✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुणेरी पुणेकरः काही निरिक्षणे

ड
डॉ.प्रसाद दाढे यांनी
Sun, 08/17/2008 - 12:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55508 वाचन

💬 प्रतिसाद (229)

प्रतिक्रिया

>>पुण्यात काय उणे आहे ह्याचे निरिक्षण करण्याचे

मुशाफिर
Tue, 08/19/2008 - 00:13 नवीन
काम अपुणेकर मंडळिंवर सोपवून तो आपल्या कामात व्यस्त असतो. पण कितीहि व्यस्त असला तरिही......पुण्यासाठी किल्ला लढवायला सदैव तत्पर असतो. हे लिहायच राहून गेले कि काय? :) ह. घ्या. (किल्ला न लढवताच पान्ढरे निशाण दाखवणारा) मुशाफिर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

(किल्ला न

मनीष पाठक
Wed, 08/20/2008 - 15:11 नवीन
(किल्ला न लढवताच पान्ढरे निशाण दाखवणारा) वेळ आली की घातली शेपुट. ही एकच घाण खोड मुंबईकरांनी सोडुन द्या. (जन्म आणि कर्माने मुंबईकर असलेला) मनीष पाठक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

>>अशी

यशोधरा
Mon, 08/18/2008 - 23:57 नवीन
>>अशी विनोदबुद्धी मुम्बैकरान्कडे नाहि हे मात्र खरं!! :) कसं जगता हो विनोदबुद्धी नसतानाही?? घड्याळाच्या तालावर नाचताना 'विनोदच' काय कोणतीही भावना बाळगणे हेच मुंबैकर विसरुन गेलाय!! म्हणून मग, पुण्याला नावं (असूयेपोटी) ठेवतो, अन् तिथेच दुसरं घर घेतो, आणि पुन्हा अस्सल 'मुंबैकर' पणा दाखवत पुण्यालाच नावं ठेवतो!! :( असो.
  • Log in or register to post comments

हे मात्र खर आहे!

मुशाफिर
Tue, 08/19/2008 - 00:05 नवीन
>>घड्याळाच्या तालावर नाचताना 'विनोदच' काय कोणतीही भावना बाळगणे हेच मुंबैकर विसरुन गेलाय!! एकदम मान्य! मुम्बई म्हणजे सात भिकार! :) (भिकार मुम्बईवरही मनापासून प्रेम करणारा) मुशाफिर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

>>भिकार

यशोधरा
Tue, 08/19/2008 - 00:14 नवीन
>>भिकार मुम्बईवरही मनापासून प्रेम करणारा फक्त मुंबैवरच? आम्ही पुणेकर अख्ख्या भारत देशावर प्रेम करतो ब्वॉ!! :) >>मुम्बई म्हणजे सात भिकार! नाही कोण म्हणलय!! :D
  • Log in or register to post comments

खॅखॅखॅ

टारझन
Tue, 08/19/2008 - 00:31 नवीन
मुम्बई म्हणजे सात भिकार! नाही कोण म्हणलय!! देवा असल्या मुंबैकराच्या हातात देश गेला तर परदेशात झेंडे लाऊन येतील .. पत्रकार परिषदेत म्हणतील आमचा भारत सात भिकार .... आरारारा ... काय हे भिकारचळ लागले रे .. चॅचॅचॅ -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

यशोधरा...

खादाड_बोका
Tue, 08/19/2008 - 00:29 नवीन
भैय्यांना घर द्याल का हो किरायाने ब्वॉ!! ;) ;) ;) ;) सत्य कटु असते....
  • Log in or register to post comments

>>आम्ही पुणेकर अख्ख्या भारत देशावर प्रेम करतो ब्वॉ!!

मुशाफिर
Tue, 08/19/2008 - 00:36 नवीन
नाहि कोण म्हणतय? पण मुम्बैकर भारतावर प्रेम करतात, हे वेगळ सान्गाव लागत नाही (पुणेकरानसारख!) :). शेवटी, देशाच्या आर्थिक राजधानीच स्थान पुणे नक्किच नाही. स्वगतः- मुशाफिरा, जसा काही मुम्बैतून मिळणारा सगळा महसूल तू स्वत:च्याच खिशातून भरतोस! :) (देशप्रेमी), मुशाफिर
  • Log in or register to post comments

>>भैय्यांना

यशोधरा
Tue, 08/19/2008 - 00:54 नवीन
>>भैय्यांना घर द्याल का हो किरायाने ब्वॉ!! एक मुंबै मराठी माणसाच्या हातातून सुटते आहे/ सुटली आहे तेवढे पुरेसे वाटत नाही का हो बोकोबा?? :) >>देशाच्या आर्थिक राजधानीच स्थान पुणे नक्किच नाही. असतं तर ते बिगरमराठी लोकांच्या हाती गेलं नसतं मात्र!! बोकोबा, मुशाफिर, पुण्यातही बिगर मराठी वा आधीपासून पुण्यात नसलेले कित्येक जण येतात, विद्यार्थी, नोकरदार सगळेच. तरीही पुण्याचं पुणेपण सुटत नही, सुटूही नये. मुंबईइतकं बोटचेपं धोरण पुण्यात इतक्या सहजासहजी स्वीकारलं जाईल अस मला तरी वाटत नाही.
  • Log in or register to post comments

बर बर...

अभिज्ञ
Tue, 08/19/2008 - 00:52 नवीन
शेवटी, देशाच्या आर्थिक राजधानीच स्थान पुणे नक्किच नाही. बर बाबा तु आनि तुझी मुंबै लै भारि.झाल समाधान? बर जाता जाता एक काम करा,पुणे आणि पुणेकरांवर गरळ ओकण्यापेक्षा तीच ताकत मुंबईत मराठी च्या संवर्धनासाठि वापरा ना. ह्या देशाच्या आर्थिक राजधानीत आताशा मराठी मुंबईकर पनवेल पर्यंत पोहोचलाच आहे, काहि वर्षांत तो पुण्यात पोचला तर त्यात नवल वाटायला नको. काय?
  • Log in or register to post comments

मराठी आणि मराठी माणसाविषयी....

