अंतू बर्व्याचं अर्थशास्त्र - १
उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेटरात 'एकच प्याला' घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चीत्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतूशेटची मूर्ती दिसली. अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते. "कशी काय गर्दी ?" "ठीक आहे !" "प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात ?" "छे ! छे !" "अहो, छे छे म्हणून झिटकता काय पाल झाडल्यासारखे ? पहिला अंक ऐकला मी हितूनच. सिंधूच्या पार्ट्यात काय दम दिसत नाही तुमच्या. 'लागे हृदयीं हुरहुर' म्हणजे अगदीच पिचकवणी म्हटलंनीत. बालगंधर्वाचं ऐकलं होतंत काय ?" नेहेमीप्रमाणे शेवटला 'काय' उडवीत अंतूशेट म्हणाले. मॅनेजरही जरा उखडले. "आग्रह नाही आमचा तुम्ही नाटक बघायला चला असा." "गावात आग्रहाचे बोर्ड तर टांगले आहेत - आणि काल घरोघर जाहिरातीची अक्षतदेखील घेऊन हिंडत होते तुमचे ब्यांडवाले! अहो, एवीतेवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचं - चार आण्यात जमवा." "चार आण्यात बघायला काय डोंबा~याचा खेळ आहे काय ?" "अहो तो बरा ! आधी खेळ तो दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसं करा. पुढलं 'कशि या त्यजूं पदाला' जमलं फक्कड तर थाळीत चार आणे आणखी टाकीन." बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर उखडला. तेवढ्यात अंतूशेटची नजर माझ्याकडे वळली. "व्यक्ती आणि वल्ली" मधून साभार‘फुकट ते पौष्टिक’ हा मानवी स्वभाव आहे. पण ‘फुकट’ सर्वार्थाने ‘फुकट’ नसतं आणि ते ‘पौष्टिक’ क्वचितच असतं हे चार झटके खाल्ल्यानंतर आपल्याला उमजतं. तरीही कुठलीही वस्तू फुकट (किंवा कमी किमतीत) मिळवण्याचा आपला हव्यास सुटत नाही. (‘बिग बाजारा’त ‘सबसे सस्ते चार दिन’ असले, की तोबा गर्दी उसळते; गब्बर पगार असणारे लोकसुद्धा ‘डॉमिनोज’ची सवलतीची कुपन्स जपून ठेवतात.) हा झगडा मूलभूत आहे – मूल्य (value) विरुद्ध किंमत (price). माणसाचा असा प्रयत्न असतो, की कमीत कमी किंमत मोजून जास्तीत जास्त मूल्य मिळवायचं! ‘फुकट ते पौष्टिक’ ही त्यातलं एक टोक – शून्य किंमत, शून्यापेक्षा जास्त मूल्य! अंतूशेटचा अर्थशास्त्रीय विचार पहा: नाटक कंपनीने हा प्रयोग करण्यासाठी संपूर्ण खर्च केलेलाच आहे. जी काय तिकीटविक्री व्हायची ती झालेलीच आहे. पण ’प्लान’ मोकळाच आहे. एक अंक झाल्याने अजून काही तिकीटविक्री व्हायची शक्यताही संपलेली आहे. अशा वेळेला मिळणारं कोणतंही उत्पन्न नाटक कंपनीच्या मॅनेजरच्या दृष्टीने ‘वाढीव उत्पन्न’ (marginal income) आहे. यात नाटक कंपनीसाठी काही ‘वाढीव खर्च’ (marginal cost) नाही, कारण एवीतेवी रिकाम्या खुर्च्यांनाच नाटक दाखवायचं! यात फायदा दोन्ही बाजूंचा झाला असता – अंतूशेटना अर्ध्या तिकिटात नाटक पहायला मिळालं असतं, आणि नाटक कंपनीला चार आण्यांचं वाढीव उत्पन्न मिळालं असतं. मॅनेजरचं अर्थशास्त्र म्हणा (किंवा व्यवहारज्ञान म्हणा) कच्चंच दिसतंय. अंतूशेटची ऑफर त्याने नाकारली. काही व्यवसायच असे असतात, की ज्यात बहुतांशी खर्च हे ‘अचल’ असतात (fixed costs). नाटक हा त्यातलाच एक व्यवसाय – नाटकाचा संच, नेपथ्य, प्रवास असे अनेक खर्च अचल आहेत, पण प्रयोगावेळी तिकीटविक्री होईलच याची शाश्वती नाही. प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ झाला, तर निर्मात्याला प्रचंड फायदा, नाहीतर प्रचंड तोटा. नाटकधंद्यात जोखीम (risk) असते ती याचीच! ज्या व्यवसायात अचल खर्च (fixed costs) जास्त असतील आणि विक्री (sale) होत नाही, तिथे अंतूशेटची ही कल्पना ग्राहकाचा फायदा करून देईल! जे लोक नियमितपणे विमानप्रवास करतात त्यांना ही कल्पना राबवता येईल. समजा, विमान सुटायला पंधरा मिनिटं उरलेली आहेत आणि विमानात पाच जागा शिल्लक आहेत. एक प्रवासी येतो, म्हणतो, मला त्यातली एक जागा द्या, मी तुम्हाला पाचशे रुपये देतो. विमान कंपनीच्या दृष्टीने `अर्थशास्त्रीय वर्तणूक’ (economic behaviour) काय आहे? विमान कंपनी काय विचार करेल पहा: त्या सीटचं भाडं खरं तर दोन हजार रुपये आहे, आणि त्यावर आपण एक हजार रुपये खर्च केलेला आहे. पंधराच मिनिटं हातात आहेत. जर या ग्राहकाला नाकारलं, तर विक्री तर रुपयाची होणार नाही, पण हजार रुपयांचा बांबू बसेल! त्यापेक्षा याला विमानात घेऊ या – पाचशे तर पाचशे! हजार रुपयांच्या खर्चातले पाचशे तर सुटले – चोराच्या हातची लंगोटी! अंतूशेटचं अर्थशास्त्र असं आहे, मंडळी – मनोरंजनात शहाणपण, स्वार्थात परमार्थ! आम के आम और गुठलियों के दाम!
In reply to मजा आली. by अमोल खरे
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद, अमोल! by आदूबाळ
In reply to कोल्हापूरच्या मार्केट by अनुप कुलकर्णी
त्या मॅनेजरनं अन्तू बर्व्याना तिकीट नाकारले त्याचे तो सोकावू नये हेच कारण असावे!हे मात्र अगदी बरोबर! यातसुद्धा एक गोम आहे. अंतूशेटना पूर्ण तिकीट घेऊन नाटक पहायची सवय जरी लावली, तरी पुढच्या वेळेस हीच कंपनी नाटक घेऊन रत्नांगीस येईल कशावरून? म्हणजे, मॅनेजरच्या त्यागाचा फायदा दुस~याच नाटक कंपनीला व्ह्यायचा! पण असं जरी असलं तरी संपूर्ण नाटकधंद्याचा विचार करता हे बरोबर आहे. याला गेम थिअरी मध्ये coopitition (cooperation + competition) म्हणतात. विना सहकार....
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद, अनुप! by आदूबाळ
In reply to दहावी मराठीच्या पाठ्यपुस्तकात एका टोमाटो शेतक~याचा धडा होता by तुषार काळभोर
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद, अनुप! by आदूबाळ
In reply to छान... by चिगो
In reply to आदुबाळ लेख अगदी फर्मास. पण मग by स्पंदना
In reply to आदुबाळ लेख अगदी फर्मास. पण मग by स्पंदना
आय हेट एनी पर्सन हु डिसिव्हज फार्मर्स.पूर्ण सहमत!!!!!!!!!!
In reply to आदुबाळ लेख अगदी फर्मास. पण मग by स्पंदना
त्याच रुपांतर आता मला चायनिज न आवडण्यात झालय.आणि असं नका करू हो! पुलंच्याच एका लेखात पी. जी. वुडहाऊसची आठवण सांगितली आहे. दुस~या महायुद्धात वुडहाउसला नाझींनी बंदिवासात ठेवलं होतं. नंतर त्याला एका पत्रकाराने विचारलं, तुला जर्मन लोकांचा तिटकारा असेल ना? त्यावर वुडहाऊस म्हणाला "मी घाऊक प्रमाणात द्वेष करत नाही!" (I don't hate in plurals!)
In reply to अपर्णाताई, प्रतिसादाबद्दल by आदूबाळ
In reply to शेवटाला स्वस्त देण्याची by गवि
In reply to लहानपणापासुन ' हे पुल ' by ५० फक्त
In reply to या वरून आठवले... by विकास
In reply to मानवी स्वभाव... by योगप्रभू
व्यवहारी वृत्ती आणि काटकसरीपणा हा उपयुक्त असतोच, पण बर्याचदा त्यातून हलकट आणि कोडगेपणाकडे प्रवास सुरु होतो. जे बघितले त्यातून मानवी स्वभावातील कल्पकतेचे कौतुक करावे, की हलकटपणाचा तिरस्कार करावा, हाच गुंता झाला. त्याच्या व्यवसायाचे रहस्य 'कल्पक हलकटपणा' होते. खरं तर घाऊक खरेदीचा फायदा उठवून दर्जेदार जेवण देणे अशक्य नसते, पण कच्च्या मालाच्या किंमती अत्यंत कमी राखून जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी 'स्वस्त-फुकट-खराब-भेसळ' या दिशेने प्रवास होत असावा.ही वाक्ये लै आवडली.
In reply to थोडी अधिकची भर.... by नितिन थत्ते
In reply to +१ by कॅप्टन जॅक स्पॅरो
छान..................