साय

लीलाधर's picture
लीलाधर in जे न देखे रवी...
12 Sep 2012 - 2:44 pm

साय

ताजी ताजी हाय दूधावरची साय,
ताजी ताजी हाय दूधावरची साय !
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया,
साईसारखी काया तीची वडरुपी छाया,
वडरुपी छायेत करील मातृरुपी माया !
सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !!

गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात,
कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात!
वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय,
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

ताजी ताजी हाय दूधावरची साय,
ताजी ताजी हाय दूधावरची साय !
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

कविता

प्रतिक्रिया

गवि's picture

12 Sep 2012 - 2:57 pm | गवि

छान छान..

सायीसारखी काया चांगली पण "वड"रुपी छाया?

आँ? अंमळ मोठ्ठाड झाली का उपमा?

..अरेंज्ड करत असल्यास जरा हलके बघून घेणे.. ( हे तुम्हाला नाही, दादाला उद्देशून..)

स्वप्निल घायाळ's picture

12 Sep 2012 - 2:59 pm | स्वप्निल घायाळ

अरे हाय काय अन नाय काय !!!

अक्षया's picture

12 Sep 2012 - 3:02 pm | अक्षया

कविता छान हाय ..:)

कविता ठीक वाटली

वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय
पण वहिनी घरी आल्यावर मगच कवीला साय खायला मिळणार , हे कसे काय ब्वा?

(भाबडा) स्पा

गवि's picture

12 Sep 2012 - 3:06 pm | गवि

भावाचं लक्ष सायीखेरीज अन्यत्र गुंतलेलं राहिल्याने फ्रीजमधली सर्व साय हा एकटा खाऊ शकेल.. असं असेल काहीतरी..

तुला रे मेल्या कशाला नसत्या शंका.. वशाड मेलो..

>>फ्रीजमधली सर्व साय हा एकटा खाऊ शकेल
आणि ह्याने खायच्या आधीच ती सर्व साय वैनीने खाऊन फस्त केली मागीर किदें करपाचें ?

अच्छा तर तुमच्याकडे हायरारकी चा वांधा आहे का ? दादाचं झाल्याशिवाय तुमचं नाही असं आहे तर, आम्हाला वाटलं की काही वेगळीच अडचण आहे की काय, असो शुभेच्छा.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2012 - 3:30 pm | अत्रुप्त आत्मा

.........................................
गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया,
साईसारखी काया तीची वडरुपी छाया,>>>

ह्हा ह्हा ह्हा ....! च.चा.ली..ला-धरा..! बर्‍याच महिन्यांनी आलास आणी काय खमंग जिल्बी टाकलीस रे...! अंतर्मन विडंबन विडंबन ओरडतय... काय करू रे.... ???????????????????????????

लीलाधर's picture

12 Sep 2012 - 3:40 pm | लीलाधर

हेच तर मी म्हणतोय रे या कवितेतुन ;) याउपर तुला काय करायचे ते तु ठरव :)

प्रचेतस's picture

12 Sep 2012 - 3:44 pm | प्रचेतस

बुवा, ही कविता तुम्हास उद्देशून हाय काय?
तुम्ही ली-ला-धराचे दादा.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2012 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्ही ली-ला-धराचे दादा.>>>
<<< मारू का तुझ्या डोक्यात गदा-
दु. दु. अगोबा..

>>दु. दु. अगोबा..
धाकटा साय साय करतो आणि थोरला दु.दु. , दु.दु. करतो. काय हा दैवदुर्विलास !!

मोदक's picture

19 Nov 2012 - 1:23 am | मोदक

इथले वरचे प्रतिसाद दिसण्याची सोय कुणी करू शकेल का? ;-)

स्पंदना's picture

19 Nov 2012 - 4:15 am | स्पंदना

धरा. सोय केली आहे.

मोदक's picture

19 Nov 2012 - 10:26 am | मोदक

धन्यवाद्स हो.

बरेच दिवसात ही शेण्शेशनल कविता वाचली नव्हती. :-))

कुणी रसग्रहण करेल काय या काव्यकलाकृतीचे..?

मोदक's picture

12 Sep 2012 - 4:11 pm | मोदक

:-D

बॅटमॅन's picture

12 Sep 2012 - 4:25 pm | बॅटमॅन

यम्मी झालीये कविता ;)

वपाडाव's picture

12 Sep 2012 - 5:44 pm | वपाडाव

...ही घ्या एक यम्मी डिश...
यामी गौतम

ही यम्मी आमच्या गॉथममध्ये होती असे दिसते ;) थांबा भेटायला पाहिजे आता ;)

(यम्मी डिशेस लैक करणारा) ब्रूस वेन.

अन्या दातार's picture

12 Sep 2012 - 5:06 pm | अन्या दातार

चान चान.

स्पा's picture

12 Sep 2012 - 5:09 pm | स्पा

चान चान

खर्रे?

लीलाधर's picture

12 Sep 2012 - 5:12 pm | लीलाधर

अगदी खर्रेच ;)

पैसा's picture

12 Sep 2012 - 5:35 pm | पैसा

लहान मुलाच्या भावना छान व्यक्त झाल्यात हो, अर्थातच काही प्रश्ण आणि कमेंटा आहेतच.

१. आता तुमच्याकडे दूध आणले जात नाही का? तापवायला गॅस नाही का?
२. वहिनी आल्यानंतर ती सायीचे विरजण करून दही आणि लोणी करेल. तुम्हाला साय मिळायचे चान्सेस फार कमी.
३. वहिनी माया करेलच हे कशावरून? बघून ठेवली आहे का?
४. स्पा, सूड, गवि, ५० फक्त यांच्याशी अर्थातच बाडिस.
५. वल्लीने विचारलेला प्रश्न पडला होता पण मला पण दुष्ट ही पदवी मिळायच्या भीतीने गप्प बसायचे ठरवले आहे.
६. "दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?" हा प्रश्न का पडला? दादाने तिला आधीच गायब केली आहे का?

आणखी प्रश्ण यांची उत्तरे मिळाल्यानंतर.

इरसाल's picture

12 Sep 2012 - 5:39 pm | इरसाल

प्रश्न विचारता ब्वॉ तुम्ही ?

पैसीण प्रश्नकर्ते

जेनी...'s picture

13 Sep 2012 - 9:33 am | जेनी...

दु.दु. आणि साय ..
कायतरी घोटाळा हाय ;)
:P

प्रचेतस's picture

13 Sep 2012 - 9:48 am | प्रचेतस

बाकी ही साय ली-ला-धराला इतकी का आवडते ब्वॉ?

प्रभाकर पेठकर's picture

13 Sep 2012 - 9:59 am | प्रभाकर पेठकर

काही प्रश्न चारचौघात विचारता येत नाहीत, हेच खरे.

लीलाधर's picture

13 Sep 2012 - 10:05 am | लीलाधर

अगदी बरोबर म्हणालात ओ काका तुमच्याशी सहमत ;)

ज्ञानराम's picture

13 Sep 2012 - 10:33 am | ज्ञानराम

गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात, ( गोर्‍या गोर्‍या रंगाची गाय आणू घरात !!)
कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात! (कधी घेऊन येशील रे हम्माला घरात? )
वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय, (गाय येता घरी मिळेल ताजी ताजी साय ....)
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? ( दादा ,दु दु देणारी हम्मा कुठाय?? )

अस लिहा हव तर.....

विडंबन येऊद्यात आत्मा अत्रुप्त आहे वाचायला...

अत्रुप्त आत्मा's picture

13 Sep 2012 - 10:52 am | अत्रुप्त आत्मा

@विडंबन येऊद्यात आत्मा अत्रुप्त आहे वाचायला...>>> आणी आत्मा अत्रुप्त आहे,तुंम्ही खोचक प्रतिसाद दिलात,तर तुंम्हाला भसकन टोचायला
आत्मा मेरा नाम

ज्ञानराम's picture

13 Sep 2012 - 11:03 am | ज्ञानराम

@विडंबन येऊद्यात आत्मा अत्रुप्त आहे वाचायला...>>> आणी आत्मा अत्रुप्त आहे,तुंम्ही खोचक प्रतिसाद दिलात,तर तुंम्हाला भसकन टोचायला
:)
हे आवडले ! छान यम - क जुळवले आहे.

;)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Sep 2012 - 11:26 am | अत्रुप्त आत्मा

@छान यम - क जुळवले आहे. >>> :-D चांगल मस्त - क चालतय की तुमचं! :-p

काहि म्हणा साय(ली)लाधराला खुप आवडते ,हे सिद्ध झालय आता ;)

५० फक्त's picture

13 Sep 2012 - 11:15 am | ५० फक्त

बापरे काय ती प्रतिभा वेस्टनाची हौस.

बॅटमॅन's picture

13 Sep 2012 - 11:21 am | बॅटमॅन

आता प्रतिभा आणि कुठे आली मध्येच ;)

५० फक्त's picture

13 Sep 2012 - 12:08 pm | ५० फक्त

अहो खफवरच्या कविता वाचुन पुजातैच्या प्रतिभेविषयी फार अपेक्षा वाढल्या होत्या, इथं त्यांनी तुका(राम्)दास, असलं ब्रॅकेट मधलं कॉमन लिहायचा प्रयत्न केलेला पाहुन म्हणलं की प्रतिभावेस्टन होतंय असं...

लीलाधर's picture

13 Sep 2012 - 12:14 pm | लीलाधर

>>>>>> अहो खफवरच्या कविता वाचुन पुजातैच्या प्रतिभेविषयी फार अपेक्षा वाढल्या होत्या, इथं त्यांनी तुका(राम्)दास, असलं ब्रॅकेट मधलं कॉमन लिहायचा प्रयत्न केलेला पाहुन

आधीच हौस आणि त्यात पडतोय प्रतिभेचा पौस ओ ;) त्याला काय करणार ?

मोठ्या मोठ्या खफवर छोट्या छोट्या गोष्टी घडणारच ५० राव ;)

बॅटमॅन's picture

13 Sep 2012 - 12:23 pm | बॅटमॅन

"प्रतिभावेस्टन" बेष्ट आवडल्या गेले आहे.

ओ पन्नास ,
तुमाला काय म्हैत नै तर उगा जादा बोलु नका \(
आपल्याला आधी हिस्टोरी म्हैत असावी मग बोलावं
कसं ????? :)

व्हय व्हय आमाला नाय माहित बाई हिस्टोरी, मुलांनो आणि मुलींनो चला हाताची घडी तोंडावर बोट, गपगुमान बसा बरं एक लाईन धरुन, पुजाबै सायेच्या मायेची गोट्ष पाट म्हनुन्श्यान दावनार आहेत,

चला सुरु कराओ पुजाबै तुमी...

शैलेन्द्र's picture

13 Sep 2012 - 12:21 pm | शैलेन्द्र

आयचा घो..

"दादा मला एक वहीणी आण" या गाण्याच कॉलेजात असताना केलेले खंग्री विडंबण आठवलं..

गेले ते दिन गेले.. :(

मी_आहे_ना's picture

13 Sep 2012 - 12:31 pm | मी_आहे_ना

ते विडंबन इथे टंकवून आमच्यासाठी ते दिन परत आणा की ओ...
:)

शैलेन्द्र's picture

13 Sep 2012 - 12:50 pm | शैलेन्द्र

इथे "हैदोस" घालयला नको.. :)

स्पा's picture

13 Sep 2012 - 12:26 pm | स्पा

"दादा मला एक वहीणी आण" या गाण्याच कॉलेजात असताना केलेले खंग्री विडंबण आठवलं..

हो आम्ही बी पिकनिक गाण्यांसाठी याच एक खास विडंबन केल्याचे स्मरते

सस्नेह's picture

13 Sep 2012 - 3:10 pm | सस्नेह

शाळेत असताना पीटीचे सर 'दादा मला एक वहिणी...'च्या तालावर ड्रम बडवून आम्हाला पीटी करायला लावायचे त्याची आठवण आली.

अन्या दातार's picture

13 Sep 2012 - 3:21 pm | अन्या दातार

'दादा मला एक वहिणी...'च्या तालावर ड्रम बडवून आम्हाला पीटी करायला लावायचे

या गाण्यावर पीटी??? देवा!!!

>>How pity!
असेच म्हणतो.

बाकी 'वहिणी' हा शब्द व्याकरणदृष्ट्या काळजाला भिडला.

५० फक्त's picture

13 Sep 2012 - 3:44 pm | ५० फक्त

सोलापुरात - मी कशाला आरशात पाहु ग $$$$$$$$$$ मीच माझ्या रुपाची राणी ग$$$$$$$ या गाण्यावर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी ढोल वाजवतात, आहात कुठं अन्याजी दातार.

रेवती's picture

13 Sep 2012 - 7:32 pm | रेवती

अरे माझ्या देवा ऽऽऽ!
या गाण्याच्या चालीवर पीटी चाललीये असं डोळ्यासमोर आलं आणि हसून मुरकुंडी वळली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2012 - 4:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:) आवडेश.

वरुन दहाव्या नंबरच्या ओळीनं घोळ घातला पाहा.
नै तर वहिनीची आतुरता जवळ जवळ कवितेतून पोहचली होती.

[रसग्रहणाला घेऊ का काय ही कविता ]

-दिलीप बिरुटे

गणामास्तर's picture

13 Sep 2012 - 7:18 pm | गणामास्तर

आयला. हे कसं सुटलं ब्वॉ नजरेतून.
पब्लीकला हैदोस घालायला चिक्कार वाव असून त्यातल्या त्यात कमीचं घातलाय की. ;)
बाकी कवी आणि बुवांशी याविषयी सविस्तर चर्चा शनिवारी करण्यात येईल.

बॅटमॅन's picture

14 Sep 2012 - 11:17 am | बॅटमॅन

पब्लीकला हैदोस घालायला चिक्कार वाव असून त्यातल्या त्यात कमीचं घातलाय की.

बाडीस. पीतग्रंथविद्याविभूषितांची मांदियाळी असूनदेखील असे कसे ;)

वहिनीला मातृरुपी, वडाची का होईना छाया वगैरे म्हणणं ठीक आहे पण वहिनीच्या गोर्‍या, सायीसारख्या अंगाबद्दल कश्याला दिरानं बोलावं? हा प्रश्न पडला. ही कवीता दादाच्या नजरेस पडली तर काही खरे नाही. ;)

लीलाधर's picture

13 Sep 2012 - 8:10 pm | लीलाधर

आहे ना तुझ्या प्रश्नाचे उत्तर इथे चाललेल्या चर्चेतच आहे गो जरा नीट बघून घे बरे ;)

तिमा's picture

13 Sep 2012 - 7:47 pm | तिमा

या कवितेत गूढ अर्थ भरलेला आहे. यावर एखादा 'सायस्पर्श' निघू शकेल.

ज्ञानराम's picture

14 Sep 2012 - 9:08 am | ज्ञानराम

'सायस्पर्श' <<<<<<<<, आवडल्या गेले आहे...:bigsmile:

अर्धवट's picture

14 Sep 2012 - 12:35 pm | अर्धवट

त्याचं क'साय'.. असलं प'साय'दान लिहील्यावर फ'साय'चेच प्रसंग अधीक हो. ;)

च्यामारी... लीलीधराच्या या सायलीली ? ;)

कविने वापरलेलं साय हे रुपक आणि वहिनी घरात आल्यावर मिळणारी साय पाहता कवीची भावी वैनी चितळ्यांची, आरे डेरी वाल्यांची थोडक्यात कुठल्यातरी डेअरीवाल्यांची पुतणी किंवा मुलगी असावी. लग्नानंतर तिला एखादी दुग्धफॅक्टरी आंदण म्हणून मिळणार असावी, असं वाटतंय.

वा वा.. चितळेंपैकी का? म्हणजे ताजी बाकरवडीही घरबसल्या.. वेळेचं बंधन नाही..

सर्वच बोटं तुपात..

आरेपैकी नसावी वहिनी.. नाहीतर कवी वहिनी आली की एनर्जी मिळेल असं म्हणाला असता..

मदनबाण's picture

14 Sep 2012 - 7:02 pm | मदनबाण

नाहीतर कवी वहिनी आली की एनर्जी मिळेल असं म्हणाला असता..
हॅहॅहॅ... ;)

इइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
कै च्या कैच लिहितात बै हे लोक.....\(

भावनांची किती ही उधळपट्टी आँ?

पूजाबै, येवढी काही वैट्ट नाय हों कविता चचाची. पाल पडल्यागत काय किंचाळताय.

बॅटमॅन's picture

14 Sep 2012 - 6:32 pm | बॅटमॅन

अहो बैंना किनै लैसन्स टु स्क्रीम आहे असं म्हंटात ;)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Sep 2012 - 6:38 pm | अत्रुप्त आत्मा

@येवढी काही वैट्ट नाय हों कविता चचाची.>>> त्या प्रतिसादांबद्दल बोलताहेत,,, :-p
होय ना गं बालिके...? :)

अहो सुडपंत ..मी त्या गविंच्या एनर्जी पोस्ट बद्दल बोलली \(

आले लगेच आग लावायला .......\(

होशी जरि लवकरी इतकी लाल तू रागाने |
काये कवण करु धजैल बापडा आगीने ;)

बॅटमॅन's picture

11 May 2015 - 2:19 pm | बॅटमॅन

तमिळ अन तेलुगुमध्ये पाल म्हणजे दूध बरंका.

लयीच स्निग्धांश ह्ये सायीत ..आपलं कवितेत...

स्पा's picture

28 Feb 2013 - 4:32 pm | स्पा

काय लिलाध्रा
साय दिली कि नाय वैणीने अजून

गणामास्तर's picture

28 Feb 2013 - 5:08 pm | गणामास्तर

=)) =)) =))

बॅटमॅन's picture

28 Feb 2013 - 5:17 pm | बॅटमॅन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

स्पा's picture

28 Feb 2013 - 5:21 pm | स्पा

=))

प्रचेतस's picture

28 Feb 2013 - 6:21 pm | प्रचेतस

aaa

दूध तापवता येत नाय वाट्टं धाक्ल्या दीराना :)

प्रसाद गोडबोले's picture

28 Feb 2013 - 7:42 pm | प्रसाद गोडबोले

गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया,
साईसारखी काया तीची वडरुपी छाया,

लैच अचाट उडी आहे ही .... वडाच्या झाडाखाली दुध तापवतात काय तुमच्याकडे ?
त्याशिवाय असली कल्पना सुचणे म्हणजे अशक्यच....
_/\_

लॉरी टांगटूंगकर's picture

27 Aug 2013 - 11:06 pm | लॉरी टांगटूंगकर

झाडाखाली दुध तापवतात =) =)

फिरंगी's picture

28 Feb 2013 - 7:51 pm | फिरंगी

किती वेळ झाला ..... मनातल विडंबन काही बाहेर येत नाही ................. वाट पाहतो .......

अधिराज's picture

28 Feb 2013 - 8:06 pm | अधिराज

तुमच्या असल्या लिला बघून वहिनी पळून जायची.

फिरंगी's picture

28 Feb 2013 - 8:52 pm | फिरंगी

वहीनी पुराण संपवा आणि विडंबन एकवा आता...................

या कवितेतला दादा कोण म्हणायचा? आहे का अजून तो?

तुम्हास आत्मूदादा अपेक्षित आहे काय?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2013 - 11:45 pm | अत्रुप्त आत्मा

@आत्मूदादा अपेक्षित आहे काय?>> http://www.sherv.net/cm/emo/angry/pulling-hair-out.gif दुष्ट खौट अगोबा...
अगोबा....आत्मा
http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/frying-pan-smash.gif

अच्छा. म्हणजे या कवितेतले दादा तुम्हीच का? मला वाटलं की काल्पनिक कविता आहे.

अभ्या..'s picture

1 Mar 2013 - 12:04 am | अभ्या..

अस्तित्वात दादा आहेत, कविता आहे, साय आहे, फक्त वहिनी तेवढी सध्या काल्पनिक आहे. :)

सूड's picture

1 Mar 2013 - 12:05 am | सूड

मला पण ही कविता (पक्षी: विडंबन) काल्पनिक आहे असं वाटत होतं अजूनपर्यंत.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2013 - 12:18 am | अत्रुप्त आत्मा

@ म्हणजे या कवितेतले दादा तुम्हीच का?>>> तुंम्ही कित्तिही काहिही जरी म्हणलात,तरी..

तो मी नव्हेच!!!

http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

भिकापाटील's picture

28 Feb 2013 - 10:30 pm | भिकापाटील

स्पा काकाचे धन्यवाद. वर आणल्याबद्दल.
नाहीतर आम्ही कविवर्य लीलाधराच्या ह्या वाडःमयीन कलाकृतीस मुकलो असतो.

अवांतरः वहिनी बहूधा वडराची आहे नि तीचे नाव छाया आहे.

तिमा's picture

3 Mar 2013 - 2:24 pm | तिमा

ह्या कवितेवर आधारित 'साय'को चित्रपट काढण्याच्या विचारात आहेत काही प्रोड्यूसर्स!