✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

साय

ल — लीलाधर, Wed, 09/12/2012 - 14:44
साय ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया, वडरुपी छायेत करील मातृरुपी माया ! सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !! गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात, कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात! वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय, दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

प्रतिक्रिया द्या
54318 वाचन

💬 प्रतिसाद (151)

आँ?

गवि
Wed, 09/12/2012 - 14:57 नवीन
छान छान.. सायीसारखी काया चांगली पण "वड"रुपी छाया? आँ? अंमळ मोठ्ठाड झाली का उपमा? ..अरेंज्ड करत असल्यास जरा हलके बघून घेणे.. ( हे तुम्हाला नाही, दादाला उद्देशून..)
  • Log in or register to post comments

अरे हाय काय अन नाय काय !!!

स्वप्निल घायाळ
Wed, 09/12/2012 - 14:59 नवीन
अरे हाय काय अन नाय काय !!!
  • Log in or register to post comments

कविता छान हाय ..:)

अक्षया
Wed, 09/12/2012 - 15:02 नवीन
कविता छान हाय ..:)
  • Log in or register to post comments

कविता ठीक वाटली वहिनी येता

स्पा
Wed, 09/12/2012 - 15:02 नवीन
कविता ठीक वाटली वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय पण वहिनी घरी आल्यावर मगच कवीला साय खायला मिळणार , हे कसे काय ब्वा? (भाबडा) स्पा
  • Log in or register to post comments

..

गवि
Wed, 09/12/2012 - 15:06 नवीन
भावाचं लक्ष सायीखेरीज अन्यत्र गुंतलेलं राहिल्याने फ्रीजमधली सर्व साय हा एकटा खाऊ शकेल.. असं असेल काहीतरी.. तुला रे मेल्या कशाला नसत्या शंका.. वशाड मेलो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

>>फ्रीजमधली सर्व साय हा एकटा

सूड
Wed, 09/12/2012 - 15:33 नवीन
>>फ्रीजमधली सर्व साय हा एकटा खाऊ शकेल आणि ह्याने खायच्या आधीच ती सर्व साय वैनीने खाऊन फस्त केली मागीर किदें करपाचें ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अच्छा तर तुमच्याकडे हायरारकी

५० फक्त
Wed, 09/12/2012 - 15:07 नवीन
अच्छा तर तुमच्याकडे हायरारकी चा वांधा आहे का ? दादाचं झाल्याशिवाय तुमचं नाही असं आहे तर, आम्हाला वाटलं की काही वेगळीच अडचण आहे की काय, असो शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

.............................

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/12/2012 - 15:30 नवीन
.........................................Image removed. गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया,>>> Image removed. ह्हा ह्हा ह्हा ....! Image removed. च.चा.ली..ला-धरा..! बर्‍याच महिन्यांनी आलास आणी काय खमंग जिल्बी टाकलीस रे...! अंतर्मन विडंबन विडंबन ओरडतय... काय करू रे.... ???????????????????????????
  • Log in or register to post comments

तु काय करायला हवेस

लीलाधर
Wed, 09/12/2012 - 15:40 नवीन
हेच तर मी म्हणतोय रे या कवितेतुन ;) याउपर तुला काय करायचे ते तु ठरव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवा, ही कविता तुम्हास

प्रचेतस
Wed, 09/12/2012 - 15:44 नवीन
बुवा, ही कविता तुम्हास उद्देशून हाय काय? तुम्ही ली-ला-धराचे दादा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@तुम्ही ली-ला-धराचे

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/12/2012 - 16:21 नवीन
@तुम्ही ली-ला-धराचे दादा.>>> <<< मारू का तुझ्या डोक्यात गदा- दु. दु. अगोबा.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

>>दु. दु. अगोबा..धाकटा साय

सूड
Wed, 09/12/2012 - 16:24 नवीन
>>दु. दु. अगोबा.. धाकटा साय साय करतो आणि थोरला दु.दु. , दु.दु. करतो. काय हा दैवदुर्विलास !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मदत...

मोदक
Mon, 11/19/2012 - 01:23 नवीन
इथले वरचे प्रतिसाद दिसण्याची सोय कुणी करू शकेल का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

धरा. सोय केली आहे.

स्पंदना
Mon, 11/19/2012 - 04:15 नवीन
धरा. सोय केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

धन्यवाद्स हो...

मोदक
Mon, 11/19/2012 - 10:26 नवीन
धन्यवाद्स हो. बरेच दिवसात ही शेण्शेशनल कविता वाचली नव्हती. :-)) कुणी रसग्रहण करेल काय या काव्यकलाकृतीचे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

:-D

मोदक
Wed, 09/12/2012 - 16:11 नवीन
:-D
  • Log in or register to post comments

यम्मी झालीये कविता

बॅटमॅन
Wed, 09/12/2012 - 16:25 नवीन
यम्मी झालीये कविता ;)
  • Log in or register to post comments

१ यम्मी डिश

वपाडाव
Wed, 09/12/2012 - 17:44 नवीन
...ही घ्या एक यम्मी डिश... यामी गौतम Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ही यम्मी आमच्या गॉथममध्ये

बॅटमॅन
Wed, 09/12/2012 - 17:55 नवीन
ही यम्मी आमच्या गॉथममध्ये होती असे दिसते ;) थांबा भेटायला पाहिजे आता ;) (यम्मी डिशेस लैक करणारा) ब्रूस वेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

चान चान.

अन्या दातार
Wed, 09/12/2012 - 17:06 नवीन
चान चान.
  • Log in or register to post comments

चान चान खर्रे?

स्पा
Wed, 09/12/2012 - 17:09 नवीन
चान चान खर्रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

अगदी

लीलाधर
Wed, 09/12/2012 - 17:12 नवीन
अगदी खर्रेच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

छान!

पैसा
Wed, 09/12/2012 - 17:35 नवीन
लहान मुलाच्या भावना छान व्यक्त झाल्यात हो, अर्थातच काही प्रश्ण आणि कमेंटा आहेतच. १. आता तुमच्याकडे दूध आणले जात नाही का? तापवायला गॅस नाही का? २. वहिनी आल्यानंतर ती सायीचे विरजण करून दही आणि लोणी करेल. तुम्हाला साय मिळायचे चान्सेस फार कमी. ३. वहिनी माया करेलच हे कशावरून? बघून ठेवली आहे का? ४. स्पा, सूड, गवि, ५० फक्त यांच्याशी अर्थातच बाडिस. ५. वल्लीने विचारलेला प्रश्न पडला होता पण मला पण दुष्ट ही पदवी मिळायच्या भीतीने गप्प बसायचे ठरवले आहे. ६. "दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?" हा प्रश्न का पडला? दादाने तिला आधीच गायब केली आहे का? आणखी प्रश्ण यांची उत्तरे मिळाल्यानंतर.
  • Log in or register to post comments

फारच

इरसाल
Wed, 09/12/2012 - 17:39 नवीन
प्रश्न विचारता ब्वॉ तुम्ही ? पैसीण प्रश्नकर्ते
  • Log in or register to post comments

दु.दु. आणि साय ..कायतरी

जेनी...
गुरुवार, 09/13/2012 - 09:33 नवीन
दु.दु. आणि साय .. कायतरी घोटाळा हाय ;) :P
  • Log in or register to post comments

बाकी ही साय ली-ला-धराला इतकी

प्रचेतस
गुरुवार, 09/13/2012 - 09:48 नवीन
बाकी ही साय ली-ला-धराला इतकी का आवडते ब्वॉ?
  • Log in or register to post comments

?

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/13/2012 - 09:59 नवीन
काही प्रश्न चारचौघात विचारता येत नाहीत, हेच खरे.
  • Log in or register to post comments

१ नंबर काका

लीलाधर
गुरुवार, 09/13/2012 - 10:05 नवीन
अगदी बरोबर म्हणालात ओ काका तुमच्याशी सहमत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

गाय लिहा साय ऐवजी...!!!

ज्ञानराम
गुरुवार, 09/13/2012 - 10:33 नवीन
Image removed. गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात, ( गोर्‍या गोर्‍या रंगाची गाय आणू घरात !!) कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात! (कधी घेऊन येशील रे हम्माला घरात? ) वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय, (गाय येता घरी मिळेल ताजी ताजी साय ....) दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? ( दादा ,दु दु देणारी हम्मा कुठाय?? ) अस लिहा हव तर..... Image removed. विडंबन येऊद्यात आत्मा अत्रुप्त आहे वाचायला...
  • Log in or register to post comments

@विडंबन येऊद्यात आत्मा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/13/2012 - 10:52 नवीन
@विडंबन येऊद्यात आत्मा अत्रुप्त आहे वाचायला...>>>Image removed. आणी आत्मा अत्रुप्त आहे,तुंम्ही खोचक प्रतिसाद दिलात,तर तुंम्हाला भसकन टोचायला Image removed. आत्मा मेरा नाम Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

:)

ज्ञानराम
गुरुवार, 09/13/2012 - 11:03 नवीन
@विडंबन येऊद्यात आत्मा अत्रुप्त आहे वाचायला...>>> आणी आत्मा अत्रुप्त आहे,तुंम्ही खोचक प्रतिसाद दिलात,तर तुंम्हाला भसकन टोचायला :) हे आवडले ! छान यम - क जुळवले आहे. ;)
  • Log in or register to post comments

@छान यम - क जुळवले आहे. >>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/13/2012 - 11:26 नवीन
@छान यम - क जुळवले आहे. >>> :-D चांगल मस्त - क चालतय की तुमचं! :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

काहि म्हणा साय(ली)लाधराला खुप

जेनी...
गुरुवार, 09/13/2012 - 11:12 नवीन
काहि म्हणा साय(ली)लाधराला खुप आवडते ,हे सिद्ध झालय आता ;)
  • Log in or register to post comments

बापरे काय ती प्रतिभा

५० फक्त
गुरुवार, 09/13/2012 - 11:15 नवीन
बापरे काय ती प्रतिभा वेस्टनाची हौस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आता प्रतिभा आणि कुठे आली

बॅटमॅन
गुरुवार, 09/13/2012 - 11:21 नवीन
आता प्रतिभा आणि कुठे आली मध्येच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अहो खफवरच्या कविता वाचुन

५० फक्त
गुरुवार, 09/13/2012 - 12:08 नवीन
अहो खफवरच्या कविता वाचुन पुजातैच्या प्रतिभेविषयी फार अपेक्षा वाढल्या होत्या, इथं त्यांनी तुका(राम्)दास, असलं ब्रॅकेट मधलं कॉमन लिहायचा प्रयत्न केलेला पाहुन म्हणलं की प्रतिभावेस्टन होतंय असं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

५० राव

लीलाधर
गुरुवार, 09/13/2012 - 12:14 नवीन
>>>>>> अहो खफवरच्या कविता वाचुन पुजातैच्या प्रतिभेविषयी फार अपेक्षा वाढल्या होत्या, इथं त्यांनी तुका(राम्)दास, असलं ब्रॅकेट मधलं कॉमन लिहायचा प्रयत्न केलेला पाहुन आधीच हौस आणि त्यात पडतोय प्रतिभेचा पौस ओ ;) त्याला काय करणार ? मोठ्या मोठ्या खफवर छोट्या छोट्या गोष्टी घडणारच ५० राव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

"प्रतिभावेस्टन" बेष्ट

बॅटमॅन
गुरुवार, 09/13/2012 - 12:23 नवीन
"प्रतिभावेस्टन" बेष्ट आवडल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

ओ पन्नास ,तुमाला काय म्हैत

जेनी...
गुरुवार, 09/13/2012 - 18:09 नवीन
ओ पन्नास , तुमाला काय म्हैत नै तर उगा जादा बोलु नका \( आपल्याला आधी हिस्टोरी म्हैत असावी मग बोलावं कसं ????? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

व्हय व्हय आमाला नाय माहित बाई

५० फक्त
गुरुवार, 09/13/2012 - 19:23 नवीन
व्हय व्हय आमाला नाय माहित बाई हिस्टोरी, मुलांनो आणि मुलींनो चला हाताची घडी तोंडावर बोट, गपगुमान बसा बरं एक लाईन धरुन, पुजाबै सायेच्या मायेची गोट्ष पाट म्हनुन्श्यान दावनार आहेत, चला सुरु कराओ पुजाबै तुमी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आयचा घो.."दादा मला एक वहीणी

शैलेन्द्र
गुरुवार, 09/13/2012 - 12:21 नवीन
आयचा घो.. "दादा मला एक वहीणी आण" या गाण्याच कॉलेजात असताना केलेले खंग्री विडंबण आठवलं.. गेले ते दिन गेले.. :(
  • Log in or register to post comments

येऊ द्या

मी_आहे_ना
गुरुवार, 09/13/2012 - 12:31 नवीन
ते विडंबन इथे टंकवून आमच्यासाठी ते दिन परत आणा की ओ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

इथे "हैदोस" घालयला नको..

शैलेन्द्र
गुरुवार, 09/13/2012 - 12:50 नवीन
इथे "हैदोस" घालयला नको.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना

+१

स्पा
गुरुवार, 09/13/2012 - 12:26 नवीन
"दादा मला एक वहीणी आण" या गाण्याच कॉलेजात असताना केलेले खंग्री विडंबण आठवलं.. हो आम्ही बी पिकनिक गाण्यांसाठी याच एक खास विडंबन केल्याचे स्मरते
  • Log in or register to post comments

सायीसारखी मऊशा SSS र कबिता.

सस्नेह
गुरुवार, 09/13/2012 - 15:10 नवीन
शाळेत असताना पीटीचे सर 'दादा मला एक वहिणी...'च्या तालावर ड्रम बडवून आम्हाला पीटी करायला लावायचे त्याची आठवण आली.
  • Log in or register to post comments

How pity!

अन्या दातार
गुरुवार, 09/13/2012 - 15:21 नवीन
'दादा मला एक वहिणी...'च्या तालावर ड्रम बडवून आम्हाला पीटी करायला लावायचे
या गाण्यावर पीटी??? देवा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

>>How pity!असेच म्हणतो.बाकी

सूड
गुरुवार, 09/13/2012 - 15:43 नवीन
>>How pity! असेच म्हणतो. बाकी 'वहिणी' हा शब्द व्याकरणदृष्ट्या काळजाला भिडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

सोलापुरात - मी कशाला आरशात

५० फक्त
गुरुवार, 09/13/2012 - 15:44 नवीन
सोलापुरात - मी कशाला आरशात पाहु ग $$$$$$$$$$ मीच माझ्या रुपाची राणी ग$$$$$$$ या गाण्यावर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी ढोल वाजवतात, आहात कुठं अन्याजी दातार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

अरे माझ्या देवा ऽऽऽ!या

रेवती
गुरुवार, 09/13/2012 - 19:32 नवीन
अरे माझ्या देवा ऽऽऽ! या गाण्याच्या चालीवर पीटी चाललीये असं डोळ्यासमोर आलं आणि हसून मुरकुंडी वळली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

छान :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/13/2012 - 16:13 नवीन
:) आवडेश. वरुन दहाव्या नंबरच्या ओळीनं घोळ घातला पाहा. नै तर वहिनीची आतुरता जवळ जवळ कवितेतून पोहचली होती. [रसग्रहणाला घेऊ का काय ही कविता ] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा