Skip to main content

पुस्तक

विश्वेश यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला निघालो आणि गाडीत बसलो कि राखून ठेवलेले एखादे पुस्तक काढतो वाचायला अन त्याच वेळी आपला शेजारी देखील त्याचे पुस्तक काढतो तेव्हा आपले लक्ष आपल्या पुस्तकापेक्षा त्याच्या पुस्तकात डोकावण्यात जास्त असते. नवरा बायकोचे पण तसेच असते काहीसे असे मला वाटते. म्हणजे दोघेही आपापली पुस्तक वाचत असतात पण दुसर्याच्या पुस्तकाबद्दल एक आकर्षण, ओढ आणि हळू हळू हक्क वाटू लागतो. आपण त्यात डोकावू लागतो, मग स्वताच्या पुस्तकामाधली पानं कधी सवयीने तर कधी दुसर्याला कळू नये म्हणून तर कधी आपोआप उलटली जातात. संसारात खरी मज्जा तेव्हा आहे जेव्हा दोघेही एकच पुस्तक वाचाल. एकाच सुखी शेवटाच्या ओढीने ... मग आपोआपच दुसर्याचे वाचून होईपर्यंत थांबणे, एखाद्या विनोदाला दोघांनी एकत्र हसणे, एखाद्या गहीवरणाऱ्या प्रसंगी हात हातात घट्ट धरणे ह्या सगळ्याची मजा येते. आज अनेक नवरा बायको आपापली वेगळी पुस्तके वाचत आहेत, आपापल्या गोष्टीमध्ये रममाण आहेत. मग ते मधेच खुदकन हसणे, डोळ्यांचे ओलावणे हे सगळे त्याला अनोळखीच ना ... कारण त्यावेळी तो दुसर्याच गावी ... त्याच्या त्याच्या पुस्तकात मग्न ... दोन्ही पुस्तकांचे शेवट गोड असतीलही कदाचित पण ते एकटयानेच चाखायचे यात काय सुख. त्याच्या किंवा तिच्या पुस्तकात डोकावून तर बघा आवडेल तुम्हालाही ते कदाचित. हळूहळू त्या पुस्तकाबद्दलची ओढ कमी होण्याच्या आत तुमचे पुस्तक बदला. मग दोघांना एकाच गोष्टीची ओढ, एकसारखी हुरहूर अन दोघांची वाटचाल एकाच सुखी शेवटाकडे असेल. बर हे पुस्तक संपले तरी दोघांकडे एकसारख्या आठवणी असतील ... चर्चेला दोघांच्या आवडीचा विषय असेल आणि यातूनच संवाद वाढेल. संवादाला लय प्राप्त झाली कि त्याचा सुसंवाद होतो. आणि यासारखे सुरेख जीवनगाणे नाही. तेव्हा एकदा वाचून बघा एखादे पुस्तक एकत्र ... तुमचा लांबचा प्रवास सुखकर होईल हे नक्की ...
विश्वेश

पहिल्यांदाच असे 'पुस्तकी' लिखाण केले आहे,
22/01/2013 - 11:21 Permalink
अभ्या..

काही कळले नाही हो. :( नवरा बायको, पुस्तक मिळून वाचणे, लांबचा प्रवास, दुसर्‍याच्या पुस्तकात डोकावणे, नंतर चर्चा, सुखकारक शेवट. काय म्हणजे काय ते शेवटपर्यंत कळले नाही. बाकी लि़खाण उत्तम. सुद्दलेकनाचे मार्क पैकीच्या पैकी.
22/01/2013 - 11:26 Permalink
विश्वेश

In reply to by अभ्या..

अहो पुस्तक हे प्रातिनिधिक आहे, हल्ली नवरा बायकोने स्वताचे वेगळे करियर, पर्सनल आयुष्य, त्याचा आलेख असे स्वताशीच आणि स्वतासाठीचे एक वेगळे गोष्टीचे पुस्तकठरवलेले असते. माझे म्हणणे इतकेच कि अश्या वेगळ्या वेगळ्या पुस्तकांपेक्षा दोघांनी मिळून एकाच पुस्तक वाचा :)
22/01/2013 - 12:37 Permalink
अभ्या..

In reply to by विश्वेश

स्वताचे वेगळे करियर, पर्सनल आयुष्य, त्याचा आलेख
ओके ओके. आता पोहोचल्या बघा भावना. म्हणजे एकाच कालेजात शिकून, एकाच ऑफीसात, एकाच डिपार्टमेंटमध्ये नोकरी करुन, एकाच गाडीतून घरी यायचे ना? वॉव. मस्तच रोमँटीक आयडीया आहे. पब्लिक ट्रान्स्पोर्ट, ऑफीस पॉलिटिक्स, करीअर क्रायसेस, आणि अशा कीतीतरी गोष्टींवर हे उत्तम समाधान आहे.
22/01/2013 - 14:51 Permalink
संजय क्षीरसागर

In reply to by पैसा

प्रश्न पुस्तकाचा नसून एकत्र वाचण्याचा आहे. `वाचणारी कुठून आणायची' हे महत्त्वाचय...पुस्तक काय कसंही मिळवता येईल.
23/01/2013 - 10:45 Permalink
पैसा

In reply to by धमाल मुलगा

स्पावड्याला खफ, चेपु सगळीकडे सध्या पुस्तकेच पुस्तके दिसतायत!
23/01/2013 - 13:26 Permalink
संजय क्षीरसागर

= दोघं एकत्र असताना `पुस्तक' कशाला वाचायच?
२) तुमचा लांबचा प्रवास सुखकर होईल हे नक्की
= लांबच्या प्रवासात तर पुस्तक अजिबात वाचू नये. खिडकीबाहेर पहावं किंवा एकमेकांशी गप्पा माराव्या.
३) पहिल्यांदाच असे 'पुस्तकी' लिखाण केले आहे
= तरीच! दोघांनी आपापल्या आवडीची पुस्तकं वाचावी आणि मग ती एकमेकांशी शेअर करावी. त्यानं एकमेकांशी नव्यानं जवळीक होते.
22/01/2013 - 17:10 Permalink
संजय क्षीरसागर

In reply to by पैसा

शिवाय प्रवास लांबचा आहे.... आणि आपल्याला तर मुक्कामाला पोहोचल्यावर काय करायच ते खिडकीबाहेर बघितल्यावर एकसोएक सुचायला लागतं (खरं तर दिसायला लागतं)!
22/01/2013 - 19:53 Permalink
अग्निकोल्हा

उद्या सुट्टि आहे या कल्पनेत एखादं मस्त पुस्तक डोक्याला डोके लाउन वाचत बसणे खरोखर एक सुंदर अनुभव आहे! खुप छान लिहयलं.
22/01/2013 - 19:18 Permalink
अग्निकोल्हा

In reply to by अग्निकोल्हा

मग दोघांना एकाच गोष्टीची ओढ, एकसारखी हुरहूर अन दोघांची वाटचाल एकाच सुखी शेवटाकडे असेल.
एक्सलंट! जोडीने चित्रपट बघताना दुर्दैवाने मानसिक गुंतवणूक कमी अन शारिरीक गुंतवणूकच जरा जास्त होतें. पण पुस्तक वाचताना मात्र तसं होतं नाही. We allways remains on same page by all mean :) अर्थात यासाठी दोघांना समान आवडीची पुस्तके मात्र जरुर हवीत.
22/01/2013 - 19:23 Permalink
श्रिया

पुस्तकाची उपमा आवडली. पण दोघांनी प्रत्येक वेळेस वेगळी पुस्तके वाचवीत असे आहे का? दोघांची आवडनिवड सारखीच असेल तर एकच पुस्तक दोघांनी वाचण्याचा आनंद घ्यावा किंवा एकाने वाचून दाखवावे आणि दुसर्‍याने ऐकावे.
23/01/2013 - 11:41 Permalink
संजय क्षीरसागर

In reply to by श्रिया

आहो, प्रत्येक वेळी दोघांची आवड सारखी नसते. आणि... ज्या वेळी दोघांची आवड एक असते तेंव्हा ते पुस्तक वाचण्यात वेळ घालवत नाहीत.
23/01/2013 - 11:54 Permalink
तर्री

पेस्तनकाका भाई-सुनिता बाई ना विचारतात " ए भाऊसाहेब घरी पण तुम्ही असे पुस्त्काकामाधी डोके घालून बसते काय रे " ? त्याची आठवण झाली. आमच्या घरी मी साहित्य वाचतो आणि सौ. "मायक्रोवेव्ह मधील १०० पाकृ " इ . वाचते आणि त्यामुळेच शेवट गोड होतो हे.वे.सा.न.
23/01/2013 - 11:45 Permalink
तिमा

येथ म्हणे श्री 'विश्वेशरावो', हा होईल दानपसावो || आम्ही किनई, दोघे मिळून फक्त 'ज्ञानेश्वरी' हेच पुस्तक वाचतो.
23/01/2013 - 11:57 Permalink