✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुन्हा एकदा पाकिस्तान

स
सर्वसाक्षी यांनी
Wed, 01/09/2013 - 14:41  ·  लेख
लेख
पाकिस्तान शत्रु असला, जरी तो आपल्या देशात अतिरेकी पाठवत असला तरीही ते त्या देशाचे राष्ट्रिय धोरण आहे आणि त्याचा संबंध त्या देशातील कलावंत आणि खेळाडु यांच्याशी जोडु नये अशी सहिष्णु व मानवतावादी, कला-क्रिडा प्रोत्साहक भूमिका मांडलेली दिसते. पाकिस्तानी खेळाडुंना इथे येण्यास वा पाकिस्तानी कलाकारांना इथल्या सिने/ करमणुक क्षेत्रात काम करु देण्यास विरोध करणार्‍यांना संकुचित म्हटले जाते. कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल. मग अशा घटना घडल्यानंतरही आपण' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात' असे गुणगुणत पाकिस्तानी खेळाडुंना निमंत्रित करत राहणार का? इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे? जर त्या कलावंतांना/ खेळाडुंना इथे येणे महत्वाचे वाटत असेल तर त्यांनी अशा कृत्यांचा जाब आपल्या राष्ट्राला का विचारु नये? आणि जर ते असे करत नसतील तरीही आपण त्यांना इथे कडेकोट बंदोबस्तात मिरवणार का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
70028 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

काय सांगता?

नितिन थत्ते
Wed, 01/16/2013 - 15:36 नवीन
>>एकंदरीत स्वत:ची मतपेढी टिकविण्याच्या काही पक्षांच्या किळसवाण्या राजकारणामुळे भारतीय सैनिकांचा अमानवी पद्धतीने जीव जात आहे तीन शिरच्छेदाच्या घटनांपैकी एका घटनेच्या वेळी "मतपेटी टिकवण्याचे किळसवाणे राजकारण" न करणार्‍या पक्षाचे सरकार होते असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एकंदरीत स्वत:ची मतपेढी

पिंपातला उंदीर
Wed, 05/20/2015 - 21:20 नवीन
एकंदरीत स्वत:ची मतपेढी टिकविण्याच्या काही पक्षांच्या किळसवाण्या राजकारणामुळे भारतीय सैनिकांचा अमानवी पद्धतीने जीव जात आहे गुर्जी मे २०१४ नंतर सीमेवर लई सैनिक मारले गेले हो . त्याबद्दल बोला की थोड . आता कुठल्या पक्षाच्या किळसवाण्या राजकारणामुळे सैनिकांचा जीव जात आहे . सांगा पाहू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

'भारतीय जवानांकडून सीमेचे

पक्या
गुरुवार, 01/17/2013 - 00:09 नवीन
'भारतीय जवानांकडून सीमेचे उल्लंघन नाही' http://esakal.com/esakal/20130116/5255041879650501265.htm
  • Log in or register to post comments

Let's talk it out: Hina Rabbani Khar to India

मदनबाण
गुरुवार, 01/17/2013 - 10:50 नवीन
Image removed. "Dialogue between the Indian and Pakistani leadership would be fruitful as Prime Minister Manmohan Singh and the people of India wanted peaceful relations with Pakistan". (SM Krishna-Source The Times Of India Sep 9, 2012, 02.57PM IST) "For something like this to be blown out of proportion...there is absolutely no questions of ever anyone authorising any beheading or killing of Indian soldiers. It would be absolutely opposite to the peace process.” (Hina Rabbani Khar-Source THE HINDU NEW YORK, January 16, 2013) याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! किंवा अमन की आशा और कायरता की साजिश ! आपण फक्त "हात चोळत" बसतो ?
  • Log in or register to post comments

राजकीय वास्तव

अवतार
गुरुवार, 01/17/2013 - 15:39 नवीन
भारतात जरी हा प्रश्न नैतिकतेच्या पातळीवर पहिला जात असला तरी पाकिस्तानसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. सत्ताधारी आणि सर्वसामान्य समाज यांचे हितसंबंध वेगवेगळ्या पातळ्यांवर गुंतलेले असतात. आधुनिक राष्ट्रवाद हा अलीकडच्या काळात सामान्य जनतेच्या रेट्यामुळे अस्तित्वात आला आहे. सत्ताधारी वर्ग हा कधीही अशा प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय सत्तापालटासाठी अनुकूल नव्हता. सत्तेचा केंद्रबिंदू हा काही ठराविक राज्यकर्त्या घराण्यांच्या हातातून पद्धतशीरपणे सामान्य जनतेच्या बाजूला झुकणे हा लोकशाहीचा अर्थ आहे. पाकिस्तानच्या निर्मितीमागील प्रेरणा ह्याच मुळात लोकशाहीवादी नसून सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध राखणे ह्या एकाच हेतूने त्या देशाचा जन्म झाला आहे. पण अशा राजकारणाचे दूरगामी परिणाम निश्चितच होत असतात. त्याचाच परिणाम म्हणून आज तेथील सत्ताधीशांबद्दल तिथल्या जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. तिथे अंतर्गत विघटनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अशा वेळी बाहेरच्या शत्रूची भीती दाखवून सत्ताधारी वर्गाचे प्राबल्य पुनर्प्रस्थापित करण्यासाठी त्यांना अशी खेळी करणे भागच आहे. पण महत्वाचा प्रश्न म्हणजे भारताची प्रतिक्रिया काय असावी. जी काही प्रतिक्रिया असेल ती भारताच्या हिताची असावी पाकिस्तानच्या हिताची नव्हे. दोन देशांमधील युद्ध आणि गल्लीतील मारामारी यात फरक असतो. युद्ध सुरु करणे फारच सोपे असते. पण संपवणे अत्यंत अवघड असते. युद्धाचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिणाम काय होतील याचा विचार अगोदर करावा लागतो. अंतिम विजय हाच युद्धाचा हेतू असावा, प्रतिशोध हा नव्हे. आज पाकिस्तान आतूनच दुभंगत आहे. अशा वेळी जर भारतीय सैन्याकडून आक्रमक पावले उचलली गेली तर त्याचा परिणाम म्हणून ही विघटनाची प्रक्रिया थांबून तिथल्या सत्ताधीशांना जनतेचा प्रचंड प्रमाणात पाठींबा मिळू शकतो. परिणामी राष्ट्रवादाच्या भावनेने भारलेला एकसंध शक्तिशाली पाकिस्तान निर्माण होऊ शकतो. अशा राष्ट्रीय भावनेने एकवटलेल्या पाकिस्तानचे आव्हान मोडून काढणे ही भारतासाठी कायमची डोकेदुखी होऊ शकते. वार करायचाच असेल तर तो योग्य वेळी आणि योग्य जागी करावा. लष्करप्रमुखांनी नेमके हेच म्हटले आहे.
  • Log in or register to post comments

हा सगळा प्रकार मला एकतर्फी

बोलघेवडा
Fri, 01/18/2013 - 06:55 नवीन
हा सगळा प्रकार मला एकतर्फी वाटतो. म्हणजे अस बघा कि आपले मिडीया आपल्यासमोर भारत अगदीच बापुडवाणा दुबळा असा चित्र उभे करतं. त्यातून अस वाटते कि आपण सतत मार खातो. पाकिस्तान सतत आपली काही तरी कुरापत काढतो. पण खर चित्र काहीतरी वेगळेच असणार आहे असा मला वाटते. आपणही पाकिस्तान पेक्षा थोडे जास्तच "बाराचे" असणार.
  • Log in or register to post comments

कप्पाळ आमचं

नितिन थत्ते
Fri, 01/18/2013 - 12:40 नवीन
ह्या:, कायतरीच ब्वॉ तुम्ही बोलता. १. भारत कध्धी कध्धी आगळीक करत नाही. भारताने गेल्या दहा हजार वर्षात कोणावर आक्रमण केलं नाही हे तुम्ही ढकलपत्रांतून वाचलेलं दिसत नाही. २. पाकिस्तान नेहमी आपली कुरापत काढत असतो. आणि आपण हातावर हात ठेवून बघतो. हे ही तुम्हाला ठाऊक नाही म्हणजे कमालच्चै. आत्तासुद्धा जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला तेव्हा "तुम्ही मुळ्ळीच गोळ्या चालवायच्या नाहीत" असं पंतप्रधानांनी/सोनिया गांधींनी/संरक्षणमंत्र्यांनी पर्सनली त्या सैनिकांना कळवलं होतं हेही तुम्हाला माहिती नाही? ३. आपले सैन्य इतके बलवान आहे की ते दीड (सेकंदात/मिनिटात/तासात/दिवसात) पाकिस्तानला होत्याचं नव्हतं करून टाकेल. केवळ आपल्या देशात मुसलमान राहतात आणि त्यांना मताधिकार आहे म्हणून आपले षंढ/नाकर्ते/बोटचेपे वगैरे सरकार आपल्या लष्कराला रोखून धरत आहे. मागच्यावेळी कारगिल युद्धात सुद्धा नाही का कितीतरी पाकिस्तानी घुसखोरांना केवळ ५०-६० दिवसांत आपल्या सैन्याने पिटाळून लावलं होतं. तुम्हाला काहीच माहिती नाही असं वाटतंय. जालावर नवीन दिसता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलघेवडा

या महिन्यात पाकिस्तान कडुन

मदनबाण
Fri, 10/17/2014 - 12:02 नवीन
या महिन्यात पाकिस्तान कडुन जवळपास ६३ वेळा शस्त्रसंधी चा भंग केला गेला आहे.हिंदूस्थान आणि पाकिस्तान बॉर्डर वरील गावात राहणार्‍या हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. सांबा सेक्टर हा सगळ्यात जास्त प्रभावित भाग आहे आणि इथुन जवळपास ५ हजार लोक स्थलांतरीत करण्यात आलेले आहेत. तर १ ऑक्टोबर पासुन १६ हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. मला वाटत कारगिल युद्ध झाल्या नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात फायरिंग /शेलिंग आणि लोकांचे स्थलांतर झालेले नाही. परंतु सध्या चिंतेचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे युद्ध करण्यासाठी दारुगोळाच नाही ! { एव्हढा मोठा देश आणि त्याच्याकडे आत्म संरक्षण करण्यासाठी दारुगोळा नसावा या पेक्षा वाईट अवस्था काय असावी ? } आता आपले लष्कर प्रमुख जनरल दलबिर सिंग सुहाग आहेत,त्यांच्या आधी जनरल बिक्रम सिंग होते, त्यांनी एक गोष्ट ठळकपणे उघड केली होती, ती म्हणजे आपल्याकडे २० दिवस लढण्यासाठीचा सुद्धा दारुगोळा नाही ! war wastage reserves (WWR) हा ४० दिवसांच्या घनघोर युद्धासाठी आवश्यक असावा असा दंडक असतानाही आपल्या लष्कराची दुरावस्था झालेली आहे आणि हे प्रचंड चिंतेचे कारण आहे.तसेच एयर फोर्सची प्रचंड दुरावस्था झाली आहे. { ३ दिवसांपूर्वीच सुखोइ-३० पुण्यात पडल्याची बातमी तुम्ही वाचलीत असेल} सातत्याने विमाने पडली आहेत आणि वैमानिक जीव गमवत आहे. { मला वाटते वायुदलाची विमाने युद्ध न करता पडण्यात आपल्या देशाने जागतीक रेकॉर्ड बनवला असेल. :( } म्हणजे आपल्याकडे दारुगोळाही नाही, विमानांची संख्याही कमी,पाणबुड्यांचीही संख्या घटली अश्या अवस्थेत जर सध्याची परिस्थीती अजुन चिघळली तर आपण युद्धजन्य परिस्थीचा सामना करण्यास सक्षम आहोत असे म्हणता येइल ? जाता जाता :- कारगिल युद्धाच्या वेळेला सुद्धा आपल्याला दारुगोळा पुरवठा कमी पडला होता आणि आयत्या वेळी बोफोर्स तोफेचे शेल्स साउथ आफ्रिकेतुन आयात करावे लागले होते, ही प्रकारे आपल्या लष्कराची नाचक्की करणारे होते.आणि या युद्धातुन आपण काहीच धडा घेतला नाही हे खेदाने सांगावे लागते आहे. :( संदर्भ :- Army's ammunition won't last 20 days of war Army running low on ammunition India not war ready, Army Chief tells Modi India and Pakistan exchange fire in Kashmir border clashes India giving befitting reply to Pakistan at border: Army Chief

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- RBI in talks with govt over a Financial Resolution Authority Modi government cuts through red tape to make working easier in India
  • Log in or register to post comments

चला सरकारने काही तरी पावले

मदनबाण
Sat, 10/25/2014 - 19:23 नवीन
चला सरकारने काही तरी पावले उचलली म्हणायची तर... संदर्भ :- Centre gives nod to defence projects worth Rs 80,000 cr Govt to take call on key defence deals worth Rs 70,000 crore India spurns US offer and purchases guided missiles from Israel for $525m Centre gives nod to defence projects worth Rs 80,000 crore Defence Ministry Clears Defence Projects of Worth Rs. 80,000 Cr

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- प्रेमा काय देऊ तुला (शिकलेली बायको)
  • Log in or register to post comments

ता.क :-कालबाह्य लष्करी

मदनबाण
Mon, 10/27/2014 - 16:38 नवीन
ता.क :- कालबाह्य लष्करी सामग्रीविरोधात अधिकाऱ्यांच्या पत्नींचा 'एल्गार' 'सुखोई'चे दुखणे..

