✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड

स
सृष्टीलावण्या यांनी
गुरुवार, 01/31/2013 - 08:25  ·  लेख
लेख
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल. असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय (मराठा) वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता. ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.' खरी गोष्ट अशी आहे की तमाम रयतेला शिवरायांच्या विषयी अत्यंत आपुलकी होती. स्वराज्याची स्थापना सर्वांना आनंददायी गोष्ट होती. असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे. -------------------------------------------------------------------------- (राजाभिषेक प्रसंगी वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट ह्यांच्या मार्गदर्शनाविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिनच. तो विषय इथे लिहायला घेतला तर लेखाची लांबी प्रचंड वाढेल.) संदर्भग्रंथ - वेध महामानवाचा - ले. डॉ. श्रीनिवास सामंत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
आस्वाद
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
42648 वाचन

💬 प्रतिसाद (146)

प्रतिक्रिया

गो ब्राह्मण प्रतिपालक...

स्पंदना
गुरुवार, 01/31/2013 - 08:30 नवीन
गो ब्राह्मण प्रतिपालक... आता जर का राजमुद्राच जर अशी असेल तर तेथे विरोध येतोच कोठुन? खरच काहीच्या बाही काढुन उगा नको ते वाद घालण्यापेक्षा, दुसरे काही विषय चर्चेला घेतले तर बर होइल. मग अगदी कुंकु सुद्धा चालेलं.
  • Log in or register to post comments

राजमुद्रा

आजानुकर्ण
गुरुवार, 01/31/2013 - 09:43 नवीन
गो ब्राह्मण प्रतिपालक... आता जर का राजमुद्राच जर अशी असेल तर तेथे विरोध येतोच कोठुन?
ही राजमुद्रा.यात कोठेही गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द दिसत नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

हरे रामा! मी तर हरीतात्यांची

स्पंदना
Fri, 02/01/2013 - 05:15 नवीन
हरे रामा! मी तर हरीतात्यांची आरोळीच इथे राजमुद्रा म्हणुन दिली की हो. कान पकडा! कान!!माझा हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

गोब्राह्मणप्रतिपालक

अँग्री बर्ड
Fri, 02/01/2013 - 16:31 नवीन
गोब्राह्मणप्रतिपालक हि बिरुदावली ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज वापरत होते त्याप्रमाणे आपल्याला देखील वापरायला आवडेल असे छत्रपती संभाजी महाराजांनी एका पत्रात लिहिले होते. अधिक माहिती पुण्याचे पेशवे देऊ शकतात, किंबहुना मी हे त्यांच्याच एका प्रतिसादात वाचले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

रोचक

आजानुकर्ण
Fri, 02/01/2013 - 22:14 नवीन
संभाजी, राजाराम, किंवा नंतरच्या कोणत्याच महाराजांनी गोब्राम्हणप्रतिपालक ही पदवी वापरली नाही असे ऐकले आहे. शिवाजीराजेही स्वतःला गोब्राम्हणप्रतिपालक म्हणवून घेत नसत असेही ऐकले आहे. मात्र शिवाजींना इतर लोक गोब्राम्हणप्रतिपालक म्हणत असावेत किंवा ती पदवी शिवाजींनंतर त्यांना चिकटली असा एक प्रवाद आहे. असो. संभाजीराजांचे ते पत्र किंवा पत्राचा संदर्भ पाहायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अँग्री बर्ड

पत्रिकात्मक

चौकस२१२
Tue, 01/04/2022 - 08:58 नवीन
गोब्राह्मणप्रतिपालक हे पत्रिकात्मक आहे हे मुद्दामून समजून न घेता राजकीय कारणासाठी जातीय तेढ वाढवण्यासाठी त्याला विरोध केला गेलं हे महाराष्ट्राचे दुर्दैव रयतेचा धर्म = हिंदू हल्ला करणारा केवळ सत्तेसाठी हल्ला ना करत रयतेच्या धर्मावर पण वार करीत होता म्हणून या रयतेचं प्रतीक म्हणजे , देवळे, पशुधन, आनि देवळाचे कारभार पाहणारे म्हणून प्रतीकात्मक ब्राहमण आणि या प्रतिकाच संरक्षण करणारा राजा एवढाच त्याचा अर्थ ! शिवाजी महाराजांचा आणि हिंदू धर्माचा संबंध नव्हतं वैगरे मुक्तफळे बी ग्रेडी बारामतीच्या भानामतीच्या ,मुखातून निघतात त्याचा हा प्रकार पण जिथे " टूल किट" हेच आहे कि ३.५% ना झोडपा / सोप्पे आहे आणि राजय करा तिथे काय बोलणार बाय द वे तो माझा " टूल किट" धागा कोणी चाणक्षणें उडविला कोण जाणे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अँग्री बर्ड

लेखाची मांडणी व विषय आवडला.

तर्री
गुरुवार, 01/31/2013 - 08:59 नवीन
असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे. शेवट असा करणे आवश्यक होते का ? ते सगळे कोते राजकारण आहे, हे सगळ्यांना माहित आहे.
  • Log in or register to post comments

कहर आहे. अहो मी स्वतः

सिद्धार्थ ४
गुरुवार, 01/31/2013 - 09:10 नवीन
कहर आहे. अहो मी स्वतः ब्राह्मण आहे आणि मला जेंव्हा पासून आठवते तेंव्हा पासून माझ्या घरी माझी आई शिवाजी महाराजान विषयी सांगत आली आहे. महाराजान विषयी मला अत्यंत आदर आहे आणि ते कोणत्या जातीचे आहेत ह्याचाशी मला काही कर्तव्य नाही. आणि कोणाला तो असू नये. अशी मनसे हजारो वर्ष्यातून एकदा जन्मतात. शिवाजी महाराजांच्या नखाची सर जरी माझ्या अंगी आली तरी मी माझ्या आयुष्याचे सार्थक झाले असे समजीन. तुम्ही कुठे संभाजी ब्रिगेड आणि त्यांची विचारसरणी घेऊन बसला आहात. सोडून द्या. जेंव्हा तुम्ही महाराज आणि त्यांचे कार्य जातीवादाला जोडलं तेंवा मी म्हणेन तुम्हाला शिवाजी महाराज कळलेच नाहीत. वरती aparna akshay म्हणाल्या तेच खरे. "खरच काहीच्या बाही काढुन उगा नको ते वाद घालण्यापेक्षा, दुसरे काही विषय चर्चेला घेतले तर बर होइल. मग अगदी कुंकु सुद्धा चालेलं "
  • Log in or register to post comments

+१००

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/31/2013 - 09:30 नवीन
+१००.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धार्थ ४

खर सांगायच तर शिवकालीन

शैलेन्द्र
गुरुवार, 01/31/2013 - 09:15 नवीन
खर सांगायच तर शिवकालीन महाराष्ट्रात जाती होत्या पण तो जातीयवादी नव्हता, आणि तिच त्याची शक्ती होती. अनेक ब्राम्हण तलवार गाजवायचे, जिवा महाला नावाचा न्हावी तरबेज पटाइत होता. जातीतुन जातियवाद चालु झाला तो पेशवाईत.
  • Log in or register to post comments

जातीतुन जातियवाद चालु झाला तो

चौकस२१२
Tue, 01/04/2022 - 09:02 नवीन
जातीतुन जातियवाद चालु झाला तो पेशवाईत. आता दोन्ही संपला ना ? ना शनिवार वाडा ना सातारा ना कोल्हापूर मग हे काय चाललंय ? ब्रिगेडी च? अन त्यांमागच्या "जाणत्या राजाचे" कोणत्याही ३.% च्या घरात जर कोना ऐतिहासिक महान व्यक्तीचा फोटो असले आर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा.. बाजीरावांचा नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

शंका

आजानुकर्ण
गुरुवार, 01/31/2013 - 09:40 नवीन
अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल.
जर शिवाजीराजांच्या पूर्वी भारत शतकानुशतके पारतंत्र्याच्या अंधकारात होता, आणि त्यामुळे महाराष्ट्रील ब्राम्हणांची राज्याभिषेक करायला मिळण्याच्या संधीची अनुपलब्धता होती तर तीच अनुपलब्धता भारतातीलच गागाभट्टांना लागू होत नाही काय? की त्या काळात उत्तरेत काही राज्याभिषेक करण्याच्या संधी गागाभट्टांना मिळाल्या होत्या?
  • Log in or register to post comments

हो.

प्रचेतस
गुरुवार, 01/31/2013 - 09:50 नवीन
हो. उत्तरेतल्या औरंगजेबाच्या मांडलिक राजपूत राजांपैकी काही जणांचे राज्याभिषेक गागाभट्टांनी केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

धन्यवाद

आजानुकर्ण
गुरुवार, 01/31/2013 - 09:52 नवीन
माहितीबद्दल आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दुसरी गोष्ट

आजानुकर्ण
गुरुवार, 01/31/2013 - 09:50 नवीन
प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत.
मला वाटते राज्याभिषेक ही प्राविण्याची गोष्ट नसून procedure ची गोष्ट असावी. येथे तलवारबाजीशी तुलना चुकीची वाटते. उदा. पुस्तक वाचून पोहता येणार नाही, मात्र गणपती प्रतिष्ठापना नक्कीच करता येईल. त्याचप्रमाणे पुस्तक वाचून तलवारबाजी करता आली नाही तरी राज्याभिषेक करता यावा. शिवाजीमहाराज जातीयवादी होते यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र हे सिद्ध करण्यासाठी वापरलेले एकंदरीत argument चुकलेले वाटते.
  • Log in or register to post comments

अस्सं

सृष्टीलावण्या
गुरुवार, 01/31/2013 - 12:21 नवीन
मला वाटते राज्याभिषेक ही प्राविण्याची गोष्ट नसून procedure ची गोष्ट असावी. प्राविण्याशिवाय प्रोसीजर करता येते आणि ती पण राजाभिषेकासारखी, अत्यंत तोलामोलाची, हे माहित नव्हते. असो. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

असे असेल कदचित..

यसवायजी
गुरुवार, 01/31/2013 - 22:56 नवीन
पुस्तक वाचून पोहता येणार नाही, मात्र गणपती प्रतिष्ठापना नक्कीच करता येईल
म्हंजे पहा.. लग्नातले विधी करणारे वेगळे.. आणी 'घाटावरचे विधी' करणारे वेगळे.. घाटावरच्यांना लग्नात नेऊन कसे चालेल?? बर त्यावेळचे इथले, प्रतिष्ठापना एकवेळ वाचुन करतील, पण म्हणुन काय आपल्या राजा-शिव-छत्रपतींचा राज्याभिषेक बुकं वाचुन करायचा? तिथं experienced गागाभट्टच हवेत.. कसें?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

खरेच आहे...

सृष्टीलावण्या
Fri, 02/01/2013 - 09:45 नवीन
आपल्या राजा-शिव-छत्रपतींचा राज्याभिषेक बुकं वाचुन करायचा? तिथं experienced गागाभट्टच हवेत.. कसें?
१०० टक्के सहमत. जातीद्वेषाचा आधुनिक चष्मा लावून शिवरायांनी घेतलेले अनेक निर्णय चुकीचे कसे होते हे सांगण्यासाठी काही मंडळी इतका केविलवाणा अट्टाहास का करतात तेच कळत नाही. विशेषकरून एऱ्हवी ज्यांच्याकडून सुसंगत विचारांची अपेक्षा करावी ते पण असे कसे लिहितात कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

बर त्यावेळचे इथले,

गवि
Fri, 02/01/2013 - 10:32 नवीन
बर त्यावेळचे इथले, प्रतिष्ठापना एकवेळ वाचुन करतील, पण म्हणुन काय आपल्या राजा-शिव-छत्रपतींचा राज्याभिषेक बुकं वाचुन करायचा? तिथं experienced गागाभट्टच हवेत.. कसें?
तत्समच लहानपणापासून आम्ही गावाकडे लग्नसणादि खास प्रसंगी, गावातली कापडपेठ सोडून "बाँबेवरुन कापडं" आणतोच की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

सर्वसामान्य ब्राम्हण जरी

पिंपातला उंदीर
गुरुवार, 01/31/2013 - 09:52 नवीन
सर्वसामान्य ब्राम्हण जरी कधीही शिवरायांच्या विरुद्ध नसला तरी काही धार्मिक मुखंड नक्कीच वेगळा विचार करणारे होते यात शंका नाही. राजर्षी शाहू महाराजना पण या मुखंडानचा फटका बसला होता.
  • Log in or register to post comments

हुं

सृष्टीलावण्या
गुरुवार, 01/31/2013 - 12:24 नवीन
काही धार्मिक मुखंड नक्कीच वेगळा विचार करणारे होते यात शंका नाही.
ते कसे काय बुवा.. इतकी खात्रीशीर विधाने करण्याचा आधार काय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

@महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/31/2013 - 10:00 नवीन
@महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनाराजाभिषेकाचा विधी माहित नव्हता.>>> =)) =)) =)) प्रचंड विनोदि युक्तीवाद
  • Log in or register to post comments

+१ विनोदी युक्तिवाद

मालोजीराव
गुरुवार, 01/31/2013 - 11:45 नवीन
....बुवांनी आन मी ५०० वर्षांपूर्वीच 'राज्याभिषेक कसा करावा' ,'तुमचा राज्याभिषेक तुम्हीच शिका' आणि '७ दिवसात राज्याभिषेक विधी शिका' असे लेख मिपा वर प्रकाशित केले होते.परंतु नेमकं १६७०-१६७५ या काळात काही तांत्रिक अडचणींमुळे मिपाचा सर्वर डाऊन असल्याने विधी सापडला नसावा...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मालोजी.... ऐसे लिहोन...मजसी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/31/2013 - 12:11 नवीन
मालोजी....=)) ऐसे लिहोन...मजसी का मारिले तुंम्ही..हसवून हसवून =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

खरंय बुवा....हसू नका..

मालोजीराव
गुरुवार, 01/31/2013 - 14:25 नवीन
खरंय बुवा....हसू नका...गागाभट्ट सायबानी आपले लेख ढापून एकत्र करून 'राज्याभिषेक प्रयोग ' ग्रंथ लिहिलाना ...आहात कुठे...अजून मानधन पोचला नाय...बुवा तुमी एकट्यानं नाय न खाल्लं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@बुवा तुमी एकट्यानं नाय न

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/31/2013 - 14:44 नवीन
@बुवा तुमी एकट्यानं नाय न खाल्लं>>> =)) =)) बास.... बास अता. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

आपसांत

सृष्टीलावण्या
Fri, 02/01/2013 - 09:51 नवीन
चाललेला संवाद वाचून एक कथा आठवली... एकदा एक गाढव आणि माकड परस्परांना उद्देशून म्हणतात, अहाहा काय तुझे सुंदर रूप, अहाहा काय तुझा स्वर्गीय आवाज... कृपया ही करमणूक थांबवू नये ही विनम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

उंट उंट, माकड नाही. बाकी चालू

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 02/01/2013 - 12:08 नवीन
उंट उंट, माकड नाही. बाकी चालू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

मूळ श्लोक असा आहे:

बॅटमॅन
Fri, 02/01/2013 - 12:12 नवीन
मूळ श्लोक असा आहे: उष्ट्रानां च गृहे लग्नं गर्दभा: स्तुतिपाठका: | परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम् अहो ध्वनि:||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

च्यायला या विसर्गाचापण एक

बॅटमॅन
Fri, 02/01/2013 - 12:13 नवीन
च्यायला या विसर्गाचापण एक स्मायली झालेला दिसतोय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आणि स्मायली पण लै भारी झालीय.

प्रचेतस
Fri, 02/01/2013 - 12:20 नवीन
आणि स्मायली पण लै भारी झालीय. डोक्याला चावी मारमारून शेवटी झिंज्या उपटणारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

झिंज्या उपटणारी नै तर

बॅटमॅन
Fri, 02/01/2013 - 12:23 नवीन
=)) झिंज्या उपटणारी नै तर डोक्यावर हात मारणारी :| =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

थेट डोक्यावर पण नै. टू बी

प्रचेतस
Fri, 02/01/2013 - 12:33 नवीन
थेट डोक्यावर पण नै. टू बी स्पेसिफिक-कपाळावर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कपाळ-करवंटी ती हीच काय

बॅटमॅन
Fri, 02/01/2013 - 12:38 नवीन
कपाळ-करवंटी ती हीच काय =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आउटकम

विकास
Fri, 02/01/2013 - 21:33 नवीन
चला या धाग्याच्या निमित्ताने काहीतरी शिकायला मिळाले. एक शब्द पण न लिहीता स्वतःच्या भावना कशा व्यक्त करायच्या ते! :| =)) ت ツ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आम्हाला पण शिकवा की ही

आनन्दिता
Fri, 02/01/2013 - 23:26 नवीन
आम्हाला पण शिकवा की ही स्मायली.... लै भारी आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?'

मालोजीराव
Fri, 02/01/2013 - 12:32 नवीन
सृ ला, विमे,ब्याट,वल्ली .....मानधनातील काही वाटा मिळेल या अपेक्षेनी जर तुम्ही बुवा आणि माझ्या संवादशृंखलेत आला असाल तर लक्षात असू द्या एक फुटकी 'शिवराई' हि मिळणार नाही कुणाला ! भट्ट सायबांकडून मानधन कसं काढून घ्यावं यावर सल्ले घेणारा /मागणारा रीतसर धागा येइलच त्यावर कायदेतज्ञांनी मते द्यावीत हि विनंती. असो...बुवांबरोबर 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' हे जळजळीत सत्य बाहेर आणणारे पुस्तक लिहित आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हॅहॅहॅ.

प्रचेतस
Fri, 02/01/2013 - 12:38 नवीन
हॅहॅहॅ. बाकी तुमच्याकडून आधीच एक अस्सल शिवराई मिळाल्यामुळे आम्ही तुमच्या ऋणात आहोत. :) याउप्परी इतर कसल्याही मानधनाची जरूरी नोहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

तुम्ही पुस्तके लिहाच, आम्ही

बॅटमॅन
Fri, 02/01/2013 - 12:39 नवीन
तुम्ही पुस्तके लिहाच, आम्ही त्यावर आधीच बंदी आणण्याची तितकीच जळजळीत घोषणा करीत आहोत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

बुवांबरोबर लिहितोयेस?

सूड
Fri, 02/01/2013 - 13:04 नवीन
मग काव्यसंग्रह लिही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

@बुवांबरोबर 'राज्याभिषेकाचे

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/01/2013 - 21:51 नवीन
@बुवांबरोबर 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' हे जळजळीत सत्य बाहेर आणणारे पुस्तक लिहित आहोत.>>> Image removed. मेलो मेलो ,मालो-जी राव ठार झालो Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

म्हणजे?

विकास
Fri, 02/01/2013 - 21:54 नवीन
'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' हे जळजळीत सत्य बाहेर आणणारे पुस्तक लिहित आहोत. राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार शिवाजी महाराज नव्हतेच असे म्हणणे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ...

सृष्टीलावण्या
Sat, 02/02/2013 - 12:34 नवीन
नाट्यछटाकार दिवाकर म्हणतात, "भेंडीरमणाने उठावे, बटाटेनंदनाची स्तुती करावी, बटाटेनंदनाने पुढे यावे, भेंडीरमणाची वाहवा करावी, याने त्याला शेली म्हणावे, त्याने याला कीट्स म्हणावे! चालला आहे सपाटा! असे केल्याशिवाय जगात भागत नाही!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

काही दुवे

आजानुकर्ण
गुरुवार, 01/31/2013 - 10:01 नवीन
येथे दोन दुवे मिळाले. हे दोन्ही लेखक मला माहीत नाहीत. मात्र दोन्ही लेखकांनी बी-ग्रेडी दाव्यांना थोडेसे समर्थन दिल्यासारखे वाटते. १. social history of india पान 245 ( दुवा २. छत्रपती शिवाजी (ले. भगवानसिंग राणा) पान ७७ (दुवदुवा
  • Log in or register to post comments

दुवे गंडल्यासारखे वाटतात

आजानुकर्ण
गुरुवार, 01/31/2013 - 10:02 नवीन
असो. गूगल बुक्स वर शोधता येईल पहिल्या पुस्तकाचे लेखक एन सदाशिवन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

दुवे दुरुस्त केलेत.

प्रचेतस
गुरुवार, 01/31/2013 - 10:06 नवीन
दुवे दुरुस्त केलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

बाकी हे दोन्ही लेखक कितपत

प्रचेतस
गुरुवार, 01/31/2013 - 10:16 नवीन
बाकी हे दोन्ही लेखक कितपत विश्वसनीय आहेत याची शंका वाटते. मोडीशी परिचय नसल्यामुळे (अर्थात दफ्तरातील तत्कालिन मोडीतील साधनांविषयी परिचय न झाल्यामुळे ) विख्यात इतिहास संशोधक सर जदुनाथ सरकारांनी शिवरायांविषयी कित्येक चुकीची विधाने केलेली आहेत (याविषयी बॅटमॅन अधिक सांगू शकेल). तसेच या संशोधकांबाबत होणे सहज शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

भगवानसिंह राणा यांच्या

बॅटमॅन
गुरुवार, 01/31/2013 - 11:56 नवीन
भगवानसिंह राणा यांच्या पुस्तकातील एतत्संबंधी भाग सदाशिवन यांच्या पुस्तकातून उतरून घेतल्यागत वाटतोय. बाकी सदाशिवन यांच्या पुस्तकातील भाग पाहिला. सभासद बखरीची कॉपी केलीये बस्स. ५०,००० लोक वगैरे उल्लेख तिथेच आहेत. बाकी त्यांच्याच मते असेही दिसते, की जुनी मातब्बर मराठा घराणी शिवाजीमहाराजांचे स्वामित्व मानण्यास राजी नसण्याने त्यांनी तो कर्मठ दृष्टिकोन उचलून धरला. म्हणजे काही ब्राह्मणांमुळे नव्हे, तर मराठ्यांमुळे महाराजांना त्रास झाला असे दिसते त्यांच्या पुस्तकावरून!!! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कसं काय बॉ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/31/2013 - 23:19 नवीन
>>>विख्यात इतिहास संशोधक सर जदुनाथ सरकारांनी शिवरायांविषयी कित्येक चुकीची विधाने केलेली आहेत वल्लीशेठ, सर जदूनाथ सरकारांनी कोणकोणती शिवरायांविषयी चुकीची विधानं केली आहेत ? महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत कोणती मंत चूकीची वाटतात त्याची कारणं काय ? सर जदुनाथांची विधानं चूकीची आहेत कोणत्या संदर्भग्रंथावरुन सर जदुनाथांची मंत ही चूकीची आहेत, असा निष्कर्ष काढता येतो ? माहिती देता आली तर जरुर द्यावी. सर जदूनाथांचं शिवाजी अ‍ॅन्ड हीज टाइम या पुस्तकातील राज्याभिषकाचं प्रकरण इतक्यात चाळलं आहे. (वाचलं नै हं) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

राज्याभिषेकाबद्दल असं नाही पण

प्रचेतस
Sat, 02/02/2013 - 13:01 नवीन
राज्याभिषेकाबद्दल असं नाही पण एकूणात महाराजांच्या चरित्राबद्दल जदुनाथ सरकारांनी समकालीन मोडीतील कागदपत्रांचा (मोडी येत नसल्याने) अभ्यास केला नाही. ते मुख्यतः इंग्रजी, डच, पोर्तुगीझ, फ्रेंच आणि फारसी कागदपत्रांवरच विसंबून राहिले. अस्सल मराठी साधनांशी परिचय न झाल्याने शिवाजीबद्दलच्या इतिहासात त्यांच्याकडून बर्‍याच त्रुटी राहिल्या आहेत. याबद्दल नेमकी माहिती मजजवळ नाही म्हणूनच वर बॅटमॅन अधिक सांगू शकेल असे लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा