काय 'ध्यान' आहे!
लेखनप्रकार
सध्या 'ध्यान' या विषयावर सर्वत्र गोंधळ ( महामायेचा!) घातलेला आहे!
त्यात माझी थोडी भर टाकतेय, आणी नेहमीचे आळशी पणा चे विचार झटकून एक गमतीदार अनुभव लिहायला घेतेय.
मला मजा आली म्हणून 'गमतीदार'! (इतर कुणाला काय वाटते, त्याची मी पर्वाच करत नाही!)
तर मी काय सांगत होते, गेल्याच महिन्यात मी 'विपश्यना' चा दहा दिवसांचा कोर्स केला.
खूप वर्षांपासून जायचे होते, पण एकदम १० दिवस काढणे कठीण जात होते. पण जाऊन आल्यानंतर मात्र मी स्वत: ला खूप शिव्या दिल्या, जेव्हा वाटले होते तेंव्हाच यायला हवे होते, इतकी वर्षे फुकट घालवलीस तू माउ!
तर 'विपश्यना'......,
या ध्यान प्रकारात जी मुख्य गोष्ट करायची ती म्हणजे, अंतर्मुख होणे.
( थोडक्यात घरातला साठवलेला कचरा उपसून बघणे, बघायला लागला कि तो आपोआप स्वच्छ होतो, ...मग 'दिवाळी' येतेच पाठोपाठ!)
"आत बघणे, शरीरातील घडामोडी बघणे,कारण जे पिंडी तेच ब्रम्हांडी, त्याच त्या पाच महाभूतांपासून संपूर्ण विश्व बनले आहे, आपण त्याचाच भाग आहोत, त्यांचे नियम सगळीकडे सारखे. ते 'केवळ' बघायचे! निसर्ग, आयुष्य, स्वत: , इतर,.... सगळेच 'नक्की काय चाललंय' ते समजून घेण्यासाठी हे अंतर्मुख होणे असते...."
हे सगळे वाचून झाले होते माझे पूर्वीच. प्रत्यक्ष अनुभव घेताना इतके कठीण जाईल हे माहित नव्हते!
...तर कोर्स सुरु झाला. नियम सांगितले, 'आर्य मौन' पाळायचे. खाणाखुणा सुध्धा करायच्या नाहीत. काही गरज पडली तर धम्मसेविका असते, तिला काय ते सांगा. सकाळी ४ ते रात्री ९ पर्यंतचे शेड्युल सांगितले. एकंदरीत १२ तास ध्यान करायचे. ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! [१])
मला मौन पाळणे काही फार कठीण वाटले नाही. मला बाजूच्या अखंड पचर पचर करणार्या २ बायकांची मात्र काळजी वाटत होती. मला फक्त एकच मुख्य काळजी होती कि रात्री ना जेवताच, ९ वाजताच झोप कशी येणार? आणि पुन्हा ४ वाजता जाग कशी येणार? पण पहिल्या दिवशी तरी बिनघोर झोप लागली आणि महदाश्चर्य म्हणजे ४च्या आधीच ५ मिनिटे अपोआप जाग आली.
आता खरी परीक्षा सुरु.... डोळे मिटून, ना झोपता, मांडी घालून, चुळबुळ न करता आणि तेपण 'ध्यान' करत, दिवसातले १२ तास बसायचे कसे? ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! [२])
तरीसुद्धा मन घट्ट करून, शरीर सैल सोडून, मधूनच ताठ, मधूनच कुबड काढत 'ध्यानाला' सुरुवात केली. चुळबुळ सुरूच होती पहिला पूर्ण दिवस.
गुरुजी ( सत्यनारायण गोएंका गुरुजी) सांगत होते, श्वासाकडे लक्ष द्या, फक्त श्वास आता येतो, बाहेर जातो, तिकडे लक्ष द्या, फक्त नाकातल्या भागाकडे लक्ष द्या.
माझे कुठले लक्ष लागायला? आधीतर उगीच मोठ्ठा श्वास घेत होते आणि फुकटची थकून जात होते, नंतर आपोआप श्वासांनी माझ्या दंगामस्तीला कंटाळून त्याची 'नॉर्मल' लय सुरु केली. पाठ सारखी दुखत होती, पायाला मुंग्या येत होत्या, घामाच्या धारा गळत होत्या, अखंड चुळबुळ सुरु होती, कसले ध्यान अन कसले काय? ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! [३])
मन सतत कुठेतरी भलतीकडे धावत होते, उगीच नाही मनाला माकडाची उपमा देत, असा विचार आला. त्या विचाराबरोब्बर उपमा आठवला आणि उगीच भूक लागली. सकाळी काय खाल्ले, आता जेवायला काय असल वगरे विचारांवर पुन्हा मनातले माकड उडया मारायला लागले. घरी चांगली मजेत बसले होते, कुठून बुद्धी झाली आणि इथे आले हट्टानी! ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! [जप])
हळूहळू पाठ भयंकर दुखायला लागली, सायटिका, स्पोंडीलायटिस वगरै सगळे प्रकार डोके वर काढायला लागले. मधूनच मी डोळे उघडून इथे तिथे बघायचे (चीटिंग! चीटिंग!). माझ्या बाजूच्याच रांगेत एक पोनीटेलवाला दादा आणे एक काका होते. नेमके ते चांगलेच मुरलेले रीपिटर्स होते. एकदम ताठ आणी स्थिर बसायचे. मला खूप लाज वाटायची त्यांच्याकडे बघून! अशा वेळेस मी गपकन डोळे मिटून पुन्हा 'लढाई' सुरु करायचे.
एकीकडे गुरुजी आपले सारखे कळकळीनी सांगत होते, श्वासाकडे लक्ष द्या, मन इकडे तिकडे जाईलच, त्यांनी त्रासून जाऊ नका, माकडाकडे बघता तसे 'फक्त' बघा..... सर्व गोष्टी 'द्रष्टा' भावनेनी बघा, कर्ता/ भोक्ता भावनेनी बघू नका. जे काही होत आहे ते निसर्ग नियामांनुसारच घडत रहाते. तुम्ही फक्त 'बघा'.
मग अचानक लक्षात आले, कधीतरी काही वेळ श्वासाकडे लक्ष देताना, उगीच घाम वगरे येत नाहीये, मुन्ग्यापण येत नाहीत. म्हणजे मन स्थिर झाले कि शरीर आपोआपच स्थिर होतेय, त्यासाठी वेगळे काही प्रयत्नांचे पराकाष्ठा वगरै करायची गरज नाही. उगीच मारामारी करतेय मी स्वतःशीच.
गुरुजी सांगत होते, फक्त नाकाच्या आतल्या त्वचेकडे लक्ष द्या, तिथे श्वासाचे जाणीव "बघा".
अचानक हे सगळे जमायला लागले... हुश्श केले मी. ( अर्थात काही 'सेकंद' जमत होते, पुन्हा माकडचाळे सुरु!)
श्वास कसा जातो कसा येतो हे नीट कळायला लागले, आता जाण्याचा वेग बाहेर येण्याचा वेग, हे सगळे 'जाणवायला' सुरुवात झाली. आपण केवढी तरी हवा आता घेत असतो ते कळायला लागले.मला माहितच नाहते आपण 'इत्तकी' हवा आत घेतो ते. हळूहळू तेवढ्या भागातल्या जाणीवा इतक्या तीव्र झाल्या, कि आपण वास नक्की कुठून घेतो, त्या ग्रंथी देखील जाणवायला लागल्या. शिवाय कुंपणापलिकडच्या गाईम्हशींचा वास स्पष्ट यायला लागला. याची मात्र मला खूप गंमत वाटायला लागली.
ध्यान करता करता ( आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट म्हणतात तशा) अनेक गोष्टी आठवत होत्या,
पहिले ३ दिवस काय काय कुठले कुठले, साफ विसरलेले, लहानपणचं, असे काहिही आठवून अचानक रडायला वगरै यायचे. खूपच त्रास होत होता त्या विचारांचा. घरी परत पळून जावेसे वाटायचे. परत गुरुजींचे शब्द यायचे, 'फक्त' बघा. शांतपणे बघा.
त्यांच्या आश्वासक शब्दावर विश्वास ठेउन जरा धीर धरला, आणि ४थ्या दिवशीच्या 'अॅक्चुअल विपश्यना' ची वाट बघत राहिले.
(हल्लीची फ्याशन म्हणून) क्रमशः
वाचने
19505
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
डेंजर प्रकार आहे मंजे एकंदरीत .
सॉलीड ग माऊ ..... कसं जमलं
हा भाग चुळबुळ करत वाचला.आता
In reply to हा भाग चुळबुळ करत वाचला.आता by रेवती
+१
ह्म्म्म्म्म्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म्म्म्म्म्म by विलासराव
विलासराव जरुर कोर्स
In reply to विलासराव जरुर कोर्स by मितभाषी
भावश्या
In reply to भावश्या by विलासराव
नक्की
तुमचा अनुभव आम्हा सर्वांना
उत्सुकता..
धन्य आहेस माउ!
पुढचा भाग येऊद्या १-२ तासातच
In reply to पुढचा भाग येऊद्या १-२ तासातच by चाणक्य
http://www.dhamma.org/
मस्त लिहिलं आहे. क्रमशः
मार्गदर्शक लेख
माउताई तुझ्या उपम्या वरुन
सुंदर विषय.
चला एकुणच कुणीतरी अनुभवी
मला हि विपश्यनेचा कोर्स
In reply to मला हि विपश्यनेचा कोर्स by रुमानी
नक्की करा.
In reply to मला हि विपश्यनेचा कोर्स by रुमानी
http://courses.dhamma.org/en
मंडळी, हे दोन वर्षांपूर्वीचं
In reply to मंडळी, हे दोन वर्षांपूर्वीचं by इनिगोय
इनिगोय धन्यवाद.
मस्त!
आता मला खुप गिल्टी वाटतय..
In reply to आता मला खुप गिल्टी वाटतय.. by पिलीयन रायडर
सगळ्यांनाच पहिल्या दिवशी पळून
मी १९९८ मधे
बापरे.... मला खरच असे कोर्स
In reply to बापरे.... मला खरच असे कोर्स by Mrunalini
सहमत!
In reply to सहमत! by दादा कोंडके
अगदि खरे.. त्यामुळे इथे घर
In reply to सहमत! by दादा कोंडके
दादा, अहो, हे सगळं सगळ्यांनाच
In reply to दादा, अहो, हे सगळं सगळ्यांनाच by इनिगोय
हम्म...
In reply to हम्म... by दादा कोंडके
अध्यात्म म्हणून वेगळे काही
फारच छान लिहिले आहे! १२ तास
छान लिहीलयस
सुंदर लेख आहे!