मुशाफिर
Tue, 08/19/2008 - 01:10 नवीन
कळकळ मुम्बईकरानाहि आहेच! आज मुम्बईत जो मराठी माणूस टिकला आहे तो स्वतःच्या हिमतीवरच. अर्थात, त्याची स्थिति फार भूषणावह नाही, हे कोणिच नाकारत नाहि. आहो, मि. पा. वर आम्हि जे लिहितो आहोत ते फक्त गम्मत म्हणून. आणि मुम्बै काय किवा पूणे काय? जगात जिथे राहू तिथे भारतीय आणि त्यातहि मराठी (माणस आणि शहर) आम्हाला सगळ्यात प्रिय आहे! तेव्हा समस्त मिपाकर जनहो माझे लिखाण ह्.घ्या. हे. सा. न. ल. :) काहि काळ पूण्यनगरी(तही) निवास केलेला, मुशाफिर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

>>देवा असल्या मुंबैकराच्या हातात देश गेला तर परदेशात झेंडे लाऊन

मुशाफिर
Tue, 08/19/2008 - 00:54 नवीन
सध्या परदेशातच झेन्डे लावत आहोत (फक्त अटकेपार नाही हो, त्याच्याही पुढे! ), तेही मोठ्या अभिमानाने! (भारतीयत्वाच्या बर का? नाहीतर मुम्बईच्याच का? असा तिरकस पुणेरी प्रश्ण विचाराल!) :) ह्.घ्या. आणि पत्रकार परिषदेच म्हणाल तर आम्हा पामरान्चि कसली हो परिषद? परदेशस्थ (पण मनाने) मुम्बैकर(च), मुशाफिर
  • Log in or register to post comments

शेवटी,

टारझन
Tue, 08/19/2008 - 01:03 नवीन
शेवटी, देशाच्या आर्थिक राजधानीच स्थान पुणे नक्किच नाही. नाचा मग !! =)) सध्या परदेशातच झेन्डे लावत आहोत देश आपल्या हातात नाही... असले झेंडे तर आम्ही पण लावले आहेत. आणि पत्रकार परिषदेच म्हणाल तर आम्हा पामरान्चि कसली हो परिषद? आई गं .. किती डोकं फोडून सांगू ? ज्यांच्या हातात देश आहे (प्रधानमंतत्री, राष्ट्रपती, ई.) ते परदेशात गेले की एक पत्रकार परिषद होते (शुद्ध मराठीत प्रेस कॉन्फरंस) त्यांच्या प्रत्येक शब्दाला महत्व आसतं.. आता आमची मुंबै सात भिकार म्हणनार्‍याच्या हातात जर देश गेला आणि त्याने वरिल कंडीशन्स मधे म्हंटला की आमचा भारत 'सात भिकार' चांगली इज्जत उतरवुन याल हो ! आणि कोणती बहुराष्ट्रिय बैठक असेल आणि त्यात भारताला कोणी काय म्हंटले तर तुम्ही त्याच्या ७ गुणे कौतुक कराल हो .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

>>सध्या

यशोधरा
Tue, 08/19/2008 - 00:59 नवीन
>>सध्या परदेशातच झेन्डे लावत आहोत बरका मुशाफिरभौ, तुम्ही जे झेंडे आत्ता लावताय ना, ते कधीच लावून परतलोय बरं आम्ही पुणेकर!! ;) नवीन कायतरी बोला!!
  • Log in or register to post comments

यशोधरा..

अभिज्ञ
Tue, 08/19/2008 - 01:05 नवीन
तुम्ही जे झेंडे आत्ता लावताय ना, ते कधीच लावून परतलोय बरं आम्ही पुणेकर!! नवीन कायतरी बोला!! यशोधरा जबरा प्रतिसाद टाकलास. अगदी बॅकहँड क्रॉसकोर्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आता बास

अभिज्ञ
Tue, 08/19/2008 - 01:19 नवीन
मंडळी आता बास करुयात. एका दिवसात १०० च्या वर प्रतिसाद आलेत.मि.पा.वरील नवीन विक्रमच झालेला असावा. अन हा धागा असाच चालु राहिला तर प्रतिसाद संख्या हजारात पण जाइल. ह्यातून निष्पन्न काहि होणार नाहि. (आणि पुणेकरांकडे एवढा फावला वेळहि नसतोच म्हणा) डॉ.दाढे यांनी गंमत म्हणुन लिहिलेला हा धागा एवढे प्रतिसाद खेचेल असे वाटले नव्हते. त्यांनाहि हि वादावादि वाचून "कुठून झक मारली अन हा लेख लिहिला" असे न वाटल्यास नवलच! असो ज्यांना अजूनहि ह्या विषयावर टंकायचे असेल त्यांनी नवीन धागा काढलेलाच बरा. कारण आता इथे वाचायला त्रास पडतो. काय म्हणता? अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

अरे थांब थांब.....

ब्रिटिश टिंग्या
Tue, 08/19/2008 - 01:28 नवीन
मी नुकताच एंटरलोय...... मला जरा एखादा वात्रट, खडुस अन् टिपीकल पुणे ३० प्रतिसाद टाकु दे! (पक्का पुणेरी) टिंग्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

ह्म्म्म्म्......

ब्रिटिश टिंग्या
Tue, 08/19/2008 - 02:17 नवीन
आमच्याबद्दल बोलताय होय.....बोला बोला...... फक्त १ गोष्ट लक्षात असु द्या, आम्ही जसे आहोत, तसेच राहु......आमची कितीही चेष्टा केली तरी हम नही सु ध रें गे! आता जरा बाकीच्या मुद्यांबाबत - ४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात हो खातो.....अन् फक्त हिंदुस्थान बेकरीचाच खातो.....आमची मर्जी! तुमच्या पित्ताशयात आम्ल का बरे वाढावे त्यामुळे :? दुपारी एखाद्याला जुलाब सुरू झाले तर त्याने औषधासाठी पाच वाजेपर्य॑त नुसतेच ता॑ब्या घेऊन धावावे वा घरगुती उपचार करावेत. त्यासाठी खडीवाले वैद्यांचा पाचक काढा ठेवावा नेहमी घरी......अन् हो खडीवाले वैद्यांचा पत्ता सांगायला वेगळा चार्ज पडेल! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात 'इतरांनी' डोक्यावर चढवुन ठेवलेल्या डॉलरची आमच्यालेखी 'काय' किंमत आहे हे एव्हाना समजले असेल आपल्याला! ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान? लाज कसली यात? जो लाजला तो पुणेकर नाहीच! एंड फॉर युवर काईंड इन्फॉरमेशन, आम्ही चमनलाल बोरा किंवा मगनलाल जैन नाहीत! (आम्ही संतापाने फुटतो तेव्हाच इंग्रजी फाडतो) उलट तुम्हाला आनंद वाटायला हवा की मराठी माणुस असुनही 'धंदा' (तसला नव्हे) करतोय! बिल्डी॑गला नाव ठेवता॑ना आपल्या अस्सल मर्‍हाठी नावापुढे इ॑ग्लीश शब्द जोडण्याची हौसही पुण्यात फार आहे. आमचे सदस्यनाम बघा! बाकीचे मुद्दे तसे चावुन चावुन चोथा झालेले आहेत...... तरीपण आमच्या खवय्येगिरीबद्दल कोणी टिपण्णी कशी केली नाही याचं राहुन राहुन आश्चर्य वाटतयं......अहो अ-पुणेकरांना जळ(व)ण्यासाठी कितीतरी आरोग्यभुवनं पुण्यात आहेत्.......आठवा! बादशाही, पुणे बोर्डिंग हाउस, रामनाथ, बापट उपहार गृह, बेडेकर इ.इ.......द्या शिव्या ह्यांना अन् नंतर इथेच मिटक्या मारत जेवा लेको! आम्हाला आता सवय झालीये या सर्वाची! असो, वरील सगळे मुद्दे केवळ ह.घेणे.....मागाहुन तक्रार चालणार नाही. (पुणेकरांवर टीका करणार्‍यांना खडकी-दापोडी समजणारा) टिंग्या! पुण्यातील वात्रट कार्ट्याची स्वगतपाटी - वरील प्रतिसाद वाचेल तो वेडा!
  • Log in or register to post comments

जियो

पक्या
Tue, 08/19/2008 - 07:04 नवीन
जियो टारझन, यशोधरा, टिंग्या, अभिज्ञ, संदिप ....मस्त गड लढवलात रे. बाकी पुण्यात उणं शोधण्याचे काम अ-पुणेकरच करत असतात हे मात्र खरयं. कोल्ह्याला द्राक्षे आंबट ! :) माझे कितीतरी नातेवाईक जे पुण्याबाहेर रहात होते ते कालांतराने पुण्यात रहायला आले आहेत अगदी मुंबईकर सुद्धा. अनेक ओळखीतल्या मुंबईकरांनी पण पुण्यात सदनिका घेतलेल्या आहेत. प्रत्येक शहराचा एक चेहरा असतो , एक ओळ्ख असते आणि ती पुण्याने जपली आहे . बिनचेहर्‍याच्या शहरात माणसे यंत्रवत झालेली असतात.
  • Log in or register to post comments

(पुणेकरांव

अनिल हटेला
Tue, 08/19/2008 - 07:27 नवीन
(पुणेकरांवर टीका करणार्‍यांना खडकी-दापोडी समजणारा) टिंग्या! धन्य हो !!! यशोधरा,अभिज्ञ,टा-या, आणी समस्त पुणेकर हो.... सही.................. आणी पुण्या ला नाव ठेवणारे ..... ह.घ्या.. हे .सा. न .ल मजा आली.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

अमुल्य कार्यक्रम

प्रकाश घाटपांडे
Tue, 08/19/2008 - 08:38 नवीन
इथ अमुल्य कार्यक्रम विनामुल्य पहाता येतात. पुणेकर फुकटात कुठं काय पघायला भेटतयं यात तरबेज. हा आता दाखवनारे बी पुणेकरच. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

मस्त!

वजीर
Sat, 02/21/2009 - 01:33 नवीन
खरं आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

पुणेकर हे देवालाही न उलगडलेले कोडे आहे.

विजुभाऊ
Tue, 08/19/2008 - 09:07 नवीन
रणजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या नावाखाली पी वाय सी ची टीम उतरवणारे पुणेकरच. बाकी पुणे आणि मुम्बैत एवढे एक साम्य आहे. मुम्बैकराला भारतात मुम्बई हेच एकमेव शहर आहे असे वाटते. पुणेकराला पुणे (आणि नाईलाजाने मुम्बै )सोडुन इतरत्र मागास भागातले लोक रहातात असे वाटते. ऍल्युमिनियम ची ओसरी करुन तेथे मिळणार्‍या तीन चमचे चाला अमृततुल्य नाव देणारे आणि खुन्या/ पासोड्या / दगडुशेठ /जिलब्या/ सोन्या /हत्ती / माती अशी फासेपारध्यांच्या नावासारखी देवा ची नावे ठेवणारे पुणेकर हे देवालाही न उलगडलेले कोडे आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

बरोबर आहे

अनिल हटेला
Tue, 08/19/2008 - 09:18 नवीन
बरोबर आहे !! कोडच आहे हो !!! शेवटी एक्मेवाद्वीतीय काय असत ते ... तो प्रकार फक्त पुण्यातच पहायला मिळेल .... आणी कुणी - काहीही म्हटल तरी त्याच महत्त्व कमी हत नाही ना... शिवाजी महाराजा च्या पावन स्परशाने पावन झालेली ही भूमी.. ज्ञानेश्वर ,तुकारामा च्या निवासाची भूमी... शंभू राजा समाधी सुद्धा पुण्यातच ..... पेशवाई पुण्यातील च .... अर्थात च मान्य करा नका करू हा इतीहास आहे ... टिळक ,आगरकर्,म. फुले. कर्वे ,किर्लोस्कर ...यादी फार मोठी आहे ... आता तुम्ही म्हनाल ही मंडळी पुण्याची नव्हतीच मुळी.... बरोबर आहे हे सुद्धा ... पण मग त्यानी कर्म भूमी म्हणुन पुण्याचीच निवड का केली.. (१२+२= MH १४ वाला) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

यादि

मराठी_माणूस
Tue, 08/19/2008 - 09:58 नवीन
यादी फार मोठी आहे ... उर्वरित महाराष्ट्राचि सुद्धा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

अनिल हटेला ...

खादाड_बोका
Tue, 08/19/2008 - 22:08 नवीन
पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी? त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

अनिल हटेला ...

खादाड_बोका
Tue, 08/19/2008 - 22:08 नवीन
पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी? त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

अनिल हटेला ...

