पुस्तक
आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला निघालो आणि गाडीत बसलो कि राखून ठेवलेले एखादे पुस्तक काढतो वाचायला अन त्याच वेळी आपला शेजारी देखील त्याचे पुस्तक काढतो तेव्हा आपले लक्ष आपल्या पुस्तकापेक्षा त्याच्या पुस्तकात डोकावण्यात जास्त असते.
नवरा बायकोचे पण तसेच असते काहीसे असे मला वाटते. म्हणजे दोघेही आपापली पुस्तक वाचत असतात पण दुसर्याच्या पुस्तकाबद्दल एक आकर्षण, ओढ आणि हळू हळू हक्क वाटू लागतो. आपण त्यात डोकावू लागतो, मग स्वताच्या पुस्तकामाधली पानं कधी सवयीने तर कधी दुसर्याला कळू नये म्हणून तर कधी आपोआप उलटली जातात. संसारात खरी मज्जा तेव्हा आहे जेव्हा दोघेही एकच पुस्तक वाचाल. एकाच सुखी शेवटाच्या ओढीने ... मग आपोआपच दुसर्याचे वाचून होईपर्यंत थांबणे, एखाद्या विनोदाला दोघांनी एकत्र हसणे, एखाद्या गहीवरणाऱ्या प्रसंगी हात हातात घट्ट धरणे ह्या सगळ्याची मजा येते.
आज अनेक नवरा बायको आपापली वेगळी पुस्तके वाचत आहेत, आपापल्या गोष्टीमध्ये रममाण आहेत. मग ते मधेच खुदकन हसणे, डोळ्यांचे ओलावणे हे सगळे त्याला अनोळखीच ना ... कारण त्यावेळी तो दुसर्याच गावी ... त्याच्या त्याच्या पुस्तकात मग्न ... दोन्ही पुस्तकांचे शेवट गोड असतीलही कदाचित पण ते एकटयानेच चाखायचे यात काय सुख. त्याच्या किंवा तिच्या पुस्तकात डोकावून तर बघा आवडेल तुम्हालाही ते कदाचित. हळूहळू त्या पुस्तकाबद्दलची ओढ कमी होण्याच्या आत तुमचे पुस्तक बदला. मग दोघांना एकाच गोष्टीची ओढ, एकसारखी हुरहूर अन दोघांची वाटचाल एकाच सुखी शेवटाकडे असेल.
बर हे पुस्तक संपले तरी दोघांकडे एकसारख्या आठवणी असतील ... चर्चेला दोघांच्या आवडीचा विषय असेल आणि यातूनच संवाद वाढेल. संवादाला लय प्राप्त झाली कि त्याचा सुसंवाद होतो. आणि यासारखे सुरेख जीवनगाणे नाही.
तेव्हा एकदा वाचून बघा एखादे पुस्तक एकत्र ...
तुमचा लांबचा प्रवास सुखकर होईल हे नक्की ...
याद्या
4794
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
चू.भू. ...
काही कळले नाही हो. :(
भा. पो. नसतील तर क्षमस्व
In reply to काही कळले नाही हो. :( by अभ्या..
भा पो एकदाच्या
In reply to भा. पो. नसतील तर क्षमस्व by विश्वेश
मस्तच लिहिलंय
ऑ !
In reply to मस्तच लिहिलंय by स्पा
+१
In reply to ऑ ! by स्पंदना
लायब्ररी?
In reply to मस्तच लिहिलंय by स्पा
एक तरी पुस्तक आहे त्याच्याकडे...
In reply to लायब्ररी? by पैसा
खिखिखि!
In reply to एक तरी पुस्तक आहे त्याच्याकडे... by मोदक
आणि मला वाटते
In reply to खिखिखि! by पैसा
बोंबला!
In reply to आणि मला वाटते by संजय क्षीरसागर
=))
In reply to बोंबला! by धमाल मुलगा
मी सध्या बरीच पुस्तके चाळतोय
त्यावर 'जात आहेत दिवस'
In reply to मी सध्या बरीच पुस्तके चाळतोय by स्पा
(No subject)
In reply to त्यावर 'जात आहेत दिवस' by नेत्रेश
स्वर्गवासी.....
In reply to मी सध्या बरीच पुस्तके चाळतोय by स्पा
मला वाटत, नोटबुक, किंवा
चालायचंच
In reply to मला वाटत, नोटबुक, किंवा by स्पंदना
चांगलं लिहलंय.
नै जम्या!
१) तेव्हा एकदा वाचून बघा एखादे पुस्तक एकत्र...
खिक्क
In reply to १) तेव्हा एकदा वाचून बघा एखादे पुस्तक एकत्र... by संजय क्षीरसागर
=))
In reply to १) तेव्हा एकदा वाचून बघा एखादे पुस्तक एकत्र... by संजय क्षीरसागर
डब्यात इकडेतिकडे बघण्यापेक्षा ते बरं नाही का?
In reply to =)) by पैसा
:)
In reply to डब्यात इकडेतिकडे बघण्यापेक्षा ते बरं नाही का? by संजय क्षीरसागर
मला आवडलं हे मुक्तक.
तुम्ही खरोखर रोमँटीक स्वभावाचे आहात हे नक्कि!
मग दोघांना एकाच गोष्टीची ओढ,
In reply to तुम्ही खरोखर रोमँटीक स्वभावाचे आहात हे नक्कि! by अग्निकोल्हा
गवी,
In reply to तुम्ही खरोखर रोमँटीक स्वभावाचे आहात हे नक्कि! by अग्निकोल्हा
लायसिलची जाहिरात आठवली तो खैर
In reply to गवी, by अर्धवट
हाच प्रश्न मनात आला होता.
In reply to लायसिलची जाहिरात आठवली तो खैर by गवि
कल्पना चांगली आहे
पुस्तकाची उपमा आवडली. पण
फारच पुस्तकी चाललय सगळं!
In reply to पुस्तकाची उपमा आवडली. पण by श्रिया
पेस्तनकाका !
येथ
वय झाल्यावर आवडी सेम होतात
In reply to येथ by तिमा
आम्ही मिसळपाव वाचतो!