✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हू एम आय!

प
प्राजु यांनी
Wed, 08/20/2008 - 02:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18938 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

अ
अरुण मनोहर Fri, 08/22/2008 - 06:53 नवीन

मानवच सगळे

असेच अनुभव मलाही ठिकठीकाणी आले आहेत. सरहद फक्त नकाशाच्या कागदावर असते. जमीनीवर ती दाखवण्यासाठी भलेही कुंपण घालाल, पण दोन देशांमधील हवा कोणी कशी विभाजू शकेल? देशांदेशांमधील राजकारण मानवी मनात सरहदी उभारते. आपण नागरीक त्या सरह्दींचे काटेरी कुंपण मनात तयार करतो. प्राजू, तुमचा लेख वाचून असेच काही विचार अस्वस्थ करून गेले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/22/2008 - 07:02 नवीन

प्राजू,

प्राजू, लेख चांगला आहे, आता वावरताना, कोणी पाकिस्तानी, बांग्लादेशी दिसला तर हा आपल्या भागतला आहे आणि आपल्या सारखाच सामान्य आहे ही आणि हीच भावना फक्त मनांत येते. सामान्य पाकिस्तानी नागरीक असेलही आपल्यासारखाच सामान्य आणि शांतताप्रिय परंतु पाकिस्तानी राजनितीतले लोक हे भारताचे दुश्मनच आहेत. भारतात दहशतवादी कारवाया करणार्‍या आयएसाय सारख्या संघटनांना त्यांचीच फूस आहे..! असो, आपला, (भारतीय) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Fri, 08/22/2008 - 07:03 नवीन

तुमचा लेख

तुमचा लेख विचार करायला भाग पाडतो आहे. कुठल्याच बाजूचा निष्कर्ष मांडायचा तुमचा अट्टाहास नाही ही अजून एक लाजवाब गोष्ट. सानियाच्या एका कादंबरीतली एक आजी म्हणते, प्रत्येकाला तपासताना थोडी जागा ठेवावी. ती कुठे, कशी भरून निघेल सांगता येत नाही... त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/22/2008 - 07:21 नवीन

अलिकडेच

अलिकडेच कारगिलच्या युद्धात आम्ही पाकड्यांना धूळ चारली आहे. भारतामध्ये बाँबस्फोट घडवून त्यांच्या अश्याच जर दहशतवादी कारवाया सुरू राहिल्या तर पुन्हा एकदा त्यांना माती चारायची वेळ येईल. भारतातीत दहशतवादी कारवायांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचाही हात नेहमीच असतो! आणि सामान्य नागरीक, मग तो कोणत्याही देशाचा का असेना, तो शांतताप्रियच असतो. माझ्यासारखा भारतीय सामान्य नागरीकही शांतताप्रियच आहे. तेव्हा पाकिस्तानच्या नागरीकांचे त्यात काही विशेष कवतिक आहे असं मला तरी वाटत नाही! पाकिस्तान आमचा दुश्मन आहे आणि राहील! या निमित्ताने कारगिलच्या धुमश्चक्रीत कामी आलेल्या सर्व भारतीय जवानांना मी श्रद्धांजली वाहतो. अजून एक - सुदैवाने माझ्याच देशात रहात असल्यामुळे मी भारतीय म्हणूनच ओळखला जातो. इथे येऊन कुणी गोरा मला 'एशियन' म्हणून शकत नाही! मी भारतीय आहे आणि भारतीयच राहीन. माझा देश मला जी काही दोन वेळची रुखीसुखी भाकरी देतो त्यातच मी समाधानी आहे! 'हू ऍम आय' हा प्रश्न मला तरी कधी पडला नाही आणि यापुढेही पडू नये एवढीच इच्छा आहे! आपला, (आधी भारतीय आणि मग एशियन वगैरे वगैरे!) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 08/22/2008 - 07:52 नवीन

देशाभिमान

तात्याराव तुमचा जाज्वल्य देशाभिमान कौतुकास्पदच आहे. औद्योगीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या ह्या युगात देशप्रेमाची आठवणच करून द्यावी लागते. तुम्ही म्हणालात, "आणि सामान्य नागरीक, मग तो कोणत्याही देशाचा का असेना, तो शांतताप्रियच असतो. माझ्यासारखा भारतीय सामान्य नागरीकही शांतताप्रियच आहे. तेव्हा पाकिस्तानच्या नागरीकांचे त्यात काही विशेष कवतिक आहे असं मला तरी वाटत नाही!" मला नाही वाटत, अशा सामान्य माणसाचे कौतूक करण्यासाठी हा लेख होता. मुद्दा हा की आपण सारे शांतताप्रीय आहोत, तर मग ही दुशमनी कां? हा रक्तपात, निरपराध लोकांची हत्या कां? ह्याचे उत्तर म्हणून त्याने असे केले म्हणून मीही तसेच करीन हे म्हणणे सोपे आहे. तेच आपण आजवर करीत आलो आहोत. ते सोडून आपण अखंड भारताची स्वप्ने पुन्हा पहायला का लागू नये? ब्रीटीशांनी त्यांच्या गलीच्छ राजकारणासाठी आपल्याला झुंजवले. आजही ते लोक गेल्यावर आम्ही सुंदोपसुंदी करीतच आहोत. हा खंडप्राय देश पुन्हा एक झाला तर आजच एक महासत्ता म्हणून उभारेल. कोणी असेही म्हणेल की भारत एकटाच आज महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. पण तसे असूनही, अखंड भारताची एकी ह्या प्रोसेस मधे वेग आणेल. पण राजकारणी लोकांनी ह्या दिशेने पाऊल टाक्न्ञासाठी आधी सामान्य नगरीकांनी मनातील दुशमनी संपवली पाहीजे. तात्याराव, तुम्ही म्हणालात, "सुदैवाने माझ्याच देशात रहात असल्यामुळे मी भारतीय म्हणूनच ओळखला जातो. इथे येऊन कुणी गोरा मला 'एशियन' म्हणून शकत नाही!". उद्योगासाठी तुम्हाला देशोदेशी जावे लागले नाही, तुम्ही खरेच सुदैवी आहात. ज्यांना देशाबाहेर राहून इतर देशातल्या नागरीकातला सामान्य माणुस पहाता आला, त्यांना मनामनांत घातलेली सरहदींची कुंपणे तोडायला कदाचित सोपे झाले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 08/22/2008 - 17:29 नवीन

मला नाही

मला नाही वाटत, अशा सामान्य माणसाचे कौतूक करण्यासाठी हा लेख होता. मला मात्र तसेच वाटले! असो... तर मग ही दुशमनी कां? हा रक्तपात, निरपराध लोकांची हत्या कां? ते कृपया पाकिस्तानी अतिरेक्यांना विचारा... उद्योगासाठी तुम्हाला देशोदेशी जावे लागले नाही, तुम्ही खरेच सुदैवी आहात. अगदी खरं आहे. खरंच मी सुदैवी आहे. दोन वेळची मानाची भाकरी कमवण्याइतपत शिक्षण, संधी मला माझ्या मातृभीमीने दिली आहे! ती मला माझ्या मातृभूमीतच मिळत आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अवलिया Fri, 08/22/2008 - 19:43 नवीन

वा तात्या

वा तात्या वा अगदी खरं आहे. खरंच मी सुदैवी आहे. दोन वेळची मानाची भाकरी कमवण्याइतपत शिक्षण, संधी मला माझ्या मातृभीमीने दिली आहे! ती मला माझ्या मातृभूमीतच मिळत आहे! मी पुढे असे म्हणेन की जर संधी मिळाली नाही तर मी ती मातृभुमीतच मिळवेन व इतरांना पण उपलब्ध करुन देईन जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्राजु Fri, 08/22/2008 - 08:07 नवीन

लेख

लेख लिहिताना मी कोणत्याही संदर्भात असे म्हंटले नाही की, मला भारतीय असल्याचा अभिमान नाही. किंबहुना या लेखाचा खटाटोप कोणाला किती देशप्रेम आहे हे समजण्यासाठी नाहीच आहे. मी भारतीयच आहे आणि नेहमीच राहणार आणि मला तात्यांच्या पेक्षा २ % जास्तच माझ्या देशाचा अभिमान आहे. मी पाकिस्तान बद्दलही कुठे काही वाइट लिहिलेले नाहीये. मी मानसिकतेबद्दल लिहिले आहे. मी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. माझी मानसिकता बदलली... इतकंच. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण, मराठा, कोळी.. इतर अनेक जाती उपजाती आहेत. वर करणी शांत असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद असतातच. पण जेव्हा भैय्या लोकांविरूद्ध लढायची वेळ आली तेव्हा सगळा महाराष्ट्र उभा राहिला... हेच लॉजिक मी इथे वापरले आहे. यातून कोणी कोणत्या निष्कर्षापर्यंत यावे अशी अपेक्षा नाही. लेखामध्ये मांडलेली मते ही केवळ माझीआणि माझीच आहेत. ती कोणावरही लादण्याचा माझा प्रयत्न नाही आणि कधीही नसेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 08/22/2008 - 17:36 नवीन

मी भारतीयच

मी भारतीयच आहे आणि नेहमीच राहणार आणि मला तात्यांच्या पेक्षा २ % जास्तच माझ्या देशाचा अभिमान आहे प्राजू, माझ्या प्रतिसादात तुला किती देशाभिमान आहे किंवा नाही याचा मी कुठेही उल्लेख केलेला नाही. तुझा लेख हा सामान्य पाकिस्तानी माणसाबद्दल आहे आणि कुठल्याही देशाचा सामान्य नागरीक हा शांतताप्रियच असतो असे मीही म्हटलेले आहे. तुझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे सामान्य पाकिस्तानी नागरीक हा जरी कितीही शांतताप्रिय असला तरी 'पाकिस्तान' हा मात्र भारताचा कट्टर दुश्मनच आहे आणि राहील इतकाच माझा मुद्दा होता. सबब, तुझे वरील वाक्य हे व्यक्तिगत असून मला ते गैरलागू वाटते! बाकी, जेव्हा जेव्हा पाकिस्तानी पाणी भारताच्या डोक्यावरून जाऊ लागेल तेव्हा तेव्हा पाकिस्तानला गर्दीस मिळवण्यास भारत समर्थ आहेच! असो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
A
anilanantbhate Sat, 08/23/2008 - 15:14 नवीन

फारच छान

फारच छान प्राजु! आपन एका मुलभूत् विशयाला हात घातला आहात. मानवी मनाचे सहज सूलभ दर्शन आपल्या लेखातून घदत.! होय. भारतीय आनी पाकिस्तानी दोघन्मधेही उददामाजी काले गोरे असा केवल एका रेघे एवधाच सूक्श्म फरक आहे. म्हनुनच तर तिसर्या जगान्त ते एशिअन्स म्हनूनच ओलखले जातात. एके कालच्या अखन्द भारतातील भावन्द्,शेजारी राश्त्र (शत्रु राश्त्र ही असतील) पन सर्वसामान्य प्रजेच काय! प्रत्येक गोश्तीकदे राजकीय चश्म्यातून पाहून पाहून ज्यान्ची मन निबर झाल्येत्,चिन्तन शिबिरान्तील बौध्धिक घोतून आनी घोतवून घेतलेल्या मनावर एवधी पूत चधली आहेत , तेन्वा लक्शान्त कोन घेतो! आपनच कसे बावन्न कशी देश प्रेमी हे दाखवून देन्याचीच स्पर्धा चालू आहे प्रतिक्रिया देनार्यान्कदून!भारतीयत्वाचे थेकेदार बनता बनता जो विवेक सामान्य पाकिस्तानी स्त्रीया दाखवू शकतात, तो ही या धुध्धाचार्यान्कदे औशधाएवधाही नाही याच फार वैशम्य वातत.सार जग आज भारतामधे चालू असलेल्या मानवतेच्या एका अभिनव अद्भूत प्रयोगाकदे, आशेने आनी कौतुकाने दोले लावून बसले आहे.क्शमा, करूना आनी सहिश्नुता, असा आपला सान्स्क्रुतिक वारसाच आपन विसरत चाललो आहोत. भारतीय आनि पाकिस्तानी ,त्या एकमेकान्शी निर्व्याज, निरागसतेने खेलनार्या मुलाना काय कल्पना कि आपापल्या देशानी क्रूर, राक्शसी व्रूत्ती अन्गिकार्न्यामधे केवधी मोथी झेप घेतली आहे! आपली बदललेली मानसिकता अगदी १००%योग्य आहे. आपन मानस आहोत आनी हे मानुस पन आपन विसरला नाहीत हीच मोथी दिलासादायक गोश्त आहे. " जो जे वान्छील तो ते लाहो" अस साअन्गनार्या ज्ञानेशराना तर आम्ही विसरलेलोच आहोत, आपन कार्यपरत्वे दूर देशी असूनही ही मुल्य जपताहात, याबद्दल शतशः धन्यवाद आनी अभिनन्दन सुध्धा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मुक्तसुनीत Fri, 08/22/2008 - 07:25 नवीन

लेख

लेख आवडला. साध्या भाषेतला , एका साध्या माणसाला काय वाटते ते सांगणारा. वर तात्यांनी म्हण्टल्याप्रमाणे, सामान्य माणसांना युद्धे, हिंसा यापैकी काही नको आहे ; पण ... माणूस चांगला असतो , जमाव वाईट. सामान्य जनता शांतताप्रिय असते , पण सत्ताकेंद्रे कारस्थाने करणारी. मी मध्यंतरी http://www.anothersubcontinent.com/forums या मिसळपाव सारख्याच , पण इंग्रजी साईटवर जायचो. नावच पहा : अनादर सब्काँटीनेंट डॉट कॉम. अपेक्षेप्रमाणेच तिथे प्रामुख्याने आपल्या देशातले , पाकिस्तान, बांगलादेशातले (आणि या देशाची पार्श्वभूमी असणारे नॉन रेसिडेंट ) लोक येतात. आपल्या उपखंडातल्या अनेकानेक गोष्टींची चर्चा होते. इतर देशीच्या लोकांना आपल्याबद्दल वाटणारी आपुलकी , मते मतांतरे याचे रंगीबेरंगी चित्र तिथे अव्याहतपणे पहायला मिळते. प्राजु यांनी जे लिहीले त्याचेच प्रत्यंतर तेथेही येते...
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 08/22/2008 - 08:40 नवीन

क्या बात है ...

>> माणूस चांगला असतो , जमाव वाईट. सामान्य जनता शांतताप्रिय असते , पण सत्ताकेंद्रे कारस्थाने करणारी. ह्या वाक्यालाच आधी दाद गेली... तुम्हाला भेटायला फार मजा येईल राव. नेमके मी इस्ट कोस्ट जीटीजीला नव्हतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Fri, 08/22/2008 - 07:25 नवीन

लेख

लेख आवडला. साध्या भाषेतला , एका साध्या माणसाला काय वाटते ते सांगणारा. वर तात्यांनी म्हण्टल्याप्रमाणे, सामान्य माणसांना युद्धे, हिंसा यापैकी काही नको आहे ; पण ... माणूस चांगला असतो , जमाव वाईट. सामान्य जनता शांतताप्रिय असते , पण सत्ताकेंद्रे कारस्थाने करणारी. मी मध्यंतरी http://www.anothersubcontinent.com/forums या मिसळपाव सारख्याच , पण इंग्रजी साईटवर जायचो. नावच पहा : अनादर सब्काँटीनेंट डॉट कॉम. अपेक्षेप्रमाणेच तिथे प्रामुख्याने आपल्या देशातले , पाकिस्तान, बांगलादेशातले (आणि या देशाची पार्श्वभूमी असणारे नॉन रेसिडेंट ) लोक येतात. आपल्या उपखंडातल्या अनेकानेक गोष्टींची चर्चा होते. इतर देशीच्या लोकांना आपल्याबद्दल वाटणारी आपुलकी , मते मतांतरे याचे रंगीबेरंगी चित्र तिथे अव्याहतपणे पहायला मिळते. प्राजु यांनी जे लिहीले त्याचेच प्रत्यंतर तेथेही येते...
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 08/22/2008 - 07:32 नवीन

असेच अनुभव

शेजार्‍यांकडून आणि कामाच्या ठिकाणच्या सहकार्‍यांकडून आला आहे. आता अन्य लोकांचा अनुभव आहे, की पाकिस्तानी लोक गोड बोलून फसवतात. माझा तसा अनुभव नाही. कदाचित कोणी फसवू शकेल इतका भरवसा मी अनोळखी किंवा कमी ओळख असलेल्या व्यक्तीवर टाकत नाही. बाकी "बिहारी लोक एकमेकांत संगनमत करून आपल्या इकडे घुसखोरी करतात" असे ऐकून आहे. त्यामुळे गोव्याबाहेरचे वेगवेगळ्या प्रांतातले, देशांतले घाटी लोक मिळून गोड बोलून कपट करतात असे जाणवते. म्हणूनच सर्व घाटी लोकांशी काळजीपूर्वक व्यवहार केलेलाच बरा. (गोव्यातले सहिष्णू लोक मात्र एकमेकांशीच भांडत राहातात.) भांडकुदळ गोवेकरांशी तर फारच काळजीपूर्वक व्यवहार करतो.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 08/22/2008 - 07:34 नवीन

विचार प्रवर्तक लेख

आवडला. मुख्य म्हणजे लेखातला विचार मांडण्यातला प्रामाणिकपणा आवडला. (प्रामाणिक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 08/22/2008 - 07:50 नवीन

सुंदर लेख.

लेख खुप छान आहेस प्राजु, >>>>>>>>>>गोर्‍या फिरंग्यांमध्ये आपल्या कातडीच्या रंगाशी जुळणारा रंग,आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणारि संस्कृती, आपल्या बोली भाषेशी मिळती जुळती असणारी बोलीभाषा या घटकांमुळेच बहुधा इथे भारतीय किंवा पाकिस्तानी अशी आयडेंटीटी न रहाता ती 'एशियन' अशी होते. गोर्‍यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं. हे खरं आहे.
  • Log in or register to post comments
व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/22/2008 - 08:15 नवीन

इन्फोसिस, विप्रो, टीसीएस

कुठे आहात ? ह्या सर्व कंपन्यांनी पाकिस्तानात ऑफिसे उघडायला हवीत. पाकिस्तानातले अनेक इंजिनेर इकडे अमेरिकेत येतात. ह्या कंपन्यांना सध्यापेक्षा ४०% प्रतिवर्ष वाढायचे असेल, तर डोकेबाज एम्प्लॉयीज पाकिस्तानात मिळतील. चीन मध्ये नाही. कुणी ऐकते आहे का रे ? -- वैद्य
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 08/22/2008 - 08:20 नवीन

केल्याने देशाटन

अनुभव प्रातिनिधीक. लेख अतिशय आवडला. थोडी संवेदनशीलता मनात जपलीच पाहीजेच व मानसीकता बदलण्याचे धाडस असले पाहीजे. इतिहासाचे ओझे झुगारुन नवा इतिहास घडवायला जमले पाहीजे, नाहीतर कुठल्याही कारणावरुन माणसामाणसातली दरी ही कधीच बुजली जाणार नाही. देश विदेशच्या लोकातील अंतरे सोडा तर अगदी साडेतीन टक्यातील लोकात पण पुणे वा मुंबई किंवा कोकणातले वा देशावरचे, मराठी वा इंग्रजी बोलणे, ह्या २१ व्याशतकातील सुशिक्षीत समाजात, त्यातुन निवडक प्रगत लोकात जर अजुनही गंभीरपणे स्थान, भाषा वादावादी होत असेल तर काय बोलायचे? मूळ लेखातील विचारांना अजुन थोडे पुढे नेउन फक्त "एशियन" का आपल्यासारख्या न दिसणार्‍या माणसांबद्दल पण कुठलीही अढी वाटली नाही पाहीजे. लहान मुलांना हे किती सहज जमते.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 08/22/2008 - 08:24 नवीन

लेख छान

लेख छान वाटला... इकडे मला असे अनुभव नाही आले ... पन ब-याचदा चॅट वगैरे करताना पाकिस्तानी लोकाशी संवाद झालाये.. आणी त्यातुन एक गोष्ट जाणवली की ह्या लोकाना भारत देशा विषयी फार कुतुहल आहे .. एव्हन भारताची प्रगती मीडीया ज्याप्रकारे जगाला दाखवते आहे ते पाहुन..... असो !! चायनीज लोक सुद्धा इंडीयन म्हटल की अतिशय स्पेशल नजरेने बघतात .. आणी अभिमान वाटतो की, आय यम इंडीयन !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 08/22/2008 - 08:45 नवीन

सुरेख लेख आहे प्राजू

देशाबाहेर पडलो की काही गोष्टींकडे बघायचा कॅलिडोस्कोप बदलतो... ह्याचा अर्थ असा नाही की भारतीय म्हणून देशाभिमान कमी होतो. मला ही असे अनुभव आले आहेत जिथे पाकिस्तानी, अफगाणी सामान्य माणूस शांतताप्रिय भेटलाय. आम्ही तर मटण - चिकन आणायला आठ - पंधरा दिवसातून पाकिस्तानी दुकानात जातोच. क्रिकेटपासून सियासत पर्यंत भरपूर गप्पा होतात.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 08/22/2008 - 09:36 नवीन

लेख खुप

लेख खुप छान आहे . गोर्‍या फिरंग्यांमध्ये आपल्या कातडीच्या रंगाशी जुळणारा रंग,आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणारि संस्कृती, आपल्या बोली भाषेशी मिळती जुळती असणारी बोलीभाषा या घटकांमुळेच बहुधा इथे भारतीय किंवा पाकिस्तानी अशी आयडेंटीटी न रहाता ती 'एशियन' अशी होते. गोर्‍यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं. एकदम सही!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 08/22/2008 - 09:42 नवीन

अनुभव

अनुभव वाचायला आवडले प्राजु ! मस्त लेख.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/22/2008 - 09:48 नवीन

प्राजू तू तुझा अनुभव चांगल्या रीतीने शब्दबद्ध केला आहेस.

गाव, जिल्हा, राज्य, देश, परदेश असं आपलं क्षितिज विस्तारत जाताना माणसांबद्दलचे विचारही बदलत जातात, माझे बदलले. सामान्य माणसाला एक शांत आयुष्य जगण्यात रस असतो आणि अशा इच्छेला देश-कालाच्या सीमा नसतात. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 08/22/2008 - 10:28 नवीन

प्राजु, लेख खूप आवडला!!

माणूस कितीही बुद्धिमान असला तरी देशात आणि देशाबाहेर राहून त्याच्या समजुतीत फरक हा पडतोच!! समर्थांनी "केल्याने देशांतर..." उगीचच म्हट्लेलं नाहीये!!!! भारतात राहून पाकिस्तानी अणि चिनी हे आपले शत्रू म्हणुन ओळखले जातात! आपल्या सरकारने आपल्याला तसंच शिक्षण दिलंय!! कोण म्हणतो भारत सरकार प्रोपगान्डा करत नाही म्हणून? तसे नसते तर भारत सरकारने आजवर "ब्रूक्स-हेंन्डरसन" रिपोर्ट क्लासिफाईड करून ठेवला नसता!! भारत सरकार आजवर हीच भूमिका त्याच्या नागरिकांवर बिंबवत आलेलं आहे की चीनने भारतावर आक्रमण केलं, भारताची काहीही आगळीक नसतांना!! वरील रिपोर्ट या भूमिकेला छेद देणारा होता आणि आज जी काही जागतिक कागदपत्रे प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून हेच सिद्ध होतं नेहरूंनी कारण नसतांना हे आक्रमण ओढवून घेतलं...... पाकिस्तान्यांबद्दलही तेच! सर्वसाधारण पाकिस्तानी जनतेला आज भारतीयांबद्दल आपुलकीच वाट्ते! हां, आयएसाआय सारख्या संस्था वैर कसं वाढावं याचे प्लान करीत असतात पण रॉ सुद्धा तेच करत असते! नाहीतर रॉ सारख्या संस्थेचे भारतात काम काय? पाकिस्तानात जशी काही अतिरेकी मंडळी आहेत तशीच भारतात सुद्धा आहेत जी अखंड हिंदुस्तानची स्वप्ने पहात आहेत. अशा लोकांचा सामान्य (भारतीय वा पाकिस्तानी) जनतेच्या मनोगताशी काहीही संबंध उरलेला नाही!!! तिसर्‍या देशात गेल्यामुळे आपल्या भूमिका अधिक विशाल होत जातात! दुसर्‍या देशांच्या मानसिकतेबरोबरच आपल्या सरकारची चालबाजीही कळत जाते. तिसर्‍याच देशांची नि:पक्षपाती कागदपत्रे पहायला मिळतात (उदा. हारवर्ड लायब्ररी , युनायटेड नेशन्स पेपर्स, वा पेंटॅगॉन पेपर्स!) स्वतःची अशी एक भूमिका बनवता येते!! आमच्यापुरते म्हणाल तर उद्या आमच्या अब्दुलखानाला जर कोणी भारतीय उगाच तो पाकिस्तानी आहे म्हणुन त्रास देऊ लागला तर आम्हीच त्या भारतीयाची हाडे नरम करू!! भारतमाता की जय!!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/22/2008 - 10:41 नवीन

पिडाकाका,

हां, आयएसाआय सारख्या संस्था वैर कसं वाढावं याचे प्लान करीत असतात पण रॉ सुद्धा तेच करत असते! नाहीतर रॉ सारख्या संस्थेचे भारतात काम काय? आपल्या वरील विधानाला आक्षेप आहे. प्रत्येक देशाला गुप्तहेर खाते जरुरीचे आहे. रॉ (रिसर्च अँड ऍनालिसिस विंग) आणि सी.बी.आय. (सेंट्रल ब्यूरो ऑफ इनवेस्टिगेशन) ह्या दोन संस्था भारताची अंतर्गत सुरक्षाव्यवस्था कशी मजबूत राहील. कटांचे सुगावे कसे लागतील ह्याबाबत काम करीत असतात. आय्.एस्.आय, ने मुंबईत जे बाँबस्फोट घडवून निरपराध माणसे मारली तसली भ्याड कृत्ये आपल्या गुप्तचर संघटनांनी केलेली नाहीत. माझ्या माहीतीत रॉ किंवा सीबीआयवर असले घाणेरडे आरोप कधीही झालेले नाहीत. तेव्हा त्यांची तुलना ही अयोग्य आहे. आयएसाअय ही एक पक्की विद्वेषी संघटना आहे आणि केवळ भारतद्वेष हाच त्याचा ऍजेंडा आहे हे वारंवार सिद्ध झालेले आहे. उगीच सत्य नकारण्यात काही हशील नाही! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Fri, 08/22/2008 - 11:00 नवीन

खरंच!

आय्.एस्.आय, ने मुंबईत जे बाँबस्फोट घडवून निरपराध माणसे मारली तसली भ्याड कृत्ये आपल्या गुप्तचर संघटनांनी केलेली नाहीत. याची तुम्हाला कशावरून खात्री वाटते? भारतीय वृत्तपत्रे वाचून? आणि भारताच्या हेरांनी तशी कॄत्ये तुमच्या म्हणण्यानुसार जर केली नसतील तर ते कुचकामी ठरत नाहीत काय? इन्टेलिजन्स एजन्सी वा हेरांचे ते एक कामच नाही काय? माझ्या माहीतीत रॉ किंवा सीबीआयवर असले घाणेरडे आरोप कधीही झालेले नाहीत. चतुरंगा! सीबीआय फक्त इन्टर्नल अफेअर्स बघते आणि तिच्या नांवावर अशी कॄत्ये भरपूर आहेत (पहा: हूव्हर ऍडमिनिस्ट्रेशन!) परकीय देशात सीबीआय नव्हे तर सीआयए धिंगाणा घालते!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Fri, 08/22/2008 - 11:32 नवीन

निरपराध माणसे मारणे हे हेरांचे काम?

पिडाकाका? परदेशात काही कारण नसताना बाँबस्फोट घडवून निरपराध माणसे मारणे हे हेरांचे काम असते??? तर मग अशा कामात रॉ ही अजून 'रॉ'च आहे ह्याचा मला अभिमान आहे!! भारतीय वृत्तपत्रे वाचून कशाला मत बनवायचे अहो. भारतातल्या प्रत्येक गोष्टीवर डोळा ठेऊन बसलेले बीबीसी, सीएनएन सारखी चॅनल्स काय असल्या बातम्या सोडणार आहेत? पराचा कावळा करण्यात आणि भारताची प्रतिमा मलीन करण्यात हे अग्रेसर आहेत. रॉने एक जरी असे काम केले असते तरी त्याचा जगभर गाजावाजा केला असता ह्यांनीच! सीबीआय चा उल्लेख मी अनवधानाने केला, क्षमस्व, मला आयबी म्हणायचे होते! आणि तुम्ही अमेरिकेचे सीआयए म्हणताय त्यांनी तर जगभर नंगानाचच घातलेला आहे, त्यांच्याशी केजीबीचीच तुलना! (हूवर ऍड्मिन. चा संदर्भ समजला नाही?) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Fri, 08/22/2008 - 12:17 नवीन

अरे. आपण

अरे. आपण निरपराध माणसे म्हणतो (अणि ते खरेही आहे!) पण त्यांच्या दृष्टीने हा शत्रूराष्ट्रात केवळ गोंधळ उडवणे नाही काय? आज पाकिस्तानातही तालिबान्यानी ऍम्यूनेशन फॅक्टरीच्या बाहेर हेच केले नाही काय? अरे आपल्या भारतात अंतर्गत हेरगिरीसाठी सीबीआय आहे. तिच्या नांवावरही अनेक कॄष्णकॄत्ये (रेफः आणिबाणी) जमा आहेत. रॉ ही परदेशात हेरगिरी करण्यासाठीचीच संस्था आहे. नाहीतर ती सीबीआयची रिडंडन्सी ठरली नसती का?:) (हूवर ऍड्मिन. चा संदर्भ समजला नाही?) माझा रेफरन्स हूव्हर ऍडमिनिस्ट्रेशन च्या काळात अनेक पोलिटिकल विरोधकांना एफबीआयने 'कम्यूनिस्ट" ठरवुन त्यांची छळवणूक केल्याबद्दल होता. जगात अशी कोणतीही हेरगिरी करणारी (बाह्य वा अंतर्गत!) यशस्वी संस्था नाही की जिच्या खात्यावर काही कृष्णकृत्ये जमा नाहीत. पण त्याबद्दल मला फारशी काळजी नाही! कारण तशी नसतील तर ती फार इफेक्टीव्ह हेरगिरी संस्था आहे असे म्हणता येणार नाही. पण आपण जरा रियलिस्टिक झालेले बरे नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
आ
आनंदयात्री Fri, 08/22/2008 - 11:03 नवीन

सहमत

रंगाशी सहमत ! >>नसते तर भारत सरकारने आजवर "ब्रूक्स-हेंन्डरसन" रिपोर्ट क्लासिफाईड करून ठेवला नसता!! भारत सरकार आजवर हीच भूमिका त्याच्या नागरिकांवर बिंबवत आलेलं >>आहे की चीनने भारतावर आक्रमण केलं, भारताची काहीही आगळीक नसतांना!! वरील रिपोर्ट या भूमिकेला छेद देणारा होता आणि आज जी काही जागतिक कागदपत्रे >>प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून हेच सिद्ध होतं नेहरूंनी कारण नसतांना हे आक्रमण ओढवून घेतलं कदाचित हे सत्यही असेल ! काका तुम्ही काही दुवे देउ शकता का या वरच्या विधानांच्या समर्थनार्थ ? दिल्यास आमच्या माहितीत भर पडेल. एक वैयक्तिक अनुभवः जिवाभावाचा खान आडनाव लावणारा मित्र. सगळ्या अडिअडचणीत धावुन येणारा, मित्र म्हणुन अगदी जिवलग. माझे शेखशी भांडण झाल्यावर तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करणारा, वेळप्रसंगी (हाणामारीत) अचानक पणे त्याची बाजु घेणारा. नंतर येउन कौमची कारणे देउन समजवायचा प्रयत्न करणारा. आनंदयात्री, शेख, खान यांच्या निष्ठा भारतभुशीच आहेच हे पक्के ! उदाहरण कोणत्याही अभिनिवेशातुन दिलेले नाही. अशा पार्श्वभुमीवर भारतीयाची हाडे नरम करण्याची भाषा एकवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
पिवळा डांबिस Fri, 08/22/2008 - 11:24 नवीन

दुवे!

कदाचित हे सत्यही असेल ! काका तुम्ही काही दुवे देउ शकता का या वरच्या विधानांच्या समर्थनार्थ ? दिल्यास आमच्या माहितीत भर पडेल. प्राथमिक माहितीसाठी वाचा: "वादळ माथा" श्री. यशवंतराव चव्हाणांची बायोग्राफी, लेखकः राम प्रधान, राज्यपालः अरुणाचल प्रदेश आणि मग त्यातून कागदपत्रे बॅकट्रेस करीत जा!! अशा पार्श्वभुमीवर भारतीयाची हाडे नरम करण्याची भाषा एकवत नाही. आम्हालाही असे लिहितांना फारसे सुख होते असे नाही पण न्यूयॉर्कमध्ये राहून असे विचित्र प्रसंग आम्ही पाहिले आहेत. निरपराध पाकिस्तानी अब्दुल (किंवा आणखी कोणितरी) खान व त्याला उगीचच त्रास देणारा भारतीय बांधव!! नाही, पूर्ण विचाराअंती आम्ही तरी त्या अब्दुलखानाचीच बाजू घेऊ!!!! भारतमातेने आम्हाला तेच शिकवलंय, दुर्बलांचा, अनाथांचा कैवार घे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
च
चतुरंग Fri, 08/22/2008 - 11:42 नवीन

चीनबद्दल आपल्या नेतृत्त्वाची अक्षम्य

डोळेझाक आणि सरदार पटेलांसारख्या द्र्ष्ट्याची दूरदृष्टी नाकारणे असला टोकाचा करंटेपणा घडलेला आहे. ह्यात आपल्या गुप्तहेर खात्याची काही चूक असण्यापेक्षा आपल्या त्यावेळच्या नेतृत्त्वाचा दुबळेपणा झाकण्यासाठी ब्रूक्स्-हेंडरसन रिपोर्ट क्लासिफाईड झालाय! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
प
पिवळा डांबिस Fri, 08/22/2008 - 11:54 नवीन

थॅन्क्यू!!

थॅन्क्यू!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
आ
आनंदयात्री Fri, 08/22/2008 - 11:58 नवीन

धन्यु

धन्यु :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
संदीप चित्रे Fri, 08/22/2008 - 19:46 नवीन

बरोबर आहे रे रंगा..

रॉबाबत तुझ्याशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर Sat, 08/23/2008 - 00:15 नवीन

आमच्यापुर

आमच्यापुरते म्हणाल तर उद्या आमच्या अब्दुलखानाला जर कोणी भारतीय उगाच तो पाकिस्तानी आहे म्हणुन त्रास देऊ लागला तर आम्हीच त्या भारतीयाची हाडे नरम करू!! जळ्ळं मरायला आम्ही कशाला तुझ्या त्या अब्दुलखानला त्रास देऊ? त्याला त्रास देण्याचा आमचा काय संबंध? तो मोठा त्याच्या घरचा! साला, आम्हाला काय पडली आहे त्याला त्रास द्यायची? कोण तो?? आणि कुणी त्रास दिला आहे त्याला? त्याआधीच हाडे नरम करण्याची भाषा?? च्यामायला बस ना घेऊन तुझ्या त्या अब्दुलखानला! कोण त्रास देत नाय तुला! च्यामारी! म्हणे भारतीयांची हाडे नरम करू..! माय फूट....! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
अ
अरुण मनोहर Fri, 08/22/2008 - 11:01 नवीन

पिडांची कॉमेन्ट.

संदर्भः http://www.misalpav.com/node/3127#comment-43809 खरतर प्राजुच्या लेखाच्या कीतीतरी बाहेर हे सगळे जात आहे. पण खालील पिडां विधान वाचून मला आक्षेप नोंदवलाच पाहीजे. पिडांने (कळत नकळत?) भारताच्या काही हितचिंतकांना अतिरेकी म्हणून दुखावले आहे. >>>पाकिस्तानात जशी काही अतिरेकी मंडळी आहेत तशीच भारतात सुद्धा आहेत जी अखंड हिंदुस्तानची स्वप्ने पहात आहेत. अशा लोकांचा सामान्य (भारतीय वा पाकिस्तानी) जनतेच्या मनोगताशी काहीही संबंध उरलेला नाही!!! मला इथे फक्त येवढेच म्हणायचे आहे की अखंड भारताची स्वप्ने पहाणारी मंडळी अतिरेकी नाहीत. पिडांने (मुद्दाम?) "अखंड हिंदुस्तानची" शब्द वापरला! हिंदुस्थान म्हणताच आम्ही ब्रीटीशांनी पेरलेले तेच धर्मांध राजकारण आणत आहोत. अखंड भारत ही वेगळी संकल्पना आहे. फाळणी पुर्वीचा भारत, एक देश झाला आणि सर्व धर्म सहीष्णू होउन एकत्र राहीला तर? पण हा खूप मोठा विषय आहे. मला वाटते सारेगमाप ने झी वर नुकताच अखंड भारत स्वातंत्र्यदिन साजरा करून विषयाला उजळणी दिली आहे. ह्यावर चर्चा करायची असल्यास कृपया कोणीतरी स्वतंत्र धागा सुरू करा.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 08/22/2008 - 11:09 नवीन

गैरसमज!

मला कुणाच्या भावनांशी खेळ करायचा नाही, पण आजच्या घडीला आपले अटलबिहारी बाजपेयी म्हणाले त्याप्रमाणे "पाकिस्तान हे सत्य आहे जे कोणीही खोडून टाकू शकणार नाही!" त्यामुळे वेळोवेळी 'अखंड हिदुस्तान' चा नारा देऊन भावना भडकावणारी मंडळी ही सुद्धा अतिरेकी विचारांचीच आहेत असे आम्ही मानतो! हे आमचे मत आपल्याला पटणार नाही कदाचित, त्याबद्दल आम्हाला खेद आहे. आपल्या मतांतराबद्दल आदरही आहे. पण ते आमचे वैयक्तिक मत आहे आणि आम्ही त्याच्याशी एकनिष्ठ आहोत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
व
विजुभाऊ Fri, 08/22/2008 - 12:06 नवीन

अखंड भारत

अखंड भारत ही वेगळी संकल्पना आहे. फाळणी पुर्वीचा भारत, एक देश झाला आणि सर्व धर्म सहीष्णू होउन एकत्र राहीला तर? ही दिवास्वप्ने आहेत. फाळणीपूर्वीचा भारत की ब्रम्हदेश बांगलादेश पाकिस्तान अफगानिस्तानपर्यन्तचा भूप्रदेश हा कधीच एकसंध देश नव्हता. भौगोलीक /भाषीक/ सांस्कृतीक/ धार्मीक कारणांमुळे तो नेहमीच वेगळा आहे ही वस्तुस्थिती आहे. सुस्थीर पाकिस्तान ही पाकिस्तानही पेक्षा भारताची गरज आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
स्वाती दिनेश Fri, 08/22/2008 - 11:20 नवीन

प्राजु..

प्राजु. भारताबाहेर राहणार्‍यांचा हा प्रातिनिधिक अनुभव! अशा प्रकारचे अनुभव भारताबाहेर गेल्यावर बरेच जणांना येतात. जेव्हा क्षितिजे रुंदावतात तेव्हा दृष्टिकोनही व्यापक होतो ह्याचे तुझा हा लेख म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. लेख आवडला हे वेसांन ल. स्वाती
  • Log in or register to post comments
र
राघव१ Fri, 08/22/2008 - 11:25 नवीन

छान लेख!

प्राजुताई, लेख फार सुंदर आहे. कोणतेही मत व्यक्त ना करता केवळ परिस्थिती मांडलेली आहे. वाचणार्‍या सगळ्यांच्या मनात निर्माण होणारे निरनिराळे भाव हेच या लेखाचे यश आहे!! सगळीकडे चांगले-वाईट लोक असतातच. जोवर मूळ गाव समजत नाही तोवर ती तुमच्या-आमच्या सारखीच माणसे असतात अन् सर्वसमावेशक असे परिमाण त्यास लागते. तीच मानवता. जेव्हा संदर्भ देशाचे/प्रांताचे/समाजाचे/जातीचे येतात तेव्हा हे परिमाण त्यानुरूप बदलत जाते. मला वाटते सामन्य माणसाचा दृष्टिकोन अन् सत्ताधारी माणसाचा दृष्टिकोन यात असलेला मूळ फरक अशा अनुभवातून दिसून येतो. असेच लिहीत राहा. शुभेच्छा. :) राघव.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 08/22/2008 - 12:09 नवीन

प्राजुताई!

तुझ्या लेखाच्या धाग्याच्या मध्येच येउन असा धिंगाणा घातल्याबद्दल क्षमस्व!:) पण हा विषयच इतका सेन्सिटिव्ह आहे की थोडीफार चर्चा होणारच! तरी वर लिहिल्याप्रमाणे तुझा लेख आवडला. किप ईट अप!! -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 08/22/2008 - 12:15 नवीन

मुठा, मिठी आणि सिंधू

लेख आवडला. विशेषतः मुठा वि. मिठी असा वाद रंगलेला असताना एकच सिंधू दोन्ही देशांतून वाहते याची ग्वाही देणारा. बाकी, 'यू कॅनॉट सी द पिक्चर अनलेस यू स्टेप आऊट ऑफ द फ्रेम' हे जरी सार्वत्रिक सत्य नसले, तरी बर्‍याच वेळा खरे ठरते हे मात्र खरे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 08/22/2008 - 14:42 नवीन

खरे आहे

'यू कॅनॉट सी द पिक्चर अनलेस यू स्टेप आऊट ऑफ द फ्रेम' हे जरी सार्वत्रिक सत्य नसले, तरी बर्‍याच वेळा खरे ठरते हे मात्र खरे.
खरे आहे. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
संजय अभ्यंकर Fri, 08/22/2008 - 12:40 नवीन

हू एम आय!

प्राजुचा सुंदर लेख! कधितरि परदेशी जातो तेव्हा असा अनुभव येतो की, परदेशस्थ भारतीयांपेक्षा पाकीस्तानीच आपल्याशी आपुलकीने वागतात. जेव्हा परदेशस्थ भारतीयांना कळते की हा भारतातुन आला आहे, तेव्हा लोक आपल्या पासुन अंतर ठेऊन रहातात. दोन वर्षांपुर्वी ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीत गेलो होतो. टेथे किमान २५ भारतीय लोक विविध स्तरांवर कार्यरत होते. त्यांपैकी केवळ एक व्यक्ती माझ्याशी येउन बोलत असे. बाकिच्यांनी माझ्या पासुन काही फुटांचे अंतर (जाणवेल) असे ठेवले. (कदाचीत कंपनी प्रशासनाला गैर वाटू नये म्हणून त्यांचा तो प्रयत्न असावा) माझा सहाध्यायी एक कोरियन होता. कंपनीतले समस्त कोरियन त्याच्याशी ज्या आपूलकीने वागत होते, त्यामूळे आपल्या भारतीयांची मानसिकता फार जाणवली. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 08/22/2008 - 12:54 नवीन

प्राजु..

प्राजु.. मस्तच लेख!! खूप प्रामाणिक लिहीलायस.. बाहेर राहूनच बर्‍याच गोष्टी कळतात, वळतात हेच खरं.. इथे येऊन पाकीस्तानी जनतेशी जुळवून घ्यावचं लागेल मला! कारण आमचा इंडीयन(!) ग्रोसरीवाला पाकीस्तानी आहे! :) हे आणि असेच कितीतरी प्रसंग येतात, आणि त्यातून आपण शिकतो.. एक मात्र खरं भारतात राहून उगीचच जास्त अढी निर्माण होते, ती बाहेर राहून सुटते.. मस्त लेख! भारताबाहेर राहणार्‍या लोकांना नक्कीच अपील होईल नीट!
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Fri, 08/22/2008 - 13:02 नवीन

लेख खुप छान आहे .

ह्या लेखावरुन मला एका पुस्तकची आठवण झाली ...मिळल्यास जरुर वाचा "कुंपणापलिकडचा देश" अतिशय सुंदर पुस्तक आहे..........जरुर वाचा आणि लेखिका आहेत " मनिषा टिकेकर" --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 08/22/2008 - 13:38 नवीन

सामान्य

सामान्य नागरिक मग ते कोणत्या का देशाचे असेनात्...नॉर्मल परिस्थितीत एकमेकांना भेटल्यावर चांगलेच वागतात. पाकिस्तान हा देश खरोखरीच भारतासारखा सहिष्णु आहे काय? धर्मांध राजकारणामुळे पाकीस्तान भारताचा शञू बनला आहे. आणि या शत्रूत्वाचा सामना भारताला करावाच लागतो. >>कोणी पाकिस्तानी, बांग्लादेशी दिसला तर हा आपल्या भागतला आहे आणि आपल्या सारखाच सामान्य आहे ही आणि हीच भावना फक्त मनांत येते (परदेशी वास्तव्य असताना ) हा आपल्या सारखाच सामन्य आहे ही भावना मनात यायची पण आपल्याच भागातला आहे हे मात्र कधीही मनात आले नाही >>गोर्‍यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं. हिंदीमधून संवाद साधता येतो , मुलेबाळे, खाणेपिणे अशा अनेक गोष्टींवर समविचार असू शकतात ह्यामुळे जव़ळीक वाटणे गैर नाही. पण जर राजकारण , इतिहास , धर्म हे विषय चर्चेत आले तर किती जवळीक वाटेल? अवांतर - मध्यंतरी मनोज वाजपेयी, रवि किशन चा १९७१ हा भारत पाक युध्दातील युध्दकैद्यांचा सिनेमा पाहीला. त्यात भारतीय युध्दकैद्यांचा पाकिस्तानी कँप मधून पळून जाण्याचा प्रयत्न दाखवला आहे. सत्यघटनेला मध्यवर्ती ठेवून सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे . या भारतीय युध्दकैद्यांचे पाकिस्तान्यांनी अतोनात हाल केले. बरेच जण कित्येक वर्ष जेल मध्ये मातृभूमीची , आपल्या घराची ,गावाची, नातेवाईकांची याद काढत सडून मेले. त्यांना म्हणे १९८३ मध्ये शेवटचे पाहीले गेले. त्यानंतर त्यांचा अजिबात ठावठिकाणा आजतागायत लागला नाही . यातीलच ६ जणांनी पाकिस्तानी कँप मधील सक्त पहारा तोडून पलायनाचा डाव आखलेला असतो. सिनेमा बघण्यासारखा आहे. http://www.youtube.com/watch?v=P8Ama-AnoVk
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 08/22/2008 - 13:20 नवीन

गरज

परदेशात आपलि मानसिकता बदलते म्हणुन वेगळा अनुभव येतो. तिथे आपल्याला असुरक्षित वाटत असते आणि आपल्या सारखे कोणि आहे का, हे आपण शोधत असतो. पाकिस्तानि बरेचसे आपल्यासारखे दिसत असल्यामुळे आणि खाण्या पिण्याच्या गोष्टित साधर्म्य असल्यामुळे ते गोर्‍या पेक्षा जवळ चे वाटतात. गोरे एक विशिष्ट अंतर ठेउन असतात. त्यामुळे ह्या जवळकित गरज हा प्रमुख धागा असतो.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 08/22/2008 - 13:24 नवीन

विश्वबंधुत्व आणि वर्तुळे

विचार करायला लावणारा लेख. पाकिस्तान / बांगलादेश किंवा इतर देशातील सर्वसामान्य नागरिक मूलतः दुष्ट/वैरत्वाने प्रेरित असतील असे मुळीच वाटत नाही. किंबहुना 'वसुधैव कुटुंबकम' ही भावना उच्च पातळीवर सर्व मानवात असतेच. (जर पृथ्वीवर परग्रहवासियांचे आक्रमण झाले तर चीन त्यांच्या बाजूने अमेरिकेविरुद्ध लढणार नाही हे निर्विवाद सत्य आहे.) पण ती जितकी खोलात जाते तितकी दुरावत जाते... पृथ्वी -आशिया-भारत-राज्य-जिल्हा-तालुका-गाव-वॉर्ड--गल्ली-शेजार-कुटुंब-अगदी सख्खे भाऊही वेळ पडली की एकमेकांशी भांडतात. धर्म-जात -पोटजात -कूळ(गोत्र); प्रांत-भाषा -पोटभाषा ही वर्तुळातली वर्तुळे अशीच आहेत. परदेशात भारतीय भेटतात तेंव्हा ते अशाच कोणत्यातरी वर्तुळापुरता विचार करत असावेत असे वाटते. सर्वसामान्य पाकिस्तानी हे सर्वसामान्य भारतीयांशी मित्रत्वाने वागत असतील. पण म्हणून एक देश म्हणून पाक भारताचा मित्र ठरत नाही. आपल्या लहान वर्तुळातील समूहाने सोसलेल्या कटु अनुभवांची स्मृती अजूनही ताजी आहे. आणि ती ताजी रहावी असे अनुभव अजुनही येत आहेत. त्यामुळे सर्वात आतील वैयक्तिक वर्तुळात पकिस्तानी कितीही मित्र वाटले तरी देशपातळीवरच्या वर्तुळात पाकिस्तान शत्रूच राहिला आहे.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 08/22/2008 - 14:56 नवीन

खरं आहे..

जेव्हा माझ्या देशाचे सैनिक रात्रंदिवस पाकिस्तान च्या बंदुकीच्या टप्प्यात आहेत, ११ जुलै २००६ ला मुंम्बई त लोकल मधे झालेले साखळी बॉम्ब स्फोट अनुभवले आहेत..तेव्हा असा विचार करणं कठीण आहे.. माणुस म्हणुन एक जण चांगला असेल ही.. पण देश म्हणुन?? तुम्ही दुर आहत म्हणुन हे साजिर रुप दिसत असेल.. इथे रोज टांगती तलवार डोक्यावर असताना इतका उदात विचार करणं मला अवघड वाटतं त्यामुळे सर्वात आतील वैयक्तिक वर्तुळात पकिस्तानी कितीही मित्र वाटले तरी देशपातळीवरच्या वर्तुळात पाकिस्तान शत्रूच राहिला आहे. अगदी खर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा