✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कुंकू का लावतात

श
शुचि यांनी
Wed, 01/16/2013 - 20:38  ·  लेख
लेख
रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतेच. अमेरीकेत खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "हिंदू स्त्रिया, कपाळावर कुंकू का लावतात?" मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "फॅशन" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेते. तर काहींना सांगते की "लग्नानंतर लाल कुंकू लावयच" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "पुरुष गंध का लावतात?" आणि मी निरुत्तरशी होते. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगते की योगशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, शरीरात अनेक अध्यात्मिक चक्रे असतात. पैकी ७ ही मुख्य चक्रे असून , पैकी एक आहे भ्रूमध्य चक्र ज्याला आज्ञा चक्र हेदेखील नाव आहे. या चक्राच्या देवी-देवतेची पूजा म्हणून अनेक जण गंध लावतात. आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
78745 वाचन

💬 प्रतिसाद (237)

प्रतिक्रिया

ंंंंंमस्त

विनायक प्रभू
Wed, 01/16/2013 - 20:50 नवीन
...लावल्यावर एक्दम भारी.
  • Log in or register to post comments

शुचिताई.... तुला तर सगळंच

मृगनयनी
Wed, 01/16/2013 - 21:55 नवीन
शुचिताई.... तुला तर सगळंच माहित आहे गं!.. सात चक्र, कुन्कवाने उद्दीपित करायचं आज्ञा चक्र!,.... तरीही विचारतेस्स? ;) आज्ञा चक्रातील एनर्जी वर ब्रह्मरन्ध्रांपर्यन्त जाऊन बुद्धी,शौर्य, धाडस प्रज्ज्वलित करण्यासाठी पुरुषांना भ्रूमध्यचक्रापासून वरती उभे गन्ध लावण्याची परम्परा आहे.......तेजस्वी योद्धा असणार्‍या स्त्रियांना देखील उभे गन्ध लावले जाते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मला कन्फर्म करायचं होतं.

शुचि
Wed, 01/16/2013 - 21:58 नवीन
मला कन्फर्म करायचं होतं. म्हटलं आपलं काही चूकतय का :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

बहुधा पूर्वीच्या काळी बाई

मृगनयनी
Wed, 01/16/2013 - 22:04 नवीन
बहुधा पूर्वीच्या काळी बाई विधवा झाल्यावर बहुधा तिची भ्रूमध्यात येणारी एनर्जी जास्त ऊद्दीपित होऊ नये म्हणून... तिचे कुन्कु पुसण्याची पद्धत रुढ झाली असावी!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

अतिशय माहितीपुर्ण प्रतिसाद...

धन्या
Wed, 01/16/2013 - 22:16 नवीन
केशवपन करण्यामागेही असंच काहीतरी कारण असेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

केशवपन करण्यामागेही असंच

मृगनयनी
Wed, 01/16/2013 - 23:03 नवीन
केशवपन करण्यामागेही असंच काहीतरी कारण असेल ना?
"केस" हे स्त्री'च्या सौन्दर्याचे प्रतीक मानले जाते. लांब केसांमुळे तिचे सौन्दर्य वाढते. तसेच तिची ऊर्जा केसांमध्ये साठवली जाते. त्यामुळे पूर्वीच्या काळी सुवासिनी / कुमारी यांना केस कापायची मुभा नव्हती. परन्तु विधवा स्त्रियांची ऊर्जा साठून त्या काय करणार? किन्वा केस वाढवून त्यांचे सौन्दर्य परपुरुषच बघणार किन्वा त्या विधवा बायका परपुरुषाकडे आकृष्ट होणार.. असा विचार त्यांच्या घरातल्या लोकांच्या मनात येई. असे काही होऊ नये.. म्हणून त्यांचे केशवपन करण्याची दुर्दैवी पद्धत प्रचलित होती. खरोखर ही दुर्दैवाची गोष्ट होती.. की पूर्वी लहान वयात किन्वा तरूण वयात विधवा झालेल्या बायकांना या अनिष्ट रूढींना सामोरे जावे लागे. पुनर्विवाहासही मान्यता नसल्याने अनेक इच्छा दडपून टाकाव्या लागत असत...त्या मानाने सध्या तरूण विधवांची स्थिती खुपच चान्गली आहे. किमान मृत नवर्‍याच्या प्रॉपर्टीमध्ये वाटा नको असलेल्या बायका निर्धोकपणे दुसरा कायदेशीर विवाह करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

वा !! अशा उत्तमोत्तम

शिल्पा ब
गुरुवार, 01/17/2013 - 23:34 नवीन
वा !! अशा उत्तमोत्तम संस्कृतीरक्षक धाग्यांचं अन तैंच्या अभ्यासाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अतिशय ज्ञानवर्धक माहीती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

नविन माहिती...

धन्या
Wed, 01/16/2013 - 22:17 नवीन
केशवपन करण्यामागेही असंच काहीतरी कारण असेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

बुद्धी,शौर्य, धाडस प्रज्ज्वलित करण्यासाठी .....

नेत्रेश
गुरुवार, 01/17/2013 - 03:33 नवीन
> "आज्ञा चक्रातील एनर्जी वर ब्रह्मरन्ध्रांपर्यन्त जाऊन बुद्धी,शौर्य, धाडस प्रज्ज्वलित करण्यासाठी पुरुषांना भ्रूमध्यचक्रापासून वरती उभे गन्ध लावण्याची परम्परा आहे.......तेजस्वी योद्धा असणार्‍या स्त्रियांना देखील उभे गन्ध लावले जाते!!" एवढे सगळे गंध लावणारे बुद्धीमान, शुरवीर, धाडसी, तेजस्वी पुरुष आधी मुघालांकडुन व नंतर ईंग्रजांकडुन का पराभुत होउन शेकडो वर्षे गुलामगिरीत गेले कुणास ठाउक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

वर्मी

केदार-मिसळपाव
गुरुवार, 01/17/2013 - 13:57 नवीन
वर्मी घाव घातलात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

पण

रणजित चितळे
Wed, 01/23/2013 - 13:56 नवीन
तेच आर्य, हिंदू, चंद्रगूप्त मौर्या पासून च्या लोकांनी सिंकंदर, सेल्यूकस, शक, हून, कूशाण, नाहपान, कासिम इत्यादी इन्व्हेडर्सना चित करुन ४००, ५०० वर्षापर्यंत आपला भारत एकसंध (जेव्हा रीपब्लिकची कल्पना अजून जन्माला आली नव्हती) ठेवला. आपण ह्या लोकांकडून पराभूत होण्यास पूष्कळ कारणे (व काही गंध, कुंकू, व अजून काही चूकीच्या परंपरांमूळे, चाली रुढींमुळे आपले ऐक्य राहू शकले नाही) झाली. अवांतर - जून्या सिव्हीलायझेशन मध्ये काही परंपरा आपण वापरतो, त्यानी एक त्या संस्कृतीला आयडेंटीटी येते. देश काल पात्रा मुळे ते बदलत जातात. हल्ली साडी नेसणे कमी झाले आहे. कुंकू लावणेही जवळ जवळ गेलेच आहे. ह्यात काही दुःख वाटायचे कारण नाही. आज न उद्या ते होणारच होते. काही परंपरा काही कारणाने येतात. मुसलमानात घुंघट घ्यायची परंपरा, किंवा काश्मिरी हिंदूं मध्ये लग्न झालेल्या स्त्रीया मंगळसुत्र कानात घालतात (त्यांचे वेगळ्या प्रकारचे असते वेगळेच दिसते व आपल्याला कसेतरीच वाटते पण त्यांच्या कडे पद्धत आहे). सरदार पगडी घालतात, आता घातली नाही तरी चालते. पण एक आयडेंटीटी येते त्यांनी शिख धर्माची. अशी बरीच उदाहरणे देता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

खिक्क...

अग्निकोल्हा
Wed, 01/16/2013 - 20:56 नवीन
अवांतर :- कुंक्वाखाली "देखो मगर प्यारसे" लिहल्यास जाणकार हरकत घेतील काय ?
  • Log in or register to post comments

हि हि हि

आनन्दिता
Wed, 01/16/2013 - 21:39 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

स्त्रीचा

लीलाधर
Wed, 01/16/2013 - 21:05 नवीन
सौभाग्य अलंकार आहे. कुंकुम तिलक हे स्त्रीचे सौभाग्य प्रतिक आहे. कुंकु हा दागिना स्त्रीच्या सर्व दागिन्यांपैकी बीन भोकाचा दागिना असून जगात त्याची किंमत कीतीहि केली तरी ती अपुरी होईल.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण

धन्या
Wed, 01/16/2013 - 21:12 नवीन
अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

धन्या ***** मारायचय का आज

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/16/2013 - 22:51 नवीन
=)) =)) धन्या ***** मारायचय का आज हसवुन हसवुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

'जगात त्याची किंमत कीतीहि

सूड
Wed, 01/16/2013 - 21:38 नवीन
'जगात त्याची किंमत कीतीहि केली तरी ती अपुरी होईल.' वरचं वाक्य वाचून पिच्चरमधली हिरवीण 'दो चुटकी शिंदूर की किम्मत...' वैगरे म्हणतेय असं वाटलं, असो. अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

"कीतीहि" वरील फ़ुल्लटोस का रे

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 01/17/2013 - 00:31 नवीन
"कीतीहि" वरील फ़ुल्लटोस का रे सोडलास ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हो का..?

मोदक
गुरुवार, 01/17/2013 - 00:38 नवीन
कुंकु हा दागिना स्त्रीच्या सर्व दागिन्यांपैकी बीन भोकाचा दागिना असून स्त्रीयांच्या नाकातील चमकी / मोरणी* बद्दल तुझे मत काय रे लीलाधरा..? (*मोरणी हा शब्द औरंगाबाद / बीड / विदर्भ साईडला वापरला जातो बहुदा - अधिक माहिती नाही!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

दागिने म्हणजे त्याना किमान १

५० फक्त
गुरुवार, 01/17/2013 - 08:22 नवीन
दागिने म्हणजे त्याना किमान १ तोळ्यापेक्षा जास्त असे अपेक्षित असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

माताय ! कोण बाई एका वेळी १

sagarpdy
गुरुवार, 01/17/2013 - 11:37 नवीन
माताय ! कोण बाई एका वेळी १ तोळा कुंकू लावते हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

राधे गुरु मां ला विचारा.. एक

इनिगोय
गुरुवार, 01/17/2013 - 18:02 नवीन
:)) राधे गुरु मां ला विचारा.. एक तोळा कुंकू नै पण एक तोळा मेकप नक्कीच असतो तिच्या चेहर्‍यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

या चक्राच्या देवी-देवतेची

रेवती
Wed, 01/16/2013 - 21:07 नवीन
या चक्राच्या देवी-देवतेची पूजा म्हणून अनेक जण गंध लावतात. मीही हेच ऐकले आहे.
  • Log in or register to post comments

बरोबर

दादा कोंडके
Wed, 01/16/2013 - 21:10 नवीन
तुम्ही दिलेलं कारण अगदी बरोबर आहे. तसेच पुर्वीच्या काळी कुंकू म्हणून कृत्रिम रंग न वापरता विशिष्ठ प्रदेशातली तांबडी माती वापरत. आजुबाजूच्या जडिबुटींमुळे त्यात अनेक औषधी गुणधर्म उतरलेले असायचे. तर पुरुष चंदनाचा वापर करीत. चंदन शितल असते हे आपण जाणताच. मस्तक हे सगळ्या इंद्रियांच्या जाणिवांचं केंद्रबिंदू आहे त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे शिवाय दोन्ही डोळ्याच्या मधोमध असल्याने कुंकू डोळ्यांसाठी लाभदायक आहे. १००-१५० वर्षांपुर्वी भारतीय बायका चश्मा लावित नसत! -(पिचुफेम) दादाजी तांबे
  • Log in or register to post comments

-(पिचुफेम) दादाजी तांबे

गणामास्तर
Wed, 01/16/2013 - 23:03 नवीन
-(पिचुफेम) दादाजी तांबे
हे म्हणजे लैचं खतरा. . :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

-(पिचुफेम) दादाजी तांबे

रेवती
Wed, 01/16/2013 - 23:32 नवीन
-(पिचुफेम) दादाजी तांबे खरंतर या शब्दांचा इथे मी निषेध करते. असे लिहून काय मिळते? यातून बालाजी तांब्यांबद्दल काय वाटते त्यापेक्षा वेगळा अर्थ निघतो व नको ती चर्चा होते. यातून कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी संताप येतोच. कोणत्याही स्त्रीस हे आवडणारे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

एस ओ आर डबल इ..

दादा कोंडके
Fri, 01/18/2013 - 01:55 नवीन
कोणत्याही स्त्रीस हे आवडणारे नाही.
ज्या दिवशी स्त्रिया असले विनोद असलेल्या प्रतिक्रिया पुरुषांप्रमाणेच खेळकरपणे घेतील आणि त्यांना 'कुंकू म्हणजेच स्त्रीचा खरा दागिना' टाईप प्रतिक्रिया आवडणार नाहीत तोच सुदीन. असो, तांबी तांबे सोडून कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

स्त्रिया आणि खेळकरपणा या दोन

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 13:00 नवीन
स्त्रिया आणि खेळकरपणा या दोन गोष्टी इन जण्रल कोसो दूर असतात एकमेकांपासून (काही अपवाद मान्य करून). आंजावरील एकूण चर्चेवरून लक्षात कसं आलं नाही हो तुमच्या म्हंतो मी , दादा-जी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हे बघा, स्त्रियांनी कुठले

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 01/19/2013 - 00:18 नवीन
हे बघा, स्त्रियांनी कुठले विनोद खेळकरपणे घ्यायचे आणि कुठले मनावर घ्यायचे ते सिमॉन बावरी (आधी आम्हाला फक्त राधा बावरी माहित होती) यांनी "द कंड सेक्स" मध्ये लिहिले आहे का ते आधी शोधू द्या. मग पुढील आक्रस्ताळेपणा करू आम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

एका पिचुवरून इतकी मारामारी,

आदूबाळ
Fri, 01/18/2013 - 00:06 नवीन
एका पिचुवरून इतकी मारामारी, तर इथे काय होत असेल: http://en.wikipedia.org/wiki/Machu_Picchu (हसून गडाबडा लोळायची स्मायली) अजून जमत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

(हसून गडाबडा लोळायची स्मायली)

किसन शिंदे
Fri, 01/18/2013 - 00:49 नवीन
(हसून गडाबडा लोळायची स्मायली)
= + )) इज इक्वल टू धीस =)) स्मायली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

धन्स!

आदूबाळ
Fri, 01/18/2013 - 01:08 नवीन
धन्स! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

पुरुष

लीलाधर
Wed, 01/16/2013 - 21:13 नवीन
गंध का लावतात: पुरुषाचा भालप्रदेश म्हणजे कपाळ त्या ठिकाणी परमेश्वराने ब्रह्मदेवाचे स्थान उत्पन्न केलेले आहे म्हणुन गंध हे अलंकाराचे प्रतिक म्हणुन लावले जाते.
  • Log in or register to post comments

प्रतिसादांबद्दल सर्वांचे

शुचि
Wed, 01/16/2013 - 21:34 नवीन
प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments

एव्हढया लवकर आभार ?

धन्या
Wed, 01/16/2013 - 21:54 नवीन
आता कुठे चर्चेला रंग भरतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

(No subject)

शुचि
Wed, 01/16/2013 - 21:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

द्विशतक

स्मिता.
Fri, 01/18/2013 - 20:08 नवीन
काही खास लिहिण्यासारखं नाहीये... फक्त धाग्याच्या द्विशतकाला हातभार लावतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

बाकी मंगळसूत्र, कुंकू

पिंपातला उंदीर
Wed, 01/16/2013 - 21:38 नवीन
बाकी मंगळसूत्र, कुंकू यासारखी प्रतीक स्त्रीयानच का बाळगावी लागतात? वरती कुणीतरी कुकवाच्या औषधी गुणधर्माच वर्णन केल आहे. हा फायदा पुरुषाना का नको? अशा पुरुश्‍द्वेषट्या धर्माचा जाहीर निषेध. : )
  • Log in or register to post comments

हो क्का ?

सूड
Wed, 01/16/2013 - 21:41 नवीन
हा फायदा पुरुषाना का नको? तुमच्यापासूनच सुरुवात करा मग. लग्न झालं असेल तर उद्यापास्नं मंगळसूत्र घालत चला आणि नसेल तर लग्नात स्वतःसाठीही एक बनवून घ्या, कसें ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

हिहिहि.

जेनी...
Wed, 01/16/2013 - 21:46 नवीन
हिहिहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

(No subject)

पिंपातला उंदीर
Wed, 01/16/2013 - 21:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अशा पुरुश्‍द्वेषट्या धर्माचा

आनन्दिता
Wed, 01/16/2013 - 21:50 नवीन
अशा पुरुश्‍द्वेषट्या धर्माचा जाहीर निषेध. : )
थांबा.. थांबा.. असा जोरदार निषेध करायच्या आधी समस्त पुरुषांना मंगळ्सुत्र, कुंकु या अवतारात इमॅजिन करा.. तुम्हाला, हा फायदा पुरुषाना का नको? याचे उत्तर मिळुन जाइल. सकाळी हापिसला जाताना , अगं माझं मंगळसुत्र सापडत नाहीये कुठे आजचा दिवस तुझं घालुन जातो हे ऐकायला कसं वाटेल नं??...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

आणि एखादा पैल्वान्टैप मुच्छड

जेनी...
Wed, 01/16/2013 - 21:55 नवीन
आणि एखादा पैल्वान्टैप मुच्छड असेल तर त्याला गोलगरगरित कुंकु आणि मंगळसुत्र त्यात हातात हिरव्या बांगड्या ... काय भन्नाट लूक असेल नै =)) " च्यायला ह्या ट्रेनच्या गर्दित रोज एक बांगडी पिचकते ... घामानं कुंकवाचा ओघळ गालावरुन मिश्यांपर्यंत पोचतोय ... नक्को नक्को झालाय हा पूरुषाचा जन्म :-/ " असं ऐकायला कसं वाटेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

कायचै काय पुजाबाई....

बाबा पाटील
गुरुवार, 01/17/2013 - 20:23 नवीन
यापेक्षा,दाढीमिश्यावाल्या पैलवानबाबाला नववा महिना चालु असुन तो अवघडलेल्या अवस्थेत एक एक पाउल उचलतोय ही कल्पना कसली भन्नाट वाटेल.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हि हि हि

जेनी...
गुरुवार, 01/17/2013 - 23:08 नवीन
हि हि हि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

???

तुषार काळभोर
Fri, 01/18/2013 - 15:42 नवीन
???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हे हे हे

पिंपातला उंदीर
Wed, 01/16/2013 - 22:00 नवीन
हे हे हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

हा हाहा हा मेलो

चेतन माने
गुरुवार, 01/17/2013 - 15:30 नवीन
हा हाहा हा मेलो :D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

कपाळाला कुंकू लावण्यामागे

इष्टुर फाकडा
Wed, 01/16/2013 - 21:45 नवीन
कपाळाला कुंकू लावण्यामागे अक्युप्रेशर चा संदर्भ आहे असे पूर्वी ऐकले होते. अवांतर: लीलाधर आणि ('पिचू' फेम !!!) दादाजी तांबे यांचे प्रतिसाद वाचून इतका हसतोय कि इतर लोक केवळ माझ्याकडे बघूनच खदाखदा हसायला लागले आहेत. बाकी 'पिचू' या शब्दाने किंवा त्याच्या संदर्भाने कायमच मला फास्स्कन हसायला लावले आहे. शतकातला सर्वात विनोदी शब्द आहे हा.
  • Log in or register to post comments

जस्ट लाईक इष्टुर फाकडा

जेनी...
Wed, 01/16/2013 - 21:48 नवीन
जस्ट लाईक इष्टुर फाकडा =)) मला या नावाचच हसु येतं :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा