✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुन्हा एकदा पाकिस्तान

स
सर्वसाक्षी यांनी
Wed, 01/09/2013 - 14:41  ·  लेख
लेख
पाकिस्तान शत्रु असला, जरी तो आपल्या देशात अतिरेकी पाठवत असला तरीही ते त्या देशाचे राष्ट्रिय धोरण आहे आणि त्याचा संबंध त्या देशातील कलावंत आणि खेळाडु यांच्याशी जोडु नये अशी सहिष्णु व मानवतावादी, कला-क्रिडा प्रोत्साहक भूमिका मांडलेली दिसते. पाकिस्तानी खेळाडुंना इथे येण्यास वा पाकिस्तानी कलाकारांना इथल्या सिने/ करमणुक क्षेत्रात काम करु देण्यास विरोध करणार्‍यांना संकुचित म्हटले जाते. कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल. मग अशा घटना घडल्यानंतरही आपण' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात' असे गुणगुणत पाकिस्तानी खेळाडुंना निमंत्रित करत राहणार का? इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे? जर त्या कलावंतांना/ खेळाडुंना इथे येणे महत्वाचे वाटत असेल तर त्यांनी अशा कृत्यांचा जाब आपल्या राष्ट्राला का विचारु नये? आणि जर ते असे करत नसतील तरीही आपण त्यांना इथे कडेकोट बंदोबस्तात मिरवणार का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
70028 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

जर पाकिस्तानशी संबंध तोडणे

पिंपातला उंदीर
Wed, 05/20/2015 - 21:48 नवीन
जर पाकिस्तानशी संबंध तोडणे आततायी किंवा भावनेच्या भरात केलेली कृती वाटत असेल, तर भारताला अजून वेगळ्या कृती करता येतील. (१) शांतता चर्चेचे गुर्‍हाळ सुरू ठेवणे. (२) पाकिस्तानला गाजावाजा न करता जशास तसे उत्तर देणे. म्हणजे सैनिकांना सैनिकांचा वेष न देता इतर वेषात गुपचूप सीमा ओलांडायला लावून सीमेजवळील पाकड्यांच्या ठाण्यावर अधूनमधून हल्ले करून परत येणे. असे हल्ले झाल्यावर ते आम्ही केलेच नाहीत असे सांगून काखा वर करणे. (३) पाकिस्तानमधील फुटिरतावादी संघटनांना (बलुचिस्तान, पख्तुनिस्तान व सिंध प्रांत स्वतंत्र देश करू पाहणार्‍या फुटिरतावादी संघटना) भारताने गुपचुप आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत द्यावी. असे करण्याची क्षमता फक्त इंदिरा गांधींमध्येच होती. नरसिंहराव व वाजपेयी हे देखील २००१ पर्यंत अफगाणिस्तानमधील कट्टर तालिबानविरोधी असलेल्या अह्मदशहा मसूद या पंजशीर खोर्‍यातल्या ताजिक नेत्याला शस्त्रे व आर्थिक मदत देत होते. आता पाकिस्तानी फुटिर संघटनांना तशीच मदत करण्याची वेळ आली आहे, जेणेकरून पाकचे विभाजन होण्याची शक्यता वाढेल व पाकिस्तान अंतर्गत भांडणांनी दुबळा होईल. (४) आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण पाकिस्तानी साहसवादाचे बळी आहोत व आपण कसा संयम पाळत आहोत असे कायम सांगत राहून आंतरराष्ट्रीय मत आपल्या बाजूने जरी आले नाही तरी विरूद्ध जाणार नाही यासाठी प्रयत्न करणे. जे बात ! या सगळ्या गोष्टी अमलात आणल्याबद्दल मोदींचे अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अरे बस कर पगले...

अर्धवटराव
Wed, 05/20/2015 - 22:03 नवीन
रुलाएगा क्या =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

हे वाचा.

अविकुमार
गुरुवार, 01/10/2013 - 14:25 नवीन
हे वाचा. http://in.news.yahoo.com/un-observer-group-probe-loc-incident-040002953.... पाकिस्तानने युनोमध्ये भारताविरुद्धच तक्रार केली आहे. चोराच्या ऊलट्या बोंबा. आपण असे गुळमुळीत का वागतो असेच वाटायला लागते कधी कधी. खंबीर पवित्राच नाही कधी. श्या.....
  • Log in or register to post comments

एकेकाचे प्रतिसाद त्याच्या

नाना चेंगट
गुरुवार, 01/10/2013 - 15:42 नवीन
एकेकाचे प्रतिसाद त्याच्या त्याच्या ख्यातीनुसार.
  • Log in or register to post comments

अगदी, सर्वच..

गवि
गुरुवार, 01/10/2013 - 15:53 नवीन
अगदी, सर्वच.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

भारतीय इतके "थंड रक्ताचे" कसे

मदनबाण
गुरुवार, 01/10/2013 - 18:23 नवीन
भारतीय इतके "थंड रक्ताचे" कसे ? आपण निषेधाचे तुणतुणे किती दिवस वाजवत बसणार ?नुसत्या बैठका आणि खलिते इतके वर्ष चालु आहेत मग त्याचा परिणाम असा का दिसतो ? अजुन कितीवेळा आपल्या जवानांची अशी विटंबना होत राहणार ? जाता जाता :--- Image removed. हे आमच्या स्वतंत्र देशाचे सध्याचे संरक्षण मंत्री आणि त्यांच्या बरोबर आहेत चीनचे संरक्षण मंत्री जेन लिंग. लुंगीवाल्या या संरक्षण मंत्र्याची कोणाला धास्ती / जरब तरी वाटेल काय ? अरे संरक्षण मंत्री आहेस ना तू ? मग नुसते पाकिस्तानची ही भ्याड कॄती चिथवणीखोर आहे असे काय सांगत फिरतोस ? सरळ लष्कराला द्या आदेश की मोडा पाकिस्तानच्या नांग्या आणि द्या चांगला धडा... की पुढे कधीही हे पाकडे आमच्या सैनिकांची अशी दुर्गती करण्याचा विचार सुद्धा करु शकणार नाहीत. पण मी कोणत्या सरकारला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय ? ज्या सरकारचे गॄहमंत्रीच आत्ता पर्यंत झाले-गेले विसरुन जा अशी जपमाळ घेउन फिरतात ! तिथे हा लुंग्या काय दिवे लावणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पुलंच्या एका ललित लेखात लोकल

पिंपातला उंदीर
गुरुवार, 01/10/2013 - 20:02 नवीन
पुलंच्या एका ललित लेखात लोकल प्रवासात प्रवाशांमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर होणार्‍या चर्चेचे खुमसदार वर्णन केले होते. त्या चर्चेचा शेवट आपण डोंबिवलीकाराणी कल्याण च्या लोकाना आपल्या बोगीत चढू द्यायचे नाही या निर्णयावर होतो. ही प्रतिक्रिया आणि इतर अनेक अतीसंवेदनशील प्रतिक्रिया पाहून त्या लेखाची आठवण होते. ऋषिकेश यांच्या प्रतिक्रिया आवडल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

+१

सुनील
गुरुवार, 01/10/2013 - 22:47 नवीन
एकेकाचे प्रतिसाद त्याच्या त्याच्या ख्यातीनुसार.
अगदी! जुने लेख उचकले तर, बर्‍याच प्रतिक्रियांमध्ये फक्त प्रतिसादकाचे नाव दिसते, खालील प्रतिसाद नाही! असे का, हे आता उमगले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

खत्रा!

दादा कोंडके
गुरुवार, 01/10/2013 - 23:02 नवीन
हा हा. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

ठोस निर्णय घ्यायची वेळ.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 01/10/2013 - 15:53 नवीन
इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे?
हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जो पर्यंत होत नाही तो पर्यंत क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला भारतात प्रवेशास मज्जाव असलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments

निषेध निषेध!

