खजुराहो
प्रोजेक्ट मेघदूतच्या निमित्ताने मध्य भारत पालथा घालताना आमच्या ग्रुपने खजुराहोलाही भेट दिली. वल्लीचा लोणी-भापकरचा धागा वाचताना प्रतिसादात आलेल्या खजुराहोच्या उल्लेखामुळे खजुराहोची अधिक माहिती व्हावी यासाठी हा धागा काढत आहे.
खजुराहो येथील मंदिरांची बांधणी इ.स. ९५० ते इ.स. ११५० या दरम्यान चंदेल राजांनी केली. खजुराहोचा त्या काळचा परिसर हा अत्यंत दुर्गम व जंगलाने वेढलेला असा होता. परचक्रांपासून या मंदिरांना अनायासेच संरक्षण मिळत असल्याने आजपर्यंत ती (त्यामानाने) सुस्थितीत आहेत. मंदिरांचे एकूण ३ गट आहेत (दक्षिण, पूर्व व पश्चिम); पैकी वेळेअभावी फक्त दक्षिण भागातील मंदिरांना भेट देता आली. एक गट बघण्यासाठी कमीत कमी एक दिवस लागतो. प्रत्येक मंदिर हे कोणत्या ना कोणत्या तरी देवतेस समर्पित केले आहे. चला बघूयात काही प्रकाशचित्रे:
१
२
३
४
५
ही तर फक्त झलक आहे. अजून मंदिरांचे डिटेल्स बघायचे बाकी आहेत बर का!
६
हे चंदेल राज्याचे राजचिन्ह असावे असा अंदाज आहे. दक्षिण विभागात अनेक ठिकाणी हे शिल्प बघायला मिळते. मंदिराच्या चारही कोपर्यात आढळते.
७ घोडदळ
८ हत्तीदळ व सेवक
९: स्तंभ
१०: यक्षांनी तोलून धरलेले छत
११: सभामंडपातील घुमटात असलेले नक्षीकाम
प्रत्येक मंदिरातील घुमटात वेगवेगळे नक्षीकाम केलेले आढळते.
१२: अजून एक घुमट
१३: बाहेरील बाजूस खांबांवर असणारे चिन्हः
१४: कलाकुसरयुक्त दरवाजा
आता वळूयात इतर शिल्पांकडे. खजुराहो हे जरी मैथुन शिल्पांसाठी ओळखले जात असले तरी इतर शिल्पेही प्रचंड सुंदर आहेत. मैथुन शिल्पे संख्येने कमी आहेत. फारफार तर १०-१५% असतील. पण त्याची इतकी हवा होण्याचे एक कारण म्हणजे मैथुनाविषयी असलेला समाजाचा दृष्टीकोन. एक टॅबू म्हणून बघितले जाणे याउपर त्याचे कारण मलातरी वाटले नाही.
मैथुन शिल्पांची जागाही ठरलेली आहे. सभामंडप व गर्भगृह यांना जोडणार्या भागातच ही शिल्पे कोरली आहेत. इतर कोणत्याही ठिकाणी तशी शिल्पे दिसत नाहीत.
१५: अष्टभुज गणपती:
१६: यज्ञवराह शिल्प
१७: जोत्यावरील नक्षीकामः
१८: देवादिकांची प्रमाणबद्ध शिल्पे:
१९:
कळसापर्यंत अशीच प्रमाणबद्ध शिल्पे पाहून डोळे दिपले नाहीत तरच नवल. २ शिल्पांमध्ये काही म्हणजे काहीही फरक दिसत नाही. आज जग सिक्ससिग्मा-सिक्ससिग्मा म्हणून नाचतंय; त्या काळात अशी कोणती सिस्टीम असावी? हे सर्व काम मानवी हातांनी! काय ते कौशल्य, चिकाटी! खरंच आपण प्रगती केली म्हणजे नक्की काय केलं? हा प्रश्न घेऊनच मी बाहेर पडलो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
निव्वळ अप्रतिम रे. १-४ मधील
अन्याराव काय बोलू लका आता?
सुंदर.
मस्त रे, १५ ऑगस्टला सिन्नर
१९७९ मधे
अप्रतिम
वल्ली & अन्या
प्रतिकात्मक. मुळात भारवाहक
धन्यवाद वल्ली
@ बॅटमॅन, चित्रगुप्त, अभिजीत,
आता होवुन जाऊ देत
फोटो अप्रतिमच. विशेषतः
झक्कास. इतके दिवस खजुराहो
सुंदर!!!
अप्रतिम.
प्रकल्प मेघदूत
मस्त फोटो दातार साहेब,
अप्रतिम.
जबरी फोटू... तो
मस्तच आहेत फोटो.
बाकीची छायाचित्रे कुठे
कही तरी अद्अभुत
अप्रतिम
सुंदर
विस्तारभयास्तव काही फोटो
यज्ञवराह लैच भारी रे.
+१. लैच जबरा आहे यज्ञवराह.
यहीच बोल्ता है...!
अहो पण खजुराहो येथे अजूनही
याबद्दलच बोलताय ना?
हो..
सुरेख छायाचित्रे !
सुरेख छायाचित्रे !
मस्त
उत्तम छायाचित्रे व माहिती
वा! मस्त!
खजुराहो दर्शन बसल्या बसल्या
उत्तम माहिती व छायाचित्रे !!
उत्तम
खजुराहो शिर्षक वाचून थोडा भीत
यातील काही नवे काम
धन्यवाद.
वाह !
मस्तच एकदम
अप्रतिम!
(No subject)
यज्ञवराह, गणेश शिल्प काय
वरील
मस्तच लिहीले आहेस! काही
अन्या जबरी फोटू रे वर्णन