Skip to main content

पंख

लेखक ज्ञानराम यांनी गुरुवार, 29/11/2012 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मि पसरून पंख माझे , देईन सखे उबारा.. हा पावसाचा इशारा..अन धुंद जरी वारा.. तु असताच सोबत , नाही तमा ग कसली.. बेभान बरसूदे ह्याला , तुझ भिती कसली ग असली.. क्षण क्षण होऊदे चिंब , अन गात्रात मुरुदे थेंब. भिजल्या पंखात माझ्या , जरा मिटवून घे ते अंग.. थांबेल हा वेडा , तू धिर जरासा घे ग. सर ओसरेल आता , चोचीत थेंब घे ग. ना येइल कधी हा क्षण , परतून पुन्हा आयुष्यात, बघ थांबेल पाऊस आता , मग परतूया घरट्यात..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3439
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

काव्य बरे आहे पण... मि , तु , तुझ, भिती, धिर आ रा रा ह्ये शुद्धलेखन हाय का राव ? कुटं शिकला ?

प्रतिसादा बद्दल तुम्हा सर्वांचे आभार , माझ शुदधलेखन खूप कच्च आहे, पुढल्या वेळी शुदधलेखनाच्या चूकांवर लक्ष नक्की देईन.

In reply to by ज्ञानराम

http://www.google.com/transliterate/indic/Marathi हा दुवा वापरून सराव करा. दोन-चार दिवसांत सवय होते.. शिवाय कच्चं,गं,कुठलं हे व या प्रकारचे शब्द पण बरोबर येतात.

In reply to by ज्ञानराम

माझ शुदधलेखन खूप कच्च आहे
असु दे की. शब्दातील भाव आणि शब्दांचे अर्थ महत्वाचे बघा. बाकी शुद्धलेखन वैग्रेला मारा फाट्यावर आणि मनमुराद लिहा. शुलेखन होईल हळुहळू बरे.

चित्र आधी पाहिले आणि नंतर कविता. दोन्ही ही मस्तच एकदम.
मि पसरून पंख माझे , देईन सखे उबारा.. हा पावसाचा इशारा..अन धुंद जरी वारा..
अतिशय सुंदर सुरुवात.
भिजल्या पंखात माझ्या , जरा मिटवून घे ते अंग.. थांबेल हा वेडा , तू धिर जरासा घे ग. ना येइल कधी हा क्षण , परतून पुन्हा आयुष्यात,
मस्त ओळी. ------------ आपल्या जोडीदाराप्रति असलेली प्रेमाची उब आणि घरट्याचे अस्तित्वात आलेले स्वप्न संभाळण्याची अनामिक हुरहुर शब्दातुन खुप छान व्यक्त झालेली आहे.. ---------------