Skip to main content

मनातल.

लेखक निश
Published on शनीवार, 01/12/2012
खरच कधी कधी कळत नाही की माणसाच अस अचानकपणे जाण मनाला ऐव्ह्ढ वेदना का देत ते? जाणारातर सदेह ह्या जगातुन गेलेला असतो पण मागे राहीलेल्या ईतरांसाठी मात्र त्याच जाण अतोनात दु:ख देणार असत. त्यातही मरणार्‍या माणसाने आत्महत्या केली असेल तर मग मात्र त्याच्या नातलगांसाठी मात्र ते जिवंतपणी तीव्र वेदनादायी असत. काही कुटुंबासाठीतर जिवंतपणी मरणयातनाच म्हणा ना. खर तर मनुष्य आत्महत्या का करतो? ह्यामागे कितीतरी वेगवेगळी कारण असु शकतात. घरगुती, व्यावसायिक , प्रेमभंग , अजुनही बरीच काही.खर तर त्रासाला कंटाळुन किंवा अपयशाला घाबरुन जेव्हा मनुष्य अशी वाट अनुसरतो तेव्हा त्याने जगातल्या सगळ्यात मोठ्या त्रासावर किंवा भितीवर विजय मिळवलेला असतो. त्याने मरणाच्या भितीवर विजय मिळवलेला असतो तेव्हाच त्याने आत्महत्येच टोकाच पाऊल उचलेल असत हे तो विसरतो. जर त्याने जगातल्या सगळ्यात मोठ्या भितीवर विजय मिळवलेला असतो ज्या मरणाच्या भितीच भूत देव दानव ,मनुष्य व ईतर प्रजाती ह्या सदैव मानगुटिवर घेऊन जगत असतात तर मग परत ऐकदा जगण्याचा प्रयत्न तर करुन बघावा अस त्याना का वाटत नाही. ख्रर तर कोणाच्याही ह्या जगातुन जाण्यातुन काही लोक जगायच थांबत नाहित. पण त्यांच मरणाला कवटाळण तेही जर आत्महत्ये सारख्या वाटेने असेल तर नंतर मागे राहणार्‍या त्त्याच्या नातलगाना मनावर एक भळभळती जखम घेउनच जगाव लागत हेही तितकच खर आहे. खरच आत्महत्येचा विचार करणार्‍या लोकांना अस का वाटु शकत नाही की जर त्यानी जगातल्या सगळ्यात मोठ्या त्रासावर विजय मिळवला आहे तर मग जिवनात येणार्‍या त्रासाला भितीला किंवा अपयशाला ऐव्हढ कशाला घाबरायच? आत्महत्या करणार्‍या किंवा करायचा विचार करणार्‍या लो़कांना स्वताच्या आईने त्याना जन्म देताना काढलेल्या मरणप्राय वेदनेचा विसर कसा काय पडु शकतो? आत्महत्या हा कुठल्याच त्रासावर ऊपाय असु शकत नाही. तो करण्याचा विचार करण्याआधी त्या लोकांनी त्यांच्या मातेच्या त्याना जन्म देताना काढलेल्या मरणप्राय वेदनांचा ऐकदातरी विचार करावा. बस ऐव्हढच. आत्महत्येच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटना वाचून मन सुन्न व दु:खी झाल होत. मनातल बोलाव सांगाव म्हणुन हा लेख प्रपंच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 3413
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मी १९७३ साली आत्महत्येच्या विचाराप्रत आलो होतो. का आलो होतो ? माझ्या मते माणसावर सर्वात जास्त राज्य गाजविणारी प्रेरणा असेल तर ती म्हणजे अहंकार ! कोणत्याही प्रकारे हा दुखावला गेला की व्यथा किंवा संताप अशा दोन प्रकारच्या भावना एकेकट्या किंवा समिश्रपणे कार्यरत होतात. आपणच आपल्याकडून काही अवाच्या सवव्वा अपेक्षा केल्या की निराशा , राग या भावना पराकोटीला पोचतात कारण हरेक गोष्ट आपल्याला हवी तशी होत नाही हे समजून घेणे हे जीवनाचे सार आहे. आता मी साठ वर्षात पदार्पण करीत आहे. मी जर असे म्हणालो की माझा मुत्यू अगदी सुरक्षितपणे झोपेत व्हायला हवा. तर याची खात्री कोण देणार ? मग माझा अहं मला म्हणणार तूच काय तो निर्णय घे .ते आजारीपणाचे लाजीरवाणे जिणे नको ! मग मी आत्महत्येचा विचार करणार ! मला वाटते आपण आपली शरणता स्वीकारली नाही तर आत्महत्येची भावना तीव्र होत असावी .

मी १९७३ साली आत्महत्येच्या विचाराप्रत आलो होतो. का आलो होतो ? माझ्या मते माणसावर सर्वात जास्त राज्य गाजविणारी प्रेरणा असेल तर ती म्हणजे अहंकार !... कारण हरेक गोष्ट आपल्याला हवी तशी होत नाही हे समजून घेणे हे जीवनाचे सार आहे
आत्महत्त्येच मूळ कारण म्हणजे ज्याची कोणत्याही प्रकारे सोडवणूक होऊ शकणार नाही असं वाटणारा `स्वतःच्या अस्तित्वाला' निर्माण झालेला धोका. हे स्वतःच अस्तित्व दोन प्रकारच आहे : एक, शारीरिक, ज्यात असाध्य रोग, दीर्घकालिन आजार किंवा त्यातून निर्माण झालेली शारीरिक वेदना येते. ज्याच्यापासून आता सुटका नाही म्हणून देहाच अस्तित्व संपवण्याचा निर्णय होतो. आणि दोन, स्वतःच्या प्रतिमेची झालेली किंवा होईलशी वाटणारी अपरिमित हानी (हा खरा अहंकार), थोडक्यात सामाजिक बेइज्जती. पहिल्या प्रश्नाला `इच्छामरण' हा विधायक पर्याय कायदेशिर करावा ही विनंती राष्ट्रपतींकडे अनंत वर्ष पडून आहे. दुसरा प्रश्न व्यक्तिगत पातळीवरच सोडवावा लागतो. अर्थात अध्यात्म हे या दोन्ही प्रश्नांना एकमेव उत्तर आहे कारण शरीरापासून वेगळं झालेल्याला नैसर्गिक किंवा कशाही प्रकारे आलेल्या मृत्यूची पर्वणी कळण्याची संधी आहे. दुसर्‍या प्रकारात सत्य गवसलेला सापडू शकत नाही कारण तो व्यक्तिमत्त्वातून मुक्त झालेला असतो. तुम्ही इतक्या साहसानं दिलेल्या प्रतिसादावरनं स्वतःचा प्रश्न कसा सोडवलात ते समजणं या निमित्तानं उपयोगी होऊ शकेल.

तुम्ही इतक्या साहसानं दिलेल्या प्रतिसादावरनं स्वतःचा प्रश्न कसा सोडवलात ते समजणं या निमित्तानं उपयोगी होऊ शकेल.
+१, तो प्रश्न कसा सोडवला हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल! माझ्या मते 'Fear of unknown' हे ही एक मुख्य कारण असावे आत्महत्या करण्यामागे. - ('स्व'च्या प्रेमात आकंठ बुडालेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

आपण तिच्याकडे दुर्लक्ष करून जगत असतो. उदा. आपला श्वास आता बंद पडू शकतो, घराबाहेर पडलेल्या कुणाही व्यक्तीला कधीही आणि कसाही अपघात होऊ शकतो, संपूर्ण पृथ्वी विनासूचना सूर्यमालिकेतून बाहेर फेकली जाऊ शकते. या गोष्टींचा विचार देखील कधी आपल्या मनात येत नाही. आत्महत्येच कारण Fear of self-annihilation आहे

In reply to by संजय क्षीरसागर

आत्महत्येच कारण Fear of self-annihilation आहे
असे काय नाय काय. मगाशी रविंद्र जडेजाने तिसर्‍यांदा त्रिशतक झळकावून डॉन ब्रॅडमन* ह्यांच्या पंक्तीत स्थान मिळवल्याचे ऐकून मला आत्महत्या करावीशी वाटली होती. अर्थात मिपाकरांच्या दुर्दैवाने मी त्या विचारातून लवकरच बाहेर पडलो. *हा डॉन म्हणजे क्रिकेटर डॉन. मिपाचे माजी संपादक व आजी सल्लागार श्री. डॉन वेगळे.

आमच्या सोसायटीतील एकाच्या नातेवाईकात आठ दिवसापूर्वी झालेला प्रकार - वहान चालविणारा २२ वर्षाचा- गाडीखाली तेरा वर्षाचा मुलगा जबर जखमी- चालविणार्‍यास मामुली इजा- मुलास हॉस्पिटलात वहान वाल्यानेच दाखल केले- पोलिस केस- वहान वाला पळून गेला - कृष्णा नदीत देहार्पण- १३ वर्षाचा मुलगा झपाट्याने सुधारत आहे. पोलिस कोठडीत व नंतर गजाआड खितपत पडण्याची कल्पनाच सहन न होऊन असे झाले असेल काय ?

एक् फुटकळ शंका - पहिल्या प्रश्नाला `इच्छामरण' हा विधायक पर्याय कायदेशिर करावा ही विनंती राष्ट्रपतींकडे अनंत वर्ष पडून आहे. इथं उल्लेखलेले राष्टृपती भारताचे असतील तर ते गेले ६२-६५ वर्षंच अस्तित्वात असावेत, मग ही विनंती त्यांच्याक्डे अनंत (इन्फिनिटी) वर्षे कशी पडुन राहु शकेल ?

निशजि,खरोखर विचार करायला लावणारा तुमचा लेख आहे. मरणाच्या भितीवर विजय मिळ्वल्यानंतर ती व्यक्ती कुठल्याही संघर्शाला तोंड देऊ शकते मग आत्महत्त्या करायची गरजच काय?

In reply to by अनिल तापकीर

तो जगण्याच्या विवंचनातून सुटका मिळवण्याचा प्रयत्न असतो... थोडक्यात जगण्यापेक्षा मरणं सोयीच वाटलेलं असतं.

In reply to by जेनी...

जीवन सगळंच गुडी गुडी नाही सुराबरोबर बेसूराचीही चर्चा होणारच ! पुलंनी एका जागी म्हटलेय " मालकंस समजून घ्यायचा असेल तर काय नाही म्हणजे मालकंस हे ही समजणे महत्वाचे ! "

च्यायला .. हा येथेच आहे ..आणि सारखा डोकावतोय .. डोक्याला शॉट नुस्ता !