खरच कधी कधी कळत नाही की माणसाच अस अचानकपणे जाण मनाला ऐव्ह्ढ वेदना का देत ते? जाणारातर सदेह ह्या जगातुन गेलेला असतो पण मागे राहीलेल्या ईतरांसाठी मात्र त्याच जाण अतोनात दु:ख देणार असत. त्यातही मरणार्या माणसाने आत्महत्या केली असेल तर मग मात्र त्याच्या नातलगांसाठी मात्र ते जिवंतपणी तीव्र वेदनादायी असत. काही कुटुंबासाठीतर जिवंतपणी मरणयातनाच म्हणा ना. खर तर मनुष्य आत्महत्या का करतो? ह्यामागे कितीतरी वेगवेगळी कारण असु शकतात. घरगुती, व्यावसायिक , प्रेमभंग , अजुनही बरीच काही.खर तर त्रासाला कंटाळुन किंवा अपयशाला घाबरुन जेव्हा मनुष्य अशी वाट अनुसरतो तेव्हा त्याने जगातल्या सगळ्यात मोठ्या त्रासावर किंवा भितीवर विजय मिळवलेला असतो. त्याने मरणाच्या भितीवर विजय मिळवलेला असतो तेव्हाच त्याने आत्महत्येच टोकाच पाऊल उचलेल असत हे तो विसरतो. जर त्याने जगातल्या सगळ्यात मोठ्या भितीवर विजय मिळवलेला असतो ज्या मरणाच्या भितीच भूत देव दानव ,मनुष्य व ईतर प्रजाती ह्या सदैव मानगुटिवर घेऊन जगत असतात तर मग परत ऐकदा जगण्याचा प्रयत्न तर करुन बघावा अस त्याना का वाटत नाही.
ख्रर तर कोणाच्याही ह्या जगातुन जाण्यातुन काही लोक जगायच थांबत नाहित. पण त्यांच मरणाला कवटाळण तेही जर आत्महत्ये सारख्या वाटेने असेल तर नंतर मागे राहणार्या त्त्याच्या नातलगाना मनावर एक भळभळती जखम घेउनच जगाव लागत हेही तितकच खर आहे.
खरच आत्महत्येचा विचार करणार्या लोकांना अस का वाटु शकत नाही की जर त्यानी जगातल्या सगळ्यात मोठ्या त्रासावर विजय मिळवला आहे तर मग जिवनात येणार्या त्रासाला भितीला किंवा अपयशाला ऐव्हढ कशाला घाबरायच?
आत्महत्या करणार्या किंवा करायचा विचार करणार्या लो़कांना स्वताच्या आईने त्याना जन्म देताना काढलेल्या मरणप्राय वेदनेचा विसर कसा काय पडु शकतो?
आत्महत्या हा कुठल्याच त्रासावर ऊपाय असु शकत नाही. तो करण्याचा विचार करण्याआधी त्या लोकांनी त्यांच्या मातेच्या त्याना जन्म देताना काढलेल्या मरणप्राय वेदनांचा ऐकदातरी विचार करावा.
बस ऐव्हढच. आत्महत्येच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटना वाचून मन सुन्न व दु:खी झाल होत. मनातल बोलाव सांगाव म्हणुन हा लेख प्रपंच.
वाचन संख्या
3413
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्महत्येचा विचाराची मूळ प्रेरणा
चौरा अत्यंत महत्त्वाचा विषय
तुम्ही इतक्या साहसानं
'Fear of unknown' ही जीवनात सदैव असलेली अनिश्चितता आहे
In reply to तुम्ही इतक्या साहसानं by सोत्रि
छे छे !
In reply to 'Fear of unknown' ही जीवनात सदैव असलेली अनिश्चितता आहे by संजय क्षीरसागर
तुझे प्रतिसाद वाचून
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
अत्महत्येचा एक अजब नमूना
पोलिस कोठडीत व नंतर गजाआड खितपत पडण्याची कल्पनाच
In reply to अत्महत्येचा एक अजब नमूना by चौकटराजा
एक् फुटकळ शंका -
निशजि,खरोखर विचार करायला
मरणाच्या भीतीवर विजय नाही
In reply to निशजि,खरोखर विचार करायला by अनिल तापकीर
ह्या असल्या टॉपिक वर चर्चा पण
आयला ह्ये बरंय राव
In reply to ह्या असल्या टॉपिक वर चर्चा पण by जेनी...
ह्म्म्म्म , पटतय.
In reply to आयला ह्ये बरंय राव by चौकटराजा
पुन्हा यकु...