अरुण मनोहर
गुरुवार, 01/10/2013 - 16:54 नवीन
निषेध निषेध! डार्विनच्या विचारसरणीने प्रेरीत होऊन डार्विनच्या माकडांनी केलेल्या अमानुष कृत्यांचा निषेध! मिपावरच्या डार्विन तज्ञांचे मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

' कला आणि क्रिडा क्षेत्रात

मस्त् राम
गुरुवार, 01/10/2013 - 19:43 नवीन
' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात' अशी प्रतिक्रिया दिल्यावर आपण झटपट पुरोगामी ठरतो ना! आणि आपल्या देशात पुरोगाम्यांची पैदास डासानपेक्षा जास्त झाली आहे.
  • Log in or register to post comments

उपाय

राजेश घासकडवी
गुरुवार, 01/10/2013 - 21:24 नवीन
मी एक उपाय सुचवतो. - एक वेबसाइट तयार करा. - तीवर पाकिस्तानी कलाकार असलेल्या कार्यक्रमांची आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यांची नोंद करा - ती माहिती भारतीय जनतेत सर्वत्र पसरेल असं पहा - यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती देणं, गावोगावी जाऊन सर्वांना ती माहिती मिळेल अशी योजना करणं वगैरे त्यात येईल. - त्यासाठी अर्थातच मोठी ग्रासरूट ऑर्गनायझेशन तयार करावी लागेल. पण बऱ्याच राजनैतिक पक्षांकडे अशी यंत्रणा आहे. ती वापरायला त्यांना उद्युक्त करा. - मग ज्यांना पाकिस्तानविरुद्ध राग असेल ते लोक अर्थातच हे कार्यक्रम बघणार नाहीत - मग पाकिस्तानी कलाकारांना आपोआपच पैसे किंवा आमंत्रणं मिळणार नाहीत इतकी वर्षं पाकविरोधी आरडाओरडा करणाऱ्या पक्षांनी असे प्रयत्न का केले नाहीत कोण जाणे. पाकिस्तानची मॅच सुरू झाल्यावर लोकसुद्धा येड्यासारखे टीव्ही बंद न करता बघत का बसतात हेही कळत नाही.
  • Log in or register to post comments

इतकी वर्षं पाकविरोधी आरडाओरडा

मदनबाण
गुरुवार, 01/10/2013 - 21:33 नवीन
इतकी वर्षं पाकविरोधी आरडाओरडा करणाऱ्या पक्षांनी असे प्रयत्न का केले नाहीत कोण जाणे. हिंदुस्थानी राजकारणार्‍या ओरडाओरडी करणे हाच प्रयत्न वाटत असावा बहुधा ! पाकिस्तानची मॅच सुरू झाल्यावर लोकसुद्धा येड्यासारखे टीव्ही बंद न करता बघत का बसतात हेही कळत नाही. ठळक केलेला शब्द बहुतेक आपल्या देशातील नागरिकांची मानसिकता दर्शवतो असे वाटते,राष्ट्रप्रेम हे किराणामाल विकणार्‍याच्या दुकानात इतर गोष्टींप्रमाणेच मिळते असा यांचा समज नक्कीच असावा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तुम्ही स्वतःच का करत नाही अशी

यशोधरा
गुरुवार, 01/10/2013 - 22:17 नवीन
तुम्ही स्वतःच का करत नाही अशी वेबसाईट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

षंढ राष्ट्र

रणजित चितळे
गुरुवार, 01/10/2013 - 21:33 नवीन
सावरकरांच्या भाषेत लिहायचे तर.
  • Log in or register to post comments

दुर्दैवी घटना

सुनील
गुरुवार, 01/10/2013 - 22:45 नवीन
दुर्दैवी घटना. ह्याची योग्य त्या पातळीवर आणि योग्य त्या प्रमाणात दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments

पाकिस्तानी वृत्तपत्र "डॉन

अप्रतिम
गुरुवार, 01/10/2013 - 23:15 नवीन
पाकिस्तानी वृत्तपत्र "डॉन"च्या बातमीनुसार भारतीय लष्कराने आज एका पाकिस्तानी जवानाला कंठस्नान घातल्याचे समजतय. http://dawn.com/2013/01/10/another-pakistani-soldier-killed-by-indian-forces-army/
  • Log in or register to post comments

अकबरुद्दीन ओवेसी आता कुठे

आशु जोग
गुरुवार, 01/10/2013 - 23:31 नवीन
अकबरुद्दीन ओवेसी आता कुठे आहेत आता ते निषेध करतील काय
  • Log in or register to post comments

नक्की काय झाले?

Nile
Fri, 01/11/2013 - 02:50 नवीन
वाचा: http://www.thehindu.com/news/national/runaway-grandmother-sparked-savage-skirmish-on-loc/article4291426.ece
  • Log in or register to post comments

समजत नाही

क्लिंटन
Fri, 01/11/2013 - 09:52 नवीन
"षंढ" भारत सरकार काहीही करत नाही असे म्हणत असलेल्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की एल.ओ.सी वर it's bullet for bullet अशी परिस्थिती आहे अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येत आहेत.तसेच भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा एक सैनिक मारला अशा बातम्याही आल्या आहेत.अविनाश धर्माधिकारींच्या कारगीलविषयक भाषणात उल्लेख आहे की एकदा ओढ्यावर पाणी भरायला गेलेल्या दोन भारतीय सैनिकांना पाकिस्तानी सैनिकांनी गोळ्या घालून ठार मारले. त्याच्या नंतरच्या दिवशी असेच पाणी भरायला आलेल्या पाकिस्तानी सैनिकांनाही आपल्या सैनिकांनी गोळ्याच घातल्या.असे प्रकार एल.ओ.सी वर चालत असावेत आणि भारतही जशास तसे असे उत्तर देत आहे हे नक्कीच. आजच पेपरात बातमी आली आहे की क्वेट्टामध्ये सहा बॉम्बस्फोटांमध्ये शंभरेक लोक मारले गेले आहेत.भारत सरकारचे बलुचिस्तानातील बंडखोरांना समर्थन आहे ही गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे काश्मीरातील दहशतवाद्यांना समर्थन आहे या गोष्टीइतकेच उघडे गुपित आहे.कशावरून या स्फोटांसाठी भारताने मदत केली नसेल?तसे असेल तर भारत सरकारने "हो आम्हीच स्फोटांना मदत केली" असे जाहिरपणे सांगावे अशी अपेक्षा आहे का? २००९ मध्ये इजिप्तमध्ये शर्म-अल-शेख मध्ये मनमोहन सिंह आणि तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान गिलानींची भेट झाली होती.त्यावेळी दोन्ही बाजूंकडून जारी केलेल्या संयुक्त नोटमध्ये २६/११ मुंबई हल्ल्यांचा उल्लेख नव्हता पण बलुचिस्तानचा उल्लेख होता.मनमोहन सिंहांवर त्या कारणाने बरीच टिकाही झाली होती.पण सांगायचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानातील बंडखोरांना भारत सरकार मदत करत आहे हे नक्कीच आहे. एल.ओ.सी वर जो प्रकार झाला आणि माझ्याच सैनिकांना नृशंस पध्दतीने मारले गेले याचे इतर मिपाकरांइतकेच दु:ख एक भारतीय नागरिक म्हणून मला वाटते.पण भावनेच्या भरात जाऊन वेडीवाकडी विधाने केली जाऊ नयेत असेही नक्कीच वाटते.
  • Log in or register to post comments

+/-

विकास
Fri, 01/11/2013 - 19:57 नवीन
पण भावनेच्या भरात जाऊन वेडीवाकडी विधाने केली जाऊ नयेत असेही नक्कीच वाटते.
याच्याशी सहमत. अर्थात येथे कोणीही वेडीवाकडी विधाने केली तरी त्याचा परीणाम, कोणे एके काळी "स्टालीनला सज्जड दम..." वगैरे अग्रलेख देणार्‍यांच्या लेखाचा स्टॅलीनवर परीणाम झाला असेल तितकाच होईल असे वाटते. ;) पण, माझ्या दृष्टीने मुद्दा हा नाही, अथवा भारत सरकार स्ट्रॅटेजिकली काय करते हा देखील नाही. ते करते याची खात्री आहे, त्याची पंतप्रधानांना पण सगळी माहिती असेल का ह्याबाबत कधी कधी शंका वाटते (इतर राजकारण्यांना सोडूनच द्या) तेंव्हा त्या धोरणाचे कर्ते-करवते नक्की कोण-कसे असतात माहीत नाही. (हे वाटायचे अजून एक कारण म्हणजे नक्की सिस्टीम माहीत नाही. तो वेगळा मुद्दा आहे.) प्रस्तुत घटनेतला महत्वाचा भाग असा आहे की, सैनिकांना नृशंस पद्धतीने मारले गेले आहे. ते देखील एका सार्वभौम राष्ट्राच्या सैनिकांकडून/सैन्याकडून. हे आंतर्राष्ट्रीय करार मोडणारे, रानटी वर्तन आहे. त्या विरोधात आपले राष्ट्र आणि नेतृत्व कसे आवाज करते यातून अनेक संदेश वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. केवळ बलुचिस्तानमधे काड्या करतो अथवा एल ओ सी वर आपण देखील गोळीबार करतो म्हणून आत्ता सौम्य प्रतिक्रीया देणे म्हणजे जणू काही आपण एकतर्फीच किडे करतो आणि ती आपली चूक आहे, असे मान्य करणे झाले, जे अयोग्य आहे. त्याचा सध्याच्या सोशल मेडीयाच्या जगात भारतीय सैन्याच्या मानसिकतेवर देखील परीणाम होऊ शकतो आणि regardless ते (सौम्य प्रतिक्रीया देणे) चुकीचे आहे. ९/११ हल्ला करण्यास, त्या आधी अमेरीका अरबांशी कशी वागली हे कारण होते, ऑपरेशन ब्लु स्टार (आणि शिखांशी/पंजाबशी राजकारण खेळेणे) हे इंदिरा हत्येचे कारण होते, तमिळ टायगर्सना विरोध हे राजीव हत्येचे कारण होते, वगैरे वगैरे... म्हणून यातील प्रत्येक हिंसा ही मान्य करायची का सौम्न्य पणे घेयची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

प्रतिसाद

क्लिंटन
Fri, 01/11/2013 - 23:09 नवीन
केवळ बलुचिस्तानमधे काड्या करतो अथवा एल ओ सी वर आपण देखील गोळीबार करतो म्हणून आत्ता सौम्य प्रतिक्रीया देणे म्हणजे जणू काही आपण एकतर्फीच किडे करतो आणि ती आपली चूक आहे, असे मान्य करणे झाले,
हे समजले नाही.कडक प्रतिक्रिया देण्यापेक्षा काहीतरी कृती करणे अधिक महत्वाचे नाही का?आणि भारत सरकारची शाब्दिक प्रतिक्रिया म्हणाल तर ती कुठे सौम्य असते?"आर या पार की लडाई","सब्र का बांध तुटा","मेरा यहा आना अपने आप मे एक प्रतिक है.इसे दुनियावाले समजे ना समजे, हमारा पडौसी समजे ना समजे, हम विजय का नया अध्याय लिखेंगे" इत्यादी इत्यादी प्रतिक्रिया कुठे सौम्य होत्या?पण जर भारत सरकार बलुचिस्तानातल्या बंडखोरांना मदत करून किंवा अन्य मार्गाने काहीतरी कृती करत असेल तर दरवेळी उच्चरवाने काहीतरी बोलायची गरज आहे असे वाटत नाही. गेल्या पाचेक वर्षात पाकिस्तानात झालेल्या घटनांचे कारण केवळ अमेरिकेचा अफगाणिस्तानवरील हल्ला किंवा इस्लामाबादमधील लाल मशीद प्रकरण असेल आणि त्यात भारताचा अगदी शून्य हात असेल असे वाटत नाही.पण भारत सरकारने वरकरणी सात्विकतेचा आव आणून आपला कार्यभाग उरकला तर त्यात फारसे काही चूक आहे असे वाटत नाही. अगदी १९४७ मध्येही मुस्लिमबहुल गुरदासपूर जिल्हा भारतात ठेवणे, पंजाब-बंगालमधील बहुतेक सगळा हिंदूबहुल भाग भारतात ठेऊन घेऊन "मॉथ इटन पाकिस्तान" देणे,१९७१ मध्ये मुक्तीवाहिनीला स्वतः मदत देणे हे सगळे प्रकार सात्विकतेचा आव आणतच आपण केले होते आणि त्याविषयी पाकिस्तानात किती राग आहे हे तिथल्या वर्तमानपत्रात आणि लेखांमधून समजतेच.सध्या भारत सरकार काय करत आहे त्याचे परिणाम दिसायला कदाचित वेळ लागेल पण जर गेल्या काही वर्षात भारतात दहशतवादाने मारल्या गेलेल्या लोकांच्या अनेक पटीने लोक पाकिस्तानात मारले गेले असतील तर भारत सरकार अगदी काहीच करत नाही हे मला तरी म्हणता येत नाही. बाकी पाकिस्तानची हिंसा अजिबात मान्य करू नये.एकदा एखाद्याला शत्रू मानले की त्याला कोणतीही दयामाया दाखवू नये असेच मला वाटते.१९४५ मध्ये जपान हा अमेरिकेचा शत्रू होता या एका कारणाने जपानवर अणुबॉम्ब टाकायची कृती मला समर्थनीय वाटते आणि या विषयावर मी अनेकदा अनेकांशी भिडलो आहे.शत्रूचे समूळ उच्चाटन व्हायलाच हवे.उद्या जर पाकिस्तानशी लढाईची वेळ आली तर पाकिस्तानने आपल्यावर पहिल्यांदा अणुबॉम्ब टाकायचा आणि मग आपण त्याला उत्तर द्यायचे असे न करता सुरवातीलाच आपणच त्यांच्यावर ५/१०/५० किंवा जितके लागतील तितके अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानचे अस्तित्व अगदी कायमचे संपवावे असे मला वाटते.शत्रूविषयी फालतूची मानवता दाखवून (किंवा फाशीच्या शिक्षेला घाबरून किती गुन्हे कमी झाले आहेत असले तद्दन बिनडोक प्रश्न विचारून) आपण किती मोठे मानवतावादी किंवा विचारवंत हे दाखवायची अजिबात हौस मला नाही.पण हे सगळे आताच आपल्याला करता येणार नाही हे उघड आहे.आपली तयारी पूर्ण झालेली नसेल (सर्वच दृष्टीने--सामरिक, आर्थिक,परराष्ट्रनिती इत्यादी) तर असे कोणतेही पाऊल उचलणे आत्मघाताचे ठरेल.आपल्या सरकारने अशी तयारी पूर्ण करायला नक्की काय पावले उचलली आहेत असे प्रश्न जरूर विचारावेत आणि विचारलेच पाहिजेत.पण भारतात काही दहशतवादी हल्ले झाले किंवा परवासारखी काही घटना झाली तर भारत सरकार "षंढ" वगैरे म्हणले जाते.अशी तात्कालिक प्रतिक्रिया येऊन चार दिवसात सगळे विसरून जाण्यापेक्षा ऑनगोईंग बेसिसवर सरकार आपल्या देशाची तयारी "तिथपर्यंत" होण्यासाठी काय करत आहे हे प्रश्न उभे करणे कधीही श्रेयस्कर ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

गोंधळलो! :-)

विकास
Sat, 01/12/2013 - 00:29 नवीन
आपली प्रतिक्रीया वाचून आंमळ गोंधळलो आहे. नक्की आपण एकमेकांशी वादच घालतो आहोत का नेटच्या एकाच बाजूने टेनीस खेळतोय हे समजत नाही. ;) तरी देखील काहॉ खुलासे...
प्रतिक्रिया देण्यापेक्षा काहीतरी कृती करणे अधिक महत्वाचे नाही का?
अहो मी प्रतिक्रीया म्हणले आहे, संस्थाळवर प्रतिसाद द्यायचे म्हणलेले नाही. प्रतिक्रीया म्हणजे कृती देखील असते आणि तीच डोक्यात होती. आणि तुम्ही म्हणता तसेच कृती महत्वाची वाटते. त्या ऐवजी "हम उनको उनकी नानी याद दिलाएंगे" वगैरे स्टाईल "सौम्य" प्रतिक्रीया देणे अनेकांना योग्य वाटते ते मला देखील पटत नाहीच.
बाकी पाकिस्तानची हिंसा अजिबात मान्य करू नये.एकदा एखाद्याला शत्रू मानले की त्याला कोणतीही दयामाया दाखवू नये असेच मला वाटते.
+१ पण
त्याला उत्तर द्यायचे असे न करता सुरवातीलाच आपणच त्यांच्यावर ५/१०/५० किंवा जितके लागतील तितके अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानचे अस्तित्व अगदी कायमचे संपवावे असे मला वाटते.
ह्याला मात्र -१ / असहमत. अणूबाँब हे deterrent आहेत आणि तसेच ते असावेत, पुराणातील ब्रम्हास्त्रासारखे, असे माझे मत आहे. अमेरीकेने रशियावर एक बाँब न टाकता देखील कम्युनिस्ट रशियाला सत्ताभ्रष्ट करण्यात मदत केली. तसेच काही करता येईल. पण ते देखील आपल्या कृतीतून धड दिसते असे वाटत नाही.
पण भारतात काही दहशतवादी हल्ले झाले किंवा परवासारखी काही घटना झाली तर भारत सरकार "षंढ" वगैरे म्हणले जाते.अशी तात्कालिक प्रतिक्रिया येऊन चार दिवसात सगळे विसरून जाण्यापेक्षा ऑनगोईंग बेसिसवर सरकार आपल्या देशाची तयारी "तिथपर्यंत" होण्यासाठी काय करत आहे हे प्रश्न उभे करणे कधीही श्रेयस्कर ठरेल.
मेणबत्त्या विसरलात. ;) अर्थात वरील वाक्याशी सहमतच आणि आधी देखील सहमतच होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

अणुबॉम्ब

क्लिंटन
Sat, 01/12/2013 - 21:59 नवीन
नक्की आपण एकमेकांशी वादच घालतो आहोत का नेटच्या एकाच बाजूने टेनीस खेळतोय हे समजत नाही.
बहुदा नेटच्या एकाच बाजूने टेनिस खेळत आहोत तरीही कधीकधी नेट ओलांडून पलिकडल्या बाजूलाही जात आहोत :)
अणूबाँब हे deterrent आहेत आणि तसेच ते असावेत, पुराणातील ब्रम्हास्त्रासारखे, असे माझे मत आहे.
हो बरोबर. माझ्या मुळच्या प्रतिसादातील "पाकिस्तानशी युध्दाची वेळ आली तर" हा भाग अधोरेखित करायचा राहिला :) . जर युध्दाची वेळ आली तर पाकिस्तान नक्कीच अणुबॉम्बचा प्रयोग करणार आणि मग नंतर आपण कितीही प्रत्युत्तर दिले तरी आपले व्हायचे ते नुकसान झालेलेच असेल.तेव्हा पाकिस्तानला तिथपर्यंत जाऊच न देता त्यांचे आधीच कंबरडे मोडावे असे मला वाटते. सगळेच पाकिस्तानी वाईट नाहीत पण निर्णय घ्यायचे अधिकार घेणारे लष्करी अधिकारी आणि आय.एस.आय वाले वाईट आहेत याविषयी फारसे दुमत नसावे.आणि पाकिस्तानातल्या निरपराधांना शिक्षा होऊ नये म्हणून भारतातल्या निरपराधांचे बळी देणे असला बेगडी मानवतावाद लवकरात लवकर नाहिसा करावा. अशा वेळी आपल्या हातात काय आहे?सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानशी आपले संबंध कधीच सुधारणार नाहीत असा नकारात्मक दृष्टीकोन नकोच.दुसऱ्या महायुध्दात इंग्लंड आणि जर्मनीमध्ये किंवा अमेरिका आणि जपानमध्ये किती शत्रुत्व होते हे आपल्याला माहितच आहे.पण आज त्याच देशांमध्ये तसे शत्रुत्व आहे का?तसे भारत आणि पाकिस्तानात कधीच होणारच नाही असे नाही.त्या दृष्टीने पाकिस्तानातील शांततावादी लोक असतील त्यांची संख्या वाढावी हे प्रयत्न करणे गरजेचेच आहे.शेवटी भारत हाच जबाबदार देश आहे आणि युध्द आणि अणुबॉम्बचा प्रयोग टाळण्यासाठी जे काही करणे शक्य असेल ते करावे हे म्हणणे मला पटते.अर्थातच कुठेही बोटचेपेपणा नको.जर पाकिस्तानने कोणतीही आगळीक केली तर त्याला तिथल्या तिथे जबरदस्त प्रत्युत्तर द्यायलाच हवे.मध्यंतरी पाकिस्तानचा मंत्री रहमान मलिक भारतात येऊन वाटेल ते बरळून गेला.त्याला ताबडतोब आपण हाकलून का दिले नाही हा प्रश्न मला नक्कीच पडतो.२००९ मध्ये एल.टी.टी.ई विरूध्द युध्द चालू असताना नॉर्वे की स्वीडनचा परराष्ट्रमंत्री खास युरोपीअन स्टाईलमध्ये श्रीलंकेला मानवतेचे डोस पाजायला येणार म्हटल्यावर त्याला त्याची जागा दाखवून द्यायला श्रीलंका सरकारने त्याला कोलंबो विमानतळावरून हाकलून दिले होते.असे आपण का करू शकत नाही? तेव्हा पाकिस्तानशी युद्धाची वेळ आली तर त्यांच्यावर आधीच आपण अणुबॉम्ब टाकावेत पण तशी वेळ येऊ नये म्हणून जे काही करता येईल ते करावे.मला वाटते माझा मुद्दा मी स्पष्ट केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

"जर युध्दाची वेळ आली तर

श्रीगुरुजी
Sun, 01/13/2013 - 20:06 नवीन
"जर युध्दाची वेळ आली तर पाकिस्तान नक्कीच अणुबॉम्बचा प्रयोग करणार आणि मग नंतर आपण कितीही प्रत्युत्तर दिले तरी आपले व्हायचे ते नुकसान झालेलेच असेल." हे शक्य नाही. पाकिस्तानने कितीही वल्गना केल्या तरी पाकडे अणुबॉम्बचा वापर करणे अशक्य आहे. चुकुन पाकिस्तानने तसे केले तर आपला संपूर्ण देश भस्मसात होईल याची पाकड्यांना खात्री आहे. किंबहुना जगातला कोणताच देश अणुबॉम्बचा वापर करणे अशक्य आहे. प्रत्येकवेळी एकच तुणतुणे वाजवले जाते की, "दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याने भारताने सीमा ओलांडली किंवा पाकड्या सैनिकांवर हल्ला केला तर त्याचे तात्काळ मोठ्या युद्धात परिवर्तन होऊन त्याचे अणुयुद्धात रूपांतर होईल". असे होणार नाही. पाकिस्तानने अनेकवेळा सीमा ओलांडूनसुद्धा भारताने कोणताच कणखर प्रतिसाद दिलेला नाही. भारत फक्त निषेधाचे खलिते पाठवित राहिला. भारताने १-२ वेळा सीमा ओलांडून नजीकच्या ठाण्यांवर जशास तसे हल्ले करून काही ठाणी उद्ध्वस्त केली तर पाकिस्तान प्रतिकार तर सोडाच पण यापुढे सीमा ओलांडताना १०० वेळा विचार करेल. भारतीय लष्करी सामर्थ्यापुढे आपण अजिबात टिकाव धरू शकणार नाही हे पाकड्यांना पूर्ण माहिती आहे व भारताशी पारंपारिक युद्ध करू नये एवढे शहाणपण त्यांच्याकडे आहे. म्हणून सातत्याने अणुबॉम्बची धमकी देऊन भारताला असे छोटे हल्ले करून बोचकारत रहाणे एवढेच ते करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

धाडसी विधान!

दादा कोंडके
Sun, 01/13/2013 - 20:19 नवीन
पाकिस्तानने कितीही वल्गना केल्या तरी पाकडे अणुबॉम्बचा वापर करणे अशक्य आहे. चुकुन पाकिस्तानने तसे केले तर आपला संपूर्ण देश भस्मसात होईल याची पाकड्यांना खात्री आहे. किंबहुना जगातला कोणताच देश अणुबॉम्बचा वापर करणे अशक्य आहे.
मानवी बाँब तयार होणार्‍या देशाबद्द्ल असं खात्रीनं म्हणू शकतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नो फर्स्ट युज

क्लिंटन
Fri, 01/18/2013 - 13:38 नवीन
पाकिस्तानने कितीही वल्गना केल्या तरी पाकडे अणुबॉम्बचा वापर करणे अशक्य आहे. चुकुन पाकिस्तानने तसे केले तर आपला संपूर्ण देश भस्मसात होईल याची पाकड्यांना खात्री आहे. किंबहुना जगातला कोणताच देश अणुबॉम्बचा वापर करणे अशक्य आहे.
अशी खात्री पाकिस्तानविषयी असती तर १९९९ किंवा २००१/२००२ मध्येच भारताने पाकिस्तानवर हल्ला केला असता.भारताची सामरिक ताकद पाकिस्तानपेक्षा किंचित जास्त आहे (किंचित का कारण आपले सगळे सैन्य पाकिस्तान सीमेवर एकवटलेले नाही तर चीन सीमेवरही आहे).पूर्वीच्या काळी हा फरक आतापेक्षा बराच जास्त होता.पण अणुबॉम्ब बनविल्यास कन्व्हेन्शनल युध्दात आपण कमी पडलो तरी अणुबॉम्ब टाकला तर लष्करी बळातला फरक फार "मॅटर" करणार नाही अशा भूमिकेतूनच पाकिस्तानने अणुबॉम्ब बनविला हे सर्वमान्य आहे.तेव्हा पाकिस्तानचा अणुबॉम्ब हा भारताविरूध्द वापरायलाच केलेला आहे.तो अणुबॉम्ब ते लगेच वापरतील असे नाही पण ते कधीच वापरणार नाहीत हे म्हणणे आत्मवंचना ठरेल. मी केवळ एक राजकिय विश्लेषक आहे आणि कोणत्याच पक्षाच्या कळपातला नाही.त्यामुळे सर्व पक्षांवर (त्यांच्या चांगल्या-वाईट गोष्टींवर) मी भाष्य करत असतो.त्याच भूमिकेतून म्हणतो की १९९८ मध्ये पोखरण-२ अणुचाचण्या घेणे (आणि नंतर अमेरिकेला आणि इतर महासत्तांना सांभाळून घेणे-- पोखरणनंतर दोन वर्षांच्या आत बिल क्लिंटन भारतात आले होते) ही वाजपेयी सरकारने केलेली खूप चांगली गोष्ट होती पण "नो फर्स्ट युज" हे जाहिर आश्वासन द्यायला नको होते असे मला वाटते.याविषयी मुद्दामून काही न बोलता गुळमुळीत वक्तव्ये करता आली नसती का?कारण अणुबॉम्बचा अजिबात वापर होणार नसेल तर ते इसापनितीतल्या गोष्टीप्रमाणे होईल.बेडकांना वाटत होते की ओंडका त्यांचा राजा आहे म्हणून त्याच्यापासून ते अंतर राखून होते.पण एकदा तो ओंडका काहीही करत नाही हे लक्षात आल्यावर त्याच्यावरच ते उड्या मारायला लागले. आता एकदा "नो फर्स्ट युज" हे जाहिर आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तानचे त्यांनी आपल्यावर हल्ला करायच्या आधीच कंबरडे मोडणे शक्य होईल का? झाले तर फार चांगले पण तसे न व्हायची शक्यता अधिक. आणि आपण त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकल्यास तिथले निरपराध लोक मरतील म्हणून गळे काढत असलेल्या ढोंगी मानवतावाद्यांना योग्य त्या ठिकाणी फाट्यावर मारण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मला वाटते...

विकास
Fri, 01/18/2013 - 20:42 नवीन
भारताने जेंव्हा "नो फर्स्ट युज" चे धोरण जाहीर केले तेंव्हा त्यात केवळ पाकीस्तानचा विचार नव्हता तर चीनच देखील होता. अण्वस्त्र देशांमधे मला वाटते भारत अधिकृत अण्वस्त्रधारी देश होण्या आधी चीनने १९६४ पासूनच "नो फर्स्ट उज" धोरण जाहीर केले आहे. त्या सीमेवर अण्वस्त्रांवरून टेन्शन निर्माण होणे आणि त्यातून तेथे अण्वस्त्रांची स्पर्धा वाढणे हे भारताला नको असावे. त्या शिवाय, तो काळ असा होता की सारे जग (आणि भारतातले "विचारवंत") हे सगळेच विरोधात होते. (भारतातल्या या "विचारवंतांच्या" बॉस्टनमधील पिट्ट्यांनी एम आय टी मधे निषेधाच्या मेणबत्यापण लावल्या होत्या!). त्यामुळे सर्व जगालाच अशी खात्री देणे गरजेचे असावे म्हणून देखील केले असेल. त्या व्यतिरीक्त माझे व्यक्तीगत मत असेच आहे, की ब्रम्हास्त्र हे केवळ अश्वत्थाम्याने उचलले म्हणून अर्जूनाने पण उचलावे असे कृष्णाने सांगितले, तीच भुमिका अण्वस्त्रांबाबत असावी अस मला वाटते. (महाभारतात होते म्हणून नाही, ते केवळ उदाहरण आहे, तुमच्याकडून नाही पण नाहीतर चर्च भलतीकडेच जायची!)
आता एकदा "नो फर्स्ट युज" हे जाहिर आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तानचे त्यांनी आपल्यावर हल्ला करायच्या आधीच कंबरडे मोडणे शक्य होईल का?
आपण काय करावे आणि काय करू ह्याबद्दल मी लिहीत नाही, पण काय करू शकतो इतकेच सांगतो: इराकयुद्धात (२००२ नंतरच्या नक्की, कदाचीत १९९१च्यापण) अमेरीकेने आंतर्राष्ट्रीय करारात आक्षेपार्ह नसलेली अशी सेकंडरी अण्वस्त्रे वापरली होती.... अधिक नंतर कधीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

नो फर्स्ट युज

क्लिंटन
Sat, 01/19/2013 - 21:58 नवीन
भारताने जेंव्हा "नो फर्स्ट युज" चे धोरण जाहीर केले तेंव्हा त्यात केवळ पाकीस्तानचा विचार नव्हता तर चीनच देखील होता. अण्वस्त्र देशांमधे मला वाटते भारत अधिकृत अण्वस्त्रधारी देश होण्या आधी चीनने १९६४ पासूनच "नो फर्स्ट उज" धोरण जाहीर केले आहे
ठिक आहे पण मग ज्या देशांनी "नो फर्स्ट युज" हे धोरण जाहिर केले आहे त्यांना रेसिप्रोकल म्हणून भारतही त्यांच्याविषयी "नो फर्स्ट युज" हे धोरण अवलंबेल असे जाहिर करता आले नसते का?पोखरण-२ नंतर वाजपेयींनी बिल क्लिंटनना पत्र लिहिले होते आणि त्यात भारताने अणुचाचण्या का केल्या याबद्दल लिहिले होते.त्यात चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे नाव त्यात होते (आणि याबद्दल विरोधी पक्षांनी लोकसभेत गोंधळही घातला होता).तेव्हा पाकिस्तानचीही अणुबॉम्ब बनवायची क्षमता आहे हे आपल्याला आधीपासून माहित होते हे नक्कीच.आणि अणुबॉम्बसाठी पाकिस्तान गवत खाईल अशा स्वरूपाची वक्तव्ये (किंवा अगदी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांची भारतावर आक्रमण केलेल्यांची नावे- गझनवी,अब्दाली,बाबर इत्यादी) यातून पाकिस्तानचा बॉम्ब हा भारताविरूध्दच असेल/आहे हे आपल्या लक्षात आले नव्हते का? तरीही परत पाकिस्तानविरूध्दही आपण पहिल्यांदा अणुबॉम्ब वापरणार नाही हे का जाहिर केले (विशेषतः पाकिस्तानने "नो फर्स्ट युज" हे धोरण जाहिर केलेले नाही हे माहित असताना) हा प्रश्न आहेच.
अमेरीकेने आंतर्राष्ट्रीय करारात आक्षेपार्ह नसलेली अशी सेकंडरी अण्वस्त्रे वापरली होती
हो बरोबर. अगदी १९९९ च्या कोसोव्हो युध्दातही अमेरिकेने "डिप्लिटेड न्युक्लिअर वेपन्स" वापरली होती.पण माझा मुख्य मुद्दा हा आहे की पाकिस्तानच्या हातात अण्वस्त्रे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत आहे आणि भारताविरूध्द युध्दाची वेळ आली तर ते आपल्याविरूध्द अण्वस्त्र वापरणार हे स्पष्ट आहे. (तसे संकेत २००२ मध्ये मुशर्रफने भारतीय उपखंडाच्या भेटीवर आलेल्या कॉलीन पॉवेल आणि जॅक स्ट्रॉ यांना दिले होते असे आंतरराष्ट्रीय प्रेसमध्ये आले होते आणि त्यामुळेच अमेरिकेने भारताने पाकिस्तानवर हल्ला करू नये म्हणून धावपळ केली होती.) तेव्हा पाकिस्तान पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर करणार असेल आणि मग आपण त्याला प्रत्युत्तर दिले तर पाकिस्तानचे नामोनिशाण वगैरे जरूर मिटेल पण आपले झालेले नुकसान भरून यायला अनेक दशके लागतील त्याचे काय?तेव्हा ती वेळच येऊ नये म्हणून (युध्दच होऊ नये म्हणून शक्य तितके सगळे प्रयत्न) आणि युध्द झाले तर पाकिस्तानच्या आधी आपणच अणुबॉम्ब वापरावा असे मला नक्कीच वाटते. आणि त्यासाठीची आपली आर्थिक्/सामरिक आणि सगळ्याच दृष्टीने पॉवर आहे त्यापेक्षा खूप जास्त वाढवायला हवी.अर्थात एक गोष्ट आता आपल्याला अधिक अनुकूल आहे आणि ती म्हणजे पाकिस्तान हा एक डिसीज आहे या गोष्टीचे अधिक रिअलायझेशन जगात अधिकाधिक प्रमाणात होत आहे (ही परिस्थिती १० वर्षांपूर्वी तितक्या प्रमाणावर नव्हती).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

MAD

सुबोध खरे
Mon, 01/14/2013 - 13:03 नवीन
MAD (MUTUALLY ASSURED DESTRUCTION) (खात्रीचा सर्वनाश) अणु युद्धा बद्दलच्या नीति बद्दल असे म्हटले जाते. याच साठी कोणतेही राष्ट्र अणुबॉम्ब मिळवण्यासाठी अविरत प्रयत्न करीत असते. कारण एकदा तुमच्याकडे अणु बोंब असेल तर दुसरे राष्ट्र तुमच्याशी सर्वंकष युद्ध करण्या पूर्वी दहा वेळा विचार करते.पाकिस्तान वर ५-१० अणुबॉम्ब टाकून ते संपवणे हे आपण समजत तितके सोपे नाही. कारण पाकिस्तान कडे सुद्धा ७०-८० अणुबॉम्ब आहेत आणी अशा सर्वनाशी य्द्धात ते त्यातील काही अणुबॉम्ब तरी भारतीय भूमी वर टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करणारच. तेंव्हा low intensitiy warfare (धुमसते युद्ध) हे चालू राहणारच.भारत बलुचिस्तान किंवा मोहाजिर यांना आतून वा बाहेरून मदत करतो हे उघड सत्य आहे. भारताने अहमदशाह मसूद याच्या उत्तर आघाडीला तालिबान विरुद्ध पूर्ण पाठींबा दिला होता. माझा एक सैन्यातील डॉक्टर मित्र मझार -ए शरीफ येथे भारतीय सैन्याच्या तुकडीत medical aid post madhye रुजू होता. तेंव्हा हे निषेध खलिते वगैरे ठीक आहे आपण पाकिस्तान ला swift and strong military retaliation करणे आवश्यक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

"आजच पेपरात बातमी आली आहे की

श्रीगुरुजी
Fri, 01/11/2013 - 22:26 नवीन
"आजच पेपरात बातमी आली आहे की क्वेट्टामध्ये सहा बॉम्बस्फोटांमध्ये शंभरेक लोक मारले गेले आहेत.भारत सरकारचे बलुचिस्तानातील बंडखोरांना समर्थन आहे ही गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे काश्मीरातील दहशतवाद्यांना समर्थन आहे या गोष्टीइतकेच उघडे गुपित आहे." हे तितकेसे खरे नाही. बलुचिस्तान चळवळीचा व या बॉम्बस्फोटांचा संबंध नाही. क्वेट्टामधल्या बॉम्बस्फोटात मारले गेलेले बहुतेक सर्वजण शिया होते. पाकिस्तानमध्ये गेली अनेक वर्षे शियांच्या मशिदींवर व त्यांच्या धार्मिक मिरवणुकीवर बॉम्बस्फोट होत आले आहेत. पाकिस्तानमधील सुन्नींमध्ये शियांबद्दल राग आहे. काही सुन्नी शियांना मुसलमानच मानत नाहीत. त्यांना इस्लाममधून बहिष्कृत करावे अशी सुन्नींची मागणी आहे. यापूर्वी झिया उल हक च्या राजवटीत पाकिस्तानमध्ये अहमदिया पंथाच्या मुस्लिमांना अमुस्लिम असे अधिकृतरित्या घोषित केलेले होते. तसेच शियांनाही करावे अशी मागणी आहे. मला या दोन्ही पंथातला फरक नक्की माहित नाही. पण सुन्नी महंमदाला अखेरचा प्रेषित मानतात तर शिया महमंदानंतर अजून कोणतरी प्रेषित येईल असे मानतात. हा त्यांच्यात मुख्य फरक आहे. भारत बलुची बंडखोरांना मदत करतो अशी अफवा आहे. पण ते प्रत्यक्षात खरे नसावे. नाहीतर इतक्या वर्षात काहीतरी पुरावे किंवा लागेबांधे दिसले असते. भारताने यापूर्वी लिट्टेला (श्रीलंका) शस्त्रे व आर्थिक मदत पुरवुन आपले हात पोळून घेतले होते. अफगाणिस्तानमधील नॉर्दर्न अलायन्सचा धडाडीचा ताजिक नेता अहमदशहा मसूद (याला ९/११ च्या २ दिवस आधी म्हणजे ९ सप्टेंबर २००१ ला तालिबान्यांनी आत्मघातकी ह्ल्लेखोर पाठवून मारले) याला १९९६ व त्यानंतर २००१ व नंतरही उत्तर अफगाण सीमेवरील राष्ट्रांमार्गे भारत शस्त्रात्रे व आर्थिक मदत करत होता कारण तो कट्टर तालिबानविरोधी होता. 'जियो सिंध्'चा नेता अल्ताफ हुसेनने सिंध प्रांत स्वतंत्र करण्यासाठी भारताची मदत मागितली होई. परंतु अजूनपर्यंत भारताने कोणत्याही पाकिस्तानी विभाजनवादी संघटनेला मदत पुरविली नसावी असे वाटते. मदत करत असल्यास किंवा केली असल्यास कधी ना कधी तरी ते बाहेर आले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

हे

चिरोटा
Fri, 01/11/2013 - 16:20 नवीन
भारत-पाक संबंधांचे हे झेंगाट कधीच कळत नाही.तिकडे वाघा सीमेवर रोज भारत-पाक सैनिक समोरासमोर लेफ्ट-राईट करत असतात ऐटीत.(http://en.wikipedia.org/wiki/Wagah_border_ceremony ). मग सीमेवर दुसरीकडे कुठेतरी चकमक वगैरे होते. त्यात त्यांनी गोळीबाराला सुरुवात केलेली असते आणि ह्यांनी प्रत्युत्तर दिलेले असते.किंवा vice versa. मग ते म्हणतात कश्मीरमध्ये स्वातंत्र्याची गळचेपी होतेय. हे म्हणतात- असले काही नाही.येवून बघा. हे म्हणतात- दहशतवादी पाठ्वणे थांबवा. ते म्हणतात- तुम्ही अडवा की त्यांना. काही दिवस जातात मग दोघेही एकमेकांच्या उच्च्युक्ताला बोलवून घेतात,दम भरतात आणि 'निषेध' वगैरे नोंदवतात.परत काही दिवस जातात. मग एके दिवशी सकाळी दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांचे हसत हसत फोटो!! कश्मीर प्रश्न चर्चेनेच सुटेल ह्यावर दोघांचे एकमत होते.
  • Log in or register to post comments

सर्वात प्रथम हा विचार केला

श्रीगुरुजी
Sun, 01/13/2013 - 20:20 नवीन
सर्वात प्रथम हा विचार केला पाहिजे की पाकिस्तानशी संबंध ठेवणे हे भारताच्या हिताचे आहे का? किंवा असे संबंध हितकारक नसले तरी ते अहितकारक आहेत का? जर पाकिस्तानशी संबंध तोडले तर आता आहे त्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती निर्माण होईल का परिस्थिती आहे तशीच राहील का परिस्थिती सुधारेल? १९४७ पासून गेली ६५-६६ वर्षात असे दिसून आले आहे की, पाकिस्तानशी संबंध ठेवणे हे भारताच्या अजिबात हिताचे नाही किंबहुना भारतासाठी हे संबंध अत्यंत अहितकारक ठरलेले आहेत. केवळ आपली मतपेढी सुरक्षित ठेवण्यासाठी व काश्मिरी मुस्लिमांना व भारतातील तथाकथित निधर्मांधांना खूष ठेवण्यासाठी भारताच्या हिताचा बळी देऊन पाकिस्तानचे चोचले पुरविले जात आहेत. निदान आतातरी जागे होऊन हे संबंध कायमस्वरूपी तोडले पाहिजेत.
  • Log in or register to post comments

इथे हित-अहीत कारक संबंधाचा ऑप्शन नाहि.

अर्धवटराव
Sun, 01/13/2013 - 23:29 नवीन
पाकिस्तानशी संबंध अपरिहार्य आहेत. ते चांगले किंवा वाईट असतील... पण संबंध न ठेवणे अशक्य आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

यावर जरा सविस्तर लिहाल क?

श्रीगुरुजी
Mon, 01/14/2013 - 12:44 नवीन
यावर जरा सविस्तर लिहाल क? पाकिस्तानशी संबंध अपरिहार्य का आहेत? अनेकवेळा लाथांचा प्रसाद मिळूनसुद्धा पाकिस्तानशी संबंध टिकवून धरल्याने भारताचा कोणता फायदा होतो? पाकिस्तानशी संबंध तोडले तर भारताचा नक्की काय व किती तोटा होईल? भारताला सर्वाधिक आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे उच्च तंत्रज्ञान, परकीय चलन, तेल, शस्त्रास्त्रे, कमी पडणारे अन्नधान्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा इ. . . .यापैकी कोणत्या गोष्टी पाकिस्तान पुरविते? पाकिस्तानशिवाय जगात इतर कोणताच देश या गोष्टी पुरवु शकणार नाही का? पाकिस्तानशी संबंध ठेवल्याने आजवर भारताचा काय व किती फायदा झाला? आणि हे संबंध तोडल्याने भारताचा काय व किती तोटा होईल? अशा नक्की कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे भारताला पाकिस्तानशी संबंध ठेवावेच लागतील? आपण पाकिस्तानवर नक्की कोणत्या गोष्टींवर पूर्णतः किंवा अंशतः अवलंबून आहोत? निव्वळ व्यापार बघितला तर भारताची पाकिस्तानकडून आयात जास्त व निर्यात कमी आहे. म्हणजे तिथेही असंतुलन आहेत. हा व्यापार मुख्यत्वेकरून रेशीम, कापड व काही अन्नधान्याचे पदार्थ इ. मर्यादित स्वरूपाचा आहे. या सर्व गोष्टी भारताला जगात इतर देशांकडूनसुद्धा मिळू शकतात. भारताला पाकिस्तानची अजिबात गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आहो गुरुजी जरा त्यांच्या

खबो जाप
Mon, 01/14/2013 - 15:28 नवीन
आहो गुरुजी जरा त्यांच्या भावना समजून घ्या
पाकिस्तानशी संबंध अपरिहार्य आहेत. ते चांगले किंवा वाईट असतील... पण संबंध न ठेवणे अशक्य आहे
ह्याचा अर्थ असा आहे कि शेजारच्या गल्लीतल कुत्र किती जरी चावल तरी कधीतरी सुधारेल म्हणून त्याला रोज बिस्किटे(व्हिसा ), दुध (क्रिकेट ). चपात्या(अमन कि आशा सारखे कार्यक्रम) खायला घालणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पाकिस्तानशी संबंध अपरिहार्य का आहेत?

अर्धवटराव
Mon, 01/14/2013 - 21:46 नवीन
पाकिस्तानशी आपली सागरी, जमीन, आणि आकाश सरहद्द शेअर होते.आज भारत सिमेवर काहि खुट्टं झालं भारत त्याला मिलटरी आणि डिप्लोमॅटीक लेव्हलला उत्तत द्यायचे प्रयत्न करु शकतो. पाकशी संबंध तोडल्यास प्रत्येक कारणासाठी पाक (आणि आपण सुद्धा) प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय लवादाकडे, युनो कडे जाऊ. मग ते कारण साधं मच्छीमारांनी एकमेकांच्या हद्दीत घुसणं असो, कि नद्यांचे पाणि असो, किंवा पश्चिमेकडुन येणार्‍या - जाणार्‍या हवाईवाहतुकीला पर्मीशन्स असो... काश्मीर प्रश्न तसंही युनोमध्ये दाखल झाला आहे. भारत-पाक संबंध तुटले तर तिथे युनोसारख्या संस्थांची मध्यस्ती एक नवीन डोकेदुखी म्हणुन आपल्याला छळेल. भारत आशीयाखंडात फार महत्वपूर्ण भुमीका निभवतो (सार्क वगैरे). एक खंड म्हणुन आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आणि पाकिस्तानला कहि ना काहि कॉमन भुमीका घ्यावीच लागते. पाकिस्तानला अंतर्गत बंडाळीने खिळखिळं करायचं म्हटलं तर भारताला त्यातल्या प्रत्येक फॅक्टरशी संबंध ठेवावे लागतील. अधिकृत संबंधाच्या छायेशिवाय हे धंदे जमणार नाहि. जगात अनेक शेजारी राष्ट्रांमध्ये वाईट संबंध आहेत. इस्त्राएल आणि अरब राष्ट्रे, उत्तअ-दक्षीण कोरीया, इराण - सौदी अरब (हे अगदी शेजारी नाहित, पण त्यांचं शत्रुत्व जगजाहीर आहे). पण त्यापैकी कुणीच संबंध तोडले नाहित. असो. यादी खुप लांबलचक आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर असं रुसुबाई सारखं संबंधं तोडुन बसणं एका परिपक्व लोकशाही देशाचे लक्षण नाहि. सर्वात महत्वाचं... क्रिकेट सामने, कलाकारांचे येणं जाणं वगैरे गोष्टी म्हणजे दोन राष्ट्रांचे संबंध नाहित. आंतरराष्ट्रीय संबंध हि फार खोल, संथ, आणि अत्यंत व्यापक परिमाणांची प्रक्रिया आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हम्म...

दादा कोंडके
Mon, 01/14/2013 - 15:52 नवीन
पाकिस्तानशी संबंध अपरिहार्य आहेत. ते चांगले किंवा वाईट असतील... पण संबंध न ठेवणे अशक्य आहे.
संबंध चांगले जरी नसतील तरी खूप वाईट नसण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. उद्या भारत-पाक सिमेवर चीनला लश्करी तळ उभे करू दिले तर कितक्याला पडेल? कुठ्ल्याश्या मराठी सिनेमात ऐकलेल्या म्हणीप्रमाणे पाकिस्तान म्हणजे, 'अवघड जागेचं दुखणं आणि जावई डॉक्टर' अशी अवस्था आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मेरे पती का सिर ला के दो...

मदनबाण
Sun, 01/13/2013 - 21:35 नवीन
मेरे पती का सिर ला के दो... http://zeenews.india.com/videos/bring-head-of-my-husband_19437.html
  • Log in or register to post comments

मोदींची धडाडी

हुप्प्या
Mon, 01/14/2013 - 00:51 नवीन
इथल्या आणि अन्यही बोटचेप्या, काँग्रेस धार्जिण्या प्रतिक्रिया देणार्‍ंयाना पोटशूळ होईल अशी मोदींची कारवाई http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18009125.cms पाकच्या शिष्टमंडळाला गुजराथेतून हाकलून दिले. वज्राहूनही कडक निषेधाचे खलिते पाठवण्यापेक्षा ही एक कृती बरेच काही व्यक्त करते असे मला वाटते. पण विशिष्ट व्होट बँकेचे गणित मनात घोळवत असणारे केंद्रीय सरकार असे काही करेल असे वाटत नाही. ते वाचा आणि हेही http://online3.esakal.com/esakal/20130113/5300226139781097569.htm
  • Log in or register to post comments

Sorry to burst the bubble Sir

पिंपातला उंदीर
Mon, 01/14/2013 - 09:41 नवीन
Sorry to burst the bubble Sir http://ibnlive.in.com/news/pakistani-delegates-took-part-in-vibrant-gujarat-summit-2013-gujarat-government/315561-37-64.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

.

नितिन थत्ते
Mon, 01/14/2013 - 11:31 नवीन
मोदींच्या नावे रजनीकांत ष्टाईल जोक सुरू झाले का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

+१

दादा कोंडके
Mon, 01/14/2013 - 21:55 नवीन
कुणा मोदीद्वेष्ट्याचा हा कुटील डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे सुरवातीला दोन-चार ऑब्विअस अश्या पुड्या सोडून दिल्या की पुढच्या खर्‍या गोष्टीसुद्धा लोकं, 'हॅ, मागच्यावेळेसारखंच काहितरी असेल' म्हणून दुर्लक्ष करतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

म.टा चुकले वाटते...

विकास
Mon, 01/14/2013 - 21:28 नवीन
म.टा.मधे चुकीच्या बातम्या असतात वाटतं! असो, परत एकदा माध्यमांची उठसुठ बातम्या देऊन चुका दुरूस्त न करण्याची स्टाईल दिसून आली... इंडीया टूडे मधे आजही खालील मथळे असलेल्या दोन्ही बातम्या दिसतातः Narendra Modi govt asks Pakistani delegation to leave Vibrant Gujarat Summit after tension escalates along LoC (स्त्रोतः Mail Today Bureau) Pakistani delegates took part in Vibrant Gujarat Global 2013: Modi govt (स्त्रोतः PTI) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

सहमत

सलिल २४
Mon, 01/14/2013 - 13:53 नवीन
आपण नागरिक असे संतापतो, अस्वस्थ होतो पण सरकार मात्र? आताच एक पुस्तक हाती आलाय ते वाचतोय. एका सैनिकाची रोजनिशी. ' कारगिल इन साईड स्टोरी' लेखिका हरिंदर बवेजा.अनुवाद-चंद्रशेखर मुरगुडकर.सैनिकांची अवस्था काही वेगळी नव्हती त्या वेळी.कुणाशी लढतोय,शत्रूकडे काय तयारी आहे,लष्कर कि अतिरेकी काही स्पष्ट होत नव्हत त्यांना.कारगिल विजयाची हि बाजू मला तरी माहित नव्हती.तरी जवान लढतात.आता तर त्यांना त्रिवार त्रिवार मुजरा करावा असे वाटते.दळभद्री सरकारचा तीव्र निषेध.सरकारला काही फरक पडणार नसला तरी.पण साला आपण वांझोटे चिडतो.राजकारण्यांना काही नसत.उगा डोक खराब होत.पण सैन्यासाठी मात्र जीव तुटत राहील.जय जवान.
  • Log in or register to post comments

तेव्हा पाकिस्तानशी युद्धाची

मदनबाण
Mon, 01/14/2013 - 20:20 नवीन
तेव्हा पाकिस्तानशी युद्धाची वेळ आली तर त्यांच्यावर आधीच आपण अणुबॉम्ब टाकावेत पण तशी वेळ येऊ नये म्हणून जे काही करता येईल ते करावे.मला वाटते माझा मुद्दा मी स्पष्ट केला आहे. क्लिंटन यांच्या या मुद्द्याशी मी १००% सहमत आहे. १९९८ मधे पाकिस्तानचे शमशेद अहमद म्हणाले होते की:- "Pakistan's policy implies that it will not only use nuclear weapons in a retaliatory strike, it is also ready to take the lead and use nuclear weapons first to counter Indian conventional aggression.". सध्या पाकिस्तानकडे ९० ते ११० न्युक्लिअर बॉम्बस आहेत.तसेच पाकिस्तान Non-Proliferation of Nuclear Weapons (NPT) and the Comprehensive Nuclear Test Ban Treaty (CTBT) या दोन्ही करारांमधे बद्ध नाही. पाकिस्तान फार मोठ्या प्रमाणात आणि वेगात अणवस्त्रे बनवत आहे.येत्या काही वर्षात त्यांच्याकडे १५० ते २०० अणवस्त्रांचा साठा तयार होईल. Alastair Campbell's यांच्या The Burden of Power (Campbell Diarie)मधील नोंदी नुसार फक्त ८ सेकंदात मिसाईल्स सोडण्याची आमची तयारी आहे असे पाकिस्तान मधल्या काही जनरल्सनी सांगितले होते. सध्या पाकिस्ताना त्यांच्या खुशब ४(Khushab-४)या अणुभट्टीची बांधणी पूर्ण करण्यात जुंपला आहे,ज्यामुळे प्लुटोनियचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येईल. पाकिस्तानच्या काही न्युक साईट्स :- Image removed. खुशब २ आणि खुशब ३ (Khushab २ & Khushab ३) Image removed. (सर्व चित्रे जालावरुन) संदर्भ :- Pakistan’s rush for more bombs — why? Pakistan boasted of nuclear strike on India within eight seconds Pakistan's nuclear work on fast track
  • Log in or register to post comments

ताक :-Pakistan's fourth

मदनबाण
Tue, 05/19/2015 - 10:15 नवीन
ताक :- Pakistan's fourth nuclear reactor at Khushab now appears operational सौदी पाकड्यांकडुन अणूबॉम्ब घेणार ! S. Arabia calls in off-the-shelf nuke option with Pakistan – report चीन+ पाकडे = सायनो पाक न्यूक्लिअर लिंक China Confirms Pakistan Nuclear Projects पाकिस्तानची नव्या रिअ‍ॅक्टरची भूक ? Outcry and fear as Pakistan builds new nuclear reactors in dangerous Karachi मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ता.क :-

मदनबाण
गुरुवार, 11/19/2015 - 10:08 नवीन
ता.क :- Pakistan could be 5th largest nuclear power by 2025: Report The bomb next door that’s ticking away Pakistan’s Islamic bomb पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची डोकेदुखी मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Tail wags the dog
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आतापर्यंत तीनवेळा शिरच्छेद

श्रीगुरुजी
Tue, 01/15/2013 - 22:18 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18029046.cms पाकड्यांनी गेल्या १२ वर्षात आतापर्यंत ३ वेळा पकडलेल्या भारतीय सैनिकांचा शिरच्छेद केलेला आहे. ही धक्कादायक बातमी आज लष्करानेच उघड केली. हे वाचून मन सुन्न झाले आणि पुन्हा एकदा संताप दाटून आला. सौरभ कालिया व इतर ५ जणांचा अमानवी छळ करून मारले ती अजून वेगळीच घटना आहे. भारताने ह्या बातम्या जगापासून व भारतापासून लपवून ठेवण्यातच धन्यता मानली. जेव्हा पहिल्यांदा ही विकृत घटना घडली तेव्हाच पाकिस्तानविरूद्ध कठोर कारवाई केली असती तर पुढील २ घटना टाळता आल्या असत्या. पण आधीच्या दोन घटनांनंतर भारताने त्या घटना लपवून ठेवण्यात यश मिळविले आणि आताच्या घटनेनंतर पूर्वी किमान १०० वेळा पाठविलेला तोच निषेध खलिता नवीन तारीख टाकून दिला आणि विषय मिटवून टाकला. यावेळी तर भारताच्या भूमीत घुसून व तिथून २ सैनिक पकडून आणून त्यांचे शिरच्छेद करण्यापर्यंत पाकिस्तानची मजल गेली. आपण पकडलेल्या सैनिकांचे कितीही वेळा शिरच्छेद केले तरी भारत थंडच राहतो हे माहिती असल्यामुळेच पाकिस्तान अशी कृत्ये करत राहतो व भविष्यातही करत राहील. एकंदरीत स्वत:ची मतपेढी टिकविण्याच्या काही पक्षांच्या किळसवाण्या राजकारणामुळे भारतीय सैनिकांचा अमानवी पद्धतीने जीव जात आहे आणि पाकपुरस्कृत दहशतवादामुळे सामान्य नागरिक बॉम्बस्फोटात मरत आहेत आणि आपण मात्र निर्लज्जपणे शांतता चर्चा, समझोता एक्प्रेस, व्यापार, हॉकी,क्रिकेट व इतर खेळात पाकड्यांना पायघड्या, पाकिस्तानी गायकांचे लाड इ. करून आपल्या कणाहीनतेचे केविलवाणे प्रदर्शन करत आहोत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा