Skip to main content

पुणेरी पुणेकरः काही निरिक्षणे

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 17/08/2008 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही जन्मजात पुणेकर नाही. पुण्याला जन्मापासून वर्षातून दोनदा सुट्टीत यायचो व गेली दहा वर्षे नियमित राहतो मात्र आहे. पुणेकरा॑च्या काही सवयी अगदीच अनाकलनीय आहेत १) नाण्याला 'डॉलर' असे स॑बोधणे! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात २) स्वतः जवळ मोडकी लुना कि॑वा हॉर्न सोडून सर्व पार्ट वाजणारी एम ८० का असेना, तिला 'गाडी' म्हणतात! पुण्यात सायकललासुद्धा गाडी म्हणतात. ३) दुकानात जी गोष्ट मिळते त्या सर्व वस्तू॑ची स्वत॑त्र पाटी लावतात. एकदा जनरल स्टोअर म्हटले की सगळ्या परचूटण वस्तू मिळणार हे आपण गृहीत धरले तरी पुण्यात एकाच दुकानात तुम्हा॑ला श॑भर एक पाट्या दिसतील 'येथे हे मिळेल' अश्या. उदा. कानिफनाथ रसव॑ती गृह' अशी गुर्‍हाळावर पाटी असते (तशीही उसाच्या गुर्‍हाळाला पाटीची गरज नसतेच, सगळा नजारा समोरच असतो) व पुन्हा 'इथे उसाचा ताजा रस मीळेल' अशीही पाटी असते! मी एका हेअर कटी॑ग सलूनवर 'येथे केस कापून मिळतील' अशी पाटी पाहिली होती! ('इथे केस कापून 'परत' कुणाला हवेत? तुमच्याकडेच ठेवा ते' असे म्हणण्याचा मोह टाळला) ४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात ५) आमची कुठेही शाखा नाही (ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान?) असल्या पाट्या बिनदिक्कतपणे लावतात. ६) कुठलेही दुकान (मेडिकलचे असो वा चड्डी-बनियानचे) सकाळी दहा ते एक व पाच ते (गिर्‍हाईका॑चा खूपच त्रास असेल तर) फारफारतर नऊ वाजेपर्य॑तच उघडे असते. दुपारी एखाद्याला जुलाब सुरू झाले तर त्याने औषधासाठी पाच वाजेपर्य॑त नुसतेच ता॑ब्या घेऊन धावावे वा घरगुती उपचार करावेत. ७) अभ्यासाची वा इतर पुस्तके फक्त अप्पा बळव॑त नामक नामी चौकातच मिळतील! तिथे एकाला एक लागून पन्नास दुकाने, पण सगळी चालतात. ग॑मत म्हणजे इतर ठिकाणी पुस्तका॑ची दुकाने अजिबात चालत नाहीत! ८) पुण्यात सर्व मुली तो॑डाभोवती दहशतवादी गु॑डाळतात तसे कापड बा॑धतात. हे म्हणे चेहर्‍याचे धुळीपासून व सूर्यप्रकाशापासून स॑रक्षण म्हणे. पण 'ज्या॑च्यासाठी' इतका चेहरा छान ठेवण्याची आस, त्या॑ना तो दिसतच नाही ना मग?? ९) पुण्यात डो॑गरावर फिरायला येणारे पेन्शनर म्हातारे येणार्‍या जाणार्‍या मुली॑चे अष्टा॑गानी दर्शन करतात. आणि आपल्या मित्रानी केलेल्या देहा॑तशासनाच्या लायकीच्या कोटीवर मोठ-मोठ्या॑नी हसतात. कोटी सोडा, साध्यासाध्या वाक्या॑नासुद्धा असेच हसतात. उदा. 'बर॑ का, काल मला आपले आबा भेटले होते..' 'काय सा॑गताय.. हॉ हॉ हॉ.. '(किमान दहा मजले). शिवाय डो॑गरावर एकमेका॑ना ला॑बून पाहिले तरी 'हारी हारी!' अशी घसा सुकेस्तोवर गर्जना करतात. १०) बिल्डी॑गला नाव ठेवता॑ना आपल्या अस्सल मर्‍हाठी नावापुढे इ॑ग्लीश शब्द जोडण्याची हौसही पुण्यात फार आहे. पुण्याबाहेरच्या, विशेषतः मु॑बईच्या लोका॑ना त्याचे फार हसू येते. उदा. पाडळे पॅलेस, पाटील प्लाझा, भोसले-शि॑दे आर्केड, काकडे मॉल इ. ११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात. तुम्हीसुद्धा अश्या काही पिक्यूलियर पुणेरी गोष्टी पाहिल्या असतील तर सा॑गा..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 55679
प्रतिक्रिया 229

प्रतिक्रिया

(या विश्वातल्या, कन्या सुपरक्लस्टरमधल्या, आकाशगंगेतल्या, सूर्यमालेतल्या, पृथ्वीवरच्या, आशिया खंडातल्या, भारत देशातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या, पुणे शहरातल्या, बाणेर गावातल्या, एका छोट्या घरात रहाणारी, नगण्य) गूड १ !!! दिसतये ते !! जी गोष्ट चांगली ,ती चांगली... जिथे चुकतये ते चुकतये हे मान्य कधी करणार आम्ही , कुणास ठाउक !! बाकी मी सुद्धा जन्माने फक्त पुण्याचा !! आणी कर्तूत्त्वा म्हणाल तर सध्या काहीच नाही ... म्हनुण मी सुद्धा तुमच्या सोबत उभाराहुन पुण्याच्या नावानी खडे फोडु शकतो.... ते जमत नाही आपल्याला .... जे आहे जस आहे तस आहे ... आणी हो हे जे तुमच लिखाण आहे ते जरा त्रयस्थ दृष्टीने वाचा मग समजेन मी अस वाक्य का बोललो "असुये विषयी" पण तीतका मोठे पणा आपल्यात नाहिये .... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

पण तीतका मोठे पणा आपल्यात नाहिये .... अगदी खरं! जो काही मोठेपणा आहे तो पुणेकरांतच आहे! अगदी मान्य! ;) आपला, (तोंड दाबून हसणारा मुंबईकर!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अगदी खरं! जो काही मोठेपणा आहे तो पुणेकरांतच आहे! अगदी मान्य! तात्या, ही सिक्सरच आहे ... एक नंबर! मानलं तुम्हाला! =)) काय आहे, अनिल हटेला, मी तर नगण्यच आहे, मोठेपणा दाखवणार कुठून! ;-) पुण्यातल्या विक्षिप्त सवयींचंही कसा काय लोक समर्थन करतात कोण जाणे? :?

यमी आजी !! कदाचीत खरही असेन तुमच !!! मोठेपणा विषयी न बोललेल च बर !! ठीक हे !! पुणे हेही इतर शहरा सारखे साधे सुधे आणी नगण्य शहर आहे !!! ओ के ? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

आन्याचे सर्व मुद्दे क्लास .. आमचं पुणं बेष्ट ... सगळ्या जगात ... मी बर्‍याच ठिकाणी राहीलोय . तात्याच्या मुंबईत सुद्धा ! पण नको वाटली मुंबई... हल्ली मुंबईतले लोक्स तळेगाव, लोणावळा आणि पुण्यात घर शोधतात म्हणे ... पुण्याने सगळ्यांकोच भुरळ पाडी हय .. पण मान्य करने को तात्या एवं यमी आज्जी क्यो तयार नही हय ? तात्या आणि यमी कडे सबळ मुद्दे नाहीत .. ते नुसतेच अपोज करत आहेत ... असो ... आन्या अप्पन तेरे साथ है रे -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by टारझन

मी कधीही ठाणं किंवा मुंबई, किंवा कोणतंही शहर श्रेष्ठ आहे असं म्हटलं नाही आहे. कोणतंही शहर आयडियल होऊच शकत नाही. पण जेव्हा नावं ठेवायची वेळ येते तेव्हा मुंबईकरपण मुंबईतल्या गर्दिला नावं ठेवतो आणि लंडनचा माणूस खराब हवेबद्दल बोलतो. मी पुण्यात आहे कारण तेव्हा radio quiet zone पुण्याजवळ (नशीबाने) सापडला आणि radio astronomers ना पुणे विद्यापीठामधे जागा दिली गेली. पण याचा अर्थ पुणेरी लोक जर "पुणंच सर्वश्रेष्ठ शहर आहे" असा काढत असतील, बाहेरच्या लोकांनी दाखवलेल्या विसंगतींच चांगल्याच आहेत असं म्हणात असतील तर ते माझ्या दृष्टीनी हास्यास्पद आहे! पुण्यातली लोकं तर पेठांच्या बाहेर पुणं आहे हे पण मान्य करत नाहीत, तर लोणावळा आणि तळेगाव तर फारच लांब आहेत ... फक्त पुणे जिल्ह्यात आहेत, तालुकापण बदलतो! बाणेरला रहाते म्हटल्यावर "किती लांब" एवढंच पुणेरी लोक म्हणणार, पण त्यामुळे मला जरातरी मोकळे रस्ते, कमी प्रदूषण आणि मुख्य म्हणजे प्रवासाला लागणारा कमी वेळ या गोष्टी त्यांच्या (पुणेरी, पेठांमधल्या) डोक्यात येत नाहीत. आता लोकं "पुणेरी" गोष्टींबद्दलच बोलतात कारण, एकतर पुणेरी लोक स्वतःच रस्त्याला पडलेल्या सहा फूट खड्ड्याबद्दलही अभिमान व्यक्त करतात आणि दुसरं म्हणजे, पुणं हे एक जुनं, बय्रापैकी मराठी लोकांच्या वस्तीचं शहर आहे आणि बय्रापैकी विकसितही आहे. मुंबईमधे "भारतीय" (फक्त मराठी नाही) प्रतिबिंब दिसतं आणि नाशिक, (किंवा सातारा उदाहरणार्थ) एवढं जुनं, विकसित किंवा (दु:)अभिमानी लोकांचं शहर नाही. (तुझी वैश्विक) यमी आज्जी!

११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात. हाच काय तो जाज्वल्य की काय म्हणतात तो अभिमान? बाकी वर यमी यांनी दिलेल्या सविस्तर प्रतिसादाशी १००% सहमत. (मुंबईकर) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

"असूया? आणि पुण्याबद्दल?? ही ही ही! अरे देवा, असूयेला तरी काही चॉईस असावा की नाही? " तात्या काय सिक्सर मारलात :D

काय मुंबई ,ठाणे वगैरे दंगा चाललाय रे? हे "मुंबई,ठाणे " वगैरे भाग पुण्यात कुठेशीक येतात? इथल्या पुणेकरांपैकी कोणाला माहिती आहे का? ;) (पानिपतची लढाई नक्की कुठे झाली ते माहित असणारा) अभिज्ञ. अवांतर- टार्‍या व अनिल हटेला , मस्तच किल्ला लढवलात.अभिनंदन. (सर्वच जण ह.घ्या.)

१) माझ्या मते 'पुणे तेथे काय उणे' असं म्हणण्याची पद्धत पेशवाईपासून चालू आहे. कारण पुणे हे त्यावेळी मराठी साम्राज्याचं केंद्र होतं. एक समृद्ध शहर होतं. २) पुणेकरांप्रमाणेच स्वतःची वेगवेगेळी स्वभाववैशिष्ट्ये असलेले इतरही 'कर' आहेत (संदर्भः पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर बाय अवर ओन भाईकाका). त्यात फक्त पुण्याच्याच लोकांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. ३) मुंबई देशाचं आर्थिक केंद्र आहे आणि एक बहुभाषिक शहर आहे. त्यात मराठी लोकांना आज पूर्वीचं महत्वाचं स्थान राहिलेलं नाही. त्यामानाने पुण्यात अजून परिस्थिती बरी आहे. पुणे निदान महाराष्ट्रातील सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचं शहर आहे हे तरी मान्य कराल की नाही? ४) 'विद्येचे माहेरघर' वगैरे गोष्टीसुद्धा स्वातंत्र्याआधीपासून चालत आलेल्या आहेत. कारण विद्यार्जनासाठी लागणार्‍या महत्वाच्या संस्था पुण्यात होत्या आणि येत गेल्या (अगदी आयुकापासून वेदपाठशालेपर्यंत). ५) पुण्यातले खत्रूड दुकानदार, लेड्बॅक वातावरण याचं एकमेव कारण म्हणजे पुण्याची आर्थिक प्रगती तितक्या वेगाने झाली नाही. पण ही उदाहरणं आजकाल कमी होतायंत. (आणि खत्रूड दुकानदारांबद्दलच म्हणायचं तर त्यातला बराचसा दोष कर्वें, लेलें, अभ्यंकर, चितळें वगैरे कोकणस्थी आडनावं लावणार्‍यांकडेच जातो....भले मग ही मंडळी स्वतःला दलाल स्ट्रीटवरची नाहीतर वॉल स्ट्रीटवरची म्हणू देत... ह. घ्या :) ) ६) पुणे हे कोणत्याच बाबतीत आदर्श शहर नाही, किंवा माझा ते तसं आहे असा दावाही नाही. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं कौतुक करायलाच हवं. केवळ नावं ठेवण्यासाठी नावं ठेवायची ह्याला काही अर्थ नाही. --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

माझी चुलत आत्या पुण्यात राष्ट्रिय रासायनिक प्रयोगशाळेत (म्हणजे मराठीत N.C.L. हो ! :)) कार्यरत होती. ती ने सान्गितलेला हा किस्सा. तीची आणि डॉ. मोहन आगाशे ह्यान्चि चान्गली ओळख आहे. पुण्यात असताना माझी आत्या जागेच्या शोधात होती. आणि याविषयी सहज बोलताना डॉ. तीला म्हणाले, "तू एक काम कर. त्या 'इतिश्री' सोसायटीत जागा बघ. तिथे बरेच पेन्शनर राहातात. ते तुझ्यावर आणि तुझ्या घरावर बारिक लक्ष ठेवतील. म्हणजे, त्यानाही दिवसभर काम मिळेल आणि तुझ्या घराचीहि देखरेख होईल. ती ही एकदम फुकटात!" :)

म्हणजे पहा, पुण्यातले लोक कसे शेजारधर्माला जागतात ते!! :) नायतर तुमची मुंबै!! शेजारच्याचा खून झाला तरी कळत नै तुम्हाला!

In reply to by यशोधरा

पु. ल. म्हणतात त्याप्रमाणे, "पुणेकर व्ह्यायच असेल तर पुण्याविषयी जाज्व्यल्य अभिमान असायला हवा". तो हाच वाटत! ;) पण मला तर वाटल की , डॉ. आगाशे हे पुणेकरच आहेत. ;) मग त्याना ही गोष्ट का कळू नये? आता डॉ. आगशे यान्चा जाहीर निषेध वगैरे करतायत की काय समस्त पुणेकर ???? :) (मुळचा मुम्बैकर) मुशाफिर

In reply to by यशोधरा

एक नंबर बोललीस .. अजुन एक ... मुंबैकरांकडे काही मुद्देच नाहीत, सगळी बेसलेस विधाने आहेत. आपण कधीही मुंबैच्या कोणत्याही गोष्टीला आक्षेप घेतलेला नाहीये.. पण कोल्ह्याला द्राक्षे आंबट असतात. तात्या व त्यांची मुंबैकर गँग उगाच संख्याबळाच्या जोरावर बेसलेस मुद्दे उचलून धरत आहेत. जो मुंबैकर आणि पुणेकर नाही अशांना विचारले तर कमीत कमी ५१% मत पुण्याला पडेल असा अस्मादिकांना विश्वास आहे. तात्या काहीही बोलले की बाकी स्पेक्टेटर्स नुसते बिनज्योत बुद्धु आणि शिक्सर शुमन प्रमाणे हसत आणि षटकार मारत आहेत. अरे ठोस मुद्दे मांडा ना राव. यमीचे मत तर बादच झालेले आहे. कारण तीला तर स्वर्गात सुद्धा काहीतरी त्रुटी आढळतील. पुण्याचे हे महात्म्य साक्षात भाईकाकांनी मान्य केले आहे त्यामुळे तुम्ही आम्ही त्यावर गोदङी फाडुन उपयोग नाही. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मी एक सदाशिवपेठी पुणेकर असून सुद्धा मला हि निरक्षण वाचून मजा आली.. पण साहेब इथल्या काही माकडांच्या हातात कोलित मिळालं ना... ;) जाऊ दे..पुणेकरांना माकडांची सवय आहे.. मारा शाब्दिक कोलांट्या उड्या आम्हाला मजाच येते आहे. -पक्का जाज्ज्वल्य अभिमान असलेला पुणेकर.

डॉक्टरसाहेब ... तुमची निरीक्षणशक्ती चांगली आहे पण काही गोष्टी पटल्या नाहीत ब्वॉ आणि काही गोष्टी अज्ञानातून आल्या आहेत असे वाटले. एक अस्सल पुणेकर म्हणून काही निरीक्षणांवर मत व्यक्त करतोय -- >> १) नाण्याला 'डॉलर' असे स॑बोधणे! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात मी लहान होतो तेव्हा एक 'डॉलर' नावाचे चॉकोलेट मिळायचे. गोल बंदा रूपया असतो त्या आकाराचे आणि सोनेरी कव्हर असायचे. अजूनही मिळत असेल बहुतेक. एक रूपयाचे नाणं आणि एक रूपयाची नोट ह्यातल्या फरकासाठी बोली भाषेत त्या चॉकोलेटवाल्या डॉलरचा संदर्भ वापरणं रूढ झालं ! >> २) स्वतः जवळ मोडकी लुना कि॑वा हॉर्न सोडून सर्व पार्ट वाजणारी एम ८० का असेना, तिला 'गाडी' म्हणतात! पुण्यात सायकललासुद्धा गाडी म्हणतात. झोपडीलाही 'चंद्रमौळी' वगैरे शब्द आहेतच की ! पेशवाईचं गाव म्हटल्यावर एवढं तर होणारच :) >> ५) आमची कुठेही शाखा नाही (ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान?) असल्या पाट्या बिनदिक्कतपणे लावतात. ही पाटी तर मुंबईतून पुण्यात आली .. माझ्या आठवणीप्रमाणे 'कला निकेतन' की अशाच कुठल्या तरी प्रसिद्ध दुकानाची जाहिरात होती ! >> ७) अभ्यासाची वा इतर पुस्तके फक्त अप्पा बळव॑त नामक नामी चौकातच मिळतील! तिथे एकाला एक लागून पन्नास दुकाने, पण सगळी चालतात. ग॑मत म्हणजे इतर ठिकाणी पुस्तका॑ची दुकाने अजिबात चालत नाहीत! जुनं पुणं (पक्षी: गाव) छोटं असल्याने ठराविक भागात ठराविक वस्तू मिळतात / मिळायच्या उदा. तांबट आळी, बोहरी आळी इ. >> ८) पुण्यात सर्व मुली तो॑डाभोवती दहशतवादी गु॑डाळतात तसे कापड बा॑धतात. हे म्हणे चेहर्‍याचे धुळीपासून व सूर्यप्रकाशापासून स॑रक्षण म्हणे. पण 'ज्या॑च्यासाठी' इतका चेहरा छान ठेवण्याची आस, त्या॑ना तो दिसतच नाही ना मग?? अहो पण 'कोणासाठी' चेहरा छान ठेवतात ते आपल्याला काय माहिती ? 'ज्यांच्यासाठी' इतका चेहरा छान ठेवतात, त्यांना दिसत असेलच ना :) >> ११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात. खरंतर हा प्रकार मी मुंबईत पाहिलाय... अगदी मुंबईकर मराठी लोकांना मी हे म्हणताना ऐकलंय की मुंबई शब्दात 'बाँबे'ची शान नाही यार ! अगदी ठाण्याचा माणूस जर चर्चगेट भागात गेला असेल तर म्हणतो, "जरा बाँबेला गेलो होतो' :) (तसंच मुंबईचे लोक 'पुणे' म्हणण्याऐवजी 'पूणा' म्हणतानाही पाहिले आहेत !! )

>>आता डॉ. आगशे यान्चा जाहीर निषेध वगैरे करतायत की काय समस्त पुणेकर ???? नाय ब्वॉ!! उलट पहा बरं, त्यांनी पण कसं स्नेहीधर्माला जागून तुमच्या आत्त्याच्या लक्षात आणून दिलं की तिचा फायदा कशात आहे, त्याबाद्दल कौतुकच आहे त्यांचं :) पुण्यातली माणसंच अशी, माणूसकी जपणारी... :) अवांतरः ठराविक भागात ठराविक गोष्टी मिळणं चांगलच की!! तुमच टाईम मॅनेजमेंट का काय ते होऊन जातय आपोआप!! जे हवय ते घ्यायला सगळीकडे सैरावैरा नको धावायला!! :)

In reply to by यशोधरा

पु. ल. नि म्हटलय तेच पुन्हा म्हणतो ! :).... बाकि काहि म्हणा पण मुम्बई वर कितीही टिका केलीत तरी आम्हि तुम्हाला अनुमोदनच देवू. "मुम्बईचा अभिमान असायला हवा हि अट नाहि. उलट कोणि जर मुम्बईला एक भिकार म्हणत असेल तर आपण म्हणाव सात भिकार!" - तुम्हाला कोण व्हायचय? :) (जन्माने मुम्बईकर असणारा) मुशाफिर :)

In reply to by मुशाफिर

"मुम्बईचा अभिमान असायला हवा हि अट नाहि. उलट कोणि जर मुम्बईला एक भिकार म्हणत असेल तर आपण म्हणाव सात भिकार!" - तुम्हाला कोण व्हायचय? एगजॅक्टली! आपल्या शहरातलं वाईट दाखवलं तरी यांना राग येतो! दुसय्राच्या डोळ्यातलं .....! यमी ली! (from the middle of nowhere)

बिचारे "कल्याण, डोंबिवली,ठाणे " कर जर स्वतःला मुंबईकर समजून घेत असतात,पण सच्चा मुंबईकर त्यांन "मुंबईकर" मानत नाहित त्याबद्दल काय? अभिज्ञ. अवांतर : आमचा आक्षेप हा "पुणे व पुणेकरांना" विनाकारण टार्गेट करून लिहिण्यावर आहे. बा़कि चालु द्यात.

"आणि खत्रूड दुकानदारांबद्दलच म्हणायचं तर त्यातला बराचसा दोष कर्वें, लेलें, अभ्यंकर, चितळें वगैरे कोकणस्थी आडनावं लावणार्‍यांकडेच जातो....ह. घ्या )" ह्यावरुन आठवलेला अजून एक किस्सा. आमचे एक नातेवाईक कोल्हापूरला असतात त्यान्च्या शेजारी राहात असलेल्या काकानी सान्गितलेला. हे शेजारी एकदा पुण्यात असताना चितळेंच्या दुकानात बाकरवडी आणायला गेले. त्या दिवशी "बाकरवडी सम्पली आहे उद्या या!" असे सान्गून त्याना परत पाठवल. त्याना २५ कि. बाकरवडी हवी असल्याने तुम्हि आगावू मागणी नोन्दवून घ्या, अशी त्यानी विनन्ती केली. तेव्हा त्याना "इथे सकाळी बाकरवडीसाठी मोठी रान्ग लागते , उद्या त्यावेळी या आणि मिळेल तेव्हढि घेवून जा!" हे उत्तर मिळाले. दुसर्या दिवशी रान्गेत उभे राहून जेव्हा ते मागणी नोन्दवू लागले तेव्हा "अहो आता बाकरवडी सम्पत आली आहे. तुम्हाला एव्हढि दिली तर इतरना मिळणार नाहि, एव्हढी कशाला हवी आहे बाकरवडी तुम्हाला एकावेळी?" अस विचारल. तेव्हा ते काका शान्तपणे म्हणाले "त्याच काय आहे? मी कोल्हपूरला असतो आणि महिन्यात एकदाच पुण्याला येतो. आमचा कुत्रा Tommy तुमच्या बाकरवड्यानशिवाय काही खात नाही हो! तेव्हा, त्याला चितळेंकडे बाकरवड्या कमी होत्या हे कस समजावणार?" त्याना २५ किलो बाकरवड्या मिळाल्या! :) (पुण्याचही पाणी चाखलेला!) मुशाफिर.

In reply to by मुशाफिर

अर्रे वा ! कुत्रा चितळ्यांची बाकरवडी खातो का ? वा वा वा !!! मग माणसे पेडिग्री खात असतील =)) =)) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by टारझन

मुम्बैकराना विचारून काय उपयोग? :) (जगात कुठेही राहिला तरी मनाने मुम्बैकरच असलेला!) मुशाफिर :)

चांगलं चालूय.. संदीप तुझे सगळे मुद्दे पटले.. बाकी पुण्याला उगीचच नावं ठेवणार्‍या लोकांना काय सांगायचे आता? जाऊदे, माझं पुणे इतकं मस्त आहे की अशा कॉमेंट्सनी पुण्याच्या चांगल्या गोष्टींना काहीच फरक पडत नाही.. उग्गीच विचार करून माझ्या डोक्याला ताप ! त्यापेक्षा पुण्याचा पाऊस्,सिंहगड..पुण्यात राहणारे थोर कलावंत (उदा भीमसेनजी..) त्यांनी सुरू केलेला सवाईगंधर्व, आमची युनिव्हर्सिटी,आमचे शाळा कॉलेजेस याचा विचार करते मी..... अरे हज्जार गोष्टी आहेत आमच्याकडे ज्या बाकी कोठेही नाहीएत.. एखाद्या गोष्टीचे मोठेपण तिला न देण्याचा करंटेपणा मी नाही करणार.. जे चांगलं आहे ते आहेच.. मग दुनियेला ते पटो वा न पटो !! दुनिया गेली (पुण्याच्या) खड्ड्यात !! :) B) बैलोबा चायनिजकर, आणि टारझन किल्ला छान लढवलात.. असाच पुणेरी बाणेदारपणा दाखवत चला!! :D

In reply to by भाग्यश्री

अरे हज्जार गोष्टी आहेत आमच्याकडे ज्या बाकी कोठेही नाहीएत.. उदा: खड्ड्यांतले रस्ते, खत्रूड दुकानदार, सार्वजनिक वाहतूक सेवेचा अभाव, सौजन्याचाही अभावच, पाऊस न पडणे, भुईकोट किल्ले, शेअर बाजार, उपयुक्त लोकल ट्रेन्स, यु.आय.सी.टी... इत्यादी! पण भीमसेनजींचं पुण्यातलं वास्तव्य आणि त्यांचा सवाई गंधर्व महोत्सव या दोन गोष्टींमधे या पुणेकर लोकांचं काय योगदान हे कोणी पुणेकर मला सांगाल का? किंवा पुण्याच्या भल्यासाठी तुमचं काय योगदान हे तरी, म्हणजे का भांडताय ते तरी समजेल मला! दुनिया गेली (पुण्याच्या) खड्ड्यात !! बरोबर आहे, कारण अलम दुनियेत खड्ड्यांमधले रस्ते फक्त पुण्यातच आहेत!

>>बाकि काहि म्हणा पण मुम्बई वर कितीही टिका केलीत तरी आम्हि तुम्हाला अनुमोदनच देवू. नाय ब्वॉ!! आम्हां पुणेकरांना नाय्येत असल्या सवयी टीका करायच्या उठसूठ!! तुम्हां मुंबैकरांना आहेत वाट्ट??? :D

In reply to by यशोधरा

ह्या लेखातली निरिक्षणे एका पुणेकरानेच लिहिली आहेत. आम्ही फक्त पुण्यनगरीचे आणि तिथल्या नगरजनान्चे काही किस्से सान्गतोय इतकच! ;) (साळसूद) मुशाफिर :)

>>ह्या लेखातली निरिक्षणे एका पुणेकरानेच लिहिली आहेत. असं, स्वतःवरच हसायला तेवढं मोठं मन, मनाचा दिलदारपणा आणि अतिशय तरल विनोदबुद्धी लागते!! आता पुणेकरांपाशीती आहेच! म्हणून तर पुणे तिथे काय उणे!! :)

In reply to by यशोधरा

>>असं, स्वतःवरच हसायला तेवढं मोठं मन, मनाचा दिलदारपणा आणि अतिशय तरल विनोदबुद्धी लागते!! आता पुणेकरांपाशीती आहेच! अशी विनोदबुद्धी मुम्बैकरान्कडे नाहि म्हणून तर मुम्बैकरान्च्या विक्षिप्तपणाचे किस्सेहि नाहीत! :) ह्.घ्या. अल्प (विनोद) बुद्धि असलेला मुम्बईकर मुशाफिर! :)

In reply to by मुशाफिर

>>ह्या लेखातली निरिक्षणे एका पुणेकरानेच लिहिली आहेत. गैरसमज आहे. डॉ.दाढे हे स्वतः डोंबिवलीकर आहेत, अन फक्त गेले दहा वर्षच पुण्यात आहेत. खरा पुणेकर असल्या फालतु स्वनिरिक्षणात (ह्.घ्या.) वेळ घालवत नसतो. पुण्यात काय उणे आहे ह्याचे निरिक्षण करण्याचे काम अपुणेकर मंडळिंवर सोपवून तो आपल्या कामात व्यस्त असतो. ;)

In reply to by अभिज्ञ

काम अपुणेकर मंडळिंवर सोपवून तो आपल्या कामात व्यस्त असतो. पण कितीहि व्यस्त असला तरिही......पुण्यासाठी किल्ला लढवायला सदैव तत्पर असतो. हे लिहायच राहून गेले कि काय? :) ह. घ्या. (किल्ला न लढवताच पान्ढरे निशाण दाखवणारा) मुशाफिर :)

In reply to by मुशाफिर

(किल्ला न लढवताच पान्ढरे निशाण दाखवणारा) वेळ आली की घातली शेपुट. ही एकच घाण खोड मुंबईकरांनी सोडुन द्या. (जन्म आणि कर्माने मुंबईकर असलेला) मनीष पाठक.

>>अशी विनोदबुद्धी मुम्बैकरान्कडे नाहि हे मात्र खरं!! :) कसं जगता हो विनोदबुद्धी नसतानाही?? घड्याळाच्या तालावर नाचताना 'विनोदच' काय कोणतीही भावना बाळगणे हेच मुंबैकर विसरुन गेलाय!! म्हणून मग, पुण्याला नावं (असूयेपोटी) ठेवतो, अन् तिथेच दुसरं घर घेतो, आणि पुन्हा अस्सल 'मुंबैकर' पणा दाखवत पुण्यालाच नावं ठेवतो!! :( असो.

In reply to by यशोधरा

>>घड्याळाच्या तालावर नाचताना 'विनोदच' काय कोणतीही भावना बाळगणे हेच मुंबैकर विसरुन गेलाय!! एकदम मान्य! मुम्बई म्हणजे सात भिकार! :) (भिकार मुम्बईवरही मनापासून प्रेम करणारा) मुशाफिर

>>भिकार मुम्बईवरही मनापासून प्रेम करणारा फक्त मुंबैवरच? आम्ही पुणेकर अख्ख्या भारत देशावर प्रेम करतो ब्वॉ!! :) >>मुम्बई म्हणजे सात भिकार! नाही कोण म्हणलय!! :D

In reply to by यशोधरा

मुम्बई म्हणजे सात भिकार! नाही कोण म्हणलय!! देवा असल्या मुंबैकराच्या हातात देश गेला तर परदेशात झेंडे लाऊन येतील .. पत्रकार परिषदेत म्हणतील आमचा भारत सात भिकार .... आरारारा ... काय हे भिकारचळ लागले रे .. चॅचॅचॅ -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

भैय्यांना घर द्याल का हो किरायाने ब्वॉ!! ;) ;) ;) ;) सत्य कटु असते....

नाहि कोण म्हणतय? पण मुम्बैकर भारतावर प्रेम करतात, हे वेगळ सान्गाव लागत नाही (पुणेकरानसारख!) :). शेवटी, देशाच्या आर्थिक राजधानीच स्थान पुणे नक्किच नाही. स्वगतः- मुशाफिरा, जसा काही मुम्बैतून मिळणारा सगळा महसूल तू स्वत:च्याच खिशातून भरतोस! :) (देशप्रेमी), मुशाफिर

>>भैय्यांना घर द्याल का हो किरायाने ब्वॉ!! एक मुंबै मराठी माणसाच्या हातातून सुटते आहे/ सुटली आहे तेवढे पुरेसे वाटत नाही का हो बोकोबा?? :) >>देशाच्या आर्थिक राजधानीच स्थान पुणे नक्किच नाही. असतं तर ते बिगरमराठी लोकांच्या हाती गेलं नसतं मात्र!! बोकोबा, मुशाफिर, पुण्यातही बिगर मराठी वा आधीपासून पुण्यात नसलेले कित्येक जण येतात, विद्यार्थी, नोकरदार सगळेच. तरीही पुण्याचं पुणेपण सुटत नही, सुटूही नये. मुंबईइतकं बोटचेपं धोरण पुण्यात इतक्या सहजासहजी स्वीकारलं जाईल अस मला तरी वाटत नाही.

शेवटी, देशाच्या आर्थिक राजधानीच स्थान पुणे नक्किच नाही. बर बाबा तु आनि तुझी मुंबै लै भारि.झाल समाधान? बर जाता जाता एक काम करा,पुणे आणि पुणेकरांवर गरळ ओकण्यापेक्षा तीच ताकत मुंबईत मराठी च्या संवर्धनासाठि वापरा ना. ह्या देशाच्या आर्थिक राजधानीत आताशा मराठी मुंबईकर पनवेल पर्यंत पोहोचलाच आहे, काहि वर्षांत तो पुण्यात पोचला तर त्यात नवल वाटायला नको. काय?

In reply to by अभिज्ञ

कळकळ मुम्बईकरानाहि आहेच! आज मुम्बईत जो मराठी माणूस टिकला आहे तो स्वतःच्या हिमतीवरच. अर्थात, त्याची स्थिति फार भूषणावह नाही, हे कोणिच नाकारत नाहि. आहो, मि. पा. वर आम्हि जे लिहितो आहोत ते फक्त गम्मत म्हणून. आणि मुम्बै काय किवा पूणे काय? जगात जिथे राहू तिथे भारतीय आणि त्यातहि मराठी (माणस आणि शहर) आम्हाला सगळ्यात प्रिय आहे! तेव्हा समस्त मिपाकर जनहो माझे लिखाण ह्.घ्या. हे. सा. न. ल. :) काहि काळ पूण्यनगरी(तही) निवास केलेला, मुशाफिर

सध्या परदेशातच झेन्डे लावत आहोत (फक्त अटकेपार नाही हो, त्याच्याही पुढे! ), तेही मोठ्या अभिमानाने! (भारतीयत्वाच्या बर का? नाहीतर मुम्बईच्याच का? असा तिरकस पुणेरी प्रश्ण विचाराल!) :) ह्.घ्या. आणि पत्रकार परिषदेच म्हणाल तर आम्हा पामरान्चि कसली हो परिषद? परदेशस्थ (पण मनाने) मुम्बैकर(च), मुशाफिर

In reply to by मुशाफिर

शेवटी, देशाच्या आर्थिक राजधानीच स्थान पुणे नक्किच नाही. नाचा मग !! =)) सध्या परदेशातच झेन्डे लावत आहोत देश आपल्या हातात नाही... असले झेंडे तर आम्ही पण लावले आहेत. आणि पत्रकार परिषदेच म्हणाल तर आम्हा पामरान्चि कसली हो परिषद? आई गं .. किती डोकं फोडून सांगू ? ज्यांच्या हातात देश आहे (प्रधानमंतत्री, राष्ट्रपती, ई.) ते परदेशात गेले की एक पत्रकार परिषद होते (शुद्ध मराठीत प्रेस कॉन्फरंस) त्यांच्या प्रत्येक शब्दाला महत्व आसतं.. आता आमची मुंबै सात भिकार म्हणनार्‍याच्या हातात जर देश गेला आणि त्याने वरिल कंडीशन्स मधे म्हंटला की आमचा भारत 'सात भिकार' चांगली इज्जत उतरवुन याल हो ! आणि कोणती बहुराष्ट्रिय बैठक असेल आणि त्यात भारताला कोणी काय म्हंटले तर तुम्ही त्याच्या ७ गुणे कौतुक कराल हो .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

>>सध्या परदेशातच झेन्डे लावत आहोत बरका मुशाफिरभौ, तुम्ही जे झेंडे आत्ता लावताय ना, ते कधीच लावून परतलोय बरं आम्ही पुणेकर!! ;) नवीन कायतरी बोला!!

In reply to by यशोधरा

तुम्ही जे झेंडे आत्ता लावताय ना, ते कधीच लावून परतलोय बरं आम्ही पुणेकर!! नवीन कायतरी बोला!! यशोधरा जबरा प्रतिसाद टाकलास. अगदी बॅकहँड क्रॉसकोर्ट.

मंडळी आता बास करुयात. एका दिवसात १०० च्या वर प्रतिसाद आलेत.मि.पा.वरील नवीन विक्रमच झालेला असावा. अन हा धागा असाच चालु राहिला तर प्रतिसाद संख्या हजारात पण जाइल. ह्यातून निष्पन्न काहि होणार नाहि. (आणि पुणेकरांकडे एवढा फावला वेळहि नसतोच म्हणा) डॉ.दाढे यांनी गंमत म्हणुन लिहिलेला हा धागा एवढे प्रतिसाद खेचेल असे वाटले नव्हते. त्यांनाहि हि वादावादि वाचून "कुठून झक मारली अन हा लेख लिहिला" असे न वाटल्यास नवलच! असो ज्यांना अजूनहि ह्या विषयावर टंकायचे असेल त्यांनी नवीन धागा काढलेलाच बरा. कारण आता इथे वाचायला त्रास पडतो. काय म्हणता? अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

मी नुकताच एंटरलोय...... मला जरा एखादा वात्रट, खडुस अन् टिपीकल पुणे ३० प्रतिसाद टाकु दे! (पक्का पुणेरी) टिंग्या :)

आमच्याबद्दल बोलताय होय.....बोला बोला...... फक्त १ गोष्ट लक्षात असु द्या, आम्ही जसे आहोत, तसेच राहु......आमची कितीही चेष्टा केली तरी हम नही सु ध रें गे! आता जरा बाकीच्या मुद्यांबाबत - ४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात हो खातो.....अन् फक्त हिंदुस्थान बेकरीचाच खातो.....आमची मर्जी! तुमच्या पित्ताशयात आम्ल का बरे वाढावे त्यामुळे :? दुपारी एखाद्याला जुलाब सुरू झाले तर त्याने औषधासाठी पाच वाजेपर्य॑त नुसतेच ता॑ब्या घेऊन धावावे वा घरगुती उपचार करावेत. त्यासाठी खडीवाले वैद्यांचा पाचक काढा ठेवावा नेहमी घरी......अन् हो खडीवाले वैद्यांचा पत्ता सांगायला वेगळा चार्ज पडेल! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात 'इतरांनी' डोक्यावर चढवुन ठेवलेल्या डॉलरची आमच्यालेखी 'काय' किंमत आहे हे एव्हाना समजले असेल आपल्याला! ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान? लाज कसली यात? जो लाजला तो पुणेकर नाहीच! एंड फॉर युवर काईंड इन्फॉरमेशन, आम्ही चमनलाल बोरा किंवा मगनलाल जैन नाहीत! (आम्ही संतापाने फुटतो तेव्हा इंग्रजी फाडतो) उलट तुम्हाला आनंद वाटायला हवा की मराठी माणुस असुनही 'धंदा' (तसला नव्हे) करतोय! बिल्डी॑गला नाव ठेवता॑ना आपल्या अस्सल मर्‍हाठी नावापुढे इ॑ग्लीश शब्द जोडण्याची हौसही पुण्यात फार आहे. आमचे सदस्यनाम बघा! बाकीचे मुद्दे तसे चावुन चावुन चोथा झालेले आहेत...... तरीपण आमच्या खवय्येगिरीबद्दल कोणी टिपण्णी कशी केली नाही याचं राहुन राहुन आश्चर्य वाटतयं......अहो अ-पुणेकरांना जळ(व)ण्यासाठी कितीतरी आरोग्यभुवनं पुण्यात आहेत्.......आठवा! बादशाही, पुणे बोर्डिंग हाउस, रामनाथ, बापट उपहार गृह, बेडेकर इ.इ.......द्या शिव्या ह्यांना अन् नंतर इथेच मिटक्या मारत जेवा लेको! आम्हाला आता सवय झालीये या सर्वाची! असो, वरील सगळे मुद्दे केवळ ह.घेणे.....मागाहुन तक्रार चालणार नाही. (पुणेकरांवर टीका करणार्‍यांना खडकी-दापोडी समजणारा) टिंग्या! पुण्यातील वात्रट कार्ट्याची स्वगतपाटी - वरील प्रतिसाद वाचेल तो वेडा!

जियो टारझन, यशोधरा, टिंग्या, अभिज्ञ, संदिप ....मस्त गड लढवलात रे. बाकी पुण्यात उणं शोधण्याचे काम अ-पुणेकरच करत असतात हे मात्र खरयं. कोल्ह्याला द्राक्षे आंबट ! :) माझे कितीतरी नातेवाईक जे पुण्याबाहेर रहात होते ते कालांतराने पुण्यात रहायला आले आहेत अगदी मुंबईकर सुद्धा. अनेक ओळखीतल्या मुंबईकरांनी पण पुण्यात सदनिका घेतलेल्या आहेत. प्रत्येक शहराचा एक चेहरा असतो , एक ओळ्ख असते आणि ती पुण्याने जपली आहे . बिनचेहर्‍याच्या शहरात माणसे यंत्रवत झालेली असतात.

(पुणेकरांवर टीका करणार्‍यांना खडकी-दापोडी समजणारा) टिंग्या! धन्य हो !!! यशोधरा,अभिज्ञ,टा-या, आणी समस्त पुणेकर हो.... सही.................. आणी पुण्या ला नाव ठेवणारे ..... ह.घ्या.. हे .सा. न .ल मजा आली.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

इथ अमुल्य कार्यक्रम विनामुल्य पहाता येतात. पुणेकर फुकटात कुठं काय पघायला भेटतयं यात तरबेज. हा आता दाखवनारे बी पुणेकरच. प्रकाश घाटपांडे

रणजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या नावाखाली पी वाय सी ची टीम उतरवणारे पुणेकरच. बाकी पुणे आणि मुम्बैत एवढे एक साम्य आहे. मुम्बैकराला भारतात मुम्बई हेच एकमेव शहर आहे असे वाटते. पुणेकराला पुणे (आणि नाईलाजाने मुम्बै )सोडुन इतरत्र मागास भागातले लोक रहातात असे वाटते. ऍल्युमिनियम ची ओसरी करुन तेथे मिळणार्‍या तीन चमचे चाला अमृततुल्य नाव देणारे आणि खुन्या/ पासोड्या / दगडुशेठ /जिलब्या/ सोन्या /हत्ती / माती अशी फासेपारध्यांच्या नावासारखी देवा ची नावे ठेवणारे पुणेकर हे देवालाही न उलगडलेले कोडे आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

बरोबर आहे !! कोडच आहे हो !!! शेवटी एक्मेवाद्वीतीय काय असत ते ... तो प्रकार फक्त पुण्यातच पहायला मिळेल .... आणी कुणी - काहीही म्हटल तरी त्याच महत्त्व कमी हत नाही ना... शिवाजी महाराजा च्या पावन स्परशाने पावन झालेली ही भूमी.. ज्ञानेश्वर ,तुकारामा च्या निवासाची भूमी... शंभू राजा समाधी सुद्धा पुण्यातच ..... पेशवाई पुण्यातील च .... अर्थात च मान्य करा नका करू हा इतीहास आहे ... टिळक ,आगरकर्,म. फुले. कर्वे ,किर्लोस्कर ...यादी फार मोठी आहे ... आता तुम्ही म्हनाल ही मंडळी पुण्याची नव्हतीच मुळी.... बरोबर आहे हे सुद्धा ... पण मग त्यानी कर्म भूमी म्हणुन पुण्याचीच निवड का केली.. (१२+२= MH १४ वाला) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

यादी फार मोठी आहे ... उर्वरित महाराष्ट्राचि सुद्धा

In reply to by अनिल हटेला

पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी? त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे

In reply to by अनिल हटेला

पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी? त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे

In reply to by अनिल हटेला

पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी? त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे

In reply to by अनिल हटेला

पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी? त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे

In reply to by अनिल हटेला

पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी? त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे

मराठी माणसा जागा हो !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

स्वतः: च्या डोळ्या वरचि झापडे बाजुला करा, मग दिसेल सगळे जागेच आहेत

In reply to by मराठी_माणूस

बरोबर

उर्वारीत महाराष्ट्राची यादी फार मोठी आहे.तेच म्हणतो पण पुणेकराला पुणे (आणि नाईलाजाने मुम्बै )सोडुन इतरत्र मागास भागातले लोक रहातात असे वाटते. त्याशिवाय बाकी काही दिसतच नाही. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

इतरत्र मागास भागातले लोक रहातात असे वाटते. त्याशिवाय बाकी काही दिसतच नाही. विजाभौ आगामी निवडणूका गडचिरोलीतुन लढवणार आहेत वाटत =)) अहो असतात मागास लोक मागास भागात, काय करणार ? चला आपण उच्चशिक्षणाचे ऍडमिशन घेताना प्राधान्ययादी मधे आंबेडकर युनिव्हर्सिटी-->मराठवाडा युनिव्हर्सिटी-->तत्सम (विजाभौंच्या भाषेत पुणेर्‍यांनी मागासात काढलेल्या) युनिव्हर्सिटी मधे ऍडमिशन घेऊया.... आहो आख्या म्हाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी हे नाव पुण्याला जनमताने मिळालंय.. इसको कोण एक माणूस के सर्टिफिकेट की गरज नही हय.... (जस टिळकांना लोकमान्य) गणपतीला जी पण नावे आहेत ती प्रेमाखातर आहेत, त्यात मुंबैकरासारखा वरवरपणा नाही ए कोई नया धागा शुरू करो रे ........... जहालमतवादी पुणेकर्स : यशो,आन्या,टिंग्या,अभिज्ञ्,टार्‍या अँड टिम -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

पुण्यावर होत असेल तर नक्कीच काहीतरी असणार या शहरात. तर मग अशी थोडी थोडी चर्चा करून कशाला थांबायचं.ज्याला पुणं आणि पुणेकर समजले आहेत त्यांनी एक मोठा लेख लिहायला काय हरकत आहे.(डॉ. दाढ्यानी हा विषय मांडला असावा एका स्थलांतरीत माणसाच्या नजरेतून )फोटो फीचर बनवलं तर आणखी मजा .एखाद्या मानसशास्त्रीनी पुणेकरांच्या मानसिकतेचं विश्लेषण पण का करू नये.?(प्रत्येक शहराची अशी खास मानसिकता असते असं मला वाटतं.)मनमोकळ्या चर्चेचा आनंद झाला.

च्यायला नेमक्या ह्याच टॉपीक च्या वेळी काम वाढल्याने गप्प बसावं लागलं. असो. आता टाकतो तेल. पेशवाई पुण्यात होती ह्यात काय नवल? कारण मुंबई निर्माण केलीच मुळी साहेबाने. त्यावेळी मुंबई आजच्या सारखी असती तर पेशवे कुठे राहिले असते हे सांगायला नकोच. आणि पेशव्यांच्या पुण्या नंतर निर्माण होऊनही आज मुंबई अख्ख्या भारताची आर्थीक राजधानी आहे. शेयर बाजार आहे, डायमंड मार्केट आहे. तरी पुणेच महान. आपला, (श्रीमंत मुंबईकर) ऍडी जोशी पुण्यात म्हणे जगाला जळवतील अशा खायच्या जागा आहेत. असतीलही. पण मग ते जग पेठांपुरते मर्यादीत असेल. एकट्या दादर आणि गिरगाव मधेच अख्ख्या पुण्यापेक्षा जास्त आणि सरस खायची आणि प्यायची सोय आहे. तरी पुणेच महान. आपला, (खादाड मुंबईकर) ऍडी जोशी पुण्यात मराठी टक्का जास्त आहे. मग??? लोकं बाहेरून येतात ते आयुष्यात पुढे जायला. जगाच्या मागे असलेल्या गावात कोण कशाला जाईल. पुण्यापेक्षा जास्त मराठी टक्का आमच्या आसूद गावात आहे. ह्यावर काय बोलायचे? अमेरिकेत शेकडो लोकं जातात. युगांडा मधे कोण कशाला जाईल? आणि मुंबईतून जी कोणी लोकं पुणे, तळेगावला रहायला येतात ती रिटायर्ड झाल्यावर. पुर्वी पुण्यात निदान हवा तरी चांगली होती. आता तिचीही वाट लागली आहे. तरी पुणेच महान. आपला, (मराठी मुंबईकर) ऍडी जोशी पुण्यातले रस्ते, रिक्षावाले आणि PMT बद्दल तर बोलावे तितकेच कमी आहे. वहतुकीला शिस्त नावाचा प्रकारच नाहिये. सिग्नल पाळणार्‍या माणसाकडे बाकिचे "सटकलाय" ह्या नजरेने बघतात. पुण्यात असून स्वतःचं वाहन नसणारा माणूस अपंग होऊन जातो अथवा रिक्षानी जायची हिंमत केलीच तर कंगाल होतो. मुंबईमधली वहातूक व्यवस्था अतीशय उत्तम आहे. इथे आयुष्यभर स्वतःच वाहन न घेऊन जगणारी माणसं आहेत. लोकं लेन ची शिस्त पाळतात. लाल, पिवळा, हिरवा दिवे वाला सिग्नल पालीकेने लोकांच्या करमणूकी साठी लावला नाहिये हे मुंबईकर जाणतो. इंटरनॅशनल एअरपोर्ट बद्दल मी बोलतच नाहिये. तरी पुणेच महान. आपला, (शिस्तप्रिय मुंबईकर) ऍडी जोशी अरे हो, आणि आजकालचे बरेचसे पुणेकर अजून पेशवाईतच जगतायत. जगोत बापडे. कोणे एके काळी पेशवाई होती. आता नाहिये. तरी पुणेच महान. आपला, (वर्तमानात जगणारा मुंबईकर) ऍडी जोशी

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

जगाच्या मागे असलेल्या गावात कोण कशाला जाईल. पुण्यापेक्षा जास्त मराठी टक्का आमच्या आसूद गावात आहे. आणखी एक सिक्स पुण्याच्या विरुद्ध बाजूनी! आणि आणखी काही उदाहरणादाखल: त्यावेळी मुंबई आजच्या सारखी असती तर पेशवे कुठे राहिले असते हे सांगायला नकोच. आणि पेशव्यांच्या पुण्या नंतर निर्माण होऊनही आज मुंबई अख्ख्या भारताची आर्थीक राजधानी आहे. पण मग ते जग पेठांपुरते मर्यादीत असेल. एकट्या दादर आणि गिरगाव मधेच .... जगाच्या मागे असलेल्या गावात कोण कशाला जाईल. पुण्यापेक्षा जास्त मराठी टक्का आमच्या आसूद गावात आहे. ह्यावर काय बोलायचे? अमेरिकेत शेकडो लोकं जातात. युगांडा मधे कोण कशाला जाईल? सिग्नल पाळणार्‍या माणसाकडे बाकिचे "सटकलाय" ह्या नजरेने बघतात. लाल, पिवळा, हिरवा दिवे वाला सिग्नल पालीकेने लोकांच्या करमणूकी साठी लावला नाहिये हे मुंबईकर जाणतो. तुमचं उत्तर अतिशय मुद्देसूद आहे आणि बिनतोडही, पण .... आणि आजकालचे बरेचसे पुणेकर अजून पेशवाईतच जगतायत. भौ, हे तुम्हीच लिहिलं आहेत, त्यामुळे फार जास्त अपेक्षा करू नका "इतिहास"पुरुषांकडून! एक षष्ठांश गोरी यमी गोखले (खरी, संहिता जोशी)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एक षष्ठांश गोरी यमी गोखले (खरी, संहिता जोशी) आपल्या बाजुने कोणितरी बोलणारे भेटल्यानंतर अति हार्शाने किंवा आनंदाने बावचाळलेल्या मधले एक उदाहरण. स्वताचे खरे नावही विसरलेल्या यमु आज्जी. :) (मनाने आणी कर्माने मुंबईकर)मनीष पाठक

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

पेशव्यांच्या पुण्या नंतर निर्माण होऊनही आज मुंबई अख्ख्या भारताची आर्थीक राजधानी आहे. ह्यात मराठी माणसाचा किती हात ? उद्या बिहारचा जपान (जपान्यांमुळे) झाला तर लालू म्हणेल मी बिहारचा जपान केला आणी ह्या ऍड्या(का येड्या?) सारखा नाचेल =)) (पुण्याचा श्रीमंत पेशवा) टारझन पुण्यापेक्षा जास्त मराठी टक्का आमच्या आसूद गावात आहे. ह्यावर काय बोलायचे? ह्यालू ... ह्यालू ? ..... कुनी वळाखत का आसूद गावाला .. च्यामारी लिवता लिवता माझी भाषाच आसुद झाली =)) काय पण एक एक गावठी ... (शुद्ध पुणेकर) टारझन अमेरिकेत शेकडो लोकं जातात. युगांडा मधे कोण कशाला जाईल? आमेरिकेत आजकाल पट्टेवाला पण जातो... आम्ही नुसते युगांडाच नाही तर अजुन ४ देशांची वारी करून आलोय. आणि पट्टेवाल्याच्या अमेरिकेत जायचा मोह नाहीच ... आलेले चान्स नाकारून अफ्रिका गाठली.. उद्या दुसरा देश ... हवा आहे आपली .. वास घेऊन नाक दाबा =)) (बारा देशांचं मिनरल वॉटर पिलेला) टारझन पुण्यात म्हणे जगाला जळवतील अशा खायच्या जागा आहेत. असतीलही. पण मग ते जग पेठांपुरते मर्यादीत असेल. एकट्या दादर आणि गिरगाव मधेच अख्ख्या पुण्यापेक्षा जास्त आणि सरस खायची आणि प्यायची सोय आहे अरारारा .. =)) =)) =)) हसून हसून मेलो आहे ... मला दादर गिरगावाच्या एकाही खायच्या ठिकाणाचं नाव कोण्या नॉन-पुणेकर आणी नॉन-महाराष्ट्रियन माणसाने घेतलेल ऐकिवात नाही... हा मात्र माझ्या पूणे ऑफिसला व्हिजीट देणारे दिल्लीची टिम मात्र आवर्जुन पराठे खायला "चैतन्य" मधेच आवर्जुन जातात. असो ... तुम्ही बी या हो जोशी ब्वॉ.... (पूण्याच्या शेकडो हॉटेल्सचे शेकडो मेनू चापलेला) टारझन पुण्यातले रस्ते, रिक्षावाले आणि PMT बद्दल तर बोलावे तितकेच कमी आहे. वहतुकीला शिस्त नावाचा प्रकारच नाहिये. सिग्नल पाळणार्‍या माणसाकडे बाकिचे "सटकलाय" ह्या नजरेने बघतात. हाहाहा .... यह तो पूणे की शान है ... थ्री चियर्स फॉर पी.एम.टी. पुण्यात असून स्वतःचं वाहन नसणारा माणूस अपंग होऊन जातो अथवा रिक्षानी जायची हिंमत केलीच तर कंगाल होतो. आता बावळटांना जगात कुठेही फसवलंच जातं .... आम्ही मात्र रिक्षाने मस्त फिरुन पैशे जमवून आहोत... =)) (अतिहुशार आणि बावळटांना फाट्यावर गंडवणारा पुणेकर) टारझन लाल, पिवळा, हिरवा दिवे वाला सिग्नल पालीकेने लोकांच्या करमणूकी साठी लावला नाहिये हे मुंबईकर जाणतो. इंटरनॅशनल एअरपोर्ट बद्दल मी बोलतच नाहिये. तरी पुणेच महान. =)) =)) =)) वा ! पूण्यात किती करमणूक होते वा वा वा .... आणि एवढी शिस्त पाळून देखील दादरहुन पूणे हायवे ला लागायला २-३ तास लागतात.. मग तिथुन पुढे पूण्याला माणूस १:३० तासातच पोचतो .. वा रे मुंबईच ट्राफिक ... सिग्नल तोडायला जागा पायजे ना ..गाड्यांना जेट इंजिन असत तर जाम एकमेकांवर गाड्या चढवून हवेत पण ट्राफिक जाम केलं असतं... पूण्यात एवढे अरुंद रोड असुन पण कधी मुंबैच्या १०%पण ट्राफिक नाही (करमणूकीचे सिग्नल तोडणारा) टारझन आणि शेवटी आख्ख्या जगाला पुरून उरून मिशा पिळणारा पूणेकर - ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात