ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार "मैत्री दिन" म्हणून ओळखला जातो.प्रत्येक वेळी आपण मैत्रीचे गोडवे कायम गात असतो पण त्याच "कडवाहट सच" पण पाहू कधीतरी. मैत्रीतच कधी स्वार्थही दडलेला असतो.(सगळ्याच नाही),मला एक जाहिरात आठवली "जो तेरा है वो मेरा है, जो मेरा है वो तेरा है " पण सध्या उलट आहे "जो तेरा है वो मेरा है जो मेरा है वो भी मेरा है " अशी सद्यस्थिती आहे .हल्ली सोशल नेट्वर्किंगच्या माध्यामातून बिझनेसच्या फायद्यासाठी मैत्री करतात. त्यात गुन्हा नाही उलट मैत्री मदतच करेल . पण जो त्यात मदत करू शकत नाही म्हणून त्याची मैत्रीची किंमंत शून्य करावी हे चूक आहे. माझ्या अनुभवात मी कायम स्वार्थच अनुभवला. अशी मैत्रीची खूप उदाहरणे आहेत सांगू तितकी कमीच आहेत. त्यातलं एक उदाहरण मी जेव्हा ५ वी ला होते तेव्हा माझी एक मैत्रीण होती अगदी जवळची,माझे बाबा शाळेत नोकरीला होते. एकदा तिच्या भावाची निबंध वही हरवली म्हणून माझ्याकडे आली, आणि बाबांना म्हणाली की काका, मला निबंध वही हवी होती, मला मिळू शकेल का ? बाबा म्हणाले तशी आम्हाला देण्याची परवानगी नाही तरी पण एखादा रफ गठ्ठा सापडला तर त्यातली एक वही देईन. शाळेकडून पैसे भरल्यास ती मिळेल सुद्धा .. पण पैसे भरून शक्य नव्हते.कारण तिचे बाबा तिला पैसे देणार नव्हते .. मग ओके म्हणाली, त्यानंतर सारखे मला फोन,भेटणे आमचे झाले.. बाबांना ती वही मिळाली आणि (फुकट) तिच्या हातात मिळाली. ही सारी खटपट केवळ मैत्रीसाठी केली. असो तीच मैत्रीण आता गायब झाली. हो पण वाईट वेळेला ती मात्र साथ देते तेही "डिवचण्यासाठी".... अजून एक प्रसंग शाळेत असतानाचाच .. शास्त्र प्रयोग करायचा होता.दोघी दोघींनी मिळून . त्यात मला आई बाबांनी मदत केली होती. मी सगळ मोडेल बनवले होते आणि ती आयती थिअरी वाचून दाखविली.म्हणजे यात कष्ट माझ्या आई वडिलांचे माझे आणि क्रेडीट तिने घ्यायचे. तरी पण मी कधीही अपेक्षा केली नाही.असे अनेक अनुभव आहेत. आजही मी पाहते मैत्री फक्त दिखावू आहे. स्वार्थ,फसवणूक, विश्वासघात करणे,काही लोक मैत्रीची व्याख्या बदलवतात. जिथे आपण म्हणत होतो की "संकटकाळी जो धावून येईल ती मैत्री". आता म्हणव लागेल, संकटकाळी जो फसवून , विश्वासघात करून, अथवा दुखावून जाईल तीच खरी मैत्री ". आणि त्यात सोशल नेट्वर्किंग च्या माध्यमात हवे तेवढे शो ऑफ करता येते. खूप दिवसांनी मैत्रीण आली की तुझे स्वागत आहे अशी पोस्ट करायची आणि मग बरेच दिवस झाले की मग रंग दाखवायला सुरुवात करायची. किंवा कोणी कुठे जाणार असेल की निरोप समारंभ करायचा ही गोष्ट अगदी चांगली आहे.पण त्यातही कुचकेपणा दाखवायचा हल्ली मी काही बोलत नाही, भांडणे होतात, तुम्हीच ठरवा... असे बोलून जुने वाद उकरता येते का ते पाहायचे आणि वाद झाल्यास युनिटी दाखवायची एकाच पुढे... हे सारे गमतीशीरच आहे. जाऊ दे मैत्रीचे अनेक रंग असतात.
पण मला वाटते मैत्री असावी तर कृष्ण-सुदाम्यासारखी. यांचा आदर्श प्रत्येकाने ठेवला तर समजेल मैत्री काय असते ते. कृष्णाने सुदाम्यात असे काय पहिले होते की त्याने त्याची मैत्री ठेवावी. मित्रांनो मैत्रीसाठी तो गरीब श्रीमंत,काळा गोरा, हुशार मट्ठ, बुटका जाड हे सारे पाहण्याची गरज नसते. मैत्री अथवा कोणतेही नाते हे निखळ,निर्मळ, पारदर्शक,प्रामाणिकपणा, आपुलकी, आणि सर्वात महत्वाचे विश्वासाच्या पायावर उभे असते. आपल्याला जर एखाद्या मैत्रीसाठी काही करता येत नसेल तर किमान दुखवू तरी नका.
मैत्रीच्या तुटण्याला खरे कारण
मित्र मैत्रिणींचे बेजबाबदार वागणे
अविश्वास,विनाकारण उपदेश करणं
अप्रामाणिकपणा, धोखा देणं कारणीभूत
हे आता नको जगाला सदा सांगणे
मित्रहो कसे जगावे त्या निर्मळ मैत्रीने
आयुष्यभर माणूस मैत्रीच्या मायानदीत गटांगळ्या खात असतो. या मैत्रीच्या माया नदीचे खाच खळगे, चढ उतार , डोह सर्व काही माणूस स्वतःसाठी निर्माण करतो.इतर कोणी त्याला या मैत्रीच्या माया नदीत डूबवत नाहीत .फक्त स्वता:च्या चुका झाकण्यासाठी माणूस दुसर्याकडे बोट करतो.त्याच्यासाठी त्याच्यामुळे ,त्याच्यापुढे आपले काहीच चालत नाही.म्हणून आपल्याकडून या चुका झाल्या म्हणण्यात अर्थ नाही. मुळात आपली कमजोर मानसिकता, आत्मविश्वासाचा अभाव स्वार्थी वृत्ती, मी पणा हेच आपणाला मैत्रीच्या माया नदीत दुबवत असतात. मैत्रीची ही मायानदी ईर्ष्या, द्वेष , मत्सर,अहंकार,क्रोध, लोभ आदींनी पूर्ण भरलेली आहे त्यामुळे यांच्या जानिवेशिवाय या मैत्रीच्या मायानादीत राहणे अत्यंत अवघड आहे. परंतु चांगल्या भक्कम विचारांच्या किनाऱ्यावर उभं राहून निस्वार्थ प्रेम,एकी,कर्तव्याची प्रेरणा देणाऱ्या चांगल्या विचारांचे आचरण आपल्या कडून होत असल्याने हे विचार,वर्तन आपल्या पायाच्या किंवा अंगाच्या कोणत्याही भागाला या मैत्रीच्या माया नदितील द्वेष , ईर्ष्या,मत्सर आदींच्या पाण्याचा थेंबही लागू देणार नाही.
सुखी मैत्रीसाठी :
१.दुसऱ्याला सतत विनाकारण ऐकवण, उपदेश करू नका
२. चांगल्या लोकांशी मैत्री करा अन्यथा मैत्री करूच नका.
३. खरी निस्वार्थी मैत्री सर्वश्रेष्ठ आहे.
४. कुणीही चारचौघात त्याची उणीदुणी काढू नका
५. परिस्थितीची जाण ठेवणारा असावा जेणेकरून आपण शेअर केलेली प्रत्येक गोष्ट अथवा परिस्थितीची तो थट्टा इतरांसमोर करू नये.
६. मदत करता आली नाही तरी त्या क्षणी समोरच्याला दुखवू नका .
७. जमल तर चांगल बोला अन्यथा वाईटही बोलू नका.
शेवटी माझी एवढीच प्रार्थना आहे .. माझ्या सर्व मित्र मैत्रिणीसाठी (जे बोलत आहे /नाहीत )
प्रिय मित्र/मैत्रिणींनो,
तुझ्या जीवनात
दुःख कधी येऊ नये
मी प्रार्थनाच करीत असते
माझे सारे सुख तुला मिळावे
फुलांचा वर्षाव होवो तुझ्या जीवनात
आणि आयुष्यही लाभावे मोठे
तुझ्या वाटेचे सारे माझ्या
जीवनात यावे काटे
साऱ्या जगाचे सुख
तुझ्या पदरी पडावे
तू कधी रडलास /रडलीसच तर
अश्रू माझ्या डोळ्यातून पडावे .....
वाचन संख्या
8593
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर स्वागत!
धन्यवाद .. मी सहमत आहे
In reply to मिपावर स्वागत! by पैसा
त्या त्या वेळेची जी गरज असेल
In reply to मिपावर स्वागत! by पैसा
>>अवांतर: तुम्हाला कडवा सच
In reply to त्या त्या वेळेची जी गरज असेल by रेवती
कुलमयुViewवाचनखुणाTrackकुलमय
धन्यवाद , पहिली बाजू जरूर
In reply to कुलमयुViewवाचनखुणाTrackकुलमय by सूड
अहो ती सही आहे. ती कुणा एकाला
In reply to धन्यवाद , पहिली बाजू जरूर by कुलमयु
'कडवाहट' पोहोचली, .. 'सच'
धन्यवाद .... नक्कीच जमेल
In reply to 'कडवाहट' पोहोचली, .. 'सच' by मनीषा
हम्म ... आणि असंच मलाही कुणी
In reply to धन्यवाद .... नक्कीच जमेल by कुलमयु
तुम्ही भडकमकर मास्तरांच्या
छे छे , तेच तर सांगू शकत नाही
In reply to तुम्ही भडकमकर मास्तरांच्या by आंबोळी
प्रत्तेक प्रतिसादाला
In reply to छे छे , तेच तर सांगू शकत नाही by कुलमयु
अव्व्व्व
In reply to प्रत्तेक प्रतिसादाला by आंबोळी
लेख आवड्ला आणि पटला
धन्यवाद ..शेवटी अनुभव इकडून
In reply to लेख आवड्ला आणि पटला by स्मिता शितूत
आत्मपरिक्षण..
हा धागा अन
अपेक्षा
वेल्कम
एवढा पाळा
एयरटेल आणि अन्य जाहीराती
चांगलय की...
In reply to एयरटेल आणि अन्य जाहीराती by llपुण्याचे पेशवेll
पोरगा पोरीचे हातच हातात घेतोय
In reply to चांगलय की... by मन१
चिवळणे हा शब्दप्रयोग आवडला.
In reply to पोरगा पोरीचे हातच हातात घेतोय by llपुण्याचे पेशवेll
अधनस्य कुतः: मित्रं
विविध प्रकारचे धन.
In reply to अधनस्य कुतः: मित्रं by प्रकाश घाटपांडे
सहमत आहे.
In reply to विविध प्रकारचे धन. by प्रभाकर पेठकर