Skip to main content

वीस लाख ....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 22/11/2012 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
उभा देश हबकला होता त्या दीड दिवसात थिजलेल्या महाराष्ट्राकडे बघून ! बाळासाहेबांच्या जाण्याने महाराष्ट्र इतका हादरेल याची कुणी कल्पनाही केली केली नव्हती. माझा पानवाला दिन्या मंगलोर चा. बोला, मेरे को कोई डर नई है। लेकिन रिस्पेक्ट देने के लिए दो दिन बंद रखेगा। शॅटरडे संडे को धंदा डब्बल रहता है, मगर रिस्पेक्ट ज्यादा इम्पोर्टेन्ट है। ...... मी खलास. रविवारी दिवाळीच्या सुट्टीनंतरचा नाशकातल्या उद्योगनगरीतला कामाचा पहिला दिवस. पण सातपूर, अंबड आणि सिन्नर या तीनही वसाहतीत चिडीचूप सामसूम. हे अभूतपूर्व दृष्य बघून मी चाट पडलो. कित्येक वेळा उद्योगांचे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन बंदचे आव्हान नाशकात इथल्या औद्योगिक संघटनांनी अनेकदा गेल्या दहाबारा वर्षात केले होते. पण दहाबारा टक्क्यापेक्षा ज्यास्त प्रतिसाद कधी मिळाला नव्हता. त्यामुळे ती सामसूम बघून मला झीट यायची पाळी आली. प्रत्यक्ष मुंबईतली दृष्ये तर आणखी चक्रावणारी होती. केवढा प्रचंड जनसमुदाय तो ! कुठून तरी आकडा आला वीस लाख ! बापरे. इतके प्रचंड संख्येने लोक. तेही पूर्ण शांत. कुठेच खटखट नाही. सगळे प्रचंड शोकात बुडालेले. हे सगळे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी. दसऱ्याच्या मेळाव्याच्या वेळी बाळासाहेबांची थकलेली आवाहने ऐकून धाय मोकलून रडणारे सैनिक मी पहिले त्यावेळी याची कल्पना नाही आली की केवढा प्रचंड परिणाम एका व्यक्तिमत्वाचा इथल्या जनमानसावर असू शकतो ! मुंबईला प्रत्यक्ष न पोहोचू शकणारी जनता तर या पेक्षा कित्येक पटीने ज्यास्त त्या त्या गावांमध्ये असेल. एवढी प्रसिद्धी ! एवढी मान्यता ! एवढे प्रेम ! त्यानंतर रोज खरेतर या प्रसंगाचे चित्र डोकावतंय. अनेक वेगवेगळे विचार त्यानिमित्ताने मनात धिंगाणा घालतात. मंथन हा एक भीषण प्रकार आहे. त्यातून किती काय काय बाहेर पडेल याचा नेम नाही. बरेच मुद्दे. बरीच उत्तरे. बरेच प्रश्न. बऱ्याच शंका. नेल्सन मंडेला आठवले. नेल्सन मंडेलांचे एक वाक्य ओप्रा विनफ्रेने तिच्या शो मध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उच्चारल्याचे आठवले. " The deepest concern is not that we are inadequate. The deepest concern is we are powerful beyond measure." हे विधान सातत्याने मला माझ्या क्षमतेचे ऑडीट करायला भाग पाडते. माझी अस्सल कुवत किती आहे आणि त्या कुवतीच्या जोरावर मी काय करू शकतो याचा किमान अंदाज बांधता यायला लागल्यावर फसल्याचे प्रमाण तर कमी होतेच पण कुठे हात घालायचा आणि कुठे पोळणार आहे याचा अंदाज तरी येतो. ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील एक अनुभव सांगतात. " एक चोरांची टोळी चोरी करून पळत होती आणि आम्ही त्यांचा पाठलाग करत होतो. आम्ही गाडीत होतो आणि ते जंगलातून आड वाटेने पळत होतो. बराच वेळ पाठलाग चालला होता. त्यांचा पळणं अथक चालू होतं.भानावर येऊन काही वेळाने मी किती किलोमीटर पाठलाग करतोय हे बघितलं आणि पागल झालो. ते चोर सुमारे चोपन्न किलोमीटर सतत पळत होते ...............!!!! "चिंता याची नाहीय की आमच्या मध्ये काही कमतरता आहे, चिंता याची आहे की आमची क्षमता किती आहे याचा अंदाज आम्हाला नाही" इतकी प्रचंड शक्ती एका व्यक्तीवर केंद्रित झाली होती तरी महाराष्ट्र आज खड्यात कसा गेला ? एवढ्या प्रचंड शक्तीला राजकीय सिंहासनाची गरजच नाही. त्यामुळे सत्ता मिळाली नाही म्हणून काया पालट झाला नाही हे मान्य करता येणं शक्य नाही. दंडशक्ती राजसत्तेवर वचक ठेऊ शकते हे चाणक्यापासून, जिजाऊ पासून अगदी अलीकडे अण्णा हजारे यांच्या पर्यंत कित्येक राजसत्तांच्या इतिहासात स्पष्ट दिसते आहे. अनेक ऋषीमुनी दंडशक्तीचे काम करीत होते हे रामायण महाभारता मध्ये आपण वाचलंय. मुद्दा राजकारणाचा नव्हता त्यामुळे राजकीय वल्कले काढून ठेऊन आपले प्रेम आणि श्रद्धा सगळ्यांनी व्यक्त केल्या . संजय दत्त, खा. प्रिया दत्त, शरद पवार, समस्त राष्ट्रवादी काँग्रेस, बच्चन, शबाना, पृथ्वीराज ....वगैरे. महाराष्ट्राच्या उन्नतीकामी हे शक्ती केंद्र खर्ची का नसेल पडले ? राजसत्तेचाच मुद्दा असेल तर पाच वर्षे प्रत्यक्ष सत्ता हातात होती. मोदींनी पहिल्या पाचच वर्षात रक्ताने बरबटलेल्या मातीत आर्थिक गुंतवणुकीची फवारणी केली आणि स्वत:चे स्थानही निर्माण केलं आणि गुजरातही उभा केला. नितीशकुमार तर सर्वार्थाने लहान. पण पूर्वी लालूंच्या कारकिर्दीत आपण ज्या बिहारची चर्चा करायचो तो बिहार आज राहिलेलाच नाही. सायकल मिळते म्हणून शाळेत जाणाऱ्या आणि शाळेत जायला लागल्यावर शिकण्यात रमलेल्या छकुल्यानी बिहार फुलून गेलाय. बिहारी आज बिगारी काम करायला महाराष्ट्रात येतच नाही. त्याला त्याच्याच गावी रोजगार मिळाला. त्यामुळे तो तिथे आपल्या घरी बायको मुलांसंगे सुखाने रहायला लागलाय. बदल आपल्या डोळ्यांसमोर घडतोय. उभा देश तोंडात बोट घालून थक्क होऊन ज्या शक्तीकडे बघत राहिला त्या शक्तीच्या जोराने महाराष्ट्र असा का नाही बदलला ? ....................आमची क्षमता किती आहे याचा अंदाज नाही आला ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24693
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

In reply to by वरुण मोहिते

प्रचंड जेन्युअन प्रश्न आहे !

माननिय बाळासाहेबांना अखेरचा निरोप द्यावयास झालेली गर्दी ५ ,१५ ,ते भले २० लाखांची असेल अथवा नसेल.अफाट गर्दी होती आणि शांततेत सगळ काहि पार पडल यात सगळ काही आल...पण राडा होईलच किंबहुना तो व्हावा म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्यांचा जो काही अपेक्षाभंग झाला ते बघून एक शिवसैनिक म्हणुन अत्यानंद झाला..बाकी युतीच्या काळात महाराष्ट्राचा किती विकास झाला किंवा एकंदरीत युतीच्या शासन काळाचा आढावा श्री विकास यांनी सविस्तर मांडलाय्...त्यात अजून भर हवी तितकी घालता येईल... बाळासाहेबांनी गेल्यावर देखिल जी गर्दी जमवली ती अनेकांना त्यांच्या उभ्या हयातीत जमवणे शक्य झाले नाही आणि होणार देखिल नाही..आणि निदान महाराष्ट्रापुरता विचार करता सध्या हयात असलेल्या नेत्यांची,जाणत्या राजांची इहलोकीची यात्रा संपेल तेंव्हा किती गर्दी जमेल ह्याचे अंदाज किंवा ठोकताळे न बांधलेलेच बरे....बाकी पैसे देऊन गर्दी जमवणारे भविष्यात देखिल कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही..बाकी लेख विचारप्रवर्तक आहे हे मात्र नक्की... अवांतर्--बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त सार्वजनिक होताच ठाण्यात ज्याप्रमाणे दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली ती पाहता त्यांच्या त्या कृतीत आदर होता हे निश्चित..आणि सगळ बंद झाल्यावर अडकलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नाक्यांवर शिवसैनिक जातीने प्रवाशांना रिक्षात बसवून देत होते हे स्वतः अनुभवले...

In reply to by अनामिका

पण राडा होईलच किंबहुना तो व्हावा म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्यांचा जो काही अपेक्षाभंग झाला ते बघून एक शिवसैनिक म्हणुन अत्यानंद झाला
धन्यवाद. शिवसैनिकांनी राडा करु नये यासाठी देवाला पाण्यात घालून, राडा होईल अशी अपेक्षा केल्यास निदान शिवसैनिकांना अत्त्यानंद व्हावा म्हणून तरी राडा होत नाही इतपत खात्री पटल्यास देवाला रिटायर न करण्याचे आणखी एक चांगले कारण सापडले. किंबहुना शिवसैनिकांनी राडा घालू नये यासाठी आर. आर. आबा पाटील, पोलीस डिपार्टमेंट व महाराष्ट्र सरकार यांना ही सोपी युक्ती कळवता आल्याल उत्तम.

मराठी माणसांना "आपण कसे तुच्छ आहोत" हे सिद्ध करण्यात जो आनंद मिळतो त्याबद्दल मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे! त्याचा आज पुनश्च प्रत्यय आला.

In reply to by सुधीर काळे

काळे काका, कोणीही मराठी माणसांना तुच्छ बिच्छ समजत नाही. आणि कोणाचा कोणी कमीपणाही दाखवत नाही. फक्त लेखात, बातम्यात जो वीस लाखाचा आकडा येतोय ना, त्याचा हिशेब उर्फ ताळेबंद जुळत नाही बघा. बाकी, राडा वगैरेचं म्हणाल तर भीतीमुळे लोकांनी पाळलेला बंद वगैरे गोष्टीही नजरेआड करुन कसे चालेल, नाही म्हणजे पटत असेल तर हो म्हणा...! आणि चुकत असेल तर आमचा कान धरा. -दिलीप बिरुटे (काळेकाकांचा पुतण्या)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत्.ईतर राज्यातही राजकिय नेता निधन पावला की असे होते.दुकाने बंद करणे वगैरे.सेनेच्या बाबतीत ही चर्चा जास्त होते कारण ईतर राजकिय पक्षांच्या तुलनेत सेनेला गुंडगिरीचा ईतिहास आहे.पक्ष नेत्यांनी त्याचे समर्थनही केले आहे.

In reply to by चिरोटा

महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते (ज्यांचे प्रतिनिधी विधिमंडळात आहेत असे; नाही तर कुणी धनकवडीच्या नेताजी काँग्रेस सेनेचे उदाहरण देईल) हिंसा करत असतात. या गोष्टीला पायबंद घालण्यासाठी आघाडी सरकारने काही वर्षांपूर्वी अशा हल्ल्यात झालेल्या नुकसानाची भरपाई त्या पक्षाकडून करण्याचा अधिनियम काढला अन दुसऱ्याच दिवशी नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा प्रत्यक्ष उपयोग करायची संधी सरकारला मिळवून दिली. १०-११ वर्षांपूर्वी राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'मी नथुराम गोडसे बोलतोय' चे ठाण्यातील प्रयोग उधळण्यासाठी हल्ले केले होते. त्यामुळे या मुद्द्यावर केवळ सेनेलाच लक्ष करणे बरोबर नाही. अन गेल्या काही वर्षांत उद्धव यांनी हि प्रतिमा बदलण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले आहेत. काही वेळा राजकीय अपरिहार्यतेमुळे अपवाद झालेत.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

सगळेच सर्वज्ञानी नसतात. प्रतिप्रश्न करण्यापेक्षा मुद्देसूद उत्तर दिले तर आभारी राहीन.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मेहेंदळे साहेब इथे मुद्देसुद उत्तर देण्याची काय गरज आहे बर,महराष्ट्रातच राहतात ना, रेल्वेची मराठी उमेदवारांना डावलुन घेतली जाणारी भरती उधळणे असो, ओ.एन.जी.सी.खादी ग्रामोद्योग मंडळ इंडियन एअरलाईन्स आर.सी.एफ. एल आय सी मधील भरती असो, यू.पी. आणि बिहारी अधिकाऱ्यांची भरती प्रक्रियेमधील मनमानी थांबविण्यासाठी दंडुक्याचाच फायदा झाला आहे कि नाही

