मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टेंन्शन...

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
वेळेवर झोपलं तरी,नीट झोप लागत नाय...! देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ दिवसभराच्या थकव्यात, असं वाटत असतं... की कधी येकदा रातच्याला,आपलं घर दिसतं... पोटभर जेवून,एकदाचे पसरावे पाय...॥१॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ पोटासाठी कामाची वाट,तशिही चुकत नाही... समजा...आयतं मिळालं,तर मग सुखाची काय ग्वाही? सालं...असल्याच विचारानी टेंन्शनला,वेगवेगळे फुटतात पाय...॥२॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ ''हे'' म्हणे येणारच...,असं समजुन जगायचं असतं... नाहि आलं,तर..''अरे व्वा...!'',असंही म्हणुन बघायचं असतं... नक्की ''हे'' कसं आहे,काही अंदाजच लागत नाय...॥३॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ हल्ली टेंन्शन रिलिज करायला,वेगवेगळ्या गोळ्या मिळतात... संध्याकाळी सातला नाहि का???,जश्या काहि ठिकाणी पोळ्या मिळतात... त्या घेऊन याचा उतारा,मनासारखा मिळतो काय???...॥४॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ काहिवेळा टेंन्शन उतरायला,कविता आमची कामी येते... आमच्या अवजड मनाला,टेकण्यासाठी खांदा देते... मग शब्दांवाटे जातो आळस,जरा मोकळे होतात हात/पाय...॥५॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ चला...आता मन शांत झालं,कारण खरं उत्तर बाहेर आलं... मनही आमचं असच हाय,काढू तेवढी निघतात सालं... पुन्हा ''या'' टेंन्शनमधे, कविता येण्याची गॅरेंटी काय???...॥६॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥

वाचने 9392 वाचनखूण प्रतिक्रिया 41

तर्री 22/10/2012 - 20:29
संध्याकाळी सातला नाहि का???,जश्या काहि ठिकाणी पोळ्या मिळतात... ( कहर ) आवडेश !

कविता आवडली असे कसे म्हणू कारण अ. आ. टेन्शनमध्ये आहेत हे वाचून बरे नाही वाटले.

प्रचेतस 23/10/2012 - 08:21
अत्रुप्तीच्या हिंदोळ्यावर झोके आलात घेऊन शाजीच्या अड्ड्यावर आलात पराठे खाऊन पोट लागले डचमळू रात्रीची झोप येईना काय देवाधिदेवा यालाच, टेंन्शन म्हणावं काय???

In reply to by अत्रुप्त आत्मा

पक पक पक 23/10/2012 - 19:44
नाही तिथे चिमटा घेउन खोड त्यांनी काढ्ली, डचमळ्लेल्या पोटात आता बरीच खळ्बळ वाढली, काय उत्तर द्यावे ते सुचत नाही काय..? देवाधी देवा यालाच टेंन्शन म्हणावे काय..? :bigsmile:

In reply to by प्रचेतस

जेनी... 23/10/2012 - 09:42
" ही " घेऊन बघा " हिनं " जातं असं म्हणतात , नाहि आलं तरि " थोडी मज्जा !" असहि घेणारे म्हणतात , नक्की "हिचा " उपयोग काय ,आपल्या डॉस्क्यात शिरत नाय देवाधिदेवा यालाच , टेंशन म्हणावं काय? :D

In reply to by जेनी...

पक पक पक 23/10/2012 - 21:57
नक्की "हिचा " उपयोग काय ,आपल्या डॉस्क्यात शिरत नाय देवाधिदेवा यालाच , टेंशन म्हणावं काय? एकदा घेउन बघाच आत्त्याबाई... ;)

In reply to by पक पक पक

जेनी... 24/10/2012 - 02:34
वीकेंड टू वीकेंड'च' आम्ही " हिचा " उपयोग करतो ,;) आम्हाला आलेलं " हे " " हिच्या " माथी मारतो , :P खरं सांगायला ,आमच्या सोडुन आमी कुणाच्या बापाला भित नाय :) देवाधिदेवा 'ह्या'लाच टेंशन म्हणावं काय ||दु.|| :D

In reply to by प्रचेतस

अगोबाचा बोरू चवताळल्यावरच तासतो मग शब्दांना मिळेल,तसे तो रंग फासतो. निष्कारण माझ्या खोड्या काढून,पळून जातो लाऊन पाय... देवाधिदेवा या अगोबाला... संपादक म्हणावे काय???

गुरुजींनाही टेंसन? गुरुजी टेन्शन येणारच संध्याकाळी ७ वाजता कोणी पोळ्या घेते का? प्रत्येक कामाची एक वेळ ठरली असते. संध्याकाळी ७ ला ठेंसन कमी करण्याचे औषध घ्या. मग बघा कसे टकाटक वाटते. या गुरुजीला संध्याकाळी एकदा भेटलेच पाहीजे. पैजारबुवा,

In reply to by लीलाधर

http://ww.smashits.com/tyagi/kisi-ko-daulat-ki-tension/song-78688.html TENSION जाउदे उगाच आपण कशाला ठेंषण घ्या हे गाणं ऐका आणि ठेंषण फ्री व्हा. पैजारबुवा,

In reply to by स्पा

५० फक्त 23/10/2012 - 10:20
' मन्या फेणे' आयडीवरुन दिला असता तर संपादित झाला नसता, संपादकांशी जास्त दुश्मनी ठेवु नये ना ठेवावी जास्त मैत्री संपादक आहेतच लई खत्री नेहमी सांगतात आमचे सोत्री.

In reply to by स्पा

गवि 23/10/2012 - 11:21
मेल्या, संपादित कोण कशाला करेल उगाच..? जेव्हा एचटीएमएल सारखे " " असे कंस टाकायचे असतील तेव्हा टेक्स्ट फॉर्मॅट फुल एचटीएमएल ठेवून कसे चालेल? मग ते कंस टॅगसारखे मानून गुप्तच नाही का होणार? "प्लेन टेक्स्ट" असा टाईप सिलेक्ट करत जा अशा वेळी.. आता वर प्लेन टेक्स्ट फॉर्मॅट करुन ठेवला आहे.

In reply to by तलाठी

मितभाषी 27/10/2012 - 10:43
कविते मुळे आजचा दिवस टेन्शन लेस....
हाहाहा हे लै भारी बरका आप्पा, एका पिशवीत आख्खं गाव कोंबून, सगळ्या गावाला टेंशन देणार्‍यालाही टेंशन असते ही नविन माहीती मिळाली. ;)

In reply to by सूड

@वल्ली - Sat, 27/10/2012 - 09:51 पण तुमच्या टेन्शनचे काय?>>>>>>>> ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लू :-p @धौतीयोगचूर्णजनित कविता कमीयेत का ?>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif या सुडक्याला गाडा रे कुणितरी ;-)

चौकटराजा 27/10/2012 - 17:55
सगळं रीतसर झालं गुर्जी, बोले तो यजमान फक्त केळे खिचडी ठेवून करतो तो सन्मान दक्षिणेचं नाव मात्र जाम काढत नाय अत्रुप्त गुर्जी जे येतं त्याला टेन्शन म्हणायचा काय .... ?

अनन्न्या 27/10/2012 - 19:20
अबब... केवढी मोठी ही कविता! सगळे मिपाकर सांघिक कविता तयार करतायत. प्रत्येक प्रतिसादागणिक एक एक कडवे वाढ्ते आहे.