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pooling of gas and coal on cards: Government plans to fuel up 91K MW of stuck power projects
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मागील एनडीए सरकारच्या काळातही

नितिन थत्ते
Sat, 11/01/2014 - 07:41 नवीन
मागील एनडीए सरकारच्या काळातही असाच ओरडा झाला होता. त्यावेळी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी स्वतः मिग २१ ची वारी केली आणि ती सुरक्षित असल्याची ग्वाही वगैरे दिली होती. [त्यानंतर तो ओरडा शमला होता असे आठवते].
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ता.क :-कालबाह्य चेतक-चीता

मदनबाण
Tue, 11/18/2014 - 10:26 नवीन
ता.क :- कालबाह्य चेतक-चीता लष्करातून बाद करावीत: अधिकाऱ्यांच्या पत्नींचं साकडं Pakistan test-fires 2nd nuclear-capable missile in week Pakistan test-fires nuclear capable ballistic missile Hatf IV NSA monitoring situation: MEA on `China training Pakistani troops along India border' report

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }
  • Log in or register to post comments

पाकिस्तान आणि चीनची मैत्री

मदनबाण
Tue, 11/18/2014 - 12:08 नवीन
पाकिस्तान आणि चीनची मैत्री आपल्याला त्रासदायक ठरत आहे, एकीकडुन पाकिस्तान उध्योग करत आहे तर दुसरी बाजुने चीन ! मध्यंतरी चीनचे राष्ट्रपती Xi Jinping हिंदूस्थानात येउन गेले त्यावेळी चीनी सैन्याकडुन लढाख मधील चुमार मधला प्रश्न गहन झाला होता. { मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जवळपास १००० पेक्षा चीनी सौन्य हिंदूस्थानात घुसवुन चीन ने दिलेली वाढदिवसाची भेट } चीन ने आपल्या देशाच्या हद्दीत ४०० मीटर आत येउन रस्ते बनवले { जे आपल्या लष्कराने नंतर उध्वस्त केले. } एक डोळा लढाख वर ठेवुन दुसरा डोळा सिक्किम वर रोखला गेला आहे. चीन आणि हिंदूस्थान यांच्या मधे "बफर" असलेल्या तिबेट मधे रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात चीन ने मोठ्या प्रमाणात पैसा ओतला आहे. ते आता सिक्किमच्या अगदी जवळ पोहचले आहे ! Image removed. नथुला पास चे महत्व आपल्यासाठी का आहे ? याचे उत्तर वरचा मॅप पाहुन कळते. Image removed. काही वाचनिय दुवे :- China plans taking Tibet rail network near Sikkim Why do the Chinese want a train to Sikkim? China Inaugurates New Tibet Rail Link Close to Sikkim India has ignored Tibet for too long China entered Sikkim during Ladakh face-off एक जुना रिपोर्ट :- The Impact of Opening up Sikkim’s Nathu-La on China-India Eastern Border Trade

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }
  • Log in or register to post comments

नथुला पास चे महत्व आपल्यासाठी

मदनबाण
Tue, 05/19/2015 - 10:19 नवीन
नथुला पास चे महत्व आपल्यासाठी का आहे ? याचे उत्तर वरचा मॅप पाहुन कळते. हा नथुला पास जून पासुन उघडला जाणार आहे, थॅक्स टू मोदी ? फॉर कैलास-मान सरोवर यात्रा न्यू-रुट. Nathu La route to Kailash-Mansarovar to open from June: PM Modi मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

The Tibet story that you

मदनबाण
Tue, 05/19/2015 - 10:34 नवीन
The Tibet story that you should know... Better Late Than Never: India Finally Beefing up China Frontier मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

२०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं

मदनबाण
Tue, 11/25/2014 - 09:58 नवीन
ता.क :- Pak To Have 200 Nukes By 2020: US Think Tank Pakistan has fastest growing nuclear weapons programme in the world: report Strategic Stability in the Second Nuclear Age २०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }
  • Log in or register to post comments

दक्षीण आशियातील अण्वस्त्रांचा

माहितगार
Tue, 11/25/2014 - 15:41 नवीन
दक्षीण आशियातील अण्वस्त्रांचा प्रश्न महत्वाचा असला तरीही, १) प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेला आकडा हाईप करून दाखवला जातो आहे, २) बातम्या देण्याची वेळ सार्क परिषद आणि ओबामांच्या भारत भेटीत काश्मीर प्रश्ना संबंधात भारतावर दबाव टाकण्यासाठी म्हणून असावी. (भारतीय लोक नुसतीच स्वतःची पाठ थोपाटून घेतात पण आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीत प्रत्यक्षात चीन आणि पाकीस्तान बरेच चतुर प्रकार करताना दिसतात जे दुर्दैवाने सामान्यतः भारतीय लोकांना लक्षातही येत नाहीत) ३) दंगली होतील या भितीने भारताची फाळणी होऊ देणे हीच पहिली आणि मोठी चूक होती. आणि आता तर फाळणीच अधीक समर्थन केल जातय पण अण्वस्त्र अतीरेक्यांच्या हाती पडलीतर किती जिवीत हानी होईल हा एक प्रश्न आणि दुसरे शस्त्रास्त्रांच्या न संपणार्‍या स्पर्धेसाठी किती पैसा डावावर लावला जाईल. पाकिस्तानी जनतेला अरब चीन आणि अमेरीका एकमेकांच्या चढाओढीने पैसा देत रहाणार पण भारताच्या नागरीकांना स्वतःच्या डोक्यावर शासकीय कर्जे घेऊन शस्त्रास्त्र स्पर्धेत उतरावे लागते. असो. या निमीत्ताने आमची हि छोटी धागा जाहीरात १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेला

मदनबाण
Tue, 11/25/2014 - 16:03 नवीन
प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेला आकडा हाईप करून दाखवला जातो आहे, २) बातम्या देण्याची वेळ सार्क परिषद आणि ओबामांच्या भारत भेटीत काश्मीर प्रश्ना संबंधात भारतावर दबाव टाकण्यासाठी म्हणून असावी. अहं अस पाकड्यांच्या बाबतीत म्हणणे चुकीचे ठरेल ! पाकिस्तानकडे १२०-१५० अणवस्त्रे आहेत ही माहिती फार जुनी झाली, त्यात भर टाकण्याचे उध्योग पाकिस्तान करत राहिला त्याचाच परिणाम हा नविन आकडा आहे, तसेच छोट्या आकाराची अणवस्त्रे ही बनवण्यात पाकिस्तान सध्या कार्यरत असल्याचे समजते. या लेखाच्या पहिल्या पानावर ज्या खुशब ३ प्लुटोनियम रिअ‍ॅक्टरचा चा सॅटॅलाईट फोटो दिला आहे, ती ऑपरेशनल झाल्याच्या बातम्या आहेत, यातुन त्यांना 5.7-7.1 kg of weapon-grade plutonium मिळेल. तसेच IPFM { International Panel on Fissile Materials } नुसार पाकड्यांनी आत्ता पर्यंत 170 kg प्लुटोनियम जमा केले असावे ज्यातुन ३५-४० न्युक्लिअर वेपन्स बनवली जातील { 4-5 kg of plutonium प्रत्येकी एकाला } पाकिस्तान हे अणवस्त्रांचा ज्वालामुखी बनत चालला आहे आणि अर्थातच आपल्या प्रेमापोटी ते त्यात भर टाकत आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

खुशब -४ अजुन सुरु झाली नाही,

मदनबाण
Tue, 11/25/2014 - 16:23 नवीन
खुशब -४ अजुन सुरु झाली नाही, असे त्याच्या कुलिंग टॉवरच्या निर्माण प्रक्रियेवरुन लक्षात येते. खुशब-४ च्या कंस्ट्रक्शन प्रोग्रेसवर असलेला हा एक रिपोर्ट :- Further Construction Progress on the Fourth Heavy Water Reactor at Khushab Nuclear Site { ISIS Reports -Institute for Science and International Security } हा या रिपोर्टचा पिडीएफ दुवा :- Further Construction Progress on the Fourth Heavy Water Reactor at Khushab Nuclear Site

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अण्वस्त्र युद्धासाठी डझनभर

माहितगार
Tue, 11/25/2014 - 17:08 नवीन
अण्वस्त्र युद्धासाठी डझनभर बनवलीतरी डोक्यावरून पाणी जात असेल ना ? त्यांचा भौगोलीक आकार आणि शहरांची संख्या पाहता त्यांच्यावर वापरण्यासाठी भारताला डझन पुरतील आणि त्या नंतर उरलेली तुम्ही म्हणता ती संख्या वापरण्याच्या स्थितीततरी असतील का ते ? एवढी सव्वाशे किंवा दोनशे ठेऊन पाकींना काय उपयोग होऊ शकेल ते समजले नाही. त्या शिवाय मिसाईल विरोधी क्षेपणास्त्रे दोन्ही देशांकडे असणार म्हणजे अवस्त्रे आपापल्याच आवकाशात फुटण्याची शक्यता वाढू शकते. आपण आकडे देता आहात ते अंदाजे असावेत. आणि आकडे फुगवून सांगीतले जाण्यात पाकीस्तानचे नुकसान काहीच नाही. काश्मीर बद्दल बोलणी करण्याचा भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्या पलिकडे या बातम्यातून काही हशील आहे का ? दोन्ही देशात अण्वस्त्र स्पर्धा आहे आपण (भारताने) किती आरडा ओरडा केला तरी पाकीस्तानव त्याचा प्रभाव तर होणार नाही, मग आपल्या मतानुसार सद्यस्थितीत पाकीस्तान विरुद्ध भारताकडे उपाय काय राहतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

एवढी सव्वाशे किंवा दोनशे ठेऊन

मदनबाण
Tue, 11/25/2014 - 17:21 नवीन
एवढी सव्वाशे किंवा दोनशे ठेऊन पाकींना काय उपयोग होऊ शकेल ते समजले नाही. ते उपद्रवी आहेत्,आणि उपद्रवी लोक त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाउ शकतात ! ते काळ्या बाजारात याची विक्रीही करु शकतात. संख्येच म्हणाल तर मला वाटत अमेरिकेकडे १७०० च्या आसपास आहेत म्हणे. { नक्की परत एकचा शोधायला हवे जालावर } काश्मीर बद्दल बोलणी करण्याचा भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्या पलिकडे या बातम्यातून काही हशील आहे का ? काश्मिर हे फक्त आपल्या कुरापती काढण्यासाठीचे निमित्त आहे,क्षणभर गॄहीत धरुन चालु की काश्मिर पाकिस्तानला मिळाले तरी सुद्धा ते गुण्यागोविंदाने नांदतील का ? अर्थात याचे उत्तर नाही असेच येते, कारण त्यांचा आत्ता पर्यंतच इतिहास ! पाकीस्तानव त्याचा प्रभाव तर होणार नाही, मग आपल्या मतानुसार सद्यस्थितीत पाकीस्तान विरुद्ध भारताकडे उपाय काय राहतो ? आत्मबल वाढवणे /आर्थीक आणि लष्करी दॄष्ट्या स्वंयपूर्ण होणे... तुम्ही जर पैलवान झालात तर तुमची कळ काढण्याची हिम्मतच कोणी करणार नाही, पण हेच जर तुम्ही काडीपैलवान असाल तर येणारे-जाणारे सुद्धा टपल्या मारुन जातात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

आर्थीक आणि लष्करी दॄष्ट्या

माहितगार
Tue, 11/25/2014 - 17:28 नवीन
आर्थीक आणि लष्करी दॄष्ट्या स्वंयपूर्ण होणे
आर्थीक आणि लष्करी दॄष्ट्या काय व्हावयास हव त्याच्याशी सहमत. पण आर्थीक आणि लष्करी दॄष्ट्या काय व्हावयास हव आणि काय आहे सध्याची यातील दरी दुर्दैवाने बर्‍यापैकी मोठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

रशिया आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी उलाढाल !

मदनबाण
Tue, 11/25/2014 - 15:40 नवीन
नविन घडामोडी + नविन समिकरणे India Under Modi to Buy First Heavy Weapons Since 1980s India to buy first artillery since 1980s Putin woos Pakistan as India buys US arms जाता जाता :- “The Modi government is more realistic and pragmatic when it comes to defense acquisitions,” said Amit Cowshish, a distinguished fellow at the Institute for Defence Studies and Analyses in New Delhi. “Earlier, defense procurements used to get stuck for years on flimsy grounds.”

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }
  • Log in or register to post comments

‘चीनशी युद्ध झाल्यास दोन्ही

मदनबाण
गुरुवार, 09/07/2017 - 21:10 नवीन
‘चीनशी युद्ध झाल्यास दोन्ही आघाड्यांवर लढण्याची तयारी ठेवायला हवी’ …अन्यथा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक; लष्करी अधिकाऱ्याचा पाकला इशारा

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nirmala Sitharaman to focus on military preparedness
  • Log in or register to post comments

२०१३ मध्ये काँग्रेस होती ,

अतूल २०१५
Fri, 09/08/2017 - 01:00 नवीन
२०१३ मध्ये काँग्रेस होती , आता कोण आहे? मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही , २०१३ मध्ये जे बोलत होते , तेच आता बोला सैनिक तेव्हा पण आपले होते आत्ता पण आपले आहे.
  • Log in or register to post comments

पाकिस्तान ने जनवरी से अब तक 1300 बार सीज फायर का उलंघन

मदनबाण
Sun, 06/07/2020 - 11:04 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalte
  • Log in or register to post comments

चीनी बाजु :-

मदनबाण
Sun, 06/07/2020 - 19:47 नवीन
चीनी बाजु :- आपली बाजु :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalte
  • Log in or register to post comments

भारतीय दुतावासातील दोन

मदनबाण
Tue, 06/16/2020 - 14:26 नवीन
भारतीय दुतावासातील दोन कर्मचाऱ्यांना पाकिस्तानात रॉडने माराहाण, भयंकर छळ एकीकडे चीन दुसरीकडे पाकिस्तान, दोन्ही बाजुने लचके तोडणे चालु !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- What stops India from designating Pakistan a terrorist state and cutting off diplomatic relations with it? :- Brahma Chellaney
  • Log in or register to post comments

ऑपरेशन पूंछ और कितने बार करना है, जरा बताओ तो सही ?

मदनबाण
Tue, 11/23/2021 - 21:06 नवीन
दरवर्षी प्रमाणे मोदी यांनी त्यांची दिवाळी सैनिकां बरोबर साजरा केली... नेहमी प्रमाणे फोटो सेशन , व्हिडियो सेशन झाले. पण यावेळी एक मात्र एक गोष्ट वेगळी होती म्हणजे हे सगळं होण्याच्या आधी पासुन म्हणजे ११ ऑक्टोबर पासुन जम्मु-काश्मिर मधील पूंछ मध्ये जी धुमचक्री सुरु झाली ती थांबण्याचे नाव घेत नसुन आपल्या जवानांचे मृतदेह मात्र घरी परत पाठवायला तेव्हा पासुन सुरुच आहे. आपली आर्मी गेले कित्येक वर्ष असे वक्तव्य करत आली आहे की पाकिस्तानशी लढण्याची वेळ आणि जागा आम्ही ठरवु, तेव्हा हा मुहुर्त कधी काढला जातोय याची मी वाट पाहतोय. सर्जिकल स्ट्राईक करुन आपण पाकिस्तानच्या मनात जे भय उत्पन्न केले होते ते तसेच ठेवण्यास ५६ इंची छातीचे पंतप्रधान मोदी आणि आपले लष्कर सपशेल अपयशी ठरवले असुन याची साक्ष पाकिस्ताने केलेल्या या कारवायाच देतात. आपल्या अनेक मुख्य समस्यांचे मूळ पाकिस्तान आहे हे व्यवस्थित ठावुक असताना देखील हे मूळ उपटुन नष्ट करण्यास आपण या दिवसा पर्यंत अपयशी ठरलेलो असुन, आपण केवळ जवानांचे मृतदेह उचलत राहिलो आहोत. कुठे आहे पाकस्तानला कायमच धडा द्यायची इच्छा ? दोन आघाड्यावर लढण्याची तयारी ठेवा म्हणणारे लष्कर एका आघाडी वरच्या शत्रुला अजुन नष्ट किंवा विकलांग करुन ठेवु शकली नाही हे अपयश नव्हे तर अजुन काय ? या विषयावर अधिक इकडे :- जाता जाता :- ऑपरेश पाकिस्तान सर्वनाश पाहण्याची इच्छा ठेवुन आहे, ती पूर्ण होणे या जन्मी तरी शक्य होते का ते मात्र ठावूक नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सरहद पर एक फौजी अपना वादा निभा रहा हैं,वो धरती माँ की मोहब्बत का कर्ज चुका रहा हैं।
  • Log in or register to post comments

पुढच्या ऑपरेशन

कपिलमुनी
Wed, 11/24/2021 - 02:50 नवीन
पुढच्या ऑपरेशन साठी यूपी किंवा नॅशनल इलेक्क्शन येईतो थांबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

@ मदनबाण

सुबोध खरे
Wed, 11/24/2021 - 11:28 नवीन
@ मदनबाण पाकिस्तानचा सर्वनाश म्हणजे काय? उत्तर कोरिया विरुद्ध एवढे निर्बंध टाकून सुद्धा अमेरिकेने आजतागायत तेथे हल्ला करण्याचे धारिष्ट्य का दाखवलेले नाही? रशिया आणि नंतर अमेरिका २० वर्षे अफगाणिस्तानात राहून सुद्धा शेवटी माघारी का गेली? सध्या पाकिस्तान FATF च्या करड्या यादीत कशामुळेआणि कोणामुळे आहे? बलूच बंडखोरांमुळे मूळ ४७०० कोटी डॉलर्स च्या CPEC ची भांडवली किंमत ६२०० कोटी पर्यंत वाढली आहे ती कुणामुळे? तुम्ही आपली शस्त्र शक्ती वाढवली कि त्याचा पाकीस्तानवर काय परिणाम होतो? पाकिस्तानचा भूभाग जोडून घेतला तर तेथल्या लोकसंख्येचे काय करायचे याचा विचार केला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

पाकिस्तानचा सर्वनाश म्हणजे

मदनबाण
Wed, 11/24/2021 - 13:10 नवीन
पाकिस्तानचा सर्वनाश म्हणजे काय? माझ्या पुरते म्हणाल तर, आपल्या सैनिकांचे / लोकांचे लोकांचे रक्त सांडण्याची त्यांची क्षमता नष्ट करणे. उत्तर कोरिया विरुद्ध एवढे निर्बंध टाकून सुद्धा अमेरिकेने आजतागायत तेथे हल्ला करण्याचे धारिष्ट्य का दाखवलेले नाही? उत्तर कोरिया हा अमेरिकेचा शेजारी नाही, तसेच त्यांचे साऊथ कोरिया मधले बेस त्यांनी इतरत्र हलवले नाही. उत्तर कोरिया पाकिस्तान सारखे उद्योग साऊथ कोरिया बरोबर करत नाही. रशिया आणि नंतर अमेरिका २० वर्षे अफगाणिस्तानात राहून सुद्धा शेवटी माघारी का गेली? दोन्ही देशांचा गोरिला वॉर लढण्याचा अनुभव व आणि अभ्यास कमी पडला त्यांच्याकडे नव्हता. अमेरिकेला समुद्रात राहुन हल्ला करण्यात महारत असली तरी ती लँड लॉक अफगाणिस्तान विरोधान वापरता आली नाही. शिवाय या दोन्ही विरोधात पाकिस्तान ने मुजाहिदीनांना सर्व प्रकारचे जमेल ते सहाय्य केले. यात दोन बोक्यांच्या भांडणात लोणी सात्यत्याने पाकिस्तान मिळवत राहिला. सध्या पाकिस्तान FATF च्या करड्या यादीत कशामुळेआणि कोणामुळे आहे? खरं पाहिलं तर आत्ता तो काळ्या यादीत असायला हवा होता, तसे झाले असते तर हल्लीच सौदी ने जी नवी भिक त्यांच्या झोळीत टाकली आहे ती सुद्धा टाकता आली नसती. बलूच बंडखोरांमुळे मूळ ४७०० कोटी डॉलर्स च्या CPEC ची भांडवली किंमत ६२०० कोटी पर्यंत वाढली आहे ती कुणामुळे? आपल्यामुळे इतके जरी नुकसान होत असेल तर बरी प्रगती करतोय आपण इतकेच सध्या म्हणुया. तुम्ही आपली शस्त्र शक्ती वाढवली कि त्याचा पाकीस्तानवर काय परिणाम होतो? तुम्ही काहीही केले तरी पाकिस्तान त्याच्या मूळ उद्देशा पासुन भरकटणार नाही. त्यांना काय वाटेल म्हणुन आपण एकाच सर्जीकल स्ट्राईकवर गप्प बसलो त्याचीच नवी फळे आता मिळताना दिसत आहेत. पाकिस्तानचा भूभाग जोडून घेतला तर तेथल्या लोकसंख्येचे काय करायचे याचा विचार केला आहे का? त्यांचा भूभाग जोडुन घेण्याची इच्छा नाही, तशी वेळ येण्याची शक्यता शून्य कारण आपण इतक्या वर्षात जे करु शकलो नाही ना त्याची आपण मानसिकता आपण ठेवुन आहोत. जेव्हा सरकार त्या मानसिकतेत येईल तेव्हा हा प्रश्न विचारात घेण्या सारखा असेल. जाता जाता :- शत्रुचे आयुष्य कमी केले की तुमचे आयुष्य वाढते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- फौजी भी कमाल के होते हैं,जेब के छोटे बटुए में परिवार, और दिल मे सारा हिंदुस्तान रखते हैं।
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा