मिपा वरील अलीकडील काही लेख, त्यावरील प्रतिसाद आणि त्या प्रतिसादांचे पडसाद वाचुन मला ही झेन कथा आठवली.
योग्य/अयोग्य, पाप/पुण्य, साक्षर/निरक्षर, इश्वरवादी/निरीश्वरवादी ई. वादग्रस्त वातावरणात थोडासा शितल शिडकाव करावा हा हेतु.

चंदन पुर गाव.
या गावात लहु लोहाराच एक दुकान असतं. दिवस भर भाता मारायचा, भट्टी पेटती ठेवायची आणि ऐरणीवर भट्टीमधे तापलेल्या लोखंडावर हातोड्याचे घाव घालुन वेगवेगळ्या वस्तु बनवायच्या हा त्याचा व्यवसाय.
रोजच्या प्रामाणे आज देखिल त्याच काम जोरात आणि जोमात चालु असताना त्याच्या घराबाहेरुन जाणा-या एका भिक्कुला त्याने घातलेल्या हातोड्याचे घाव ऐकु येतात. कुतुहल म्हणुन तो भिक्कु त्याच्या घरामधे येतो आणि उत्सुकतापुर्ण नजरेने त्याच काम न्याहाळु लगतो. त्या घराच्या आडगळीच्या कोप-यामधे काही मोडके, वेडेवाकडे, बिनकामचे हातोडे पडलेले असतात.
तो भिक्कु लहु लोहारास विचारतो "मित्रा हे हातोडे मोडायला किती ऐरणी लागल्या? त्या मोडक्या ऐरणी कश्याबर ईथे दिसत नाहीत?"
लहु उत्तरतो "ही एकच ऐरण मी गेली कीत्येक वर्षे वापरतो आहे. या ऐरणीनेच कीत्येक हातोडे तोडले असतील. कारण हातोडे घाव घालतो तर ऐरण तो घाव शातपणे सहन करते."
![]()
मिसळपाव
प्रतिक्रिया
जय पाल!
जय पाल!
अहाहा!
फारच सुरेख कथा!
जय हो! सुरेख गोष्ट.
जय हो! सुरेख गोष्ट.
झक्कास हो जयपाल भाऊ.
झक्कास हो जयपाल भाऊ.
ए-वन्!
ए-वन्!
क्या बात है...
स्त्रिशक्तीचं महत्व विषद करणारा धागा!
आता ईथेपण स्त्री अन पुरुष भेद
In reply to क्या बात है... by अग्निकोल्हा
आता ईथेपण स्त्री अन पुरुष भेद कशाला काढता भौ..?
तो हातोडा आणि ती ऐरण..... ऐरण
In reply to आता ईथेपण स्त्री अन पुरुष भेद by सस्नेह
तो हातोडा आणि ती ऐरण..... ऐरण ती आहे म्हणून सहनशील आणि हातोडा तो आहे म्हणून अन्यायकारक.. सर्वत्र असेच असते. सर्व ती पिचलेल्या असतात आणि सर्व तो हलकट...
अतिथी
यावरून 'स्त्रिशक्तीचं महत्व
In reply to तो हातोडा आणि ती ऐरण..... ऐरण by विश्वनाथ मेहेंदळे
यावरून
'स्त्रिशक्तीचं महत्व विषद'होतं ?बोव्हारिणी चे पुस्तक वाचा.
In reply to आता ईथेपण स्त्री अन पुरुष भेद by सस्नेह
बोव्हारिणी चे पुस्तक वाचा. त्यात सगळे स्पष्ट लिहिले आहे.
२.७८ अशिक्षित विकृती
उत्तम!
झकास कथा!
परंतु सध्या विकेंड असल्यानं आमचा डिकोडर अंमळ गंडलाय. सोमवारी व्यवस्थित उमजेल ही कथा. :)
भा पो
मिपावर सगळ्या एरणीच आहेत.
हातोडे हैत ते पैलतीरास जातील
In reply to भा पो by पप्पु अंकल
हातोडे हैत ते पैलतीरास जातील असेच नं ;) (पण कॉन्व्हर्स नॉट ट्रू)
एकदम मार्मिक कथा.
एकदम मार्मिक कथा.
बोंब
बोंब... भिख्खू उगाचच भिख्खू झाला राव. तो लोहार झेन आहे खरा. बरं, ते जाऊं द्या... भिख्खू कोण हे सांग. मग हातोडे आणि ऐरणीचा विचार करेन. ;-)
मोडकांना भिख्खू माहित नाही...
In reply to बोंब by श्रावण मोडक
मोडकांना भिख्खू माहित नाही... गंमतच आहे राव.
कोण?
In reply to मोडकांना भिख्खू माहित नाही... by नाना चेंगट
खरंच माहिती नाही राव. कोण तो? कोण? व्यनि करा, चालेल.
मस्त कथा.
In reply to मोडकांना भिख्खू माहित नाही... by नाना चेंगट
मस्त कथा.
बाकी नान्याशी पूर्ण सहमत. मोडकांसारख्या ज्ञानी माणसाला हा प्रश्न विचारताना पाहून क्षणभर ऐरण झाल्यासारखे वाटले.
इथे ऐरणीवरचे जुने अर्थपूर्ण
इथे ऐरणीवरचे जुने अर्थपूर्ण गाणे टाकणार होते, पण त्यात नको तो शब्द आहे... म्हणून जाउ दे. ;)
गोष्ट छान आहे. बोध घ्यावाच लागेल अशी.
धन्यवाद!
गांधिवादाची प्रेरणा ही कथा तर न्हवे याचाही शोध कोणी घेइल काय ?
.
सॉलिड!!
सॉलिड!!
छे... विज्ञानद्वेष्टेपणाचा कळस झाला हा.
ऐरणीची घनता, तिचा विशिष्ट आकार हे घाव सहन करण्याकरताच बनलेले असतात. उगाच त्यातुन काहि संदेश वगैरे शोधुन काढणं म्हणजे अंधश्रद्धेचा कळस.
अर्धवटराव
तुमच्या या प्रतिसादातून
In reply to छे... विज्ञानद्वेष्टेपणाचा कळस झाला हा. by अर्धवटराव
तुमच्या या प्रतिसादातून विज्ञाननिष्ठेचाही कळस झाला. :)
अहो प्रत्येक गोष्टीला अशी वैज्ञानिक कसोटी लावायला गेलो तर सारं जीवनच निरस होऊन जाईल.
जेवणाच्या प्रत्येक घासात मग आपल्याला कर्बोदके, प्रथिने आणि मेद दिसायला लागतील.
- विज्ञानवादी छटाकराव वाकडे
+१
In reply to तुमच्या या प्रतिसादातून by धन्या
दोघांचेही प्रतिसाद एकच नंबर!
कळस??
In reply to तुमच्या या प्रतिसादातून by धन्या
तुम्ही तर मिपावर नवखे नाहि... मग एव्हढ्यात तुम्हाला विज्ञाननिष्ठेचा कळस दिसला? आश्चर्य आहे :)
अर्धवटराव
>>जेवणाच्या प्रत्येक घासात मग
In reply to तुमच्या या प्रतिसादातून by धन्या
>>जेवणाच्या प्रत्येक घासात मग आपल्याला कर्बोदके, प्रथिने आणि मेद दिसायला लागतील.
हॅ हे तर काहीच नाही
आम्हाला जीवाणू विषाणू पण दिसतात.
+१
In reply to छे... विज्ञानद्वेष्टेपणाचा कळस झाला हा. by अर्धवटराव
एक लोहार असा संदेश देतो हे सांगून शिक्षणाची जबाबदारी असलेल्या शिक्षणखात्याची, विद्यापीठांची, डाक्टरेट प्रोफेसरांची जी अवहेलना केली आहे तिचा निषेध
पुन्हा सहमत.
In reply to +१ by नाना चेंगट
त्यातून तो लोहार झेन भाषेतून हा संदेश देत असल्याने दुप्पट निषेध.
बहुजनांच्या भाशेतून (कोण रे
In reply to पुन्हा सहमत. by परिकथेतील राजकुमार
बहुजनांच्या भाशेतून (कोण रे तो म्हणाला श नाही ष- मनुवादी कुठला!) न देता हुच्चभ्रू भाशेतून संदेश देणे हा सगळा बामणी कावा आहे. निशेद आसो!!
लोहारनं ऐरणी भाषेतून संदेश द्यायला हवा!
In reply to पुन्हा सहमत. by परिकथेतील राजकुमार
पराशी हातोडा वाजवून... संमत!
छान.
अजून येऊ दे.
-दिलीप बिरुटे
जय हो...! मंगलमय हो...!
जय हो...! मंगलमय हो...! :-)
उत्तम बोध कथा .
उत्तम बोध कथा .
पण.. असे अनेक घाव सोसून ऐरण ही ऐरणच राहते, त्यातून वेगळे काहीच साकारत नाही हे देखिल सत्य आहे.
सहमत आहे. अनेक माणसे ही अशीच
In reply to उत्तम बोध कथा . by मनीषा
सहमत आहे. अनेक माणसे ही अशीच घाव सोसत जगतात आणि काय सांगू ती तशीच माणसे रहातात हे देखिल सत्य आहे.
सहनशीलतेला जास्त ताकद लागते
सहनशीलतेला जास्त ताकद लागते हा भावार्थ पटला.
+१
In reply to सहनशीलतेला जास्त ताकद लागते by प्रकाश घाटपांडे
हेच म्हण्तो
+२
In reply to सहनशीलतेला जास्त ताकद लागते by प्रकाश घाटपांडे
पकाकाकांशी सहमत.
मस्त....
मस्त....
छान आहे बोधकथा
छान आहे बोधकथा
अशाच अजुन बोधकथा येउदेत...
अशाच अजुन बोधकथा येउदेत... :)
शाळेत आमच्या हातांवर आपटून
शाळेत आमच्या हातांवर आपटून आपटून मास्तरांच्या अनेक पट्ट्या मोडल्या त्याची अंमळ आठवण झाली.
याला म्हणतात पट्टीचे विद्यार्थी!
In reply to शाळेत आमच्या हातांवर आपटून by आदिजोशी
.
खुपच छान आहे कथा!!!!
खुपच छान आहे कथा!!!!