✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भीती वाटे कुणाला?

द
देवदत्त यांनी
Wed, 08/27/2008 - 20:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4383 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

म
मनिष Wed, 08/27/2008 - 21:50 नवीन

कुठे बघायचा हा फूंक

कुठे बघायचा म्हणे हा फूंक एकट्याने? रामगोपाल ला म्हणा पैसे ठेव तयार, मी बघतो! थोडे दचकणे ठीक आहे, पण मी कुठल्या सिनेमाला खरच घाबरलो असल्याचे आठवत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 08/27/2008 - 22:06 नवीन

हा खेळ सावल्यांचा

ह्या सिनेमाबद्दलही असे ऐकले होते की हा सिनेमा बनवून झाल्यानंतर पाहताना ९ जण भीतीने मेलेत, त्यात स्वत: त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचाही समावेश आहे. त्यामुळे त्या सिनेमाच्या मूळ प्रिंट्स जाळून टाकल्या गेल्या व त्याच कथेवर नवीन सिनेमा पुन्हा त्याच नावाने बनविण्यात आला.
मस्त लोणकढी आहे. या चित्रपटाचा डायरेक्टर अद्याप जिवंत आहे. ;) असो, हा खेळ सावल्यांचा प्रदर्शित झाला तेव्हा मी बरीच लहान होते. भयंकर भीती वाटली होती. विशेषतः माडाचे एक उंच झाड आमच्या घरातून दिसतं. नरसूचं भूत त्यावर राहात असावं अशी माझी कल्पना होती. रात्री काळोखात एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जायचीही हिम्मत नव्हती. तर हा चित्रपट मी पुन्हा दोन दिवसांपूर्वी पाहिला. मला वाटत होतं की जुना चित्रपट आता त्याची काय भीती वाटणार? पण तो पाहताना अनेक पैलू पुढे आले. चित्रपटाची कथा चांगली आहे. काही मेलोड्रॅमाटिक प्रसंग सोडले तर कथावस्तु सुरेख आहे. वेड्या जाईचा केस पिंजारून केलेला नाच अद्यापही अंगावर शहारे आणतो. आशा काळेनी रोजची रडूबाई सोडून शिव्या घालणारी मानसिक रुग्ण साकारणे म्हणजे हाईट. ही कथा सुमती गुप्तेंची आहे असे कळले तरी ती कुठल्या पाश्चात्य चित्रपटावरून घेतलेली आहे का काय असे वाटले. आपल्या हातून खून झाला अशी अपराधी भावना बाळगल्याने कमकुवत मनाची तरूणी, आपल्या सावत्र आईचे, दिवाणजींचे, सावत्र मामाचे सगळे उद्योग माहित असलेली पण कुणाची साथ नसल्याने त्यांच्या संगतीत आयुष्य जगणारी आणि भूताचा संचार होतो आहे हे कळल्यावर कोलमडून पडलेली आणि त्या भरात अर्वाच्य शिव्या घालून सर्वांचे बिंग बाहेर आणणारी मुलगी मस्तच. चित्रपट बघताना काही प्रसंगात अजूनही अंगावर शहारा येतो. कोणाला ही मूळ कथा कोणती हे माहित असल्यास कळवावे. तरीही, चित्रपटातील सर्वात भीतीदायक प्रसंगः डॉ. काशिनाथ घाणेकर केसांचा कोंबडा, तांबारलेले डोळे, बेल बॉटमची प्यांट, चार बटनं सुटलेला शर्ट, गळ्यात लटकणारं चमकदार लॉकेट घालून गोमू संगतीनं म्हणत तंगड्या उडवत नाचतात तो. हा प्रसंग पाहून दोन दिवस झोप लागली नाही. :( जाता जाता: डरना मना है पाहिला होता आवडला म्हणून डिविडी विकत घेतली आहे. कधीतरी एकांतात पाहिन म्हणते. फूंकची डि व्ही डी येण्याची वाट बघते आहे. ;)
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Wed, 08/27/2008 - 23:04 नवीन

मी तसे ऐकले होते

या चित्रपटाचा डायरेक्टर अद्याप जिवंत आहे. असेलही. मी तसे ऐकले होते. त्या दिग्दर्शकाला म्हणावे माफ कर मला. :) ह्या सिनेमाबाबत भरपूर काही इथे वाचायला मिळाले. http://en.wikipedia.org/wiki/The_Exorcist_(film) http://www.houseofhorrors.com/exorcist.htm मूळ प्रिंट जाळल्या असे कोणत्या सिनेमाबाबत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
वर्षा Sat, 08/30/2008 - 11:24 नवीन

एक्झॉर्सिस्ट...

