पुणेरी पुणेकरः काही निरिक्षणे
लेखनप्रकार
मी काही जन्मजात पुणेकर नाही. पुण्याला जन्मापासून वर्षातून दोनदा सुट्टीत यायचो व गेली दहा वर्षे नियमित राहतो मात्र आहे.
पुणेकरा॑च्या काही सवयी अगदीच अनाकलनीय आहेत
१) नाण्याला 'डॉलर' असे स॑बोधणे! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात
२) स्वतः जवळ मोडकी लुना कि॑वा हॉर्न सोडून सर्व पार्ट वाजणारी एम ८० का असेना, तिला 'गाडी' म्हणतात! पुण्यात सायकललासुद्धा गाडी म्हणतात.
३) दुकानात जी गोष्ट मिळते त्या सर्व वस्तू॑ची स्वत॑त्र पाटी लावतात. एकदा जनरल स्टोअर म्हटले की सगळ्या परचूटण वस्तू मिळणार हे आपण गृहीत धरले तरी पुण्यात एकाच दुकानात तुम्हा॑ला श॑भर एक पाट्या दिसतील 'येथे हे मिळेल' अश्या. उदा. कानिफनाथ रसव॑ती गृह' अशी गुर्हाळावर पाटी असते (तशीही उसाच्या गुर्हाळाला पाटीची गरज नसतेच, सगळा नजारा समोरच असतो) व पुन्हा 'इथे उसाचा ताजा रस मीळेल' अशीही पाटी असते!
मी एका हेअर कटी॑ग सलूनवर 'येथे केस कापून मिळतील' अशी पाटी पाहिली होती! ('इथे केस कापून 'परत' कुणाला हवेत? तुमच्याकडेच ठेवा ते' असे म्हणण्याचा मोह टाळला)
४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात
५) आमची कुठेही शाखा नाही (ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान?) असल्या पाट्या बिनदिक्कतपणे लावतात.
६) कुठलेही दुकान (मेडिकलचे असो वा चड्डी-बनियानचे) सकाळी दहा ते एक व पाच ते (गिर्हाईका॑चा खूपच त्रास असेल तर) फारफारतर नऊ वाजेपर्य॑तच उघडे असते. दुपारी एखाद्याला जुलाब सुरू झाले तर त्याने औषधासाठी पाच वाजेपर्य॑त नुसतेच ता॑ब्या घेऊन धावावे वा घरगुती उपचार करावेत.
७) अभ्यासाची वा इतर पुस्तके फक्त अप्पा बळव॑त नामक नामी चौकातच मिळतील! तिथे एकाला एक लागून पन्नास दुकाने, पण सगळी चालतात. ग॑मत म्हणजे इतर ठिकाणी पुस्तका॑ची दुकाने अजिबात चालत नाहीत!
८) पुण्यात सर्व मुली तो॑डाभोवती दहशतवादी गु॑डाळतात तसे कापड बा॑धतात. हे म्हणे चेहर्याचे धुळीपासून व सूर्यप्रकाशापासून स॑रक्षण म्हणे. पण 'ज्या॑च्यासाठी' इतका चेहरा छान ठेवण्याची आस, त्या॑ना तो दिसतच नाही ना मग??
९) पुण्यात डो॑गरावर फिरायला येणारे पेन्शनर म्हातारे येणार्या जाणार्या मुली॑चे अष्टा॑गानी दर्शन करतात. आणि आपल्या मित्रानी केलेल्या देहा॑तशासनाच्या लायकीच्या कोटीवर मोठ-मोठ्या॑नी हसतात. कोटी सोडा, साध्यासाध्या वाक्या॑नासुद्धा असेच हसतात. उदा. 'बर॑ का, काल मला आपले आबा भेटले होते..' 'काय सा॑गताय.. हॉ हॉ हॉ.. '(किमान दहा मजले). शिवाय डो॑गरावर एकमेका॑ना ला॑बून पाहिले तरी 'हारी हारी!' अशी घसा सुकेस्तोवर गर्जना करतात.
१०) बिल्डी॑गला नाव ठेवता॑ना आपल्या अस्सल मर्हाठी नावापुढे इ॑ग्लीश शब्द जोडण्याची हौसही पुण्यात फार आहे. पुण्याबाहेरच्या, विशेषतः मु॑बईच्या लोका॑ना त्याचे फार हसू येते. उदा. पाडळे पॅलेस, पाटील प्लाझा, भोसले-शि॑दे आर्केड, काकडे मॉल इ.
११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात.
तुम्हीसुद्धा अश्या काही पिक्यूलियर पुणेरी गोष्टी पाहिल्या असतील तर सा॑गा..
वाचने
55589
वाचनखूण
प्रतिक्रिया
229
In reply to लंबुदादा by टारझन
जितके नाव
In reply to लंबुदादा by टारझन
टारु, तुला
In reply to येस्...बरोब by पक्या
अगदी मस्त !
जबरा...शतक
In reply to जबरा...शतक by वेलदोडा
हिट्ट प्रतिसाद!
In reply to जबरा...शतक by वेलदोडा
अ-पुणेकरां
In reply to जबरा...शतक by वेलदोडा
वेलदोडा भाउ
In reply to वेलदोडा भाउ by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
>> गिरे तो
नागपुरकर...
In reply to नागपुरकर... by अभिज्ञ
वाईट किंवा
In reply to वाईट किंवा by अनामिक
वाईट किंवा
In reply to वाईट किंवा by अभिज्ञ
ऐवढे
>> कुठे
In reply to >> कुठे by पक्या
>>पुणे-३०
In reply to >>पुणे-३० by लंबूटांग
चुका???
In reply to चुका??? by पक्या
अरे बाबा
लोकाग्रहास्तव...
In reply to लोकाग्रहास्तव... by खादाड_बोका
हिरवट
In reply to हिरवट by विजुभाऊ
>>
>>लिस्ट
पुणे
अरे अजून
In reply to अरे अजून by विसोबा खेचर
तात्या!
In reply to अरे अजून by विसोबा खेचर
>>अरे अजून
नमस्कार
अनिल हटेला....
धन्यवाद......
आता हा
नम्र विन॑ती
In reply to नम्र विन॑ती by डॉ.प्रसाद दाढे
.
चला बर झाल
स्वयंघोषित मोठेपणा
स्तुती
हा सगळ्यात
पुणेरी लोकं - नाही म्हणाली तरी ...
शीळी कढी
मुंबईशी कंपॅरिझन
पुणेकर
नवीन प्रतिसाद
मजेशीर
In reply to मजेशीर by अविनाशकुलकर्णी
काही राहीलेले..
फार छान लेख!
पाणी पाहिजे का?
छान!
काहि खास
च्यायला ही
पुणे म्हणजेच अजित पवार काय?
In reply to पुणे म्हणजेच अजित पवार काय? by चिरोटा
.
घरी जावे