Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सूड on Tue, 11/13/2012 - 14:52
लेखनविषय (Tags)
बालगीत
प्रतिशब्द
व्युत्पत्ती
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा
अभिनंदन
भाषांतर
मित्रहो, सहज गाणं ऐकत ऐकत मला अचानक हा दृष्टांत झाला की ही लावणी नव्हेच!! ही तर एका ईश्वराच्या प्रेमात पडलेल्या कन्यकेने त्या ईश्वराला केलेली आळवणीच !! गाण्याची सुरुवात ऐकताच आपल्याला कन्यकेच्या आध्यात्मिक विचारांची जाणिव व्हायला लागते. गाण्याची सुरुवात काहीशी अशी आहे. हिंदी फिल्मों में देखा जीवन का सारा लेखा। पेडों के आगे बच्चन पेडों के पिछे रेखा॥ वरच्या ओळींमध्ये क्न्यकेला नव्वदच्या दशकात प्रसारीत होणारी रामायण ही मालिका अभिप्रेत आहे. 'हिंदी सिरीयलों मे देखा' हे मीटर मध्ये बसणार नाही म्हणून फिल्मों मे हा शब्द वापरला आहे. तर कन्यका म्हणते, या हिंदी रामायण मालिकेत जीवनाचं सारं सार आहे. ते कसं सांगायला ती म्हणते झाडाच्या पुढे बच्चन आहे. येथे कन्यकेला लक्ष्मण अभिप्रेत आहे. 'बच्चन' हा शब्द आध्यात्मिक अँगल लावून न बघणार्‍यांची दिशाभूल करु शकतो. कन्यका म्हणते झाडाच्या पुढे लक्ष्मण असून त्याने सीतेसाठी काढलेली लक्ष्मणरेखा ही झाडापलिकडे राह्यलेली आहे. म्हणजे माणूस हा नेहमी दुसर्‍यासाठी बंधने घालत असतो हे चपखलपणे सुचवते. पुढे कन्यका म्हणते, मामूली नहीं मैं लडकी खोलें सपनों की खिडकी ॥ अपनी ठंडी दुनिया को मैनें सपनो पे सेंका॥ येथे पुन्हा आध्यात्मिक दृष्टीकोन वापरण्याची गरज पडते. येथे ही कन्यका स्वप्न बघत नाहीये तर ध्यानधारणा करुन तिने कुंडलिनी जागृत होण्याची पायरी गाठली आहे. त्यामुळेच भर थंडीतही ध्यानधारणा करुन ती बाह्य वातावरणाचा आपल्या शरीरावर काही फरक पडू देत नाही. पुढल्या ओळीत भगवंताने आपल्याला बोलवावं यासाठी ती म्हणते, मेरा शॉट रेडी है देवा ओके जल्दी कर देना झोली मेरी भर देना। हिरोईन मुझे बना देना सवा डॉलर चढाऊंगी बदले में॥ म्हणजे आता आध्यात्मिक उन्न्तीसाठी तिने समाधी अवस्थेत जाण्याचा निर्णय घेतलाय. ती देवाला विनवते की , "देवा रे, हा माझा प्रयत्न सफल होउ दे, म्हणजे मी बाकीच्यांच्या दृष्टीने हिरोईन ठरेन" आणि तसं झालं तर ती सवा डॉलर म्हणजे आपला पुढला जन्म देवाला अर्पण करेल. येथे ही कन्यका नवस करण्याच्या प्रथेला ही & हि कमेंट देण्यासाठी जणूकाही आपण नवस करतो आहोत असे भासवते. पुढे असलेला कोरस म्हणजे षडरिपूंनी तिला घातलेली भुरळ आहे. कोरस: चल गं रानी गाऊया गानी क्याम्येर्‍याच्या संगं आनं क्लोजंपंवाली लेन्सं लगी है दिखा दे अपने रंगं. तर हे षडरिपू म्हणतात, ''बाई गं, समाधी घेऊन हिरोईन होण्यापेक्षा या क्यामेर्‍यासमोर तुझे अभिनयाचे रंग उधळ, गाणी गायला आम्ही तुझ्यासोबत आहोतच!!" पुढील कडवं; रंगीन पोषटर मेरा गलियों में दिखाई दे। घर घर के रेडियो मेंभी मेरे गीत सुनाई दे॥ कोरसः गं बाई हिची गाणी वाजली गं बाई हिची पायरसी झाली आऽऽणि हिच्या प्रिमीयरला युएसंहूनं माधुरी आली कन्यका म्हणते, "देवा रे, खरंच तू आहेस का? मी काय म्हणतेय ते ऐकतोयेस का? समाधीनंतर माझी पोस्टर गल्लीगल्लीत लागू देत आणि प्रत्येक घरच्या रेडिओत माझ्या सत्संगांची गाणी ऐकू येऊ देत." षडरिपू कोरसमधून तिला भुरळ पाडायला म्हणतात ," बाई गं, क्यामेर्‍यासमोर तुझं गुणप्रदर्शन केलंस तर तुझी गाणी पायरसी होण्याइतपत फेमस होतील. तुझ्या सिनेमाच्या प्रिमीयरला माधुरी येईल'. त्यांना न जुमानता ही कन्यका आपला धोशा चालूच ठेवते; हर कोई फ्यान हो मेरा आणि ऑटोग्राफं माँगे । संग फोटो खिंचवाने की सब लोग दुहाई दे। दुबली सी कमर के ठुमके सिलवर जुबली कर देना झोली मेरी भर देना। हिरोईन मुझे बना देना सवा डॉलर चढाऊंगी बदले में॥ ती म्हणते की सर्व जण माझे फ्यान होवोत आणि माझी स्वाक्षरी मागोत (पण मी तोवर समाधी घेतलेली असेल.). माझ्या समाधीस्थानी फोटो काढण्यासाठी लोकांची रीघ लागो आणि हे जे षडरिपू मला भुरळ घालतायेत त्यांच्या नखरेल ठुमक्यांची खुश्शाल सिलवर जुबली होऊ दे. पण मी घेतलेला निर्णय सफल होण्याचा आशीर्वाद देऊन माझी झोळी भर जेणेकरुन मी तुझ्या दरबारी हिरोईन होईन. तूर्तास इतुकेच !! ;)
  • Log in or register to post comments
  • 6865 views

प्रतिक्रिया

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 11/13/2012 - 15:40

Permalink

काय लोकं सूड घेतात नै लगेच!

काय लोकं सूड घेतात नै लगेच! ;-) :-b
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 11/13/2012 - 17:09

Permalink

कय लिवलंय, कय लिवलंय.

कय लिवलंय, कय लिवलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Wed, 11/14/2012 - 16:21

In reply to कय लिवलंय, कय लिवलंय. by प्रचेतस

Permalink

+१

वाचाल तर वाचाल
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/13/2012 - 19:43

Permalink

हाहाहा!

हिरविण व्हायची स्वप्न मस्त जमलीत. "सवा डालर चढाऊंगी" हे तर खासच!
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 11/13/2012 - 19:54

Permalink

सुप्पर डूप्पर लाईक !!!

सुप्पर डूप्पर लाईक !!! मिपावर* होणारी बरीचशी विडंबने ही खरे तर विडंबने नसतात(किंवा असली तरी अत्यंत वाईट दर्जाची असतात) हे माझे मत मी काही जणांना बोलून दाखवले होते. तेव्हा तुला काय अपेक्षित आहे ते उदाहरण देऊन सांग अशी एक रीअक्शन होती. यापुढे उदाहरण म्हणून मी या लेखाकडे बोट दाखवू शकेन. *बाकीच्या संस्थळांवर फार वावर नसल्याने तिकडे काय होते ते माहित नाही. तिथेही वेगळी परिस्थिती नसेल तर सदर शब्दाच्या जागी "मराठी आंतर्जालावर" असे वाचावे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 11/14/2012 - 16:28

In reply to सुप्पर डूप्पर लाईक !!! by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

+1. विमे

टोटल शमत भारि जमलय =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by इष्टुर फाकडा on Tue, 11/13/2012 - 20:58

Permalink

'खरे'

'खरे' विडंबन वगैरे ची जास्त माहिती नाही. पण हे लयी आवडलंय. अपेक्षित होतं हे विडंबन येणं :)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Tue, 11/13/2012 - 21:51

Permalink

बरय.

बरय.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 11/14/2012 - 11:24

Permalink

झिंगालाला हु हु.

Image removed. झिंगालाला हु हु.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 11/14/2012 - 14:53

Permalink

कं लिवलंय , कं लिवलंय!!!!!

कं लिवलंय , कं लिवलंय!!!!! पोर्गी अस्तास तं मग इचार्लं आस्तं मझ्यशि मय्तर्रि कर्नर कं म्हून ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 11/14/2012 - 19:04

In reply to कं लिवलंय , कं लिवलंय!!!!! by बॅटमॅन

Permalink

@पोर्गी अस्तास तं मग इचार्लं

@पोर्गी अस्तास तं मग इचार्लं आस्तं मझ्यशि मय्तर्रि कर्नर कंम्हून>>> :-O क्काय?... :-O अरे हो! हा खराखुर्रा पुरुष आय-डी आहे नै का? =)) ============================================================== सो नाक्षी डुआयडीमेकर :-b
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 11/15/2012 - 12:19

In reply to @पोर्गी अस्तास तं मग इचार्लं by अत्रुप्त आत्मा

Permalink

सो नाक्षी डुआयडीमेकर.

"काय लोकं सूड घेतात नै लगेच!" असे वर कुणीतरी म्हणून गेलंय... ;-) ============================================================== हरिणाक्षी टारगेटवर :-p
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Wed, 11/14/2012 - 15:03

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 11/14/2012 - 19:51

Permalink

हं

च्यायला, या लेखनाला कै इतिहास भूगोल आहे का ? लेख इंजॉय करता येईना. कोणीतरी माहितीपूर्ण खरड करा रे ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 11/15/2012 - 10:12

In reply to हं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

http://www.misalpav.com/node

http://www.misalpav.com/node/23068
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 11/15/2012 - 10:22

In reply to http://www.misalpav.com/node by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

धन्स.

दुव्याबद्दल धन्स. तो प्रयत्नही चांगला होता आणि हाही प्रयत्न चांगला आहे. :) -दिलीप बिरुटे [तटस्थ]
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 11/14/2012 - 22:40

Permalink

सही मजा आली.

सही मजा आली. मुळ गाणे कोणत्या चित्रपटातील आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 11/14/2012 - 22:41

In reply to सही मजा आली. by पाषाणभेद

Permalink

मुळ गाणे कोणते आहे ?

मुळ गाणे कोणते आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 11/14/2012 - 22:45

In reply to मुळ गाणे कोणते आहे ? by जेनी...

Permalink

layer_detailpage" frameborder

  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 11/14/2012 - 22:48

In reply to layer_detailpage" frameborder by सूड

Permalink

अय्या ....??

अय्या ....?? अय्या ...! अय्या . =))
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 11/15/2012 - 05:32

Permalink

प्रसिद्धी म्हणजे मनाच्या

प्रसिद्धी म्हणजे मनाच्या गाभार्‍यातुन उमटणार अस काही तरी, जे नेमक डॉलरात सापडत, आणि अंतर्बाह्य बदलुन टाकत. भक्तीसुद्धा अशीच! त्यामुळे सुड तुमच इंटरप्रिशन अगदीच वावग नाही म्हणता येणार. छान लिहिल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 11/16/2012 - 12:47

Permalink

च्यायला!!

च्यायला!! :D
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Fri, 11/16/2012 - 20:53

Permalink

फार पूर्वी

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की 'रेखा जिसको सबने देखा". ते ऐकून देवयानी चौबळांनी ते छापून टाकलं. आता तर सर्वच हिरविणींबद्दल हे वाक्य लागू होईल.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com