उभा देश हबकला होता त्या दीड दिवसात थिजलेल्या महाराष्ट्राकडे बघून ! बाळासाहेबांच्या जाण्याने महाराष्ट्र इतका हादरेल याची कुणी कल्पनाही केली केली नव्हती. माझा पानवाला दिन्या मंगलोर चा. बोला, मेरे को कोई डर नई है। लेकिन रिस्पेक्ट देने के लिए दो दिन बंद रखेगा। शॅटरडे संडे को धंदा डब्बल रहता है, मगर रिस्पेक्ट ज्यादा इम्पोर्टेन्ट है। ...... मी खलास. रविवारी दिवाळीच्या सुट्टीनंतरचा नाशकातल्या उद्योगनगरीतला कामाचा पहिला दिवस. पण सातपूर, अंबड आणि सिन्नर या तीनही वसाहतीत चिडीचूप सामसूम. हे अभूतपूर्व दृष्य बघून मी चाट पडलो. कित्येक वेळा उद्योगांचे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन बंदचे आव्हान नाशकात इथल्या औद्योगिक संघटनांनी अनेकदा गेल्या दहाबारा वर्षात केले होते. पण दहाबारा टक्क्यापेक्षा ज्यास्त प्रतिसाद कधी मिळाला नव्हता. त्यामुळे ती सामसूम बघून मला झीट यायची पाळी आली.
प्रत्यक्ष मुंबईतली दृष्ये तर आणखी चक्रावणारी होती. केवढा प्रचंड जनसमुदाय तो ! कुठून तरी आकडा आला वीस लाख ! बापरे. इतके प्रचंड संख्येने लोक. तेही पूर्ण शांत. कुठेच खटखट नाही. सगळे प्रचंड शोकात बुडालेले. हे सगळे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी. दसऱ्याच्या मेळाव्याच्या वेळी बाळासाहेबांची थकलेली आवाहने ऐकून धाय मोकलून रडणारे सैनिक मी पहिले त्यावेळी याची कल्पना नाही आली की केवढा प्रचंड परिणाम एका व्यक्तिमत्वाचा इथल्या जनमानसावर असू शकतो ! मुंबईला प्रत्यक्ष न पोहोचू शकणारी जनता तर या पेक्षा कित्येक पटीने ज्यास्त त्या त्या गावांमध्ये असेल. एवढी प्रसिद्धी ! एवढी मान्यता ! एवढे प्रेम !
त्यानंतर रोज खरेतर या प्रसंगाचे चित्र डोकावतंय. अनेक वेगवेगळे विचार त्यानिमित्ताने मनात धिंगाणा घालतात. मंथन हा एक भीषण प्रकार आहे. त्यातून किती काय काय बाहेर पडेल याचा नेम नाही. बरेच मुद्दे. बरीच उत्तरे. बरेच प्रश्न. बऱ्याच शंका. नेल्सन मंडेला आठवले. नेल्सन मंडेलांचे एक वाक्य ओप्रा विनफ्रेने तिच्या शो मध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उच्चारल्याचे आठवले. " The deepest concern is not that we are inadequate. The deepest concern is we are powerful beyond measure." हे विधान सातत्याने मला माझ्या क्षमतेचे ऑडीट करायला भाग पाडते. माझी अस्सल कुवत किती आहे आणि त्या कुवतीच्या जोरावर मी काय करू शकतो याचा किमान अंदाज बांधता यायला लागल्यावर फसल्याचे प्रमाण तर कमी होतेच पण कुठे हात घालायचा आणि कुठे पोळणार आहे याचा अंदाज तरी येतो. ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील एक अनुभव सांगतात. " एक चोरांची टोळी चोरी करून पळत होती आणि आम्ही त्यांचा पाठलाग करत होतो. आम्ही गाडीत होतो आणि ते जंगलातून आड वाटेने पळत होतो. बराच वेळ पाठलाग चालला होता. त्यांचा पळणं अथक चालू होतं.भानावर येऊन काही वेळाने मी किती किलोमीटर पाठलाग करतोय हे बघितलं आणि पागल झालो. ते चोर सुमारे चोपन्न किलोमीटर सतत पळत होते ...............!!!!
"चिंता याची नाहीय की आमच्या मध्ये काही कमतरता आहे, चिंता याची आहे की आमची क्षमता किती आहे याचा अंदाज आम्हाला नाही"
इतकी प्रचंड शक्ती एका व्यक्तीवर केंद्रित झाली होती तरी महाराष्ट्र आज खड्यात कसा गेला ? एवढ्या प्रचंड शक्तीला राजकीय सिंहासनाची गरजच नाही. त्यामुळे सत्ता मिळाली नाही म्हणून काया पालट झाला नाही हे मान्य करता येणं शक्य नाही. दंडशक्ती राजसत्तेवर वचक ठेऊ शकते हे चाणक्यापासून, जिजाऊ पासून अगदी अलीकडे अण्णा हजारे यांच्या पर्यंत कित्येक राजसत्तांच्या इतिहासात स्पष्ट दिसते आहे. अनेक ऋषीमुनी दंडशक्तीचे काम करीत होते हे रामायण महाभारता मध्ये आपण वाचलंय. मुद्दा राजकारणाचा नव्हता त्यामुळे राजकीय वल्कले काढून ठेऊन आपले प्रेम आणि श्रद्धा सगळ्यांनी व्यक्त केल्या . संजय दत्त, खा. प्रिया दत्त, शरद पवार, समस्त राष्ट्रवादी काँग्रेस, बच्चन, शबाना, पृथ्वीराज ....वगैरे. महाराष्ट्राच्या उन्नतीकामी हे शक्ती केंद्र खर्ची का नसेल पडले ? राजसत्तेचाच मुद्दा असेल तर पाच वर्षे प्रत्यक्ष सत्ता हातात होती. मोदींनी पहिल्या पाचच वर्षात रक्ताने बरबटलेल्या मातीत आर्थिक गुंतवणुकीची फवारणी केली आणि स्वत:चे स्थानही निर्माण केलं आणि गुजरातही उभा केला. नितीशकुमार तर सर्वार्थाने लहान. पण पूर्वी लालूंच्या कारकिर्दीत आपण ज्या बिहारची चर्चा करायचो तो बिहार आज राहिलेलाच नाही. सायकल मिळते म्हणून शाळेत जाणाऱ्या आणि शाळेत जायला लागल्यावर शिकण्यात रमलेल्या छकुल्यानी बिहार फुलून गेलाय. बिहारी आज बिगारी काम करायला महाराष्ट्रात येतच नाही. त्याला त्याच्याच गावी रोजगार मिळाला. त्यामुळे तो तिथे आपल्या घरी बायको मुलांसंगे सुखाने रहायला लागलाय. बदल आपल्या डोळ्यांसमोर घडतोय. उभा देश तोंडात बोट घालून थक्क होऊन ज्या शक्तीकडे बघत राहिला त्या शक्तीच्या जोराने महाराष्ट्र असा का नाही बदलला ?
....................आमची क्षमता किती आहे याचा अंदाज नाही आला ?
वाचने
24693
प्रतिक्रिया
135
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंतर्मुख करुन विचार करायला
+१
In reply to अंतर्मुख करुन विचार करायला by गणपा
+१
In reply to +१ by विकास
+१
In reply to +१ by मैत्र
व्वा !
In reply to अंतर्मुख करुन विचार करायला by गणपा
आवडला
त्या शक्तीच्या जोराने
ते 'भरीव' कार्य काय होते ते
In reply to त्या शक्तीच्या जोराने by श्री गावसेना प्रमुख
अहो काय लिहिताय. अटक होईल
In reply to ते 'भरीव' कार्य काय होते ते by गणपा
नंतर थॅचरबाई की कोणसे अधिकारी
In reply to अहो काय लिहिताय. अटक होईल by अप्पा जोगळेकर
कृष्णा खोर्याचे काम युतीची
In reply to ते 'भरीव' कार्य काय होते ते by गणपा
मुंबईतील ५५ उड्डाणपूल (आघाडी
In reply to कृष्णा खोर्याचे काम युतीची by श्री गावसेना प्रमुख
मुंबई म्हणजे आक्खा महाराष्ट्र
In reply to मुंबईतील ५५ उड्डाणपूल (आघाडी by विश्वनाथ मेहेंदळे
बरोबर !
In reply to मुंबई म्हणजे आक्खा महाराष्ट्र by गणपा
? उड्डानपुल, रस्ता, ......?
In reply to बरोबर ! by सुधीर मुतालीक
मी नाशिकचे नाव पण नाही घेतले
In reply to बरोबर ! by सुधीर मुतालीक
हे मान्य ....
In reply to मी नाशिकचे नाव पण नाही घेतले by विश्वनाथ मेहेंदळे
मग बारामती म्हणजे तरी अख्खा
In reply to मुंबई म्हणजे आक्खा महाराष्ट्र by गणपा
या तिन्ही कामांचे श्रेय नितिन
In reply to मुंबईतील ५५ उड्डाणपूल (आघाडी by विश्वनाथ मेहेंदळे
नसत्या उठाठेवी,नितीन गडकरी
In reply to या तिन्ही कामांचे श्रेय नितिन by अप्पा जोगळेकर
मी चुकत नसेन तर तेव्हा ते
In reply to नसत्या उठाठेवी,नितीन गडकरी by श्री गावसेना प्रमुख
हो होते. त्यांना श्रेय दिले
In reply to मी चुकत नसेन तर तेव्हा ते by बॅटमॅन
मी अगोदरही तुम्हालाच सांगीतले
In reply to हो होते. त्यांना श्रेय दिले by विश्वनाथ मेहेंदळे
भरीव कार्य.
In reply to ते 'भरीव' कार्य काय होते ते by गणपा
±1
In reply to भरीव कार्य. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म.
In reply to ±1 by दादा कोंडके
ग्रेट...
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा...
In reply to ग्रेट... by सोत्रि
तुमचे लेखन नेहमी आवडते. हेही
उद्दीष्टे वेगळी.
बाळासाहेब ठाकरे हे थोर
+१
In reply to बाळासाहेब ठाकरे हे थोर by अप्पा जोगळेकर
इतका मोठा जनसमुह जमतो म्हणजे
विचारात पाडणारा लेख आहे
+१
In reply to विचारात पाडणारा लेख आहे by रामदास
या लेखाने महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा पुन्हा एकदा बघण्यास प्रवृत्त केले. लेखकाचे अभिनंदनअसेच म्हणतो.विवेकी लेखन.
ज्जे बात!
एखादा नवखा आमदार मंत्रीपदाची
In reply to ज्जे बात! by सोत्रि
....................आमची
वीस लाख हा आकडा कपोलकल्पित वाटतो.
@ अदिती : २० लाख हा आकडा
In reply to वीस लाख हा आकडा कपोलकल्पित वाटतो. by ३_१४ विक्षिप्त अदिती
आता कर म्हणावे परत गणित
In reply to @ अदिती : २० लाख हा आकडा by स्पा
२० लाख जमवायला निदान १०-१५
In reply to @ अदिती : २० लाख हा आकडा by स्पा
एक शंका
In reply to २० लाख जमवायला निदान १०-१५ by ३_१४ विक्षिप्त अदिती
आवडलं...
In reply to २० लाख जमवायला निदान १०-१५ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा फोटो पहा.
In reply to @ अदिती : २० लाख हा आकडा by स्पा
विकिनुसार
In reply to हा फोटो पहा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
विकीची बातमी खरी असेल तर...
In reply to विकिनुसार by संपत
आदितीच्या अन्दाजानुसार
In reply to विकीची बातमी खरी असेल तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१०१२५० चौ. मी. हे शिवाजी
In reply to आदितीच्या अन्दाजानुसार by संपत
मला इथे फक्त
In reply to १०१२५० चौ. मी. हे शिवाजी by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपण शिवाजी पार्कला आयताकृती
In reply to मला इथे फक्त by संपत
गूगल मॅपमधून सावरकर मार्ग
In reply to आपण शिवाजी पार्कला आयताकृती by ३_१४ विक्षिप्त अदिती
केळुस्कर रस्ता पूर्वेकडून
In reply to गूगल मॅपमधून सावरकर मार्ग by संपत
धिक्कार!
In reply to केळुस्कर रस्ता पूर्वेकडून by ३_१४ विक्षिप्त अदिती
'विठ्ठल' तिला सुबुद्धी देवो.
In reply to धिक्कार! by परिकथेतील राजकुमार
मग अदितीच्या गणिताचे काय?
In reply to विकिनुसार by संपत
अंत्यदर्शनासाठी ३ किमी इतकी
In reply to हा फोटो पहा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
लेख
लेख आवडला
हाच रिस्पेक्ट मतदानाच्या
In reply to लेख आवडला by इरसाल
किबहुना हा रिस्पेक्ट
In reply to हाच रिस्पेक्ट मतदानाच्या by डावखुरा
चोक्कस लेख असे म्हणतो
जे नि:पक्ष विचार करतात
+१
वीस लाख अशक्य वाटत नाही. अन्य
सी एन
१८ नोव्हेंबर २०१२
In reply to सी एन by चिरोटा
दीड कोटी
In reply to सी एन by चिरोटा
मुळ मुद्दा बाजुलाच राहिला आणि
तेवढं'च' जमत असेल तर दुसरं
In reply to मुळ मुद्दा बाजुलाच राहिला आणि by गणपा
+१
In reply to मुळ मुद्दा बाजुलाच राहिला आणि by गणपा
ह्यालाच बहुदा 'कोणाला कशाचे
In reply to +१ by सोत्रि
मुळ मुद्दा बाजुलाच राहिला आणि
In reply to मुळ मुद्दा बाजुलाच राहिला आणि by गणपा
गुर्जी यु टू?
In reply to मुळ मुद्दा बाजुलाच राहिला आणि by राजेश घासकडवी
>>>गुर्जी यु टू?
In reply to गुर्जी यु टू? by गणपा
हे विधान सातत्याने मला माझ्या
In reply to गुर्जी यु टू? by गणपा
खरय...छान लिहिलंय ..कुठेही
तोच तर प्रॉब्लेम
In reply to खरय...छान लिहिलंय ..कुठेही by bhaktipargaonkar
उत्तम लेख
+
In reply to उत्तम लेख by पैसा
राहून राहून इतके नक्की वाटते,
In reply to + by विकास
नेमके.
In reply to + by विकास
+१
In reply to नेमके. by नाना चेंगट
+१
In reply to + by विकास
>>>>पण राहून राहून इतके नक्की
In reply to + by विकास
>>>>पण राहून राहून इतके नक्की
In reply to + by विकास
मला वाटते.
वीस लाख हा आकडा फुगवलेला आहे.
In reply to मला वाटते. by उनाड
तुम्ही सांगा बर किती होते तेथे(अंदाजेच सांगा वाटल्यास)
एक शंका????