In reply to by श्री गावसेना प्रमुख

नक्की फायदा झालेला आहे. असे केल्याने अशा जाहिराती फक्त उ.प्र./बिहारमधील वृत्तपत्रातच देऊन तिथल्या लोकांनाच नोकरीला लावण्याचा कट उधळला गेला कीं नाहीं ते माहीत नाहीं पण उघडकीला नक्कीच आला. भविष्यकाळात तरी असे केले जाणार नाहीं अशी आशा करू या. पण आपण जागरुक राहिलेच पाहिजे! होतंय् काय तर अशा अयोग्य गोष्टी करणार्‍यांवर कांहींच आरोप होत नाहींत किंवा त्यांना कुणीच जाब विचारत नाहींत पण शिवसेनेने किंवा 'मनसे'ने अन्यायाविरुद्ध दंडुका उचलला की "मराठी लोक प्रांतीय"ची हाकाटी सुरू होते! या बाबतचा उर्दूतला एक शेर आठवला: वो कत्लभी करते हैं तो चर्चा नहीं होती हम आहभी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम! अर्थात् मूळ शेर अत्याचार करणार्‍या प्रेयसीबद्दल आहे. पण इथे एकदम फिट्ट बसतोय् म्हणून दिला आहे! आणखी उल्लेखनीय गोष्ट अशी कीं हे सारे झाले तरी आपले राष्ट्रीय पक्ष मूग गिळून बसले. ना काँग्रेस, ना रा. काँग्रेस, ना भाजपा! एक मनसे किंवा शिवसेनेने फक्त आवज उठवला. असे बाकीच्या प्रांतांत होत नाहीं. तिथली सरकारेच याबाबत कारवाई करतात मग तिथे बाळासाहेबांसारखे नेतृत्व कशाला उदयास येईल?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अहो १-२ ठिकाणी गुंडगिरी केली आणि फायदा झाला म्हणून सरसकट विधान करणे योग्य नाही. किती ठिकाणी तोटा झाला ते मोजा पाहू आता. प्रत्येक प्रश्नाला गुंडगिरी हेच उत्तर असेल तर कठीण आहे. Hammer is excellent tool if you want to nail something. But if all you have is hammer, then everything start looking like a nail. बघा जरा विचार करून.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आता तुम्हीच सांगा तोटा किती झाला ते,मला तर नाही वाटत की काही तोटा झाला असेल तुमच्या नजरेतुन कुठे तोटा झाला ते बघुया.
मराठी माणसांसाठी त्यांनी गुंडगीरी केली आणी समजा केलीही नसती तर त्या यु पी बिहार च्या अधिकार्यांनी मराठी माणसाला त्यांचे पद दिले असते काय?
1त्यांनी (सेनेने)त्यांच्या वर होनार्‍या टीकेकडे दुर्लक्ष केल म्हनुन तर ते आजवर इथे पोहचले,काही ठीकाणी 1या शिवाय पर्याय नसतो

In reply to by सुधीर काळे

अंत्यविधीला वीस लाखापेक्षा फारच कमी मंडळी आली होती असे म्हणण्यात मराठी माणसाला तुच्छ लेखण्याचा प्रश्न येतोच कुठे? सर्व मराठी माणसांची प्रतिष्ठा एका व्यक्तीच्या ठिकाणी एकवटली आहे काय ?

मुद्दा असा आहे की कोणत्या गोष्टीवर किती चर्चा करायची. किती लाख लोकं अंत्यविधीसाठी आले होते हा चर्चेचा विषयच कसा होउ शकतो ? म्हणजे जर समजा हजार लोकं आली तरी हेच लोकं पुढे होऊन म्हणणार की बघा बघा फक्त हजार लोकं आले, जर काही लाख लोकं आले, आणि हे मी म्हणत नाहीये तर सेनेचा द्वेश करणारे सर्व हिंदी+ ईंग्रजी चॅनल्स तेच सांगत आहेत, तर तो आकडा कसा चुकीचा आहे ह्यावर चर्चा चाललेय. काही लोकांना काहीतरी खुस्पट काढुन वादविवाद करण्यात जाम मजा येते हे गेल्या काही वर्षात मिपावर पाहिले आहे, तेच ह्यावेळी चालले आहे. जर तुम्हाला वाटत नसेल कि इतके लोकं आले होते, तर द्या ना सोडुन, त्यावर इतका वादविवाद करायची, अख्खा मॅप लेखावर चिकटवायची काय गरज आहे ? आणि मी कुठेही सेनानेत्यांनी बघा बघा किती लोकं आले म्हणुन टिमक्या वाजवलेल्या ऐकल्या नाहीत. इतके शिवसैनिक येऊन शांततेत परत गेले त्याबद्दल एक शब्दही नाही ? द्वेष माणसाला पुर्ण आंधळा बनवतो हेच खरं. जाता जाता- माझ्यासारखे असंख्य लोकं दिवसभर टिव्हि समोर खिन्न मनाने बसले होते व संध्याकाळी उद्धव, राज आणि तमाम सिवसैनिकांबरोबर आपले अश्रु थोपवण्याचा प्रयत्न करत होते. तो आकडा पकडलात तर २० लाख वरुन काही पटीत जाईल. माझा प्रतिसाद आवडला नसेल तर सोडुन द्या, पण गेलेल्या माणसाबद्दल किती स्कोअर सेट्ल करणार त्याचे तारतम्य बाळगा.

In reply to by अमोल खरे

मी हेच लिहिणार होतो, पण अमोल खरेसाहेबांनी माझे काम हलके केले. विकास-जींच्या प्रतिसादात एक मुद्दा खास होता तो कुणा-कुणाच्या लक्षात आला ते माहीत नाहीं. तो म्हणजे गर्दीचा आकडा बीबीसीनेसुद्धा त्याच्या आसपासचाच दिला. शिवाय पोलिसांच्या सरावलेल्या नजरेला गर्दीचा अगदी रास्त अंदाज असतो असा माझा अनुभव आहे. म्हणून तो आकडा जवळपास बरोबरच असावा असे मला वाटते. शेवटी एक गोष्ट लक्षात असावी ती ही कीं लोकमान्यांच्या चौपाटीला १९२० साली केलेल्या अंत्यविधीनंतर असा खुल्या आवारात अंत्यविधी फक्त बाळासाहेबांच झाला, तोही तब्बल ९२ वर्षांनंतर. इतर कुणाचाही नाहीं. यातच त्यांचे जनमानसातले स्थान स्पष्ट होते. बाळासाहेबांचे पार्थीव त्यांच्या घरातून बाहेर पडता-पडता मुंबईच्या पोलिसांनी त्यांना मानवंदना (बहुदा उस्फूर्तपणपणे) दिली ती कशाला? ते कुणी सरकारी नेते नव्हते. तरी पोलिसांनी आपण होऊन प्रेमाने ती दिली! शिवाजी पार्कवर त्यांना आदरांजलीही महाराष्ट्राच्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी वाहिली. त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने झाला ते सर्व हेच दर्शविते कीं बाळासाहेबांनी इतर कुठे राज्य केले नसले तरी मराठी लोकांच्या हृदयावर प्रेमाने राज्य केले. म्हणूनच "अस्सल मराठी प्रजा" या राजाला त्याच्या मृत्यूनंतरही एकनिष्ठच राहिली. अंत्ययात्रेला जमलेल्या जनतेच्या "आकड्यावरून" बाळासाहेबांच्या 'लायकीचा' जो पंचनामा इथे झाला त्याबद्दल वाचून मला खरेच मनापासून जे वाटले ते मी एका वाक्यात काल लिहिले होते. मी कित्येकदा माझ्या मित्रांत म्हणतो कीं पु.ल. जर बंगालात जन्मले असते तर त्यांना साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले असते. पण बिचारे मराठीभाषिक असल्याने त्यांच्या लेखनाचे चीज जे एरवी झाले असते ते नक्कीच झाले नाहीं. कुणाला पटो अथवा ना पटो. आपण मराठी लोकांनी इतरांकडून बोध घेतला पाहिजे. आपल्याच लोकांना हीन ठरविण्यात पुरुषार्थ (बायकार्थ) मानू नये. आपल्या मराठी नेत्यांबद्दल, इतर थोर व्यक्तींबद्दल शक्य तो चांगलेच बोलावे. चांगले बोलण्यासारखे कांहीं नसेल तर मौन पाळावे. कमीत कमी त्यांना कमी कसे लेखता येईल असे तरी कांहीं करू नये. 'मिपा'वरील किती लोकांना माझे म्हणणे पटेल कुणास ठाऊक, पण माझे हे मत आहे. बाळासाहेबांना आपल्या प्रशस्तीपत्राची गरज नाहीं. ते त्यापलीकडील नेते होते. पण आपणही त्यांचे मोठेपण ओळखून असावे. सूर्यावर थुंकू नये!

In reply to by अमोल खरे

जाता जाता- माझ्यासारखे असंख्य लोकं दिवसभर टिव्हि समोर खिन्न मनाने बसले होते व संध्याकाळी उद्धव, राज आणि तमाम सिवसैनिकांबरोबर आपले अश्रु थोपवण्याचा प्रयत्न करत होते. तो आकडा पकडलात तर २० लाख वरुन काही पटीत जाईल. माझा प्रतिसाद आवडला नसेल तर सोडुन द्या, पण गेलेल्या माणसाबद्दल किती स्कोअर सेट्ल करणार त्याचे तारतम्य बाळगा.>>>>>>>>>>> हे एकदम मस्त आवडले

In reply to by अमोल खरे

जाता जाता- माझ्यासारखे असंख्य लोकं दिवसभर टिव्हि समोर खिन्न मनाने बसले होते व संध्याकाळी उद्धव, राज आणि तमाम सिवसैनिकांबरोबर आपले अश्रु थोपवण्याचा प्रयत्न करत होते. तो आकडा पकडलात तर २० लाख वरुन काही पटीत जाईल. ------------------------------------------------------------------------- + १०११

काळेकाकांशी १००००००००००००००% सहमत्...माननिय बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत कायमच गर्दी जमवली आणि आता त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतल्यानंतर देखिल त्यांना निरोप द्यायला लाखोंची गर्दी उसळली होती हे इतिहासात कायमच नमूद झालय तेंव्हा आता जमलेल्या गर्दीच्या आकड्यावर खल करुन पुर्वग्रहाने पछाडलेल्या लोकांना आपला कंडू शमवून घ्यायचाच असेल तर त्यांनी तो जरुर घ्यावा पण त्याने सत्य बदलणार नाही.....ह घ्या आमचे बाळासाहेब हे लोकांचे लाडके होते(रस्त्यावर उतरलेल्या २५ लाख.लोकांचे देखिल आणि घराघरातून टिव्हीसमोर बसून अश्रू ढाळणार्‍या अनेकांचे ज्यांची मोजदाद कुणी केलेली नाही)..आमच्यासाठी हेच पुष्कळ आहे बाकी ज्यांना या गर्दीची आकडेमोड करायची हौस आहे त्यांनी ती खुशाल करावी.शेवटी इतकेच म्हणते "लवकर बरे व्हा" जय हिंद! जय महाराष्ट्र!

In reply to by अनामिका

सुरेख उत्तर, अनामिका! धन्यवाद वरुण-जी, श्री गावसेनाप्रमिख! इंटरफेल? तुम्ही तर डॉक्टरेट घेतलीत!

सुधिर का़ळे आणि अमोल खरे यांच्याशी सहमत...हेच लिहायचे होते पण मिपा वरील चर्चा भलतिकडे चालल्यने लिहिले नाही...आणि आकड्यांबाबत म्हणायचा तर मी तेथे उपस्तित होतो काहि वेळ आणि माझ्यासार्खेच हजारो-लाखो लोक होते जे काही वेळ थांबत आणि दर्शन घेउन निघुन जात होते ही गर्दि सकाळि ४-५ पासुन ते रात्री ८-९ पर्यंत सतत बदलती होति आणि तितकीच होति.े लोकं वेडी नाहीत उगाच काहिपण सांगायला..त्यामुळे किती जमले त्यातुन ही चर्चा करण्यापेक्षा मुतालिक काकांनी जो मुद्दा मांडला आहे त्यावर चर्चा झाली तर बरे होइल.

कित्येक वर्षे व कित्येक पिढ्या ज्याच्या आख्यायिका व दंतकथा सांगितल्या जातील; असा एक अजब माणूस होता, ज्याचे नाव बाळासाहेब ठाकरे. कारण त्यांना व्यक्तीगत भेटलेले व त्यांच्या सहवासाची संधी मिळालेले जेवढ्या भल्याबुर्‍या गोष्टी त्यांच्याबद्दल सांगतील, तेवढ्यच नव्हेतर त्यापेक्षा अधिक गोष्टी त्यांना न भेटलेले लोक त्यांच्याबद्दल सांगतील व सांगत रहातील. कारण ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. एक सहजपणे जीवन जगलेला व सहजपणे कुठल्याही परिस्थितीला सामोरा जाणारा, साधासरळ माणूस होता बाळासाहेब. आणि राजकीय अभ्यासक वा विश्लेषक म्हणुन विचाराल; तर ज्याला आपली अफ़ाट राजकीय तकद कळली सुद्धा नाही म्हणुन ज्याने तिचा पुरेपुर वापर केला नाही असा एक अनैच्छिक राजकारणी; असे मी या मनस्वी माणसाचे वर्णन करीन. ज्याने करोडो लोकांच्या मनात स्वत:विषयी चांगुलपणा जोपासण्यात आयुष्य वेचले व राजकारण शोधले, असा अलौकीक मानव. भाऊ तोरसेकर " पुर्ण लेख येथे वाचा http://jagatapahara.blogspot.in/2012/11/blog-post_26.html

WOW!

मी स्वतः टीव्ही बघतच नव्हते २-३ दिवस. पण २ ही दिवस bkcला आणि मुलुंडला जाउन आले. बस कंडक्टरशी बोलले. संध्याकाळी ठाण्यात ड्युटीवर असलेल्या पोलिसमावशींशी देखिल बोलले. कुठेही राडा सुरु नव्हता. बस् आणि ट्रेन्स नीट चालू होत्या. जास्तीच्या दादर ट्रेन्स सोडतायत असे दिसले. पण खरोखरच सगळे काही शिस्तीत झाले. शनिवारी बातमी आली तेंव्हाच माझा स्वतःचा दिवे लावायचा मूड पार निघून गेला. मी राहते तो भाग राष्ट्रवादीचा समजला जातो. पण बाहेर बघितले तर खरोखरच सगळीकडचे दिवे, रोषणाई बंद होती. ते दिवे परवा तुळशीच्या लग्नाला लागले. मधल्या दिवसात मी फटाक्यांचे आवाजसुद्धा ऐकले नाहीत. माझा असा अंदाज आहे हा दुखवटा उत्स्फुर्तच होता. त्यांच्या भाषणाला जशी उत्स्फुर्त गर्दी असयचे तसच...

लीमाऊ तुमच्या माझ्यासारख्या त्या बातमीने देखिल खिन्न झालेल्यांची संख्या फार मोठी आहे..मी सध्या ज्या देशात आहे तेथे देखिल माझ्या मैत्रिणींपैकी कित्येकांनी बातमी कळताच दिवाळी निमित्त केलेली रोषणाई काढून टाकली...

लेख आवडला. मराठी माणसाला स्वतःच्या क्षमतेचा अंदाज नाही कारण मराठी लोकांच्या मनात पद्धतशीरपणे न्यूनगंड निर्माण झालेला आहे. दुर्दैवाने, भरपूर शिकलेले मराठी लोक पुस्तकी ज्ञानाला आणि सोवळ्या वागणुकीला अतिशय गंभीरपणे घेतात आणि आपण खर्‍या दुनियेत वावरतो आहोत हे विसरून अतिडावेपणाकडे झुकत जातात. अशा वृत्तीच्या लोकांमुळे गुजराती वा मारवाडी समाजांप्रमाणे मराठी समाजात धनप्रतिष्ठा, श्रमप्रतिष्ठा आणि सपोर्ट नेटवर्क निर्माण झाले नाहीत. शिवसेनेने मराठी अस्मितेसाठी आणि हक्कांसाठी लढणे सुरु केले हे योग्यच झाले पण नंतर लोकांचा पाठिंबा मिळवल्यावर असे सपोर्ट नेटवर्क निर्माण करणे आणि काही क्षेत्रांमधली विशिष्ट एकाधिकारशाही कायदेशीर मार्गांनी कमी करणे आणि मराठी लोकांना विविध क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करणे हे त्यांना जमले नाही. त्यात महाराष्ट्रातले सोवळ्यातले विचारवंत शिवसेनेपासून चार हात लांबच राहिल्याने योग्य दिशा देण्याचे काम करणारेही कोणीच नव्हते आणि कोणी प्रयत्न केला असता तरी शिवसेनेतल्या एकाधिकारशाहीत त्याचा कितपत उपयोग झाला असता ही शंकाच आहे. ज्या माणसाने थोडेसेही जग पाहिले आहे त्या माणसाला तथाकथित सुसंस्कृत समाजांच्या मुखवट्याआडची हिंसा कळायला वेळ लागत नाही. जगातले अतिप्रगत आणि तथाकथित सुसंस्कृत समाज प्रत्यक्षात किती हिंसक आहेत हे कोणाला सांगायची गरज नाही असे वाटते. अशा परिस्थितीत शिवसेनेने आपल्याला जे योग्य वाटते त्याविरुद्ध आपल्या पद्धतीने कृती केली यात अगदी हीन असे काहीच नाही. शिवसेना कधीच गांधीवादी नव्हती त्यामुळे इतर गांधीवादी पक्षांपेक्षा त्यांनी जास्त अहिंसा बाळगण्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचेच होते. उलट अहिंसक निदर्शनांनी कधीच काहीही साध्य होत नसल्याने शिवसेनेने परिणामांची पर्वा न करता स्वतःला योग्य वाटेल त्यासाठी कृती केली याचे मला नेहमीच कौतुक वाटलेले आहे. परंतु नंतर नंतर शिवसेनेचे प्राधान्यक्रम बदलले आणि सत्तेसाठी राजकारण करणार्‍या इतर पक्षांसारखाच तो एक पक्ष झाला. एन्रॉन प्रकरण, मुंबई व्यतिरिक्त इतर महाराष्ट्रात काय प्रश्न आहेत त्याचे अज्ञान, महाराष्ट्र सोडून सत्तेसाठी हिंदुत्ववादाची धरलेली कास आणि घराणेशाहीवर खरपूस टीका करणार्‍या बाळासाहेबांनी स्वतःच्या मुला-नातवाच्याच हातात सूत्रे जाऊ द्यायचा आटापिटा करणे या आणि अशा गोष्टी शिवसेनेबद्द्लची आपुलकी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पुरेशा ठरल्या. लोकांवर भरपूर प्रभाव असूनही समाजाची उन्नती करण्यासाठी काय करायला पाहिजे हे माहित नसल्याने त्या प्रभावाचा फारसा दूरगामी परिणाम झाला नाही असे खेदाने म्हणावे लागते.

Thank you, Mr Vikas, for Loksatta article that covered information many like me didn't have!

In reply to by सुधीर काळे

Thank you, Mr. Sudhir, for thanking Mr. Vikas coz many like me did not say!

आपण २० लाखांवरच अडलोय तिकडे कार्यकारी संपादक प्रथम २५ अन आता ३५ लाखांवर पोचले आहेत ;-).

In reply to by श्रीरंग_जोशी

>>>>आपण २० लाखांवरच अडलोय तिकडे कार्यकारी संपादक प्रथम २५ अन आता ३५ लाखांवर पोचले आहेत हाहाहा. वाढू द्या आकडा. सॉरी चालु द्या आपलं... :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब काय हे ?इतकी सुद्धा लिबर्टी देणार नाही रोखठोककारांना?थोडेसे दर्यादिल व्हा .....५ ,२५ इकडेतिकडे झाल्याने काय फरक पडणार आहे...शेवटी सत्य तर बदलणार नाही ना?............. ;)

In reply to by अनामिका

:) आम्ही दर्यादिल माणूस असल्यामुळेच आता आकड्याचा विषय कोणी काढला की अगोदर त्यांच्या पायावर डोकं ठेवतो आणि वारक-याप्रमाणे पुढचा रस्ता धरतो. माणूस मोठा होता हे मान्यच आहे, ते कोणालाही मान्य व्हावं. पण, माणसाचा मोठेपणा सिद्ध करायला सारखे आकडे वाढवून वाढवून कशाला सांगायचे. :) [पळा आता] -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"माणूस मोठा होता हे मान्यच आहे, ते कोणालाही मान्य व्हावं. पण, माणसाचा मोठेपणा सिद्ध करायला सारखे आकडे वाढवून वाढवून कशाला सांगायचे"तेच तर ....डॉक्टरसाहेब अहो कोण तो आकडा वाढवतय ते तरी ध्यानात घ्या ? त्यांना आता आपणच शिवसेनाप्रमुख असल्याची स्वप्न पडत असतील असा कयास लावावा का?..

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहा. वाढू द्या आकडा. सॉरी चालु द्या आपलं
त्याचं काय आहे प्रा.डॉ. सुरुवातीला वीस लाख म्हणजे "लै भारी" आकडा वाटला होता. नंतर उमजले, जागतिक विक्रम आपल्या भारतातीलच - दीड कोटी (अण्णादुराई)- यांचा आहे. अगदी गेलाबाजार अयातुल्ला खोमेनीदेखिल ६०-७० लाख गोळा करून गेला होता. तेव्हा वीस लाख कमी वाटू लागला!! अवांतर - मुलगा आपल्या आईला म्हणतो, "आई, साप मेल्यावर त्याची लांबी वाढते का?". आई (आश्चर्यचकित), "नाही. का रे?" मुलगा, "बाबांनी काल बागेत साप मारला तो एक फूट होता. पण आत्ता शेजरच्या काकांना सांगताहेत की दोन फुटी होता!" (हा केवळ विनोद आहे. आणि तो विनोद म्हणूनच घ्यावा. उपमा वैग्रे बघायचा प्रयत्न करू नये!)

In reply to by सुनील

ते त्यांची बहादुरी दाखवताय साहेब की मि २/३/५ फुटी साप मारला आहे म्हणुन बाकी त्या उदाहरणात काही अर्थ नाही

जोशी रोखठोककार वहावत जातात हे सर्वशृत आहे.तेंव्हा आपल्या बुद्धीला पटेल इतकेच वाचायचे बाकी सोडून देणेच योग्य..

माणसाचा मोठेपणा सिद्ध करायला सारखे आकडे वाढवून वाढवून कशाला सांगायचे.
उगीच जास्त दिवस चर्चा करण्यात काही हाशिल नाही,आपण पन त्यांच्यासारखच वागुया ओठात एक अन पोटत एक असे नको. सत्यम शिवम सुंदरम