मि पसरून पंख माझे , देईन सखे उबारा..
हा पावसाचा इशारा..अन धुंद जरी वारा..
तु असताच सोबत , नाही तमा ग कसली..
बेभान बरसूदे ह्याला , तुझ भिती कसली ग असली..
क्षण क्षण होऊदे चिंब , अन गात्रात मुरुदे थेंब.
भिजल्या पंखात माझ्या , जरा मिटवून घे ते अंग..
थांबेल हा वेडा , तू धिर जरासा घे ग.
सर ओसरेल आता , चोचीत थेंब घे ग.
ना येइल कधी हा क्षण , परतून पुन्हा आयुष्यात,
बघ थांबेल पाऊस आता , मग परतूया घरट्यात..
काव्य बरे आहे पण...
मि , तु , तुझ, भिती, धिर आ रा रा ह्ये शुद्धलेखन हाय का राव ? कुटं शिकला ?
खुप सुंदर
-१
अगदी बरोबर
प्रतिसादा बद्दल तुम्हा सर्वांचे आभार , माझ शुदधलेखन खूप कच्च आहे, पुढल्या वेळी शुदधलेखनाच्या चूकांवर लक्ष नक्की देईन.
http://www.google.com/transliterate/indic/Marathi
हा दुवा वापरून सराव करा. दोन-चार दिवसांत सवय होते..
शिवाय कच्चं,गं,कुठलं हे व या प्रकारचे शब्द पण बरोबर येतात.
माझ शुदधलेखन खूप कच्च आहेअसु दे की. शब्दातील भाव आणि शब्दांचे अर्थ महत्वाचे बघा. बाकी शुद्धलेखन वैग्रेला मारा फाट्यावर आणि मनमुराद लिहा. शुलेखन होईल हळुहळू बरे.
फोटु एकदम बेस्ट
धन्यवाद पिऊ
चित्र आधी पाहिले आणि नंतर कविता.
दोन्ही ही मस्तच एकदम.
मि पसरून पंख माझे , देईन सखे उबारा.. हा पावसाचा इशारा..अन धुंद जरी वारा..अतिशय सुंदर सुरुवात.
भिजल्या पंखात माझ्या , जरा मिटवून घे ते अंग.. थांबेल हा वेडा , तू धिर जरासा घे ग. ना येइल कधी हा क्षण , परतून पुन्हा आयुष्यात,मस्त ओळी. ------------ आपल्या जोडीदाराप्रति असलेली प्रेमाची उब आणि घरट्याचे अस्तित्वात आलेले स्वप्न संभाळण्याची अनामिक हुरहुर शब्दातुन खुप छान व्यक्त झालेली आहे.. ---------------
अरेच्या ! फोटो मी आधी पाहिलाच नव्हता.
मस्त आहे. अन कवितापण. तेवढं शुद्धलेखन एक सोडलं तर...
मला ़कविता मनापासुन आवडली .
अर्थ खुप सुंदर वाटला .
प्रतिसादा बद्दल ..धन्यवाद पूजा , स्नेहांकिता , गणेशा ... :)
धन्यवाद परा..:)
ठीक आहे.