खादाड_बोका
Tue, 08/19/2008 - 22:08 नवीन
पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी? त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

अनिल हटेला ...

खादाड_बोका
Tue, 08/19/2008 - 22:09 नवीन
पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी? त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

अनिल हटेला ...

खादाड_बोका
Tue, 08/19/2008 - 22:09 नवीन
पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी? त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

मराठी

अनिल हटेला
Tue, 08/19/2008 - 10:03 नवीन
मराठी माणसा जागा हो !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

झापडे

मराठी_माणूस
Tue, 08/19/2008 - 10:08 नवीन
स्वतः: च्या डोळ्या वरचि झापडे बाजुला करा, मग दिसेल सगळे जागेच आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

+१

दिल्लीचं कार्ट
गुरुवार, 02/26/2009 - 09:59 नवीन
बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

तेच म्हणतो

विजुभाऊ
Tue, 08/19/2008 - 10:06 नवीन
उर्वारीत महाराष्ट्राची यादी फार मोठी आहे.तेच म्हणतो पण पुणेकराला पुणे (आणि नाईलाजाने मुम्बै )सोडुन इतरत्र मागास भागातले लोक रहातात असे वाटते. त्याशिवाय बाकी काही दिसतच नाही. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

विजाभौ + माणूस

टारझन
Tue, 08/19/2008 - 10:22 नवीन
इतरत्र मागास भागातले लोक रहातात असे वाटते. त्याशिवाय बाकी काही दिसतच नाही. विजाभौ आगामी निवडणूका गडचिरोलीतुन लढवणार आहेत वाटत =)) अहो असतात मागास लोक मागास भागात, काय करणार ? चला आपण उच्चशिक्षणाचे ऍडमिशन घेताना प्राधान्ययादी मधे आंबेडकर युनिव्हर्सिटी-->मराठवाडा युनिव्हर्सिटी-->तत्सम (विजाभौंच्या भाषेत पुणेर्‍यांनी मागासात काढलेल्या) युनिव्हर्सिटी मधे ऍडमिशन घेऊया.... आहो आख्या म्हाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी हे नाव पुण्याला जनमताने मिळालंय.. इसको कोण एक माणूस के सर्टिफिकेट की गरज नही हय.... (जस टिळकांना लोकमान्य) गणपतीला जी पण नावे आहेत ती प्रेमाखातर आहेत, त्यात मुंबैकरासारखा वरवरपणा नाही ए कोई नया धागा शुरू करो रे ........... जहालमतवादी पुणेकर्स : यशो,आन्या,टिंग्या,अभिज्ञ्,टार्‍या अँड टिम -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

एव्हढी मोठी चर्चा

रामदास
Tue, 08/19/2008 - 10:07 नवीन
पुण्यावर होत असेल तर नक्कीच काहीतरी असणार या शहरात. तर मग अशी थोडी थोडी चर्चा करून कशाला थांबायचं.ज्याला पुणं आणि पुणेकर समजले आहेत त्यांनी एक मोठा लेख लिहायला काय हरकत आहे.(डॉ. दाढ्यानी हा विषय मांडला असावा एका स्थलांतरीत माणसाच्या नजरेतून )फोटो फीचर बनवलं तर आणखी मजा .एखाद्या मानसशास्त्रीनी पुणेकरांच्या मानसिकतेचं विश्लेषण पण का करू नये.?(प्रत्येक शहराची अशी खास मानसिकता असते असं मला वाटतं.)मनमोकळ्या चर्चेचा आनंद झाला.
  • Log in or register to post comments

माझा आवडता विषय

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 08/19/2008 - 11:51 नवीन
च्यायला नेमक्या ह्याच टॉपीक च्या वेळी काम वाढल्याने गप्प बसावं लागलं. असो. आता टाकतो तेल. पेशवाई पुण्यात होती ह्यात काय नवल? कारण मुंबई निर्माण केलीच मुळी साहेबाने. त्यावेळी मुंबई आजच्या सारखी असती तर पेशवे कुठे राहिले असते हे सांगायला नकोच. आणि पेशव्यांच्या पुण्या नंतर निर्माण होऊनही आज मुंबई अख्ख्या भारताची आर्थीक राजधानी आहे. शेयर बाजार आहे, डायमंड मार्केट आहे. तरी पुणेच महान. आपला, (श्रीमंत मुंबईकर) ऍडी जोशी पुण्यात म्हणे जगाला जळवतील अशा खायच्या जागा आहेत. असतीलही. पण मग ते जग पेठांपुरते मर्यादीत असेल. एकट्या दादर आणि गिरगाव मधेच अख्ख्या पुण्यापेक्षा जास्त आणि सरस खायची आणि प्यायची सोय आहे. तरी पुणेच महान. आपला, (खादाड मुंबईकर) ऍडी जोशी पुण्यात मराठी टक्का जास्त आहे. मग??? लोकं बाहेरून येतात ते आयुष्यात पुढे जायला. जगाच्या मागे असलेल्या गावात कोण कशाला जाईल. पुण्यापेक्षा जास्त मराठी टक्का आमच्या आसूद गावात आहे. ह्यावर काय बोलायचे? अमेरिकेत शेकडो लोकं जातात. युगांडा मधे कोण कशाला जाईल? आणि मुंबईतून जी कोणी लोकं पुणे, तळेगावला रहायला येतात ती रिटायर्ड झाल्यावर. पुर्वी पुण्यात निदान हवा तरी चांगली होती. आता तिचीही वाट लागली आहे. तरी पुणेच महान. आपला, (मराठी मुंबईकर) ऍडी जोशी पुण्यातले रस्ते, रिक्षावाले आणि PMT बद्दल तर बोलावे तितकेच कमी आहे. वहतुकीला शिस्त नावाचा प्रकारच नाहिये. सिग्नल पाळणार्‍या माणसाकडे बाकिचे "सटकलाय" ह्या नजरेने बघतात. पुण्यात असून स्वतःचं वाहन नसणारा माणूस अपंग होऊन जातो अथवा रिक्षानी जायची हिंमत केलीच तर कंगाल होतो. मुंबईमधली वहातूक व्यवस्था अतीशय उत्तम आहे. इथे आयुष्यभर स्वतःच वाहन न घेऊन जगणारी माणसं आहेत. लोकं लेन ची शिस्त पाळतात. लाल, पिवळा, हिरवा दिवे वाला सिग्नल पालीकेने लोकांच्या करमणूकी साठी लावला नाहिये हे मुंबईकर जाणतो. इंटरनॅशनल एअरपोर्ट बद्दल मी बोलतच नाहिये. तरी पुणेच महान. आपला, (शिस्तप्रिय मुंबईकर) ऍडी जोशी अरे हो, आणि आजकालचे बरेचसे पुणेकर अजून पेशवाईतच जगतायत. जगोत बापडे. कोणे एके काळी पेशवाई होती. आता नाहिये. तरी पुणेच महान. आपला, (वर्तमानात जगणारा मुंबईकर) ऍडी जोशी
  • Log in or register to post comments

वेल डन!

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/19/2008 - 12:00 नवीन
जगाच्या मागे असलेल्या गावात कोण कशाला जाईल. पुण्यापेक्षा जास्त मराठी टक्का आमच्या आसूद गावात आहे. आणखी एक सिक्स पुण्याच्या विरुद्ध बाजूनी! आणि आणखी काही उदाहरणादाखल: त्यावेळी मुंबई आजच्या सारखी असती तर पेशवे कुठे राहिले असते हे सांगायला नकोच. आणि पेशव्यांच्या पुण्या नंतर निर्माण होऊनही आज मुंबई अख्ख्या भारताची आर्थीक राजधानी आहे. पण मग ते जग पेठांपुरते मर्यादीत असेल. एकट्या दादर आणि गिरगाव मधेच .... जगाच्या मागे असलेल्या गावात कोण कशाला जाईल. पुण्यापेक्षा जास्त मराठी टक्का आमच्या आसूद गावात आहे. ह्यावर काय बोलायचे? अमेरिकेत शेकडो लोकं जातात. युगांडा मधे कोण कशाला जाईल? सिग्नल पाळणार्‍या माणसाकडे बाकिचे "सटकलाय" ह्या नजरेने बघतात. लाल, पिवळा, हिरवा दिवे वाला सिग्नल पालीकेने लोकांच्या करमणूकी साठी लावला नाहिये हे मुंबईकर जाणतो. तुमचं उत्तर अतिशय मुद्देसूद आहे आणि बिनतोडही, पण .... आणि आजकालचे बरेचसे पुणेकर अजून पेशवाईतच जगतायत. भौ, हे तुम्हीच लिहिलं आहेत, त्यामुळे फार जास्त अपेक्षा करू नका "इतिहास"पुरुषांकडून! एक षष्ठांश गोरी यमी गोखले (खरी, संहिता जोशी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी

एक षष्ठांश

मनीष पाठक
Wed, 08/20/2008 - 15:30 नवीन
एक षष्ठांश गोरी यमी गोखले (खरी, संहिता जोशी) आपल्या बाजुने कोणितरी बोलणारे भेटल्यानंतर अति हार्शाने किंवा आनंदाने बावचाळलेल्या मधले एक उदाहरण. स्वताचे खरे नावही विसरलेल्या यमु आज्जी. :) (मनाने आणी कर्माने मुंबईकर)मनीष पाठक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं मग ?

टारझन
Tue, 08/19/2008 - 12:22 नवीन
पेशव्यांच्या पुण्या नंतर निर्माण होऊनही आज मुंबई अख्ख्या भारताची आर्थीक राजधानी आहे. ह्यात मराठी माणसाचा किती हात ? उद्या बिहारचा जपान (जपान्यांमुळे) झाला तर लालू म्हणेल मी बिहारचा जपान केला आणी ह्या ऍड्या(का येड्या?) सारखा नाचेल =)) (पुण्याचा श्रीमंत पेशवा) टारझन पुण्यापेक्षा जास्त मराठी टक्का आमच्या आसूद गावात आहे. ह्यावर काय बोलायचे? ह्यालू ... ह्यालू ? ..... कुनी वळाखत का आसूद गावाला .. च्यामारी लिवता लिवता माझी भाषाच आसुद झाली =)) काय पण एक एक गावठी ... (शुद्ध पुणेकर) टारझन अमेरिकेत शेकडो लोकं जातात. युगांडा मधे कोण कशाला जाईल? आमेरिकेत आजकाल पट्टेवाला पण जातो... आम्ही नुसते युगांडाच नाही तर अजुन ४ देशांची वारी करून आलोय. आणि पट्टेवाल्याच्या अमेरिकेत जायचा मोह नाहीच ... आलेले चान्स नाकारून अफ्रिका गाठली.. उद्या दुसरा देश ... हवा आहे आपली .. वास घेऊन नाक दाबा =)) (बारा देशांचं मिनरल वॉटर पिलेला) टारझन पुण्यात म्हणे जगाला जळवतील अशा खायच्या जागा आहेत. असतीलही. पण मग ते जग पेठांपुरते मर्यादीत असेल. एकट्या दादर आणि गिरगाव मधेच अख्ख्या पुण्यापेक्षा जास्त आणि सरस खायची आणि प्यायची सोय आहे अरारारा .. =)) =)) =)) हसून हसून मेलो आहे ... मला दादर गिरगावाच्या एकाही खायच्या ठिकाणाचं नाव कोण्या नॉन-पुणेकर आणी नॉन-महाराष्ट्रियन माणसाने घेतलेल ऐकिवात नाही... हा मात्र माझ्या पूणे ऑफिसला व्हिजीट देणारे दिल्लीची टिम मात्र आवर्जुन पराठे खायला "चैतन्य" मधेच आवर्जुन जातात. असो ... तुम्ही बी या हो जोशी ब्वॉ.... (पूण्याच्या शेकडो हॉटेल्सचे शेकडो मेनू चापलेला) टारझन पुण्यातले रस्ते, रिक्षावाले आणि PMT बद्दल तर बोलावे तितकेच कमी आहे. वहतुकीला शिस्त नावाचा प्रकारच नाहिये. सिग्नल पाळणार्‍या माणसाकडे बाकिचे "सटकलाय" ह्या नजरेने बघतात. हाहाहा .... यह तो पूणे की शान है ... थ्री चियर्स फॉर पी.एम.टी. पुण्यात असून स्वतःचं वाहन नसणारा माणूस अपंग होऊन जातो अथवा रिक्षानी जायची हिंमत केलीच तर कंगाल होतो. आता बावळटांना जगात कुठेही फसवलंच जातं .... आम्ही मात्र रिक्षाने मस्त फिरुन पैशे जमवून आहोत... =)) (अतिहुशार आणि बावळटांना फाट्यावर गंडवणारा पुणेकर) टारझन लाल, पिवळा, हिरवा दिवे वाला सिग्नल पालीकेने लोकांच्या करमणूकी साठी लावला नाहिये हे मुंबईकर जाणतो. इंटरनॅशनल एअरपोर्ट बद्दल मी बोलतच नाहिये. तरी पुणेच महान. =)) =)) =)) वा ! पूण्यात किती करमणूक होते वा वा वा .... आणि एवढी शिस्त पाळून देखील दादरहुन पूणे हायवे ला लागायला २-३ तास लागतात.. मग तिथुन पुढे पूण्याला माणूस १:३० तासातच पोचतो .. वा रे मुंबईच ट्राफिक ... सिग्नल तोडायला जागा पायजे ना ..गाड्यांना जेट इंजिन असत तर जाम एकमेकांवर गाड्या चढवून हवेत पण ट्राफिक जाम केलं असतं... पूण्यात एवढे अरुंद रोड असुन पण कधी मुंबैच्या १०%पण ट्राफिक नाही (करमणूकीचे सिग्नल तोडणारा) टारझन आणि शेवटी आख्ख्या जगाला पुरून उरून मिशा पिळणारा पूणेकर - ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी

झकास..

अभिज्ञ
Tue, 08/19/2008 - 12:36 नवीन
टार्‍या, लै भारि प्रतिसाद. जबरि हाणलास. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

व्वा

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 08/19/2008 - 13:26 नवीन
ह्यात मराठी माणसाचा किती हात ? तू नक्कीच १००% पुणेकर आहेस. आपला वाद पुण्यातले मराठी विरुद्ध मुंबईतले मराठी असा नसून पुणे शहर विरुद्ध मुंबई शहर असा आहे. आणि तुझंच उदाहरण घ्यायचं तर पेशवाई बुडण्यात आणि महराष्ट्राची राजधानी बदलून मुंबई होण्यात मात्र पुण्यातल्या मराठी माणसांचा १००% हात आहे. वास घेऊन नाक दाबा पुण्यातली सुवासीक हवा आणि प्रदुषणमुक्त वातावरण ह्यावद्दल पुण्यातल्या स्कूटर-धारी अतिरेकी मुलींना विचरून ये. अरारारा .. हसून हसून मेलो आहे ... मला दादर गिरगावाच्या एकाही खायच्या ठिकाणाचं नाव कोण्या नॉन-पुणेकर आणी नॉन-महाराष्ट्रियन माणसाने घेतलेल ऐकिवात नाही... पेठांतून बाहेर या पंत. एशीयाड ने उतरून प्रकाश मधे खाल्ल्याशिवाय पुढची कामे न करणारे किती पुणेकर दाखवू? आता ह्यावर तू पुन्हा भूक लागली की माणूस खाणारच असं बिनबुडाचं विधान करशीलच. मला दादर गिरगावाच्या एकाही खायच्या ठिकाणाचं नाव कोण्या नॉन-पुणेकर आणी नॉन-महाराष्ट्रियन माणसाने घेतलेल ऐकिवात नाही. हा अजून एक खराखुरा बेसलेस पुणेरी पणा. ह्या न्यायाने मी सुर्योदय होतच नाही असं म्हणू शकेन. तुला अनंताश्रम, प्रकाश, जिप्सी, चंद्रगुप्त, दिल्ली दरबार, समर्थ भोजनालय, सत्कार, महेश, तांबे आहारग्रुह, कुलकर्णी, ताराबाग, खाऊ गल्ली, राजधानी, श्रीकृष्ण बोर्डींग हाऊस, मेरवान, माँडेगार, लिओपोल्ड, कॅफे ब्रिटानिया आणि अशी अजून अनेक नावं गेली नसतीलंच. आणि तुझ्या ओळखीचे नसले तरी माझ्या ओळखीचे शेकडो नॉन मराठी लोकं इथले वारकरी आहेत. कारण तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मुंबईत मराठी टक्का कमी आहे. हाहाहा .... यह तो पूणे की शान है ... थ्री चियर्स फॉर पी.एम.टी. वा... काय पण शान आहे. जियो मेरे लाल. आता बावळटांना जगात कुठेही फसवलंच जातं.... आम्ही मात्र रिक्षाने मस्त फिरुन पैशे जमवून आहोत... हे टिपीकल पुणेरी बिनबुडाचं उत्तर. मुद्दा न कळता वादासाठी वाद. रिक्षा ने जाऊन कंगाल होण्यात रिक्षावाल्यांची बेईमानदारी दिसून येते सोन्या. बाहेर गावाहून आलेल्या लोकांना फसवण्यात शहाणपणा मानणार्‍या पुणेकरांचा विजय असो. वा ! पूण्यात किती करमणूक होते वा वा वा .... आणि एवढी शिस्त पाळून देखील दादरहुन पूणे हायवे ला लागायला २-३ तास लागतात.. मग तिथुन पुढे पूण्याला माणूस १:३० तासातच पोचतो .. वा रे मुंबईच ट्राफिक ... पुण्याची परिस्थीती वेगळी आहे? १:३० माणूस पुण्याच्या वेशीवर पोचतो माणूस. पुढे पोचायचे वांधेच आहेत. आणि अरे पुणे आहेच केवढस्सं... तरी गल्लो गल्ली ट्राफीक जॅम. पुण्याच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोचायला रस्ता मोकळा असेल तर तास पण लागत नाही. त्यामुळे नदीचं पाणी काठावर पसरतं म्हणून तिला मडक्याने आटोपशीरपणाचे धडे देउ नयेत. सिग्नल तोडायला जागा पायजे ना.. गाड्यांना जेट इंजिन असत तर जाम एकमेकांवर गाड्या चढवून हवेत पण ट्राफिक जाम केलं असतं... आता तू स्वतःच लिहीतोस की पुण्यातले रस्ते अरूंद आहेत. आणि तरी तुला असं म्हणायचंय का की तिथे सिग्नल तोडायला जागा असते? नक्की काय ते एक ठरव, नी मग बोल. पूण्यात एवढे अरुंद रोड असुन पण कधी मुंबैच्या १०%पण ट्राफिक नाही अरे पुणे केव्हढं? मुंबई केव्हढी? मुंबईचे एक एक उपनगर पुण्याहून मोठे आहे. संबंध आहे का काही तुलनेचा? पण तू बोल. कारण तू पुणेकर असल्याने कुणी ऐको न ऐको, बोलंणं हा तुझा अधिकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

विरोधाभास

टारझन
Tue, 08/19/2008 - 22:45 नवीन
आपला वाद पुण्यातले मराठी विरुद्ध मुंबईतले मराठी असा नसून पुणे शहर विरुद्ध मुंबई शहर असा आहे. वर कमीत कमी तीन वेळा पुणे शहराचा नाही, पुणेकराचाच उल्लेख झालाय. पेठांतून बाहेर या पंत. आता अजुन किती बाहेर येऊ जोशी ब्वॉ ? एशीयाड ने उतरून प्रकाश मधे खाल्ल्याशिवाय पुढची कामे न करणारे किती पुणेकर दाखवू? आयला आमच्या वाटचं तुम्हीच उत्तर दिलत का? वा वा वा !! लै झाक! खरी गोष्ट बिनबुडाची कशी काय? अच्छा जळजळ होतेय होय .. मग ठीक आहे. माझ्या ओळखीचे शेकडो नॉन मराठी लोकं इथले वारकरी आहेत. ते तिथेच रहातात. जेवायला ते काय युपी-बिहार(किंवा काय असेल ते) तिकडे जातील काय ? .. आता करोडोंची पैदास मुंबैत पैदा करून ठेवल्यावर शे-दोनशे लोक येणारच जवळ खायला.पण पुण्याच्या जंगली महारज रोडची आठवण नक्कीच करत असतील.पण पुण्याच तसं नाय बॉ .. बाहेरची लोक इथे आले की आवर्जुन (अगदी आवर्जुन बरंका) स्पेशल हाटिलात जातात (लिश्ट मोठी आहे, दर वेळी लिहीने शक्य नाही). वा... काय पण शान आहे. जियो मेरे लाल. वा काय पण जोशी आहे. जलो मेरे लाल रिक्षा ने जाऊन कंगाल होण्यात रिक्षावाल्यांची बेईमानदारी दिसून येते सोन्या. आता पुन्हा तेच का?कोणीही फक्त बावळटांनाच फसवू शकतो.रिक्षावाला काही गनपॉइंट वर लुटत नाही. तुला असं म्हणायचय का मुंबै मधे संत तुकारामांचे १ कोटी अवतार रहातात ? बाहेर गावाहून आलेल्या लोकांना फसवण्यात शहाणपणा मानणार्‍या पुणेकरांचा विजय असो. हेच जर आधी बोलला असता तर मिपाचे बरेच किलोबाइट्स वाचले असते रे पितळ्या ... आणि अरे पुणे आहेच केवढस्सं... =)) =)) =)) पुणे क्षेत्रफळ = ७००किमी वर्ग मुंबई क्षेत्रफळ = ४३७.७१ किमी वर्ग आता एवढ बिनबुडाच विधान करण्याची पुणेकराची पातळी नाही, बिनबुडाची विधाने करण्याची ऍड्या मुंबैकरांची हुकूमत मान्य आहे... =)) आरारारा .. मेलो ... =)) तरी गल्लो गल्ली ट्राफीक जॅम. मुंबई मधे एक फ्लायओव्हर पार करायला १ तास पण लागू शकतो. अर्रे पूणे फ्लायओव्हर पेक्षा छोटंस असेल नाही ? अरे पुणे केव्हढं? मुंबई केव्हढी? मुंबईचे एक एक उपनगर पुण्याहून मोठे आहे. संबंध आहे का काही तुलनेचा? डुकरांना,कोंबड्यांना एका खुराड्यात बंद करून ठेवतात, त्यांना एवढी गर्दी पाहुन वाटतं आरे आपलं खुराड पुण्यापेक्षा लै लै मोठं ... =)) =)) बिनबुडाची विधाने बुडापासून करणारा पुणेकर -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी

पुन्हा पुन्हा तेच गुर्‍हाळ

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 08/20/2008 - 12:28 नवीन
वर कमीत कमी तीन वेळा पुणे शहराचा नाही, पुणेकराचाच उल्लेख झालाय. अरे माझ्या गोंडस गुलाबा का अक्कल पाजळतोयस स्वतःची. इथे मी कधीही पुणेकर मराठी / पंजाबी / गुजराती असा उल्लेख केलाय का सोन्या?? पुणेकर म्हटलंय. तू ही मुंबईकर म्हण की. आणि पेशवाई बुडण्यात असलेल्या पुणेकर मराठी लोकांबद्दलच तुझं मत अजून मांडलंच नाहियेस. एशीयाड ने उतरून प्रकाश मधे खाल्ल्याशिवाय पुढची कामे न करणारे किती पुणेकर दाखवू? आयला आमच्या वाटचं तुम्हीच उत्तर दिलत का? बाळा हे प्रकाश दादर मधे आहे. आणि ते तुला महिती नसेल तर ते तुझं अज्ञान आहे. प्रकाश फेमस नाहिये असा पुणेरी अर्थ काढू नकोस. ह्यालाच पुणेरी कुपमंडूक व्रुत्ती म्हणतात. आता पुन्हा तेच का?कोणीही फक्त बावळटांनाच फसवू शकतो. रिक्षावाला काही गनपॉइंट वर लुटत नाही. ह्या बाबतीत मात्र पुणेरी भामट्यांना तोड नाही. तसंच फसवणं, समोरच्या माहिती नाही हे जाणून गंडवणं आणि गरजेच्या वेळी नाडणं ह्यातला फरक तुझ्या सो कॉल्ड पुणेरी बुद्धीला कळू नये ह्यात काहिही आश्चर्य नाहिये. पुणे क्षेत्रफळ = ७००किमी वर्ग मुंबई क्षेत्रफळ = ४३७.७१ किमी वर्ग + डुकरांना,कोंबड्यांना एका खुराड्यात बंद करून ठेवतात, त्यांना एवढी गर्दी पाहुन वाटतं आरे आपलं खुराड पुण्यापेक्षा लै लै मोठं ... अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्याचा हा अजून एक पुणेरी प्रकार. अरे बाळा ज्या मुंबईत ४८ एकर चं जिजामाता उद्यान, ६४ एकर चं एस्सेल वर्ल्ड, ३० एकर ची फँटसी लँड, ३७० हेक्टर चं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, १०४ km² चं नॅशनल पार्क आहे तिचा टोटल एरीया ४३७.७१ किमी वर्ग होऊ शकतो हे फक्त तुझ्यासारखा बाळबुद्धी पुणेकरच मान्य करेल. पण अर्थात हे तुला माहिती नसल्याने जगात अजून कुणालाच महिती नाही आणि फक्त मुंबईतलीच लोकं तिथे जातात असं विधानही तू करशीलच. गुगल वर सर्च करून तू फक्त समोर दिसलेले मथळे वाचलेस. खोलात जाऊन माहिती नाही काढलीस. ती मी देतो - पुण्याचे जे हे क्षेत्रफळ तू देतोयस ते चुकीचं आहे. आजूबाजूची बांडगुळं पकडून मोजल्यावर पुण्याचा मेट्रोपॉलीटन एरीया होतो 1,359 km² आणि तशी मी जर नवी मुंबई / पनवेल वगरे मुंबई रीजन मधे येणारी सबर्बस मुंबई मधे जमा केली तर मुंबईचा एरीया होतो - 4,355 km². पण हे सोड. पुणे म.पा. च्या अखत्यारीत येणारा एरीया आहे १८८ km². त्यात पिंपरी चिंचवड म.पा. जमा केलं तर हा एरीया होतो ३१४.११ km² आणि फक्त मुंबई म.पा. च्या अखत्यारीत येणारा एरीया आहे ४८० km². पण तरीही तू पुणेच मोठं असा दावा करशीलंच. (हे सगळे आकडे मी सरकारी वेबसाइट्स वरून घेतले आहेत.) सरकारच्या वेबसाईट नुसार मुंबई भारतातलं सगळ्यात मोठं मेट्रोपॉलीस आहे रे. पण तू पुणेकर असल्याने स्वतःलाच सगळी अक्कल देवानी दिली आहे असा तुझा समज असल्याचं लपत नाहिये. ह्याला म्हणतात पेठांतून बाहेर येणे. पण ह्यातला फरक तुझ्या सो कॉल्ड पुणेरी बुद्धीला कळू नये ह्यात काहिही आश्चर्य नाहिये. आता एवढ बिनबुडाच विधान करण्याची पुणेकराची पातळी नाही, बिनबुडाची विधाने करण्याची ऍड्या मुंबैकरांची हुकूमत मान्य आहे... आरारारा... मेलो... तुझं बिन बुडाचं बुड दाखवलंय मी वर. तरी, गिरे तो भी टांग उप्पर ह्या पुणेरी बाण्या नुसार, तुझं पुणेच महान आहे रे महाराजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

>>पुणेच

यशोधरा
Tue, 08/19/2008 - 11:57 नवीन
>>पुणेच महान. धन्यवाद जोशीबुवा शेवटी हे सत्य मान्य केल्याबद्दल!! :) थ्यांकू, थ्यांकू :D
  • Log in or register to post comments

मस्त!

मनस्वी
Tue, 08/19/2008 - 12:23 नवीन
११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात. प्रसाद, हे वरचं एक सोडून बाकी सगळं खरं आहे! :) मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

एडी

अनिल हटेला
Tue, 08/19/2008 - 12:28 नवीन
एडी भौ!! बरोब्बार ओळखलत !! साहेबाच्या देशाची सवय आहे भो तुम्हाला... तुम्ही आणी तुमची मुम्बै आम्ही कधी म्हतल बॉ की महान नाही......? आमच एव्हढच म्हनन होत की , आमच्या पुण्याला का म्हुन नाव ठेवता....? आणी शेयर मार्केट ,डायमंड मार्केट ई... तुमच्याच मालकीच भो ते........ पुणेकर म्हणे पेठाच्या बाहेर जात नाहीत .... हो!! आता आमची सवय्च आहे ती, काय करणार .. आणी आमच्या वाहतुक व्यवस्थे बद्दल बोलुच नका.... तुम्ही कधी पाहिलये की आपल उगाच !!! पन तरी हम हम है ........... ( इनो घ्याच राव ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

>>ऍल्युमिनि

पक्या
Tue, 08/19/2008 - 12:34 नवीन
>>ऍल्युमिनियम ची ओसरी करुन तेथे मिळणार्‍या तीन चमचे चाला अमृततुल्य नाव .... नावाप्रमाणेच तो चहा असतो बरं का ! एकतर अमृततुल्य मधील चहा सतत भल्या मोठ्या पातेलीत उकळत असतो. त्यामुळे पाण्याचा अंश कमी होऊन तो चांगला घट्टमुट्ट झालेला असतो. शिवाय त्यात वेलची वगैरे मसाला घालून दिला जातो. हे नावाचे न उलगड्णारे कोडे वाटत असेल तर पिऊन पहा आधी.
  • Log in or register to post comments

खायच तिथ ..

शेखर
Tue, 08/19/2008 - 12:35 नवीन
बाहेरुन आलेल्या लोकांना खायच तिथ हा*यची सवय आहे. खाल्या घरचे वासे मोजणारी माणस ही त्यांना काय आपल काम झाल की झाल. परत नावे ठेवायला मोकळी ... शेखर
  • Log in or register to post comments

चांगली

अवलिया
Tue, 08/19/2008 - 12:43 नवीन
चांगली चर्चा चालु आहे नवीन माहिती मिळत आहे माझ्या बाजुने कुठेही तेल ओतत नाही जरा नवीन धागा सुरु केला तर अधिक चांगला आस्वाद घेता येइल अर्थात पुणेकर व अपुणेकरांचे यावर एकमत झाले तर.... सर्किट चेंगट (हल्ली नावात सर्किट लावले पाहिजे असा काहि दंडक झाल्याचे आमच्या कानावर उडत उडत आले. आणिबाणित कुठल्याही दंडकाची अवज्ञा होवु नये म्हणुन सहीपुरता नावात तात्पुरता बदल केलेला आहे हे सुज्ञ वाचक लक्षात घेतीलच. ज्यांना समजले नसेल त्याना आता कळेल)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा