✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना

स — सांजसंध्या, Sat, 12/08/2012 - 13:48
धुंदीत जर कळाले, तारुण्य या कळ्यांना सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना गंधाळत्या नशेला, शृंगारुनी गुलाबी देऊन कोण गेले, गुलकंद पाकळ्यांना हे कायदे निजामी, का लावता फुलांना भेदी कुणी पहारे, टाळून सापळ्यांना अंधार दाटताना, रंगून सांज यावी थांबावयास सांगा, डोळ्यांत सावल्यांना ह्या रेशमी क्षणांनी. सृजनास जाग यावी कविता हळू फुलाव्या, अनुभूतल्या मळ्यांना संध्या

प्रतिक्रिया द्या
6445 वाचन

💬 प्रतिसाद (24)

तरल कविता... छान..

ज्ञानराम
Sat, 12/08/2012 - 14:12 नवीन
तरल कविता... छान..
  • Log in or register to post comments

वा दिल गार्डन गार्डन हो गया..

अविनाशकुलकर्णी
Sat, 12/08/2012 - 14:23 नवीन
वा दिल गार्डन गार्डन हो गया.. मस्त
  • Log in or register to post comments

हम्म

प्रचेतस
Sat, 12/08/2012 - 17:41 नवीन
कविता आवडली नाही. तुझ्या कविता हळूहळू टाइपकास्ट व्हायला लागल्यात असे वाटतेय.
  • Log in or register to post comments

???

मोदक
Sat, 12/08/2012 - 18:04 नवीन
श्री वल्ली, तुम्हाला कवितेतले काय आवडले नाही हे सांगितले तर नक्की काय सुधारणा अपेक्षीत आहे हे सर्वांनाच कळेल. कितीही म्हटले तरी काव्यप्रकटीकरण प्रक्रियेमध्ये कवि / कवयित्रीने काहीतरी विचार केलेला असतो, तो विचार जर आपणांस कळाला असेल तर कविता जास्ती चांगल्या पद्धतीने पोहोचू शकते. किमान त्या विचाराचा उल्लेख आला असता तरी ठीक होते, अन्यथा आपल्या प्रतिसादाचे "मताची एक पिंक" या पलिकडे मूल्य काहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कवितेतला टाइपकास्टपणा आवडला

प्रचेतस
Sat, 12/08/2012 - 18:08 नवीन
कवितेतला टाइपकास्टपणा आवडला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सहमत पण जरा फरकाने

चौकटराजा
Sat, 12/08/2012 - 18:08 नवीन
मी सहमत आहे. संध्याबाई , समजा गजल टाईपचेच काम करावयाचे आहे तरीही वेगवेगळे विषय हाताळा ना जरा ! उदा म्हणून सांगतो . ओ पी नय्यर तसे टाईपकास्ट संगीतकार होते. तरीही रविद्र नाथांच्या मूळ एकला चलो रे या रचनेवर कवि प्रदीप यानी केलेल्या चल अकेला चल अकेला ला चाल लावताना त्यानी आपले नय्यरपण त्यात सोडले नाही. तुम्हाला गजल या आकृतीबंध अतिप्रिय असल्यास आपले गजलीपण कायम ठेवून विषयाची विविधता आणता येईल ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:अओ:

सांजसंध्या
Sun, 12/09/2012 - 07:16 नवीन
:अओ: चौराकाका, इतर विषयांवरच्या कविता पोष्टल्यात ना मी :) चुकून राहील्या असतील पहायच्या. हे आनंदकंद वृत्त आहे. यात लाखो गीतं लिहीली गेली आहेत. कवितेबद्दल काही सूचना असतील तर अवश्य कराव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

वन मोअर बेस्ट..........

अत्रुप्त आत्मा
Sat, 12/08/2012 - 18:03 नवीन
वन मोअर बेस्ट.......... :-) प्रत्येक कडवं म्हणजे एकेक रूपक,पण विषयसूत्र एकच....त्यामुळे ही रचना गजर्‍यासारखी टवटवित झालेली आहे.
  • Log in or register to post comments

संध्या .....

जेनी...
Sat, 12/08/2012 - 21:10 नवीन
संध्या ..... :)
  • Log in or register to post comments

सुरेख ! ! !

निरन्जन वहालेकर
Sat, 12/08/2012 - 22:31 नवीन
व्वा ! क्या बात है !! सुन्दर ! ! !
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार.

सांजसंध्या
Sun, 12/09/2012 - 07:16 नवीन
सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments

सुरेख मला तर आवड्ली बै कविता

पियुशा
Sun, 12/09/2012 - 13:10 नवीन
सुरेख मला तर आवड्ली बै कविता गालाला खळी पडणारी पियु ;)
  • Log in or register to post comments

शंका ???

वपाडाव
गुरुवार, 12/20/2012 - 13:08 नवीन
खळ्या पाडायला BEML ला बोलावुन घेतलं होतं का... किती दिवस लागले??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

आयला परत कच्चा माल

सुहास..
Mon, 12/10/2012 - 10:13 नवीन
आयला परत कच्चा माल ;)
  • Log in or register to post comments

-

वपाडाव
गुरुवार, 12/20/2012 - 13:10 नवीन
का रे, सध्या १५ चा आहे का? मग थांब की एखाद xxxx ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

अगदी नाजुक साजुक....गोड...

जयवी
Mon, 12/10/2012 - 11:57 नवीन
अगदी नाजुक साजुक....गोड... कविता :)
  • Log in or register to post comments

मला सुद्धा खुप आवडली

अनिल तापकीर
गुरुवार, 12/13/2012 - 10:10 नवीन
मला सुद्धा खुप आवडली
  • Log in or register to post comments

मस्त

सु.द.मोरे
Wed, 12/19/2012 - 15:52 नवीन
मला तर आवडली बरका....
  • Log in or register to post comments

कविता अजून वाचली नाही पण...

सुबक ठेंगणी
गुरुवार, 12/20/2012 - 12:45 नवीन
गालातल्या खळ्या? की गालावरच्या खळ्या? माफ करा पण "प्रथमग्रासे मक्षिकापातः" असं वाटलं.
  • Log in or register to post comments

सांभाळा की सांभाळ ??

चौकटराजा
गुरुवार, 12/20/2012 - 17:02 नवीन
खळया हे अनेकवचन आहे अनेकवचनांचे आज्ञार्थी एकवचनी कसे काय बॉ ? अत: मला वाटते सांभाळा का म्हणावे गालातल्या खळ्यांना असे असावे की नाही ?
  • Log in or register to post comments

सो...

सुबक ठेंगणी
गुरुवार, 12/20/2012 - 17:35 नवीन
अखेर तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कविता वाचलीच!:) उत्तर एकः सांभाळा हा शब्द गझल वृत्तात बसत नाही. उत्तर दोनः खळ्यांच्या/गालाच्या मालकाला/मालकिणीला कवी एकेरीत संबोधतो आहे. (जर कळ्यांना धुंदीत तारुण्याचा अर्थ कळाला तर "गालावरच्या खळ्यांना सांभाळ हो तू" असं का बरं म्हणावं कुणी कुणाला?) अ‍ॅम आय राईट कवी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कविता वाचता ...

चौकटराजा
Fri, 12/21/2012 - 09:22 नवीन
कविता वाचता असे वाटत नाही की पूर्ण कविता खळ्यांच्या मालकिणीला उद्देशून लिहिली आहे . उद्देशून कविता साठी ने मजसि ने ही सावरकरांची कविता समोर आणावी दुसरे असे की सांभाळा हे वृत्तात बसत नसेल तर सांभाळ वापरा हा दृषटीकोन फारच चुकीचा म्हणावा लागेल कारण कवितेत अर्थ महत्वाचा ( खरे तर अर्थ हाच साहित्याचा- भाषेचा मूल हेतू आहे ).आता वृत्ताला ही मान व अर्थालाही याचे उदाहरण देतो. त्यासाठी मराठी काव्यात संस्कुत विभक्तिचा कसा चपखल उपयोग केला आहे पहा. रामे धनुष्य मोडीले , नाते सीतेसी जोडीले . यात रामे हा शब्द मराठीत रामाने असे वापरला पाहिजे पण " रामाने हा शब्द वृत्तात बसत नाही म्हणून रामे या शब्दाचा वापर केलेला दिसतो. हंसे मुक्ता नेली ही काव्यपंक्ति अशीच आहे. वृत्तात बसावे या साठी गीतरामायणात रामासाठी श्री, राम, राघव , रामचंद्र , रघुनंदन, पतितपावन, रघुकुलदीपक अशा विविध अक्षरी शब्दांचा वापर गदिमानी केला होता. ही त्यांची कल्पकताच त्याना शब्दप्रभू ही उपाधि देवून जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

येस्स

सांजसंध्या
Wed, 01/02/2013 - 20:28 नवीन
येस्स :) थँक्स सुबक ठेंगणी. उशिराने पाहिल्याबद्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

चौरा

इरसाल
गुरुवार, 12/20/2012 - 17:09 नवीन
गुराख्याला : "सांभाळ आपल्या गायींना" ( त्याला अरेतुरे करु शकतो) मालकाला: " सांभाळा आपल्या दिवट्यांना/गायींना " वगैरे वगैरे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा