Skip to main content

मैत्रीच्या नाण्याची दुसरी बाजू --- एक कडवाहट सच

लेखक कुलमयु
Published on गुरुवार, 16/08/2012
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार "मैत्री दिन" म्हणून ओळखला जातो.प्रत्येक वेळी आपण मैत्रीचे गोडवे कायम गात असतो पण त्याच "कडवाहट सच" पण पाहू कधीतरी. मैत्रीतच कधी स्वार्थही दडलेला असतो.(सगळ्याच नाही),मला एक जाहिरात आठवली "जो तेरा है वो मेरा है, जो मेरा है वो तेरा है " पण सध्या उलट आहे "जो तेरा है वो मेरा है जो मेरा है वो भी मेरा है " अशी सद्यस्थिती आहे .हल्ली सोशल नेट्वर्किंगच्या माध्यामातून बिझनेसच्या फायद्यासाठी मैत्री करतात. त्यात गुन्हा नाही उलट मैत्री मदतच करेल . पण जो त्यात मदत करू शकत नाही म्हणून त्याची मैत्रीची किंमंत शून्य करावी हे चूक आहे. माझ्या अनुभवात मी कायम स्वार्थच अनुभवला. अशी मैत्रीची खूप उदाहरणे आहेत सांगू तितकी कमीच आहेत. त्यातलं एक उदाहरण मी जेव्हा ५ वी ला होते तेव्हा माझी एक मैत्रीण होती अगदी जवळची,माझे बाबा शाळेत नोकरीला होते. एकदा तिच्या भावाची निबंध वही हरवली म्हणून माझ्याकडे आली, आणि बाबांना म्हणाली की काका, मला निबंध वही हवी होती, मला मिळू शकेल का ? बाबा म्हणाले तशी आम्हाला देण्याची परवानगी नाही तरी पण एखादा रफ गठ्ठा सापडला तर त्यातली एक वही देईन. शाळेकडून पैसे भरल्यास ती मिळेल सुद्धा .. पण पैसे भरून शक्य नव्हते.कारण तिचे बाबा तिला पैसे देणार नव्हते .. मग ओके म्हणाली, त्यानंतर सारखे मला फोन,भेटणे आमचे झाले.. बाबांना ती वही मिळाली आणि (फुकट) तिच्या हातात मिळाली. ही सारी खटपट केवळ मैत्रीसाठी केली. असो तीच मैत्रीण आता गायब झाली. हो पण वाईट वेळेला ती मात्र साथ देते तेही "डिवचण्यासाठी".... अजून एक प्रसंग शाळेत असतानाचाच .. शास्त्र प्रयोग करायचा होता.दोघी दोघींनी मिळून . त्यात मला आई बाबांनी मदत केली होती. मी सगळ मोडेल बनवले होते आणि ती आयती थिअरी वाचून दाखविली.म्हणजे यात कष्ट माझ्या आई वडिलांचे माझे आणि क्रेडीट तिने घ्यायचे. तरी पण मी कधीही अपेक्षा केली नाही.असे अनेक अनुभव आहेत. आजही मी पाहते मैत्री फक्त दिखावू आहे. स्वार्थ,फसवणूक, विश्वासघात करणे,काही लोक मैत्रीची व्याख्या बदलवतात. जिथे आपण म्हणत होतो की "संकटकाळी जो धावून येईल ती मैत्री". आता म्हणव लागेल, संकटकाळी जो फसवून , विश्वासघात करून, अथवा दुखावून जाईल तीच खरी मैत्री ". आणि त्यात सोशल नेट्वर्किंग च्या माध्यमात हवे तेवढे शो ऑफ करता येते. खूप दिवसांनी मैत्रीण आली की तुझे स्वागत आहे अशी पोस्ट करायची आणि मग बरेच दिवस झाले की मग रंग दाखवायला सुरुवात करायची. किंवा कोणी कुठे जाणार असेल की निरोप समारंभ करायचा ही गोष्ट अगदी चांगली आहे.पण त्यातही कुचकेपणा दाखवायचा हल्ली मी काही बोलत नाही, भांडणे होतात, तुम्हीच ठरवा... असे बोलून जुने वाद उकरता येते का ते पाहायचे आणि वाद झाल्यास युनिटी दाखवायची एकाच पुढे... हे सारे गमतीशीरच आहे. जाऊ दे मैत्रीचे अनेक रंग असतात. पण मला वाटते मैत्री असावी तर कृष्ण-सुदाम्यासारखी. यांचा आदर्श प्रत्येकाने ठेवला तर समजेल मैत्री काय असते ते. कृष्णाने सुदाम्यात असे काय पहिले होते की त्याने त्याची मैत्री ठेवावी. मित्रांनो मैत्रीसाठी तो गरीब श्रीमंत,काळा गोरा, हुशार मट्ठ, बुटका जाड हे सारे पाहण्याची गरज नसते. मैत्री अथवा कोणतेही नाते हे निखळ,निर्मळ, पारदर्शक,प्रामाणिकपणा, आपुलकी, आणि सर्वात महत्वाचे विश्वासाच्या पायावर उभे असते. आपल्याला जर एखाद्या मैत्रीसाठी काही करता येत नसेल तर किमान दुखवू तरी नका. मैत्रीच्या तुटण्याला खरे कारण मित्र मैत्रिणींचे बेजबाबदार वागणे अविश्वास,विनाकारण उपदेश करणं अप्रामाणिकपणा, धोखा देणं कारणीभूत हे आता नको जगाला सदा सांगणे मित्रहो कसे जगावे त्या निर्मळ मैत्रीने आयुष्यभर माणूस मैत्रीच्या मायानदीत गटांगळ्या खात असतो. या मैत्रीच्या माया नदीचे खाच खळगे, चढ उतार , डोह सर्व काही माणूस स्वतःसाठी निर्माण करतो.इतर कोणी त्याला या मैत्रीच्या माया नदीत डूबवत नाहीत .फक्त स्वता:च्या चुका झाकण्यासाठी माणूस दुसर्याकडे बोट करतो.त्याच्यासाठी त्याच्यामुळे ,त्याच्यापुढे आपले काहीच चालत नाही.म्हणून आपल्याकडून या चुका झाल्या म्हणण्यात अर्थ नाही. मुळात आपली कमजोर मानसिकता, आत्मविश्वासाचा अभाव स्वार्थी वृत्ती, मी पणा हेच आपणाला मैत्रीच्या माया नदीत दुबवत असतात. मैत्रीची ही मायानदी ईर्ष्या, द्वेष , मत्सर,अहंकार,क्रोध, लोभ आदींनी पूर्ण भरलेली आहे त्यामुळे यांच्या जानिवेशिवाय या मैत्रीच्या मायानादीत राहणे अत्यंत अवघड आहे. परंतु चांगल्या भक्कम विचारांच्या किनाऱ्यावर उभं राहून निस्वार्थ प्रेम,एकी,कर्तव्याची प्रेरणा देणाऱ्या चांगल्या विचारांचे आचरण आपल्या कडून होत असल्याने हे विचार,वर्तन आपल्या पायाच्या किंवा अंगाच्या कोणत्याही भागाला या मैत्रीच्या माया नदितील द्वेष , ईर्ष्या,मत्सर आदींच्या पाण्याचा थेंबही लागू देणार नाही. सुखी मैत्रीसाठी : १.दुसऱ्याला सतत विनाकारण ऐकवण, उपदेश करू नका २. चांगल्या लोकांशी मैत्री करा अन्यथा मैत्री करूच नका. ३. खरी निस्वार्थी मैत्री सर्वश्रेष्ठ आहे. ४. कुणीही चारचौघात त्याची उणीदुणी काढू नका ५. परिस्थितीची जाण ठेवणारा असावा जेणेकरून आपण शेअर केलेली प्रत्येक गोष्ट अथवा परिस्थितीची तो थट्टा इतरांसमोर करू नये. ६. मदत करता आली नाही तरी त्या क्षणी समोरच्याला दुखवू नका . ७. जमल तर चांगल बोला अन्यथा वाईटही बोलू नका. शेवटी माझी एवढीच प्रार्थना आहे .. माझ्या सर्व मित्र मैत्रिणीसाठी (जे बोलत आहे /नाहीत ) प्रिय मित्र/मैत्रिणींनो, तुझ्या जीवनात दुःख कधी येऊ नये मी प्रार्थनाच करीत असते माझे सारे सुख तुला मिळावे फुलांचा वर्षाव होवो तुझ्या जीवनात आणि आयुष्यही लाभावे मोठे तुझ्या वाटेचे सारे माझ्या जीवनात यावे काटे साऱ्या जगाचे सुख तुझ्या पदरी पडावे तू कधी रडलास /रडलीसच तर अश्रू माझ्या डोळ्यातून पडावे .....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 8593
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

