Skip to main content

वीस लाख ....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 22/11/2012 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
उभा देश हबकला होता त्या दीड दिवसात थिजलेल्या महाराष्ट्राकडे बघून ! बाळासाहेबांच्या जाण्याने महाराष्ट्र इतका हादरेल याची कुणी कल्पनाही केली केली नव्हती. माझा पानवाला दिन्या मंगलोर चा. बोला, मेरे को कोई डर नई है। लेकिन रिस्पेक्ट देने के लिए दो दिन बंद रखेगा। शॅटरडे संडे को धंदा डब्बल रहता है, मगर रिस्पेक्ट ज्यादा इम्पोर्टेन्ट है। ...... मी खलास. रविवारी दिवाळीच्या सुट्टीनंतरचा नाशकातल्या उद्योगनगरीतला कामाचा पहिला दिवस. पण सातपूर, अंबड आणि सिन्नर या तीनही वसाहतीत चिडीचूप सामसूम. हे अभूतपूर्व दृष्य बघून मी चाट पडलो. कित्येक वेळा उद्योगांचे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन बंदचे आव्हान नाशकात इथल्या औद्योगिक संघटनांनी अनेकदा गेल्या दहाबारा वर्षात केले होते. पण दहाबारा टक्क्यापेक्षा ज्यास्त प्रतिसाद कधी मिळाला नव्हता. त्यामुळे ती सामसूम बघून मला झीट यायची पाळी आली. प्रत्यक्ष मुंबईतली दृष्ये तर आणखी चक्रावणारी होती. केवढा प्रचंड जनसमुदाय तो ! कुठून तरी आकडा आला वीस लाख ! बापरे. इतके प्रचंड संख्येने लोक. तेही पूर्ण शांत. कुठेच खटखट नाही. सगळे प्रचंड शोकात बुडालेले. हे सगळे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी. दसऱ्याच्या मेळाव्याच्या वेळी बाळासाहेबांची थकलेली आवाहने ऐकून धाय मोकलून रडणारे सैनिक मी पहिले त्यावेळी याची कल्पना नाही आली की केवढा प्रचंड परिणाम एका व्यक्तिमत्वाचा इथल्या जनमानसावर असू शकतो ! मुंबईला प्रत्यक्ष न पोहोचू शकणारी जनता तर या पेक्षा कित्येक पटीने ज्यास्त त्या त्या गावांमध्ये असेल. एवढी प्रसिद्धी ! एवढी मान्यता ! एवढे प्रेम ! त्यानंतर रोज खरेतर या प्रसंगाचे चित्र डोकावतंय. अनेक वेगवेगळे विचार त्यानिमित्ताने मनात धिंगाणा घालतात. मंथन हा एक भीषण प्रकार आहे. त्यातून किती काय काय बाहेर पडेल याचा नेम नाही. बरेच मुद्दे. बरीच उत्तरे. बरेच प्रश्न. बऱ्याच शंका. नेल्सन मंडेला आठवले. नेल्सन मंडेलांचे एक वाक्य ओप्रा विनफ्रेने तिच्या शो मध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उच्चारल्याचे आठवले. " The deepest concern is not that we are inadequate. The deepest concern is we are powerful beyond measure." हे विधान सातत्याने मला माझ्या क्षमतेचे ऑडीट करायला भाग पाडते. माझी अस्सल कुवत किती आहे आणि त्या कुवतीच्या जोरावर मी काय करू शकतो याचा किमान अंदाज बांधता यायला लागल्यावर फसल्याचे प्रमाण तर कमी होतेच पण कुठे हात घालायचा आणि कुठे पोळणार आहे याचा अंदाज तरी येतो. ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील एक अनुभव सांगतात. " एक चोरांची टोळी चोरी करून पळत होती आणि आम्ही त्यांचा पाठलाग करत होतो. आम्ही गाडीत होतो आणि ते जंगलातून आड वाटेने पळत होतो. बराच वेळ पाठलाग चालला होता. त्यांचा पळणं अथक चालू होतं.भानावर येऊन काही वेळाने मी किती किलोमीटर पाठलाग करतोय हे बघितलं आणि पागल झालो. ते चोर सुमारे चोपन्न किलोमीटर सतत पळत होते ...............!!!! "चिंता याची नाहीय की आमच्या मध्ये काही कमतरता आहे, चिंता याची आहे की आमची क्षमता किती आहे याचा अंदाज आम्हाला नाही" इतकी प्रचंड शक्ती एका व्यक्तीवर केंद्रित झाली होती तरी महाराष्ट्र आज खड्यात कसा गेला ? एवढ्या प्रचंड शक्तीला राजकीय सिंहासनाची गरजच नाही. त्यामुळे सत्ता मिळाली नाही म्हणून काया पालट झाला नाही हे मान्य करता येणं शक्य नाही. दंडशक्ती राजसत्तेवर वचक ठेऊ शकते हे चाणक्यापासून, जिजाऊ पासून अगदी अलीकडे अण्णा हजारे यांच्या पर्यंत कित्येक राजसत्तांच्या इतिहासात स्पष्ट दिसते आहे. अनेक ऋषीमुनी दंडशक्तीचे काम करीत होते हे रामायण महाभारता मध्ये आपण वाचलंय. मुद्दा राजकारणाचा नव्हता त्यामुळे राजकीय वल्कले काढून ठेऊन आपले प्रेम आणि श्रद्धा सगळ्यांनी व्यक्त केल्या . संजय दत्त, खा. प्रिया दत्त, शरद पवार, समस्त राष्ट्रवादी काँग्रेस, बच्चन, शबाना, पृथ्वीराज ....वगैरे. महाराष्ट्राच्या उन्नतीकामी हे शक्ती केंद्र खर्ची का नसेल पडले ? राजसत्तेचाच मुद्दा असेल तर पाच वर्षे प्रत्यक्ष सत्ता हातात होती. मोदींनी पहिल्या पाचच वर्षात रक्ताने बरबटलेल्या मातीत आर्थिक गुंतवणुकीची फवारणी केली आणि स्वत:चे स्थानही निर्माण केलं आणि गुजरातही उभा केला. नितीशकुमार तर सर्वार्थाने लहान. पण पूर्वी लालूंच्या कारकिर्दीत आपण ज्या बिहारची चर्चा करायचो तो बिहार आज राहिलेलाच नाही. सायकल मिळते म्हणून शाळेत जाणाऱ्या आणि शाळेत जायला लागल्यावर शिकण्यात रमलेल्या छकुल्यानी बिहार फुलून गेलाय. बिहारी आज बिगारी काम करायला महाराष्ट्रात येतच नाही. त्याला त्याच्याच गावी रोजगार मिळाला. त्यामुळे तो तिथे आपल्या घरी बायको मुलांसंगे सुखाने रहायला लागलाय. बदल आपल्या डोळ्यांसमोर घडतोय. उभा देश तोंडात बोट घालून थक्क होऊन ज्या शक्तीकडे बघत राहिला त्या शक्तीच्या जोराने महाराष्ट्र असा का नाही बदलला ? ....................आमची क्षमता किती आहे याचा अंदाज नाही आला ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24693
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

In reply to by विकास

उत्तम लेख.. भरभरून भावनिक वर्णन नाही किंवा एकांगी तिरकस टीकाही नाही. विचाराला प्रवृत्त करणारा लेख... लिहीत राहा..

