गान आपल्याला आढळेल.फार कशाला ... आपली आरती जरा पेटीवर वाजवून पहा... माळाच्या मळामदी कोन ग उभी हे
गाणे वाजवून पहा... गंगू तारुण्य तुझ बेफाम हे गाणे वाजवून पहा ... असं पतियाळा घराण्च्याच्या परवीन सुलताना यांच्या साडेतीन सप्तकी गायकी सारखं तुम्हाला तिथं काहीही मिळणार नाही. पण स्मरणीयता ही रंजकतेची बहीण आहे ती लोकगीतात साधेपणामुळे तुम्हाला सापडेल.
त्यात मानवाला पुढे असे ही कळून आले की सा रे ग म यांच्या वारंवारितेचा (frequency) काही तरी निस्चित परस्पर संबंध आहे.सा च्या काही प्रमाणात ( बहुदा दीडपट) जी वारंवारिता ती म्हणजे पंचम मग प ध नि सा यांचे शोधन होऊन
सप्तक पुरे झाले.प ध नि सा हे दुसरे तिसरे काही नसून वरच्या वारंवरितेला धरून सारेगमच पुन्हा येतात हे कळून आले. त्यात खालचा सा व वरचा सा हे एकदम एकरूप आहेत हे कळून आले. मग सा व पंचम हे एकदम वाजविले की कानाला विशेष आनंद मिळतो हे कळून आले ( हार्मनी) आज पाश्चिमात्य अभिजात संगीत हे स्वरसंवाद तत्वावर तर आपले भारतीय संगीत स्वर संगति ( वा स्वरावली) ( मेलडी) या वर आधारीत आहे. आपल्या इकडे आरोह
अवरोहाचे नियम कडक आहेत.कारण एरवी निर्विकार असलेला एकाकी असलेला स्वर दुसर्या स्वरामागे वा पुढे उभा राहिला की तो कोणता तरी रंग ,पोत घेउन येतो याचा अनुभव कानाना आल्याशिवाय रहात नाही.पाश्चात्य संगीतात " कॉर्ड" चे महत्व फार आहे. कॉर्ड म्हणजे दोन किंवा अधिक स्वर एकदम वाजविणे. यात रंजक व अऱंजक अशा दोन्ही प्रकारच्या कॉर्डस असतात. बहुदा पियानो वा कीबोर्डवर गीत वाजविताना डाव्या हाताने मंद्र वा मध्य सप्तकात कॉर्ड वाजवितात तर मेलडी उर्फ चाल ही मध्य व तार सप्तकात वाजवितात. याचे भन्नाट प्रात्यक्षिक चेतन घोडेश्वर यांच्या अदाकारीत इथे - झुबी डूबी - ( थी इडीयट) वर ऐका.
वर आपण पाहिलेच की पदार्थ म्हणजे " ख्याल" यात बडा ख्याल व छोटा ख्याल असे प्रकार. बड्या ख्यालात घेतलेली वर
मूळ हळद जिरे मोहरी ई ची फोडणी या छोट्या ख्यालतही कमी प्रमाणात का होईना येणारच. या ख्रेरीज धृपद व धमार हे
चांगले पण कमी लोकप्रिय पदार्थ ही आहेत. ( ज्या प्रमाणे जुना बुंदीचा लाडू काय वाईट होता का पण आताच्या मेनूत रस मलाई व गुलाबजाम असतातच की नाही ?) आता हळ्द, हिंग, जिरे, ची फोडणी म्हणजे काय ते पाहू या.
आलापी, सरगम, तानक्रिया, बढत ही तो फोडणीचे सामग्री. एखाद्या क्रिकेटर कडे समोरचे व्ही मधले फटके, ऑन चे फटके,ऑफ ड्राईव्ह यांचा खजाना अधिक तसा तो परिपूर्ण फलंदाज तसेच गायकाचे( खरे तर गवयाचे असा शब्द हवा ) ही
असते. ह्या सगळ्या अंगांचा समावेश गायकीत होणे म्हणजे रसिकास पर्वणीच असते.
उपशास्त्रीय हा अभिजात संगीताच्या मैफलीत नंतरची स्वीट् डिश या प्रकारात मोडणारा पदार्थ . यात प्रामुख्याने ठुमरी, दादरा, टप्प्पा. तराणा असे काही पदार्थ वाढले जातात. या खेरीज शास्त्रीय मैफलीत न येणारे पण इथे जाता जाता उल्लेख करावा असे पदार्थ म्हणजे, कजरी, चैती, सावन, नज्म, कव्वाली, गजल, मांड, हीर, भजन, निर्गुणी भजन आणि अनेक.
क्रमशः
वाचने
9020
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान... मात्र ते पदार्थ
+१
In reply to छान... मात्र ते पदार्थ by बिपिन कार्यकर्ते
ते रूपक केवळ मूळाक्षरांची कल्पना यावी म्हणून
In reply to +१ by नगरीनिरंजन
ओके... उगाच रसभंग होत होता.
In reply to ते रूपक केवळ मूळाक्षरांची कल्पना यावी म्हणून by चौकटराजा
च्चचच!!!
In reply to ते रूपक केवळ मूळाक्षरांची कल्पना यावी म्हणून by चौकटराजा
+१
In reply to च्चचच!!! by पिवळा डांबिस
हॅहॅहॅ! माझा प्रतिसाद नीट
In reply to +१ by शुचि
हाहाहा! पिडां उगाच खोड्या
In reply to च्चचच!!! by पिवळा डांबिस
छ्या...
In reply to च्चचच!!! by पिवळा डांबिस
वाचनीय...
वाचतोय
अहो चौराकाका,
चौकटराजा
पुभाप्र!!
बाडीस.
In reply to पुभाप्र!! by सूड
व्वा!!
और आने दो!
सुरेख
"उपशास्त्रीय हा अभिजात
एक शंका - सा रे ग म प ध नी सा
हे सारे आपले खेळ
In reply to एक शंका - सा रे ग म प ध नी सा by शुचि
शंकानिरसन
In reply to एक शंका - सा रे ग म प ध नी सा by शुचि
डो अ डीअर अ फिमेल डीअर,
In reply to शंकानिरसन by पिवळा डांबिस
ह का नाही लिहिलं?
In reply to डो अ डीअर अ फिमेल डीअर, by शुचि
मालिका छान चालू आहे
कन्फूजन!
In reply to मालिका छान चालू आहे by पैसा
अर्थात!
In reply to कन्फूजन! by पिवळा डांबिस
लक्षण पदार्थ
असं पहा !
वरील जागी एक चूक