Exorcistचा विषय निघालाच आहे म्हणून... Exorcist मागची खरी गोष्ट -वर्षा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
छ
छोटा डॉन गुरुवार, 08/28/2008 - 19:55 नवीन

एकांतात नका बघु ...

डरना मना है पाहिला होता आवडला म्हणून डिविडी विकत घेतली आहे. कधीतरी एकांतात पाहिन म्हणते.
नका हो, एकांतात नका बघु. घाबरायचे सोडा, पिक्चर बोर झाल्याने तुम्ही जर "गाढ झोपी" गेलात तर तो "टीव्ही आणि डीव्हीडी प्लेअर" बंद कोण करणार ? फुकट ८-१० तास विजेचा अपव्याय होईल, लाईट किती महाग झाली आहे आता नाही !
हा खेळ सावल्यांचा प्रदर्शित झाला तेव्हा मी बरीच लहान होते. भयंकर भीती वाटली होती.
सहमत. बहुतेक हा माझा आयुष्यातला पहिला भयपट. मराठीतुन असल्याने समजला व कदाचित त्यामुळेच भिती वाटली होती. आता आम्ही पार निर्ढावलो आहोत, कश्शा कश्शाची म्हणुन भिती वाटत नाही. हिंदी सिनेमात घाबरण्यासारखे काही नसते व इंग्रजी जास्त कळत नाही त्यामुळे "मनापासुन भिती" वाटत नाही. काही वेळा किळसवाणे वाटते नक्की ... अवांतर : परवाच "हॉस्टेल भाग १ व २" पाहिले, महाभयंकर हा एकच शब्द मी सांगु शकतो त्या सिनेमाबद्दल. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली गुरुवार, 08/28/2008 - 20:08 नवीन

कालच आली

घाबरायचे सोडा, पिक्चर बोर झाल्याने तुम्ही जर "गाढ झोपी" गेलात तर तो "टीव्ही आणि डीव्हीडी प्लेअर" बंद कोण करणार ? फुकट ८-१० तास विजेचा अपव्याय होईल, लाईट किती महाग झाली आहे आता नाही !
कालच आली (ऑनलाईन मागवली होती) आता बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे. तसा, आधी पाहिला असल्याने बोर होणार नाही याची ग्यारंटी. पण आता आठवत नसल्याने पुन्हा पहावा म्हणते. त्यामुळे झोपी जाणार नाही. :)
आता आम्ही पार निर्ढावलो आहोत, कश्शा कश्शाची म्हणुन भिती वाटत नाही.
हा खेळ सावल्यांचा पुन्हा बघ हो! कशाची नाही तर डॉ. घाणेकरांना नाचताना बघून नक्की भीती वाटणार. पण खरंच, या चित्रपटावर विचार करता त्यातील काही डायलॉग्ज आणि प्रसंग भारी आहेत. अशा धर्तीवर नवा चित्रपट काढता येईल.
हिंदी सिनेमात घाबरण्यासारखे काही नसते व इंग्रजी जास्त कळत नाही त्यामुळे "मनापासुन भिती" वाटत नाही.
मग जपानी चित्रपट बघ (सबटायटल्ससह). सिरियसली, हल्ली सर्व इंग्रजी हॉररपट जपानी चित्रपटांवरून येतात. महाभयंकर कल्पना असतात या जपान्यांच्या. मनापासून भीती आणि किळस दोन्ही वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
आ
आगाऊ कार्टा गुरुवार, 08/28/2008 - 12:01 नवीन

द रिंग

"द रिंग" आणि "द रिंग २" हे चित्रपट कोणी पाहिले आहेत का? या चित्रपटातील काही प्रसंग खूपच भितीदायक आहेत. 'फूंक' हा भयपट नसून तो एक फसलेला विनोदी चित्रपट आहे.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 08/29/2008 - 03:01 नवीन

वरिजिनल

वरिजिनल जपानी 'द रिंग' पहा...विंग्रजी 'द रिंग' पेक्षा १० पट जास्त भीतीदायक आहे... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ कार्टा
त
तात्या विंचू गुरुवार, 08/28/2008 - 19:04 नवीन

रिंग आणि भितीदायक ...हाहाहा

आख्खी रिंग सीरिज फालतू आहे असे माझे ठाम मत आहे... आत्तापर्यंत कुठलाही भयपट मला भितीदायक वाटला नाही... त्यातल्या त्यात १४०८ बरा वाटला... 'फूंक' अजुन बघायचा आहे..बघूया वेळ मिळाला की.....
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 08/29/2008 - 08:53 नवीन

राम गोपाल

राम गोपाल वर्माचाच पहिला भयपट "रात". हा खरोखरच भयानक होता. रेवतीचा अभिनय तर एकदम भारी. ७-८ वेळा पाहिल्यानंतर आता कुठे जरा भिती कमी झाली. नाहीतर आधी घरात एकटा असताना कधी "रात" लागला की पहायला भिती वाटायची. त्यातले खास प्रसंग म्हणजे- १) रेवती आणि तिचा मित्र बाइकवर एका ठिकाणी हिंडायला जातात. तिथे बाइक पंक्चर होते (किंवा पेट्रोल संपतं असं काहितरी) आणि तिचा मित्र तिला तिथेच थांबायला सांगून एकाला लिफ्ट मागतो आणि टायर दुरुस्त करायला जातो. जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याला रेवती दिसत नाही. तिला शोधत शोधत तो आतमधे झाडीत जातो आणि एका तळ्यापाशी ती गुडघ्यात मान घालून बसलेली दिसते - रडताना. तिला हाका मारतो तरी ती वर बघत नाही. शेवटी तिला हात लावतो तेव्हा ती वर बघते. हा संपुर्ण सीन जबरदस्त घेतला आहे. २) रेवती ज्या घरात रहात असते तिथे आधी एका बाईचा खुन तिच्या नवर्‍यानेच केलेला असतो आणि तिचं भूत तिथे वावरत असतं. फ्लॅशबॅक मधे असं दाखवतात की तो एकदा झोपला असताना अचानक पलंगामधुन एकदम दोन हात येतात आणि त्याला मारुन टाकतात. ३) रेवती एकदा एका समारंभाला जाते. तिथे सगळ्यांशी बोलता बोलता अचानक तिच्या अंगात त्या बाईचं भूत शिरतं. ती तशीच गच्चीवर जाते. ते पाहून तिची खास मैत्रिण ही कुठे चालली ते बघायला जाते. ही हाका मारत तिच्या पाठीमागे जाते तेव्हा रेवती पाठमोरी असते. मग हळूहळू रेवती मागे वळते आणि तिच्या मैत्रिणीची मान काडकन मोडते. ४) रेवती सापडत नाही तेव्हा तिचा मित्र तिला शोधत शोधत एका क्लासरूम मधे जातो तो सीन. ५) चित्रपटाच्या शेवटी ओम पुरी (मांत्रिक) आणि रेवतीचा मित्र घराखालील भुयारात त्या भुताला शोधायला जातात आणि एका वळणानंतर अचानक ती बसलेली दिसते. लाल साडीत. एकूणच हा चित्रपट एक सुंदर भयपट आहे. :-) जेवढे श्रेय राम गोपाल वर्माच्या दिग्दर्शानाला तेवढेच श्रेय रेवतीच्या अफलातून अभिनयाला. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 08/30/2008 - 14:43 नवीन

रात/भूत

रात हाही मस्त सिनेमा होता. त्यानंतर 'भूत' मध्ये रामगोपाल वर्माने 'रात' मधील दोन तीन प्रसंग पुन्हा वापरले होते. 'रात' मध्ये मैत्रीणीची मान मोडलेली. 'भूत' मध्ये वॉचमन ची. 'रात' मध्ये सुरूवातीला रेवतीला थियेटर मध्ये एकटा असल्याचा भास होतो, तसेच 'भूत' मध्ये ही दाखवले आहे, नेमके आठवत नाही पण बहुधा उर्मिला ला समुद्रकिनार्‍यावर दाखविले आहे. आणखी आहेत बहुधा. सिनेमा पाहताना आठवत होते, आता नाही. :) जेवढे श्रेय राम गोपाल वर्माच्या दिग्दर्शानाला तेवढेच श्रेय रेवतीच्या अफलातून अभिनयाला. सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा