Skip to main content

लैंगिक शिक्षणाचे व्यावहारीक महत्त्व

लेखक शुचि यांनी मंगळवार, 22/01/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुद्दा मांडायचा प्रयत्न करते - आम्हाला जेव्हा शाळेत लैंगिक शिक्षण मिळालं तेव्हा फक्त "मासिक धर्म" या विषयावर सांगीतले गेले. अजूनही भारतात तीच स्थिती आहे की आता गुप्तरोग/ एडस आदि रोगांची माहीतीदेखील सांगीतली जाते? कारण चित्रपट, कादंबर्‍या आदिंमधून सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते. सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात? वास्तव म्हणजे 'सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात. शारीरीक संपर्काशिवाय किंवा अगदी अचूक सांगायचे झाले तर "बॉडी फ्लुईड एक्स्चेंज" शिवाय आनंद कसा मिळवायचा आदिची माहीती देणे आदि "लैगिक शिक्षणांतर्गत" अंतर्भूत नाही काय? शिक्षक-पालक साधारण कधी ही माहीती देतात? आणि देत नसतील तर हे आवश्यक नाही का? "एकच सहचारी (पार्ट्नर)" हे एक मूल्य यापेक्षा व्यावहारीक स्तरावर किती महत्त्वाचे आहे याचा कशी उहापोह झालेला माझ्या माहीतीत नाही. नैतिक मूल्य-मूल्य म्हणून ती डोक्यावर घेतलेली गोष्ट आहे पण त्याच गोष्टीला जबरदस्त व्यावहारीक मूल्य आहेच हे कधी हायलाईट होत नाही ते. मुलांशी मनमोकळेपणाने बोलणे हे नैतिकतेइतकेच किंबहुना जास्त व्यावहारीक (प्रॅक्टिकल) पातळीवरुन व्हायला पाहीजे. असो. या विषयावर गंभीर आणि संयत प्रतिसादांची अपेक्षा मिपाकरांकडून ठेवली तर वावगे ठरेल का? आशा करते लेखामागची भूमिका जाणवून मग प्रतिसाद येतील. नुसता कळफलक बडवला असे होणार नाही. नाना स्तरांतून, नाना वयाच्या, प्रगल्भतेच्या, व्यवसायीक स्तरांमधून आलेल्या व्यक्ती मिपावर वावरतात तेव्हा ही अपेक्षा अवाजवी ठरु नये.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 52141
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

शब्दरचनेशी नाही, पण मताशी सहमत. पूर्वीच्या काळी एड्स विषाणू अस्तित्वात असला तरी अक्राळविक्राळ स्वरुपात पसरलेला नव्हता. त्यामुळे अवेअरनेस आता जास्त आवश्यक झाला आहे. पूर्वी होणारे एड्सखेरीजचे गुप्तरोग बहुतांश पेनिसिलिन अथवा अन्य इंजेक्शनांनी बरे होऊ शकत असतील आणि थेट जिवावर उठत नसतील अशी शक्यताही नाकारता येत नाही. सर्वायकल कॅन्सरला जन्म देऊ शकणारा Human papillomavirus कदाचित पूर्वी कर्करोगाचं कारण म्हणून तितका ज्ञात नसेल. त्यामुळे सर्वायकल कॅन्सर झालेल्या स्त्रियांना नुसतंच दुर्दैवी ठरवण्यात येत असेल. त्याचा लैंगिक आयुष्याशी संबंध असू शकतो हेही माहीत नसेल.. ही फक्त उदाहरणं.. तस्मात शिक्षणाची आवश्यकता आहेच. फक्त सर्व बाजू शिकवण्यात याव्यात. आणि "शिक्षण" पेक्षाही अवेअरनेस (जाणीव!?) असं त्याचं स्वरुप असावं. अवांतरः "पूर्वीच्या (आमच्या) काळी" आणि "हल्ली" अशी तुलना करताना निर्माण होणार्‍या गडबडींमागची कारणं पाहणारी प्रातिनिधिक उदाहरणं जुन्या पिढीतल्याच एका प्रख्यात आय सर्जनने दिली होती: १. पूर्वीच्या काळी बायकांचे डोळे ठणठणीत असायचे. नजर अगदी तांदळातला खडा काढण्याइतकी किंवा सुईत दोरा ओवण्याइतकी तीक्ष्ण. हल्ली बघावं तर सर्वांना चष्मे.. आरोग्य बिघडलंय खरं. - वास्तविक पूर्वीच्या काळी बायका जास्तीतजास्त वेळ घरात असायच्या. एका मर्यादेपलीकडे दूरचं पहायची वेळ / आव्हान आयुष्यात फारच कमी. त्यामुळे घरातल्या घरात काम होऊन जायचं. दूरचं नीट दिसत नाही याची खरोखर जाणीव नव्हती. निकटचं खराब दिसण्याचा दोष (चाळिशीत) आला की मगच तो जास्त जाणवायचा आणि चष्मा आणला जायचा. २. तेच "हल्ली" लहानपणी चष्मा लागण्याविषयी. पूर्वी मुलांना दृष्टिदोष होतेच. चष्मा लागणे हा विशिष्ट दोष डोळ्याच्या रचनेमुळे होतो, त्यात पूर्वी किंवा आता फरक नाही. (पोषण / खाणेपिणे यामुळे रातांधळेपणा आदि होऊ शकतात, दूरदृष्टिता / निकटदृष्टिता नव्हे.) पूर्वी पोरांचे डोळे तपासलेच जायचे नाहीत आणि ते सतत डोळे ताणून / फाडफाडून अ‍ॅडजेस्ट करुन पाहण्याची सवय लावून घ्यायचे. आणि चष्म्याची गरज वय होईपर्यंत (स्नायू थकून अ‍ॅडजेस्ट होणं बंद होईपर्यंत) जाणवायची नाही. .... पूर्वी वाटीवाटी तूप पिऊनही तब्ब्येती ठणठणीत असायच्या आणि हल्ली कोलेस्टेरॉल वगैरे भानगडी आल्यात असंही म्हटलं जातं. पण अनेकदा तूप पिणारे आणि शंभर जिलब्या उठवणारे ठणठणीत काका "गेले" कसे याचा शोध घेतला तर "पंगतीतच अचानक मान टाकली आणि डोळे फिरवले" असंही दिसतं.. :)

In reply to by गवि

पूर्वी होणारे गुप्तरोग हे पूर्वीच्या वैद्यकशास्त्राप्रमाणे पाहिले तर असाध्य नव्हतेच असेही नाही. पानिपतच्या युद्धाचे मुख्य कारण असलेला रोहिला सरदार नजीबखान लढाईनंतर किती आजारी होता त्याचे वर्णन अस्सल पत्रात दिलेले शेजवलकरांच्या पानिपत १७६१ या पुस्तकात लढाईनंतर किंवा उपसंहार या प्रकरणात आहे- "नजीब अजारी बहुत. छ २२ तारखेस रात्री हातपाये आपटीत होता. सर्वांग सुजले आहे. इंद्रियाचे वाटे रक्त व पू वाहतो, लोकांचा मुजरा पडल्यापडल्या छावणीतच होतो." त्यातच त्याचा अंत झाला, त्यामुळे गुप्तरोग घातक असू शकतो हे नक्की. पण प्रसाराबद्दल सहमत आहे. दळणवळण फार जलद झाल्याने हा विषाणू इतका फैलावलाय की ज्याचे नाव ते. सर्वांगीण अवेअरनेस इज ए मस्ट.

In reply to by बॅटमॅन

गुप्तरोग घातक असू शकतो हे नक्की.
नक्कीच. एकदा गूगलवर इमेजेस शोधून पहा. चूकलेल्या लैंगिकतेचे विदारक रुप दिसेल.

In reply to by बापू मामा

गरज नक्कीच आहे.. काही उच्चशिक्षित लोकंदेखिल जेव्हा हेटाळणीच्या सुरात "षंढ", "वंध्यामैथुन" असे शब्दप्रयोग वापरतात तेव्हा खरच या शिक्षणाची किती गरज आहे हे जाणवतं... मनुष्याच्या कर्तृत्वाचा आणि त्याच्या शरिराच्या प्रजोत्पादक संस्थेच्या कार्याचा संबंध नाही .. मैथुनाचा प्रजोत्पादनाशिवाय किंबहुना त्याहुन अधिक संबंध आनंद मिळवण्याशी आहे.. एवढी मूलभूत माहिती सर्वांना असावी असे वाटते..

In reply to by बापू मामा

काय गरज आहे ह्या लैंगिक शिक्षणाच्या थेरांची. आज आमची पन्नाशीतली पिढी आहे. आम्हाला कोणी लैंगिक शिक्षण दिलं ? अरे, पाण्यात पडल्यावर पोहोता येतं, हेच ( आणी असेच) आम्ही शिकलो. ऊगीच ह्या विषयाचा बाऊ केला जातोय.
ओ गवि, मला ट्रोलनाथ म्हणाला होतात ना. बघा, याला म्हणतात ट्रोलींग.. पडलात ना बळी. ए धत्तड तत्तड, धत्तड तत्तड !!!!!!!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हॅ हॅ.. तो शब्द तुमच्याच एका प्रतिसादातून उचललेला होता, तो प्रतिसाद आवडला होता म्हणून.. ;)

In reply to by बापू मामा

आम्हाला कोणी लैंगिक शिक्षण दिलं ?
ह्म्म्म्म... म्हणजे तुम्हाला "ते" सगळं सगळं नीट माहित आहे तर.. नक्की का ??? की तुम्हाला माहित आहे तेच "सगळं" आहे असे तुम्हाला वाटते ???

लैंगिकतेबद्दल शाळेत शिकवलम जावं हे पटलं - पटतं.. मात्र विद्यार्थांना हे पालकांनी समजावल्यास अधिक उत्तम नाही का? पालक स्वतःच्या पाल्याला जर इतक्या खुलेपणाने सांगु शकत नसतील तर शिक्षकांना हे विद्यार्थ्यांपुढे सांगणे किती अवघड जात असेल याचि कल्पना येऊ शकते. यापेक्षा शासनाने काहि शास्त्रशुद्ध विडियो बनवावेत आणि ते शाळां-शाळांमधून दाखवावेत, ज्यामुळे कोणला 'सांगायची' गरज रहाणार नाही मात्र टार्गेट ऑडियन्सला सगळं काही समजेल. बाकी, सेक्स ही पुनरुत्पादन करण्यासाठी आणि स्त्रियांवर हक्का गाजवण्यासाठी करण्याची क्रिया आहे असे गैरसमज असणार्‍या समाजात योग्य माहिती पाल्यांपर्यंत झिरपायला वेळ हा लागणारच

In reply to by ऋषिकेश

पालकांनी शिकवणं सर्वात उत्तम. काही पालक करतातही. पण आपला समाज कसा आहे याची कल्पना आपल्याला आहेच कि. मुलांशी खुलेपणाने बोलणं भल्याभल्यांना शक्य होत नाही. म्हणून तर शाळेच्या माध्यमातून हा विषय शिकवला जावा ही कल्पना पुढे आली. शिक्षकांना पालकांइतकं जड जाईल असं वाटत नाही. आपल्याकडे मुलांचं पालकांशी असलेलं नातं हेच खुलेपणाच्या आड येतं. मात्र मुलं-मुली यांना एकत्र हे शिक्षण देताना अनेक अडचणी येतात. लैंगिक शिक्षणात फक्त स्वतःची ओळख होणारे बदल आणि त्यांना सामोरं कसं जायचं तसंच विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल वाटणा-या आकर्षणाचं शात्रीय उत्तर इतकंच असेल अशी माझी कल्पना आहे. विकर सेक्सबद्दचा मानवतावादी दृष्टीकोण आणि सन्मानजनक व समतावादी वागणूक या गोष्टी संस्कारातून यायला हव्यात. ते शाळेत होत नसेल तर गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.

अवेअरनेस कोणत्या बाबतीत द्यावा यालाही काही मर्यादा आहेत. अरे, भुकेलेलं लेकरु आई कडून अगदी जन्मताक्षणीच गरज भागवितं. त्याला पोट कसं भरायचं हे कोणी शिकवितं ? तसेच या विषयाचे आहे. ऊलट या विषयावर (एडस, कंडोम ) इतके साहित्य रस्तो रस्ती ,अगदी बस च्या पार्श्वभागीही उपलब्ध आहे, कि वेगळे शिकवायची काय गरज आहे?

In reply to by बापू मामा

अवेअरनेस कोणत्या बाबतीत द्यावा यालाही काही मर्यादा आहेत.
या मर्यादा कोण ठरवतं आणि कशाच्या आधारावर? लैंगिक शिक्षण म्हणजे पोर्नोग्राफी बघण्याचा राजमार्ग नव्हे.
ऊलट या विषयावर (एडस, कंडोम ) इतके साहित्य रस्तो रस्ती ,अगदी बस च्या पार्श्वभागीही उपलब्ध आहे, कि वेगळे शिकवायची काय गरज आहे?
रादर म्हणूनच वेगळे सांगायची गरज आहे. नुसत्या कंडोमच्या काहिराती पाहून किंवा मुतार्‍यांतून मर्दाना ताकत, हवा भरून साईज ठीक करणे, वगैरे जाहिराती असतात त्या पाहून जर शिक्षण होईल असे वाटत असेल तर तुमची कीव करावी तितकी थोडीच आहे. शिवाय, मुळात इतके सगळे उपलब्ध असले तरी सेक्स इज टॅबू हे लहानपणापासून शिकवले जाते त्याची काय वाट? पन्नाशीच्या पिढीच्या बालपणात, लैंगिकतेसंबंधी साधी शंका विचारली तरी कसा मार मिळायचा ते डोळेआड केलेत वाटतं. लैंगिकतेची ओळख पिवळ्या पुस्तकांतूनच व्हावी आणि लग्न होईपर्यंत त्या रोगट फँटसीज हाच एकमेव आधार असावा ह्यालाच तुम्ही जर ठीक आहे असे म्हणत असाल तर मग अरसिकेषु कवित्व कशाला करू?

In reply to by बापू मामा

ऊलट या विषयावर (एडस, कंडोम )इतके साहित्य रस्तो रस्ती ,अगदी बस च्या पार्श्वभागीही उपलब्ध आहे, कि वेगळे शिकवायची काय गरज आहे?
अगदी म्हणूनच या विषयावर 'आधिकारीक' पातळीवर शिकवायची गरज आहे. हल्लीच्या पिढीकडे भरपूर माहिती आहे, त्यांना ती तुम्ही लिहिली आहे तशा अनेक मार्गांनी ती मिळत असते. त्यातील योग्य कोणती, अयोग्य कोणती, उपयुक्त कोणती आणि अपायकारक कोणती, आयोग्यपूर्ण कोणती हे सांगायला त्या क्षेत्रातील अधिकारी माणसाने माहिती देणे अधिकच गरजेचे झाले आहे

आपली माघार ! आजकाल भाच्चे कंपनीच इतकी बुद्धिमान झाली की ती मामाचा "मामा" करतील. लैंगिक शिक्षण म्हणजे पोर्नोग्राफी बघण्याचा राजमार्ग नव्हे. सहमत. अगदी म्हणूनच या विषयावर 'आधिकारीक' पातळीवर शिकवायची गरज आहे. म्हणजे अधिकारी व्यक्ति कोण? व तिने एक्झॅक्ट काय करावे?

In reply to by बापू मामा

शाळेतील प्रशिक्षित शिक्षक, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञाकडून समुपदेशन घेऊन योग्य शब्दात पाल्याला माहिती देऊ शकणारे पालक (किंवा या विषयाचे शिक्षण देणारे अधिकृत शासकीय कार्यक्रम, हे अजून सुरू व्हायचेत म्हणतात)

(नववी पासून) काही प्रमाणात याबद्द्ल माहिती देण्यात आली आहे, मी अजून ते पुस्तक पाहिले नाही. त्याबद्दल फक्त ऐकले आहे. एक मात्र नक्की, पूर्वीपेक्षा आज सर्व माहिती सहज उपलब्ध असल्याने मुलांपर्यंत पोहोचणारी माहिती योग्य दिशेने आहे की नाही हे पाहणे, सजगतेने लक्ष ठेवणे आणि गरज पडेल तेव्हा योग्य दिशा दाखवणे हे महत्त्वाचे आहे. लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतून याबाबत पालकांसाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

खरतर इथले प्रतिसाद वाचुन काही समजेल अशी आशा होती. पण आता मीच बोलते. या बद्दलच शिक्षण आवश्यक का? एक अनुभव. कॉलेजात मैत्रीणीच्या भावाच लगन झाल. त्यावेळच्या अन आताच्याही मत प्रवाहापणे "इतक्यात नको" असा सगळ्यांचा भर होता. मग नविन लग्नाच्या दोघांनाही घरच्या "फॅमिली डॉकटर" कडे पाठवण्यात आले. डॉकटर काकांनी मुलाला लहानाच मोठ होताना पाहिलेले. मग त्याम्नी कंडोम घेउन ते कसे वापरायचे ते हाताच्या अंगठ्याचा वापर करुन सागितले.इकडे महिन्याभरात उलट्या सुरु. नवरा तावला, बायको त्याच्यावर गरम. मग हे कस झाल हे पहायला डॉक्टरकाकांकडे. डॉक्टरांनी जेंव्हा खर कारण ऐकल तेंव्हा त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला. मैत्रीणीच्या भावाने डॉक्टरांच्या सांगण्याबरहुकुम कंडोम अंगठ्यावर चढवलेलं. मैत्रीण सांगत होती,"माझी वहिनी इतकी चिडली होती सांगु. काहीही माहिती नाही अन लग्न करतात म्हणाले भावाला." आता हे ऐकताना मग नक्की कस वापरायच कंडोम अन कंडोम म्हणजे काय हे प्रश्न आम्हालाही पडले होते. अन आज माझी १४ वर्षे कन्या शाळेत टिचरला आम्ही प्रोटेक्शनवरुन चिडवल म्हणुन सांगत येते. कंडोम क्लास मध्ये आणुन दाखवले गेले. माझ एकच तत्व आहे, ऐकताना चेहर्‍यावर कोणतेही भाव आणायचे नाहीत. तिला कस सांगायच हे ज्ञान मला नाही. नवरा तर सपशेल पळ काढतो. मग तिला जी सर्वंकश माहिती शाळेत मिलतेय त्याला निदान काहीतरी हॉरीबल असल्यासारखे रिअ‍ॅक्ट न करणे एव्हढा शहाणपणा मला कळतो. बाकि कधी तिनेहोउन काही विचारल तर मी जमेल तेव्हढ शांतपणे उत्तर देते. तरी माझी मुलगी १४ वर्षाची आहे. इथे ६ वी पासुनच हा विषय तज्ञ बोलावुन शिकवला जातो. मी प्रायमरी शाळेत व्हॉलेंटीअर करते.एकदा स्टाफरुम मध्ये ६वीची क्लास टिचर आली अन साम्गु लागली. माझ्या वर्गातली मुल जमिनीवर पडुन गडाबडा लोळत होती, अन त्यांच्या डोळ्यातुन पाणी गळत होत. व्हाय शुड वी मास्टरबेट हा प्रश्न विचारला त्यांनी त्या त्ज्ञाला अन तो सांगतो दॅट इज यॉर नीड. म्हणजे जेम्व्हा मुलांना अजुन या भावनेची ओळखसुद्धा नाही तेंव्हाच या गोष्टी सांगुन, जेंव्हा त्यांना याची गरज भासेल तेंव्हा आपण असे का वागतोय या गोष्टीचा ताण नाहीसा होत असावा. आता याचा परिपाक म्हणजे माझ्या मैत्रीणीच्या सहावीच्या पोरीने त्याच दिवशी कारमध्ये शिरल्या शिरल्या तिच्या एक वर्ष मोठ्या भावाला आईवडिलांसमक्ष विचारल्"डु यु मास्टरबेट" अन बिचार पोरग आई बाप सारे लालेलाल झाले. पण एकुण मला वाटत ते हे की त्यामागचा स्ट्रेस नाहीसा झालाय, जो आमच्याबाबतीत होता.

In reply to by स्पंदना

मैत्रीणीच्या भावाने डॉक्टरांच्या सांगण्याबरहुकुम कंडोम अंगठ्यावर चढवलेलं.
हा विनोद म्हणून एका डॉक्टर मित्राने सांगितला होता. हा किस्सा ऐकीव असावा असं वाटतं कारण खरं असं घडेल असं वाटत नाही. पण तुम्हाला खात्री असेल तर मला त्या भावाचं आश्चर्यच वाटेल. बाकी सध्याचं वातावरण बघता 'बलात्कार किंवा एड्स काय आहे?' हा प्रश्न यायच्या आधी 'सेक्स' काय आहे' ते मुलांना सांगायला हवं. आमच्या काळात याच्या शिकवणीची सुरवात 'घाणेरड्या जोक्स'नी व्हायची. अनेक वेळा हे जोक्स अनैतिकतेच्या सीमा ओलांडत. आठवी-नववी पर्यंत साधारण सगळं बिट्स अँड पिसेस मध्ये कळलेलं असायचं. वर्गात सो कॉल्ड सज्जन मुलं यापासून दूर असायची. त्यांना असले जोक सांगितलेले आवडत नसायचं. पुढे बाहेरच्या राज्यातल्या मुलांमुळे आपणही किती 'सज्जन' आहोत हे कळलं. :)

In reply to by दादा कोंडके

बाकी सध्याचं वातावरण बघता 'बलात्कार किंवा एड्स काय आहे?' हा प्रश्न यायच्या आधी 'सेक्स' काय आहे' ते मुलांना सांगायला हवं. आमच्या काळात याच्या शिकवणीची सुरवात 'घाणेरड्या जोक्स'नी व्हायची. अनेक वेळा हे जोक्स अनैतिकतेच्या सीमा ओलांडत. आठवी-नववी पर्यंत साधारण सगळं बिट्स अँड पिसेस मध्ये कळलेलं असायचं. वर्गात सो कॉल्ड सज्जन मुलं यापासून दूर असायची. त्यांना असले जोक सांगितलेले आवडत नसायचं. पुढे बाहेरच्या राज्यातल्या मुलांमुळे आपणही किती 'सज्जन' आहोत हे कळलं.
वाक्यावाक्याशी सहमत!!

In reply to by दादा कोंडके

कदाचित त्या जोकचा मुळ हिरो हेच साहेब असावेत. कारण भावाच ल्ग्न झाल होत हे खर अन ती याबरोबरच बाकिचे किस्सेही सांगायची.कधी वहिनीच्या भाज्या, आईचा बदललेला नूर, अन मेन म्हनजे वहिनी हिच्या पिढीची आसल्याने त्या दोघीतला संवाद. शरीराला स्वतःच्या गरजेची जाणिव होती, पण डॉक्टरनी सांगीतलय म्हणजे असाव काहीतरी हा विचारही असु शकतो. अगदी प्रोफेशनल कोर्सेस होइपर्यंत कंडोम म्हणजे काय हे प्रत्यक्ष न बघितलेली मुल अजुनही असतात. अन आपल्याला साधा, सरळ मुलगा अथवा मुलगी हवी असते. मग ते साधे सरळ व्यक्तीमत्व, सार्‍याच बाबतीत साधे सरळ सज्जन असणार नाहीत का?

In reply to by स्पंदना

मला एकच प्रश्न पडलाय.. जर बायकोला प्रेग्नंट कसं करायच एवढं समजलं, तर कंडोम वापरायच कसं हे नाही समजलं? म्हण्जे हे काही रॉकेट सायन्स नाही.. कॉमन सेन्स आहे.. अवांतरः- माझी आजी आपण जर नवीन लग्न झालेल्या मुलीला "अजुन लहान आहे ती.. समजत नाही.." ह्या टाईप च काही बोललो तर म्हाणायची की "गरोदर व्हायच कळलं ना.. मग कशी ती लहान?"

In reply to by पिलीयन रायडर

जर बायकोला प्रेग्नंट कसं करायच एवढं समजलं, तर कंडोम वापरायच कसं हे नाही समजलं? म्हण्जे हे काही रॉकेट सायन्स नाही.. कॉमन सेन्स आहे..
सहमत आहे.

In reply to by शुचि

त्या मुलीच्याही (त्याच्या बायकोच्या) ते लक्षात आले नव्हते हे तुमच्या लक्षात आले नाही वाटते:-)

पण एकुण मला वाटत ते हे की त्यामागचा स्ट्रेस नाहीसा झालाय, जो आमच्याबाबतीत होता. ह्या एका वाक्याने लैंगिक शिक्षणाचा उद्देश सफल झाला म्हणायला हरकत नाही.

शिक्षण तर हवंच कारण आता माहिती मिळवण्याचे मार्ग (तेही जास्त करुन चुकीचेच...) आहेत.. त्यामुळे काहीतरी येड्पटासारखे समज असतात लोकांचे.. माझी आई मुलांच्या शाळेत शिकवायची तेव्हा नातु असलेल्या शिक्षिकांना ८-१० तली मुलं गलिच्छ पत्र लिहायची.. एकदा तर एका नवीन तरुण बाईंना असं पत्र आलं.. रडली बिचारी खुप.. तिला त्या मुलां समोर जाउन शिकवाव वाटेना. मी पण एकदा गेले होते आईच्या शाळेत त्या मुलांचा नाच बसवायला, तर ते अशा पद्धतिनी जवळ गोळा व्हायचे की मला मी कधी इथुन पळुन जाते असं व्हायचं. ६-७ तल्या मुलांच्या नजरा हपापलेल्या असु शकतात.. ५वी तला मुलगा बस मध्ये तुम्हाला नको तिथे हात लावायचा प्रय्त्न करु शकतो.. आता आई कन्या शाळेत आहे.. आणि तिथेही अचाट प्रकार घडत असतात.. मुळात हे मुला-मुलिंची वेगळी शाळा हाच मोठा मुर्खपणा आहे.. मुलं काहीतरी पाहतात्..तेच खरं समजुन बसतात.. आणि हाच मुलगा पुरुष बनुन बायको कडुन तशाच अपेक्षा ठेवतो.. आता आम्च्यावेळी हे नव्हतं म्हणुन आताही नको म्हणणं म्हणजे वेडेपणा आहे..

In reply to by पिलीयन रायडर

शिक्षकांना असे अनुभव येत असतील असे वाटले नव्हते :( मुलामुलींच्या वेगळ्या शाळा नकोत. सहमत आहे.
मुलं काहीतरी पाहतात्..तेच खरं समजुन बसतात.. आणि हाच मुलगा पुरुष बनुन बायको कडुन तशाच अपेक्षा ठेवतो..

In reply to by शुचि

तसे परफेक्ट शरीर आपल्या जोडीदाराकडून अपेक्षितात यावर तो लेख होता. हास्यास्पद आहे पण खरच तशी परिस्थिती आहे.
त्याही आधी स्वतःला न्युनगंड येतो त्याच काय? :)

In reply to by जेनी...

२X, ३X ठिक आहे. पण 'बिझार' विडिओ बघितले नाहीत काय? :) याच्यावर मात्रा म्हणजे 'बिहाइंड सिन्स' वाले विडिओ बघणे.

महाराष्ट्र टाईम्स मध्ये एक "सेक्स टॉक" असे सदर येते आणि त्यात या विषयावर बरीच सखोल व सविस्तर माहीती दिलेली असते. हि आहे त्याची लिंक : http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/17833528.cms

एक शंका : हे शिकवलं पाहिजे , ते सांगितलं पाहिजे , आमुक माहिती द्यायला हवी तमुक समजावलं पाहिजे .... सगळे ह्यावरच लेक्चर झाडतायत ... पण ते कस़ समजवाल , काय वाक्यरचना कराल , कशी आणि केव्हा सांगायला सुरुवात कराल .... ह्यावर काहितरि लिहा ... अपर्णाचा प्रतिसाद वाचला पण जे वाचायला मिळेल ह्या अपेक्षेने वाचायला घेतला ते त. तिने सपशेल एका ओळीत संपवलय ... सो प्लिझ आपल्या मुलांना सेक्स ची माहिती कशी सांगाल हे वाचायला उत्सुक आहे .

In reply to by जेनी...

ते काय टेम्प्लेट आहे का पूजा? प्रत्येकाचा संवाद, धाटणी, पद्धत वेगळी. फक्त कोणते मुद्दे कव्हर करायला पाहीजे ते जरी कळलं तरी खूप झालं.

In reply to by शुचि

अरे मग तेच म्हणतेय ... वापराना आपापल्या पद्धती , धाटणी संवाद .. आणि सांगा . तुम्हि लोक फक्त कोणते मुद्दे हाताळायला हवेत हे सांगताय पण कसे हाताळावेत हे कुणीच सांगत नैये ... मग. ंमुलांना काय समजवाणार देव जाने त्यात ' कसं' हा प्रश्न तर कोसो दूर .

पाठ्यपुस्तक, अपेक्षित प्रश्नसंच, आयम्पी असले काही नकोय तिला. डैरेक प्रश्नपत्रिका पायजे. ;)

In reply to by जेनी...

आयती उत्तरे आम्हाला तरी कुठे मिळाली पूजा? पण तरीही, सुरवात होते ती स्वतःच्या शरीरात घडणार्‍या बदलांपासुन. अन आपल्याला काय होतय हा प्रश्न पडलेली मुल म्हणजे स्वतःबद्दल असुरक्षीतता असणारा प्राणी. अश्यावेळी विचार कर माझ्या वरच्या दोन्ही उदाहरणात किती विरोधाभास आहे? लग्न होउनही कंडोममध्ये काही औषध असाव असा विचार करणारा मुलगा, अन शाळेत निवांत एकुण एक प्रकारची कॉन्ट्रॅसेफ्टिव्ह्ज पाहुन आलेली कन्या. मला हे अस का होतय असा घाबरलेला आपल्याकडील एखादा किशोरवयिन मुलगा, अन मास्टरबेशन इज यॉर नीड हे अगदी १२व्या वर्षी ज्याला अजुन त्याची गरज नाही आहे असा मुलगा. एकुण सेक्स एज्युकेशन म्हण्जे तुम्हाला या गरजा आहेत, अन त्या कंप्लीटली नॅचरल आहेत हे सांगण. अगदी पुढ जाउन सांगायच तर मी एकदा माझ्या मुलीला शेवटी सांगितल, नोइंग इट इज डिफर्ंट दॅन एक्स्पेरिअन्सिंग इट बाबा. पण या स्गळ्याच्याही आधी आज तिला एस टी डी बद्दल माहिती असल्याने तो धोका ती जबाबदारी तीला समजत असावी. अन म्हणजे काय? कस? हे सगळ, बिलीव्ह मी, प्लास्टीक डम्मीज आणुन दाखवल्याने त्या बद्दलल्चे सारे प्रश्न निकालात निघालेत. आता हे पालकांना जमणार आहे का? नाही अन म्हणुन मी तरी या फंदात फारशी पडत नाही, बट स्टील आय अ‍ॅम सपोर्टीव्ह. अन हेच मुद्द्याच आहे. तु असा वागु नको हे सांगण्यात काही अर्थ नाही राहिलेला.

In reply to by स्पंदना

अन मास्टरबेशन इज यॉर नीड हे अगदी १२व्या वर्षी ज्याला अजुन त्याची गरज नाही आहे असा मुलगा.
१२ व्या वर्षी गरज नाही हे खरं वाटतं तुला अपर्णा? माझ्या माहीतीत बरीच लवकर ही नीड (गरज) जाणवलेली मैत्रिण आहे तसेच २१ व्या वर्षापर्यंत मासिक धर्म काय हे माहीत नसलेला मित्रही आहे. तेव्हा .... :) ... जाऊ देत.

In reply to by शुचि

डिपेंडस! इंदिव्हिज्युअल नीडस अन डेव्हलपमेंट. व्हॉट कॅन आय से? हा मासिकपाळी माहित नसलेली मुलं मलाही माहित आहेत. कुणी सांगितल तरे समजेल ना?

In reply to by स्पंदना

ह्म्म , म्हणजे पालकानी नेमकि कोणती भुमिका घ्यायला हविय यात,?? अजुन एक तुम्हाला आयती उत्तरं मिळाली नाहित , कबूल कदाचित तुम्हि तुमचे प्रश्नहि कुणापूढे मांडले नसावेत ... पण आत्ता लैंगिकतेवर सर्रास बोललं जातं , प्रश्न मांडले जातायत ... मग त्याची उत्तरं अगदि स्वच्छ मार्गाने आपल्या पूढच्या पिढिला मिळावित रादर त्या़चं पाऊल चुकिचं पडु नये , लैंगिकते विषयि त्यांच्या मनात न्युनगंड निर्मान होऊ नये असं पालकांना नुसतच वाटुन काय फायदा ??? प्रयत्न करायला नकोत ?? कि फक्त काय सांगितलं पायजेल , कुणी सांगितलं पायजेल यावर चर्चा कशाला ?? तुम्हि स्वताहा पालक असाल तर आपल्या पाल्याच्या प्रश्नाना कसे सामोरे जाल ते लिहा अप्पू तु ज्या देशात रहाते तिथे सेक्स बद्दल बिंधास्त बोललं जातं पण जर भारतात असतिस तर हा प्रश्न कसा हाताळला असतास ??? ते सांग ...

In reply to by जेनी...

भारतात असते तर? मला माझ्या मुलीला काऽऽही सांगायची गरज नसती लागली. आजुबाजुच्या वातावरणाने तिला शहाण केल असत. पण तो काही हेल्दी अ‍ॅटीट्युड नाही. मी भारतात असते आणि नसते तरी माझ अपब्रींगींग हे भारतियच आहे. अन तो अ‍ॅटीट्युड आहे लज्जेचा. आपल्याकडे अगदी उत्सर्जनालाही जायच असेल तर हळुच सांगितल जात चार माणसात नाही. मग उंगली दाखवावी लागते. मी आता काय करते तर एक पायरी पुढे जाउन या गोष्टी नैसर्गिक आहेत हे पहिला मी स्वतः स्विकारते. अन फार वेगळ्या पद्धतिने व्यक्त नाही होत. काही विचारल (आता परवाचा बलात्कार, या गोष्टीने फार प्रश्न समोर आणले अन त्यांना तोंड देता देता पूरेवाट झाली) तर जमेल तशी उत्तरे देते नाहीतर मला खरच माहित नाही अशी सरळ सरळ कबुली. मी फार शहाणी आहे अन तू गप्प बस हा अ‍ॅटीट्युड टाळते. नको ते प्रश्न विचारु नकोस हे म्हणन टाळते. आणि एव्हढच बस होत असाव मुलांना आईवडिलांकडुन. एका विशिष्ट सीमा रेषेच्या बाहेर जाउन आपली मत या कोवळ्या वयात सांगण म्हणजे त्यांच्या कोर्‍या पाटीवर आपला ठसा उमटवण होइल अस वाटत मला. म्हणुन लेट हर व्हेंचर हरसेल्फ. फक्त एक गोष्ट करते मी, की आजुबाजुला जे आई इकड , बाप तिकडे दुसर्‍या कुणाबरोबर हे जे सार आहे ते आपण विचार करुन वागलो तर घडायची शक्यता कमी हे सांगाय्चा प्रय्त्न करते. नशिबाने नेबर्स चांगले मिळालेत. समोरची आर्लेट-डेव्हीड, ४९ इअर्स ऑफ मॅरेज, बाजुची हेलन-डेरेक २५ इअर्स ऑफ मॅरेज, पिट्-अ‍ॅन १५ , त्यामुळे कदाचित ती चांगली उदाहरणे पाहुन चांगल काहे शिकेल ही अपेक्षा. डोन्ट नो एक्झॅक्टली. आता शुची हा धागा काढुन विचारु शकते, मी तर या बाबतीत बोलतेय पण पहिल्यांदाच.

करू नये. कुणी तरी प्रेग्नंट असणं, कुणाला तरी मूल होणं, सेप्रेट बेडरूम्स, मित्रमैत्रिणींच्या गप्पा, पेपरातल्या जाहिराती... द फॅक्ट रिचेस देम. बापू मामांनी बरोबर म्हटलयः
ऊलट या विषयावर (एडस, कंडोम) इतके साहित्य रस्तो रस्ती ,अगदी बस च्या पार्श्वभागीही उपलब्ध आहे, कि वेगळे शिकवायची काय गरज आहे?
खरा प्रश्न लग्न झाल्यावर येतो. दादांनी म्हटलय तसा (फिल्मस वगैरे बघून)...
त्याही आधी स्वतःला न्युनगंड येतो त्याच काय?
किंवा शुचिनं लिहीलय तसं :
पोर्नोग्राफी बघून लोक तसल्या आसनांच्या अपेक्षा आणि तसे परफेक्ट शरीर आपल्या जोडीदाराकडून अपेक्षितात
माझ्या स्मरणात नाही (शोधून सांगीन) पण एका इंग्लिश लेडीडॉक्टरच उत्तम पुस्तक माझ्या मित्रानं लग्नानंतर वाचायला दिलं होतं. तीनं स्त्री देह काय आहे, स्पर्श कसा असावा, एकमेकात संवाद (सकाळपासनं) कसा असावा, स्त्रीची मानसिकता काय असते आणि तिचं शरीर हे कसं एक म्युझिकल इंस्ट्रूमेंट आहे इथपर्यंत सगळी माहिती इतकी शास्त्रशुद्ध दिली होती की वाचत राहावी. नुसतं बॉडी हायजीन नाही तर दुसर्‍या दिवशी (प्रणयोत्तर होणारे) शारीरिक बदल किंवा त्रास आणि त्यावरचे सोपे उपाय. पुरूषाचा नेमका रोल, कधी तरी उद्भवणार्‍या त्याच्या उनुद्दिपनाची कारणं, त्यावर तीनं सुचवलेला सोपा उपाय (जस्ट वेट अँड गेट इंटू समथींग एल्स, इट कम्स बॅक ऑन इट्स ओन). एवढच नाही तर प्रणयोत्तर संवादात नेमकं काय बोलू नाही! मी तर ते पुस्तक वाचून आवाक झालो होतो. पुस्तकात शेवटी ती म्हणते, द कोअर पार्ट इज योर ओपननेस टू इच अदर, स्पिक फ्रँकली. डोंट होल्डबॅक एनीथींग. द बेस्ट टीचर इज योर पार्टनर. इट इज योर प्रायवेट डोमेन!

In reply to by संजय क्षीरसागर

वाचायला पाहीजे. रोचक वाटतय. __________________________________________ बाकी स्त्रिया सहसा पिवळी पुस्तके वाचत नाहीत असा माझा एक समज. आम्ही (माझ्या मैत्रिणींचे अनुभव गाठीस धरुन) अतिशय रोमँटीक पुस्तके वाचतो. पूर्वी एम अँड बी असायची तशी आता नोरा रॉबर्ट्सची. भयंकर मजा येते ती पुस्तके वाचताना. हार्ड कोअर वर्णनांपेक्षा अशी सॉफ्ट (अँटीसिपेशन ची मजा देणारी) पुस्तके आवडतात.

In reply to by शुचि

दोन वर्षापूर्वी माझ्या मित्राचा मुलगा नववीत (लॉयोला हायस्कूलला) होता. त्याची बायको (ती डॉक्टर आहे) रात्री उशीरानं घरी येते आणि याला पण काम संपवून घरी यायला वेळ होतो. एकदा पाऊस पडत होता तर तो लवकर घरी आला. बराच वेळ बेल वाजवून दार उघडेना. मग मुलानं दार उघडलं आणि थोड्या वेळानं त्याची मैत्रिण त्याच्या बेडरूममधनं बाहेर आली. तीनं बिनधास्त याच्या मुलाची जीन आणि टी शर्ट घातला होता, हा बघतच राहिला! मग धाडस करून मुलाला म्हणाला `हाऊ इज शी वेअरिंग योर क्लोद्ज?' तो एकदम कुssलली म्हणाला `शी वॉज ड्रेंच्ड अँड हॅड नथींग टू चेंज' काय शिकवणार आपण पोरांना?

In reply to by संजय क्षीरसागर

अत्यल्पसंख्य हुच्चभ्रू समाज वगळला तर हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आजिबात योग्य नाहीये.

In reply to by बॅटमॅन

आणि लेखिकेचा प्रश्न आणि मुलांच्या शाळांचे उल्लेख पाहता प्रतिसाद विचारात घेण्यासारखा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

बहुसंख्य भारतीय नेटीझन्स उदाहरणात सांगितलेल्याशी रिलेट करू शकतील असे अजूनही वाटत नाही. **अनिवाशांचे माहीत नाही-पण अटकळ अशी की त्यांतीलही बहुसंख्य माझ्याशी सहमत होतील. बाकी निवासी जनतेला विचारा, बहुसंख्य लोक नक्कीच रिलेट करू शकणार नाहीत. ** उगीच कोणी अनिवाशाने आमच्यावर टीका का करता वैग्रे गळा काढू नये. काढल्यास त्या आक्षेपास मिरजेतल्या फाट्यावर मारण्यात येईल.

In reply to by Nile

वाईट कशाला वाटून घेऊ हो, मी फक्त वस्तुस्थिती सांगतोय. (च्यायला आमच्यावेळी हे असलं नव्हतं हे वाक्य चक्क हेवा वाटून घेऊन म्हणू की काय ;) )

In reply to by संजय क्षीरसागर

प्रतिसाद विचारार्ह आहे का? हो आहे. पण उल्लेखिलेली परिस्थिती सीरियस असली तरी अजून घरोघरी दिसणारी आजिबात नाहीये किमान भारतात.

In reply to by बॅटमॅन

पार पुढे गेलीयेत हे नक्की. आणि खरा मुद्दा तो आहे. कुणाला संधी आहे कुणाला नाही इतकाच काय तो फरक. माझं म्हणणं साधं आहे : दे नो, दॅट्स ऑल!

In reply to by संजय क्षीरसागर

ऑफ कोर्स दे नो. ऑल्दो द एक्स्टेंट टु व्हिच दे डेअर टु कॅरी औट देअर डिजाईन्स इस स्टिल लिमिटेड.

In reply to by शुचि

ओशोंच एक विधान आहे : वेन देअर इज अ कपल ऑन द बेड, दे आर नॉट टू बट फोर पीपल. द अदर टू आर देअर इमॅजिनेशन्स अबाऊट इच अदर! अँड दॅट इमॅजीनरी कपल नेव्हर अलाऊज द रियल वन्स टू कम टुगेदर.

In reply to by संजय क्षीरसागर

फक्त शयनगृहात नाही प्रेमातही आपण आपली कल्पनाच समोरच्या व्यक्तीवर आरोपीत करून जगतो. ती व्यक्ती कशी आहे पेक्षा आपल्या कल्पना (फँटसीज), स्वप्ने आपण तिच्यात पहातो.

In reply to by संजय क्षीरसागर

हाहा अँटीसिपेशन म्हणजे सेक्सचे (खरं तर इंटीमसी चे) अँटीसिपेशन. या पुस्तकांत नायक-नयिकांच्या भेटी अन प्रत्येक भेटीनंतर एकमेकांचे आकर्षण, वरवर लटका गुस्सा (फुगवा) पण आतून हवेहवेसे वाटणारे मीलन हे सर्व स्त्रीच्या दृष्टीकोनातून इतकं छान रंगवलेले असते. तसेच परीसराचे वर्णनही अगदी डिटेलमध्ये व सुरेख असते. आणि मग खूप प्रतीक्षेनंतर (;)) एखादा किस व मुख्य त्या किसमुळे होणारी मानसिक आंदोलने (आफ्टरईफेक्ट वर भर) अशी मजा मजा असते. भयानक आवदतात अशी पुस्तके :) त्या हार्ड्कोअर सेक्सच्या वर्णनांपेक्षा तर फारच आवडतात.

In reply to by संजय क्षीरसागर

अँटीसिपेशनची मजा देणारी पुस्तके आवडतात!
सिलेस्टीअल बेड (मराठी अनुवाद स्वर्गिय शैया) लेखक आयर्विन वॅलेस. नक्किच वाचा. आमचं लैंगिक शिक्षण त्यातुनच झालं. आणि हो विषय निघालाच आहेत तर प्लिज ओशोंची पुस्तके नका वाचायला देउ... तो काय बरळेल हा मुख्य मुद्दा नाही तर तान्हुलि मुलं मात्र लैंगीक बाबतीत नक्कि गोंधळतिल हे नक्कि...

In reply to by अग्निकोल्हा

तान्हुलि मुलं मात्र लैंगीक बाबतीत नक्कि गोंधळतिल हे नक्कि
`मुलांना' त्यांचा उपयोग नाही.

हया चर्चेत अजून नॅन्सी फ्रायडे ( माय सिक्रेट गार्डन , फोर्बिडन फ्लॉवर्स इ ) पुस्तकांचे उल्लेख कसे नाहित ? ह्याचे आश्चर्य वाटते आहे. "होस्टेल " वर हमाकास सापडणारी ही पुस्तके "खूप खूप " शिकवून गेली होती.

In reply to by तर्री

नॅन्सी फ्रायडे चे "माय सिक्रेट गार्डन" कॉलेजमध्ये वाचले होते. ठीकठाक होते. पण खूप उशीरा तिचे :माय मदर, मायसेल्फ" वाचले जे आवडले.

जेव्हा पोरं सर्वात पहिला प्रश्न या बाबतीत विचारतील तेव्हापासूनच सत्य काय ते सांगितलेलं बरं. हे विधान अनेकांना धक्कादायक वाटेल पण तसं नाही. त्या गोष्टीतली फाजील सेन्सिटिव्हिटी काढून टाकणं, आणि फर्स्ट हँड योग्य माहिती मिळाल्यामुळे नंतर मिळालेली रंगीबेरंगी मसाला लावलेली माहितीसुद्धा योग्य रितीने घेता येणं / न्यूनगंड किंवा अपराधीपणा न येता योग्य तिथे एंजॉयही करता येणं. पण वयोगटानुसार आपापली शब्दरचना आणि कितपत रिव्हील करायचं हे आधी ठरवून घ्यायला लागतंच. काही प्रपोज्ड वाक्यरचना वयोगटानुसारः वय वर्षे ३-५ - साधारण "मी कसा आलो" टाईपचे प्रश्न सुरु होतात. तेव्हा गॉडने पाठवलं, दवाखान्यातून आणलं अशी उत्तरं न देता, एक पाऊल पुढे टाकून "आईच्या पोटात तयार झालास" असं सांगणं. ९९% लगेच पुढचा प्रश्न येतोच "मी आत कसा गेलो?" तेव्हा आणि पुढे कधीतरी "बाबांचा यातला रोल काय?" अशा आशयाचा प्रश्न थेट / अप्रत्यक्ष आला तर खालीलप्रमाणे उत्तर देता येईल: "बाबांकडे एक बीज (झाडाची बी किंवा तत्सम उदाहरण देऊन) असतं ते आईला देतात आणि मग आई त्यापासून बाळ तयार करते / पोटात बाळ तयार होतं.)" ते बीज कसं देतात, अशा प्रश्नाची अपेक्षा असतेच, पण ३-६ वर्षं वयोगटात हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्या तपशिलासाठी तुला नंतर मोठा झाल्यावर सांगू असं म्हणता येईल. नंतर आठ - बारा अशा वयोगटात मुलं आपल्याला विचारायला येतीलच असं नव्हे, अशा वेळी आलीच तर ती आधी ज्ञान मिळवून मगच खात्री करायला विचारतील, तेही तुमचा मैत्रीपूर्ण संबंध असे तर. त्यासाठी मुळात किमान एका पालकाने पंतोजी भूमिका सोडून मित्र बनून राहिलं पाहिजे. जर पोर बाहेरची माहिती घेऊन विचारायला आलंच तर ही संधी घेऊन कोणतीही लपवालपवी न करता स्पष्ट शब्दात स्त्री आणि पुरुष यांचे संबंध कसे येतात ते सांगितलं पाहिजे. शक्यतो पाल्याच्याच लिंगाच्या पालकाने (मुलगी - आई / मुलगा - बाबा) हे सांगितलं तर तितका ऑकवर्डनेस येत नाही. पण कोणत्याही परिस्थितीत "तुला बाहेरुन कळलेली माहिती चुकीची / फाजील आहे आणि हे चावट विषय मित्रांत बोलणं बंद कर.. त्या मित्राची संगत सोड" असं काही म्हणू नये. त्यांचे सोर्सेस थेट चॅलेंज करुन आपण खड्ड्यात जाऊ नये. उलट त्या मित्राने सांगितलेल्या माहितीतला खरा भाग हा खरा आहे हे कबूल (!) करुन फक्त अवास्तव भाग चुकीचा आहे हे सांगावं. एकतर्फी ज्ञानकाढा पाजल्याने पोरं संवाद बंद करुन टाकतील ही शक्यता असतेच. जर पोरं स्वत:हून काही विचारायला पुढे आली नाहीत तर तेरा चौदाव्या वर्षी सूचकतेने / नर्मविनोदाने हस्तमैथुनाची आपल्याला जाणीव आहे, ते सर्वजण करतात आणि त्यात अपराधी वाटून घेऊ नये हे थेट रोख न ठेवता इतर चर्चेच्या रोखाने त्याला जाणवून द्यावं. याने पोरांना दिलासा वाटून एक नैसर्गिक गोष्ट तरी ते विना अपराधी भावना ठेवता करु शकतील. त्याला प्रायव्हसी दिली पाहिजे. कसं पकडलं असा भाव एकदाही असता कामा नये. याच काळात कधीतरी कोणत्यातरी विषयाचा धागा पकडून सेक्स याविषयी स्पष्ट कल्पना पाल्याला द्यावी. "इकडे ये, समोर बस, मी तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे" अशी वातावरणनिर्मिती करुन कानकोंडे न करता सहज विषय निघेल (सिनेमातलं दृष्य, सेमी न्यूड मॉडेलचा फोटो.. इ इ) त्या वेळी त्या निमित्ताने योग्य माहिती देता येईल. पोरांना पंधराव्या वर्षापर्यंत तशीही डीटेलवार माहिती असतेच, सुरुवातीपासून सर्व ज्ञान देण्याची गरजही पडत नाही. फक्त त्याला बाहेरुन झाली आहे त्या खंडीभर माहितीतली योग्य आणि अयोग्य इतकं सेपरेशन करुन देण्याची क्षमता त्याच्यात आणणं इतकंच आपल्यासाठी बाकी असतं. या संदर्भात आपापल्या केसेसमधे (पालकांकडून स्वतःला , स्वतःकडून पाल्याला) उचित ठरलेली / जमून गेलेली काही वाक्यं / शब्दरचना असतील तर इथे द्यायला हरकत नाही. सर्वांनाच त्याचा उपयोग होईल..

In reply to by गवि

पोरांना पंधराव्या वर्षापर्यंत तशीही डीटेलवार माहिती असतेच, सुरुवातीपासून सर्व ज्ञान देण्याची गरजही पडत नाही. फक्त त्याला बाहेरुन झाली आहे त्या खंडीभर माहितीतली योग्य आणि अयोग्य इतकं सेपरेशन करुन देण्याची क्षमता त्याच्यात आणणं इतकंच आपल्यासाठी बाकी असतं.
हाहा खरचच बरोबर आहे आपण म्हणता ते. फक्त मुलांना रिस्क कदाचित माहीत नसतात त्या आवर्जून सांगीतल्या पाहीजेत एवढच अ‍ॅड करते.

In reply to by गवि

इथं एक गोची अशी आहे की त्याचे/तीचे मित्र-मैत्रीणींचे पालकसुद्धा समजुतदार असले पाहिजेत. नाहीतर दुसर्‍या दिवशी आपल्या पोराचा कान धरून समोर उभं करतील आणि या वयात पोराला असलं शिकवता का म्हणून जाब विचारतील. (एक उदाहरण बघितलं आहे). पण बाकी प्रतिसादाशी सहमत. लहान असताना शेजारच्या गल्लीत एक मनपा दवाखाना होता. ऑडीट असेल तर ते तशीच पडून असलेली काँडोमची पाकीटं जवळच्या उकिरड्यात टाकायची. आमचा छंद म्हणजे त्यातलं काँडोम काढून त्यात हापश्यावर पाणी भरून फुगा-फुगा खेळणे. तेंव्हा मी साधारण तिसरीत होतो. ते करताना रस्त्यावरच्या एका फाटक्या माणसाने ते कुठे लावतात (तेंव्हा त्यानं त्याचा उल्लेख 'पोपट' असा केला होता:) ) हे सांगितलं होतं. अर्थात त्याचा उद्देश शिक्षण वगैरे नव्हता पण याचा दुष्परिणाम कधीच जाणवला नाही.

पाचवीत मैत्रिणीने राजा राणीचा एक भन्नाट विनोद सांगीतला होता. कळला नव्हता तेव्हा. पण ती मात्र कळल्यासारखी हसत होती. बरं अर्थ विचारला तर मात्र सांगत नव्हती. पुढे ज्ञानवर्धन झाले तशी त्यातली उपमा लक्षात आली :)

गविंशी सहमत. त्यावरून एक विनोद आठवला. जरा सभ्य भाषेत सांगतो. वयात आलेल्या मुलांशी या बाबतीत लपवा-छपवी केली तर ते कसे बरोब्बर पकडतात ते ह्या वरून कळेल. मुलगा: बाबा मी कसा झालो? बाबा अस्वस्थ. काहीतरी सारवासारव म्हणून... बाबा: अरे मी आणि तुझ्या आईने देवाला नवस केला म्हणून तू झालास. मुलगा: बाबा तुम्ही कसे झालात? बाबा: अरे तुझ्या आजोबांनी आणि आज्जीने देवाला नवस केला म्हणून मी झालो. मुलगा: बाबा आजोबा कसे झाले? बाबा: कारण त्यांच्या आई बाबांनी देवाला नवस केला म्हणून... मुलगा: च्यायला आपल्यात काय सेक्स बिक्स करण्याची पद्धत नाही आहे का हो? बाबा: ------------

आपण फक्त लैन्गिक शिक्षणबद्दल चर्चा करतोय, पण फक्त तितकाच प्रश्न नाही. मुळातच मोकळा संवाद आणि ज्ञानाचे देवाणघेवाण घरातच असेल, तर मुलांना 'चुकीच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनी समजल्या' असे कधीच होणार नाही. खरे तर पालकांच्या आणि शिक्षकांच्या देखिल, कार्यशाळा घ्यायला हव्यात, व त्यात हे शिकवायला हवय की एकंदरीत शरीरशास्त्र काय आहे, पूर्ण शरीराचे काम नक्की कसे चालते?, आणि ते मुलांना सोपे करुन कसे सांगावे. आत्ता या क्षणी जर का मी विचारले की पचनसंस्थेचे काम कसे होते, तर कितीजणांना बरोब्बर सगळे सांगता येइल? कुणीही नाही. मग इतक्या साध्या आपण रोज वापरत असलेल्या शरीरकार्याबद्दल जर आपल्याला नीट माहिती नाही, तर मुलांच्या साध्या प्रश्नांना, जसे, पाणी साधे असते, मग शू पिवळी कशी होते?, आणि शी अशी मध्येच पातळ का होते? अश्या प्रकारच्या प्रश्नांनादेखिल कुणी नीट , सोपी, योग्य उत्तर देउ शकत नसतील, तर लैगिकतेबद्दल्च्या गुन्तागुन्तीच्या गोष्टीना कसे काय तोंड द्यायचे? तिथे तर मनाचाही फार मोठा भाग आहे. या विषयांची माहिती देण्याचे काय ते काम शिक्षकांचे आणि डॉक्टरचे, असे म्हणून आपण हात झटकून मोकळे होउ शकत नाही. कारण या मानवी शरीरासंबंधातल्या गोष्टी सर्वसाधारण बुद्धिमत्ता असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती हव्यातच. आपण नुसता नवीन MP3 Player घेतला तरी त्याचे manual वाचून त्यचे काम समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आपले स्वतःचे शरीर तर आपण आयुष्य्भर वापरतो. त्याच्या अभ्यासाबाबत आळशीपणा आणि भिती का? यातून जसे रक्ताभिसरण संस्था, पचनसंस्था, याची कामे सांगितली जाउ शकतात व त्यांची काळजी घेणाबद्दल सूचना दिल्या जातिल, तशीच लैन्गिक शिक्षाणाचीही वर्णी लागू शकेल. ..............

हे झालं फक्त कोंडी फोडण्याबद्दल. की एकंदरीत या विषयाला हात कसा घालावा.. त्यांना स्वतःच्या भावना ओळखणं आणि त्याबद्दल काय करावं हे फारस्ं शिकवायची गरज असते असं मला वाटत नाही. तसंही त्यांना कुठले समाज, संस्कार वगरै दडपण नसते. शिवाय मुळातच मुले high EQ वाली असतात. पुढे परिस्थितीमुळे गोंधळतात! कुठल्याही विषयावर बोलताना मुख्य गोष्ट ही आहे, की मुलांना त्यांना हवं तसे व्यक्त होउ द्यावं. आणि काहीही ऐकायला मिळाले तरी गोंधळून जाता कामा नये. :) कठिण जाते हे, पण कुठेतरी 'मोकळ्या' संवादाची सुरुवात करण्यासाठी, आपण स्वतःच स्वतःवरची दडपणं काढून टाकून या प्रश्नांना सामोरं जाणं आवश्यकच आहे. खरं तर सगळ्याच मुलांना ठराविक वयातच हे सगळं सांगितलंच पाहिजे असं नाही. कारण प्रत्येकालाच या संवेदना ठराविक वयात कळतील असे नाही. त्यामुळे 'लक्ष ठेवणं' आलंच. पण 'हे काय चाललेत चाळे?' म्हणून डोळे मोठ्ठे करुन राग व्यक्त केला तर त्यांना कायमची भिती बसेल. मध्ये ऑटिस्टिक मुलांबरोबर काम करणार्‍या मैत्रिणीकडून कळले की अश्या स्वमग्न मुलांना तर या भावना ५ वर्षे वयातच होतात. वर अपर्णानी लिहिलय तसे प्रसंग भर वर्गात कायमच येतात. आणि एखाद्या मुलाला बघून बाकी सगळीच मुले चटकन शिकतात! त्यावेळेस त्यांना या क्रुती व्यक्तिगत आहेत. तुम्ही एकटे असताना बाथरुमध्ये जाउन करा, हे शिकवणे कठिण जाते. पण नॉर्मल मुलांना योग्य वेळ बघून 'कॉशन्स' शिकवणे कठिण नाही.

माझे वैद्यकिय शिक्षण चालु असतानाची गोष्ट आहे,आम्हाला द्वितिय वर्षाला preventive and social medicine नावाचा एक विषय असतो,त्याच्यासाठीचा मास्तर आम्हाला शेवटपर्यंत आला नाही,दुसर्‍याच एका बाईंनी जमेल तेव्हडाच तो विषय शिकवला,त्यात हे contraceptive,family planning,general health असे विषय कव्हर केले जातात्,आणी याविषयीचा आमचा सगळाच आनंदीआनंद होता.साला नेमका बहिस्थ परिक्षकाने contraceptive वर सगळ्या पोरांना प्रश्न विचारायला सुरुवात केली,कंडोम आणी ओ.सी.पिल्स्,ते पन रात्री चुकली तर दुसर्‍या दिवशी २ खाव्यात (दुर्द्शन ची माहिती )याच्यापलिकडे आमच्या ३० च्या ३० पोरांची बोंब.external ने शेवटी डोक आपटुन घेतल आणी प्राचार्यांना बोलवले,शेवटी त्यांच्यात काय बोलन झाल माहिती नाही पन आम्ही कसे बसे काठावर पास झालो. आता वैद्यकीय शिक्षण घेणार्‍यांची अशी अवस्था आपल्या पुन्यातल्या कॉलेजची असेल तर बाकी सामान्य जनतेच काय हो!!!!