In reply to by मैत्र

असेच म्हणतो

लेख आवडला पण बहुतेक स्वतःची क्षमता स्वतःला उमगतेच असे नाही. आणि खरे तर लोकप्रियता आणि लोकांकरुन किंवा लोकांसाठी काम करणे या बहुतेक वेगळ्या गोष्टी असाव्यात. असो एक वेगळेच चिंतन आवडले. चेतन

त्या शक्तीच्या जोराने महाराष्ट्र असा का नाही बदलला ? गुजरातेत किंवा बिहारात जनतेने जशी पुर्ण सत्ता दिली तशी महाराष्ट्राने सलग सत्ता दिली नाही,(एकदा दिलेली होती तेव्हाही त्यांनी भरीव असे कार्य केलेच होते की)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

ते 'भरीव' कार्य काय होते ते जाणुन घ्यायला आवडेल. खिसे भरले म्हणुन सांगु नका ते सर्वांना ठाऊक आहे. ;)

In reply to by गणपा

अहो काय लिहिताय. अटक होईल तुम्हाला. एन्रॉनला आधी शिवसेनेचा विरोध होता. नंतर थॅचरबाई की कोणसे अधिकारी बाळासाहेबाना भेटले आणि त्यानंतर लगेचच सेनेने भूमिका बदलली. हे कसे? हे कसे? याला उत्तर नाही. कामगारांचे संप फोडण्यासाठी त्यांना मारझोड का व्हायची याला उत्तर नाही. ७५ ते ८४ या काळात शिवसेनेचे मांजर का झाले होते याला उत्तर नाही. मराठी माणूस म्हणजे राडेबाज, तोडफोड करणारा, बिनडोक, मवाली अशी प्रतिमा का तयार झाली याला उत्तर नाही. किंबहुना कोणत्याच अडचणीत आणणार्‍या प्रश्नाचे उत्तर नाही. मारझोड हेच एक उत्तर.

In reply to by अप्पा जोगळेकर

नंतर थॅचरबाई की कोणसे अधिकारी बाळासाहेबाना भेटले आणि त्यानंतर लगेचच सेनेने भूमिका बदलली. त्या बाईचे नाव रिबेका मार्क आहे. दादर हा शिबसेनेचा बालेकिल्ला,मग तिथे त्यांचा धुव्वा का उडाला ? या प्रश्नाचे जर उत्तर मिळाले तर सर्व आरश्या सारखे स्पष्ट होईल.

In reply to by गणपा

कृष्णा खोर्याचे काम युतीची सत्ता गेल्यानतर आघाडीने किती रखडवले? उसाचा हमी भाव, घोलपांची चर्मकार मातंग समाजासाठीच्या योजना असोत झुणका भाकर योजना असोत आरोग्य विज्ञान विद्यापीठ असो जेव्हढे आठवले व सापडले ते हे आमच्या तालुक्यात ही असाच दुष्काळ पाचवीला पुजलेला,युतीच्या काळात गिरणा पाणी पुरवठा योजना सुरु केली त्यांच्या काळात जवळपास ८०% काम झाल्यानंतर आघाडीने ते २०%काम करायला १० वर्ष लावली. खिसे कोण नाही भरत पण ओकार्या होइ पर्यंत नको

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मुंबईतील ५५ उड्डाणपूल (आघाडी ने पैशाची उधळपट्टी म्हणून टीका केलेला प्रकल्प) वांद्रे वरळी समुद्री पूल (पूर्ण कॉंग्रेसच्या राज्यात झाला असला तरी संकल्पना युतीच्या काळात परत टेबलावर आणली गेली होती) मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग (यात कॉंग्रेस चे श्रेय फक्त ठेवण्यापुरते बदलण्यापुरते, पुलंच्या ऐवजी इतर कुणाचे)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मुंबई म्हणजे आक्खा महाराष्ट्र नव्हे विमे. :) नो वंडर मुंबई सोडल्यास जास्त जनाधार नाही. (तोही हल्ली कमी होत चाललाय.)

In reply to by गणपा

नशिक पुणे रस्ता हा विनोद आहे हे कदाचित महिती असेल, विमे. असे महाराष्ट्रात खुप विनोद असतील. आणि मुद्दा हाही आहे की मग आपल्या विकासाची संकल्पना काय आहे ? उड्डानपुल, रस्ता, ......?

In reply to by सुधीर मुतालीक

? उड्डानपुल, रस्ता, ......? रस्त्यावरुनच विकास हा गावात जात असतो असे वाटते, राहीली जनाधाराची गोष्ट्,त्याची चिंता नसावी. झालेत बहु आहेत बहु होतील बहु परंतु या सम हाच

In reply to by सुधीर मुतालीक

मी नाशिकचे नाव पण नाही घेतले हो मुतालिक काका. मी आपला मुंबई पुणे रस्त्याबद्दल बोलतो आहे. आणि तो उत्तम आहे. आणि उड्डाणपूल, रस्ते या विकासाच्या संकल्पना नाहीत ?? कमाल आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नेमके काय मग? तुमच्या विकासाच्या संकल्पना सांगा आणि त्यात रस्ते-उड्डाणपूल नसतील तर मग बोलू.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हे मान्य आहे की आपण नाशिक चा उल्लेख नाही केला. मला गणपा म्हणाला त्या मुद्यावर जोर द्यायचा होता. तो म्हणतो, मुम्बै म्हणजे महाराष्ट्र नव्हे. त्याची री ओढताना मला असे म्हणावेसे वाट्ले की पहा ना नाशिकपुणे रस्ता तर ज्योक आहे. वेग्रे. विकासाची संकल्पना हा तर प्रचंड मोठा विषय आहे, पटकन रस्ते पुल आपल्याला दिसतात. तेही महत्वाचे आहेतच. पण व्वा काय मस्त रस्ता केलाय हे म्हणत एसि गाडितुन आपण जी गावे ओलांडून जात असतो त्या गावात संडास नसतात आणि माणसे उघड्यावर बसतात हे आपल्याला माहिती आहे. मग मुद्दा असा आहे की विकास म्हणले दोनही महत्वाचे आहे, पण रस्ते आधी की संडास आधी. पुल आधी की पाणि आधी. रस्तेच करायचे होते तर त्यातही भीषण दिसणारी विषमता का ? खेडोपाडी दिसायला रस्ते नसतात, पण आयआरबी तर त्याच वेळी मजबुत धंदा तर करते आहे. ........

In reply to by गणपा

मग बारामती म्हणजे तरी अख्खा महाराष्ट्र कुठे आहे? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. तिचा विकास केला तर त्यात काय बिघडले. आधीच्या कॉंग्रेस सरकारांनी काय केले मुंबईसाठी ? त्यांचे मतदारसंघ पश्चीम महाराष्ट्र किंवा विदर्भात. शिवसेनेने मुंबईचा विकास केला हे तर खरे. मुंबईत हे ५५ उड्डाणपूल नसते तर काय झाले असते याची कल्पना करा. तत्कालीन विरोधकांनी खूप आगपाखड केली होती. मग ते सत्तेत गेले तेव्हा आधीच्या सरकारने तिजोरी रिकामी केली म्हणून गळे काढत होते. पण जेव्हा यातील काही पूल आघाडीच्या कार्यकाळात पूर्ण झाले तेच "प्रगतीशील सरकार" म्हणून पेपरात जाहिराती देऊन उद्घाटनाला मरे ऐटीत जात असत हे लोक. जिज्ञासूंनी तेव्हाचे पेपर बघून खात्री करून घ्यावी. द्रुतगती महामार्ग हा "मुंबई ते मुंबई" नाही "मुंबई ते पुणे" आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाची दोन शहरे जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे किती फायदा झाला हे मी सांगायला लागणे म्हणजे दुर्दैव आहे. आणि हा फायदा केवळ मुंबई, वांद्रे, कलानगर किंवा सेनाभवन याच परिसरात नाही झाला बरे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

या तिन्ही कामांचे श्रेय नितिन गडकरी यांचे आहे. हे शिवसेनेचे कर्तॄत्व नव्हे.

In reply to by बॅटमॅन

हो होते. त्यांना श्रेय दिले पाहिजे. अरे पण जर त्या काळात याच विभागात भ्रष्टाचार झाला असता तर युतीच्या काळात झाला म्हणून बोंबा ठोकल्या असत्या की नाही ? भाजपने भ्रष्टाचार केला सेनेचा संबन्ध नाही असा युक्तिवाद खपवून घेतला असता काय? मग चांगल्या कामाचे श्रेय पण विभागले जात नाही काय? आणि सरकार वर बाळासाहेबांचा रिमोट चालायचा हे जाहीर केले होते न तेव्हा. मग त्यांना श्रेय जात नाही ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मी अगोदरही तुम्हालाच सांगीतले होते की विरोधासाठी विरोध करणार्‍यांना कितीही सांगीतले तरी खरे वाटत नाही ,म्हणुन म्हणतो जाउ द्या.

