Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Wed, 01/16/2013 - 20:38
रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतेच. अमेरीकेत खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "हिंदू स्त्रिया, कपाळावर कुंकू का लावतात?" मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "फॅशन" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेते. तर काहींना सांगते की "लग्नानंतर लाल कुंकू लावयच" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "पुरुष गंध का लावतात?" आणि मी निरुत्तरशी होते. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगते की योगशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, शरीरात अनेक अध्यात्मिक चक्रे असतात. पैकी ७ ही मुख्य चक्रे असून , पैकी एक आहे भ्रूमध्य चक्र ज्याला आज्ञा चक्र हेदेखील नाव आहे. या चक्राच्या देवी-देवतेची पूजा म्हणून अनेक जण गंध लावतात. आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?
  • Log in or register to post comments
  • 78752 views

प्रतिक्रिया

Submitted by इष्टुर फाकडा on गुरुवार, 01/17/2013 - 21:02

In reply to जस्ट लाईक इष्टुर फाकडा by जेनी...

Permalink

चला, नाव सार्थकी लागलं

चला, नाव सार्थकी लागलं :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 01/16/2013 - 21:53

In reply to कपाळाला कुंकू लावण्यामागे by इष्टुर फाकडा

Permalink

ही 'पिचू'ची काय भानगड आहे?

एकदा कधीतरी बालाजी तांबेंना भगवदगीता कार्ड की तसलंच काहीतरी वापरुन ज्योतिष कथन करताना पाहीलं आणि त्यांचा धसकाच घेतला.
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Wed, 01/16/2013 - 22:59

In reply to ही 'पिचू'ची काय भानगड आहे? by धन्या

Permalink

ही 'पिचू'ची काय भानगड आहे?

ही 'पिचू'ची काय भानगड आहे?
अरे ये पीएसपीओ नही जानता.. :) आता एक काम कर, रद्दीतले सगळे फॅमिली डॉक्टर उपसून सगळी प्रश्णोत्तरे पाठ कर. ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 01/17/2013 - 20:42

In reply to ही 'पिचू'ची काय भानगड आहे? by गणामास्तर

Permalink

इथेच सांग...

किंवा इथे सांगण्यासारखे नसेल तर व्यनी कर. आमच्याकडे सकाळ येत नाही. जाहीरात टाईम्स येतो, कसल्याशा ऑफरमधला आहे म्हणून चालू आहे. शनिवार आणि रविवार लोकसत्ता घेतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Fri, 01/18/2013 - 00:57

In reply to इथेच सांग... by धन्या

Permalink

मला पन पायजे व्यनि. कवाधरनं

मला पन पायजे व्यनि. कवाधरनं सोदतोय अर्त याचा. फोनवर ५० रुपडे गेले त्या भानगडीत.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 01/18/2013 - 02:20

In reply to मला पन पायजे व्यनि. कवाधरनं by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

"तो शब्द" अधिक बालाजी तांबे

"तो शब्द" अधिक बालाजी तांबे असं गुगलून घ्या. बरंच ज्ञानवर्धन होईल! (माझंही झालं)
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 01/18/2013 - 15:45

In reply to "तो शब्द" अधिक बालाजी तांबे by आदूबाळ

Permalink

'त्यांच्या' सगळ्या औषधांच्या..

'त्यांच्या' सगळ्या औषधांच्या नावाचा शेवट 'सॅन'ने का होतो?
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 01/16/2013 - 22:04

Permalink

मासिक धर्माचे प्रतीक

कुंकू हे स्त्रियांच्या मासिक धर्माचे प्रतीक आहे. कुंकवाचा लाल रंग हा रक्ताशी संबंधित असून त्याचा पुरषांचे शौर्य वगैरेंशी संबंध नसून मासिक पाळीशी संबंधित आहे. मासिक पाळीच्या आवर्ती चक्राप्रमाणे आवर्तन दर्शवणारा गोलाकार बिंदू म्हणजे कुंकू. ऋतुप्राप्ती झालेल्या स्त्रियाच कुंकू लावत असत. मात्र कुंकवाचा लग्नाशीही संबंध नव्हता. लग्नानंतर कुंकू लावतात असे आपणास दिसते कारण पूर्वीच्या काळी ऋतूप्राप्तीनंतर स्त्रियांचा विवाह लगेचच होत असे. ऍक्युप्रेशर, आयुर्वेदिक फायदा, मस्तक शांत होते वगैरे बालाजी पद्धतीचे निष्कर्ष निराधार आहेत. अनेक कुंकू लावणाऱ्या कडकलक्ष्मी बायका मला माहीत आहेत. कुंकवाने त्यांचे डोके थंड झाले नाही. याबाबत मनोगतावर की उपक्रमावर विस्ताराने चर्चा झाली होती. दुवा सापडल्यास देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 01/16/2013 - 22:09

In reply to मासिक धर्माचे प्रतीक by आजानुकर्ण

Permalink

कुंकु लालच का असतं ?? असा

कुंकु लालच का असतं ?? असा प्रश्न विचारणार होते आता मी :( पण मग वेगवेगळ्या रंगांच्या साडीवर लावायला वेगवेगळ्या रंगाची कुंकवं बनवायला हवी होती :( ... त्यामुळेच टिकलीशिवाय पर्याय नसतो :-/
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 01/16/2013 - 23:03

In reply to मासिक धर्माचे प्रतीक by आजानुकर्ण

Permalink

मळवट

अनेक कुंकू लावणाऱ्या कडकलक्ष्मी बायका मला माहीत आहेत. कुंकवाने त्यांचे डोके थंड झाले नाही.
अगदी सहमत. त्यांचा तर कपाळभर मळवट अस्तो तरीपण. बादवे रंगाचे ठीक आहे हो पण आकाराचे काय? टिपका, गोल, लंबगोल, चिरी, मळवट या प्रत्येकामागे पण संस्कृती आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Wed, 01/16/2013 - 23:40

In reply to मासिक धर्माचे प्रतीक by आजानुकर्ण

Permalink

सहमत

या धाग्यावर गंभीर प्रतिसाद निरर्थक आहेत तरीही धार्ष्ट्य केले आहे. फार पूर्वी विश्वनाथ खैरे यांनी त्यांच्या एका लेखात असे मांडले होते की मुलगी ऋतुमती होऊ लागली आहे हे जाहीर होण्यासाठी ती कपाळावर,मुख्यत्वे भांगात लाल रंग भरीत असे.प्राचीन काळात मुलीला जोडीदार निवडण्याचा हक्क होता. ती मुलगी प्रणयाराधन करण्याजोगी झाली आहे हे इच्छुक पुरुषांस कळावे यासाठी ही खूण होती. खैर्‍यांनी तर ऋतु,रक्त,ह्या शब्दांमध्येही व्युत्पत्तिसाम्य मानले आहे. ठराविक कालावधीचे फेरे हा अर्थ पुढे सार्वत्रिक झाला आणि कालमापनासाठीसुद्धा वापरात आला.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 01/17/2013 - 00:16

In reply to सहमत by राही

Permalink

या धाग्यावर गंभीर प्रतिसाद

या धाग्यावर गंभीर प्रतिसाद निरर्थक आहेत
कारण कळेल का? बाकी प्रतिसाद आवडला. नवीन माहीती दिल्याबद्दल, मी आजानुकर्ण यांची आणि आपली आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 01/17/2013 - 01:01

In reply to सहमत by राही

Permalink

या धाग्यावर गंभीर प्रतिसाद

या धाग्यावर गंभीर प्रतिसाद निरर्थक आहेत
पूर्णपणे सहमत. धागाकर्त्रीचा उद्देश साफ असेल, पण कैच्याकै प्रतिसादांचे प्रमाण बघता असेच म्हणावे लागते. बाकी एकेका फालतू शब्दाच्या वापरावरून संवेदना जागृत झाल्याचे पाहून मजा वाटली. (नेहमीप्रमाणेच)
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Wed, 01/16/2013 - 22:09

