उडत्या तबकड्यांचे गूढ आणि सैन्य दलातील भोळसटपणा
चीनच्या सरहद्दीजवळ उडत्या तबकड्यांचे गूढ आणि सैन्य दलातील भोळसटपणा
उडत्या तबकड्या किंवा आकाशात (बातमी नुसार) 3 ते 5 तास तरंगत राहणाऱ्या त्या अज्ञात वस्तू वस्तुतः मानवी मनाचे खेळ असतात. अशा खोट्या वस्तूंचे अस्तित्व भारतीय लष्कराने मान्य करणाऱे रिपोर्ट्स वरिष्ठांना पाठवले ही बातमी वाचून भारतीय सैन्य दलात अजूनही किती अंधश्रद्धा आहेत याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळते. बातमी नुसार संरक्षण खात्यातील वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या संस्थांना देखील 'काय आहे काही सांगता येत नाही' असे म्हणावे लागणे म्हणजे विज्ञानिक दृष्टीला आव्हान आहे. 'चीन व त्याचा पित्त्या पाकिस्तान यांची ही मतलबी चाल आहे' असे म्हणायला भरपूर वाव असताना 'त्यात त्यांचा संबंध नाही' असे खंडन करून सेनादलाने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे!
'तसे काही नसते हो' असे म्हणणाऱ्या भारतातील निर्मूलनवादींच्या दृष्टीने सैन्यदलाची यथेच्छ निर्भत्सना करायची सुवर्ण संधी त्यांना आहे. जागतिक स्तरावरील त्यांच्या भाईबंदांनी वरील बातमी असत्यावर आधारित असल्याने त्याची तातडीने दखल घेऊन सर्व (विशेषतः नोबेल विजेत्या) वैज्ञानिकांनी एकत्र येऊन एक निषेध खलिता सरकारला सादर करणे अत्यंतिक गरजेचे झाले आहे.
.......
ता.क. - असे म्हणतात की
1) चिनी वर्तमानपत्रात हीच बातमी 'साम्राज्यवादी भारताचा कुटिल डाव' अशी छापून आली असून त्यावर चीनतर्फे सीमावादावरील वरिष्ठांच्या पुढील बैठकीत या अज्ञात वस्तूंच्या 'फेकाफेकी' बद्दल तीव्र निषेधाचा मसूदा तयार होत आहे.
2) 'सनसनी' किंवा तत्सम नावाने दुकान चालवणाऱ्या वाहिन्यांनी आपापले छुपे कॅमेरे सरसावत आता आर्मीतील 'त्या अज्ञात वस्तूंच्या विहरणाची टेपची लीक करून मिळवायला शोधक पथके पाठवली आहेत.
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
?!
लिंक बिंक कै तरी द्या की हो
ह्म्म... आत्ताच बातमी वाचली !
पृथ्वी
लो कल्लो बात...
पुरावा असेल तर द्या ना
सैन्याच्या
पीजे:
माऊ तै
वेल !
धन्यवाद मदनबाण
कदाचित त्या तरंगत्या वस्तू
आले निषेध खलिते....
(No subject)
हे मी काही वर्षांपुर्वी वाचले
यावरून आठवले
+१- थोडे अवांतर
अपडेट
वा वा असेच रिपोर्ट अपेक्षित
वा वा असेच रिपोर्ट अपेक्षित .
आत्ताच बातमी आली आहे
अक्षयकुमारच्या जोकर सिनेमाची
चिनी दिवे...