In reply to by गणपा

शिवसेनेच्या अधिकृत सायटीवर १९९५ ते १९९९ हा शिवशाहीचा सुवर्णकाळ मानल्या जातो. या सुवर्णकाळात काय भरीव कार्य झाले त्याचा दुवा. शिवशाहीचा सुवर्णकाळ. बाकी, वीस लाख लोकांच्या गर्दीचा आणि लेखातील भावनिक विचारांचा विचार प्रवाह सोडला तर महाराष्टानं प्रगतीसाठी आपली शक्ती एकवटली पाहिजे, या मुद्याशी कोणी असहमत होणार नाही. शेवटचा उतारा खासच. विचार पटला. धन्स.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी, वीस लाख लोकांच्या गर्दीचा आणि लेखातील भावनिक विचारांचा विचार प्रवाह सोडला तर महाराष्टानं प्रगतीसाठी आपली शक्ती एकवटली पाहिजे,
इथच तर मेख आहे. मुळात प्रगती म्हणजे काय हे लोकांच्या डोक्यात जायला हवं ना? सार्वजनिक स्वच्छता, दळणवळण, आरोग्यसेवा, शिक्षण वगैरे म्हणजे प्रगती की अस्मिता, अध्यात्मिक प्रगती वगैरे. नाहितर मग हेच कशाला, अगदी दरवर्षी (अगदी २० लाख नाही) पण प्रचंड संख्येने पंढरपूरात वारकरी जमताच की. काय उपयोग होतो त्याचा तुमच्या ह्या प्रगतीच्या द्रुष्टीकोनातून? उलट सार्वजनिक स्वच्छतेचे तीन-तेरा वाजतातच ना? या शिवाजीपार्कमधे सकाळी चार वाजल्यापासून जमलेल्या काही लाख लोकांच्या स्वच्छताग्राहाची काय व्यवस्था होती? आंतरराष्ट्रीय परिमाणानुसार काही हजार मुतार्‍या असायला हव्यात. पण ते महत्वाचं नाही. एलीडी स्क्रीनची व्यवस्था महत्वाची. लोकं काय आपला कार्यभाग कुठंही उरकतीलचकी. तसही भारतात रस्त्याच्या कडेला भिंतीकडे तोंड करून उभंरहाणं/ बसणं म्हणजे काही विशेष नाही. :)

In reply to by दादा कोंडके

प्रगती म्हणजे काय या मुद्याशी सहमत आहे. >>>>भारतात रस्त्याच्या कडेला भिंतीकडे तोंड करून उभंरहाणं/ बसणं म्हणजे काही विशेष नाही. भारतात आता ब-यापैकी सुधारणा होत आहेत. गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतागृह, रस्ते,वीज,पाणी, वाहतूक, याबाबतीत चांगली प्रगती होत आहे. आता वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक स्वच्छता यांचा योग्य ताळमेळ नसला तरी येत्या पुढील काही वर्षात अधिक चांगले बदल होतील, याबद्दल यात काही शंका नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक स्वच्छता यांचा योग्य ताळमेळ नसला तरी येत्या पुढील काही वर्षात अधिक चांगले बदल होतील, याबद्दल यात काही शंका नाही.
सर, हा पॉझिटिव्ह दृष्टीकोन आवडला! - (पॉझिटिव्ह) सोकाजी

In reply to by सोत्रि

सर, हा पॉझिटिव्ह दृष्टीकोन आवडला!
तुम्हाला भाबडा आशावाद म्हणायचय का? ;)

"चिंता याची आहे की आमची क्षमता किती आहे याचा अंदाज आम्हाला नाही"
हा मुद्दा महत्त्वाचा आहेच. पण त्याच बरोबर कुठल्या क्षेत्रातील आपली क्षमता तपासायची, वाढवायची आणि पूर्ण ताकदीनिशी वापरायची हेही महत्वाचे. महत्त्वाकांक्षा 'वेगळ्या' असतील तर क्षमता पूर्णपणे वापरल्या गेल्या पण राज्याचा विकास झाला नाही असे चित्र समोर येऊ शकते.

बाळासाहेब ठाकरे हे थोर व्यंगचित्रकार होते, त्यांची विनोदबुद्धी अत्यंत धारदार होती आणि ते क्वचित कधीतरी चांगले अग्रलेख लिहित असत. बस्स. यापलीकडे जाऊन त्यांची थोरवी गाणे म्हणजे स्वतःशीच प्रतारणा करणे. उभा देश तोंडात बोट घालून थक्क होऊन ज्या शक्तीकडे बघत राहिला त्या शक्तीच्या जोराने महाराष्ट्र असा का नाही बदलला ? व्यक्तीची योग्यता तिच्यामागे किती समर्थक आहेत किंवा ती व्यक्ती किती प्रभावशाली आहे याच्या आधारे ठरवली गेली म्हणून या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले नसावे. सत्य साईबाबांच्या मागे सुद्धा लाखो लोक होते. त्यांच्याही अंत्ययात्रेला ५ लाख लोक जमले होते. पाठिंबा हाच जर व्यक्तीच्या योग्यतेचा एकमेव निकष असेल तर सत्य साईबाबांची गणना थोर राष्ट्रपुरुषांमध्ये करावी लागेल. आणि र. धो. कर्वेंच्या सारखी थोर माणसे अतिसामान्य म्हणून गणली जातील. अवांतर - २० लाख हा पद्धतशीरपणे प्रोपागंडा करुन पसरवला गेलेला आकडा आहे. हा आकडा मतपेटीत परावर्तित झालेला कधी दिसला आहे का ? जग हादरले आहे, पानिपतच्या रणसंग्रामानंतरचा सर्वात भयंकर हलकल्लोळ माजला आहे, देवांना असुरांनी पुन्हा बंदिवान केले म्हणून बाळासाहेब त्यांची सुटका करायला निघून गेले अशा प्रकारची असंख्य मते सामनामध्ये दररोज छापून येत आहेत.गोबेल्सनीती. जगात काही माणसे 'वेस्टेड व्हॅल्युज' घेऊन जन्माला येतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

त्यांची विनोदबुद्धी अत्यंत धारदार होती
सहमत. उद्धवनंतर आणि आदित्यला युवासेनेचा अध्यक्ष करून, "मी तुमच्यावर घराणेशाही लादली नाही" हे त्यांचं सर्वात विनोदी वाक्य होतं. :)

मोदींबाबत जे लिहीले आहे त्यासोबत काही अंशी सहमत. पण बिहार/बिहारींबाबत साशंकता आहे. सार्वत्रीक बदल घडवून आणणे हा लांबलचक प्रवास असतो. त्या बदलाची सुरुवात बिहार मध्ये झाली आहे असे वाटते पण बिहारचे राजकारण कुठल्या बाजूने कलंडेल हे सांगता येत नाही. तरीपण या लेखाने महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा पुन्हा एकदा बघण्यास प्रवृत्त केले . लेखकाचे अभिनंदन

In reply to by रामदास

या लेखाने महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा पुन्हा एकदा बघण्यास प्रवृत्त केले. लेखकाचे अभिनंदन असेच म्हणतो.

चांगले करणाऱ्याला पाठींबा कमी नाही. पण नेत्यांनाच दिशा नाही तर जनतेला कुठून येणार ? अण्णा हजारेंना काय कमी पाठिंबा दिलाय?

एकदम वेगळा आणि एकदम पटणारा विचार ह्या लेखातुन आलाय.
गुजरातेत किंवा बिहारात जनतेने जशी पुर्ण सत्ता दिली तशी महाराष्ट्राने सलग सत्ता दिली नाही
खरेंतर मतदारराजाने सूज्ञ होऊन मतपेटीद्वारे सत्ता हाती दिली होती. त्यावेळी त्या सत्तेचा आणि पाठीशी असलेल्या शक्तीचा सूज्ञपणे वापर केला असता तर असे व्ह्यायची वेळ आलीच नसती. काँग्रेसला महाराष्ट्रातून उखडून टाकायची मिळालेली संधीं वाया घालवली ह्याची ह्या लेखाने जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित झाली. - (आपल्या क्षमतेचा अंदाज असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

एखादा नवखा आमदार मंत्रीपदाची शपथ घेतल्या नंतर जसा कावराबावरा होतो तसे ह्यांचे झाले असावे. आमच्या गावातली एक महीलेला सभापती पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांनी विचारले की आता तुम्ही काय कामे करनार्,त्यावर त्यांच उत्तर होत की मि सेनापतींचा वाढदिवस साजरा करनार राहीले उखडुन टाकण्याची गोष्ट अस एकदमच कोणाला उखडुन टाकता येत का?

....................आमची क्षमता किती आहे याचा अंदाज नाही आला ह्यातच सारे काही आले.

वीस लाख हा आकडा कपोलकल्पित वाटतो. शिवाजी पार्क, गुगल मॅपमधे: http://bit.ly/Tj0wpE इथे दिसतं त्याप्रमाणे शिवाजी पार्क डी आकाराचं आहे. पण सुलभीकरण म्हणून आयत मानता येईल. 'सॅटलाईट व्ह्यू'च्या जागी 'मॅप व्ह्यू'त हे नीट दिसतं. गूगल मॅपमधून सावरकर मार्ग असणार्‍या आयताची बाजू ~३७५ मीटर, केळुस्कर रस्ता (उत्तर) बाजू ~२७० मी. शिवाजी पार्कला आयत समजून क्षेत्रफळ १०१२५० चौ. मी. केळुस्कर रस्ता पूर्वेकडून दक्षिणेकडे गोलाकारात वळतो (डी आकार) म्हणून ३५१०० चौ मी वजा केले (त्या भागात आयत आखून, एक तृतीयांश क्षेत्रफळ कमी केलं). साधारण क्षेत्रफळ आलं, ६६००० किमी. या मोजमापात परीघ काढला १२०० मी, जो स्थानिक नगरसेवकाने तिथे पाट्या लावून सांगितलेल्या आकड्याच्या (११२० मीटर) जवळपास असणारा आहे. थोडक्यात माझं गणित चुकलेलं असेल तर ते वरच्या बाजूला चुकलेलं आहे. याच म्यापात, सॅटलाईट व्ह्यूमधे, झाडं वगळता शिवाजी पार्कचे छोटे चौकोन करून क्षेत्रफळ मोजलं, उत्तर साधारण ६०००० चौ मी आलं. थोडक्यात ६० हजार चौरस मीटर जागा सभेसाठी उपलब्ध आहे. माणसाला बसण्यासाठी अर्धा चौरस मीटर जागा लागेल असं समजलं तर ६० हजार / अर्धा = एक लाख वीस हजार लोक बसू शकतात. अधिक गर्दी केली, तर माणसाला बसायला ०.४ चौरस मीटर जागा लागेल असं पकडू. माणसांची संख्या दीड लाख. लोकलसारखी गर्दी उभी असेल तर माणशी ०.२५ चौ.मी जागा आणि माणसांची संख्या अडीच लाख. पण यात स्टेज, जाण्यायेण्याची जागा, सुरक्षितता, viewing distance मोजलेलं नाही. ते मोजल्यास आकडा आणखी खालीच येणार. माणसं फार गर्दी करून बसली तर सव्वा लाख, लोकल ट्रेनसारखी कोंबून कोंबून भरली तर सव्वादोन लाख... डोक्यावरून पाणी. त्यापुढे नाही. अजून पन्नास हजार लोकं अधिक. थोडं झाडांवर चढलेले, थोडे इमारतींमधून ऐकतात हे मोजूनही आकडा तीन लाखांच्यावर फुगवता येणं अशक्य आहे. माझ्या गणितात साधारण १०% एरर असेल. आता तुम्हाला वाटलेलं आश्चर्य "कुठून तरी आकडा आला वीस लाख" हा प्रश्न मलाही पडलेला आहे? आकडा इतका कसा आणि मुख्य म्हणजे का फुगवतात?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

@ अदिती : २० लाख हा आकडा मुंबईत कलानगर ते शिवाजी पार्क व्हाया सेना भवन येथे जमलेल्या लोकांचा होता फक्त पार्कात जम्लेल्यांचा नाही . असो तरीही २० लाख म्हणजे जरा अतीच वाटतंय

In reply to by स्पा

२० लाख जमवायला निदान १०-१५ शिवाजी पार्क लागतील. कलानगर ते शिवाजी पार्क या अंतरामधे वस्ती नसती तर कशीबशी १० शिवाजी पार्क मावली असती. (शिवाजी पार्क ते कलानगर हे सरळ रेषेतलं अंतर साधारण तीन-सव्वातीन किमी आहे, शिवाजी पार्कची लांबी ~३७५मी) उरलीसुरली झाडं, वस्ती, इमारती, रेल्वे, वांद्र्याची खाडी एवढ्या सगळ्या गोष्टी पकडून १० शिवाजी पार्कांएवढी गर्दी कशी मावणार होती? या भागात जमलेली गर्दी, आजूबाजूला असलेली घरं, तिथे रहाणार्‍या लोकांची इच्छा-अनिच्छा, हे सगळं बळेच पकडून १० लाख होतील कदाचित.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अंतयात्रेला सुरुवात झाल्यापासून अनेक लोक दर्शनासाठी पार्थिव ठेवलेल्या वाहनाजवळ येत होते अन दर्शन मिळाल्यावर परत जात होते. म्हणजे ते शिवाजी पार्ककडे अजिबात जात नव्हते व गर्दीतून बाहेर पडत होते. दिवसभरात असे करणाऱ्यांचे प्रमाण बरेच असेल. आपल्या गणितात हा घटक गृहीत धरला आहे का? मला वाटते गर्दीचे आकडे मोजण्यासाठी पोलिसांचे व प्रसारमाध्यमांचे काही ना काही सूत्र असणार जे अनेक वर्षांच्या अनुभवातून प्रगल्भ झाले असणार. त्रुटीचे प्रमाण +२०% वगैरे राहत असावे (एक अंदाज).

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

उगाच चार लोकं म्हणतात म्हणून वीस लाख-वीस लाख म्हणण्यापेक्षा (बौद्धीक आळस न करता) शक्य असेल त्या पद्धतीने ताडून पहाण्याचा प्रयत्न आवडला.

In reply to by स्पा

http://photo.outlookindia.com/images/gallery/20121118/Thackeray_Cremati… हा फोटो पहा. वरच्या गणितातल्या उत्तराला दोनने भाग असं सुचवेन. अगदी जवळचा भाग वगळता बाकी माणसं लोकलमधे भरल्यासारखी वगैरे अजिबात खच्चून भरलेली नाहीत. थोडक्यात एक लाख माणसं शिवाजी पार्कात असतील तरी चिक्कार. एकूण मिळून त्याच्या दुप्पट. बातमीदारांनी एखादं शून्य "मनसे" टाकलं असावं.

In reply to by संपत

विकिची बातमी बरोबर असेल तर अर्ध्या चौ.मिला एक माणूस प्रमाणे वरील जागेत सव्वा दोन लाख लोक जमा होतील. खालच्या प्रतिसादातील रस्त्यावरील लाखभर लाख धरु जे शिवाजी पार्कात आले नाहीत, ते परत गेले. कारण शिवाजीपार्क सव्वादोन लाख लोकांनी गच्च भरलेलं होतं. अशी एकुण बेरीज केली तर सव्वातीन लाख लोक होतील ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या भागात जमलेली गर्दी, आजूबाजूला असलेली घरं, तिथे रहाणार्‍या लोकांची इच्छा-अनिच्छा, हे सगळं बळेच पकडून १० लाख होतील कदाचित. हे त्यांचे गणित शिवाजी पार्कचा एरिया ६०००० चौ. मि. आहे ह्या समजुतीवर होता. आता जर शिवाजी पार्कचा एरिया दुप्पट असेल तर बळेच पकडुन १८-२० लाख व्हायला हरकत नाही.

In reply to by संपत

१०१२५० चौ. मी. हे शिवाजी पार्कचं क्षेत्रफळ मी आधीच दिलेलं आहे. विकीवर दिलेला आकडा (~११२००० चौ मी.) यापेक्षा फार निराळा नाही. पहिल्या प्रतिसादात लिहील्याप्रमाणे हा आकडा रस्त्यांच्या आतल्या बाजूला जो संपूर्ण प्लॉट आहे त्याचं क्षेत्रफळ आहे. मोकळ्या भागाचं नाही. गूगलच्या सॅटलाईट व्ह्यूमधे शिवाजी पार्क बघाल तर मधे मोकळं मैदान आणि बाजूला झाडं, इमारती* असं आहे. तो भाग आयताकृती नाही, त्यापेक्षा लहान आहे. पण आयताकृती पकडला तरीही क्षेत्रफळ भरतंय (३२०मी *२०० मी =) ६४,००० चौ.मी. चौसष्ट हजारच्या जागी सत्तर हजार असेल किंवा साठ हजार. पण दुपटीने वगैरे चूक नाही. *स्थानिक अधिक माहितीही देऊ शकतील. ---- आकड्यांबद्दलच बोलले कारण या धाग्यात आपली ताकद, संख्या वगैरेंचा उल्लेख आहे. मुळात ती ताकद खरोखरच आहे का हा फाजिल आत्मविश्वास आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. वीस लाखाच्या जागी माझं उत्तर १७ लाख वगैरे असतं तरीही त्याबद्दल शंका व्यक्त केल्या नसत्या. एकंदरच order of magnitude गणित काय ते मला समजतं. आणि हे गणित चुकलं असेल तर पुढची सगळीच गणितं, अंदाज, सिद्धांत चुकतात. शिवसेना पाच वर्ष (युती करून) कशीबशी महाराष्ट्राच्या सत्तेत राहिली आणि त्यापुढे पुन्हा कॉंग्रेस, आघाडी सत्तेवर का आल्या याचा विचार करताना हेच आकडे उपयुक्त असतात. भावनिक आवाहनं करून लोकशाहीत सत्ता मिळत नाही, मिळाली तरी ती टिकत नाही. बहुमत मोजायचं असतं तेव्हा अशी गणितं करावीच लागतात. ---- आकड्यांचं सोडून दिल्यास, मरणानंतर मृत व्यक्तीबद्दल आदर कसा व्यक्त करावा, दिवंगत शिवसेनाप्रमुख या विषयांबद्दल माझी जी मतं आहेत ती या धाग्यावर मांडावीत असं मला वाटत नाही. --- र.धों. कर्वेंच्या पत्नी, मालतीबाईंच्या, मयताला चार डोकीही जमली नाहीत. संततीनियमन आणि त्यातून स्त्रियांचं सबलीकरण या विषयावर सातत्याने लिखाण आणि काम केल्यामुळे समाजाने त्यांना वाळीत टाकलं होतं. रधोंनी ढकलगाडीवरून मालतीबाईंचं प्रेत स्मशानात नेलं आणि अंत्यसंस्कार केले. त्यानंतर घरी परत येताना ओळखीचा कोणी मनुष्य रस्त्यात भेटला. त्याने विचारल्यावर शांतपणे झालेली गोष्ट सांगितली आणि आपलं नियतकालिक 'समाजस्वास्थ्य'चं काम करायला घाईघाईत निघून गेले. मालतीबाई गेल्या त्या महिन्यातही समाजस्वास्थ्यच्या प्रकाशनावर काहीही परिणाम झाला नाही. लोकांच्या घरी अंक वेळेत पोहोचला. मनुष्याच्या दैवतीकरणावर माझा विश्वास असता तर संततीनियमन, उदारमतवाद वगैरे गोष्टी प्रवाहाविरोधात पोहून शिकवणार्‍या रधोंच्या पायाचं पाणी तीर्थ म्हणून रोज प्यायले असते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला इथे फक्त आपले गणित ज्या अंदाजावर आधारित आहे त्यावर टिपण्णी करायची होती. आपला प्राथमिक अंदाज हा ६६००० चौ मी होता कारण आपण शिवाजी पार्कला आयताकृती मानून त्यातून १/३ वजा केले होते. शिवाजी पार्कवर आजही १० % पेक्षा जास्त क्षेत्रफळ झाड, लहान मुलांचे पार्क, टेनिस कोर्ट, इतर इमारती ह्याने व्यापलेले नाही. बऱ्याचदा असे बघण्यात येते कि गणित बरोबर असते पण ते ज्या प्राथमिक माहितीवर आधारित असते तीच चुकीची असते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गूगल मॅपमधून सावरकर मार्ग असणार्‍या आयताची बाजू ~३७५ मीटर, केळुस्कर रस्ता (उत्तर) बाजू ~२७० मी. शिवाजी पार्कला आयत समजून क्षेत्रफळ १०१२५० चौ. मी. केळुस्कर रस्ता पूर्वेकडून दक्षिणेकडे गोलाकारात वळतो (डी आकार) म्हणून ३५१०० चौ मी वजा केले (त्या भागात आयत आखून, एक तृतीयांश क्षेत्रफळ कमी केलं). साधारण क्षेत्रफळ आलं, ६६००० किमी. या मोजमापात परीघ काढला १२०० मी, जो स्थानिक नगरसेवकाने तिथे पाट्या लावून सांगितलेल्या आकड्याच्या (११२० मीटर) जवळपास असणारा आहे. थोडक्यात माझं गणित चुकलेलं असेल तर ते वरच्या बाजूला चुकलेलं आहे.

In reply to by संपत

केळुस्कर रस्ता पूर्वेकडून दक्षिणेकडे गोलाकारात वळतो (डी आकार) म्हणून ३५१०० चौ मी वजा केले (त्या भागात आयत आखून, एक तृतीयांश क्षेत्रफळ कमी केलं).
जमल्यास म्यापावर आयत आखून त्याची चित्रं डकवेन. म्हणजे हजार शब्द लिहीण्याची आवश्यकता भासू नये.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती ही अनिवासी अर्थात परदेशी, म्हणजेच परप्रांतीयांचे अपग्रेडेड व्हर्शन असल्याने तिचा शिवसेनेवरचा राग स्पष्ट दिसतो आहे. असो.. 'विठ्ठल' तिला सुबुद्धी देवो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

'विठ्ठल' तिला सुबुद्धी देवो. हा.हा.हा... परा तू ना ! ;) उगाच झेंडा चित्रपटातल्या गाण्यातली एक ओळ आठवली ती इथे देतो... आजवर ज्यांची वाहिली पालखी "भलताच" त्यांचा "देव" होता. गायक :--- ज्ञानेश्वर मेश्राम झेंडा

लेख विचार करायला लावणारा आहे हे ढोबळ वाक्य झाले. जे नि:पक्ष विचार करतात त्यांची आधीपासूनच स्पष्ट मते आहेत. जे वस्तुनिष्ठ विचारच करत नाहीत आणि भावनेच्या भरांत वाहून जातात त्यांच्यापैकी ५० टक्के लोकांना जरी या लेखाचा फायदा झाला तरी खूप झाले.

हाच रिस्पेक्ट मतदानाच्या दिवशी कुठे जातो.की फक्त मेल्यानंतरच आठवतो ?

In reply to by डावखुरा

किबहुना हा रिस्पेक्ट मतांमध्ये रुपांतरित होण्यासाठी कुणाला तरी मरावंच लागतं. आपल्या देशाची परंपराच आहे ती.

:) चोक्कस लेख असे म्हणतो (फक्त गुजरात/बिहार उदाहरणे खटकली -- पेक्षा सिमीत वाटली.. हा लेख केवळ महाराष्ट्रापेक्षा एकूणच भारतीय मानसिकतेला लागु पडावा असे वाटते)

जे नि:पक्ष विचार करतात त्यांची आधीपासूनच स्पष्ट मते आहेत .>>>>> पोलीस काढतील तो अर्थ आणि जनसागर म्हणेल त्याच भावना योग्य समजणे हे धोरण स्विकारल्यापासून कशाचाच त्रास होत नाही. सकारात्मक विचारसरणीचा अशा रितीने फायदा होत आहे.

हा लेख केवळ महाराष्ट्रापेक्षा एकूणच भारतीय मानसिकतेला लागु पडावा असे वाटते)
सहमत. ह्याहून कित्येकपट गर्दी सी.एन. अण्णादुराई, एम्.जी.आर. ह्यांच्यावेळीही होती असे म्हणतात.हे ही नेते स्थानिक जनतेच्या भावनांना हात घालत आणि स्वाभिमान जागवत.
उभा देश तोंडात बोट घालून थक्क होऊन ज्या शक्तीकडे बघत राहिला त्या शक्तीच्या जोराने महाराष्ट्र असा का नाही बदलला ?
भावनेच्या,असुरक्षिततेच्या आधारावर राजकारण करणे सोपे असते.खरे बदल घडवून आणण्याचा प्रवास खडतर असतो. सध्या बिहारचे उदाहरण पाहिलेत तर लक्षात येईल.

वीस लाख अशक्य वाटत नाही. अन्य कुणा नेत्याच्या भाषणाला, अंत्ययात्रेला इतकीच किंवा अधिक गर्दी जमल्याचे माहीत आहे का ?

सी एन अण्णादुराई- १५ लाखाहून अधिक.(१९६९). aNNaa अयातुल्ला खोमेनी(१९८९)- ५० लाख. alla

In reply to by चिरोटा

१८ नोव्हेंबर २०१२  Bal Thackeray's final journey खालील छायाचित्रातील मागची इमारत पहाण्यासारखी आहे. Bal Thackeray's final journey Balasaheb Thackeray Picture from the net

In reply to by चिरोटा

सी एन अण्णादुराई- १५ लाखाहून अधिक.(१९६९).
कुतुहलापोटी सहज गुगलून पाहिले. आकडा १५ लाख नसून दीड कोटी असा आहे (१५ मिलियन)! विकिनुसारे हा गिनिज बूकमध्ये नोंदविला गेलेला विक्रम आहे. विशेषतः ४३ वर्षांपूर्वीची चेनैची (तेव्हाचे मद्रास) लोकसंख्या लक्षात घेता, हा आकडा प्रचंडच. असो, बाकी चर्चा वाचत आहेच!

मुळ मुद्दा बाजुलाच राहिला आणि इथे मंडळींना आकड्यांच गणित मांडताना आणि त्या बद्दल दोन्ही बाजुंनी मतं मांडताना पाहुन गम्मत वाटली.

In reply to by गणपा

तेवढं'च' जमत असेल तर दुसरं कुणी काय करु शकतं????????? अशानं आमच्या मयताला चार + एक पण नाय जमणार हे आमच्या लक्षात येत नाही ना! असो...

In reply to by गणपा

मुळ मुद्दा बाजुलाच राहिला आणि इथे मंडळींना आकड्यांच गणित मांडताना आणि त्या बद्दल दोन्ही बाजुंनी मतं मांडताना पाहुन गम्मत वाटली.
लेखाचं नावच 'वीस लाख' आहे ना भौ. मग तो आकडा जर लेखासाठी इतका महत्त्वाचा मुद्दा असेल तर तो तपासून बघायला नको? (या लेखाचं टायटल 'वीस हजार' आहे अशी कल्पना करून लेख वाचून बघा. 'दोन लाख' सुद्धा तितका विशेष वाटत नाही.) मला तर आकडे न तपासता त्यावर तावातावाने दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्यांची गंमत वाटते. जर तो आकडा तितका खरोखरच मोठा नसेल तर बरेच प्रश्न निकालातच निघतात.

In reply to by राजेश घासकडवी

गुर्जी यु टू? निदान मला तरी लेख वाचल्यावर शीर्षका पेक्षा आतला आशय जास्त महत्वाचा वाटला. म्हणुन वरील विधान.

In reply to by गणपा

हे विधान सातत्याने मला माझ्या क्षमतेचे ऑडीट करायला भाग पाडते. माझी अस्सल कुवत किती आहे आणि त्या कुवतीच्या जोरावर मी काय करू शकतो याचा किमान अंदाज बांधता यायला लागल्यावर फसल्याचे प्रमाण तर कमी होतेच पण कुठे हात घालायचा आणि कुठे पोळणार आहे याचा अंदाज तरी येतो.
इतकी प्रचंड शक्ती एका व्यक्तीवर केंद्रित झाली होती तरी महाराष्ट्र आज खड्यात कसा गेला ?
ही लेखातली आशयगर्भ विधानं या आकड्याभोवती फिरतात. लेखकालाच स्वतःच्या क्षमतेचं ऑडिट करणं महत्त्वाचं वाटतं. मग ऑडिट करताना आकडेवारी बरोबर नको का? कंपनीत आलेल्या ऑडिटरला 'अहो आकड्यांकडे काय बघता, एंप्लॉयी मोराल बघा जरा. आमची प्रॉडक्ट्स कशी आहेत ते बघा' असं म्हणून कसं चालेल? माझा मुद्दा असा आहे की जर वीस लाख हा आकडा बरोबर नसला तर लेखाच्या आशयाला धक्का पोचतो. 'महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय' वगैरे तशीच आकडेवारीशिवाय आलेली विधानं केवळ भावनेला हात घालतात म्हणून सत्य ठरत नाही. पण जर सर्वानुमते 'सत्यापेक्षा भावना किंवा परसेप्शन महत्त्वाचं' असं ठरलं तर मी जरूर हे प्रयत्न थांबवेन.

खरय...छान लिहिलंय ..कुठेही भावनांचा अतिरेक नाहीये..खरं तर प्रत्येक राज्याला आपला असा एक नेता आहे बिहार ला नितीश कुमार, गुजरात म्हंटला कि मोदी ...प्रत्येक राज्याला एक गॉडफादर आहे... पण महाराष्ट्र पहिल्यापासून पोरकाच होता ....बाळासाहेबांचाच काय तों आधार होता..त्यांच्या वडीलकी मुळे आपण बिनधास्त होतो, राजकारणात राहूनही कोणतेही राजकीय पद न भूषविलेला दमदार नेता...पण आता काय पुन्हा महाराष्ट्र पोरकाच .... हे बाकीचे नेते फक्त आपली घरं तिजोर्या कश्या भरता येतील एवढाच बघतात ...सामान्य जनतेचा विचारच नाही ...महागाई ...बेरोजगारी ...त्यामुळे वाढणाऱ्या चोर्या...गुन्हेगारी ...महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ नाही लागणार...राज आणि उद्धव एकत्र यावेत आणि या महाराष्ट्राला चांगले दिवस यावेत हीच बाळासाहेबांच्या चरणी प्रार्थना.

मराठी माणूस लढवय्या अशी आपली पूर्वीपासूनची प्रतिमा आहे. पूर्वीचे समाजवादी हे नेहमी उत्तम विरोधी पक्ष म्हणून काम बजावीत असत, तशी शिवसेनेची स्थापना मुख्यत्वे प्रतिक्रियात्मक अशी संघटना म्हणून झाली होती हे लक्षणीय आहे. सरकारला अडचणीत आणणारे विरोधी पक्षनेते बरेचदा सरकारमधे गेले की गोंधळलेले दिसतात. त्यातूनही जे बेरजेचे राजकारण करणारे नेते आहेत ते वेगळ्याच बेरजा करत असतात. सर्वात जास्त महसूली उत्पन्न देणारी मुंबई असूनही महाराष्ट्राची अवस्था अशी का याची बरीच उत्तरे या गोष्टींचा विचार केला तर मिळावीत. लोकप्रियता आणि सत्ता मिळणे किंवा सत्ता मिळणे आणि ती लोकांसाठी वापरणे या सगळ्याची गणिते आणि त्यांची उत्तरे अनाकलनीय आहेत. नेत्याची ध्येये आणि कार्यक्षमता यांचा त्या त्या राज्यावर बरा/वाईट परिणाम होतो. तरीही अत्यंत कार्यक्षम आणि स्वच्छ प्रतिमा असलेले, तसेच अनेक लोकोपयोगी योजना राबवणारे मनोहर पर्रीकर गोव्यात २००५ नंतर फोडाफोडीच्या राजकारणामुळे ७ वर्षे परत सत्तेत येऊ शकले नाहीत. काम करणे आणि निवडणुका जिंकणे या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कोणत्याही पक्षाचे अधिकृत धोरण आणि त्यांचे मित्रपक्ष यामुळेही त्याच्यावर मर्यादा येतात. बाळासाहेब हे व्यक्तिगत पातळीवर कितीही लोकप्रिय असले तरी त्यांच्या पक्षातले सहकारी, त्यांचे आणि सहकार्‍यांचे हितसंबंध या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून ही लोकप्रियता प्रत्यक्ष कामात जेवढी परावर्तित व्हायला हवी होती तेवढी झाली नसावी.

In reply to by पैसा

लेखाच्या मूळ गाभ्यासंदर्भात असलेले "फोकस" उत्तर आवडले. मला हा लेख केवळ बाळासाहेब अथवा शिवसेनेसंदर्भात अथवा त्यांच्या अंत्ययात्रेत किती सामील होते या संबंधीत मर्यादीत वाटला नाही. त्याचा मूळ गाभा हा, "The deepest concern is not that we are inadequate. The deepest concern is we are powerful beyond measure." या वाक्यासंदर्भात आहे. "अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा..." असे काव्य लक्षात ठेवणारे आपण वास्तवात "अंथरूण पाहून पाय पसरावेत" या वृत्तीने स्वत:ची शक्ती लक्षात घेत नाही आणि रीस्क घेत नाही, ती वाढवणे लांबच राहील... असो.
पूर्वीचे समाजवादी हे नेहमी उत्तम विरोधी पक्ष म्हणून काम बजावीत असत,..काम करणे आणि निवडणुका जिंकणे या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
वरील दोन वाक्यांचा विचार करत असताना एकदम आठवले ते एस एम जोशी आणि प्रजासमाजवादी तसेच काँग्रेसेतर राजकारणी ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी केली, नेटाने पुढे नेली आणि यशस्वी करून दाखवली.. पण संयुक्त महाराष्ट्राच्या पहील्या निवडणूकीत ते काही राज्य मिळवू शकले नाहीत. किंबहूना नंतरया काळात हळू हळू ते अस्तंगतच होत गेले. तेच नंतरच्या काळात पुलोद सरकार बाबत घडले. लाटणे मोर्चा काढणारी पाणीवाली बाई अशी प्रतिमा असलेल्या म्रूणाल गोरे यांनी अनेक वर्षे लोकोपयोगी कामे केली पण सत्तेत असताना आणि नंतर आवाज बंद झाला. आता ह्यांना काय पॉवर नव्हती का? असे काही नाही. पण असे झाले ते खरे. बाळासाहेबांच्या बाबतीत देखील तेच आहे असे वाटते. वर पैसा यांनी म्हणल्याप्रमाणे शिवसेना ही प्रतिक्रीयात्मक संघटना म्हणून होती. जनतेने त्यांना सत्ता प्रथम दिली ती ८०च्या दशकात, जेंव्हा मुरली देवरांनी मुंबईतील मराठी भाषिकांना कमी लेखणारे उद्गार काढले होते. तरी देखील स्थानिय लोकाधिकार समितीने अनेकांसाठी काम केले होते. भारतीय कामगार सेनेच्या बाबतीत देखील, जे काही वेळोवेळी ऐकले होते त्यावरून असे दिसते की दता सामंत स्टाईल संप करण्यापेक्षा समेटाने काही घडू शकते का यावर भर दिला गेला. युतीचे सरकार येण्याआधीच्या राज्यात, जेंव्हा, "एकच लक्ष विधानसभा" ही घोषणा लोकप्रिय केली गेली होती तेंव्हा पासून बाळासाहेबांनी मुंबई-पुणे द्रूतगतीमार्गाचा पुरस्कार केला होता. पण शेवटी काँग्रेस सत्तेवर आली आणि पवार मुख्यमंत्री झाले. तरी देखील ठाकरे हे पवारांना जाहीर भेटले आणि आम्ही नसलो तरी तुम्ही सत्तेत आहात, आणि हा प्रकल्प तडीस न्या असे म्हणत, शिवसेनेने जे काही अहवाल तज्ञ व्यक्तींकडून तयार करून घेतले होते ते त्यांना दिले. अर्थात त्या पाच वर्षात काहीच झाले नाही. नंतरच्या काळात युती सरकारने मात्र ते पणास लावले आणि करून दाखवले. तेच फ्लायओव्हर्स बद्दल. याचे प्रत्यक्ष श्रेय नितीन गडकरींना दिले जाऊ शकते पण जर इतिहासात शोधले तर बाळासाहेब त्याची प्रेरणा होते हे लक्षात येईल. त्या व्यतिरीक्त त्या काळातील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे: माझ्या माहीतीप्रमाणे, युतीच्या सरकारच्या वेळेस प्रथमच मंत्रीमंडळात कुठल्याच एका विशिष्ठ जातीच्या व्यक्तींचे प्राबल्य ठेवले गेले नव्हते (जे काँग्रेस व तत्सम पक्षांच्या सरकार मधे असते). केवळ हेच असे सरकार होते. तथाकथीत स्पृश्यांपासून ते ज्यांना कायद्याने नाही, पण समाजात अस्पृश्य मानले गेले होते असे देखील होते. याला कारण बाळासाहेब होते आणि अर्थातच भाजप देखील होता. याचे परीणाम हे जर सातत्याने असेच पुढे चालू राहीले असते तर कदाचीत वेगळे झाले असते. पण त्यांचे सरकार परत आलेच नाही. त्याला देखील कारण अर्थातच काही अंशी बाळासाहेबांना धरावे लागेल. त्यांच्याकडून नक्कीच चुका झाल्या ज्या त्यांना आणि त्यांच्या पक्षाला भोवल्या. अजून एक गोष्ट आठवते, ती म्हणजे, रालोआच्या काळात घटक पक्ष असताना, शिवसेनेस अनेक गोष्टी मान्य होत नसत. तेच इतर घटक पक्षांचे देखील होते. पण केवळ शिवसेना हा असा एकच पक्ष होता, ज्याने स्वतःचे वेगळे मुद्दे मांडले पण त्याचा उपयोग इतर पक्षांप्रमाणे सरकारला जेरीस आणून नाकदुर्‍या ओढायला लावायला केला नाही. प्रत्यक्ष सत्तेत जास्त वेळ नसलेल्या पण जे राजकारणी होते, अशातले एस एम, मॄणाल गोरे अथवा बाळासाहेब असे भिन्न व्यक्तीमत्वांनी नक्की काय केले असा विचार करताना आणि त्यांची, "power beyond measure" शोधायची असेल तर, त्या व्/व्यक्य्तीक्तीमत्वे) अस्तित्वातच नसत्या तर काय झाले असते याचा विचार केल्यास अनेक उत्तरे मिळू शकतात. थोडक्यात मी काही शिवसैनिक नाही की शिवसेना पक्षाचा समर्थक आहे असे म्हणायची अवस्था नाही. पण एखाद्या व्यक्तीचे मोठेपण (येथे बाळासाहेबांचे, पण असेच इतरत्र इतर कुणाचे) शोधताना बर्‍याच अंगाने विचार करायला हवा असे वाटते. बाकी राहता राहीला २० लाखांचा आक्डा. आत्ता पर्यंत हा आकडा मी शिवसेनेकडून ऐकलेला नाही तर टाईम्स ऑफ इंडीया अथवा बीबीसी / एबीसी वर १५ लाखाचा आकडा वाचला आहे. आता हा आकडा त्यांच्या कानात कोणी जाऊन सांगितला आणि त्यांनी त्याच्यावर आंधळे पणाने विश्वास ठेवला का डोळसपणे हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण राहून राहून इतके नक्की वाटते, की जे काही चारपाच टाऴकी का २० लाख टाळकी अत्यंयात्रेत जमली होती, त्यांनी काहीच "राडा" न केल्याने अनेकांचा अपेक्षाभंग करून किमान संपूर्ण देशातले इनो संपून जाण्याइतकी नाराजी ओढवून घेतली आहे. असो.

In reply to by विकास

राहून राहून इतके नक्की वाटते, की जे काही चारपाच टाऴकी का २० लाख टाळकी अत्यंयात्रेत जमली होती, त्यांनी काहीच "राडा" न केल्याने अनेकांचा अपेक्षाभंग करून किमान संपूर्ण देशातले इनो संपून जाण्याइतकी नाराजी ओढवून घेतली आहे. असो. हे मात्र खरं आहे, काही तरी होईल असं अनेकांना वाटत होतं. ' राडा ' झालाच नाही हाही एक धक्काच होता हे कबूलच केले पाहिजे. राडा टाळण्यासाठी उत्स्फूर्तपणे झालेली सामसूम आणि पोलिसांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, हा दिलेला सल्लाही कामाला आला असावा. -दिलीप बिरुटे

In reply to by विकास

नेमके. >>>>पण राहून राहून इतके नक्की वाटते, की जे काही चारपाच टाऴकी का २० लाख टाळकी अत्यंयात्रेत जमली होती, त्यांनी काहीच "राडा" न केल्याने अनेकांचा अपेक्षाभंग करून किमान संपूर्ण देशातले इनो संपून जाण्याइतकी नाराजी ओढवून घेतली आहे. असो. अगदी अगदी. अनेकांनी लोकसत्ता, मटामधे किमान गेला बाजार मिपावार प्रसिद्धीसाठी त्या राड्याच्या विरुद्ध निषेध करणारे लेख आधीच लिहून ठेवले होते.. हाय रे दुर्देव.. कागद आणि शाई अथवा कळफलकाची खडखड वाया गेली !! बाकी अनेकांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया वाचून मौज वाटली.

In reply to by नाना चेंगट

बाळासाहेबांसाठी इतकी लोकं आली तरी ह्यांना प्रॉब्लेम. ती लोकं आली नसती तरी परत बोलायला मोकळे की बघा बघा, इतकी कमी लोकं आली. एवढं पब्लिक शांततेने आलं आणि शांततेने गेलं तर आनंद व्हायच्या ऐवजी हे लोकं इनो घेतायत. काय द्वेष आहे बाळासाहेबांबद्दल ह्या लोकांना देव जाणे.

In reply to by विकास

या मुद्द्यांशी संपूर्ण सहमत महाराष्ट्रात गेल्या १३ वर्षांपासूनही अधिक काळ राष्ट्रीय व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीची सलग सत्ता आहे. त्यातील साडेआठ वर्षे त्यांची केंद्रातही सत्ता आहे. एवढे असूनही महाराष्ट्रात उल्लेखनीय विकासप्रकल्पांचे स्मरण करायचे झाल्यास १९९५ - ९९ या काळातच जावे लागते यातच सर्व काही आले. मला एका गोष्टीचे राहून राहून आश्चर्य वाटते सत्ताधारी आघाडीच्या कामगिरीचे मूल्यमापन करायच्या फंदात कुणीच पडत नाही. जवळ जवळ सर्वच प्रकारच्या माध्यमांना सेनेवर (बहुतांश वेळा नकारात्मक) भाष्य केल्याखेरीज का राहवत नाही? एकदा तर एका आघाडीच्या (राष्ट्रीय स्तरावरच्या) वृत्तवाहिनीने बृह्नमुंबई मनपाद्वारे चालवल्या जाणाऱ्या मराठी शाळांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत सेनेला जबाबदार धरले जात होते. आपल्या देशातील व्यवस्थेत शिक्षणाचे धोरण ठरवणे व त्याची अंमलबजावणी करणे हा पूर्णपणे राज्य सरकारांच्या अखत्यारीतला विषय आहे या बाबींचे ज्ञान त्या वाहिनीच्या धुरिणांना नसावे यात दोष कुणाचा. मनपा केवळ शाळा चालवते. गेल्या काही वर्षांत संपूर्ण राज्यातील मराठी शाळांची परिस्थिती बिकट झालेली आहे त्यासाठी राज्यसरकारऐवजी इतर कुठल्या यंत्रणेस जबाबदार धरणे पूर्णपणे चुकीचे आहे.

In reply to by विकास

>>>>पण राहून राहून इतके नक्की वाटते, की जे काही चारपाच टाऴकी का २० लाख टाळकी अत्यंयात्रेत जमली होती, त्यांनी काहीच "राडा" न केल्याने अनेकांचा अपेक्षाभंग करून किमान संपूर्ण देशातले इनो संपून जाण्याइतकी नाराजी ओढवून घेतली आहे. असो. १००% सह्मत

In reply to by विकास

>>>>पण राहून राहून इतके नक्की वाटते, की जे काही चारपाच टाऴकी का २० लाख टाळकी अत्यंयात्रेत जमली होती, त्यांनी काहीच "राडा" न केल्याने अनेकांचा अपेक्षाभंग करून किमान संपूर्ण देशातले इनो संपून जाण्याइतकी नाराजी ओढवून घेतली आहे. असो.१००% सह्मत

पानवाल्याचे उदाहरण प्रातिनिधिक नाही. बहुतेक दुकानदारांनी भितीपोटीच दुकाने बंद ठेवली होती. फेसबूक च्या स्टेटस वरून दवाखाना उधळून ती भिती रास्त होती हेच सिद्ध झाले. वीस लाख हा आकडा फुगवलेला आहे. एनटीआर च्या मृत्यूसमयी मी हैदराबादेत होतो तर तीन दिवस हेच चित्र होते. इंदिरा गांधीच्या निधनंतर धाय मोकलून रडणार्‍या झोपडपट्टीतील बायकाही मी पाहिल्या आहेत. संजय दत्त, खा. प्रिया दत्त, शरद पवार, समस्त राष्ट्रवादी काँग्रेस, बच्चन, शबाना, पृथ्वीराज ही चमको मंडळी आहेत. उभा देश तोंडात बोट घालून थक्क होऊन ज्या शक्तीकडे बघत राहिला त्या शक्तीच्या जोराने महाराष्ट्र असा का नाही बदलला ? तामिळनाडून जयललिता आणी करुणानिधिंची अशीच लोकप्रियता आहे. एखाद्या राज्यात अशी लोकप्प्रिय व्यक्ती असणे बदलासठी पुरेसे नाही.

In reply to by उनाड

वीस लाख हा आकडा फुगवलेला आहे. बरोबर आहे तुमच म्हणन्,तेथे काय कुणी वही पेन थोडेच घेउन बसलेल होत लोक मोजायला.
तुम्ही सांगा बर किती होते तेथे(अंदाजेच सांगा वाटल्यास)

यापैकी किती जण अंत्यविधिला उपस्थित होतात???