Skip to main content

कुंकू का लावतात

लेखक शुचि यांनी बुधवार, 16/01/2013 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतेच. अमेरीकेत खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "हिंदू स्त्रिया, कपाळावर कुंकू का लावतात?" मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "फॅशन" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेते. तर काहींना सांगते की "लग्नानंतर लाल कुंकू लावयच" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "पुरुष गंध का लावतात?" आणि मी निरुत्तरशी होते. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगते की योगशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, शरीरात अनेक अध्यात्मिक चक्रे असतात. पैकी ७ ही मुख्य चक्रे असून , पैकी एक आहे भ्रूमध्य चक्र ज्याला आज्ञा चक्र हेदेखील नाव आहे. या चक्राच्या देवी-देवतेची पूजा म्हणून अनेक जण गंध लावतात. आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?

वाचने 79077
प्रतिक्रिया 237

प्रतिक्रिया

In reply to by विनायक प्रभू

शुचिताई.... तुला तर सगळंच माहित आहे गं!.. सात चक्र, कुन्कवाने उद्दीपित करायचं आज्ञा चक्र!,.... तरीही विचारतेस्स? ;) आज्ञा चक्रातील एनर्जी वर ब्रह्मरन्ध्रांपर्यन्त जाऊन बुद्धी,शौर्य, धाडस प्रज्ज्वलित करण्यासाठी पुरुषांना भ्रूमध्यचक्रापासून वरती उभे गन्ध लावण्याची परम्परा आहे.......तेजस्वी योद्धा असणार्‍या स्त्रियांना देखील उभे गन्ध लावले जाते!!

In reply to by मृगनयनी

बहुधा पूर्वीच्या काळी बाई विधवा झाल्यावर बहुधा तिची भ्रूमध्यात येणारी एनर्जी जास्त ऊद्दीपित होऊ नये म्हणून... तिचे कुन्कु पुसण्याची पद्धत रुढ झाली असावी!!!!

In reply to by धन्या

केशवपन करण्यामागेही असंच काहीतरी कारण असेल ना?
"केस" हे स्त्री'च्या सौन्दर्याचे प्रतीक मानले जाते. लांब केसांमुळे तिचे सौन्दर्य वाढते. तसेच तिची ऊर्जा केसांमध्ये साठवली जाते. त्यामुळे पूर्वीच्या काळी सुवासिनी / कुमारी यांना केस कापायची मुभा नव्हती. परन्तु विधवा स्त्रियांची ऊर्जा साठून त्या काय करणार? किन्वा केस वाढवून त्यांचे सौन्दर्य परपुरुषच बघणार किन्वा त्या विधवा बायका परपुरुषाकडे आकृष्ट होणार.. असा विचार त्यांच्या घरातल्या लोकांच्या मनात येई. असे काही होऊ नये.. म्हणून त्यांचे केशवपन करण्याची दुर्दैवी पद्धत प्रचलित होती. खरोखर ही दुर्दैवाची गोष्ट होती.. की पूर्वी लहान वयात किन्वा तरूण वयात विधवा झालेल्या बायकांना या अनिष्ट रूढींना सामोरे जावे लागे. पुनर्विवाहासही मान्यता नसल्याने अनेक इच्छा दडपून टाकाव्या लागत असत...त्या मानाने सध्या तरूण विधवांची स्थिती खुपच चान्गली आहे. किमान मृत नवर्‍याच्या प्रॉपर्टीमध्ये वाटा नको असलेल्या बायका निर्धोकपणे दुसरा कायदेशीर विवाह करू शकतात.

In reply to by मृगनयनी

वा !! अशा उत्तमोत्तम संस्कृतीरक्षक धाग्यांचं अन तैंच्या अभ्यासाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अतिशय ज्ञानवर्धक माहीती आहे.

In reply to by मृगनयनी

> "आज्ञा चक्रातील एनर्जी वर ब्रह्मरन्ध्रांपर्यन्त जाऊन बुद्धी,शौर्य, धाडस प्रज्ज्वलित करण्यासाठी पुरुषांना भ्रूमध्यचक्रापासून वरती उभे गन्ध लावण्याची परम्परा आहे.......तेजस्वी योद्धा असणार्‍या स्त्रियांना देखील उभे गन्ध लावले जाते!!" एवढे सगळे गंध लावणारे बुद्धीमान, शुरवीर, धाडसी, तेजस्वी पुरुष आधी मुघालांकडुन व नंतर ईंग्रजांकडुन का पराभुत होउन शेकडो वर्षे गुलामगिरीत गेले कुणास ठाउक...

In reply to by नेत्रेश

तेच आर्य, हिंदू, चंद्रगूप्त मौर्या पासून च्या लोकांनी सिंकंदर, सेल्यूकस, शक, हून, कूशाण, नाहपान, कासिम इत्यादी इन्व्हेडर्सना चित करुन ४००, ५०० वर्षापर्यंत आपला भारत एकसंध (जेव्हा रीपब्लिकची कल्पना अजून जन्माला आली नव्हती) ठेवला. आपण ह्या लोकांकडून पराभूत होण्यास पूष्कळ कारणे (व काही गंध, कुंकू, व अजून काही चूकीच्या परंपरांमूळे, चाली रुढींमुळे आपले ऐक्य राहू शकले नाही) झाली. अवांतर - जून्या सिव्हीलायझेशन मध्ये काही परंपरा आपण वापरतो, त्यानी एक त्या संस्कृतीला आयडेंटीटी येते. देश काल पात्रा मुळे ते बदलत जातात. हल्ली साडी नेसणे कमी झाले आहे. कुंकू लावणेही जवळ जवळ गेलेच आहे. ह्यात काही दुःख वाटायचे कारण नाही. आज न उद्या ते होणारच होते. काही परंपरा काही कारणाने येतात. मुसलमानात घुंघट घ्यायची परंपरा, किंवा काश्मिरी हिंदूं मध्ये लग्न झालेल्या स्त्रीया मंगळसुत्र कानात घालतात (त्यांचे वेगळ्या प्रकारचे असते वेगळेच दिसते व आपल्याला कसेतरीच वाटते पण त्यांच्या कडे पद्धत आहे). सरदार पगडी घालतात, आता घातली नाही तरी चालते. पण एक आयडेंटीटी येते त्यांनी शिख धर्माची. अशी बरीच उदाहरणे देता येतील.

अवांतर :- कुंक्वाखाली "देखो मगर प्यारसे" लिहल्यास जाणकार हरकत घेतील काय ?

सौभाग्य अलंकार आहे. कुंकुम तिलक हे स्त्रीचे सौभाग्य प्रतिक आहे. कुंकु हा दागिना स्त्रीच्या सर्व दागिन्यांपैकी बीन भोकाचा दागिना असून जगात त्याची किंमत कीतीहि केली तरी ती अपुरी होईल.

In reply to by लीलाधर

'जगात त्याची किंमत कीतीहि केली तरी ती अपुरी होईल.' वरचं वाक्य वाचून पिच्चरमधली हिरवीण 'दो चुटकी शिंदूर की किम्मत...' वैगरे म्हणतेय असं वाटलं, असो. अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण प्रतिसाद.

In reply to by लीलाधर

कुंकु हा दागिना स्त्रीच्या सर्व दागिन्यांपैकी बीन भोकाचा दागिना असून स्त्रीयांच्या नाकातील चमकी / मोरणी* बद्दल तुझे मत काय रे लीलाधरा..? (*मोरणी हा शब्द औरंगाबाद / बीड / विदर्भ साईडला वापरला जातो बहुदा - अधिक माहिती नाही!)

तुम्ही दिलेलं कारण अगदी बरोबर आहे. तसेच पुर्वीच्या काळी कुंकू म्हणून कृत्रिम रंग न वापरता विशिष्ठ प्रदेशातली तांबडी माती वापरत. आजुबाजूच्या जडिबुटींमुळे त्यात अनेक औषधी गुणधर्म उतरलेले असायचे. तर पुरुष चंदनाचा वापर करीत. चंदन शितल असते हे आपण जाणताच. मस्तक हे सगळ्या इंद्रियांच्या जाणिवांचं केंद्रबिंदू आहे त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे शिवाय दोन्ही डोळ्याच्या मधोमध असल्याने कुंकू डोळ्यांसाठी लाभदायक आहे. १००-१५० वर्षांपुर्वी भारतीय बायका चश्मा लावित नसत! -(पिचुफेम) दादाजी तांबे

In reply to by दादा कोंडके

-(पिचुफेम) दादाजी तांबे खरंतर या शब्दांचा इथे मी निषेध करते. असे लिहून काय मिळते? यातून बालाजी तांब्यांबद्दल काय वाटते त्यापेक्षा वेगळा अर्थ निघतो व नको ती चर्चा होते. यातून कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी संताप येतोच. कोणत्याही स्त्रीस हे आवडणारे नाही.

In reply to by रेवती

कोणत्याही स्त्रीस हे आवडणारे नाही.
ज्या दिवशी स्त्रिया असले विनोद असलेल्या प्रतिक्रिया पुरुषांप्रमाणेच खेळकरपणे घेतील आणि त्यांना 'कुंकू म्हणजेच स्त्रीचा खरा दागिना' टाईप प्रतिक्रिया आवडणार नाहीत तोच सुदीन. असो, तांबी तांबे सोडून कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.

In reply to by दादा कोंडके

स्त्रिया आणि खेळकरपणा या दोन गोष्टी इन जण्रल कोसो दूर असतात एकमेकांपासून (काही अपवाद मान्य करून). आंजावरील एकूण चर्चेवरून लक्षात कसं आलं नाही हो तुमच्या म्हंतो मी , दादा-जी?

In reply to by दादा कोंडके

हे बघा, स्त्रियांनी कुठले विनोद खेळकरपणे घ्यायचे आणि कुठले मनावर घ्यायचे ते सिमॉन बावरी (आधी आम्हाला फक्त राधा बावरी माहित होती) यांनी "द कंड सेक्स" मध्ये लिहिले आहे का ते आधी शोधू द्या. मग पुढील आक्रस्ताळेपणा करू आम्ही.

In reply to by दादा कोंडके

एका पिचुवरून इतकी मारामारी, तर इथे काय होत असेल: http://en.wikipedia.org/wiki/Machu_Picchu (हसून गडाबडा लोळायची स्मायली) अजून जमत नाही

गंध का लावतात: पुरुषाचा भालप्रदेश म्हणजे कपाळ त्या ठिकाणी परमेश्वराने ब्रह्मदेवाचे स्थान उत्पन्न केलेले आहे म्हणुन गंध हे अलंकाराचे प्रतिक म्हणुन लावले जाते.

बाकी मंगळसूत्र, कुंकू यासारखी प्रतीक स्त्रीयानच का बाळगावी लागतात? वरती कुणीतरी कुकवाच्या औषधी गुणधर्माच वर्णन केल आहे. हा फायदा पुरुषाना का नको? अशा पुरुश्‍द्वेषट्या धर्माचा जाहीर निषेध. : )

In reply to by पिंपातला उंदीर

हा फायदा पुरुषाना का नको? तुमच्यापासूनच सुरुवात करा मग. लग्न झालं असेल तर उद्यापास्नं मंगळसूत्र घालत चला आणि नसेल तर लग्नात स्वतःसाठीही एक बनवून घ्या, कसें ?

In reply to by पिंपातला उंदीर

अशा पुरुश्‍द्वेषट्या धर्माचा जाहीर निषेध. : )
थांबा.. थांबा.. असा जोरदार निषेध करायच्या आधी समस्त पुरुषांना मंगळ्सुत्र, कुंकु या अवतारात इमॅजिन करा.. तुम्हाला, हा फायदा पुरुषाना का नको? याचे उत्तर मिळुन जाइल. सकाळी हापिसला जाताना , अगं माझं मंगळसुत्र सापडत नाहीये कुठे आजचा दिवस तुझं घालुन जातो हे ऐकायला कसं वाटेल नं??...

In reply to by आनन्दिता

आणि एखादा पैल्वान्टैप मुच्छड असेल तर त्याला गोलगरगरित कुंकु आणि मंगळसुत्र त्यात हातात हिरव्या बांगड्या ... काय भन्नाट लूक असेल नै =)) " च्यायला ह्या ट्रेनच्या गर्दित रोज एक बांगडी पिचकते ... घामानं कुंकवाचा ओघळ गालावरुन मिश्यांपर्यंत पोचतोय ... नक्को नक्को झालाय हा पूरुषाचा जन्म :-/ " असं ऐकायला कसं वाटेल :)

In reply to by जेनी...

यापेक्षा,दाढीमिश्यावाल्या पैलवानबाबाला नववा महिना चालु असुन तो अवघडलेल्या अवस्थेत एक एक पाउल उचलतोय ही कल्पना कसली भन्नाट वाटेल.....

कपाळाला कुंकू लावण्यामागे अक्युप्रेशर चा संदर्भ आहे असे पूर्वी ऐकले होते. अवांतर: लीलाधर आणि ('पिचू' फेम !!!) दादाजी तांबे यांचे प्रतिसाद वाचून इतका हसतोय कि इतर लोक केवळ माझ्याकडे बघूनच खदाखदा हसायला लागले आहेत. बाकी 'पिचू' या शब्दाने किंवा त्याच्या संदर्भाने कायमच मला फास्स्कन हसायला लावले आहे. शतकातला सर्वात विनोदी शब्द आहे हा.

In reply to by इष्टुर फाकडा

एकदा कधीतरी बालाजी तांबेंना भगवदगीता कार्ड की तसलंच काहीतरी वापरुन ज्योतिष कथन करताना पाहीलं आणि त्यांचा धसकाच घेतला.

In reply to by धन्या

ही 'पिचू'ची काय भानगड आहे?
अरे ये पीएसपीओ नही जानता.. :) आता एक काम कर, रद्दीतले सगळे फॅमिली डॉक्टर उपसून सगळी प्रश्णोत्तरे पाठ कर. ;)

In reply to by गणामास्तर

किंवा इथे सांगण्यासारखे नसेल तर व्यनी कर. आमच्याकडे सकाळ येत नाही. जाहीरात टाईम्स येतो, कसल्याशा ऑफरमधला आहे म्हणून चालू आहे. शनिवार आणि रविवार लोकसत्ता घेतो. :)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

"तो शब्द" अधिक बालाजी तांबे असं गुगलून घ्या. बरंच ज्ञानवर्धन होईल! (माझंही झालं)

कुंकू हे स्त्रियांच्या मासिक धर्माचे प्रतीक आहे. कुंकवाचा लाल रंग हा रक्ताशी संबंधित असून त्याचा पुरषांचे शौर्य वगैरेंशी संबंध नसून मासिक पाळीशी संबंधित आहे. मासिक पाळीच्या आवर्ती चक्राप्रमाणे आवर्तन दर्शवणारा गोलाकार बिंदू म्हणजे कुंकू. ऋतुप्राप्ती झालेल्या स्त्रियाच कुंकू लावत असत. मात्र कुंकवाचा लग्नाशीही संबंध नव्हता. लग्नानंतर कुंकू लावतात असे आपणास दिसते कारण पूर्वीच्या काळी ऋतूप्राप्तीनंतर स्त्रियांचा विवाह लगेचच होत असे. ऍक्युप्रेशर, आयुर्वेदिक फायदा, मस्तक शांत होते वगैरे बालाजी पद्धतीचे निष्कर्ष निराधार आहेत. अनेक कुंकू लावणाऱ्या कडकलक्ष्मी बायका मला माहीत आहेत. कुंकवाने त्यांचे डोके थंड झाले नाही. याबाबत मनोगतावर की उपक्रमावर विस्ताराने चर्चा झाली होती. दुवा सापडल्यास देतो.

In reply to by आजानुकर्ण

कुंकु लालच का असतं ?? असा प्रश्न विचारणार होते आता मी :( पण मग वेगवेगळ्या रंगांच्या साडीवर लावायला वेगवेगळ्या रंगाची कुंकवं बनवायला हवी होती :( ... त्यामुळेच टिकलीशिवाय पर्याय नसतो :-/

In reply to by आजानुकर्ण

अनेक कुंकू लावणाऱ्या कडकलक्ष्मी बायका मला माहीत आहेत. कुंकवाने त्यांचे डोके थंड झाले नाही.
अगदी सहमत. त्यांचा तर कपाळभर मळवट अस्तो तरीपण. बादवे रंगाचे ठीक आहे हो पण आकाराचे काय? टिपका, गोल, लंबगोल, चिरी, मळवट या प्रत्येकामागे पण संस्कृती आहे का?

In reply to by आजानुकर्ण

या धाग्यावर गंभीर प्रतिसाद निरर्थक आहेत तरीही धार्ष्ट्य केले आहे. फार पूर्वी विश्वनाथ खैरे यांनी त्यांच्या एका लेखात असे मांडले होते की मुलगी ऋतुमती होऊ लागली आहे हे जाहीर होण्यासाठी ती कपाळावर,मुख्यत्वे भांगात लाल रंग भरीत असे.प्राचीन काळात मुलीला जोडीदार निवडण्याचा हक्क होता. ती मुलगी प्रणयाराधन करण्याजोगी झाली आहे हे इच्छुक पुरुषांस कळावे यासाठी ही खूण होती. खैर्‍यांनी तर ऋतु,रक्त,ह्या शब्दांमध्येही व्युत्पत्तिसाम्य मानले आहे. ठराविक कालावधीचे फेरे हा अर्थ पुढे सार्वत्रिक झाला आणि कालमापनासाठीसुद्धा वापरात आला.

In reply to by राही

या धाग्यावर गंभीर प्रतिसाद निरर्थक आहेत
कारण कळेल का? बाकी प्रतिसाद आवडला. नवीन माहीती दिल्याबद्दल, मी आजानुकर्ण यांची आणि आपली आभारी आहे.

In reply to by राही

या धाग्यावर गंभीर प्रतिसाद निरर्थक आहेत
पूर्णपणे सहमत. धागाकर्त्रीचा उद्देश साफ असेल, पण कैच्याकै प्रतिसादांचे प्रमाण बघता असेच म्हणावे लागते. बाकी एकेका फालतू शब्दाच्या वापरावरून संवेदना जागृत झाल्याचे पाहून मजा वाटली. (नेहमीप्रमाणेच)

एस.टी मधे घरचा वैद्य, १०० प्रश्नांची उत्तरे अशी पुस्तके विकायला येतात लोकं. त्यात असतं म्हणे या कुंकवाचं कारण.. आत्तापर्यंत पुस्तकांपेक्षा त्या विक्रेत्याच्या गेंगाण्या आवाजातील जाहिरातीतच जास्त इंटरेस्ट असल्यामुळे कधी वाचनं झालं नाही...

उपरोध (आयरनी) हाच की जेव्हा अमेरीकन्स हा प्रश्न विचारतात तेव्हा याचे उत्तर शोधावेसे वाटते, बाकी अंधानुकरण किंवा दबावाखाली अनुसरण :(

In reply to by शुचि

अमेरिकनांना काय गरज पडल्येय आमच्या बायकांच्या कुंकवाची उठाठेव करायची? तुमच्या बायका कुठेकुठे आणि कायकाय गोंदवून घेतात ते पहिल्यांदा बघा म्हणावं!!!! :)

In reply to by जेनी...

शुचि आणि पूजा, या एकदा आमच्या मालिबू बीचवर,प्रत्यक्षच दाखवतो!!! गोर्‍यांच्या गोंदणाला आरसा कशाला!!! :)