मैत्रीबद्दलचे स्फुट आवडले. राजकारणाप्रमाणेच आंतरजालावर काय किंवा खर्‍या आयुष्यात काय कोणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. हे लक्षात ठेवलं की त्रास होत नाही. त्या त्या वेळेची जी गरज असेल ती पुरी झाली की पुढे चालू लागायचं!

In reply to by पैसा

त्या त्या वेळेची जी गरज असेल ती पुरी झाली की पुढे चालू लागायचं बघा हो मयुबाई. हीच ती निबंधाची वही मिळाल्यानंतर पळून गेलेली आपली मैत्रिण! कशी बरोब्बर सापडली! (पैतै- लैट लेनेका.) ;) अवांतर: तुम्हाला कडवा सच म्हणायचय का?

In reply to by रेवती

>>अवांतर: तुम्हाला कडवा सच म्हणायचय का? असेल असेल. बाकी 'कटूसत्य' शब्द चपखल बसला असता. हल्ली हिंदाळलेल्या मराठीची फ्याशन आहे म्हणे. या लेखातले 'धोखा' वैगरे शब्द हृदय हेलावून गेले. पहिल्या बाजूच्या प्रतिक्षेत (सूड उगवणे)

कुलमयु ViewवाचनखुणाTrackकुलमयु यांची खरडवही इतिहास खरडवही यांची खरडवही बघा. सदस्यं कालावधी १ तास 21 मिनिटे सदस्यत्त्व मिळाल्या मिळाल्या लिहीलेला लेख जमला आहे. पहिल्या बाजूबद्दलही वाचायला आवडेल.

'कडवाहट' पोहोचली, .. 'सच' लक्षात आलं
७. जमल तर चांगल बोला अन्यथा वाईटही बोलू नका.
हे जमेल तितकं आचरणात आणण्याचा नक्की प्रयत्नं करीन.

In reply to by कुलमयु

हम्म ... आणि असंच मलाही कुणी दुखावणार नाही अशी अपेक्षा करणं जास्तं नाही ना होणार? अवांतर : तुमचे विचार, खूपच उच्चं, पवित्र , आणि प्रगल्भ आहेत बरं का ! :)

तुम्ही भडकमकर मास्तरांच्या ड्युआयडी आहात काय? आणि हा धागा म्हणजे छुपा "छिद्रांन्वेशी सम्राटाची डायरी (३)" तर नाही ना?

In reply to by कुलमयु

प्रत्तेक प्रतिसादाला उपप्रतिसाद देण्याच्या स्टाईलने एक जुने काका आठवले..... इतिहास तज्ञ परा(काका रा)जवाडे अधिक प्रकाश टाकू शकतील...

In reply to by आंबोळी

+१ आंबोळी भौ. आम्हाला का नाही 'मिनियापोलिस' वाल्या काकांची आठवण झाली. जरा आयपी मॅच करुन बघा बरे, तेच आहेत का ते. ;)

लेख आवड्ला आणि पटला माझेहि अनुभव असेच आहेत स्वार्थापुर्ति मैत्रि कोणिहि करू नये

In reply to by स्मिता शितूत

धन्यवाद ..शेवटी अनुभव इकडून तिकडून सारखेच .... हल्ली अनुभव मांडले की म्हणण्याची वेळ येते ... काहीतरी नवीन सांग .

एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा विश्वासघात कसा करू शकते? तसे असेल तर चुक आपल्या विश्वास टाकण्यात आहे हे नक्की समजावे. इतरांना सुधारण्यापेक्षा स्वतःला आधी सुधरावे. सततचा विश्वासघात दरवेळी वेगवेगळ्या मित्रां(?)कडून होत असेल तरी आपले मित्र/मैत्रीणी तावूनसुलाखून घेणे हे आपल्या हाती असते. ते जर आपण करत नसू तर ती चुक आपली आहे. म्हणजेच दोन्ही प्रसंगात चुक आपलीच असते. आपल्या चुकांपासून आपण धडा घ्यावा आणि स्वतःला बदलावे. त्या बरोबर जग बदलेल.

हा धागा अन हा धागा एकमेकाला काही सांगताहेत का? कुलमयु धडाधड लिहिताय. व्व्वा!

विश्वास ठेवावा, अपेक्षा नको... ते काही 'रिटर्न ओव्हर इन्व्हेस्टमेंट' नाहीये. 'निखळ' आनंद असावा मैत्रीमध्ये. असो... वाचतोय, येऊद्या अजून.

>>३. खरी निस्वार्थी मैत्री सर्वश्रेष्ठ आहे. >>४. कुणीही चारचौघात त्याची उणीदुणी काढू नका >>७. जमल तर चांगल बोला अन्यथा वाईटही बोलू नका. हे तुम्हीच सांगून तुम्हीच लहानपणीच्या मैत्रीची उणीदुणी काढत आहात .. मला पटलेला एक बेसिक फंडा : नेकी कर ..दरिया मे डाल ..

एयरटेल आणि अन्य जाहीराती म्हणजे केवळ पोकळपणा आहे. मला कळत नाही जो तेरा है वो मेरा म्हणताना ९० टक्के वेळा मुलांचे हात मुलींच्या हातात दाखवून एअरटेल वाले काय साधू इच्छीत आहेत तर आधीच बावचळलेल्या आणि बहकलेल्या किशोरवयीन मुलांचे मार्केट बस्स. सोशलनेटवर्किंग वगैरे सगळा शो आहे. त्यात अगदी जुने जिवलग मित्र मिळाले तरी ते 'जुने' झालेले असतात वर्तमानातला जिवलग मित्र हा वेगळा असतो कारण तो आपल्याला अजूनही जवळ असतो. वपुंचे एक वाक्य आहे 'मैत्री म्हणजे दोन गरजांची स्पर्धा, ज्याची गरज आधी संपली तो आधी उठून गेला'

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पोरगा पोरीचे हातच हातात घेतोय ह्यात काय वाईट आहे समजलं नाही. . पोरगा पोरीचेच हात हातात घेतोय ह्यात काय वाईट आहे समजलं नाही. उद्या पोरगा तसल्या भावनेनें दुसर्‍या पोराचेच हात हातात घेउ लागला तर "शांतम् पापम्" म्हणणारे तुम्ही संस्कृतीरक्षक लोकच पहिले असाल.

In reply to by मन१

पोरगा पोरीचे हातच हातात घेतोय ह्यात काय वाईट आहे समजलं नाही. बारकाईने पाहीलंत तर आम्ही त्याला वाईट म्हटलेले नाही पण तुमच्या मैत्रांपैकी ९० टक्के मैत्रिणीच आहेत का हो? नाही ना? मुलगे जास्त असतील ना! मग मैत्री म्हणजे ९० % ठीकाणी मुलगा आणि मुलगीच एकमेकांना चिवळताना दाखवावे का? आणि खरं सांगायचं तर आम्ही किशोरवयीन होतो तेव्हा मैत्रिणी असण्याची पद्धत होती परंतु चिवळण्याची नव्हती. प्रश्न हा होता की सदर जाहीरात जर किशोरवयीन मुले पाहून बहकत असतील तर ते सर्वथा अयोग्य आहे. नुसतेच एकमेकाना चिवळणारे किती गहीरे मित्र-मैत्रीण आहेत हे सिद्ध होत नसते. पोरगा पोरीचेच हात हातात घेतोय ह्यात काय वाईट आहे समजलं नाही. उद्या पोरगा तसल्या भावनेनें दुसर्‍या पोराचेच हात हातात घेउ लागला तर "शांतम् पापम्" म्हणणारे तुम्ही संस्कृतीरक्षक लोकच पहिले असाल सदर चर्चा विषयात रोख मैत्रीवर असल्याने समलैंगिक्/विषमलैंगिक भावनांचे मुक्त प्रदर्शन या विषयाला पास देत आहे.

आलसस्य कुतो विद्या | अविद्यस्य कुतः धनं| अधनस्य कुतः मित्रं| अमित्रस्य कुतः सुखं|| ( आळशी माणसाला विद्या कुठून येणार? विद्या नसणार्‍या कडे धन कुठून येणार? धन नसणार्‍याकडे मित्र कुठून येणार? व मित्र नसणार्‍याकडे सुख कुठून येणार?) मैत्री हे नात बरचस परस्पर उपयुक्तता मुल्यावर टिकून असत! तुमच उपयुक्ततामूल्य जसजसं कमी होत जातं तस तसं मित्र तुमच्यापासून दूर जायला लागतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

धन नसणार्‍याकडे मित्र कुठून येणार? इथे धन म्हणजे 'पैसा' असा अर्थ अभिप्रेत नसावा. एखाद्याकडे बौद्धीक धन असेल, एखाद्याकडे वैचारिक धन असेल, एखाद्याकडे प्रेमाचे धन असेल तर एखाद्याकडे संस्कृतीचे धन असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुभाषित काराला नेमके कुठले धन अभिप्रेत असावे हे समजत नाही. पण धनाचे वैविध्य मान्य आहे. मुद्दा खरा उपयुक्ततेचा व उपभोगाचा आहे. नुसतेच धन असून काय उपयोग?