Permalink

एस.टी मधे घरचा वैद्य, १००

एस.टी मधे घरचा वैद्य, १०० प्रश्नांची उत्तरे अशी पुस्तके विकायला येतात लोकं. त्यात असतं म्हणे या कुंकवाचं कारण.. आत्तापर्यंत पुस्तकांपेक्षा त्या विक्रेत्याच्या गेंगाण्या आवाजातील जाहिरातीतच जास्त इंटरेस्ट असल्यामुळे कधी वाचनं झालं नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 01/16/2013 - 23:04

Permalink

उपरोध (आयरनी) हाच की जेव्हा

उपरोध (आयरनी) हाच की जेव्हा अमेरीकन्स हा प्रश्न विचारतात तेव्हा याचे उत्तर शोधावेसे वाटते, बाकी अंधानुकरण किंवा दबावाखाली अनुसरण :(
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 01/17/2013 - 00:08

In reply to उपरोध (आयरनी) हाच की जेव्हा by शुचि

Permalink

आगावू मेले अमेरिकन!

अमेरिकनांना काय गरज पडल्येय आमच्या बायकांच्या कुंकवाची उठाठेव करायची? तुमच्या बायका कुठेकुठे आणि कायकाय गोंदवून घेतात ते पहिल्यांदा बघा म्हणावं!!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 01/17/2013 - 00:18

In reply to आगावू मेले अमेरिकन! by पिवळा डांबिस

Permalink

हाहाहा "ह्म्म "कुठे कुठे" हो

हाहाहा "ह्म्म "कुठे कुठे" हो पिडां =))
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 01/17/2013 - 00:21

In reply to आगावू मेले अमेरिकन! by पिवळा डांबिस

Permalink

आणि " काय काय " हो पिंडा काका

आणि " काय काय " हो पिंडा काका =))
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 01/17/2013 - 00:36

In reply to आणि " काय काय " हो पिंडा काका by जेनी...

Permalink

काय अन् कुठे

शुचि आणि पूजा, या एकदा आमच्या मालिबू बीचवर,प्रत्यक्षच दाखवतो!!! गोर्‍यांच्या गोंदणाला आरसा कशाला!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 01/17/2013 - 01:14

In reply to काय अन् कुठे by पिवळा डांबिस

Permalink

मालिबू वर खूपदा गेलेय पण त्या

मालिबू वर खूपदा गेलेय पण त्या देवळातील प्रसाद चापायला :) बाकी बायकांकडे नाही पाहीले :(
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 01/17/2013 - 07:11

In reply to मालिबू वर खूपदा गेलेय पण त्या by शुचि

Permalink

मी मालिबू बीचवर असं म्हंटलय.

मी मालिबू बीचवर असं म्हंटलय. अमेरिकन बायका मालिबूच्या देवळात कशाला जातील, तो टॅमरिंड राईस खायला? तो तर आम्हालासुद्धा मोह पाडत नाही... :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 01/17/2013 - 07:58

In reply to मी मालिबू बीचवर असं म्हंटलय. by पिवळा डांबिस

Permalink

.... हाच तो बेवॉच चा बीच खरय

:) .... हाच तो बेवॉच चा बीच :) खरय तुमचं म्हणणं पिडां
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 01/17/2013 - 13:25

In reply to काय अन् कुठे by पिवळा डांबिस

Permalink

'गोंद्या' आल्या रे

>>> गोर्‍यांच्या गोंदणाला आरसा कशाला!!! बाकी आपल्या पूर्वजांनी ज्या सूक्ष्मचैतन्यदायी बिंदुदाबनाची देणगी फक्त पती हयात असणार्‍या स्त्रियांच्या पिट्युटरी ग्लँडच्या उद्धारासाठी उपलब्ध केली होती, तेच ज्ञान उसने घेऊन (जसं कणादाच्या सिद्धांतावरूनच त्यांनी 'हिग्ज बोसॉन'चा शोध लावला) ह्या पाश्चात्यांनी सर्वांसाठी पिट्युटरीच काय पण पँक्रिआजपासून हायपोथॅलॅमसपर्यंत सार्‍या ग्लँडबिंदुदाबनचैतन्यप्रेरकतत्त्वाची सोय ह्या टॅटूजमार्फत केली आहे, अशी काही वदंता अलीकडेच कानी आली. खरं काय हो हे?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 01/18/2013 - 13:04

In reply to 'गोंद्या' आल्या रे by नंदन

Permalink

कसलं मेंदुभंजक बोलता हो

कसलं मेंदुभंजक बोलता हो तुम्ही !!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 01/18/2013 - 13:45

In reply to 'गोंद्या' आल्या रे by नंदन

Permalink

@ग्लँडबिंदुदाबनचैतन्यप्रेरकतत

@ग्लँडबिंदुदाबनचैतन्यप्रेरकतत्त्वाची>>> =)) =)) =)) @कसलं मेंदुभंजक बोलता हो तुम्ही !!!!!>>> बॅटमॅन यांच्या तापत्रयविहारक वाक्यरचनेशी....... पूर्ण सहमत ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Fri, 01/18/2013 - 15:53

In reply to 'गोंद्या' आल्या रे by नंदन

Permalink

बाब्बो..

ह्या पाश्चात्यांनी सर्वांसाठी पिट्युटरीच काय पण पँक्रिआजपासून हायपोथॅलॅमसपर्यंत सार्‍या ग्लँडबिंदुदाबनचैतन्यप्रेरकतत्त्वाची सोय ह्या टॅटूजमार्फत केली आहे, अशी काही वदंता अलीकडेच कानी आली.
बाप रे.. खाचकन ऽ ऽ खप्याच मैं.. =))
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 01/22/2013 - 09:40

In reply to 'गोंद्या' आल्या रे by नंदन

Permalink

नंदन मेल्या, ह्या असला कायबाय

नंदन मेल्या, ह्या असला कायबाय लिहीतंस तर एक बरोसो लेख रे लिहूक काय हात दुखतत तुझे?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रिया on Wed, 01/16/2013 - 23:10

Permalink

लेखात नमूद केल्याप्रमाणे

लेखात नमूद केल्याप्रमाणे कुंकवाचे फायदे मिळण्यासाठी ते कपाळावर नेमके कुठे लावावे ह्याचेही निर्देश आहेत. कपाळा खाली ,भ्रुमध्याच्याठिकाणी पिच्यूटरी ग्लॅंड (शीरस्थ ग्रंथी)चा अक्‍यूप्रेशर बिंदू आहे. त्या ठिकाणी शुद्ध कुंकू लावले असता त्यातील औषधी घटक त्वचेमार्फत ग्रंथीना मिळतात व त्यामुळे त्यांचे कार्य व्यवस्थित चालू राहते. तसेच शुद्ध लाल कुंकवामध्ये लोह असेल तर तोही फायदा मिळण्याचे प्रयोजन असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 01/17/2013 - 02:47

In reply to लेखात नमूद केल्याप्रमाणे by श्रिया

Permalink

+१

भ्रुमध्याच्याठिकाणी पिच्यूटरी ग्लॅंड असते त्या ग्लँडला संरक्षण अस काहीस मी वाचल आहे. पण वर जो कुंकु लाल मातीपासुन बनल जायच हे जे लिहिलय ते मात्र खरच पहिल्यांदाच ऐकते आहे. कारण आमच्याकडे कुंकवाची फळ असतात. ती कुटुन त्याची पावडर्(चुर्ण म्हणा हवे तर) कुंकु म्हणुन वापरली जाते. कुंकवाचे अनेक आयुर्वेदिक उपयोगही आहेत. मी पाहिली आहेत कुंकवाची झाड, अन फळं सुद्धा. मग पुढे ही फळं कोण गोळा करत फिरणार म्हणुन हळदीत रसायन मिसळुन त्याचा वापर सुरु झाला अन त्यामुळे कपाळावर पांढरे डाग, अथवा जळल्यासारखा काळापणा, आग हे प्रकार सुरु झाले. मग आला गंध विच वॉज कन्सिडर्ड अ‍ॅज सेफर दॅन कुंकु. या सगळ्या गोंधळात लोक मुळं कुंकु विसरुनच गेले.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 01/16/2013 - 23:44

Permalink

कुंकू का लावतात ?

स्त्रियांचे कपाळ गोल असते.पुरुषांचे कपाळ आयताकृती असते.त्यामुळे गोलाच्या केंद्रस्थानी कुंकू जसे चांगले दिसते तसे चौकोनाच्या केंद्रस्थानी दिसत नाही. म्हणून कुंकू जितके बायकांना चांगले दिसते तितके पुरुषांना दिसत नाही. कुंकू लाल असण्याचे कारण मानवी रक्ताचा रंग लाल आहे. कोणतीही स्त्री (काळी किंवा गोरी) लाजली कि चेहऱ्याचा रक्त पुरवठा वाढतो आणि चेहरा लाल होतो. त्या लालीम्याला मेचींग म्हणून लाल कुंकू लावतात. काळ्या स्त्री ला सुद्धा लाल कुंकू म्हणूनच खराब दिसत नाही.नटण्या मुरडण्याची हौस बायकांना जितकी असते पुरुषांना तिच्या एक दशांशाने हि नसते.लग्नात आजी आजोबांच्या वयाच्या व्यक्ती पहाम्हणजे आपल्या लक्षात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by तिरकीट on गुरुवार, 01/17/2013 - 00:11

Permalink

"मास्तर, ती द्रौपदी होती न

"मास्तर, ती द्रौपदी होती न द्रौपदी, ती कपाळावर कुंकवाचे ५ ठिपके लावायची का हो?" पु. लं चा १ प्रांजळ प्रश्न
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 01/17/2013 - 00:14

In reply to "मास्तर, ती द्रौपदी होती न by तिरकीट

Permalink

ह्या .. उगिच कायतरी

ह्या .. उगिच कायतरी :-/
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on गुरुवार, 01/17/2013 - 14:01

In reply to "मास्तर, ती द्रौपदी होती न by तिरकीट

Permalink

प्रांजळ उत्तर

मास्तरन्नी मग किती आणी कुठे फटके मारले हो ? आमच्या कडे ह्याला 'तुम्बून काढले' असे वाक्य प्रचलीत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 01/17/2013 - 23:10

In reply to प्रांजळ उत्तर by केदार-मिसळपाव

Permalink

तुंबून ?

नक्की का ? की 'तिंबून काढणे' म्हणायचंय ?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 01/17/2013 - 23:20

In reply to तुंबून ? by सूड

Permalink

नै. तुंबून काढले, तुंब्या

नै. तुंबून काढले, तुंब्या/हग्या मार दिला, इ.इ. शब्दप्रयोग प्रचलित आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on Fri, 01/18/2013 - 00:20

In reply to नै. तुंबून काढले, तुंब्या by बॅटमॅन

Permalink

झोडुन काढणे..( चान्गलाच झोडला पोराला आज...)

वरील सगळे बरोबर आहे. मला तिम्बुन काढणे म्हणायचे होते. अमळ घाइघाइने लिहिले होते मी, म्हणुन घसरकळीफलकाने झाली चुक.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 01/17/2013 - 00:14

Permalink

सहमत

बायकांना कुंकू चांगले दिसते याला सहमत पण त्या आकाराच्या थिअरीला नाही. (आणि लाजून एकदा लागले कुंकू की मग रागानेच चेहरा लाल व्ह्यायचे प्रसंग जास्त. तेव्हा सुध्दा मॅचिंग होते बहुतेक.)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 01/17/2013 - 00:16

In reply to सहमत by अभ्या..

Permalink

अब्या तुझं लग्न केव्हा झालं

अब्या तुझं लग्न केव्हा झालं रे ???
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 01/17/2013 - 00:22

Permalink

हेहेहेहे

ओ गृहकृत्यदक्षिणी. आत्ता कुंकवाची उठाठेव चाललीय. कुंकूवालीची नाही. आणि कुंकवाची सगळ्यात जास्त निर्मिती माझ्या जिल्ह्यात होत असल्याने माझा नैतिक अधिकार आहे त्यावर बोलायचा. त्यासाठी लग्नच व्हायला हवे असे काही नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 01/17/2013 - 00:30

In reply to हेहेहेहे by अभ्या..

Permalink

@त्यासाठी लग्नच व्हायला हवे

@त्यासाठी लग्नच व्हायला हवे असे काही नाहीये.>>> Image removed. जोरदार अनुमोदन... =))
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 01/17/2013 - 00:33

In reply to हेहेहेहे by अभ्या..

Permalink

ए अब्या ...

ए अब्या ... पण कुंकुवाली लाजली तरच कुंकु मेचिंग होतं ना ?? मग नुसती कुंकुवाची उठाठेव काय कामाची बे :-/
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 01/17/2013 - 00:38

In reply to ए अब्या ... by जेनी...

Permalink

उठाठेव ?

लाजणारणीनं समजून घ्यायचं असतं पूजा. नुस्त्या लाल ठिपक्याचीच चर्चा करायची तर जपानचा झेंडा पण फार चान दिसतो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 01/17/2013 - 00:43

In reply to उठाठेव ? by अभ्या..

Permalink

=))

अब्या मग तुझ्या बायकोच्या भ्रुमध्यावर जपानचा झेंडा फडवुन टाक बरं =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 01/17/2013 - 00:56

In reply to =)) by जेनी...

Permalink

:)

लवकरच. :) माझी बायको. बायको देखणा दिवा.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 01/17/2013 - 00:27

Permalink

ह्याअमेरिकेतल्या लोकांना

ह्याअमेरिकेतल्या लोकांना नसत्या चौकशा असतात हे खरय पण . मी एकदा मेहेंदी लावली होती हाताला .... तर एक अमेरिकन म्हणतो " टॅटु आहे का? " :-/ " ह्या टॅटु ला येतोय तो वास कसला आहे ? " " हा पर्मनन्ट आहे का?" :( अक्खि प्रोसीजर विथ संस्क्रुति समाधान सांगता सांगता पूरेवाट झाली :(
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 01/17/2013 - 01:12

In reply to ह्याअमेरिकेतल्या लोकांना by जेनी...

Permalink

अगं वास घेण्याइतकी जवळून

अगं वास घेण्याइतकी जवळून दाखवलीसच कशाला मेंदी? :(
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 01/17/2013 - 01:17

In reply to अगं वास घेण्याइतकी जवळून by शुचि

Permalink

अगं त्यानेच मला न विचारताच

अगं त्यानेच मला न विचारताच पटकन हात हातात घेतला आणि चटकन मेहेण्दीचा वास घेतला .... :-/
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 01/17/2013 - 01:21

In reply to अगं वास घेण्याइतकी जवळून by शुचि

Permalink

श्श्श्श्श !!!!! असे प्रश्न

श्श्श्श्श !!!!! असे प्रश्न चारचौघात विचारू नका. लोक संमं कडे तक्रार करतात. (वैयक्तिक) विमे
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 01/17/2013 - 00:37

Permalink

काजळ का घालतात?

काजळ का घालतात? तीट का लावतात? उटणं का फासतात? तेल का चोपडतात? . . . . .. कपडे का घालतात??? :P
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 01/17/2013 - 00:50

In reply to काजळ का घालतात? by कवितानागेश

Permalink

आचरट माऊ.

:D आचरट माऊ.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com